शिव , आदियोगी , शंकर ,सद्गुरु आणि रविशंकर 

शिव , शंकर ,सद्गुरु आणि रविशंकर 

श्रीधर तिळवे नाईक 

गेले काही दिवस अचानक रविशंकर यांनी सद्गुरूंच्या आदियोगी मांडणीवर हल्ले चढवले आणि त्यावरून वादळ उठले असे दिसते

आदियोगी ही संकल्पना मुळात नवी नव्हे नाथ परंपरेत आणि नवनाथपरंपरेत ते आदिनाथ या नावाने ओळखले जातात .

योगपरंपरेमध्ये नेहमीच शंकराला आदियोगी मानले जाते प्रश्न असा आहे की मग वाद कुठे सुरू झालाय तर सद्गुरु यांनी शिव हा पंधरा हजार वर्षांपूर्वी किंवा त्याआधी अवतरला होता अशी मांडणी केली वास्तविक त्यांनी शिवा असा शब्द वापरण्याऐवजी शंकर असाच शब्द वापरायला हवा होता परंतु शंकरालाच नंतर परंपरेने शिव म्हणायला सुरुवात केली आणि अनेकदा दक्षिणेमध्ये त्यांचा उल्लेख सिव म्हणून होतो त्याला धरूनच त्यांनी सिव हे नाव कायम ठेवलेले दिसते त्याला प्रतिउत्तर म्हणून रविशंकर यांनी शिवाला ना आदि आहे ना अंत आहे तो अनादी अनंत आहे आणि तो अनादि असल्याने त्याला अंतही नाही अशी मांडणी केली आणि ज्याचा जन्मच झालेला नाही त्याच्या संदर्भात अशी विधाने का करावीत असा एक प्रश्न उपस्थित केला यावर वाद होणे अटळ होते आणि तो झालेला आहे आणि आत्ताही तो चालू आहे 

वास्तविक या दोन्ही मांडण्या एकमेकाला छेद देतात म्हणूनच त्यांचा विचार करण्याची वेळ येते 

वास्तविक ह्या सगळ्या मांडण्या तत्त्व म्हणून समजून घेताना जे गैरसमज होतात त्यातून झालेले आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शिव हे तत्व आहे आणि ते अनादी आहे आणि त्याला अंत नाही ते अनंत आहे 

या उलट शंकर किमान १५००० वर्षांपूर्वी निर्माण झालेले असावेत असा माझा अंदाज आहे ते एका आदिवासी जमातीत निर्माण झाले होते आणि ते शंभू या नावाने ओळखले जात कालांतराने गणांचा संकर करणारे म्हणून शंकर आणि सतत शंका घेणारे म्हणून शंकर अशा दुहेरी अर्थांने त्यांना शंकर असेच म्हटले जाऊ लागले 

 प्रथम मोक्ष प्राप्त करणारे म्हणून त्यांना आदियोगी म्हटले जाते परंपरेत ते प्रकट झाले किंवा जन्मले असे मानले जात नाही एका अर्थाने ते दैवी आहेत अशी परंपरा मानते पुढेही अशाच प्रकारची मांडणी नवनाथांच्या संदर्भात येते त्यांचा म्हणजे सर्व नाथांचा जन्म अलौकिक दाखवला जातो  असा अलौकिक जन्म का दाखवला जावा हा एक फार मोठा प्रश्न आहे आपल्याला उपदेश करणारे गुरु हे अलौकिक होते असे सांगून नेमके काय होत साध्य होते हा मला नेहमीच प्रश्न पडतो कारण ह्या त्यांच्या अलौकिकतेमुळेच मोक्ष हा काहीतरी अलौकिक आणि ढगातला विषय आहे असा गैरसमज पसरतो शंकरांच्या बाबतीत अशीच अलौकिकता पसरवली गेलेली आहे पसरवली आहे आणि आता सर्व शैव भक्त त्यांना अलौकिकच मानतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात विशेषतः सद्गुरूंच्या संदर्भात हे प्रश्न आता का निर्माण केले जातात हे समजून घेणे आवश्यक आहे वस्तुस्थिती अशी आहे की आता शैव धर्मावर सर्व बाजूने हल्ले करणे गरजेचे झालेले आहे आणि शैव धर्माची जागतिक मांडणी ही सद्गुरूंनी केल्यामुळे साहजिकच तो पाया नष्ट करणे आता गरजेचे वाटणारे लोक आहेत हे सर्व लोक जय xxx वाले आहेत वास्तविक हे करून आपण आपल्याच भारतीय संस्कृतीच्या एका महान आयामाला मुकत आहोत याचे भान बहुदा नसावे यावर उपाय एकच उरतो तो म्हणजे आपण नीट मध्यम मार्ग काढणे त्यासाठी काही विशेष करण्याची गरज नाही प्रत्यक्षात काय झाले असावे याचा नीट अंदाज घेतला की ते स्पष्ट होते

 सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवान शंकर हे आदीयोगी  आहेत हे आपण सर्वात प्रथम लक्षात घेतले पाहिजे भगवान शंकर शिवतत्वाला उपलब्ध झाले म्हणजेच मोक्ष मिळवून अनंत झाले या दोन गोष्टी एकमेकाला पूरक पण तरीही एकमेकापासून वेगळ्या आहेत कारण ज्याला मोक्ष मिळतो तो शिव बनतो भगवान शंकर शिव बनले म्हणूनच आपण त्यांना भगवान शिव असेही म्हणतो जीवाची शिवापासून होणारी ही यात्रा सर्वात प्रथम भगवान शंकर यांनी पूर्ण केली म्हणून आपण त्यांना आदियोगी म्हणून सन्मान देतोपण मौखिक परंपरा ह्या जर का एकमेकाला घासून आपण पाहिल्या तर मात्र आपणाला शंकर नावाची व्यक्ती होऊन गेली हे स्पष्टपणे कळते आणि त्याचबरोबर शिव  तत्त्वाबद्दल आणि शक्ती या तत्त्वाबद्दलची चर्चा भगवान शंकर यांनीच सुरू केली हेही आपणाला कळते आणि योगाची सुरुवात ही भगवान शंकर यांनीच केली हेही आपणाला कळते हे नाकारणारे काही लोक आहेत अलीकडे काही लोक जैन लोकांनी योग सुरू केला असेही म्हणतात तर तसा म्हणण्याचा हक्क असतोच कारण शेवटी अलीकडे मौखिक परंपरा नाकारून फक्त लिखित परंपरा मानण्याची सवय अनेकांना लागलेली आहे आता ज्या काळामध्ये लिखित परंपरा अस्तित्वातच नव्हती लेखन अस्तित्वातच नव्हते ते लोक काहीच बोलत नव्हते आणि त्यांना काहीच अक्कल नव्हती अशी गृहीतक धरायचे का गृहीत धरायचे का हा प्रश्न मात्र आपण स्वतःला विचारावा हे उत्तम 

आता शिव हे तत्व आहे आणि शंकर शिवशक्ती ईश्वर जीव अशी तत्वे सांगणारा आणि 114 तंत्र सांगणारा माणूस आहे हे स्पष्ट झाले की मग सद्गुरु आणि रविशंकर या दोन व्यक्तींनी त्यावरून वाद घालावा हेच आश्चर्यकारक वाटायला लागते वास्तविक दोघांनाही शिव हे तत्व आहे हे माहीत आहे वाद निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण दोन भिन्न परंपरा आहेत साहजिकच शिव आहे पण शंकर नाही अशी काहीशी रविशंकर यांची मांडणी आहे की काय अशी शंका आहे प्रत्यक्षात दोन्हीही सत्य आहेत अनेक लोक या संदर्भामध्ये पुरावा मागतात पण मुळात हा प्रागऐतिहासिक कालखंड असल्यामुळे त्याविषयी काही बोलणेच अशक्य होऊन बसते सिंधू संस्कृतीमध्ये सापडणारे शिवलिंगे एवढाच काय तो आपल्याकडे पुरावा आहे पशुपतिनाथाचे सील हे आणखी एक पुराव्याचे लक्षण आहे साहजिकच अलीकडे त्यावर जितके हल्ले चढवता येणे शक्य आहे तितके हल्ले चढवले जातात कारण सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृतीच होती असे दाखवण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे जेणेकरून अनार्य शैव लोकांना कसलेही श्रेय मिळू नये असा प्रयत्न चाललेला असतो आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अनार्य  लोकांना या संदर्भात काहीही जाणीव नाही किंवा जाणीव असली तरी ते स्वतःच्या धर्माबाबत व संस्कृती बाबत संवेदनबधिर आहेत काही लोकांनी अलीकडे ग्रीक लोकांच्याकडनं आयात केलेली फराटाइल क्रिसेंट सृजन फलविधीची कन्सेप्ट शिवलिंगाला लावून पाहिलेली आहे वास्तविक आपल्याकडे सुफलन विधीचे वेगळे उपचार असतात शिवलिंगाशी त्याचा काही संबंध नाही परंतु हा संबंध जोडून जास्तीत जास्त अपप्रचार करायचा असा काहीही प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केलेला दिसतो आहे सातव्या शतकानंतर शैव धर्म स्वतःच्या ताब्यात घेऊन अनेक दंतकथा निर्माण करण्याचा उद्योग या देशातल्या ब्राह्मण लोकांनी केला आणि मग जास्तीत जास्त उथळता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि असे दाखवण्याचा प्रयत्न झाला की शिव म्हणजे रुद्र या वैदिक देवतेचाच अवतार आहे याला अनेक लोक बळी पडलेले  दिसतात मुख्य म्हणजे स्वतःला युरेशियन समजणारे लोक पण प्रत्यक्षात हिमाचल प्रदेश काश्मीरपाशी राहून आणि अफगाणिस्तानात राहून गोरे झालेले मूळचे अनार्यच असलेले लोक जाणीवपूर्वक हा प्रचार स्वीकारतात कारण त्यांना स्वतःला वैदिक परंपरेची स्वतःला जोडायचे असते आपल्या पूर्वजांनी युरेशियन लोक येण्यापूर्वीच शैव धर्म स्वीकारला होता हे त्यांना लपवायचे असते भारतीय असण्याची बहुदा त्यांना लाज असावी साहजिकच सर्वशैव पुराणांच्या मध्ये अनेकदंत कथा घुसवल्या गेल्या आणि एक काल्पनिक शैव धर्म निर्माण केला गेला व शेवटी त्यातून पोरानुक्त शैव धर्म निर्माण झाला ज्याचा मूळ धर्माशी काडीचाही संबंध नव्हता पुढे नवनाथ संपदायाने या विरोधात आपोआप उठाव केला तर हा नवनाथ संप्रदाय सुद्धा आपल्या ताब्यात घेतला गेला आणि तिथे पुन्हा एकदा दंतकथांचा भडीमार सुरू केलेला आहे शिवपुराणांमध्ये तर अनेक उथळ दंतकथा टाकल्या गेलेल्या आहेत शैव परंपरेत असलेल्या दंतकथांचे जास्तीत जास्त डीस्टॉर्शन करायचे आणि तेच मूळ दंतकथा म्हणून खपवायचे असे हे धोरण आहे 

प्रश्न असा आहे की हे नेमके आत्ताच पुन्हा पुन्हा का आणले जात आहे अचानक असे काय झाले आहे की हर हर महादेवाचा त्याग करून जय श्रीराम स्वीकारला गेला ? याचा विचार करण्याची मात्र शैव लोकांच्यावर  आता वेळ आलेली आहे आपल्याकडे फक्त त्याबद्दल चालून आलेल्या दंतकथा आहेत या दंतकथांच्या आधारे शिव झालाच नाही असे म्हणता येते पण मग ही वस्तुस्थिती बुद्धा बाबतही अशीच आहे बर्ट्रांड रसेल याने हिस्ट्री ऑफ वेस्टन फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये बुद्ध हा काल्पनिक असावा अशी शंका व्यक्त केलीच होती बुद्धाच्या अस्तित्वाचा समकालीन पुरावा आपल्याजवळ नाहीये जे पुरावे आहेत ते नंतरचेच आहेत आणि ते त्या काळातले आहेत जेव्हा लेखनाचा शोध लागलेला होता आणि तरीसुद्धा बुद्ध विषयीचे समकालीन लेखन उपलब्ध नाही शंकराच्या काळामध्ये तर आपणाला लेखनही विद्या अस्तित्वात तरी होती की नाही याबद्दल शंका आहे त्यामुळे लिखित पुराव्याच्या आधारे भगवान शंकरांचा इतिहास कसा लिहिणार हा प्रश्न आहे मात्र त्यांनी दिलेले उपदेश उपलब्ध आहेत आणि ते वेगवेगळ्या शैवग्रंथात अवतरलेले दिसतात बुद्धाचा सुद्धा फक्त उपदेश अस्तित्वात आहे आणि तोही अशोकाने मेंटेन केला म्हणून अन्यथा तेही झाले नसते. वस्तुस्थिती अशी आहे की बुद्ध झाल्यानंतर शेकडो वर्षांनी त्याचा मेसेज उपलब्ध झाला. शंकरांच्या बाबतीत मात्र मौखिक परंपरेमुळे तो पिढ्याने पिढ्या चालत आलेला दिसतो आणि पुढे यांची पुस्तके झालेली दिसतात आणि त्यांना तंत्र असे नाव दिलेले दिसते हा लोकधर्म असल्याने लोकांनीच तो टिकवलेला आहे खरे तर तो अनेकांना अनेक पद्धतीने खटकत असतो परंतु तो लोकांच्यातच इतका लोकप्रिय आहे की त्याचे काहीही करता येत नाही आणि आत्ताही बहुदा हीच मजबूरी असावी की शैव धर्माचे काहीही करता येत नाहीये 

 यावर उपाय काय ? तर या संदर्भात सद्गुरु काय म्हणतात किंवा रविशंकर काय म्हणतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण साधीसुधी वस्तुस्थिती स्वीकारावी ती म्हणजे शिव हे तत्व आहे आणि भगवान शंकर हे ते तत्व शोधणारे त्या तत्त्वाला उपलब्ध होणारे पहिले आदियोगी आहेत कारण त्यांनीच योग मार्ग शोधला एकदा हे सर्व स्पष्ट झाले की मग वाद घालण्याची गरज उरत नाही आता कोणी म्हणेल की आम्ही शिव हे तत्व स्वीकारतो पण शंकराबद्दल काहीही पुरावा नसल्याने आम्ही नाकारतो तर मी म्हणेन तो अधिकार तुम्हाला नक्की आहे कारण शंकराबद्दलचे पुरावे आणायचे कुठून आणि आदिवासी दंतकथांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे आता तुम्हाला आदिवासी दंतकथांना नकार द्यायचे असतील तर मग त्या संपूर्णपणे तुम्ही नाकारल्या पाहिजेत मात्र या संदर्भात सिलेक्टिव असणारे लोक खूप आहेत म्हणजे शंकरांच्याबाबत दंतकथा असेल तर ती नाकारायची आणि इतर सर्व बाबतीत मात्र आदिवासी साहित्य लोकसाहित्य म्हणून स्वीकारायचे तर हा दुटप्पीपणा आहे आणि तो चालणार नाही एवढ्या सगळ्या आदिवासी जमातींनी ही स्मृती जपून ठेवलेली असावी हे आश्चर्यकारक आहे असो जेव्हा जेव्हा इतिहास पूर्व कालखंड येतो तेव्हा तेव्हा सायन्सला काही मर्यादा पडतात आणि इतिहास पूर्व कालखंडाबाबत तर त्या मौखिक परंपरेच्या संदर्भातही पडतातच पडतात एक गोष्ट नक्की आहे की आपणाला शिवसूत्र उपलब्ध आहेत शिवाच्या नावाने सांगितली गेलेली पुस्तके उपलब्ध आहेत उदाहरणार्थ भक्ती सूत्रे प्रथम शंकराने नंदीला सांगितले हे आपल्याला माहिती आहे तर अशा तऱ्हेने अनेक अनुमानात्मक पुरावे आपल्यासाठी उपलब्ध आहेत हे स्वीकारायचे की नाही हा मात्र फार मोठा प्रश्न आहे कारण प्रत्यक्ष प्रमाण स्वीकारले तर मात्र मौखिक परंपरेत काहीच प्रत्यक्ष नसल्याने काहीही नीट ठरवता येत नाही 

हा प्रश्न शंकरांच्या बाबतीतच येत नाही तो जीजस बाबतीत सुद्धा येतो आणि मोजेस बाबतीत सुद्धा येतो आजही पाश्चात्त्य देशांमध्ये हे दोघेजण होऊन गेले की नाही याबद्दल प्रचंड वाद सुरू आहे मोहम्मद पैगंबर यांच्या काळामध्ये अशा प्रकारचा वाद होण्याची शक्यता नव्हती कारण लिखित परंपरा पूर्णपणे सामान्य जनतेला सुद्धा उपलब्ध झाली होती त्यामुळे ते होऊन गेले याबद्दल शंका येत नाही मात्र त्यांनी मानलेले स्वीकारलेले सर्व  अब्राहमिक प्रेषित होऊन गेले की नाही याबद्दल मात्र शंका येते कारण समकालीन पुरावे उपलब्ध नाहीत ही अडचण मुळातच इतिहास पूर्व कालखंडाच्या अंगाने किंवा लेखन पूर्व कालखंडाच्या अंगाने येते. सर्वच ठिकाणी लेखन विद्या डेव्हलप झालेली नव्हती काही जमातींनी तर लेखन नाकारलेच यामध्ये सर्वात पहिला क्रमांक शैव लोकांचा आहे याबाबतीत एक स्पष्टीकरण असेही आहे की लेखन अस्तित्वात होते परंतु ते ज्या पानांच्यावर लिहिले जात होते ती पाने नष्ट होणारी होती आणि तांदळाच्या साह्याने हे लेखन लिहिले जात असल्याने ते लेखन टिकणारे नव्हतेच आणि म्हणूनच ते लेखन टिकवण्याची जबाबदारी पंडितांच्या वर टाकण्यात आली. पंडित भगवान शंकरांचा उपदेश प्रत्येक पिढीत नव्याने लिहून काढत आणि तो पुढे वाचत किंबहुना जे वाचतात ते पंडित पढतात ते पंडित पठण करतात ते पंडित होय संपूर्ण आशियाभर आणि काही प्रमाणात आफ्रिका आणि युरोपमध्ये शैव धर्म पसरवण्याचे श्रेय पंडितांना आहे दुर्दैवाने नंतर त्यांनी हा धर्मप्रसार थांबवला आणि त्याचा प्रचंड फटका शैव धर्माला बसलेला दिसतो पंडितांचे ब्राह्मण होणे हे शैव लोकांना  प्रचंड महागात पडले आणि आजचा वाद ही त्यामुळेच घडलेला आहे जर का पंडित लोकांनी शैव धर्म सोडला नसता तर कदाचित या देशाचा इतिहास बदलला असता पण ब्राह्मण होण्याची सर्वश्रेष्ठ वर्ण होण्याची हौस मुख्य म्हणजे सत्तेची हौस ही अशी आहे की ती भल्याभल्यांना मोहात पाडून गेली. स्वतःला सामान्य म्हणवून घेण्यापेक्षा जर एखादा धर्म तुम्हाला भूदेव असा दर्जा देत असेल तर त्याचा मोह पडणे अटळ! पंडितांच्या बाबतीतही हेच घडले पुढे अनेक शैवधर्मात जन्मलेले राजे असे क्षत्रिय झालेले दिसतात त्यांना क्षत्रिय बनवण्यात आले कारण शैव लोकांची शासन संस्था बळकवली की सर्व काही बळकावता येते हे ब्राह्मणांना व्यवस्थित माहिती होते या शासक लोकांनाही विष्णूचा अवतार होण्याची इतकी घाई झाली की त्यांनी ताबडतोब वैदिक ब्राह्मण धर्म स्वीकारला म्हणजेच एका अर्थाने  पंडित समुदाय आणि शासक समुदाय हे कुठल्याही संस्कृतीचे आधार असणारे समुदाय युरेशियन धर्मांना जाऊन मिळाले मिळाले आणि याचे एकमेव कारण दोघांनाही असणारा सर्वोच्च दर्जा ब्राह्मण धर्माची खरी ताकद ही या सर्वोच्च दर्जातच आहे म्हणून आज सुद्धा या दोघांच्या पैकी कोणीही आपला वर्ण सोडायला किंवा त्याचा त्याग करायला तयार नाही भविष्यातही हे लोक हा त्याग करणार नाही त्याची मला पक्की खात्री कारण शेवटी सर्वच काही जापानी सामुराई असत नाहीत त्यासाठी मुळात देशाबद्दल आणि सामान्य जनतेबद्दल  प्रचंड प्रेम लागते तुकारामाच्या शब्दात कळवळा लागतो अशा प्रकारचे प्रेम अशा प्रकारचा कळवळा या दोन या दोन वर्णात फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही राष्ट्राविषयी गप्पा मारणे वेगळे आणि खरोखरच राष्ट्रावर प्रेम करणे वेगळे भारतात तरी हे दिसत नाही त्यामुळेच शैव-धर्म थोडासा उदयाला यायला लागला की ताबडतोब अशा प्रकारचे वादविवाद सुरू होतात आणि हळूहळू त्याला हटवण्याची प्रोसेस सुरू होते. प्रश्न हाच आहे की हा वाद विवाद या हटवण्याच्या प्रोसेसचाच एक भाग आहे का? 

श्रीधर तिळवे नाईक

कुलदैवत इष्ट दैवत आराध्य दैवत पावदैवत श्रीधर तिळवे नाईक


भारतामध्ये समकालीन सेवधर्मामध्ये चार प्रकारची दैवते आपणाला दिसतात पहिले कुलदैवत हे प्रत्येक कुळाचे म्हणजेच घराण्याचे असते आणि ते परंपरेने चालत आलेले असते म्हणजे माझ्या कुळामध्ये वेताळ शांतादुर्गा ही कुलदैवते चालत आलेली असतात महाराष्ट्रामध्ये अनेकांची कुलदैवते ही खंडोबा आणि तुळजाभवानी आहे ही कुलदैवते तुम्ही सर्वसाधारणपणे कोणाच्या कोणत्याही समारंभाला पुजत असता मग ते लग्न असो किंवा मरण विधी अस किंवा बारसे असो त्या कुलदैवत आमच्यामुळे संपूर्ण घराणे बांधले जाते आणि आपण एका कुळाचे आहोत ही भावना त्या कोणाला संघटित करत असते 


प्राचीन काळामध्ये जमात हेच कुळ असल्याने जमातीचे म्हणून एक दैवत असायचे आणि मग या दैवत पासून इतर अनेक दैवते निघत राहायची जसे की इस्लामचे कुलदैवत हे मुलता जमातीचे दैवत होते आणि त्याच्यापासूनच नंतर ज्याला ते अल्लाह म्हणतात ते दैवत आले ते संपूर्ण इस्लाम जमातीचे मुस्लिम जमातीचे कुलदैवत आहे आणि ते फक्त त्याची आणि त्याचीच पूजा करतात बाकी कुठल्याही दैवताला मानत नाहीत 


या पद्धती विरोधात आवाज उठवला तो भगवान शंकर यांनी त्यांनी सर्वांसाठी फक्त एकच देव दिला तो म्हणजे शिव पुढे मग अधिक विकास झाल्यावर विशेषता पार्वती आल्यावर शक्ती पण आली आणि मग हळूहळू ईश्वर भक्तीमुळे आला 


शिवशक्ती आणि ईश्वर ही त्रयी हळूहळू सर्व धर्माची मूलभूत रही बनली त्रयी बनली आणि ती सुद्धा हळूहळू शेव लोकांच्या देव्हाऱ्यात बसायला लागले या तिघांना एकत्र करणारे शिवलिंग तयार होऊ लागले आणि त्यातूनच तीन प्रकार जन्मले फक्त शिवाचे असलेले लिंग ते शिवलिंग फक्त शक्तीचे असलेले ते शक्ती लिंग शिव आणि शक्तीचे असलेले ज्याला आज आपण म्हणतो ते शिवलिंग आणि ईश्वराच्या चेहऱ्याचा समावेश केले गेलेले आणि शिवलिंगावर कोरले गेलेले लिंग म्हणजे ईश्वरलिंग ज्यात शिवशक्ती आणि ईश्वर तिघेही असतात पुढे यांच्यात भर पडत राहिली विशेषता सिद्धलिंग आले मूळशैव झाडे मध्ये झाडे मध्ये मूर्तिपूजा शक्यतो टाळली जाते मात्र पुढे ईश्वर तत्वाच्या वाढत्या प्रभावांमुळे हळूहळू सिद्धलिंग सुद्धा डेव्हलप होत गेले आणि पंच सिद्धलिंग ही डेव्हलप झाले म्हणजे लिंगा ऐवजी माणसाचा चेहरा आला त्यातून शंकर-पार्वती वगैरे यांच्या मुर्त्यांची पूजा सुरू झाली


भगवान शंकर यांनी शिव किंवा शक्ती किंवा ईश्वर यांच्यापैकी एकाला साधनेसाठी निवडण्यासाठी सांगितले आणि त्यामागे तुमच्यासाठी इष्ट काय आहे ते शोधा असे सांगितले विशेषता भक्ती अथवा भाव मार्गाने जाणाऱ्या भावतंत्राने जाणाऱ्या लोकांच्यासाठी पूजा करणे आवश्यक होते म्हणून त्यांना हे सांगणे आवश्यक बनले आणि हितेच इष्ट लिंगाचा उदय झाला मोक्षासाठी साधना करावयासाठी निवडले गेलेले दैवत म्हणजे इष्ट दैवत झाले विशेषतः शंकराचार्य यांनी हे इष्ट लिंग शिवलिंगामध्ये परिवर्तित केले 


सामान्य माणसाला मोक्षापर्यंत जाणे हे जवळजवळ अवघड असल्याने साहजिकच त्याने मात्र या तीन दैवतांच्या नादी न लागता आपला मार्ग निवडला आणि कुलदेवते बरोबर आराध्य दैवत या संकल्पनेचा उदय झाला आराध्य देवतेच्या उदया नंतरच शैव धर्म हा लोकधर्म बनत गेला यामध्ये आराध्य म्हणजेच आराधना करावयाची कोणतीही देवता आले. मात्र यामध्ये शांतपणे आराध्य देवते पुढे उभे राहणे किंवा आराध्य देवतेच्या मंदिरात जाणे एवढेच विधी पार पाडले जात होते. कालांतराने जसा जसा गोष्टी धार्मिक बदलत गेल्या तसा तसा दैवताचा एक आणखी प्रकार उदयाला तो म्हणजे पावदैवत म्हणजे जे दैवत मला पावते माझी मनोकामना पुरी करते ते दैवत होय त्याला काही लोकांनी कामनादैवत असेही नाव दिले. यामध्ये ना मोक्ष आहे ना धर्म आहे यामध्ये फक्त वासना आहे आणि आपल्या वाचनापूर्तीसाठी आपल्या इच्छेसाठी इथे साधना केली जाते यामध्ये कसलाही मोक्षाचा भाग नाही हिंदू लोक जो देव त्यांना पावतो त्याची पूजा करत असतात विशेषतः भारतामध्ये जेव्हा विरेशन लोक आले तेव्हा ही संकल्पना अधिकाधिक त्यांनी विकसित केली कारण त्यांच्याकडे देवता तीच जी पावते असा विश्वास होता आता जर का आपण हिंदू धर्मातकडे पाहिले तर आपणाला या पावणाऱ्या देवतांचा सुळसुळाट झालेला दिसतो याबाबतीत हिंदू इतके लवचिक आहेत की त्यांना मुस्लिम देवता सुद्धा चालतात ख्रिश्चन देवता सुद्धा चालतात देव पावतो की नाही एवढी एकच कसोटी ते लावून भक्ती करत असतात किंबहुना आराधना आणि भक्ती हे दोन शब्द वेगळे करण्याची वेळ येण्याची कारणच हे पाय देवतेचे झालेले आगमन होय 


भारतीय दैवत शास्त्रात त्यामुळेच विचार करताना या पाचही प्रकारांच्या दैवतांचा विचार करावा लागतो याशिवाय अनेक टाईप शोधता येतात परंतु मूलभूत प्रकार हे पाच आहेत जे प्रत्यक्ष जीवनामध्ये उपस्थित असलेले दिसतात 


श्रीधर तिळवे नाईक

शैव धम्म श्रुती आणि स्मृती श्रीधर तिळवे नाईक

आचार्य शंकर यांनी प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे श्रुती आणि अनुमानात्मक प्रमाण म्हणजे स्मृती अशी श्रुती आणि स्मृतीची व्याख्या केलेली आहे जेव्हा त्यांना श्रुती आणि स्मृती यांची शैव व्याख्या विचारली गेली तेव्हा हे घडले आहे कारण श्रुती ही संकल्पना मूळची शैव आहे आणि शैव श्रुती ही मूळ श्रुती आहे त्या उलट स्मृती मात्र युरेशियन आहे त्या शब्दाची व्याख्या करणे अत्यंत आवश्यक बनले म्हणून आचार्य शंकरांनी ही व्याख्या केली होती त्यांनी स्मृती हा शब्द मेमरीसाठीच वापरलेला आहे असे दिसते आणि मेमरी म्हणजेच स्मृती ही अनुमानात्मकच असते ती प्रत्यक्ष असत नाही असे दिसते यातून अनेक प्रश्न निर्माण होतात शब्द हा स्मृती असतो का हा मूलभूत प्रश्न यातून निर्माण होतो कारण शेवटी शब्द हा काही प्रत्यक्ष असत नाही तो प्रत्यक्षाची स्मृतीच असतो का हा खरा प्रश्न आहे माझ्या मते प्रत्यक्षाचे प्रत्यक्षात मेंदू मध्ये बिंब इम्प्रेशन उमटते आणि मग त्या बिंबापासून शब्द तयार होतो जर असा शब्द स्मृतीमध्ये असेल तर तो वापराला जातो किंवा मग शब्द नसेल तर शब्द निर्माण केला जातो आणि तो शब्द जो निर्माण झालेला आहे पुन्हा स्मृतीमध्ये जातो या अर्थाने शब्द हा स्मृती आहे मात्र बिंब हे जे दरम्यानचे काम आहे ते अनुप्रत्यक्ष असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे अनेकदा बिंब प्रतिबिंब हा खेळ सुरू होतो आणि शब्द म्हणजे प्रतिबिंब अशी ही धारणा बनते आचार्य शंकरांच्या या सिद्धांताला जितकी प्रसिद्धी मिळणे आवश्यक होती तितकी मिळाली नाही कारण आचार्य शंकर काय म्हणतात हे सर्व शैव दर्शनांनी फारसे टिकवून धरले नाही पुढे मग आद्य शंकराचार्य निर्माण झाले आणि हळूहळू आचार्य शंकरांचा विसर पडत गेला अनेक शैव विचारवंत शंकराचार्यांच्या अद्वैत वादात कोसळले कारण मुळात अवस्थांची चर्चा ही तंत्र म्हणून आधीच भगवान शंकर यांनी केली होती आणि तिचा पाया मुळात ज्याला आज दुर्वास म्हटले जाते त्या सुवास या सिध्द पुरुषाने घातला होता भगवान शंकर यांनी सांगितलेले अवस्था तंत्र आचार्य शंकर यांनी ते 

 लुप्त झाल्यावर त्याला पुन्हा जिवंत केले आणि शैव दर्शनामध्ये ते जिवंत राहिले १९ व्या शतकात स्मृतीची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा प्रामुख्याने मानसशास्त्रामध्ये झाली. साहजिकच या अंगाने काही चर्चा अपेक्षित होती पण दुर्दैवाने भारतात युरेशियन प्रभाव असल्याने कोणीही हा मुद्दा फारसा लक्षात घेतला नाही जो तो वेदांताची चर्चा करू लागला आणि श्रुती म्हणजे उपनिषदे आणि स्मृती म्हणजे मनुस्मृति वगैरे धर्मशास्त्र असे समीकरण रूढ झाले मुळातच आचार्य शंकर यांचे ऐवजी आद्य शंकराचार्यांची आणि त्यांच्या अद्वैत मताची आणि पुढे वेदांत धर्माची चर्चा अधिक झाली आणि त्यामुळे आचार्य शंकर पूर्णपणे झाकोळले गेले आणि पाशुपतदर्शन सोडले तर इतर सर्व दर्शनातून ते गायब झाले 


ही गोष्ट इथे सांगण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे कधी कधी श्रुती आणि स्मृतीची चर्चा शैव-धर्मा संदर्भात होते तेव्हा आपण हे शब्द कोणत्या संदर्भात वापरतो हे सर्व भगवान शंकर भगवती पार्वती भगवान गणपती भगवान स्कंद आणि आद्यभाविक नंदी यांच्या अनुयायांना भक्तांना कळावी मुळात आपण आपला धर्म किती बिघडवून घ्यायचा हे आता ठरवायची वेळ आलेली आहे गेली हजार वर्षे वाटेल तसे झालेले हस्तक्षेप आपण सहन केलेले आहेत पण आता वेळ आलेली आहे की आपण आपला मूळ धर्म नीट समजून घ्यावा त्यासाठी नेमका इतिहास काय घडला हे आपल्या शैव मौखिक परंपरेतून समजून घ्यावे 


श्रीधर तिळवे नाईक


शैव उत्सव बदलत चालण्यामागचे राजकारण श्रीधर तिळवे नाईक

शैव धम्मी लोकांचे सगळे उत्सव कसे ताब्यात घेता येतील आणि त्यांचे वैष्णवीकरण कसे करता येईल या एकाच ध्यासाने हल्ली युरेशियन ब्राह्मण काम करत असतात सुरुवातीला वेदांच्या मध्ये शिश्न देव म्हणून शिवलिंगाची हेटाळणी करणारे हे लोक जेव्हा शैव तंत्र मार्ग अपरिहार्य झाला तेव्हा त्याला कसे सामावून घेता येईल याविषयी विचार करू लागले साहजिकच मग याची सुरुवात सर्व शैवांना शूद्र म्हणून वेगळी कॅटेगरी देऊन जी त्या काळामध्ये आदरणीय होती आणि शंकराला रुद्र म्हणून करण्यात आली आणि तिथूनच रुद्रीकरण आणि सुद्रिकरण सुरू झाले ते आजतागायत चालू आहे शंकराच्या देवस्थानात अत्यंत जाणीवपूर्वक महारुद्र किंवा रुद्र असा शब्द हल्ली वापरला जातो हा वैदिकीकरणाचा प्रयत्न आहे संपूर्ण भारताचे युरेशीयीकरण केले की मग वर्ण जाती व्यवस्था आणता येते हे युरेशियन लोकांना व्यवस्थित माहिती आहे किंबहुना त्यांनी हे अनेकदा केलेले आहे एकेकाळी आपला प्रबळ शत्रू हा जैन आणि बौद्ध धर्म आहे हे ते ओळखून होते आणि अलीकडे आपला प्रबळ शत्रू हा शैव आहे हेही या लोकांना व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे थेट लढाईचे आव्हान द्यायचे नाही तर हळूहळू चिन्ह संस्कृतीच्या साह्याने प्रतीके व प्रतिमा बदलत संपूर्ण शैव धम्म ताब्यात घ्यायचा आणि मग गोष्टी बदलत न्यायच्या असा हा डाव आहे बहुजनांची संस्कृती नाकारण्याचा हा प्रयत्न कायमच अंशिक यशस्वी होतो पण हे अंश वाढत जाऊन तब्बल 30 टक्के झालेले आहेत हे सर्व इतकं स्लो पॉयझनिंग आहे की बहुतेक जण झोपलेले असतात कुंभकर्णाची कथा ही संपूर्ण शैव समाजाची कथा होऊन बसलेली आहे साधा शैव हा शब्द सुद्धा अनेकदा टाईप करू दिला जात नाही गुगल त्या जागी अत्यंत जाणीवपूर्वक कधी सेवा कधी साहेब किंवा साईबाबा वगैरे शब्द टाकत असतो जिथे जिथे शैव संदर्भ येतात तिथे तिथे वैष्णव संदर्भ जोडायचे त्यासाठी नव्या कथा रचायच्या हा उद्योग २१ व्या शतकात पुन्हा भरभराटीला आलेला आहे त्यातूनच अलीकडे दिवाळी विषयक वाद जाणीवपूर्वक वाढवलेला आहे जेणेकरून सर्व उत्सवांच्या व्याख्या या वैष्णव कॅलेंडरच्या संदर्भात व्हाव्यात या लोकांना शक्य असते तर हे कॅलेंडर संपूर्ण बदलले असते परंतु ह्यांच्या दुर्दैवाने चंद्र काही आपल्या पोझिशन बदलत नाही त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा हलवता येत नाहीत त्यामुळे महिनेही हलवता येत नाहीत त्यामुळे या लोकांची चांगलीच पंचायत झालेली दिसते साहजिकच हल्ली नवरात्री नंतर वीस दिवसांनी दिवाळी वगैरे वगैरे उद्योग मुद्दाम सादर केले जातात यातूनच दिवाळीची सुरुवात वसुबारस नावाच्या उत्सवाने करा असे सुचवले जाते म्हणजे दिवाळी श्रीकृष्णाशी जोडली जावी आणि मग वैष्णव धर्माशी असा हा प्लॅन आहे गायपट्ट्याने हे योजन हे प्लॅनिंग आता व्यवस्थित प्रमोट केलेली दिसते आणि तिला दिवाळीचा भाग बनवलेले आहे हे सगळं अत्यंत प्रभावी पद्धतीने मास कम्युनिकेशनच्या साह्याने केले जाते. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून प्रमोट करायची आणि या राष्ट्रभाषेचे वर्चस्व दक्षिणेवर लादायचे कारण दक्षिणच अशी आहे की जी वैष्णव धर्माला विरोध करेल याची पूर्ण जाणीव युरेशियन लोकांना आहे नेहमीप्रमाणे शैव लोकांच्यात काही फितूर लोक आहेत हे असले फितूर लोक एकेकाळी शिवाजी महाराजांच्या विरोधात होते आता ते शैव धर्माच्या विरोधात आहेत मुळात ब्राह्मणांची संख्या ही केवळ चार करोड असली तरी त्यांचें मेसेज चाळीस करोड होतात आणि मग तितके डॉमिनेट करायला लागतात इतके की लोकांचा खरोखरच त्यावरच विश्वास बसतो संपूर्ण मीडिया युरेशियन लोकांच्या ताब्यात असल्यामुळे शैव लोकांना कसलाही वाव द्यायचा नाही असे काहीतरी धोरण असते पण शैव लोकांची संख्याच इतकी आहे की ते साध्य होत नाहीये त्यातूनच कुंभमेळासारखे गणपती सारखे उत्सव झक मारत मीडियात सादर केले जातात. त्यांचे युरेशियन रूप प्रमोट केले जाते अनेक शैव लोकांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे म्हणजे त्यांनी हिंदू धर्मातला शैव पंथ स्वीकारलेला आहे साहजिकच त्या अंगाने येणाऱ्या वैदिकीकरणासारख्या वैष्णवीकरणासारख्या गोष्टी हे लोक सहज स्वीकारताना दिसतात ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे इंग्लिश भाषा आणली तितक्या सहजतेने ही युरेशियन धर्मभाषा प्रचलित होत जाते आणि मग ती हिंदूं धर्माच्या नावाखाली सर्व शैव लोकांच्यावर राज्य करायला लागते वास्तविक हिंदू धर्मात असलेले शंकर हे दैवत दंतकथात्मक जास्त आणि वास्तवात्मक कमी असलेले आहे आठव्या शतकानंतर अनेक पुराने लिहून त्यांच्या नावाने वाटेल तशा दंतकथा लिहिल्या गेलेल्या आहेत आणि अशा दंतकथांचे समर्थन करायला अनेक युरेशियन लोक व विचारवंत बसलेलेच आहेत देवदत्त पटनायक पासून रविशंकरांच्या पर्यंत सर्व लोक यात येतात किंबहुना ज्याप्रमाणे बौद्ध आणि जैन धर्म नष्ट करण्यासाठी वैष्णव धर्म ब्राह्मणीकरण करून आणला गेला त्याचप्रमाणे शैव धर्म नष्ट करण्यासाठी हिंदू हा धर्म आणला गेला आणि हे करण्यासाठी शैव धर्मातले पंडित ब्राह्मण म्हणून सामावून घेतले गेले सुरुवातीला हा धर्म आचार्य शंकर ह्या एका शैव माणसाने निर्माण केला होता आणि त्या मागचा त्याचा उद्देश पंचायतन म्हणजे शिव शक्ती गणपती सूर्य आणि स्कंद यांची पूजा नीटनेटकी करणे हा होता हे पंचायतन नंतर सावकाश बदलत सूर्याच्या जागी किंवा स्कंदाच्या जागी विष्णू आणला गेला आणि संपूर्ण शैव असलेला हा हिंदू धर्म वैष्णव हिंदू धर्म करून टाकण्यात आला यामागे रामानुजाचार्य या वैष्णवाचा प्रचंड मोठा मोठा होता आधी तत्त्वज्ञान (इथे वैष्णव वेदांत आणून हिंदू धर्म ताब्यात घेतला गेला) आणायचे मग ब्राह्मणी व्यवस्था पाळणारी राजवट आणायची आणि मग आपला वर्ण जाती व्यवस्थेचा अजेंडा राबवायचा असे धोरण असते मूळ शैव असलेली यादवांची राजवट पुढे वैष्णव करण्यात आली आणि आणली गेली अकराव्या शतकामध्ये हा गेम खेळला गेला आणि मग सावकाश ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण कलियुगात शिल्लक आहेत असे प्रतिपादन करत द्विवर्ण व्यवस्था आणली गेली आणि तिला हिंदू व्यवस्था मानण्यात आले तसे म्हणण्यात आले याहून काही वेगळा डाव आता आहे असे वाटत नाही विसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख भागवत यांनी दिलेल्या स्टेटमेंट मुळे युरेशियन लोक सुधारतील असे वाटले होते परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की एकविसाव्या शतकात सुद्धा सत्तेवर आल्यानंतर या लोकांनी आपला अजेंडा पुढे रेटायला सुरुवात केलेली आहे साहजिकच नवरात्रीमध्ये सरस्वती ही वैदिक देवता घूसवण्यात आली नंतर शक्तीच्या रूपांचे वेगवेगळ्या नावात रूपांतर करण्यात आले गरबा जो मूलतः शैव होता राधा आणि कृष्णाचे प्रतीक स्थापन करत वैष्णव करण्यात आला अनेक शक्ती पीठे जी ब्राह्मणेतर लोकांच्या ताब्यात होती त्यांचे वैष्णवीकरण घडवून ती महालक्ष्मीची करण्यात आली असे खोटे पुरावे निर्माण करण्यात आले कोल्हापूरची अंबाबाईचे मंदिर हे महालक्ष्मीचे मंदिर म्हणून जाणीवपूर्वक प्रचलित करण्यात आले आणि हे करताना आपण शाहू महाराजांचा अपमान करत आहोत ही जाणीवही निघून गेली आणि वैष्णवीकरण लादण्यात यश मिळवले गेले कोल्हापुरातला बहुजन समाज सुदैवाने यासंदर्भात अचानक जागा झालेला आहे आणि हळूहळू याचा प्रतिकार होईल अशी स्पष्ट चिन्हे आता दिसतात शैव लोकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. प्रथम वैष्णव देवता येतात ज्या मुळात शैव असतात उदाहरणार्थ राम आणि कृष्ण या मूलतः शैवदेवता होत हे शिवभक्त होते परंतु या शिवभक्तांचे रूपांतर वैष्णवांच्या अवतारात करण्यात आले नंतर तर महाकाव्यच रचण्यात आले आणि हळूहळू हे सर्व वैष्णव होत गेले खुद्द श्रीकृष्ण या शिवभक्ताचा वापर वैष्णव धर्माचा प्रचार करण्यासाठी आणि वर्णव्यवस्था निर्माण करण्यासाठी केला गेला जेणेकरून सर्व शैव लोकांनी वर्णव्यवस्थेवर आणि जाती व्यवस्थेवर विश्वास ठेवावा गीतेचा प्रचार हा त्यासाठीच करण्यात आलेला आहे म्हणजेच वर्णव्यवस्था खुद्द श्रीकृष्णाने म्हणजेच देवानेच निर्माण केली असे सांगण्यासाठी करण्यात आला गीता ही मुलता हा वर्णसंकर होऊ नये म्हणून निर्माण करण्यात आलेली आहे 


 शंकराचे मूळ नाव जे आदिवासी लोकांच्या सर्वाधिक प्रचलित आहे ते शंभू आहे किंवा शिवशंभू आहे किंवा शंभू महादेव आहे ज्याने राज्याचा त्याग करून मोक्षाचा शोध लावला पुढे शंका घेणारा म्हणून शंकर असे त्याचे नाव झाले तर भारतातल्या सर्व प्रचलित गणांचे व जमातींचे संकर करणारा तो संकर म्हणूनही संकर हेही नाव प्रचलित झाले. शंकराचे नाव रुद्र म्हणून बदलण्याचे सर्वात मोठे कारण तो संकर करतो आणि संकर करण्याची प्रेरणा देतो हेच आहे जेणेकरून कोणालाही संकर करण्याचे स्वप्न पडू नये व वर्ण जाती व्यवस्था चालू राहावी प्रश्न असा असतो की मग हे सगळे बिंबवायचे कसे तर उत्सव हे बिंबवण्याचे माध्यम आहे आणि त्यासाठी उत्सवाची संरचना बदलायची असा हा उत्तर आधुनिक गेम आहे आपल्याकडेचे विचारवंत नेहमीप्रमाणे झोपलेले असतात आणि क्रांती कोसळल्यानंतर मग तिच्यावर लिहितात त्यांना हे कळत नाहीये शिवाजी महाराज होऊन गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या वर लिहिणारे लोक हेच ! आणि हे लेखन सुद्धा शिवाजी महाराज कसे वैदिक होते हे सांगण्यासाठी जेणेकरून शिवाजी महाराजांच्या मूळ कामाचा विसर पडावा सतत डिप्लोमॅटिक असलेल्या जमातीचे करायचे काय हा फार मोठा प्रश्न असतो याला प्रतिकार म्हणून मग संभाजी ब्रिगेड सारख्या संस्था निर्माण होतात त्या का निर्माण होतात याची कसलीही मीमांसा न करता केवळ टीका करणे हे उद्दिष्ट बनते. वास्तविक मुळात लोकांच्यात जागृती करणे आणि सतत बोलत राहणे हे खूप आवश्यक आहे मुळातच जिला आज आपण ब्राह्मण म्हणतो त्या गटात त्या संरचनेत मूळ शैव पंडित असणाऱ्या लोकांची संख्या ७०% आहे या लोकांना त्यांचे मूळ सांगणे सतत आवश्यक आहे त्याचबरोबर पंडित ही व्यवस्था ओपन समाज होती आणि हा समाज खुला होता आणि त्यात कुठलाही समाज घटक सहजरीत्या प्रवेश करू शकत होता हे यांना सांगणे आवश्यक आहे म्हणजे अभिनव गुप्त हा जो पंडित होता तो मूळचा वैश्य आहे किंबहुना सगळे गुप्त वैश्यच असतात पण त्यांच्यापैकी अनेक जण पंडित झाले. कारण शैव समाजामध्ये ही व्यवस्था खुली होती महाराष्ट्रात हे लोक गुप्ते हे आडनाव घेऊन हिंडत असतात त्यांना जाणीवही नाही की ते मूळचे शैव पंडित आहेत त्यांच्या कुलदेवता पाहिल्या की लगेच सर्व लक्षात येते जोवर हे शैव पंडित स्वतःची ओळख पुन्हा एकदा शैव करत नाहीत तोवर शैवांचे संघटन अशक्य आहे त्यातले बहुतेक जण पुरोगामी असतात पण आपण का पुरोगामी आहोत हे त्यांना कळत नाही हे पंडितच शैव लोकांचा वैचारिक कणा होते अगदी बसवेश्वर सुद्धा शैव पंडित होते नंतर त्यांना वैष्णव लोकांनी ब्राह्मण केले आणि त्यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीचे रूपांतर वीरशैव नावाच्या सनातन धर्मात केले हे सुद्धा केवळ लिंगायत लोकांची प्रतीके आणि प्रतिमा बदलून हळूहळू साध्य केले गेले हेच आता नेमके संपूर्ण भारतभर शैव धर्माबाबत घडत आहे


उत्सवाची संरचना बदलण्यासाठी या पंडित लोकांचा वापर जास्त केला जातो आहे असा माझा अनुभव आहे हे म्हणजे शत्रूला शत्रूच्या साह्याने मारणे असे होते दुर्दैवाने पंडित लोकांनाही कळत नाही परिणाम असा झाला आहे की शैव धम्माच्या बाजूने कोणी प्रतिकार करण्यासाठी सुद्धा उतरत नाही 


यावर उपाय एकच आहे जास्तीत जास्त ब्राह्मणेतर लोकांच्यातून अधिकाधिक स्वतःच्या शैव-धम्माविषयी जागृत लोक निर्माण झाले पाहिजेत जोपर्यंत शैव विचारवंत निर्माण होत नाही तोपर्यंत शैव धम्मा विषयीची जागृती होणे शक्य नाही मी धम्म हा शब्द मुद्दाम वापरत आहे कारण मूळ शब्द तंत्र हा खूप बदनाम करण्यात आलेला आहे किंबहुना तंत्र बदनाम करूनच वैष्णवीकरणाची सुरुवात झालेली आहे 


एकदा का सर्व उत्सव वैष्णव झाले तर मात्र पुन्हा मागे वळणे खूप अशक्य बनणार आहे आणि दुर्दैवाने याची कल्पना लोकांना येत नाहीये आपल्याकडचे कलावंत हे काहीही कामाचे नाहीत असं माझं मत झालेले आहे मुख्य म्हणजे ते ओपनच नाहीत इतके ते ब्राह्मण्यग्रस्त आहेत जर हे सुधारले नाहीत तर यांच्या कलांच्यावर बहुजन समाजाने बहिष्कार टाकला तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण तुम्ही जेव्हा टोक गाठता दरवाजे बंद करता तेव्हा तुमच्या विरोधात ही टोक गाठले जाणे अटळ असते तुम्हालाही दरवाजे बंद केले जाणे अटळ असते बहुजन समाजात आता ही चर्चा सुरू झालेली आहे म्हणून हे सांगतो आहे 


२०१४ यावर्षी भाजपने हर हर महादेव म्हणत सत्ता मिळवली खरी परंतु २०२० नंतर हळूहळू आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली जय श्रीराम म्हणत पूर्णपणे रामायणातला वैष्णव राम हाच एकमेव राम असल्याचे सांगत त्याचा प्रचार केला गेला त्या आधारे आपण निवडणूक जिंकू असा गेम होता ४०० पारच्या घोषणा दिल्या गेल्या त्याचा काय परिणाम झाला हे या लोकसभा निवडणुकीत दिसलेच आहे बहुदा येत्या विधानसभा निवडणुकीत याचे अधिक मोठे इफेक्ट्स दिसतील अर्थात तरीही अक्कल येईल याची खात्री नाहीच आहे ज्या लोकांना मुसलमान व इंग्रज आक्रमणाच्या पुढेही अक्कल आली नाही त्या लोकांना आत्ता बुद्धि प्राप्त होईल असे वाटत नाही हे लोक आपला अजेंडा रेटत राहणार हे आता स्पष्ट होते आहे 


अशावेळी एकच उपाय उरतो शैव धर्म लोकांनी आपल्या उत्सवांचे मूळ रूप जसेच्या तसे समजून घेऊन ते मेंटेन तरी करावे किंवा ते आधुनिक किंवा चौथ्या नवतेच्या मूल्यांच्या साह्याने पुढे न्यावे वैज्ञानिक मूल्यांच्या साह्याने उजळ करावे विज्ञानाच्या विरोधात जाऊन शैव धम्मी लोकांचा विकास होणे शक्य नाही याचे भान ठेवावे या उत्सवांचे मूळ स्वरूप मी वेळोवेळी सांगितलेलेच आहे आणि पुढेही अधून मधून सांगत राहीन कारण लोक खूप लवकर विसरतात आणि त्यांना सतत आठवण करून द्यावी लागते


श्रीधर तिळवे नाईक



हिंसाचाराची कुठलीही मोठी घटना घडली की तिची मांडणी कशी करायची हा एक फार मोठा प्रश्न इतिहासकारांच्या पुढे असतो विशेषतः हिंसाचाराची व्याप्ती कशी मोजायची हा यातला कळीचा प्रश्न हिंसाची कारण मी मांसा करणे हे स्पष्ट आणि उघड असते कारण हिंसा करणारे आपली कारणे स्वतःच सांगत असतात इतिहासकार त्या कारणांची ती कितपत खरे आणि कितपत खोटी या अंगाने विश्लेषण करू शकतात 


हिंसाचाराची व्याप्ती मात्र नेहमीच वादग्रस्त बोलून राहते म्हणजे उदाहरणार्थ महायुद्धाला आपण महायुद्ध म्हणतो याचे कारण त्यात झालेल्या हिंसेची व्याप्ती ही व्याप्ती मोजायची कशी? तर पहिली कसोटी अवकाशाची आहे म्हणजे या हिंसाचाराने चार आणे किती अवकाश किती भूगोल आहे आपला हे पाहणे तर जेव्हा दोन किंवा त्याहून अधिक खंडावर एखादी युद्ध लढले जाते तेव्हा ते महायुद्ध असते आपण दोन महायुद्धे पाहिलेली आहेत इथे महायुद्ध ठरवण्याची कसोटी ही भौगोलिक आहे महायुद्धामध्ये केवळ राष्ट्र नाही तर दोन राष्ट्र संघ झाले आणि या दोन राष्ट्रसंघाने आपापसात त युद्ध केली त्यात जर्मनाने जापान दोस्त राष्ट्रांशी लढले भारत स्वतः इंग्लंडकडून उतरला 


यानंतर अर्थातच युद्ध येते आणि हे नेहमी दोन राष्ट्रांच्यात आणि प्राचीन काळी दोन राज्यांच्यात लढले जात होते भारत पाकिस्तान युद्ध हे याचे उदाहरण आहे 


यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कदाचित धार्मिक हिंसाचार येतो जो आता गाझीपट्टीत चालू आहे चौथ्या प्रकारचा हिंसाचार हा भाषिक पातळीवर होतो अनेकदा धर्माच्या आणि भाषेच्या पातळीवर स्वतंत्र राष्ट्रे मागितली गेलेली आहेत 


अशा प्रकारच्या धार्मिक आणि भाषिक पातळीवरच्या हिंसाचाराची व युद्धाची व्याप्ती तेव्हा वाढते जेव्हा तिसरी महाशक्ती कुठल्यातरी एका राष्ट्राच्या बाजूने पुढे येते जशी बांगलादेश पाकिस्तान युद्धात भारताने उडी मारली होती भारतातल्या काँग्रेसची सर्वात मोठी दुविधा अशी आहे की हिंदू सोडून त्यांना सर्वांच्या विषयी कळवळ असतो त्यामुळे बांगलादेशाची युद्ध लढले गेले मात्र तमिळ संघटनांचा प्रश्न आला तेव्हा तमिळ हिंदू असल्यामुळे काँग्रेस ही श्रीलंकेच्या वतीने युद्धात उतरले आंतरराष्ट्रीय पातळीवर हा संघर्ष श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता त्यात भारताला ढवळाढवळ करायची काहीच गरज नव्हती परंतु भारताने इथे आपल्याच संस्कृतीतल्या लोकांच्या विरोधात भाग घेतला पुढेही जेव्हा मुस्लिम राष्ट्राला तमिळ दहशतवादाने घडले तेव्हा त्या राष्ट्रात भारताने आपले सैन्य उतरवले इथेही पुन्हा मदत मागणारा देश मुस्लिम होता मात्र पाकिस्तानातल्या किंवा बांगलादेश मधल्या हिंदूंच्या वर अत्याचार झाले तेव्हा काँग्रेस कधी हिंदूंच्यासाठी उतरलेली दिसत नाही सेक्युलरिझमच्या नावाखाली ही फालतुगिरी काँग्रेसने नेहमीच केली पुढेही खलिस्तानच्या प्रश्नात शीख हे हिंदू आहेत असे गृहीत धरून त्यांच्या विरोधात युद्ध लढले गेले तेव्हा मात्र हा प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न झाला. अगदी देवस्थानावर सुद्धा हल्ला झाला हा प्रश्न कॅनडामध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय झालेला असला तरी त्याची तीव्रता आता कमी आहे मात्र काँग्रेसने इंदिरा गांधींच्या हत्यानंतर जे हत्याकांड घडवले ते बघता काँग्रेस कशी कायम भारतीय धर्माच्या विरुद्ध असते ते सिद्ध झाले किंबहुना काँग्रेसची जी प्रतिष्ठा हळूहळू धुळीला मिळायला लागली त्यामध्ये राष्ट्रांतर्गत झालेल्या हिंसेत आणि हिंसाचारात काँग्रेसने घेतलेली दुटप्पी भूमिका होती कायमच इथल्या बहुजनांच्या विरोधात जाण्याचे उद्योग काँग्रेसला सुचत राहिले यामागे अर्थातच वैष्णव इतिहास आहे हा इतिहास सांगतो की युरेशियन विशेषता ब्राह्मण व वैष्णव धर्मियांनी कायमच ज्यु, इस्लाम आणि ख्रिश्चन लोकांशी युती केलेली आहे हे सर्व सत्तेसाठी केले गेलेले आहे काँग्रेसने फक्त ही परंपरा पुढे चालवली आपल्याच लोकांशी शत्रुत्व हा काय प्रकार आहे हे अनाकलनीय आहे विशेषता तमिळ प्रश्न अत्यंत चुकीच्या पद्धतीने काँग्रेसचे हाताला हाताळला प्रामुख्याने राष्ट्राराष्ट्रातल्या युद्धांच्या नंतर धार्मिक युद्धे व हिंसाचार तिसऱ्या क्रमांकावर व्याप्तीच्या बाबतीत येते चौथ्या क्रमांकावर भाषिक हिंसाचार येतो इथे बांगलादेशातल्या लोकांना स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायला मदत केली जाते मात्र तमिळ लोकांना स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे असेल तर मात्र ते निर्माण करू दिले जात नाही वास्तविक यात भारताचाच खर तर फायदा झाला असता याचा अर्थ कोणी असा घेऊ नये की मी तमिळ टेररिझमचा समर्थक आहे मी कुठल्याच प्रकारचा दहशतवाद स्वीकारणीय मानत नाही मी फक्त हिंसाचाराची मीमांसा करत आहे


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना