BALHBODH डिसेंबर
एक सुरा पचवेपर्यंत चालून येतो दुसरा सुरा रक्त वाळवण्यास सवड नाही खुपसण्याची इतकी त्वरा सगळे कसे घाईघाईने रस्त्यावरून आहेत चालले प्रत्येकात चमत्कारिक पृथ्वी जिंकल्याचा तोरा काहींनी तर दिशासुद्धा डोळ्यात ठेवल्या दुसऱ्यांच्या चालले आहेत बस त्यांच्या पाठीमागे भराभरा गर्दी आहे पण मित्र नाही ना कोणी शेजारी आहे झुंड आहे आणि तिच्या दहशतीचा खूनी नखरा एकएकट्याला एक एक जण पाहतो एकांतात दुसऱ्याला समजून खोटा स्वतःस समजतो खरा श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) डिसेंबर लहानपणापासूनच तुम्ही दरवाजे ठेवले उघडे आई भाऊ तुमचे आभार तुम्ही दिले नाहीत कपडे मला कधीच माहीत नव्हता दुष्ट तो शैतान तुम्ही मला धर्माशिवायच दिले जगण्याचे भान सर्व शक्तिमान देवाविषयी दिला नाही ठोसपणा कित्येक म्यानीपुलेशनपासून वाचला माझा भरघोसपणा आभार तुम्ही नाळ कापली वंश कापला वर्ण जात कापले सूर्य काय आहे ते समजावले त्याच्याखालीच माझे शरीर तापले आता चाललोय डौलाने पृथ्वीवर वांड म्हणून सांड बनून समाज बनून करत नाही कुठल्याच व्यक्तीचा खून श्रीधर तिळवे नाईक (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) माहित नाही किती वादळे खाऊन गेल...