BALHBODH डिसेंबर
एक सुरा पचवेपर्यंत चालून येतो दुसरा सुरा
रक्त वाळवण्यास सवड नाही खुपसण्याची इतकी त्वरा
सगळे कसे घाईघाईने रस्त्यावरून आहेत चालले
प्रत्येकात चमत्कारिक पृथ्वी जिंकल्याचा तोरा
गर्दी आहे पण मित्र नाही ना कोणी शेजारी आहे
झुंड आहे आणि तिच्या दहशतीचा खूनी नखरा
एकएकट्याला एक एक जण पाहतो एकांतात
दुसऱ्याला समजून खोटा स्वतःस समजतो खरा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
डिसेंबर
लहानपणापासूनच तुम्ही दरवाजे ठेवले उघडे
आई भाऊ तुमचे आभार तुम्ही दिले नाहीत कपडे
मला कधीच माहीत नव्हता दुष्ट तो शैतान
तुम्ही मला धर्माशिवायच दिले जगण्याचे भान
सर्व शक्तिमान देवाविषयी दिला नाही ठोसपणा
कित्येक म्यानीपुलेशनपासून वाचला माझा भरघोसपणा
आभार तुम्ही नाळ कापली वंश कापला वर्ण जात कापले
सूर्य काय आहे ते समजावले त्याच्याखालीच माझे शरीर तापले
आता चाललोय डौलाने पृथ्वीवर वांड म्हणून सांड बनून
समाज बनून करत नाही कुठल्याच व्यक्तीचा खून
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
माहित नाही किती वादळे खाऊन गेली तुझ्या डोळ्यातील चमक
वाऱ्यासारखी भिरभिरत ठेवते डेली तुझ्या डोळ्यातील चमक
कुठल्याही व्याख्येमध्ये बसत नाही तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य
मला गणित करू देत नाही टॅली तुझ्या डोळ्यातील चमक
तू कधी काय करशील त्याचा अंदाज बांधता येत नाही
पाण्यासम खळाळते पण असते व्हॅली तुझ्या डोळ्यातील चमक
तुला नटायला आवडते नटीसारखे फुलायला फुलासारखे
जंगलाने थेट धाडलेल्या असतात वेली तुझ्या डोळ्यातील चमक
तू नोकरीही करतेस तरी आयुष्याची मालकी सांभाळतेस
संपत नाही स्वभावासारखी नाकेली तुझ्या डोळ्यातील चमक
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
हे सगळे अत्यंत बिघडलेलले आहे
हे झाड पूर्वीच कुणी ओरबाडलेले आहे
तिचे डोळे आता आरोप करत सुटलेत
प्रत्येक स्वप्न म्हणे मी धाडलेले आहे
ओढत नाही तोवरच प्रेमाचा दोर टिकतो
फुलांनी त्याचे मटेरियल घडवलेले आहे
माझे अश्रू फक्त माझ्या बेडने पाहिलेत
त्याचेही काळीज आता अवघडलेले आहे
कवीसुद्धा भेटले की पैशाची चर्चा करतात
इतके शहराचे हवामान बिघडलेले आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
जरी त्याच्या चेहऱ्यावर अळूमाळू आहे
तो नम्र नाही थोडासा लाजाळू आहे
कधीकधी ढगासारखा ओला होतो
एरव्हीं तो स्वभावाने पायाळू आहे
हे खरे की त्याने प्रतिमा सभ्य ठेवलीये
गरजूंना माहित तो किती कृपाळू आहे
संगणक कठोरच निघणार मला शंका नाही
शेवटी त्याच्या मटेरियल मध्ये वाळू आहे
लोणी खाण्याचे दिवस कधीचे संपले
त्यांच्या ताटात वाढलेले आता टाळू आहेत
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मैने ये सोच के आस्मामें पत्थर उछाला नही
चांद भी एक पत्थर है पत्थर से निराला नाही
हिंदुस्तानी हुं सबसे ज्यादा प्यार मां से है
मा से चेहरा अलग है मगर मा से निराला नाही
तय नही कर पाया विराना है या मेरा घर
ठीक तरह से देख सकू दिल में उतना उजाला नही
उसने कहा के मेरे पास जीने का सली का नही
शायद उसे अपने ही घर से किसी ने निकाला नही
