BAHUSANSKRUTIWAD

 एकसंस्कृतीवाद, बहुसंस्कृती वाद आणि चौसंस्कृती वाद श्रीधर तिळवे नाईक 

विज्ञानाच्या उदयानंतर हळूहळू पुरोगामीवादा पुढे काही प्रश्न निर्माण झाले यामागे क्लासिकल विज्ञानाचा वाटा मोठा होता क्लासिकल विज्ञानाच्या मते विज्ञान हे  स्वतःच एक संस्कृती आहे आणि ती सर्वत्र सारखीच असते कारण वैज्ञानिक truths  ही सर्वत्र सारखीच असतात साहजिकच विज्ञानाचा भर कळत  नकळत एक वैज्ञानिक संस्कृती संपूर्ण जगभर निर्माण करणे असा होता विज्ञानाचा हा आग्रह हळूहळू धर्माच्या आग्रहाला द्विगुणित करून गेला आणि जगभरात एकसंस्कृती वाद उदयाला यायला लागला परिणामी युरोपमध्ये युरोपियन अशी एक संस्कृती अस्तित्वात आहे किंवा आलेली आहे अशा प्रकारची मांडणी येऊ लागली अर्थात याचा सर्वाधिक फायदा झाला तो युरोपियन संस्कृतीला ! युरोपियन संस्कृती ही जगातील अशी पहिली खंडप्रधान संस्कृती होती जी स्वतःला संस्कृती म्हणून सादर करत होती आणि जिने स्वतःसाठी वेस्टर्न अशी दुसरी एक टर्म कॉईन केली आणि पूर्वेकडच्या सर्व  संस्कृती या इस्टन संस्कृती या नावाखाली एकत्र पाहायला सुरुवात केली 

यामध्ये सर्वात अडचण होती ती भारतातच ! कारण भारतात एक संस्कृती नव्हती तर शैव (अनार्य अथवा द्रविड) वैदिक, ब्राह्मण, वैष्णव, जैन, बौद्ध अशा अनेक संस्कृत्या अस्तित्वात होत्या साहजिकच या सर्वांचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे होता आणि त्यांनी इथल्या ब्राह्मणांच्या सल्ल्यावरून या सर्वांनाच ब्राह्मण संस्कृती किंवा ब्राह्मण धर्म असे नाव दिले परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की बौद्ध संस्कृती अशी एक स्वतंत्र संस्कृती इथे अस्तित्वात आहे जी चक्क संपूर्ण संस्कृतिक संघर्ष ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म असा मानते नंतर त्यांच्या असही लक्षात आले की द्रविड म्हणता येईल अशी एक दक्षिणात्य लोकांची स्वतःची संस्कृती आहे आणि त्यांनी मग या दोन संस्कृत्यांचा स्वतंत्र विचार सुरू केला. मुळातच हळूहळू त्यांच्या लक्षात आले की ब्राह्मण संस्कृती ही फक्त ब्राह्मण लोकांच्या पुरतीच मर्यादित आहे . प्रत्यक्षामध्ये भारतातील सर्व लोक ती स्वीकारत नाहीत किंबहुना ब्राह्मण लोकांनी स्वतःला व्यवस्थित इतिहासामध्ये स्वतंत्र ठेवलेले आहे साहजिकच मग ब्राह्मणे तरांचे काय करायचे हा एक मोठा प्रश्न त्यांच्यापुढे ठाकला या सर्वांसाठी म्हणून त्यांनी एक सब गोलाकार असा प्राचीन शब्द निवडला तो म्हणजे हिंदू संस्कृती आणि भारतातील संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती विरुद्ध द्रविड संस्कृती असा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली यातील द्रविड संस्कृतीचा फार विचार करणे त्यांना गरजेचे वाटले नाही कारण तेव्हा दक्षिणात्य भाग हा लोकसंख्येच्या तुलनेत कमी वाटत होता साहजिक सगळा भर हा हिंदू संस्कृतीवर पडला आणि ही हिंदू संस्कृती काश्मीर पासून महाराष्ट्र पर्यंत आहे अशा प्रकारचे प्रमेय उदयाला आले आणि त्यातूनच शैव संस्कृती पूर्णपणे साईडलाईन केली गेली. किंबहुना तिला हिंदूंचा भाग बनवण्यात आले मात्र हे करतानाही त्यांना कळत नकळत हे माहीत होते की हे काहीतरी वेगळे प्रकार आहेत अनेक इंग्रज अधिकाऱ्यांच्या लेखनामध्ये