Posts

Showing posts from March, 2025

NET PREM 25

 मस्क्युलीन बनायला गेलो  मशीन झालो  फेमिनाईन बनायला गेलो  फेम झालो  आता ह्या दोघांचं काय लोणचं घालू ? इंटरनेटमध्ये पराक्रम भरण्याचे प्रयत्न असफल  आशावादाचा कॉपीराईट कार्पोरेटकडे गेलेला  पिल्स आल्या तर गाफील झालो  शहाणपण दुबळं निघालं शहाणपणात आजारी पडलो  हिरॉईक झालो तर अँटीवूमन असल्याचा धब्बा लागला  डाग धुवायला गेलो तर बायका म्हणाल्या तुला कधीपासून सर्फनं स्पॉन्सर करायला सुरवात केली ? शिव्या दिल्या तर पारदर्शकता हार्श झाली  चॅलेंजमध्ये उभा राहिलो तर संन्यासामुळे व्हॅलिडिटी देता येत नाही म्हणाले  स्टॅण्डर्ड रिस्पॉन्स ठरवता आला नाही  गे न्हवतो गेंना नकार दिला तर परंपरांशी करार केल्याचा आरोप झाला  लेस्बियनांना जागा दिली तर चौथी नवता लेस्बियन आहे का अशी विचारणा झाली  महत्वकांक्षा मश्रुम केल्या  ऍक्टर्स ग्रूम केले  शैवांचा प्रपोगंडा केला  कविता अजेंडा झाली  शहाणपणाच्या साईट्स गहाळ होताना पाहिल्या  माहितीचे महासागर प्लास्टिक पिकवताना पाहिले  स्त्रीवादाने जग बदलले  बायका बदलल्या का...