अभी भी खुदकुशी करने का मन नही करता
अभी भी जिंदगीमें मेरे इतना घोटाला नही
अभी तो शुरू किया है देखते है कहा पहुंचते है
अभी भी मैने रास्तों को कदमोंके के साईझ मे ढाला नही
फुरसतसे कयामत मे करेंगे जिंदगी का हिसाब
अभी तो मेरी जिंदगी का निकला दिवाला नही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
जीभ वजनाने हलकी पण जड तिची सलगी
तेव्हा जपून वाजव तुझी बोलण्याची हलगी
कधीही लागू शकते ही तुझ्या टाळूला
वाळवंटात जाऊन भेटते अर्थाच्या वाळूला
ती एकच अशी जी आहे देहाबाहेर उपस्थित
कोणालाही कळत नाही कधी कापते कोणाची फीत
बोलण्याआधी विचार कर नेमकेपणाचा पन्नास वेळा
नाहीतर गाळात घेऊन जाईल तिचा गळ तिचा गळा
म्हणून तर तिला दिले आहे तोंड नावाचे म्यान
जरी कुलीन तलवारी सारखी दिसते तिचे व्यभिचारी खानदान
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तुमने क्या कह दिया खुले आम दिवाना मुझे
दुश्मन समझने लगा हैं सारा जमाना मुझे
तेरा दिल क्या उतर गया मेरे दिल में शिद्दतसे
मेरेही दिल मे हुआ मुश्किल आना जाना मुझे
देख पाता हूँ साफ तेरे मेरे बीचका फासला
फिर भी नामुमकिन हो गया हैं समझाना मुझे
तुम हो सपने में तो नींद सुकून की आ जाती है
तुम न हो तो क्या क्या पडता है दिखाना मुझे
आजकल समझाता हूँ हिसाब के लिए सही
कयामतमे तेरे सामने खुदाको पडेगा लाना मुझे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
काय करावे कसे करावे काही कळत नाही
काहीही माझ्याकडे पॉझिटिव्ह वळत नाही
माहित नाही काय असे सर्व काही ठप्प होते
जे जे मी पाळतो आहे ते काही पळत नाही
कारण कळल्याशिवाय निवारण कसे होणार
भावना फक्त तीव्रता देते पण फळफळत नाही
ते प्रत्येक देवापुढे दुसरा देव आणून ठेवतात
नव्या देवांचे काय करायचे मला कळत नाही
अभ्यास करावा वाटत नाही सोडूही शकत नाही
आईभाऊ नाराज कारण रोजची दळणे दळत नाही
कदाचित सायन्स निवडले तीच खरी चूक आहे
आर्ट साईड घ्यावी तर घोडा तिकडे वळत नाही
बोंबलत जाऊ दे वर्षे सारे जे व्हायचे होऊ दे
नाहीतरी जगी कोण जो जगात गोंधळत नाही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
आणि मी प्रेमात पडलो दुसऱ्यांदा
सह्याद्री झाला हिमालय चढलो दुसऱ्यांदा
बर्फ तुटला आणि त्याची नदी झाली
पाण्यातून चालत गेलो दुसऱ्यांदा
तिच्यामुळे एक संस्कृती कळुन आली
मी ही पुन्हा मला सापडलो दुसऱ्यांदा
मला वाटले ती बहुदा गोठलेली आहे
कळले होतो फक्तं विचारात थांबलो दुसऱ्यांदा
आता माझे आकाश सारे स्वच्छ आहे
भरलेला ढग होतो रीता झालो दुसऱ्यांदा
काय घडले पहिल्यांदा आठवत नाही
मी पहिला नव्हतोच होतो दुसरा दुसऱ्यांदा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मी पापच करत जाईन तिचा बुरखा काढताना
मी पापच करत जाईन तिला माझे शरीर वाढताना
मी पापच करत जाईन वासना मिरवताना
मी पापच करत जाईन प्रेम जिरवताना
मी पापच करत जाईन तिच्या इच्छा चुंबतांना
मी पापच करत जाईन तिच्या स्तनावर ओथंबताना
मी पापच करत जाईन तिच्या कानात ओसांडताना
मी पापच करेन तिच्या खांद्यावर आयुष्य सांडताना
मी पापच करत जाईन सेक्स मध्ये आग कापताना