यासंदर्भात छोट्या छोट्या टिपण्या  आपणाला दिसतात मात्र काही ठाम निष्कर्ष काढण्याचे धैर्य त्यांच्याजवळ नव्हते उलट त्या काळामध्ये संपूर्ण ज्ञान व्यवस्था ही ब्राह्मणांच्याकडे असल्याने सांस्कृतिक मांडणी संदर्भात जे काय करायचं ते ब्राह्मणांनाच करू दे अशा तऱ्हेचा स्टान्स घेणे सोयीचे होते या सगळ्या सोयीतून आणि गैरसोयीतून हिंदू संस्कृती नावाची एक संस्कृती त्यांनी अस्तित्वात आणली आणि पुढे आपल्या संविधानामध्ये हिंदू या शब्दाखाली सर्व भारतीय धर्म एकत्र आले आणि त्यांची संस्कृती ही एकत्र आली एका अर्थाने साम्राज्यवादाने आणि पुरोगामी वादाने आणलेला हा एकसंस्कृतीवाद होता ह्या एक संस्कृतीवादाला सातत्याने छेद देण्याचे काम पेरियार यांनी केले त्यांनी दक्षिणात्य संस्कृती ही पूर्णपणे वेगळी संस्कृती आहे असे सांगत तामिळ संस्कृतीला पूर्णपणे दक्षिणात्य द्रविड संस्कृतीचे उगमस्थान मानत एक वेगळी मांडणी केली आणि दक्षिणेमध्ये तिला प्रचंड पाठिंबा मिळाला याच द्रविड संस्कृतीचा प्रबंध मराठीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न काही कन्नड भाषेतून आलेल्या मराठी भाषिकांनी केला परंतु उत्तरेकडून आलेल्या ब्राह्मणांनी या सर्व मांडणीला व्यवस्थित फेटाळत आणि तिची उपेक्षा करत स्वतःचे हिंदू संस्कृतीचे ब्राह्मण संस्कृतीचे घोडे महाराष्ट्रामध्ये रेटत नेले आणि शेवटी संपूर्ण मराठी संस्कृती ही हिंदुत्ववादाला नेऊन बांधली मराठी आणि बंगाली ब्राह्मण लोकांनी डेव्हलप केलेल्या या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा दोन प्रवृत्या सुरुवातीपासूनच उदयाला आल्या होत्या त्यातूनच दोन ध्रुव बनले एक सेक्युलर  आणि दुसरा हिंदुत्ववादी हिंदू धर्माअंतर्गत ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा एक वाद होता आणि हाच वाद ब्राह्मणेतर म्हणजे काँग्रेस सेक्युलर व ब्राह्मण म्हणजे हिंदुत्ववादी असा झाला भारताच्या संस्कृतीचा आधार काय तर सेक्युलर लोक म्हणत होते की भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून सेक्युलर आहे त्या उलट हिंदू संस्कृती वाले म्हणत होते की भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून हिंदू आहे दोघेही संस्कृतीमध्ये सातत्य आहे असेच मानत होते फक्त पेरियार असे होते ज्यांनी द्रविड संस्कृती ही पूर्णपणे वेगळी आहे असे म्हणणे सुरूच ठेवले सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्नही या काळामध्ये झाला होता विशेषत: स्वामी विवेकानंदांनी याबाबतीत तामिळ माझी आई आणि संस्कृत हिंदू म्हणजे माझे वडील अशी भूमिका घेतली होती 

जसा जसा संस्कृत्यांचा अभ्यास वाढत गेला तसा तसा त्यात उत्तर आधुनिक मांडणीचा कालखंड आला आणि या कालखंडाने बहुसंस्कृतीवाद आणला हा बहुसंस्कृती वाद मुळातच युरोपियन लोकांना अतिशय आवश्यक वाटण्याचे सर्वात मोठे कारण हे त्यांनी कॉलनीचा त्याग केल्यानंतर त्यांच्या माघारी जे एतद्देशीय ख्रिश्चन होते त्यांच्या सुरक्षेची हमी हे होते तिसऱ्या जगामध्ये जर का ख्रिश्चन धर्म शाबूत ठेवायचा असेल तर  बहुसंस्कृतीवादाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही याची व्यवस्थित कल्पना ख्रिश्चन युरोपियन लोकांना होती नंतर ती ख्रिश्चन अमेरिकन लोकांनाही आली एका अर्थाने  बहुसांस्कृतिक वाद हा एक डावपेचाचा भाग होता इस्लामलासुद्धा या काळामध्ये स्वतःच्या धर्माप्रसारासाठी बहुसंस्कृतिवाद अत्यंत आवश्यक होता कारण सर्वत्र इस्लामचे साम्राज्य नव्हते जिथे बहुसंख्यांक तिथे इस्लामिक एक संस्कृती वाद व जिथे जिथे इस्लाम नाही तिथे तिथे बहुसंस्कृतीवाद अशा प्रकारचे अत्यंत दुटप्पी धोरण इस्लामने स्वीकारले 1990 नंतर इस्लामचे हे धूर्त धोरण हळूहळू स्पष्ट होत गेले आणि जगात एक प्रकारची अँटी इस्लामिक विचारसरणी डेव्हलप व्हायला लागली आणि कळत नकळत याबाबत युरोपमध्ये हळूहळू एक नवा विचारवंत वर्ग डेव्हलप व्हायला लागला ज्याला आपला उदारमतवाद हा दुबळा उदारमत वाद बनतो आहे हे लक्षात आले इस्लामच्या या डबल ढोलकीपणामुळेच इस्लाम भारतामध्ये बहुसंस्कृतीवादी आणि पाकिस्तानामध्ये एक संस्कृतीवादी असतो हे स्पष्ट झाले अर्थात काही वैचारिक आंधळे होतेच त्यांना साध्या सरळ गोष्टी दिसत नव्हत्या 
इस्लामचे " जिथे जिथे मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत तिथे तिथे बहुसंस्कृतीवादाचे आणि सेक्युलारिझमचे नारे जोराने द्यायचे ह्युमन राईटचे नारे जोराने द्यायचे " हे धोरण फक्त भारतामध्येच नव्हते असा प्रकार इस्लाम सर्वच देशात कायमच करत असतो कारण इस्लामची एक धर्मप्रसाराची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आणि ती स्ट्रॅटेजी 1850 पासून प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसते मुळात या धर्मामध्ये यायची परमिशन आहे पण जायची परमिशन नाही त्यामुळे साहजिकच हा धर्म कधीच आकसत नाही तो फक्त वाढत राहतो याच काळामध्ये ज्युधर्मी लोकांना सुद्धा इतर सर्व देशांच्या मध्ये स्वतःच्या धर्माची सुरक्षितता हवी होती साहजिकच या लोकांनीसुद्धा बहुसंस्कृती वाद स्वीकारला थोडक्यात काय तर सर्व जुडाईक धर्मांना स्वतःच्या धर्मप्रसारासाठी आणि स्व धार्मिक लोकांसाठी बहु संस्कृतीवाद ही आवश्यकता वाटत होती त्यांच्या सिक्युरिटीची ती हमी होती 
भारतामध्ये जेव्हा नवीन धर्म उदयाला आले तेव्हा या नवीन धर्मांना सुद्धा बहुसंस्कृती वाद आवश्यक होता. यामध्ये नंतर भर पडली ती बौद्ध धर्माची ! बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म स्वीकारला आणि त्यांना सुरुवातीला बौद्ध धर्म विशेषतः नव बौद्ध शाबूत ठेवायचे होते साहजिकच त्यांनाही हे नवीन धर्म जिवंत ठेवायचे  असतील आणि वाढवायचे असतील तर बहूसंस्कृतीवाद स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता या सगळ्या पार्श्वभूमीवर १९६० नंतर ब्राह्मणांनी व काही उच्च ब्राह्मणेतरांनी जेव्हा युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली तेव्हा साहजिकच त्यांच्या पुढचा वेगळाच प्रश्न होता त्यांना काही केल्या स्वतःची ब्राह्मणी किंवा हिंदू संस्कृती सोडायची नव्हती . साहजिकच त्यांनी सुद्धा पोस्ट कलोनियालीझम मांडत बहुसंस्कृतीवादाचा पुरस्कारच केला थोडक्यात काय साम्राज्यवादी आणि मायग्रेशन  संस्कृतीने जन्माला घातलेली ही एक विचार प्रणाली होती जी त्यांच्या स्वतःच्या आणि स्वतःच्या लोकांच्या हितसंबंधांची रक्षण करणारी होती साहजिकच जगभर स्थलांतरित झालेल्या सर्व विचारवंतांनी तिचा जाहीर रित्या पुरस्कार करायला सुरुवात केली त्यामध्ये हिटलरच्या काळात जर्मनीतून पळून गेलेले अनेक ज्यू विचारवंत सुद्धा होते बहुसंस्कृतीवादामध्ये अनेक पायोनियर विचारवंत हे प्रामुख्याने ज्यू विचारवंत दिसतात त्याचे कारण हेच आहे 
या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थलांतर न केलेली आणि आपल्या जमिनीवर ठामपणे उभी असलेली अशी एक लोकसंख्येची प्रचंड मोठी पातळी अस्तित्वात आहे याचाच अनेकांना विसर पडला साहजिकच या भूमीवर स्थिर असलेल्या जमिनी लोकांनी देशीवाद मांडायला सुरुवात केली. कारण हे लोक कुठेच गेले नव्हते साहजिकच जे जमिनीवर आपले सातत्य टिकवून आहेत त्यांनी काय करायचे या प्रश्नाचे उत्तर त्यांना शोधावे लागले त्यांनी एकसंस्कृतीवाद स्वीकारला पण त्याचा आधार मायग्रेशन नव्हता तर भौगोलिक सातत्य होते या भौगोलिक सातत्याच्या सिद्धांतानेच हिंदुत्ववादाला प्रचंड मदत करायला सुरुवात केली कारण हिंदुत्ववादाचे दुसरे पायोनियर स्वातंत्र्यवीर सावरकर हे भौगोलिक सातत्याविषयी सातत्याने बोलत होते किंबहुना इतिहास म्हणजे भौगोलिक कालिक सातत्य होय. हिंदू हे भौगोलिक सातत्य आहे अशी त्यांची मांडणी होती जी पुढे नेमाडे यांनीही वेगळ्या भाषेत सांगितली 
एका अर्थाने त्यामुळेच देशीवाद आणि हिंदुत्ववाद एकमेकाला पूरक होऊन काम करू लागले पण याचा एक दुष्परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांची एकसंस्कृतीवादी वृत्ती वाढत गेली आणि पुढे ती देशीवादी लोकांच्या ताब्यात न राहता हळूहळू हिंदुत्ववादाला जाऊन मिळाली हे असे घडणाऱ याचे प्रेडिक्शन मी आधीच दिलेले होते याचे कारण या परस्पर विरोधी वाटणाऱ्या विचारसरणी प्रत्यक्षात एकाच दिशेने जात आहेत याची मला खात्री होती 
चौथी नवता जेव्हा उभी करण्याचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा साहजिकच नेटवर्क सिस्टीम मध्ये या दोन्ही गोष्टींचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला एका बाजूला देशीवाद होता तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववाद आणि तिसरी बाजू जी ह्या काळात अल्पसंख्यांक होती कोणी घ्यायलाही तयार नव्हते ती अर्थातच अनार्य संस्कृतीची होती त्यातच भरीसभर म्हणून देशीवादाच्या प्रभावाखाली येऊन या लोकांनी मुलनिवासी वाद मांडला आणि या मूलनिवासी वादाला आफ्रिकन सिद्धांताने छेद देऊन शेवटी भारतात कोण आधी आला आणि कोण नंतर आला एवढाच प्रश्न भारतापुरता उरला. 
याच काळामध्ये स्वतःच्या संस्कृतीचा त्याग करणारे काही आदिवासी लोक निर्माण झाले जे हळूहळू हिंदुत्ववादाच्या दिशेने सरकू लागले आणि महात्मा फुले यांनी ज्यांना अनार्य म्हटले होते असे अनेक लोक हळूहळू हिंदुत्ववादामध्ये जायला लागले त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक आर्यवाद स्वीकारला आणि हे लोक स्वतःला आर्यवादी हिंदुत्ववादी म्हणू लागले आज याच विचारसरणीमध्ये आपल्या आत्ताच्या राष्ट्रपती आहेत खरे तर स्वतःचा विचार विस्तृत आणि व्यापक करण्याची अत्यंत चांगली संधी हिंदुत्ववादाला मिळाली होती पण दुर्दैवाने हिंदुत्ववादाने ती आता वाया घालवलेली आहे
अशा ह्या सगळ्या एक संस्कृती वाद व बहुसंस्कृती वाद यांच्या धुरळा उडवणाऱ्या परिस्थितीमध्ये करायचे काय ? माझ्या मते या सर्वांवर मात करायचे असेल तर सर्वात प्रथम आपणाला युरोपियन लोकांनी आणलेली एकखंडी संस्कृतीची संकल्पना आशिया खंडाच्या संदर्भात डेव्हलप करावी लागते मी या अंगाने एक लेख सौष्ठव मध्ये लिहिला होता साहजिकच भारतातला मुख्य सांस्कृतिक संघर्ष हा द्विखंडीय सांस्कृतिक संघर्ष आहे अशी मांडणी मला करावी लागली या खंडाला काय नाव द्यायचे हा प्रश्न होता तो प्रश्न शेवटी मी युरेशीयन हे नाव स्वीकारून सोडवला कारण भारतातले ब्राह्मण संस्कृती स्वीकारणारे सर्व धर्म हे साधारणपणे युरेशियन परंपरेमध्ये उभे राहिलेले असतात अगदी जैन आणि बौद्ध हे धर्म सुद्धा याला अपवाद नाहीत मात्र याच युरेशियन धारेमध्ये राहून ते वर्ण जात यांना विरोध करतात कारण त्यांची बीजे ही वर्ण जात न मांडणाऱ्या मानणाऱ्या त्यांच्या  माय ग्रेट झालेल्या आधीच्यां पूर्वजांच्यामध्ये आहेत 
म्हणजेच युरोशियन संस्कृतीमध्ये सुद्धा आपणाला कळत नकळत एका बाजूला वैदिक ,सांख्य ,ब्राह्म ,नवजैन बौद्ध ,आर्य समाज ,नव बौद्ध ,नव वैष्णव असे आठ धर्म ठेवावे लागतात तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मण ,वैष्णव , वेदांत,हिंदू असे वर्ण जाती व्यवस्था व स्मृतिव्यवस्था स्वीकारणारे धर्म ठेवावे लागतात 
याउलट आशियन संस्कृतीमध्ये आपणाला आदीशैव , जैन, लोकशैव(यात प्रामुख्याने नाथ व पाशुपत धर्म येतात ),लिंगायत , शीख, सत्यशोधक असे धर्म ठेवावे लागतात 
याचाच अर्थ असा की द्विखंडीय संवेदनशीलता म्हणजेच युरोशियन विरुद्ध आशियन संवेदनशीलता  ही नव्या चिन्हसृष्टीमध्ये नवे आयाम घेऊन आलेली आहे आणि कळत नकळत तिने आता पुन्हा एकदा नवद्विसंस्कृती वाद निर्माण केलेला आहे 
या दोन संस्कृतींच्या विरोधात ठाकलेला तिसरा सांस्कृतिक खंड हा युरोपियन ख्रिश्चन आहे तर चौथा सांस्कृतिक खंड हा आफ्रिकन इस्लामिक आहे हे दोन्हीही सध्या बहुसंस्कृतीवादाचे समर्थन करत असतात कारण भारतातील त्यांच्या अस्तित्वासाठी आणि विस्तारासाठी ते त्यांना आवश्यक वाटते पण जिथे त्यांचे बहुसंख्यत्व आहे तिथे मात्र हा आग्रह धरलेला दिसत नाही त्यामुळेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये युरेशियन आणि शैव लोकांचे काय झाले चालले याबद्दल हे अत्यंत सोयीस्कर मौन पाळत असतात त्यामुळे जेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा प्रश्न येतो कट्टर इस्लामवादाचा प्रश्न येतो तेव्हा युरेशियन आणि शैव एकत्र आलेले दिसतात किंबहुना हिंदुत्वाची खरी ताकद यांची युतीच होती ही युती स्वतः जय श्रीराम म्हणत युरेशियन लोकांनी तोडली 
म्हणजेच आपण जर का सध्याच्या भारताचा विचार केला तर आपणाला स्पष्टपणे दिसते की चार खंडीय संस्कृती आपापसात कधी संघर्ष करत तर कधी समायोजन करत वाटचाल करत आहेत आणि संपूर्ण आशियामध्ये मात्र हा संघर्ष आता आफ्रिकन इस्लामिक खंडीय संस्कृती विरुद्ध आशियन युरेशियन संस्कृती युती असा होतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे
थोडक्यात काय चौथ्या नवतेमध्ये एक सांस्कृतिक वाद किंवा  बहुसांस्कृतिक वाद एक्टिव असला तरी प्रत्यक्षामध्ये  चौसांस्कृतिक वाद आपणाला अस्तित्वात असलेला दिसतो त्याचा विचार करताना जुन्या पठडीत विचार करून चालत नाही आपणाला काही नवी मांडणी करावी लागेल त्यासाठी काही नवे मानदंड निर्माण करावे लागतील
श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना