भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १

श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय इतिहासाची वैज्ञानिक मांडणी करणे हा पुरोगामी कालखंडाचा एक विशेष प्रयत्न होता असे सर्वसाधारणपणे मत आहे. मला हे व्यक्तीश : अमान्य असले तरी बऱ्याच जणांना ते मान्य असल्याने त्याचा उल्लेख केला प्रत्यक्षामध्ये पुरोगामी वादामध्ये विचार प्रणाली या गोष्टीचा प्रचंड हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप सर्वच विचारवंतांनी मांडलेल्या इतिहासामध्ये दिसून येतो प्रत्येक जण स्वतःच्या वर्गाचे किंवा स्वतःच्या प्रवर्गाचे किंवा स्वतःच्या वर्णाचे आणि जातीचे हितसंबंध सांभाळत इतिहासाची रचना करताना दिसतो त्यामुळे पुरोगामी इतिहासाबद्दलच्या ज्या अत्यंत आदराच्या अशा प्रतिमा होत्या त्या उत्तराधुनिकतेने फोडल्या कारण उत्तराधुनिकतेला असे लक्षात आले की हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या हितसंबंधांमध्ये गर्क होते आणि ज्ञानाचे संबंधसुद्धा इतिहासाचे संबंध सुद्धा इतिहास लेखनाचे संबंध सुद्धा हे हितसंबंधांच्या वर आधारित होते पुढे पुढे हे अधिकाधिक स्पष्ट होत गेले त्यामुळे साहजिकच पुरोगामीवादाची अजूनही जी रोमँटिक कल्पना भारतीय इतिहासकारांच्या मध्ये विशेषता मार्क्सवादीं आणि आंबेडकरवादी लोकांच्या मध्ये आहे ती नवीन लोकांच्या इतिहासरचनेमध्ये आढळत नाही याउलट आपण जर का हिंदुत्ववाद्यांच्या कडे पाहिले तर त्यांना आपण काय करतो आहोत आणि आपण इतिहास वैज्ञानिक पद्धतीने मांडत नसून आपण इतिहास रचत आहोत याची स्पष्टपणे जाण होती अशी शंका येते अशी जाणीव समजा नसेल तर एक गोष्ट नक्की आहे हिंदुत्ववादी लोक सुद्धा स्वतःचा इतिहास स्वतःचे हितसंबंध जपतच निर्माण करत असतात रचत असतात करत होते रचत होते .


भारताच्या पाठ्यपुस्तकातले इतिहास असे अनेकदा हितसंबंधांच्यावर आधारित विशेषत: सरकारच्या हितसंबंधावर आधारित आणि त्या सरकारने स्वीकारलेल्या विचारप्रणालीवर आधारित असलेले दिसतात त्यामुळे आपण शाळेत आणि कॉलेजला शिकलेला इतिहास हा एक रचला गेलेला इतिहास आहे हे कळणेच अनेक विद्यार्थ्यांना अशक्य होऊन बसले आणि आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या मध्ये शिकवला गेलेला इतिहासच खरा आहे असे मानणारे अनेक विचारवंत निर्माण झाले जे आजही कार्यरत आहेत ज्याचे राज्य त्याचा अभ्यासक्रम ही प्राचीन काळापासून असलेली एक वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीचे काय करायचे हे भल्या भल्या इतिहासकारांना आणि विचारवंत लोकांना कळत नाही आश्चर्याची गोष्ट अशी की किमान ही वस्तुस्थिती स्वीकारावी असेही आता अनेकांना वाटत नाही साहजिकच आमची पिढी जी चिन्हकी मध्ये जन्मली आणि जालकीमध्ये वाढली होती तिला यासंदर्भामध्ये अत्यंत खोलात जाऊन चौकशी करण्याची वेळ आली त्यातूनच चौथ्या नवतेचे इतिहास आता आकाराला येताना दिसतात


भारत हे कधीही धार्मिक दृष्ट्या एक भौगोलिक सातत्य नसल्याने वेगवेगळ्या धर्माच्या आणि दर्शनाच्या आणि मोक्षाच्या मांडणीमुळे वेगवेगळ्या काल खंडाची निर्मिती करताना दिसतो वेगवेगळ्या काल गणनांची निर्मिती करताना दिसतो साहजिकच भारतामध्ये अनेक कालगणना गजबजलेल्या दिसतात प्रत्येक जण आपल्या हिशेबाने काल गणना करत असल्याने कालगणनांची एक दाटीवाटी आपणाला भारताच्या इतिहासामध्ये आढळते आणि प्रत्येक स्कूल ला स्वतःची कालगणना सुनिश्चित करून घ्यावी लागते म्हणजे बारस वाली लोकांना इतिहास लिहिताना लोकायतांचा आधार असतो आणि ते शक्यतो त्यांचा इतिहास लोकायतांच्या पासून सुरुवात करायला बघतात किंवा मग प्राक्ऐतिहासिक कालखंडातील उत्पादन साधनांच्यावर ते लक्ष केंद्रित करतात


आज 21 व्या शतकात सुद्धा त्यामुळेच श्रद्धा आणि धर्म ही गोष्ट किंवा मोक्ष ही गोष्ट इतिहास लिहिताना डॉमिनेट होत जाते म्हणजे आपण जर का आंबेडकरवादी लोकांचा विचार केला तर आपणाला स्पष्टपणे दिसते की त्यांच्या कालगणनेवर गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे त्याचबरोबर गौतम बुद्ध हा केंद्रस्थानी ठेवण्याची ही धडपड दिसते त्यामुळेच आंबेडकरवादी इतिहासकार व इतिहास भारतीय इतिहास हा बुद्ध पूर्व बुद्धकालीन आणि बुद्धोत्तर अशा तऱ्हेने विभागताना व विभागणी करताना दिसतात प्रत्यक्षामध्ये हा अहंकार आहे या उलट आपण जर का वैदिक लोकांच्याकडे गेलो तर ते आपल्या कालगणनेची सुरुवात वेदांच्या पासून करतात साहजिकच सिंधू संस्कृतीचा जेव्हा शोध लागला आणि तिथे शिवलिंगे आढळायला लागली तेव्हा मात्र या सर्व लोकांची पंचायत होऊन गेली कारण अशा प्रकारचा काही इतिहास या लोकांनी गृहीत धरला नव्हता आजही या इतिहासाचे काय करायचे या शिवलिंगांचे काय करायचे याबद्दल अनेक वादविवाद आहेत त्यातूनच मग हे शिवलिंग शिवलिंग नाही ते गरीब लोकांच्या मध्ये आढळणाऱ्या सृजनपूजेचा व अंधश्रद्धेचा भाग आहे हे सिद्ध करायला धडपडावे लागते पशुपतिनाथ हा पशुपतिनाथ नाही अशातऱ्हेची मांडणी करत चकवा द्यावा लागतो त्यासाठी अनेक फालतूचे सिद्धांत मांडावे लागतात अलीकडच्या काळात तर वैदिक लोकांनी सिंधू संस्कृती आपली संस्कृती होती असे भासवायला सुरुवात केलेली आहे जे अत्यंत चुकीचे आहे काही बौद्ध विद्वानांनी यासंदर्भामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक बुद्धाच्या आधीचा जो बुद्ध वंश होता त्याची रिलेशनशिप सिंधू संस्कृतीशी जुळवता येईल का ते ताडायला सुरुवात केलेली आहे 


अशा या हितसंबंधांच्या वर आधारित असलेल्या अनेक प्रकारच्या भारतीय इतिहासांच्यातून मार्ग काढणे हे अत्यंत कठीण आहे या सगळ्यातून एक विचित्र गोष्ट पण उदयाला येते ते म्हणजे पुरातत्वीय पुरातत्वशास्त्रीय विवेचन! अनेक लोक पुरातत्त्व शास्त्राला प्रमाण मानत आणि बौद्ध इतिहास हा प्रामुख्याने पुरातत्वीय प्रमाणामध्ये सर्वाधिक पुरावे देणारा इतिहास असल्याने संपूर्ण भारत बौद्धमय असल्याची अत्यंत रोमँटिक कल्पना करत राहतात त्या उलट वैदिक विशेषता सर्व यूरोशिअन त्यातही अधिक ब्राह्मणधर्मीय लोक ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि आता अलीकडे काही शूद्रही येऊ लागलेले आहेत सर्वच काही वैदिक असल्याचे भासवत राहतात इथे अनेकदा वैदिक म्हणजे ब्राह्मणी असे समीकरण असते आणि त्यामुळेच खरोखरच वैदिकतेचे ब्राह्मणी धर्माशी काय नाते आहे याची चर्चा सुद्धा केली जात नाही 

मी सातत्याने सांगतो आहे की वैदिक धर्म वेगळा आणि ब्राह्मण धर्म वेगळा ! अजून तरी हे फार काही मान्य होताना दिसत नाही अनेकदा ब्राह्मणांनी वैदिक धर्म ताब्यात घेतल्यामुळे वैदिक धर्म हाच ब्राह्मण धर्म असे समीकरण सरसकट स्वीकारण्याची प्रवृत्ती झालेली दिसते वास्तविक चार वेदांच्या मध्ये जी सूक्ते दिलेली आहेत ती स्पष्टपणे ऋषींची नावे सांगतात आणि त्यावरून वेद हे ऋषींनी रचलेले आहेत हे स्पष्ट आहे परंतु तरीही ब्राह्मण कोणत्या अधिकाराखाली वेद आपले म्हणतात हा एक खरोखरच प्रश्न आहे आणि वैदिक लोक वैदिक धर्माला ब्राह्मणांच्या हवाली का करतात हा एक खरे तर कळीचा प्रश्न आहे वैदिक धर्माला ब्राह्मणांच्या हवाली करणारे विचारवंत तरी हे सर्व वैदिक कसे स्वीकारतात हाही खरोखर प्रश्न आहे एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे युरेशियन लोकांनी वैदिक श्रद्धेपासून धर्मापासून सुरुवात करत मग ब्राह्मण धर्म मग वैष्णव धर्म आणि अलीकडे हिंदू धर्म निर्माण केलेला आहे या हिंदू धर्मात सामील व्हायचे की नाही असा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये काही इतिहासकारांनी वैदिक विरुद्ध हिंदू अशी ही मांडणी केलेली दिसते वास्तविक हिंदू हे वैदिकांच्या पेक्षा वेगळे नव्हेच परंतु ते तसे असल्याचे सांगितले जाते खरी गोष्ट अशी आहे की शैव हा संपूर्णपणे स्पष्टपणे स्वतंत्र श्रुती असलेला असा मुख्य भारतीय धर्म आहे सततचा खोटा प्रचार झाल्याने अनेक शैव स्वतःला हिंदू समजतात आणि त्यातूनच आत्ताचे अनेक गोंधळ निर्माण झालेले आहेत आणि सर्व विचारवंतांनी हा सगळा गोंधळ कमी करण्याऐवजी अधिकाधिक वाढवलेला दिसतो ब्रिटिशांनी जे कलोनेयल हिंदू मेटॅनारेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण करायला सुरुवात करून पुढे हातभार लावला आणि सर्वांनाच हिंदू या कॅटेगरी खाली एकत्र आणण्याचा जो खटाटोप केला त्या वसाहतवादी खटाटोपामुळेच हे सर्व घडते आहे आज अवस्था अशी आहे की सर्व शैव जे इथल्या एका अर्थाने आदिवासी पासून ते पंडितांच्या पर्यंत मोठा आणि विशाल असा कॅनवास घेऊन उभे आहेत त्यांना आता पूर्णपणे स्वतःची आयडेंटिटी नव्याने शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतीय इतिहासकार हे होऊ देत नाहीत त्या मागचे नेमके राजकारण काय आहे हे एकदा गजानन मुक्तिबोध यांच्या शैलीत विचारले पाहिजे क्या पॉलिटिक्स हैं?


प्राचीन भारतीय इतिहास हा साधारणपणे १ आदि शैव कालखंड २ वैदिक आणि लोकशैव कालखंड ३ ब्रह्म सांख्य कालखंड ४ ब्राह्मण आणि लोकशैव कालखंड ५ आगम कालखंड ज्यामध्ये लोकशैव व जैन आणि बौद्ध हे तीन येतात लोक शैव मध्ये भक्तीशैव , पाशुपतांच्यापासून नाथ संप्रदायापर्यंत अनेक जण येतात ६ लोकशैव आणि वैष्णव आणि वेदांत कालखंड 

अशा सहा कालखंडांच्या मध्ये वाटचाल करतो 


मुस्लिम आक्रमणानंतर भारताचा इतिहास बदलतो आणि आपणाला मुळातच अनेक लिखित पुरावे सुद्धा अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ स्वरूपात दिसतात 


भारताचा प्राचीन इतिहास हा प्रामुख्याने मुसलमान पूर्व इतिहास आहे हे कबूल करावे लागते 


हा इतिहास हा प्रामुख्याने लिखित आणि पुरातत्वीय प्रमाणच्या आधारे निश्चित करण्याकडे कल असल्याने आणि शैव लोकांचा इतिहास हा प्रामुख्याने मौखिक असल्याने अनेकदा इतिहासकाराची फार मोठी पंचायत झालेली दिसते गमतीचा भाग असा की आफ्रिकेच्या इतिहासामध्ये मौखिकतेला जे स्थान मिळालेले आहे त्याचे कौतुक करणारे भारतीय विचारवंत लोक किंवा आदिवासी संस्कृतीतील मौखिकतेचे कौतुक करणारे लोक जेव्हा हीच मांडणी शैव धर्मासंदर्भात उदयाला यायला लागते तेव्हा नाकारायला लागतात ब्राह्मण धर्मी लोकांनी आठव्या शतकापासून अत्यंत जाणीवपूर्वक शैव श्रुतीचा उल्लेख तंत्र श्रुती असा केलेला आढळतो अनेकदा तर वैदिक इतिहास मानणारे लोक सुद्धा तंत्रश्रूती ही आधीची श्रुती आहे आणि म्हणूनच तिला वैदिक श्रुती इतकेच महत्त्व आहे हे मान्य करतानाही अधून मधून दिसतात याचे कारण हळूहळू तंत्र हेच जास्त प्रचलित होत गेले आणि साहजिकच त्यामुळे बदनामी करता येणे सुद्धा अधिक सोपे होते बौद्ध आणि जैन या दोन धर्मांनी तर तंत्र स्वीकारले पण वैष्णव लोकांनी मात्र तंत्राचा प्रचंड मोठा स्वीकार केला कारण सामान्य माणसाशी निगडित असलेले हे तंत्र त्यांना आकर्षित करायला लागले आणि मुख्य म्हणजे शैव श्रुती मधील भक्ती त्यांना स्वीकारावी लागली कारण तिथे त्यांचा धार्मिक धंदा होता 


प्रश्न असा आहे की मौखिकतेचा इतिहास म्हणून कितपत स्वीकार करावा आणि शैवांचा इतिहास कसा लिहावा म्हणजे पोतराजाने शंकराबद्दल म्हणताना वेदांच्या आधी तू होतास असे म्हटले (आपल्याकडे बाबुराव बागुलांनी माणसाबाबत असे म्हटलेले आहे की वेदांच्या आधी तू होतास आणि ती कविता फार गाजली होती पण अनेकांना हे माहीत नाही की पोतराजांचे हे मूळ शैव काव्य आहे आणि या कवितेची मुख्य प्रेरणा तिथे आहे आणि ती शिवाला उद्देशून आहे ) तर आपण मौखिक परंपरा प्रमाण मानून हे स्वीकारणार आहोत का की वेदांच्या आधी सुद्धा शिव होता ? वास्तविक जवळजवळ सर्वच समाजशास्त्रीय विचारवंत ऐतिहासिक विचारवंत ज्यात बाबासाहेब आंबेडकर पण येतात इरावती कर्वे पण येतात आडवाटेने शंकर हा वेदांच्या आधी आहे किंवा शंकर हा भारताचा मुख्य देव आहे हे कबूल करत असतात परंतु प्रत्यक्ष इतिहासाची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ही गोष्ट कशी स्वीकारायची हे समजत नसल्याने आणि लिखित पुरावे तर सापडत नसल्याने करायचे काय असा फार मोठा प्रश्न पडत असतो इंग्रजांच्या कालखंडामध्ये निदान पुरातत्वीय पुरावे शोधण्याची धडपड होती पण ही धडपड सुद्धा प्रामुख्याने बुद्ध केंद्री आणि जैन केंद्री होती साहजिकच भगवान शिवांना त्यांच्यामध्ये स्थान नव्हते पण निदान वैदिकतेच्या विरोधात ठाकलेल्या या दोन धर्मांना काहीतरी मान्यता मिळालेली दिसते. शैव श्रुती बाबत हे घडताना दिसलेले नाही स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये तर काँग्रेसने अत्यंत जाणीवपूर्वक शैवांच्या दिशेने होऊ घातलेली उत्खनने होऊच दिलेली नाहीत एकीकडे बहुजन समाजाचे नाव घ्यायचे पण बहुजनांचा असलेला धर्म मात्र स्वीकारायचा नाही हे काँग्रेसचे धोरण होते आणि या धोरणासाठीच अनेक झारीतले xxचार्य व्यवस्थित वाट अडवून नोकरशाहीत बसलेले होते खरे तर शुक्राचार्य हा शब्द सुद्धा मला वापरायचा नव्हता कारण शुक्राचार्य स्वतःच शैव होते 


सर्वसाधारणपणे ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये हिंदू धर्माऐवजी ब्राह्मण धर्म हा शब्द वापरला जात होता कारण या काळातले सर्व हिंदू ब्राम्हणांनाच आपले पुरोहित मानत होते असे ब्रिटिशांचे मत होते (प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये या काळात जणू काय सर्व काही ख्रिश्चन असल्याच्या थाटात चाललेले होते. प्रत्यक्षामध्ये युरोपमध्ये अनेक वेगळे संप्रदाय अस्तित्वात होते हे आता नवीन इतिहासांच्या मध्ये सिद्ध झालेले आहे)प्रत्यक्षामध्ये ते खरे नव्हते कारण अनेकदा या काळामध्ये गावांच्यामध्ये आणि अनेक शहरांच्या मध्ये सुद्धा गुरव किंवा तत्सम शैव पुरोहितच ज्यांना ब्रिटिश हिंदू म्हणतात त्यांचे पुरोहित म्हणून काम करत होते ब्रिटिशांनी ब्राह्मणांना दिलेला आश्रय हा त्यांना आंधळा बनवणारा ठरला त्यामुळे जनतेकडे थेट पाहण्याऐवजी ते ब्राह्मणांच्या चष्म्यातून पाहत होते यामुळे वसाहत वादाला कळत नकळत ब्राह्मणी वसाहत वादाचे किंवा वसाहतीक ब्राह्मणी वादाचे स्वरूप प्राप्त झाले भारतातल्या वसाहतवादाची चर्चा करताना आपणाला अनेकदा इतर देशांच्यातली मॉडेल्स बाजूला काढून ठेवावी लागतात हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या स्थानिक जमातींच्या मध्ये अनेकदा अशा काही जमाती दिसतात जिथे पुरोहित शाही प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉमिनेट आहे आपल्याकडेही अशीच काहीशी वस्तुस्थिती आहे आणि हे घडण्यामध्ये मुस्लिम राजवटीचा प्रचंड मोठा वाटा आहे प्रथम मुस्लिमच होते ज्यांनी केवळ किताबी धर्म आहे म्हणून ब्राह्मण धर्माला मान्यता दिली आणि ब्राह्मण ग्रंथाचा वेद हा लिखित धर्मग्रंथ किंवा किताबी धर्म ग्रंथ आहे या एका किताबी गृहीतकाला मान्यता देऊन ब्राह्मण धर्मालाच सर्व भारतीय धर्मांचे मेंदू मानले भारतीय इतिहासाचे सर्वाधिक नुकसान हे मुस्लिमांनी केलेले आहे त्यांचीच ही विरासत वारसा पुढे ब्रिटिशांनी चालवला गेली हजार वर्षे त्यामुळेच भारताचा इतिहास आणि त्याचे लेखन हे अत्यंत गुंतागुंतीचे बनत चाललेले दिसते इतकेच नव्हे तर स्वतःच्या इतिहासावर क्लेम करण्याची बुद्धी सुद्धा शैव लोक विसरून गेलेले दिसतात ज्या लोकांना स्वतःची परंपरा दिसत नाही इतिहास दिसत नाही ते आपले भविष्य नीट बघू शकत नाही शैव लोकांच्या बाबतीत हे जितके खरे आहे तितके ते इतर कोणातच कोणाबाबतच खरे नाही 


भारताचा इतिहास हा प्रामुख्याने दोन वर्ण लिहीत असतात पहिला ब्राह्मण वर्ण इतिहास लिहीत असतो आणि दुसरा हा क्षत्रिय वर्ण लिहित असतो सिंधू संस्कृतीचे काय करायचे हे न कळल्याने अलीकडे हे दोन्ही लोक वेगवेगळ्या मार्गाने ही संस्कृती बळकावण्याच्या दिशेने प्रयत्न करतात बहुजन समाजाला xx नसते अशा प्रकारचे गृहीतक यामागे आहे बहुजन समाज काही निर्माणच करू शकत नाही असेही इन डायरेक्टली या लोकांना सांगायचे असते वास्तविक या देशांमध्ये जे काही निर्माण केलेले आहे ते बहुजन समाजाने निर्माण केलेले आहे किंवा बहुजन समाजातल्या नायकांनी निर्माण केलेले आहे आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांनी या नायकांना क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्ण देऊन केवळ भडकवण्याचे काम केलेले आहे जेणेकरून सर्व श्रेय आपल्या पदरात पडावे इंग्रजांच्यामुळे वैश्य लोक हे केंद्रस्थानी आले आणि त्यांनी थोडा इतिहास वेगळा लिहिला परंतु त्यांना सुद्धा स्वतःच्या वैश्य वर्णत्वातून मुक्ती मिळालेली दिसत नाही याचे कारण भारतीय वैश्य समाज हाच मुळात कधीही ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांच्या प्रभुत्वातून मोकळा झाला नाही बहुजन समाजातील बहुसंख्य लोकांनी नेहमीच या लोकांनी काही दावा केला की त्याला लगेच स्वीकारण्याची तत्परता दाखवलेली दिसते आणि आजही ते अशी तत्परता दाखवतात ही तत्परता अत्यंत हानिकारक ठरलेली दिसते आता हे स्पष्टपणे सांगायची वेळ आलेली आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण आणि वैश्य या वर्णांशी आमचा काडीचाही संबंध नाही आम्ही बहुजन आहोत आणि आम्हीच या देशाचे मालक आहोत यामध्ये प्रामुख्याने शैवपुरोहितांना मुख्य भूमिका निभावावी लागेल कारण जोपर्यंत पंडित किंवा गुरव हे स्वतःला स्वतंत्र आणि वर्णमुक्त करत नाहीत तोपर्यंत त्यांची शैव ही आयडेंटिटी प्रस्थापित होणे अशक्य आहे अनेकांना इतिहास लिहावासा वाटतो परंतु वैदिकतेपासून सुटका मात्र करून घ्यायची नसते याचा परिणाम असा झालाय की शैव मंदिरातून सांगितला जाणारा इतिहास हा प्रामुख्याने वैदिक इतिहासच असतो शैव इतिहास नसतो


श्रीधर तिळवे नाईक

भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न २

श्रीधर तिळवे नाईक 


भारतामधील सिंधू संस्कृतीचे काही पुरावे विशेषत: पुरातत्वीय पुरावे उपलब्ध झालेले दिसतात पण सर्वात आश्चर्याची गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे वैदिक कालखंडाचे कसलेही पुरातत्वीय पुरावे उपलब्ध नाहीत याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की असे पुरावे का नाहीत असा प्रश्न विचारण्याऐवजी अनेक युरेशियन लोक सिंधू संस्कृती मधील पुरातत्वीय पुराव्यांच्या वर वैदिक संस्कृतीचा क्लेम लावताना व ती वैदिक संस्कृतीच होती हे सिद्ध करताना दिसतात हा खोटारडेपणा आहे आणि तो स्वीकारला जाणार नाही याची जोपर्यंत युरेशियन इतिहासकारांना स्पष्ट जाणीव होणार नाही तोपर्यंत त्यांचे भवितव्य अंधारात लटकत राहणे अटळ आहे कारण जग आता तुमची थापेबाजी स्वीकारायला तयार नाही जग आता पुन्हा एकदा तुमच्याकडे पुरावे मागते आहे आणि तुमच्याकडे ते नसल्यामुळे तुम्ही लिहीत असलेला इतिहास हास्यास्पद होत चाललेला आहे 


वास्तविक युरेशियन लोकांनी असा प्रश्न विचारला पाहिजे की असे पुरावे का नाहीत आणि या प्रश्नाचे उत्तर अनेकदा शैव संस्कृतीशी मिळते जुळते आहे आणि हे उत्तर आहे मुळातच या काळामध्ये वैदिक संस्कृती ही प्रामुख्याने मौखिक होती पुरातत्वीय पुरावे मागे सोडण्यासाठी मुळातच लिखित संस्कृती ही त्या संस्कृतीत विकसित व्हावी लागते आणि त्याचबरोबर नंतर कुठल्या ना कुठल्यातरी साधनावर असे लिखाण करता येण्याची किंवा उमटवण्याची कोरण्याची कला प्रगत व्हावी लागते शैव संस्कृतीच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे मुळात झाडावर झाडाच्या पानावर लिखाण केले जात असल्याने हे लिखाण टिकलेले नाही वैदिक संस्कृतीत मुळात लिखाणावर फारसा भरच नाही सर्व काही पाठांतर करायचे अशा प्रकारचा उद्योग प्रामुख्याने ब्राह्मणांनी आरंभल्याने फार मोठा सांस्कृतिक पुराव्यांचा घोळ वैदिक संस्कृतीत निर्माण झालेला दिसतो अलीकडे हा घोळ अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण झाला की वैदिक लोकांनी विशेषता ब्राह्मणधर्मी लोकांनी असे पुरातत्वीय पुरावे नष्ट केले असा प्रश्न काही लोकांनी विचारायला सुरुवात केलेली आहे कारण बौद्ध धर्माचे असे पुरावे ब्राह्मणांनी गाडून टाकले होते अशा प्रकारचा सिद्धांत उदयाला येतो आहे मुळातच आपण जर का या संदर्भात कंबोडियाचे उदाहरण घेतले तर तिथले मंदिर मग कोणी गाडले असा प्रश्न विचारता येईल वस्तुस्थिती अशी आहे की मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या देशाच्या इतिहासाचे पुरातत्वीय पुरावे नष्ट करण्याचे आणि त्या सर्व पुराव्यांना मूर्ती पूजा या एका टायटलखाली बरबाद करण्याचे अनेक उद्योग मुस्लिम राजवटींनी केलेले दिसतात बुतखाना मान्य नसल्याने बुतखाना नष्ट करता करता भूतखानासुद्धा म्हणजेच भूतकाळखानासुद्धा नष्ट झालेला दिसतो अगदी नालंदा विद्यापीठाचे उदाहरण यासंदर्भात वारंवार दिले जाते आजही बख्तीयार खिलजीचा यासंदर्भातला रोल काय होता हे वादग्रस्त आहे 


आपण मौखिक होतो ही गोष्ट जोपर्यंत वैदिक लोक स्वीकारत नाहीत तोपर्यंत ते असेच सांस्कृतिक परस्परविरोध प्रसवत राहणार 


दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कृतचा प्रमाणभाषा म्हणून करण्यात आलेला स्वीकार ! संस्कृतमुळे प्रगती झाली नाही तर उलट प्रगती थांबली हे अजूनही अनेकांच्या लक्षात आलेले दिसत नाही ज्या वेळेला बहुजन समाज नवीन नवीन गोष्टी निर्माण करत होता तेव्हा तेव्हा वैदिक लोक हे ज्ञान संस्कृत भाषेत सुरुवातीच्या कालखंडात अनाथ असावेत परंतु नंतर मात्र निर्माण झाल्याने असे भाषांतर करणे थांबलेले दिसते उलट ब्राह्मण पुन्हा पुन्हा आपल्या प्राचीन ग्रंथांच्या मध्ये गटांगळ्या खात होते नवीन काही प्रत्यक्ष पाहण्याऐवजी शब्द प्रमाणामध्ये गुंतलेले होते संस्कृतने केवळ ज्ञान स्टोर केलेले आहे आणि त्याचा एक सार्थ अभिमान मी नेहमीच बाळगलेला आहे मात्र नवीन ज्ञान निर्माण करण्याच्या संदर्भात किंवा विज्ञान निर्मितीच्या संदर्भामध्ये मात्र जितके काम व्हायला हवे होते तितके काम झालेले नाही बहुजन समाजामध्ये त्या ज्ञानाला मान्यता मिळाल्यानंतर मग त्याचे संस्कृतकरण झालेले आहे 


बाराव्या शतकापासून तर इतके संस्कृत प्रामाण्य वाढले की नवीन निर्मिती जवळजवळ थांबलीच सर्व काही रामायण आणि महाभारत यांच्या आधारेच लिहायचे किंवा पुराणांच्या आधारेच लिहायचे या गृहीतकामुळे भारतीय संस्कृती पुराणांच्या पलीकडे जायला तयार झाली नाही आणि यामुळे युरेशियन लोकांचे प्रचंड नुकसान झालेले दिसते पुढे अनेक शैवलोक युरेशियन संस्कृतीचे गुलाम बनल्यामुळे त्यांचेही यामध्ये नुकसान झाले अर्थात अधून मधून शैव राजवटी निर्माण होत राहिल्या आणि त्यांनी काही ना काही चांगले काम केलेले दिसते म्हणजे शिवाजी महाराजांची राजवट किंवा शिखांची राजवट मुळातच संस्कृत मध्ये ज्ञान साठले जाते पण ज्ञान निर्माण होण्याची प्रोसेस किती आहे हे विचारण्याची गरज आता आहे कारण नवीन युगाचे कसलेही ज्ञान संस्कृत मध्ये निर्माण होणे अशक्य बनत गेलेले दिसते त्यामुळे फक्त गौरव करण्यापूर्वी संस्कृत भाषा ठीक आहे पण तिच्यामध्ये कोणी आता नवीन संशोधन करेल किंवा नवीन संशोधन करून ते संस्कृत मध्ये मांडेल अशी शक्यता दिसत नाही आज ना उद्या ब्राह्मण लोकांनाही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल दुर्दैवाने ती अजूनही स्वीकारली जात नाही हे घडले कारण ज्याला आज आपण विज्ञान म्हणतो ते निर्माण होण्याची प्रक्रिया संस्कृत भाषेने थांबवली पूर्वी निदान प्राकृत अथवा देशी भाषेत जे काही विज्ञान व्हायचे ते अनुवाद करण्याची तरी शक्यता होती तीही शक्यता पाचव्या सातव्या शतका नंतर नष्ट होत गेलेली दिसते याचे कारण विज्ञान हे पूर्णपणे शूद्र वर्ण कडे सोपवलेले दिसते आणि शूद्रांना संस्कृत पासून वंचित केले गेले त्यामुळे संस्कृत मध्ये विज्ञान येण्याची शक्यता जवळजवळ संपलीच अपवाद फक्त काही शैव पंडित होते असे आता दिसते या सर्व पंडितांच्या वर अलीकडे ब्राह्मण ब्राह्मण होते असा युक्तिवाद करतात परंतु ते ब्राह्मण नव्हते पंडितच होते म्हणूनच ते हे विज्ञान निर्माण करू शकले हे आपण लक्षात घेतले पाहिजे विशेषता बाराव्या शतकानंतर हे वारंवार घडलेले दिसते आणि काल्पनिक ग्रंथ जास्त गजबज करताना दिसतात 


अनेक संस्कृत ग्रंथांच्या मध्ये आपणाला ग्रंथकार त्याने कुठल्या ग्रंथांच्या आधारे हा ग्रंथ रचला हे सांगताना दिसतो परंतु प्रत्यक्षात ते ग्रंथ मात्र उपलब्ध होताना दिसत नाहीत म्हणजे कौटुल्याच्या अर्थशास्त्रा आधीच आपल्याकडे शैव लोकांची अर्थशास्त्रे लिहिली गेलेली होती आणि ती प्राकृत भाषेत लिहिली गेलेली असावीत मात्र संस्कृत मध्ये त्या पुस्तकांच्या आधारे ग्रंथ निर्माण करताना त्याला पूर्णपणे ब्राह्मण ग्रंथ बनवलेले आहे असे स्पष्ट दिसते त्यामुळे वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार आपणाला या अर्थशास्त्रात झालेला दिसतो कारण लिहिणारा कौटिल्य व ब्राह्मण धर्मीय आहे त्यामुळे अनेकदा संस्कृत ग्रंथांच्या मधले हे उल्लेख केलेले ग्रंथ नेमके कुठल्या भाषेत होते हे आजही सांगता येत नाही ते संस्कृत मध्येच आहेत असं आपण गृहीत धरायचं 


हे सर्व का घडले हे ही स्पष्ट आहे शैव धर्मातल्या लोकांना सुद्रांचा दर्जा अतिसुंद्राचा दर्जा देऊन आणि आदिवासी लोकांना जंगलात ठेवून किंवा वाणी आणि पणी लोकांचा व्यापार थांबवून त्यांचे सर्व ज्ञान हे संस्कृत पासून दूर ठेवण्यात आले. परिणाम इतकाच झाला की संस्कृत नुकसानीत गेली 


एखादी भाषा फक्त संपर्क भाषा होणे आणि ज्ञानभाषा होणे यामध्ये फरक असतो प्राकृत किंवा देशी भाषांच्या मध्ये निर्माण झालेले साहित्य हे संस्कृत मध्ये आणून संस्कृतच्या द्वारे संपर्क साधणे ही गोष्ट वेगळी आणि खुद्द संस्कृत भाषेलाच ज्ञानभाषा बनवून तिच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन ज्ञानाची भर टाकणे वेगळे ! संस्कृत ही आता ज्ञानभाषा वाटते याचे कारण अनेकदा प्राकृत भाषेत किंवा देशी भाषेत निर्माण झालेले ग्रंथ किंवा मौखिक परंपरा नष्ट झालेल्या आहेत अन्यथा संस्कृत भाषेतल्या अनेक ज्ञानाचे संदर्भ हे इथल्या लोक संस्कृतीमध्ये दडलेले आहेत किंबहुना शैवधर्माला लोकधर्म असा शब्द प्रचलित असलेला दिसतो त्याचे कारण शैव धर्माचा लोकभाषांशी आणि लोकांशी असलेला संबंध! प्राचीन काळातले पंडित हे लोकांशी संबंधित असलेले लोक होते ते हवेतले हवेत लिखाण करत नसत त्यामुळे त्यांनी केलेली लिखाण मात्र काही प्रमाणात विज्ञानाशी निगडित आहे 


सर्वसाधारणपणे ज्याला बौद्ध लोक बुद्ध पूर्व कालखंड म्हणतात तो बारा हजार ते चार हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होता असे म्हणता येते 


ज्याला आज आपण आगम कालखंड म्हणतो तो मात्र नकुशीश यांच्या पाशुपत दर्शनानंतर उदयाला आलेला दिसतो पुढे पुढे या पाशुपत दर्शनाचा पाशुपत धर्मही झालेला दिसतो ज्याचा उल्लेख अनेकदा मार्क्सवादी इतिहासकार करत असतात पाशुपत दर्शनानंतर त्यातून कपिलाचा षष्ठीतंत्रातून सांख्य धर्म उदयाला आला आणि या सांख्य धर्मातून आपणाला जैन आणि बौद्ध हे धर्म निर्माण झालेले दिसतात एकंदरच आपण हा आगम कालखंड पाशुपत ,सांख्य ,जैन आणि बौद्ध या चार आगमांचा कालखंड आहे असे म्हणू शकतो यामध्ये सुरुवातीला आपणाला ज्ञानमार्ग किंवा ज्ञानतंत्रे अधिक प्रभावी झालेली दिसते ज्यांनी ही दर्शने किंवा हे धर्म किंवा हे आगम स्थापन केले त्या सर्वांशी अनेकदा या आगमचे पालक प्रामाणिक राहिलेले दिसतात साहजिकच मूलधर्म नाहीसा झालेला दिसत नाही नंतर मात्र या धर्मांच्या मध्ये भक्ती तंत्र घुसलेले दिसते आणि अगदी भक्तीला प्रचंड विरोध करणारे जैन आणि बौद्ध धर्म सुद्धा महावीरांची आणि गौतम बुद्धांची पूजा करताना दिसतात यातूनच महायान निर्माण झालेले दिसते आणि ज्ञानतंत्राला यानंतर हीनयान समजले गेले आहे या भक्ती संपदायचा उदय झाल्यानंतर आपणाला अनेक बौद्ध जैन आणि शैव मंदिरे आणि पुढे वैष्णव मंदिरे निर्माण झालेली दिसतात इथूनच साहजिकच मग आपणाला पुरातत्वीय पुरावे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागतात आणि नंतर अनेक पुस्तके ही लिहिली गेलेली दिसतात यातून एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे लिखाणासाठी किंवा लिखित संस्कृतीसाठी भक्ती ही अधिक पूरक आहे की काय ? कारण आपण जर या काळातल्या आफ्रिकन संस्कृतीकडे लक्ष दिले तर तिथे टॅबलेटस निर्माण झालेली दिसतात आणि ती प्रामुख्याने राजाला देव मानल्याने निर्माण झालेली दिसतात 


या कालखंडानंतर अस्तित्वात असलेले पण फार प्रचलित नसलेले कारण जैन आणि बौद्ध या लोकांनी ब्रह्मचर्याचा केलेला गवगवा! तर ब्रह्मचर्याला ला झुगारून देणारे शक्तितंत्र सर्वच धर्मांच्या वर प्रभाव टाकताना दिसतात आणि प्रामुख्याने त्यातूनच बौद्ध तंत्र जैनतंत्र आणि वैष्णो तंत्र निर्माण झालेले दिसते हा सरळ सरळ शैव-धर्माचा थेट पडलेला प्रभाव आहे मात्र शैव-धर्मामध्ये जी विविधता दिसते ती विविध इतर तंत्रांच्यात दिसत नाही 


शक्ती तंत्रामध्ये अनेकदा यंत्रे फार महत्त्वाचे असतात आणि ती या कालखंडात फारच बोकाळलेली दिसतात आणि याचाच एक दुष्परिणाम किंवा सुप परिणाम आपणाला असा दिसतो की अनेक शाक्तविधींचा आपणाला कागदोपत्री पुरावा दिसायला लागतो यातील सर्वात विचित्र गोष्ट ही बौद्ध धर्मामध्ये आहे कारण बौद्ध धर्मामध्ये वज्रयान नावाचे एक स्वतंत्र यान निर्माण झालेले दिसते आंबेडकरांनी याला बौद्ध धर्माचे पतन मानलेले आहे या शक्ती तंत्राचा प्रतिवाद करण्यासाठीच लक्ष्मी आणि सरस्वती यांचे महत्त्व वाढवणे व वैदिक लोकांच्यासाठी आणि ब्राह्मण लोकांच्यासाठी अटळ बनले आणि त्यानंतरच अनेक महालक्ष्मी आणि सरस्वतीची मंदिरे निर्माण झालेली दिसतात अनेक शाक्त देवता लक्ष्मी म्हणून नाम रूपाला आणण्याची धडपड केली गेलेली दिसते पुढे मग साहजिकच शक्ती तंत्रापाशी भारत थांबलेला दिसत नाही तो नंतर शरीर केंद्री योगकेंद्री झालेला दिसतो एका अर्थाने भोगाकडून योगाकडे ही वाटचाल आहे याच काळामध्ये शैव-धर्मामध्ये आपणाला राजयोग हा शब्द उदयाला आलेला दिसतो जो पुढे विवेकानंद यांनी वापरलेला आहे हठयोगाचे वाजवीपेक्षा जास्त स्तोम माजलेले दिसते आश्चर्याची गोष्ट अशी की क्रिया तंत्र मात्र या काळामध्ये फारसे ॲक्टिव्ह झालेले दिसत नाही ज्ञानतंत्रामधून या तंत्रामधून आलेल्या नाथ तंत्रामधून आपणाला पुन्हा एकदा नवनाथ संप्रदाय उदयाला आलेला दिसतो  

ज्याचा महाराष्ट्रावर प्रचंड प्रभाव आहे 


थोडक्यात हा कालखंड जर का आपण मांडायचे ठरवले तर 

१ ज्ञानतंत्रिय कालखंड  

२ भक्तीतंत्रीय कालखंड 

३ शाक्ततंत्रिय कालखंड

४ शरीर तांत्रिय कालखंड 

अशा चार कालखंडामध्ये विभागता येतो 


मी मागेच एकदा म्हटल्याप्रमाणे इस्लामला आणि त्याने त्याच्याजवळ फक्त इबादत म्हणजेच भक्ती असल्याने सर्वच्या सर्व भारत भक्ती तांत्रिकीय झाला ज्ञान , शरीर आणि शक्ती यांची उपासना थांबली आणि सर्व भारतीय भक्तीमध्ये तुडुंब डुबून गेले ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत भक्ती हा एक अर्थाने फार चांगला शॉर्टकट आहे मात्र भारतीय भक्ती आणि इस्लामिक इबादत यांच्यामध्ये जो नैतिकतेचा फरक होता त्या नैतिकतेच्या फरकामुळेच इस्लाम विजय होत गेला कसलीही नैतिकता नसलेली व स्वतःचा विस्तार वाढवणारी अशी ही इबादत आहे साहजिकच भक्ती आणि इबादत यांच्या स्पर्धेमध्ये इबादत विजयी होताना दिसते मुख्य म्हणजे क्रौर्य हे इस्लामच्या हातातील सर्वात मोठे शस्त्र आहे जे त्यांच्या धार्मिक ग्रंथानेच दिलेले आहे त्याचा मुकाबला करण्याची कसलीही तरतूद भारतीय भक्ती मध्ये विशेषत : वैष्णव भक्ती मध्ये नव्हती


प्रश्न असा आहे की हा भक्तीचा प्रसार योग्य आहे का ? वस्तुस्थिती अशी आहे की समाजामध्ये शरीर केंद्री ,ज्ञान केंद्री ,शक्ति केंद्री ,भाव केंद्री , क्रिया केंद्री अशी पाचही प्रकाराची माणसे वावरत असतात जेव्हा एखादे तंत्र सर्वात श्रेष्ठ बनते तेव्हा फक्त त्याच कालखंडातील लोकांना मोक्षाची संधी जास्त मिळत जाते इतर तंत्रातून कोणी मोक्षाला पोहोचला असेल तर त्याचा गाजावाजा होत नाही उदाहरणार्थ या काळामध्ये ज्ञान तंत्रा मधून बौद्ध किंवा शैव लोकांच्यातून कोणी निर्माणच झाला नाही असे म्हणता येत नाही परंतु इतिहासामध्ये त्यांचा तसा उल्लेख नाही बुद्ध आणि नाथ दोघेही गायब झालेले दिसतात मात्र संतांच्या मात्र अनेक दंतकथा प्रचलित झालेल्या दिसतात आणि त्यांचे साहित्य सर्वाधिक गाजलेले दिसते याचे कारण इस्लामच्या प्रभावामधून आपण स्वीकारलेली भक्ती आणि केवळ भक्ती होय सुफीधर्माने या काळामध्ये भक्तीचा कल्लोळ उडवून दिला आणि भारतीयांनी जणू काय भक्ती हाच एकमेव तंत्राचा पर्याय उपलब्ध आहे असा गैरसमज करत स्वतःचा सत्यानाश करून घेतला 


खरे तर आठव्या शतकामध्येच भक्ती तंत्राचा प्रभाव प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना दिसतो आणि यामुळेच कदाचित आपण शेवटी इस्लाम कडून हारलेलो आहोत कारण या काळामध्ये प्रत्यक्ष इस्लाम मध्ये मात्र ज्ञानाची सुद्धा प्रचंड उपासना सुरू होती पण दुर्दैवाची गोष्ट अशी की इस्लाम मध्ये सुद्धा चौदाव्या शतकानंतर सर्वकाही इबादतमय होऊन गेले आणि त्याचा सर्वात मोठा फटका नंतरच्या मुस्लिम राजवटींना पडला आणि ज्ञान तंत्रातून उदयाला आलेले इंग्रज आणि युरोपीय सर्वत्र विजयी होत गेले 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

मोक्ष LOVE