मी पापच करत जाईन स्वतःला तिच्यात चाचपतांना
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)
ज्यांना घरात जायचंय
ते दरवाज्याचे कुलूप काढतात कड्या काढतात आत जातात
ज्यांना बाहेर राहायचंय खिडक्यातून उपदेश करत राहतात
ज्यांच्याजवळ काहीच नसतं
ते वीट वीट जमवत
घरकुल उभा करतात
ज्यांना आयता महाल लाभतो
एक तर तो ते वाढवतात
नवे महाल बांधतात
हे ज्यांना जमत नाही ते पुन्हा महालाच्या खिडक्यातून उपदेश करत राहतात
तेव्हा घर बांधायचं तर घर बांध
घरात जायचं तर दरवाजा उघड
नाहीतर दुसऱ्यांच्या घरात खिडकीतून डोकवताना
तूच विंडो सीट प्रमाणे
विंडो मॅन होशील
खिडकीतून फक्त तुलाच बाहेरुन न्याहाळता येत नाही
घरातल्या लोकांनाही तुला घरातून न्याहाळता येतं हे लक्षात ठेव
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
थांब अशी सोडून जाऊ नकोस
ठेव अशी खोडून जाऊ नकोस
तुझ्याशिवाय सर्व सुनेसुने होईल
खेळ अशी मोडून जाऊ नकोस
तुला अंदाज नाही किती थकलोय
थकवट्यात फोडून जाऊ नकोस
मान्य उडी सदा बुडीतखात्यात जाते
अवेळी मला तोडून जाऊ नकोस
ही आज्ञा नाही ही विनंती आहे
भाषेला मरोडून जाऊ नकोस
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तुला टाळण्याचे शंभर बहाणे आहेत
रोमँटिक हो म्हण ते उखाणे आहेत
तक्रार नको तुला आधीच माहीत होते
तिच्या खोलीत प्रियकर उताणे आहेत
ती जुने परंतु प्रायोगिक सादर करते
तिच्या ह्या अदेचे हजारो दिवाणे आहेत
ती परंपरा आहे की नवता माहित नाही
एक खरे तिच्याजवळ मादक ताणेबाणे आहेत
ती पृथ्वीइतकी जुनी पृथ्वीइतकीच नवी
आणि तुझ्याजवळ क्षणभंगुर दाणे आहेत
श्रीधर तिळवे नाईक
( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
दिसावयाला पदर पण ताणेबाणे होते
तिच्या काळजाखाली रोज नहाणे होते
ती तर कायमच चंचल वारा होती
माझे इरादे तरी कुठे शहाणे होते
तिची नको वफा नि मीही करणार नाही
करारच होते ना की काळीजगाणे होते
जे आत आहे ते वासनेचे वादळ आहे
ती ताटावरून उठली तूही समज खाणे होते
असे टाईमपास होत असतात आयुष्यात
आश्चर्य ! अशा टाईमपासचेही गाणे होते
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
आपण सगळेच वाया जातो
शेवटी आयुष्याचा पाया जातो
कळत नाही नेमके काय घडले
कुणाकडून केला सफाया जातो
चिन्हांच्यात उरुन काय मिळणार
प्रत्येक शब्द तिथे चुकाया जातो
कदाचित माणूस उडालेली धूळ
पृथ्वीच्या डोळ्यात चमकाया जातो
माणसे निवांत मरू देत नाहीत
मेल्यानंतर परलोक बनवाया जातो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
आयुष्याने अनेक बाजून्नी धोका दिला
पावलो पावली आत्महत्येचा मोका दिला
मी तर माझा चेंडू अजून फेकलाही नव्हता
त्यांनी मिळून माझ्याविरुद्ध चौका दिला
मला वाटले ते मला शिल्प बनवू पाहत आहेत
उरलो तेव्हा दगडही नव्हतो राखेचा ढिगारा दिला
आयुष्याचे टवके उडवत जो तो आता फिरतो आहे
जो तो विचारतो आहे मला किती टक्का दिला
माहित नाही का पण माझ्या तुकड्या नेहमी बदलत राहिले
बदलणाऱ्या रिलेशनशिपचा शिक्षकांनी पुरावा दिला
इतरांचे वाचण्यापेक्षा मी माझा अनुभव घेतो
आयुष्याने माझ्या हातात नेहमी राजा वेगळा दिला
माहित नाही का पण आता प्रयोगशाळे त जावत नाही
विज्ञानात असे काय आहे की मला इतका कंटाळा दिला
ज्याची त्याची डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी धडपड
मलाच का मग आयुष्याने असा वेगळा पाया दिला
पाटील सर म्हणतात की तू फक्त कलावंत आहेस
असेनही माहित नाही निसर्गाने काय चेहरा दिला
माझे म्हणावे असे फक्त माझ्याजवळ शहाणपण होते
बाकी तुमच्या अभ्यासक्रमाने मला नेहमी दगा दिला
असे नव्हते की वाट पाहण्याचा स्टॅमिना नव्हता
जो निर्णय दिला त्यांनी खूप खूप उशिरा दिला
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
कोल्हा श्रीधर तिळवे नाईक
मी जाणतो तुम्हाला कुत्रे आवडते
पण मी कोल्हा आहे
आणि तुमचे माझ्याविषयी गैरसमज होऊ शकतात
मला एकच एक जीवनसाथी आवडते
आणि मला तिच्याबरोबरच आयुष्य घालवायचं आहे
ती म्हणाली तर बुरख्यात
ती म्हणाली तर पोलक्यात
मला माझे नातेवाईक प्रिय आहेत
आणि माझे आई वडील माझ्यासाठी देव आहेत
मी त्यांची म्हातारपणी काळजी घेइन
त्यांच्या सुरकुत्यांच्या मधून नद्या वाहायला लावीन
त्यांच्या आजारपणात मी अख्खा बाजार घरात ओढून आणिन
शक्य आहे की माझ आयुष्य माझ्या कुटुंबात वाया जाईल
पण ते माझ्या कुटुंबातच वाया जाईल यावर मी खुश आहे
तुम्ही म्हणाल तुझ्यात आणि कुत्र्यात मग फरक काय राहिला
मी इतकच म्हणेन
कुत्रा पाळता येतो
कोल्हा पाळता येत नाही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
लोकांना आता घराबाहेर पडायचं आहे
कदाचित गर्दीत जाऊन सडायचं आहे
आजकाल जो तो आकाशाविषयी बोलतो
ज्याला त्याला आकाश रगडायचं आहे
काळजामधलं आहे हरवलेले काही
कदाचित पब्लिकमध्ये ते सापडायचं आहे
तो माझी बाईक नेहमी हक्काने नेतो
माहित नाही स्वतःला की बाईकला ताबडायचं आहे
मी ऐकले की समाज नेहमी मागे मागे नेतो
कदाचित माझ्या मॅच्युरिटीला बागडायचं आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
सगळेच तणावात आहेत
"लपवत" काय आत आहेत
कधीही रस्त्यावर येऊ शकतो
हा एकच विचार मला खात आहे
अन्नाचाही हिशेब लागेना
आणि जगणे तर फक्त अन्नात आहे
येणारे जाणारे लोक पाहतो
माहित नाही काय रस्त्यात आहे
सगळी फिक्स डिपॉझिटस विकलेली
मग फिक्स असे काय जगात आहे
लोक म्हणतात छान चाललंय
ते तेच बोलतायत जे डोळ्यात आहे
काहीतरी तोडगा निघेलच
आयुष्य जिद्द बाळगण्यात आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
क्या था वो भी जानता हूँ
क्या है वो भी जानता हूँ
मगर आपको कुछ कहता
तो आप बुरा मान जाते
दोस्ती भी जरुरी है
जिंदगी काटने के लिए यहा
जिसका कोई नही होता
वो दोस्ती में खुश हो जाता है
मांग सकता था मोहब्बत
मगर आप देते इसकी ग्यारंटी नही
शायद दोस्ती तुटती हमारी
और मुझे आपको गवाना मंजूर नही
तो चलो शुरू करते है
जो सवाल आपने पूछा उसे पीछे छोड कर
सफर तो इत्मिनानसे हो जायेगा
मंजिल मिले ना मिले
सफर मे एक सुकून सा रहेगा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
कोई साथ नही मेरे तो क्या हुआ
पहिले बदन था अब साया हुआ
दो टके के लोग पूछ रहे है तेरी औकात क्या
क्या इश्कमे इस हदतक मैं निकम्मा हुआ ?
तू सिर्फ चीजे चुराने के लिए पास आता है
जब भी मिला है मुझसे हमेशा धोका हुआ
पीठमे छूरा भोकने के अलावा आता है क्या
मेरे डिक्शनरी मे रजिस्टर तेरा नाम दगा हुआ
एक दिन ऐसाभी आयेगा जब तुम लोग कहोगे
राजा तो अभी था पता नही कहा हवा हुआ
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
जीवन हाच एक आजार असावा
प्रेम त्यावरचा उपचार असावा
ती म्हणे मला माझ्या डोळ्यात वाचते
साक्षरतेचा हा वेगळा आकार असावा
जवळ घेतल्यानंतरच खरे काय ते कळते
मनात आत्ता होकार की नकार असावा
तीच एक अशी जी पैशात उभी नाही
उर्वरीत जगात हसणेही व्यवहार असावा
बघावे तेव्हा ती अश्रू ढाळत असते
रडणे अभिव्यक्तीचा प्रकार असावा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
कोणावरही प्रेम कर तुझे मन भिरभिरतेच राहणार
लवर कितीही बरोबर असो वाटत तुला चुकीचेच राहणार
एकदा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा प्रेम दुसऱ्यांदा होते
दुसऱ्यांदाही जे होईल पहिल्यासारखे ताजेच राहणार
प्रेमामध्ये कधीही कसलीही कुठेही उधारी चालत नाही
भेट असेल तर आत्ता असेल आणि प्रेम रोकडेच राहणार
ते मुखाने सुख देते आणि मुका मार झेलत राहते
कितीही कविता लिहिल्या तरी ते शेवटी मुकेच राहणार
शेवटी तुझ्या भावनांची चिल्लर माझ्या खिशात राहिली
खिशात तीच खुळखुळती बाकी खिसे रिकामेच राहणार
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
आडगळीसाठी घरात एक स्वतंत्र खोली ठेव
हृदयात तिला नेहमी आवरण्याची तयारी ठेव
एका बाजूला टेन्शन नि दुसऱ्या बाजूला तुझं प्रेम
आयुष्यभर टेन्शन बरोबर तू अशी बरोबरी ठेव
आता कुठे आकाश जरा पावसाळी वाटते आहे
छत्री बाहेर काढू नकोस देह जरा पावसाळी ठेव
जर तुला जगण्यातली झाडे शाबूत ठेवायची तर
फुला फळावर प्रेम कर सुगंधाशी दोस्ती ठेव
काय काय राखून ठेवशील निघावे तर लागणारच
पाय कधीही काढता येईल अशी जगण्याशी सलगी ठेव
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
एक तर मापात राहतात किंवा पापात राहतात
ही सामाजिक माणसे नेहमी तापात राहतात
दंतकथा दाखवत राहतात ज्ञानाचे पूर्ण फळ
पण सर्व मानवी वस्त्या फळाच्या कापात राहतात
सरळ संस्कार दिले होते माझ्या आई-वडिलांनी
माझे दोन्ही मेंदू उनाड स्वतःच्याच टापात राहतात
खरे आहे की स्त्रीचे मला प्रथम शरीर दिसते
ठोके माझ्या काळजाचे सौंदर्याच्या मापात राहतात
आत्ता रोज आठवतो नंतर आठवेनच असे नाही
जो वर आहे प्रेम तोवर आठवणी चापात राहतात
हळूहळू मी सुद्धा तुझ्या आयुष्याचा काटा होईन
तोवर मजा मारू जोवर अपुले देह छापात राहतात
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफाईलीतून)
मी झाडांच्या कडून ऑक्सिजन घेतो म्हणून
मी झाडांशी लग्न करावं का ?
अवलंबून असणे अपरिहार्य आहे
प्रश्न मी झाडांना काय देतो हा असतो
आणि त्याचे उत्तर कार्बन डाय-ऑक्साइड असे येत राहते तोवर ठीक आहे
मी असं म्हणत नाही की तू झाड आहेस
तू काही मला ऑक्सिजन देत नाहीस
पण तरी तू काहीतरी असं देतेस जे ऑक्सिजन इतकंच महत्त्वाचं आहे
ते काय आहे यावर चर्चा कशाला
शक्य आहे की ते काय आहे हे माहित नाही
म्हणूनच ही लेनदेन टिकलीये
देत राहू
एकमेकांना एकमेक
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
एकेकाळी काहिली होती जीव शांत जाहला होता
ती निघून गेली तेव्हा आवाज तिच्यात वारला होता
परीस स्पर्श मागितला तेव्हा दिला गेला पॅरिस स्पर्श
आणि वर फॅशन म्हणून हिमालय मागितला होता
मी आत्मा बित्मा मानत नाही शरीरालाच स्पर्श कर
म्हणता क्षणी माझ्या अंगावर तिचा श्वास उगवला होता
ती प्रथम मनातून उतरली मग शरीरातून ओसरत गेली
वाटले झुळूक शिल्लक राहील पिसाट वारा राहिला होता
तिच्यासाठी रात्रभर रडलो मग पुन्हा रडलोच नाही
अश्रूंनी आयुष्यभराचा गोंधळ एका रात्रीत घातला होता
माझ्यापेक्षा शहाणे होते सारे सरकारी पोस्टमन
पत्रे तिच्या घरी त्यांना श्रीधर तिच्यात आढळला होता
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
कोशिश बदन में, दिलमे मगर कशिश नही है
शायद मेरी फितरत तुमपे आशिक नही है
मुलाकातके लिये और झूठ बोलना नही होगा
कितनी बार कहूंगा आज लेक्चर नही है
तेरे प्यार के चक्कर में मैने एक्झाम नही दी
तू कह रही है प्यार किसी सवालका जवाब नही है
गालिबके के नाम पे खुद की शायरी सुनाना
सुनने वाले खुश है मगर उनमे गालिब नही है
वो प्यार क्या करेगी जिसके पास नीतिमत्ता नही
तू जादूगर हैं मगर अच्छी लवर नही है
हमेशा जो हैं उससे बेहतर पाने की तलब
मुझे छोडने की कोई और वजह नही है
मै प्यारमें मर गया मगर नजर नही आया
चिता जली मगर पंचगंगा घाटपे निशान नही है
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
थोडासा दुखावलो पण मग शिकत गेलो
लोकांच्या टीकेमुळेच मी जगात टिकत गेलो
प्रेम आवश्यक आहे नाही कधी म्हणालो
माझी तक्रार कुमार वयातच पिकत गेलो
फुगलेले खिसे शेवटी काटकुळे झाले
प्रेमामध्ये तुझ्या नको तेही विकत गेलो
ताटकळत ठेवलीस याचे दुःख नव्हते
कारणे खोटी दिलीस त्याने पकत गेलो
प्रेम म्हणजे वायर दोन व्यक्तींच्या मधली
जाणले पण बहुदा विजेला बिचकत गेलो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
सर्वांच्या सानिध्यात तरी एकटा होतो
मी आयुष्याने सांगितलेला चुटका होतो
झटदिशी संपून गेले माझे कोवळे वय
मी प्रौढपणाने काढलेला फतवा होतो
प्रत्यक्ष क्षण तिच्या सौंदर्याने भारावलेला
मी तिच्या लावण्याचा चटका होतो
खूप काही कळण्याचा मी आणला आव
तरी तिच्या ज्ञानापुढे मी ओणवा होतो
वैभव संपत गेले फक्त अवशेष उरले
मी वडिलांच्या श्रीमंतीची अफवा होतो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
थोडासा दुखावलो पण मग शिकत गेलो
लोकांच्या टीकेमुळेच मी जगात टिकत गेलो
प्रेम आवश्यक आहे नाही कधी म्हणालो
माझी तक्रार कुमार वयातच पिकत गेलो
फुगलेले खिसे शेवटी काटकुळे झाले
प्रेमामध्ये तुझ्या नको तेही विकत गेलो
ताटकळत ठेवलीस याचे दुःख नव्हते
कारणे खोटी दिलीस त्याने पकत गेलो
प्रेम म्हणजे वायर दोन व्यक्तींच्या मधली
जाणले पण बहुदा विजेला बिचकत गेलो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
गाढवं पुढे जातात श्रीधर तिळवे नाईक
जेव्हा गुण दिसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
विवेक आत हसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
जेव्हा प्रत्येक महिना दिसू लागतो शिशिर ऋतु सारखा
फुलांचे उमलणे दिसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
त्वचा बनून पसरतो भ्रष्टाचार जेव्हा कपड्यांच्या आड
कोणाचे स्वच्छ असणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
लोक मारू लागतात गप्पा फक्त हवाई प्रवासावरती
आतील जमीन कसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
कोणी नाराज होत नाही कुठल्याही अनैतिकतेवर,खूनी
खून करताना दिसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
प्रेम करतानाही लोक वावरतात केल्यासारखा गुन्हा
नि प्रेमींचे लोकात हसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
जेव्हा अडाणी लोकांना सुशिक्षित देतात अंगठा कापून
शिक्षण राजकारणात बसणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
जेव्हा हृदयातून पसार होतो देव आणि दगड होतो
रक्ताचे रसरशीत असणे बंद होते तेव्हा गाढवं पुढे जातात
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तेरे इस शहर से निकलना अच्छा
युंही मर जाने से संभलना अच्छा
एकतर्फा कोशिश से क्या होता है
दोनो तरफ हां हो तो मिलना अच्छा
खूबसूरत और भी है इस जहान मे
मुर्झानेसे किसी और चेहरे में खिलना अच्छा
वफा के लिए भी इकरार चाहिये
इनकारभी सेटल नहीं वहासे निकलना अच्छा
वक्त कम है यहा जिंदगी जीने के लिए
खतम होने से जिंदगीको टटोलना अच्छा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्य फायलीतून)
खरेच प्रेम होते की भविष्यातली गुंतवणूक होती ?
जी काय होती ती बरोबर होती की चूक होती?
ती फुलासारखी होती आपल्या जागी एकदम स्थिर
तिला सुवास आला यात तिची काय चूक होती ?
धर्मामुळे अंतर होते पण एकच अंत:करण होते
भेटण्यापूर्वी , भेटल्यानंतर एकसमान धाकधूक होती
मला वाटले थोडीशीच नाराज आहे पुन्हा परतेल
मी समजलो त्यापेक्षा दुखावलेली खोल भावूक होती
सौंदर्या पासून सुरू झाले शरीरापाशी येऊन संपले
शेवटपर्यंत कळले नाही प्रेम होते की भूक होती
बघता बघता प्रेम आमचे हिशेब आणि चर्चा झाले
शेवटपर्यंत म्हणत राहिली ती प्रेमात अचूक होती
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
Nov
खरेच प्रेम होते की भविष्यातली गुंतवणूक होती ?
जी काय होती ती बरोबर होती की चूक होती?
ती फुलासारखी आपल्या जागी होती स्थिर
तिला सुवास आला यात तिची काय चूक होती ?
धर्मामुळे अंतर होते पण एकच अंत:करण होते
भेटण्यापूर्वी , भेटल्यानंतर एकसमान धाकधूक होती
मला वाटले थोडीशी नाराज आहे पुन्हा परतेल
मी समजलो त्यापेक्षा दुखावलेली अन् भावूक होती
सौंदर्या पासून सुरू झाले शरीरापाशी येऊन संपले
शेवटपर्यंत कळले नाही प्रेम होते की भूक होती
बघता बघता प्रेम हे हिशेब आणि चर्चा झाले
शेवटपर्यंत म्हणत राहिली ती प्रेमात अचूक होती
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
धर्म खाऊन जगणारे लोक फक्त भारतात आढळतात
तेव्हा महागाईचा मुद्दा
मरण येई तोपर्यंत चालणे शक्य नाही
येथे धर्म खिळखिळा झाला तरी खिळून राहतो खेळवून राहतो
हा फुटबॉल दिसत नाही
पण प्रत्येकाच्या घरात वावरत असतो
म्हणूनच गांधींना फक्त गरीब दाखवून चालत नाही
त्यांना त्या गरीबात हरी आहे असं सांगावं लागतं
तेव्हा कॉम्रेड बनण्यापूर्वी शंभरदा विचार कर
एक हजार वेळा देवळात जा
आणि लाख वेळा भक्तांशी बोल
अन्यथा कॉमेडी बनशील
आणि लोक ट्रॅजेडी म्हणून हसणार पण नाहीत
इथले धर्म असे की
नास्तिकाला सुद्धा स्वतःच्या धर्मात इज्जतीने ठेवतात
तेव्हा इज्जत बिज्जत काय जाणार नाही
लोक फक्त वाट पाहत राहतील की तू कधी तडजोड करतोस
आणि नवीन धम्म स्वीकारतोस
बाबासाहेबांचे सुद्धा फार काही वेगळे झाले नाही
त्यांना नवा धम्म स्वीकारावा लागला
धर्माशी फक्त धर्मानेच लढता येते या देशात
ज्याला कळले तू फळला
ज्याला कळले नाही
तो फक्त काटे मोजत राहिला
तेव्हा बघ
काटे मोजत आयुष्य घालवायचं का
काही जमले नाही तर एक वीट आणून ठेवतीलच तुझ्या पायाखाली
नव्या बांधकामाचा हा मुहूर्त होता म्हणून
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
एक सुरा पचवेपर्यंत चालून येतो दुसरा सुरा
रक्त वाळवण्यास सवड नाही खुपसण्याची इतकी त्वरा
सगळे कसे घाईघाईने रस्त्यावरून आहेत चालले
प्रत्येकात चमत्कारिक पृथ्वी जिंकल्याचा तोरा
काहींनी तर दिशासुद्धा डोळ्यात ठेवल्या दुसऱ्यांच्या
चालले आहेत बस त्यांच्या पाठीमागे भराभरा
गर्दी आहे पण मित्र नाही ना कोणी शेजारी आहे
झुंड आहे आणि तिच्या दहशतीचा खूनी नखरा
एकएकट्याला एक एक जण पाहतो एकांतात
दुसऱ्याला समजून खोटा स्वतःस समजतो खरा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
आय वॉज बॉर्न न्यूड
व्हॉट अबाउट यु ?
कि कपडे घालूनच जन्मली होतीस?
भारत आहे
आणि भारतात काहीही होऊ शकतं
खरंतर जन्मदत्त कवच कुंडले या ऐवजी
जन्मदत्त कपडे घेऊन देह जन्माला आला
हे जास्त योग्य झालं असतं
पण लेखकाला युद्ध दिसत होतं समोर
आणि युद्धात कपडे फाटतात
कवच कुंडलं फाटत नाहीत
अर्थात जोवर इंद्र येत नाही
त्यामुळे जन्मदत्त कपड्याची संकल्पना
जन्मलीच नाही बघ
आता तुझ्यापासून सुरू झाली असेल तर सांग
आणि नसेल तर मग
नग्न शरीराचा इतका गवगवा कशाला?
ज्यांच्या वासना चळतात
त्यांना नग्नता झोंबते
मी निर्मळ आहे
मला नग्न शरीरात सौंदर्य दिसते
ज्या दिवशी नग्नता बघून
माझी वासनाच चळेल
त्यादिवशी मी कपड्यांचा समर्थक झालेलो असेन
तोवर ऊन झेल
नग्न झालेल्या त्वचेत
उन्हात विटामिन असतात
हे काही मी तुला सांगायला नको
पुन्हा दगडावर उभी राहताना कपडे घाल म्हणजे झालं
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
हे माझे परमभाग्य आहे की मी तुला आवडलो आहे
वाट पाहतोय कधी म्हणशील मी तुला कळलो आहे
इच्छिणे आणि मिळून जाणे यात महद अंतर असतं
जेव्हा जेव्हा भरकटलो तेव्हा मी तुझ्यात सापडलो आहे
आता तरी तुझा बुरखा काढ इथं तुला कोण पाहतंय
तुला नीट पाहण्यासाठीच पन्हाळ्यावर धडपडलो आहे
प्रेम म्हणजे एकमेकांच्या आकाशास वेचावयास जाणे
पकडले तर सूर्य क्षण वा कृष्णविवरात तडफडलो आहे
वासना किंवा भावही असेल जे आहे ते ऑथेंटीक आहे
काय आहे ते समजून घेण्यास आतल्या आत कडमडलो आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
ईश्वर अस्तित्वात नाही सर्वांना माहीत आहे
म्हणूनच तर जो तो करत क्राईम आहे
उथळ लोकांची भक्ती म्हणजे केवळ शोपीस
दाखवायला की मी एक चांगला मनुष्य आहे
वेळ प्रसंगी जे लाच देऊन दर्शन घेतात
त्यांच्या त्या xx ची लायकी तरी काय आहे
सगळीकडे जर धर्म बिघडलेला आहे
ईश्वर म्हणून नेमके मग काय वावरत आहे
जे सांगतात देवाने सगळ्या जाती निर्माण केल्या
मला सांगा मग त्या देवाची नेमकी काय जात आहे
किती खोटे बोलाल तुम्ही देवाच्या नावाने
मी तरी कितीदा माफ करणार स्वीकारून तुम्ही ब्राह्मण आहे
ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका दंत कथेत गेले
त्यांना काय विचारणार की काय सत्य आहे
सगळे कळुन सुद्धा जो स्वतःचे शोषण होऊ देतो
त्याला मी समजावतो आहे की काय कम्युनिजम आहे
नास्तिक होऊन आयुष्याला काही फायदा झाला नाही
आस्तिक होऊन तरी कुठे आयुष्य संपन्न आहे
शेवटी आपला डोळाच मुळे एका बोटा एवढा
त्याला किती दिसणार आणि आता किती दिसत आहे
जो तो आत्महत्येवर चर्चा करत आहे
कदाचित असे असेलही की तो आत्महत्या करत आहे
आयुष्याच्या शेवटी मी ह्याच निष्कर्षावर पोचलो
आरंभी केऑस आणि शेवटाला अराजक आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment