महावीर आणि बुद्ध
भगवान बुद्ध ही भगवान महावीरांच्या जीवन चरित्रातून निर्माण केली गेलेली काल्पनिक कथा आहे का
श्रीधर तिळवे नाईक
एकोणिसाव्या शतकात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी वादविवादात सापडल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे जैन आणि बौद्ध यांच्यातील संबंध! या काळामध्ये जैन लोकांच्या बाजूने फारसे पुरावे नव्हते साहजिकच जैन लोक म्हणजे गौतम बुद्धाचे अनुयायी आणि गौतम बुद्ध हाच महावीर असा सिद्धांत मांडणारे लोक होते .काळ बदलला आणि आता एकविसाव्या शतकामध्ये गौतम बुद्ध हाच महावीर आहे अशी मांडणी पुढे आलेली आहे ही मांडणी कोणी एक संधपणे मांडत नाही कारण जैन लोक याबाबतीत फारसे जागृत नाहीत तिचा फायदा अलीकडे सुरेश राव यांच्यासारखे वैष्णव लोक घेत असल्याने मी यामध्ये उडी मारतोय ही मांडणी वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर झालेल्या संभाषणातून आणि माझ्या स्वतःच्या काही इनसाईटसमधून मी मांडतो आहे जेणेकरून या युक्तिवादाचा प्रतिवाद बौद्ध लोकांना करता यावा
१ माझ्या मते ही मांडणी पुढे येण्याचे सर्वात मोठे कारण भगवान महावीर हे भगवान बुद्धांच्या आधी होऊन गेले हे आता निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे त्याबद्दल कोणालाही शंका नाही त्यामुळे साहजिकच बुद्धापासून महावीर झाला हा सिद्धांत आता कालबाह्य झालेला आहे साहजिकच उलट्या बाजूने गंगा नेण्याचा प्रयत्न होणे अटळ होते ते आता घडताना दिसत दिसते म्हणजे भगवान बुद्ध हे दुसरे तिसरे कोणी नसून ते भगवान महावीरांचेच निर्माण केलेले दुसरे रूप आहे आणि जैन धर्म पसरू नये म्हणून ते निर्माण करण्यात आलेले आहे असा हा युक्तिवाद आहे अर्थात प्रश्न असा निर्माण होतो की मग हे कोणी केले हे ब्राह्मणांनी केले का म्हणजे जैन धर्माला आळा घालण्यासाठी ब्राह्मण लोकांनी हा बौद्ध धर्म निर्माण केला असे मानायचे का याची कसलेही उत्तर हे लोक देत नाहीत ते फक्त मांडतात आणि गायब होतात दुर्दैवाने आमचे काही स्टुडन्ट हे व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वर वाचतात आणि प्रश्न विचारतात म्हणूनच सविस्तर चर्चा करावी लागते
या युक्तिवादासाठी अनेक गोष्टी दिल्या जातात त्यांची चर्चा इथे करणे आवश्यक आहे
२ अनेक वैष्णव हिंदुत्ववादी लोक हे सर्व कनिष्काच्या काळामध्ये घडवण्यात आलेलं प्रकरण आहे असं मानतात आता यामधला दोष तर उघडच आहे कारण मुळात बुद्धाच्या बाबतीतले ऑथेंटिक पुरावे हे अशोकाच्या कालखंडातले स्पष्ट दिसतात कनिष्क राजवट खूप नंतरची गोष्ट आहे आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याआधी ती निर्विवादपणे शैव होती हे स्पष्ट आहे तशी कॉइंनस उपलब्ध आहेत पण बेसिक इतिहास सुद्धा न वाचता दंतकथा पेरणे चालू झाले की बेसिक इतिहास सुद्धा लोक लक्षात घेत नाहीत त्याचे हे उदाहरण आहे प्रश्न असा आहे की मग अशोकाच्या काळात हे सर्व झाले का ? तर नाही अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्म हा एक धर्म म्हणून प्रस्थापित झालेला दिसतो याचा अर्थ यदाकदाचीत वैष्णव मानतात तसे काही झाले असेल तर ते अशोकाच्या आधीच झाले आहे हे मान्य करावे लागते प्रत्यक्षात ते झाले की नाही हाच सर्वात मोठा वादाचा विषय आहे
३ मंडण:यासाठी सर्वात मोठा आधार घेतला जातो तो साधर्म्य या गोष्टीचा आणि पहिले साधर्म्य म्हणजे सिमिलॅरिटी अर्थातच भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांच्या नावात आहे महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते आणि खुद्द भगवान बुद्ध यांचे नाव सिद्धार्थ होते म्हणून बुद्धाचे सिद्धार्थ हे नाव भगवान महावीर यांच्या वडिलांच्या नावापासून आलेले आहे असा युक्तिवाद आहे
खंडन: मला स्वतःला या मुद्द्यात काहीच तथ्य दिसत नाही कारण शैव लोकांच्यामध्ये सिद्धार्थ हे फार कॉमन नाव होते त्याचा अर्थच सिद्ध असण्याचा अर्थ आणि सिद्धाचा अर्थ असा होतो सिद्ध हा शब्द हे दोन्ही धर्म निर्माण होण्याआधी प्रचलित होते आणि ते शैव लोकांच्यातच होते या काळात वैदिक लोक ऋषी हा शब्द वापरत तर जिला मी जैन नाथ परंपरा म्हणतो तिच्यामध्ये मुनी हा शब्द प्रचलित होता त्यामुळे सिद्धार्थ या एका शब्दाच्या आधारे जास्तीत जास्त एवढे सिद्ध होते की दोघेही शैव आहेत आणि नंतर त्यांनी आपला स्वतःचा स्वतंत्र धम्म उभा केलेला आहे
४ मंडन :महावीर आणि गौतम बुद्ध दोघेही इशवाकु वंशात निर्माण झाले अशी मांडणी आहे
खंडन :मुळात ही मांडणी इसवी सन पूर्व 300 नंतर आलेली आहे या दोघांचाही ईश्वाकू वंशाशी काडीचाही संबंध नाही
५ मंडन : दोघांनीही राज्य पुत्र पत्नी आणि त्यांचा मोह यांचा त्याग केलेला आहे आणि दोघेही सत्याच्या शोधात बाहेर पडले आहेत त्यामुळे हे दोघे एक आहेत दोन नाहीत
खंडन: हीही मांडणी नंतरची आहे कारण हे दोघे ज्या गणांच्या मध्ये जन्मलेले होते तिथे गणेशाही होती राजेशाही नव्हती त्यामुळे ते राजपुत्र होते हीच एक दंतकथा आहे हे मुळात त्या गणप्रमुखाची मुले आहेत म्हणजेच मुख्य गणनायक जो आहे त्याची ही मुले आहेत आणि या गणांच्या मध्ये कोणीही गणनायक बनू शकत होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे तिथे वर्ण व्यवस्था नव्हती पण दोघे क्षत्रिय राजपुत्र असल्याची दंतकथा मुद्दाम म्हणून वाढवण्यात आली जेणेकरून क्षत्रिय लोक हे दोन्ही धर्म स्वीकारतील प्रत्यक्षात लोकांच्या मधून आलेले हे दोघेही नेते आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे जननायक म्हणावे तसे हे दोघेही होते त्यांनी आपल्या गणाला वळण तर लावलेच परंतु संपूर्ण जगाला एक नवे वळण दिले गुणवत्ता ही अनुवंशिक असते असे मानणाऱ्या वंश वर्णवादी लोकांनी अशा प्रकारच्या दंतकथा नंतर रचलेल्या दिसतात वर्णवादी लोकांच्या मते गुणवत्ता फक्त दोन वर्णांच्यामध्ये असते एक ब्राह्मण आणि दुसरे क्षत्रिय हे दोघेही ज्या तऱ्हेने ब्राह्मण्याविरोधात ठाकले ते लक्षात घेता त्यांना ब्राह्मण बनवणे शक्य नव्हते म्हणून त्यांना क्षत्रीय बनवून टाकले गेले मुळात हे अवैदिक होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे गौतम बुद्ध स्वतःचा उल्लेख स्पष्टपणे खत्तीय असा करतो जो टिपिकल शैव शब्द आहे ज्याचा अर्थ शेती करणारा असा होतो ज्यात वर्ण ही व्यवस्था मुळात प्रस्थापित झालीच नव्हती ती प्रस्थापित होणार म्हणून या लोकांनी आधीच त्या विरोधात बंड केलेले आहे जोपर्यंत वर्णव्यवस्था वैदिक गणांच्या मध्ये चालू होती तोपर्यंत कसलाही हस्तक्षेप करण्याची गरज अवैदिक लोकांना वाटलेली नव्हती पुढे आपल्या गणाच्या दिशेने वर्णव्यवस्थेचे वादळ येते आहे म्हटल्यावर अवैदीक लोक सावध झाले आणि त्याचा प्रतिकार सुरू झाला. हा प्रतिकार प्रथम हिरण्यगणाने केला ज्याचे वैचारिक तत्त्वज्ञान नकुलीशाच्या नेतृत्वाखाली पाशुपत लोकांनी मांडले होते आणि हिरण्यने ते स्वीकारले होते या गणातूनच पुढे कपिल आला महावीर आणि गौतम बुद्ध दोघेही कपिल नंतर आलेले आहेत हे स्पष्ट आहे कारण दोघेही सांख्य दर्शनाचा तंत्राचा कधी कधी प्रतिकार सुद्धा करताना दिसतात आणि कधी कधी आदराने उल्लेख करतानाही दिसतात कारण तोपर्यंत जनमानसांच्या मध्ये कपिल आपले तंत्र घेऊन पूर्णपणे प्रस्थापित झाला होता त्याला वर्ण व्यवस्था मान्यच नव्हती थोडक्यात प्रतिकार करण्याचे तंत्र आधी शोधले गेले होते आणि महावीर आणि गौतम बुद्ध यांनी ते खूप पुढे नेले त्यातून पुढे दोन नवे धम्म निर्माण करण्यात आले आज स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेणारे लोक हे मूळचे खत्तीय लोक आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे खरे तर या सर्वांनी आपली ओळख खत्तिय म्हणजे शेती करणारे अशीच सांगायला हवी अगदी गुरूनानक सुद्धा स्वतःला खत्री म्हणजेच खत्तीय असेच म्हणवतात हे एकाच वेळी शेती करतात आणि संरक्षण पण करतात अत्यंत लडाकू आणि युद्धामध्ये तरबेज असणारी अशी ही जीवनशैली आहे म्हणूनच भगवान महावीर स्वतःच्या मोक्षाचे वर्णन जिंकणे असे करतात आणि म्हणूनच त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाते. स्वतःचे शरीर हेच रणांगण मानून त्या विरोधात लढाई जिंकणे म्हणजे मोक्ष होय अशी धारणा कळत नकळत येथे आहे ही खत्तिय धारणा आहे आणि ती योद्धे लोकांना साजीशी आहे किंबहुना खरे युद्ध हे स्वतःच्या आतील वासनेशी तृष्णाशी असते हे या लोकांनी अतिशय व्यवस्थित मांडले आणि ही लढाई या लोकांनी स्वतः जिंकली होती त्यामुळे हे सांगण्याचा त्यांना अधिकारही होता ब्राह्मणांनी तो अधिकार नाकारण्याचा प्रयत्न केला परंतु बहुजन समाजाने ब्राह्मण धर्म स्वीकारलेला नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच सर्व व्यापारी कारागीर लोक या दोघांच्या मागे गेलेले दिसतात
६ मंडन :या दोघांच्याही पत्नीचे नाव यशोदा या शब्दाशी निगडित आहे महावीर यांच्या पत्नीचे नाव यशोदा तर गौतम बुद्ध यांच्या पत्नीचे नाव यशोधरा आहे त्यामुळे हे दोघे एकच आहेत आणि महावीराच्या जीवनातून गौतम बुद्ध नावाची व्यक्तिरेखा निर्माण करण्यात आलेली आहे
खंडन : केवळ पत्नीच्या नावावरून जर का कोणाचा आयुष्य क्रम ऑथेंटिक ठरवायचे ठरवले तर अवघड होईल कारण यशोदा हे नाव या काळामध्ये खूप कॉमन होते खुद्द कृष्णाच्या आईचे नाव यशोदा ठेवले गेले होते याचा अर्थ ते एक कृष्णाच्या आधी अस्तित्वात होते हे लक्षात घेतले पाहिजे हीच गोष्ट राधा या नावाबाबत आहे महारथी कर्णाच्या आईचे नाव राधा असे आहे आणि त्यावरून हे सिद्ध होते की राधा हे नाव कृष्ण आणि कर्णाच्या आधी होते राधा ही वयाने मोठी होती हे लक्षात घेता हेही नाव आधीच प्रस्थापित असावे त्याशिवाय ते ठेवले गेलेच नसते थोडक्यात काय यशोदा काय किंवा यशोधरा काय ही नावे खूप कॉमन नावे होती
७ मंडन :महावीर यांनाही एकच मुलगा होता आणि गौतम बुद्ध यांनाही एकच मुलगा होता
खंडन: मुळात यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोघांनाही संन्यासी बनायचे होते परंतु वंश सातत्य ठेवणे ही सुद्धा एक जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली आणि एकदा आपण वंशाचा दिवा दिलाय हे लक्षात आल्यानंतर आपण आता संसारातून मुक्त होऊ शकतो हे लक्षात आल्याने हे दोघेही घर सोडून गेलेले दिसतात त्यामुळे मुलाची संख्या एक असणे ही एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे
८ मंडन :भगवान महावीर आणि भगवान बुद्ध या दोघांच्याही जन्मआधी भविष्यवाणी केली गेली होती की ते संन्यासी बनतील
खंडन:माझ्या मते ही भविष्यवाणी खरोखरच केली गेली होती की नाही याबद्दल प्रचंड प्रश्न आहेत कुठलाही माणूस ग्रेट झाला की त्याच्याबद्दल अशी भविष्यवाणी झाली होती असे दावे केले जातात त्यामुळे या दोघांच्या बाबतही हे दोघेही थोर असल्याने असे दावे केले जाणे हे अटळ होते तसे ते झालेले आहे यामध्ये जणू काय नियतीच सर्व ठरवते किंवा ईश्वर सर्व ठरवतो अशी धारणा असणारे लोक अशा प्रकारच्या दंतकथा प्रचलित करत असतात त्यांना आपले दुकान चालवायचे असते प्रत्यक्षामध्ये मी जेवढा या शास्त्राचा अभ्यास केलाय त्यावरून सांगतो की अमुक कुंडली चा मनुष्य ग्रेट होईल असं काही सांगता येत नसतं या संदर्भातली खरी गोष्ट ही फक्त सिद्ध लोकांच्या संदर्भातच असू शकते जेव्हा कोणीही सविकल्प समाधीत जातो तेव्हा त्याला कधी कधी काही गोष्टी दिसतात पण हे एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे अशा प्रकारचा कोणी सिद्ध तिथे आला होता का? तर या प्रश्नाचे उत्तर तसे दिसत नाही थोडक्यात काय हे सर्व नंतर रचले गेलेले आहे मुळात मी मागे म्हटल्याप्रमाणे सर्व काही ईश्वर घडवतो किंवा सर्व काही नियती घडवते असे मानणारे जे लोक असतात ते नेहमीच अशा प्रकारच्या दंतकथा निर्माण करत असतात आणि ऋषी आणि मुनी हे या दंतकथेचे अनिवार्य भाग असतात ते इथेही झालेले दिसतात अनेकदा तर महाभारतातले आणि रामायणातले ऋषीमुनी साकार झालेले दिसतात जणू काय हे सर्व अमरच होते
९ मंडन: महावीर यांच्या आईचाही मृत्यू त्यांच्या बाळंतपणानंतर झाला होता आणि गौतम बुद्ध यांच्या आईचा ही मृत्यू बाळंतपणानंतर झाला
खंडन: आपण जर का त्या काळामध्ये गेलो तर असे दिसते की अनेकदा हे घडत होते किंबहुना बहुपत्नीत्वाची चाल प्रस्थापित होण्यात जी कारणे होती त्यामध्ये त्या काळात बाळंतपणानंतर होणारे मृत्यू हे फार मोठे कारण होते त्यामुळे हाही योगायोग सहज घडू शकतो
१० मंडन:भगवान महावीर यांना सुद्धा एका वृक्षाखाली मोक्ष प्राप्त झाला आणि भगवान बुद्ध यांनाही एका बोधिवृक्षाखाली मोक्ष प्राप्त झाला. ज्याला त्यांनी निब्बान म्हटले
खंडन: मुळातच एक गोष्ट आपण येथे लक्षात घेतली पाहिजे की बहुतेक सर्व सिद्ध हे एखाद्या वृक्षाच्या झाडाखाली बसूनच तपश्चर्या करत असतात मी स्वतः अशी तपश्चर्या केलेली आहे म्हणून सांगतो हेही अत्यंत नैसर्गिक आहे मोक्ष नेमका कुठे प्राप्त होईल हे कोणीही सांगू शकत नाही तो अगदी एखादा माणूस विमानात बसलेला असताना सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकतो मुळात प्रश्न इथे अंतर्गत समूळ समग्र क्रांतीचा असतो ही अंतर्गत समूळ समग्र क्रांती झाली की कुणालाही मोक्ष किंवा कैवल्य किंवा निर्वाण किंवा निब्बान मिळते मोक्ष किंवा कैवल्य किंवा निर्वाण हे बाह्य प्रकरणच नव्हे हे मुळात अंतर्गत प्रकरण आहे त्यामुळे बाहेरील गोष्टींच्या साम्यावरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे
११ मंडन: महावीर यांना एका कटोऱ्यातून एका महिलेने खीर दिली होती आणि गौतम बुद्धांना सुद्धा एका महिलेने जी सुजाता नावाने खूप प्रसिद्ध झाली खीर दिली होती तीही एका कटोऱ्यातून दिली होती आणि त्यानंतरच दोघांना निर्वाणप्राप्ती झालेली आहे
खंडन: हे साम्य पराकोटीचे आहे याबाबतीत शंका नाही याबाबत कुणापासून कोणी काय घेतले याची नीट क्रोनोलॉजी तपासावी लागते त्या काळामध्ये भिक्षूंना खीर देणे ही एक अत्यंत कॉमन प्रथा होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना त्या काळातली ही सर्वात फेवरेट स्वीट डिश होती हे लक्षात घेतले पाहिजे
१२ मंडन: भगवान महावीर हे बिंबिसार च्या बागेत थांबले होते आणि भगवान बुद्ध हेही बिंबिसार च्या बागेत थांबले होते
खंडन: एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे बिंबिसार हा ह्या दोघांनाही कॉमन असलेला फॅक्टर आहे तो मगच चा राजा होता साहजिकच आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक साधूचे स्वागत करणे त्याला कर्तव्य वाटत होते किंबहुना शैव लोकांच्यामध्ये ही प्रथाच आहे हा लोकधर्म आहे तो आजही प्रचलित आहे आता हे एकाच काळामध्ये होते हे सिद्ध करणारी ही घटना आहे फक्त महावीर वयाने अधिक मोठे होते हे ही स्पष्ट दिसते एकाच काळामध्ये दोन मोक्ष मिळवणारे पुरुष जन्मू शकतात विसाव्या शतकात निसर्ग दत्त महाराज आणि रमण महर्षी एकाच काळात जन्मलेले आहेत तेव्हा हे घडू शकते
१३ मंडन : भगवान महावीरांनी अग्निहोत्र नावाच्या ब्राह्मणाला दीक्षा दिली त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी ही अग्निहोत्र नावाच्या ब्राह्मणाला दीक्षा दिलेली दिसते
खंडन : अग्निहोत्र ब्राह्मण हे त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वावरत होते ही वस्तुस्थिती त्यामुळे बुद्धाला एक अग्निहोत्र ब्राह्मण भेटला आणि भगवान महावीरांना एक अग्निहोत्र ब्राह्मण भेटला एवढाच त्याचा अर्थ आहे या काळामध्ये मुळात ब्राह्मणांच्या मध्ये सुद्धा त्यांच्या धर्माबद्दल अनेक शंका निर्माण व्हायला सुरू झाल्या होत्या कारण चार्वाक लोकांनी या काळामध्ये धर्मावर प्रचंड अटॅक चालू केले होते साहजिकच ब्राह्मणांच्या मनात सुद्धा स्वतःःच्या धर्मााविषयी खूप शंका होत्या याच वेळेला आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हिरण्य कुळामध्ये विरोचन नावाचा एक गणपुत्र झाला त्यानेच लोकायतची स्थापना केली असे म्हटले जाते आणि चारू वाक तंत्र त्याच्यामुळे सुरू झाले असेही मानले जाते विशेषता शैव परंपरा अशी आहे चारू या शब्दाचा अर्थ गोड आणि सत्य असा आहे मधुर आणि सत्य असा आहे मधुर बोलत सत्य माांडणे हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य होते विरोचन संप्रदाय प्रचंड फोफावत चालला होता आणि सर्वात प्रथम ब्राह्मण धर्मापुढे त्याने प्रश्न निर्माण केले पुराणा मध्ये या हिरण्य वंशाबद्दल ची प्रचंड द्वेष भावना आहे त्याचे कारण याच वंशामधून एकाच वेळेला पशुपत धर्म आला आणि नंतर हे चार वाक तंत्र पण आले जे पूर्ण पणे वेदांच्या विरोधात ठाकले ज्यांनी वेदांची चेष्टा केली साहजिकच अत्यंत कडवा विरोध पुराणांच्या मधून झालेला आहे त्यातूनच हिरण्यकशपू आणि नरसिंहाची कथा येते साहजिकच अनेक ब्राह्मण आता स्वतःच्या धर्माबद्दल शंका घ्यायला लागले होते आणि असे अनेक ब्राह्मण आपणाला महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या संघामध्ये दाखल होताना दिसतात
१४ मंडन जैन इतिहासामध्ये चंदावती ही मंगावतेला यासाठी रागवते की तिने बौद्ध संघामध्ये एक रात्र घालवली तर बौद्ध इतिहासामध्ये म्हणजे ललित विस्तार मध्ये चंदावती ही मंगावतीला यासाठी रागवते की तिने जैन संघामध्ये एक रात्र घालवली
खंडन : हेही साम्य आपणाला निश्चित विचार करायला लावते इथेही पुन्हा हाच प्रश्न आहे की कुणापासून कोणी काय घेतले?
१५ खंडन : भगवान महावीर यांचे केस कुरळे आहेत आणि कान लांब आहेत भगवान बुद्ध यांचे केस कुरळे आहेत आणि कान लांब आहेत
मंडन: हा योगायोग असू शकतो किंवा मग पुन्हा हाच प्रश्न निर्माण होतो की कोणापासून कोणी काय घेतले?
१६ मंडन : भगवान महावीर यांच्या ग्रंथांना त्रिरत्न असे म्हटले जाते तर भगवान बुद्ध यांच्या ग्रंथांना त्रिपिटक म्हटले जाते
खंडन : मुळातच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की याची सुरुवात शैव लोकांच्या पासून होते शैव धम्मामध्ये तीन डोळे सांगितले गेले त्यातला तिसरा डोळा तर खूपच फेमस आहे ज्याला आपण तिसरा अक्ष किंवा शंकराचा तिसरा डोळा किंवा तिसरा नेत्र म्हणतो अनेकदा तीन ही संख्या सर्वच ठिकाणी पवित्र मानली जाते याचे सर्वात मोठे कारण संपूर्ण मानवी आयुष्यातच ही प्रोसेस दिसते म्हणजे जन्म लग्न किंवा संसार आणि मृत्यू साहजिकच अनेक ठिकाणी जन्म देणारा देव संसार चालवणारा देव आणि मृत्यू किंवा प्रलय देणारा देव अशी त्रिमूर्ती दिसते साहजिकच या तीन गोष्टीचा प्रभाव या दोन धर्मांच्या वर पडलेला आहे आणि म्हणूनच तीन ग्रंथ दिले जातात अगदी ख्रिश्चन धर्माला सुद्धा गॉड, जीजस आणि मेरी अशी त्रिमूर्ती द्यावी लागलेली आहे आणि पुढे हिंदू धर्मात सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश स्वीकारले गेलेले आहेत तेव्हा मला नाही वाटत की याबद्दल या दोन धम्मांना दोष द्यावा उलट त्या काळातल्या प्रथेनुसार त्यांनीं आपल्या संस्थापकाचा उपदेश तीन ग्रंथांमध्ये विभागला आहे
१७ मंडन: जैन धर्मातील प्रचारकाला श्रमण म्हटले जाते आणि बौद्ध धर्मातील प्रसारकाला श्रमण म्हटले जाते म्हणजे जैन लोकांच्या वरूनच बौद्ध लोकांनी ही संकल्पना स्वीकारली आहे
खंडन : खरे तर ही वस्तुस्थिती आहे खुद्द बुद्धाने सुद्धा आपण श्रमण परंपरेत काम करतो असे सांगितलेले आहे दुसरी गोष्ट श्रमण परंपरा ही या दोघांच्याही आधीची आहे त्यामुळे महावीरावर पण परिणाम झाला आणि गौतम बुद्धावर ही तिचा परिणाम झाला तेव्हा आपण एवढे म्हणू शकतो की हे एकाच धारेतील जिला श्रमण म्हटले झाले जाते तिच्यातील दोन धम्म आहेत
१८ मंडन: मेगास्स्थिनीस याच्या इंडिका या पुस्तकामध्ये गौतम बुद्ध जर एवढा महान होता तर उल्लेख का नाही? उल्लेख यासाठी नाही कारण मुळात गौतम बुद्ध होऊनच गेलेला नाही
खंडन: हा प्रश्न प्रथम तामिळनाडूमध्ये निर्माण झाला आणि तो तामिळ ब्राह्मणांनी निर्माण केला याचे कारण मदुराई टेम्पल चा उल्लेख आहे आणि गौतम बुद्धाचा उल्लेख नाही हा एक प्रचंड खटकणारा प्रकार इंडिका या ग्रंथासंदर्भात आहे दुसरी गोष्ट हळूहळू हे लक्षात आले की इंडिका हा ग्रंथ 18 व्या आणि 19 व्या शतकामधल्या ओरिएंटालिस्ट लोकांनी तयार केला आणि तो न ग्रीक इतिहासकारामध्ये असलेले या ग्रंथाचे जे उल्लेख होते त्या उल्लेखांच्या आधारे तयार केला गेला होता या ग्रंथाचा लेखक मेगास्थीनीस हा सेल्युकस या ग्रीक क्षेत्रपाच्या दरबारामध्ये काम करत होता हे स्पष्ट दिसते पण असे असून सुद्धा गौतम बुद्धाचा उल्लेख त्याच्या पुस्तकांमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे पण मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो इंडिका उपलब्ध आहेत तो तुकडे तुकडे आहे कदाचित त्याने उल्लेख केलाही असेल कदाचित त्याने उल्लेख केला हे नसेल दुसरी गोष्ट या काळामध्ये मुळात बौद्ध हा धम्म बनलाच नव्हता तो बनायला लागला तो अशोक नावाच्या राजापासून तोपर्यंत चंद्रगुप्त असो किंवा बिंदुसार असो यांच्यापैकी कोणीही बौद्ध धर्म स्वीकारला नव्हता हे मूळचे शैव होते त्यातील चंद्रगुप्ता मोरया ने नंतर जैन धर्म स्वीकारला असे जैन परंपरा मानते शैव परंपरा मानत नाही शैव परंपरेनुसार चंद्रगुप्त जो जैन झाला तो दक्षिणेतला राजा होता उत्तरेतल्या राजाने अशाप्रकारे जैन धर्म स्वीकारलेला नाही बिंदुसार तर सरळ सरळ आजीवकांच्या मागोमाग गेला अशोक हाच एकमेव होता जो शेवटपर्यंत शैव म्हणून लढत होता तो चंडी आणि काली यांचा भक्त होता त्यामुळेच त्याला चंडाशोक आणि कालोशोक म्हटले जात होते हे उल्लेख खुद्द बौद्ध धर्माच्या इतिहासामध्येच आहेत माझे मत असे की या काळामध्ये बौद्ध धर्म हा धर्म म्हणून फारसा प्रचलित नसावा नंतर अशोकाच्या काळापासून त्याला राजाश्रय मिळाल्याने तो वाढत गेला अशोक याने मात्र बौद्ध धर्म स्वीकारला असावा याबाबत जी मांडणी वैष्णव लोक करतात ती बरोबर नव्हे एखादा तुमचा राजा महान असला की त्याला आपलेच म्हटलं पाहिजे असं नाही त्याने बौद्ध धर्म का स्वीकारला असा प्रश्न तुम्ही विचारू शकता पण त्याने स्वीकारला ही वस्तुस्थिती आहे अर्थात त्यामुळे काही त्याची हिंसा थांबली असाही नाही हिंसक माणूस हा शेवटी हिंसकच असतो त्यामुळे आता युद्धावर युद्धभूमीवर माणसे कापण्याऐवजी जैन मुनि आणि आजीवक कापले गेलेले आहेत अर्थात बौद्ध ग्रंथ याचा उल्लेख आदराने करतात कारण प्रतिस्पर्धी कापले गेलेत थोडक्यात काय उल्लेख नाही म्हणून अस्तित्वात नव्हता हे तर्कशास्त्र पटणारे नाही विशेषतः जो ग्रंथ पूर्ण उपलब्ध नाही त्या संदर्भात तर असे विधान स्वीकारताच येऊ शकत नाही कारण जे हरवलेले आहे त्यात उल्लेख नसेल कशावरून?
१९ मंडन: भगवान महावीर हे दिगंबर होते आणि त्यांना भगवा वस्त्र घातले की गौतम बुद्ध तयार होतात
खंडन: खुद्द गौतम बुद्ध यांचा उल्लेख स्पष्टपणे वस्त्र धारण करणारे असेच आहे उलट त्यांची या अंगाने झालेली टीका स्पष्ट आहे ते म्हणतात दिगंबर असणे हा अतिरेक आहे आणि त्यांचा कल हा सुवर्णमध्ये काढण्याकडे असून खरा सुवर्ण मध्ये एकच वस्त्र परिधान करण्यात किंवा जास्तीत जास्त दोन वस्त्रे परिधान करण्यात आहे त्यामुळे या मुद्द्याला काही अर्थ उरत नाही
२० मंडन: वाल्मिकीच्या कथांवरून अंगुलीमाल आलेला आहे किंवा हनुमान श्रीलंकेला गेले म्हणून बुद्ध श्रीलंकेला गेले
खंडन: स्पष्ट सांगायचे तर दोन्ही कथा पूर्णपणे वेगळ्या आहेत फक्त तत्वात साम्य आहे की एक बिघडलेला हिंसक माणूस अहिंसक बनला मात्र दोन्ही कथांच्या मध्ये जे ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे वेगळी आहे अंगुलीमाल हा अधिक हिंसक आहे तो मनुष्य हत्या मोठ्या प्रमाणात करतात अशा प्रकारचे हत्या वाल्मिकी करत नाहीत ते लुटतात परंतु मनुष्याला मारल्याचे काही दिसत नाही दुसरी गोष्ट ब्राह्मण परंपरेनुसार ही कथा सुद्धा काल्पनिक आहे कारण या कथेनुसार वाल्मिकी कोळी होतात आणि कोळी माणूस रामायण कसे काय लिहू शकतो वस्तुस्थिती अशी आहे की जे मूळ शैव रामायण आहे ते हे कोळी समाजातील वाल्मिकीने लिहिलेले आहे आणि हेच शैव रामायण होते जे आता पूर्णपणे गायब झाले आहे हा वाल्मिकी अजिबात वाल्या कोळी वगैरे नव्हता त्या काळामध्ये कोळी लोक कधीही मासे खाऊन आरामात उपजीविका करू शकत होते त्यांच्याकडे प्रचंड जमिनी होत्या त्यामुळे ते शेतीही करत होते तेव्हा केवळ उदरनिर्वाहाचा प्रश्न कधीच कोळी लोकांच्या पुढे नव्हता ही उगाचच निर्माण केलेली कथा आहे जेणेकरून हा ग्रंथ बहुजन समाजावर लादता येईल फक्त लोककथांच्यात त्याचे तुकडे उरले आहेत या रामायणाच्या आणि जैन बौद्ध रामायानानुसार आलेल्या राम कथांचे व्यवस्थित एकत्रीकरण करून वाल्मिकी नावाचा जो ब्राह्मण होता त्याने एक संकलन सादर केले जे वैष्णव धर्माला अनुरूप होते ते महाभारतानंतर केले गेले कारण महाभारतामुळे भावा-भावांच्यात प्रचंड भांडणे होऊ लागली कलह निर्माण होऊ लागले महाभारत हे कुटुंबांच्यात भांडण लावते म्हणून ते घरात ठेवू नये अशी अंधश्रद्धा रुढ होईपर्यंत मजल गेली तेव्हा सर्व भावांनी एकत्र राहावे म्हणून रामायणाची निर्मिती वाल्मिकी नावाच्या ब्राह्मणाने केली हा ब्राह्मण वाल्मिकी आणि मूळचा कोळी वंशातील वाल्मिकी हे पूर्णपणे दोन वेगळे वाल्मिकी आहेत आणि सत्य पुढे येऊ नये म्हणून या वाल्मिकी कोळींना नंतर अस्पृश्यांच्यात टाकून एक वाल्मिकी समाज निर्माण करण्यात आला जो आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साफसफाईच्या कामात आहे ओमप्रकाश वाल्मिकी या लेखकाने या अंगाने जे स्वतःचे आत्मचरित्र लिहिलेले आहे ते वाचण्याजोगे आहे या रामायण ग्रंथाचा एक उद्देश शैव लोकांना गुलाम बनवणे असा होता त्यामुळे साहजिकच ब्राह्मण वाल्मिकीच्या रामायण मध्ये हनुमान हा शैवावतार असून तो सतत राम नाम घेत असतो हे दाखवण्याचा उद्देश शैव लोकांनां दास बनवणे असा आहे हा हनुमान मराठी असल्याने साहजिकच महाराष्ट्रामध्ये मात्र त्याची रामापेक्षा अधिक मंदिरे आहेत खुद्द स्वामी रामदासांना रामाचे मंदिर उभी करण्याऐवजी हनुमानाची मंदिरे आणि हनुमानाचे शैव लोकांच्याकडून निर्माण झालेले आखाडे ताब्यात घ्यावेसे वाटले याचे कारण स्पष्ट आहे बहुजन समाजाचा धर्म हा शैव होता तो काढून घेऊन त्यांना वैष्णव बनवणे त्यासाठीच हनुमान हे शैव लोकांना वैष्णव बनवण्यासाठी निर्माण करण्यात आलेले पात्र आहे हनुमानाची ही लोकप्रियता अर्थातच कशी छेदायची हा प्रश्न बौद्ध लोकांच्या पुढेही होता त्यातूनच मग खुद्द गौतम बुद्ध हा आकाशात उड्डाण करून श्रीलंकेमध्ये उतरला आणि त्याने तिथल्या लोकांना आपला धम्म सांगितला अशी दंतकथा बौद्ध धर्मी लोकांनी निर्माण केली तेव्हा जर मूळ कोण असा प्रश्न आला तर त्याचे खरे उत्तर शैवांचा हनुमान असे आहे
राहता राहायला प्रश्न हेराकलीसचां ! असा उल्लेख इंडिका मध्ये आहे हे वस्तुस्थिती मात्र ती कोणा संदर्भात आहे हे अजिबात स्पष्ट होत नाही शैव म्हणतात तो भगवान शिवांचा उल्लेख आहे शंकराचा उल्लेख आहे वैष्णव म्हणतात तो भगवान कृष्णांचा उल्लेख आहे तर बौद्ध म्हणतात तो भगवान बुद्धांचा उल्लेख आहे प्रत्यक्षामध्ये तो नेमका कोणाचा उल्लेख आहे हे स्पष्ट नाही आणि ते कधी स्पष्ट होईल असे आता वाटत पण नाही त्यामुळे हा मुद्दा सोडून दिलेलाच बरा एक गोष्ट मात्र खरे आहे की यामुळेच हेराक्लिस भारतामध्ये प्रचलित झाला आणि त्याच्या कथेतून येणाऱ्या अनेक गोष्टी या भारतीय कथांच्या मध्ये झिरपल्या
भगवान बुद्ध ही भगवान महावीरांच्या जीवन चरित्रातून निर्माण केली गेलेली काल्पनिक कथा आहे का ? भाग दोन श्रीधर तिळवे नाईक
१९ मंडन : भगवान महावीर दिगंबर होते आणि त्यांना भगवे वस्त्र घातले की गौतम बुद्ध तयार होतात
खंडन : खुद्द गौतम बुद्ध यांचा उल्लेख स्पष्टपणे वस्त्र धारण करणारे असाच आहे त्या उलट भगवान महावीर यांचा उल्लेख दिगंबर असा आहे भगवान बुद्ध यांच्या मते दिगंबर असणे हा अतिरेक आहे साहजिकच एकीकडे भरपूर वस्त्रे घालणारे साधू आणि दुसरीकडे दिगंबर असणारे महावीर यांच्यातला सुवर्णमध्य काढण्याकडे गौतम बुद्ध यांचा कल आहे त्यासाठी त्यांनी मग शरीर झाकण्यापूरती वस्त्रे घालावीत अशा प्रकारची भूमिका घेतली त्यामुळे हा मुद्द्याला फारसा अर्थ राहत नाही किंबहुना हा मुद्दा कळत नकळत या दोन व्यक्ती रेखा वेगळ्या आहेत हेच दर्शवतो
२० मंडन: महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणावरून विशेषतः वाल्मिकी यांच्या आयुष्यावरून अंगुली मालाची कथा तयार करण्यात आलेली आहे किंवा हनुमान श्रीलंकेला गेले होते म्हणून गौतम बुद्ध सुद्धा श्रीलंकेला गेले
खंडन: स्पष्ट सांगायचे तर दोन्ही कथा पूर्णपणे वेगळ्या आहेत दोघेही मूळचे हिंसक होते आणि नंतर अहिंसक झाले हे एकमेव तत्व समान आहे मात्र एक निर्वाणाकडे वळलेला आहे तर दुसरा राम नामांकडे वळलेला आहे अशी कथा आहे ही अर्थातच वैष्णव मांडणी आहे प्रत्यक्षामध्ये वाल्मिकी हे ब्राह्मण होते असे सनातन धर्म सांगतो जर खरोखरच वाल्मिकी हे कोळी समाजातून आले असे वाटले असते तर रामायण वाचण्याची बंदी घातलीच गेली नसती ते संस्कृत मध्ये लिहिलेले आहे तर संस्कृत शूद्रवर्णासाठी खुले झाले असते पण असे काहीही वैष्णव धर्माने केलेले नाही उलट रामायण संस्कृत मध्ये असल्याने ते वाचण्याचा अधिकार शूद्रांना नाही अशीच भूमिका घेतलेली दिसते त्यातूनच मग रामायण आणि महाभारत यांचे भाषांतरे ही देशी भाषेत झाली त्याला सुद्धा ब्राह्मण धर्माचा सुरुवातीला विरोध होता ज्ञानेश्वरांचे काय केले हे स्पष्टच आहे अगदी तुलसी रामायण लिहिणाऱ्या तुलसीला सुद्धा त्रासच देण्यात आला होता आता जे लोक पुरोगामी ब्राह्मणांनाही सोडत नाही तिथे पुरोगामी ब्राह्मणेतरांचा काय पाड ?
वस्तुस्थिती अशी आहे की वाल्मिकी नावाचा ब्राह्मणच होऊन गेला होता आणि ब्राह्मण परंपरेला हे मान्य आहे प्रश्न असा आहे की मग वाल्या कोळ्याची ही कथा आली कुठून? वस्तुस्थिती अशी आहे की ही कथा मुळात शैव धर्मामध्ये आहे ही कथा कोळी का आहे ते लक्षात घेण्यासाठी मुळात कोळी समाजाचे शैव धर्मातले स्थान लक्षात घ्यावे लागते कारण कोळी समाज अनेकदा समुद्राकाठी किंवा नदीकाठी असणाऱ्या अनेक शैव मंदिरांचा पुरोहित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे साहजिकच त्यांच्याकडे सर्व विद्या होत्या आजही पंढरपूरचे विठ्ठल मंदिर असो किंवा आणखी काही मंदिर असो त्यांचे मूळ मालक कोळी होते ही मंदिरे कशी हिसकवली गेली आहेत ही एक वेगळी कहाणी आहे या वाल्मिकी कोळीनेच मूळ शैव रामायण लिहिलेले होते आणि ते आत्ताच्या रामायणापेक्षा पूर्णपणे वेगळे असून त्यामध्येच राम हा शिवभक्त म्हणून सादर झालेला आहे मुळात सर्व लोकांच्या मध्ये प्रचलित झालेल्या अनेक राम कथा हनुमान कथा एकत्र करून त्यातून त्याने हे वाल्मिकी रामायण लिहिलेले होते जे पूर्णपणे कोळी लोकांच्या मध्ये जास्त प्रचलित होते त्यातून आलेल्या अनेक कथा या लोककथा म्हणून अनेक ठिकाणी प्रचलित होत्या त्या सर्व या वाल्मिकी कोळीने एकत्र केल्या त्यांचे संकलन केले आणि वाल्मिकी रामायण निर्माण केले लोकांनी त्याची स्मृती व्यवस्थित जतन करण्यासाठी म्हणून त्याची जीवनकथा जपली होती तिला अत्यंत वेगळे स्वरूप नंतर ब्राह्मण धर्माकडून देण्यात आले मुळातच या सगळ्या कथेचे जे गृहीतक आहे ते वाल्या कोळी आपली उपजीविका करू शकत नव्हता म्हणून त्याने असा मार्ग पत्करला या गृहीतकावर आहे हे गृहीतक पूर्णपणे चुकीचे आहे कारण या काळामध्ये कोळी समाज अत्यंत संपन्न समाज होता त्याच्याकडे नावा होत्या जमीन होती आणि मंदिरे सुद्धा होती आणि काहींच्याकडे नंतर मीठागरे सुद्धा होती तेव्हा अशा प्रकारची पाळी कुठल्या कोळी माणसावर येऊ शकत नाही त्यामुळे गृहीतक चुकीचे असल्याने हे सर्व दंतकथेचे रूप आहे हे उघड आहे या कथेमध्ये हनुमान सुपरमॅन आहे तो उडू शकतो त्याची लोकप्रियता प्रचंड होती आणि तो मराठी कर्नाट असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये तर तो प्रचंड लोकप्रिय होता म्हणूनच तर अत्यंत पद्धतशीरपणे त्याला राम भक्त दाखवण्यात आले जेणेकरून शूद्र लोकांची शैव लोकांची गुलामगिरी प्रस्थापित व्हावी म्हणूनच त्याला अत्यंत जाणीवपूर्वक शिव अवतार केलेले आहे वैष्णव हे अत्यंत धूर्तपणाने आणि अत्यंत चालाकीने सर्व गोष्टी करत असतात दिसायला अत्यंत गोड आणि रसाळ वाटणाऱ्या या गोष्टी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला आमचे गुलाम बनूनच राहायचे आहे असा मेसेज देत असतात साहजिकच मग रामदास स्वामी राम मंदिरे काढत नाहीत कारण राम मंदिरे महाराष्ट्र मध्ये फारशी अस्तित्वातच नव्हती पण मारुतीची मंदिरे व आखाडे मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते ते ताब्यात घेण्यासाठी म्हणून पद्धतशीरपणे अनेक गोष्टी केल्या गेल्या आजही अनेक मारुतीची मंदिरे ही बहुजन समाजाच्या पुरोहित लोकांच्या ताब्यात आहेत कारण मारुती हा बहुजनांचा नायक आहे या बहुजनांच्या नायकाची कथा सांगणारा एक कोळी समाज होता त्याचे नाव वाल्मिकी समाज! आजही हा वाल्मिकी समाज अस्तित्वात आहे आणि मूळ सत्य उजेडात येऊ नये म्हणून पुढे या समाजाचे रवानगी अस्पृश्यांच्यात करण्यात आली या समाजाची नेमकी आत्ताची स्थिती काय आहे हे स्पष्ट करणारे आत्मचरित्र ओमप्रकाश वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे आजही या लोकांना आपल्याला वाल्मिकी का म्हटले जाते हे लक्षात येत नाही त्यांना ते जाऊन सांगावे लागते हनुमानाच्या या लोकप्रियतेचा मोह बौद्ध लोकांना पडणे साहजिक होते साहजिकच ज्याप्रमाणे हनुमान लंकेमध्ये जातो त्याप्रमाणे नंतरच्या बौद्ध दंतकथांच्या मध्ये गौतम बुद्ध हा उडत उडत श्रीलंकेमध्ये पोहोचतो आणि तिथल्या लोकांना बौद्ध धर्म सांगतो चायना मध्ये तर अनेक दंतकथांच्या मध्ये अनेकदा गौतम बुद्ध हा आकाशात तरंगत असतो दंतकथा फक्त वैष्णव लोक रचतात हा एक फार मोठा भ्रम आहे जगभरातले सर्व पुरोहित लोक नेहमीच दंतकथा रचत असतात बौद्ध धर्म त्याला अपवाद नाही जेव्हा जेव्हा कुठलाही धर्म पुरोहित लोकांच्या ताब्यात जातो तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या दंतकथा धर्माचा प्रचार करण्यासाठी म्हणून तयार आणि सादर केल्या जातात खरंतर गौतम बुद्ध असो किंवा महावीर असो दोघांपैकी कोणीही दंतकथांच्या आहारी जात नाही हे दोघेही अत्यंत वास्तववादी म्हणता येतील असे आहेत पण दुर्दैवाने त्यांच्या धर्मात मात्र सर्व प्रकारचा पौराणिकपणा घुसला आज सुद्धा भारतात पौराणिकपणा हा बौद्धांनी आणि जैनानी सुरू केला की वैष्णव लोकांनी सुरू केला असा मोठा प्रश्न नेहमीच इतिहासाच्या संदर्भात निर्माण होतो
थोडक्यात काय आपण जर का बारकाईने पाहिले तर इतिहासामध्ये या दोन्हीही व्यक्तिरेखा होऊन गेल्या याबद्दल शंका राहू नये त्याचबरोबर या दोन्ही व्यक्तिरेखा एकाच काळात जन्मल्या हेही खरे आहे त्याचबरोबर महावीर हे आधी जन्मले होते आणि त्यांचा धर्म आधी अस्तित्वात आला होता ही ही वस्तुस्थिती आहे महावीरांचा किती प्रभाव गौतम बुद्ध यांच्यावर पडला हे त्यांच्या बोलण्यातूनच संभाषणातूनच अनेकदा व्यक्त झालेले आहे महावीरांनी जी साधना पद्धत दिली ती अत्यंत टोकाची आहे आणि इतक्या टोकाला जाणे गरजेचे नाही आपण सुवर्णमध्य साधला पाहिजे असे प्रतिपादन सतत गौतम बुद्ध करताना दिसतात गौतम बुद्ध नेमके नवीन काय सांगतात असा प्रश्न आपण विचारू शकतो वस्तुस्थिती अशी असते की कुठलाही विचारवंत हा अचानक आकाशातून येत नसतो तो मागच्या विचारवंतांच्या खांद्यावर उभा असतो तो नेमका कुठल्या खांद्यांच्यावर उभा आहे हे तपासणे गरजेचे आहे गौतम बुद्ध हे नक्कीच जैन श्रमण परंपरेच्या खांद्यावर उभे होते विशेषता जैन लोकांची जी पंचतत्वे किंवा शिले आहेत त्यांचा प्रभाव गौतम बुद्ध यांच्यावर पडलेला आहे आणि त्यांना अधिक पुढचा अवकाश दिसला आणि म्हणूनच ते आपली मांडणी अधिक नीटनेटकी करू शकले गौतम बुद्धांच्यावर भगवान कपिल आणि भगवान महावीर यांचा प्रभावच पडला नाही अशी टोकाची भूमिका घेणारे सुद्धा काही लोक आहेत असे लोक फ्यानाटीक असतात खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकात कपिलांचा प्रभाव मान्य केलेला आहे मात्र हिरण्य वंशाबद्दल त्यांना फारशी माहिती नसावी किंवा त्यांना ती काल्पनिक वाटलेली असावी कारण हे सर्व उल्लेख पुराणांच्या मध्ये आहेत गौतम बुद्ध सतत स्वतः श्रमण परंपरेमध्ये मी उभा आहे असे सांगतात तेव्हा त्यांची परंपरा कुठून सुरू झाली हे स्पष्ट आहे आता श्रमण परंपरा कुठून आली असा प्रश्न तुम्ही विचारू शकता त्याचे उत्तर मी एका वेगळ्या निबंधात दिलेले आहे
या पुढचा प्रश्न असा येतो की एकाच वेळेला भगवान शंकरांच्याबद्दल रविशंकर शंका घेतात (यावर मी स्वतंत्र लेख टाकलेलाच होता)आणि त्याच वेळेला बरोबर दुसऱ्या बाजूने गौतम बुद्धावर अशा प्रकारचे सादरीकरण होते हा सर्व योगायोग आहे का की हे सर्व अत्यंत कलेक्टिव्हली डोकं लावून करण्यात आलेलं आहे?
आद्य शंकराचार्यांनी जे काही केले त्याचा पूर्ण फायदा घेऊन नंतर या देशातून व्यवस्थितपणे आगमपरंपरा नाहीशा करण्यात आल्या आणि श्रमण परंपरेतील जैन परंपरेला व्यवस्थित आळा घातला गेला आत्तासुद्धा हे झाले आहे का ? म्हणजे ही मांडणी जैन लोकांना अत्यंत दिलासा देणारी आहे आणि त्यांना ब्राह्मणी हिंदुत्वाच्या दिशेने खेचणारी आहे हे नेमके तेच डावपेच आहेत जे आठव्या मग उत्तर पेशवाईच्या कालखंडामध्ये आणि इंग्रजांच्या काळात युरोपियन इतिहासकारांची मदत घेत १९ व्या शतकामध्ये अवलंबले गेले होते आठव्या शतकात बौद्ध धर्म संपूर्णपणे या देशातून गायब करण्यात आला. उत्तर पेशवाई मध्ये शैव धर्म गायब करण्याचा प्रयत्न झाला आठव्या शतकात बौद्ध ग्रंथ नष्ट झाले हळूहळू शैव धर्मग्रंथ सुद्धा नष्ट झाले किंवा नष्ट करण्यात आले पंडितांच्या विशेषत: कश्मीरी पंडितांच्या मांडणीमुळे निदान काही गोष्टी आपल्या हाताशी लागतात अन्यथा तेही लागले नसते काश्मीरमध्ये १४ व्या शतकापर्यंत शैव राजवटी होत्या म्हणून हे झालेले दिसते आणि शैव परंपरा टिकलेली दिसते अन्यथा शैव धर्माची गच्छंती ही झालीच असती
आत्ता सुद्धा आलेली ही मांडणी बौद्ध धर्माला गायब करण्यासाठी करण्यात आलेली आहे का असा प्रश्न आपण विचारला पाहिजे हिंदुत्वाच्या नावाने काही लोक ब्राह्मण धर्मच आणू इच्छितात त्यांचे काय करायचे?
यानंतरचा मूलभूत प्रश्न असा की बौद्ध धर्माविषयी कर्मठ सनातनीं ब्राह्मण लोकांच्या मध्ये इतका द्वेष का? असा प्रश्न आपण नेहमी विचारला पाहिजे माझ्या मते याचे उत्तर अत्यंत साफ आहे वस्तुस्थिती अशी आहे की कुठल्याही समाजामध्ये द्विध्रुवात्मकता वेगवेगळ्या पद्धतीने येत असते बौद्ध धर्म हा जगातला असा पहिला धर्म आहे ज्याने स्पष्ट आणि स्वच्छ पणाने ब्राह्मण धर्म विरुद्ध बौद्ध धर्म अशी द्विध्रुवात्मकता स्वीकारली आणि त्याची सातत्याने मांडणी केली जी कधी शैव धर्माने सुद्धा मांडली नव्हती स्वीकारली नव्हती साहजिकच ब्राह्मण धर्माचा पराभव हा त्यांनीच बळकवलेल्या प्रदेशामध्ये व देशांमध्ये काही काळ का होईना पण अशोकाच्या नंतर बौद्ध धर्माने आणि पाशुपत धर्माने केला साहजिकच या दोन्ही धर्मांच्या विरोधात अनेक गोष्टी करण्यात आल्या याचा प्रतिकार स्पष्टपणे बौद्ध धर्माने ब्राह्मण धर्मा विरोधात बंड करून केला ब्राह्मण धर्माला इतका निकराचा प्रतिकार कोणीच केला नसेल दुर्देवाने बौद्ध धर्म ही लढाई हरत गेला आणि त्यामागे असलेली कारणे नेमकी काय होती याची मीमांसा मी इतरत्र केलेलीच आहे मात्र शैवधर्माला राजाश्रय मिळाल्याने विशेषत: दक्षिण भारतामध्ये राजाश्रय मिळाल्याने तो टिकून राहिला यावर उपाय म्हणून ब्राह्मणांनी राजाश्रय कसा काढून घेता येईल त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आणि त्यांना सर्वात पहिले यश हे महाराष्ट्रात मिळाले एकेकाळी कट्टर शैव असलेला सेऊना वंश व सेउना राजघराणे जे यादव नव्हते त्याला यादव करून आणि तुम्ही यादव होता असे सतत बिंबवून वैष्णव करण्यात आले त्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाचे वंशज आहात असे सांगत प्रथम यादव केले आणि मग वैष्णव करून टाकले आणि त्यांच्याच उत्तरकालीन राजवटीमध्ये पंढरपूरचे मूळचे शैव असलेले विठ्ठल मंदिर स्वतःच्या ताब्यात घेतले आणि तिथून हळूहळू वैष्णव वारकरी संप्रदाय निर्माण केला ज्याने हळूहळू महाराष्ट्रामध्ये सगळे सांस्कृतिक राजकारण बदलवून टाकले अर्थात त्याला शिवाजी महाराजांनी नंतर शह दिला कारण तेच एक असे होते ज्यांना काय चालले हे माहीत होते शैव राजवटींच्या सपोर्टमुळे ज्यात शिवाजी महाराज सुद्धा येतात शैव धर्मीय लोक टिकले बौद्ध लोकांचा राजाश्रय मात्र कमी होत गेला आणि त्यामुळेच बौद्ध धर्मी लोक टिकले नाहीत हे सर्व ब्राह्मण धर्माला अतिरेकी विरोध केला म्हणून झाले का असाही प्रश्न आपण येथे उपस्थित करू शकतो कि नंतरचे बौद्ध हे ब्राह्मणग्रस्त झाल्याने ते नको तितके ब्राह्मण धर्मासारखे झाल्यामुळे ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातला फरक संपला आणि त्यामुळे बौद्ध धर्म संपला? इतिहासातले हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत त्यांच्यावर सतत चर्चा मात्र होत असतात कारण एरवी जगभर पसरलेला हा धर्म भारतामध्ये का संपला हा एक फार मोठा संशोधनाचाच भाग आहे असो
सध्याचा जो नवबौद्ध धर्म आहे त्यामध्ये सुद्धा आता अशा प्रकारच्या ब्राह्मण्याने शिरकाव केलेला आहे ब्राह्मण्य म्हणजे पुरोहित गिरी होय आणि ही पुरोहितगिरी आता नवबौद्धांच्यातसुद्धा शिरताना दिसते ती केवळ बौध्द भिख्खूची आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही अर्थात ती आता खूप कमी आहे परंतु ती वाढत जाणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत याविषयी कोणी काही बोलले तर ते सुद्धा काही जणांना खपत नाही त्यांना वाटते नव बौद्धांना हा विरोध आहे मात्र त्यांच्यातीलच काही लोक जेव्हा बोलतात तेव्हा मात्र हे बोलणे बरोबर असते
अकराव्या शतकामध्ये जेव्हा रामानुजाचार्य यांच्या नेतृत्वाखाली वैष्णव धर्म आणि ब्राह्मण धर्म एक झाले तेव्हा त्याला छेद म्हणून बसवेश्वर यांनी पुन्हा एकदा आगम परंपरा केंद्रस्थानी आणून ठेवली आत्ता जी परिस्थिती निर्माण होत आहे ती परिस्थिती नेमके हेच करत आहे पुन्हा एकदा ब्राह्मण धर्म आणि वैष्णव धर्म यांची युती होत आहे आणि त्यामुळे साहजिकच ब्राह्मण धर्मी ब्राह्मण आणि वैष्णव धर्मीय क्षत्रिय पुन्हा एकदा एकत्र येऊन नवी वर्ण व्यवस्था आणतात की काय अशी शंका येण्या इतपत गोष्टी घडताना दिसतात त्या तशा घडल्या नाहीत तर उत्तमच आहे पण घडल्या तर काय? आपल्या आसपासचे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे देश ज्या प्रकारे धार्मिक कट्टरतेच्या आणि पारंपारिकतेच्या आहारी गेलेत ते बघता 21व्या शतकात हे होऊ शकते ते होणार नाही म्हणून आपण भ्रमात राहण्याचे काही कारण नाही
तेव्हा सावध ऐका पुढल्या हाका असे म्हणावे लागते कारण दर वेळेला बहुजन समाजाने स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलेली आहे मी असे म्हणत नाही की हे नक्की होईल पण हे होऊ शकते आणि होऊ शकत असल्याने ते होऊ नये म्हणून काय करता येईल त्याविषयी आत्ताच विचार करायला हवा अन्यथा बैल गेला आणि झोपा केला हे बहुजन समाजाला आणि सुविचारी सुसंस्कृत लोकांना अनेकदा लागू पडलेलेच आहे अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हे झालेले आहे तिथल्या विद्वान विचारवंतांना असे काही होईल असे वाटलेच नव्हते हे लक्षात घेण्याजोगे आहे
जे लोक शिवशाही स्थापन करूनसुद्धा पुन्हा उत्तरपेशवाई येऊ देतात त्यांच्या झोपेविषयी काय बोलावे?
श्रीधर तिळवे नाईक
ताजा कलम
Avinash Gaikwad विपुल पुरावे हे त्या त्या संप्रदायातल्या किंवा धर्मातल्या किंवा धर्मातल्या लोकांना माहिती असतात त्या धम्माबाहेरच्या लोकांचे काय? ते व्हाट्सअप वरच्या अशा लिखाणावरूनच मत बनवतात आणि ही बनलेली मते जेव्हा माझ्याकडे काही विद्यार्थी घेऊन आले तेव्हा मी केलेला हा प्रतिकार आहे इथले सर्व युक्तीवाद हे केवळ ताबडतोब आणि स्मरणशक्तीच्या आधारे केलेले आहेत खंडनाचे मुद्दे माझे पण मंडन मात्र समोरच्या व्यक्तींनीच मांडलेले आहे त्यांचं नाव सुद्धा मी दिलेल आहे त्यामुळे भिंतीला तुंबड्या लावणे झालेले नाही नवीन पिढी ब्राम्हणी हिंदुत्ववादाच्या किती प्रभावाखाली येते आहे याची बहुदा आपणाला अजूनही जाणीव येत नाहीये हा प्रतिकार खरे तर बौद्ध धर्मी लोकांनी करायला हवा तो झाला नाही म्हणून मला उतरायला लागले आपल्या आसपास अनेक अशा गोष्टी घडत असतात आणि आपणाला शेवटी मतदान पेटीत सुगावा लागतो ज्यावेळेला काहीच उपयोग नसतो मी नेमाडे यांच्या विरोधात बोलायला चालू केले तेव्हा फार कमी लोक बोलत होते अर्थात त्यावेळेला हे लोक मला माहित नव्हते त्यावेळीही माझ्यावर भिंतीला तुंबड्या लावतोय असा आरोप होताच पुढें माझीच ऱ्ही ओढावी लागलेली आहे गोष्ट वाढण्याआधीच तिला पायबंद घालावा लागतो दुसरी गोष्ट बौद्ध धर्माचा इतिहास आणि जैन धर्माचा इतिहास हा बाहेरच्या लोकांना फारसा माहीत नाही मी सुद्धा सुरुवातीला नास्तिक लोकायतवादी होतो,(त्यातूनच बाळबोध कविता हा संग्रह आलेला आहे) मग शैव होतो कारण घरात तीच परंपरा होती तोच इतिहास होता मग मात्र चॅनेल सीरींज मध्ये मी असे म्हणू शकतो की मी बौध्द झालो कारण मला मोक्ष मिळत नव्हता तेव्हा मोक्ष मिळवण्याची आणखी एक संधी म्हणून किंवा शक्यता म्हणून मी बौद्ध पद्धतीने पाहत होतो याच कालखंडात मी बौद्ध धर्माचा इतिहास थोडाफार शिकलो त्यांचा उपदेश मात्र खूप आधी मी वाचला होता अन्यथा आपल्याकडे उपदेश् इतर धर्मांचे इतिहास पोचवले जातच नाहीत पुढे त्यातूनही काही घडेना तेव्हा मग पुन्हा साधनेतल्या काही गोष्टीमुळे मी शैव झालो त्यानेही काही साधना तेव्हा मी सगळ्यांचा नाद सोडला मुक्त झालो आणि मग मुक्तच झालो मग पुन्हा सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती पाहून शैवधर्माकडे आलो या लेखनाचा उद्देश यानिमित्ताने शैव लोकांना जैन धर्म व बौद्ध धर्म यांचा थोडा इतिहास सांगता आला तर बरा हाही होता आता किती बौद्ध लोकांना शैव-धर्माबद्दल किती माहिती आहे असा प्रश्न मी विचारू शकतो मी तो विचारत नाही कारण हा ज्याच्या त्याच्या जिज्ञासेचा प्रश्न आहे अनेक नवबौद्ध लोकांना जिथे स्वतःच्या धर्माचा इतिहास माहीत नाही तिथे त्यांनी शैव-धर्माच्या किंवा जैन धर्माच्या इतिहासात रस घ्यावा हे अशक्यच असो ज्योतिबा फुले यांचे सावित्रीबाई फुले यांचे नाव घेणे त्यांना आजोबा आजी म्हणणे वेगळे आणि त्यांनी स्वीकारलेल्या धर्माला जाणून घेणे वेगळे नंतर ज्योतिबा फुले यांनी वेगळा समाज स्थापन केला तो मात्र समजून घेतला जातो सावित्रीबाई फुले मात्र शैवच राहिल्या असे दिसते त्यांनी सत्यशोधक समाज आणि शैव वेगळे केलेले दिसत नाहीत निदान त्यांच्या कविता तरी हेच सांगतात मी स्वतः सत्यशोधक समाज हा शैव-धर्मातला नव समाज मानतो बसवेश्वरांच्या नंतर गुरुनानक यांच्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर शैव धर्मात आलेले आणखी एक वळण म्हणून त्याकडे पाहतो आता शैव धर्म स्वीकारायचा की नाही याचा निर्णय बौद्ध लोकांनी घ्यावा त्याला सहधर्म मित्र धम्म मानायचं की शत्रुधर्म मानायचा हा पूर्णपणे बौद्ध लोकांचा धम्मिक प्रश्न आहे मी स्वतः जैन आणि बौद्ध या धम्मांना शैव धम्माचे सहधम्म मानतो त्याचबरोबर अलीकडचे नववैदिक (दयानंद सरस्वती)नव वैष्णव (चक्रधर आणि उत्तरार्धातले महात्मा गांधी)नव हिंदू (स्वामी विवेकानंद)यांना मित्रधम्म मानतो माझी लाईन मला क्लिअर आहे साहजिकच जेव्हा जेव्हा माझ्या मित्र धम्म किंवा सहधम्म यांच्यावर टीका तीही अवाजवी होते तेव्हा मी तिचे खंडन करायला धावतो पण मी नेहमीच त्या त्या मित्र धम्मातून किंवा सह-धम्मातून टीकेला उत्तर देण्यासाठी आधी कोणी येते का याची वाट पाहतो आपल्या माघारी काय चाललंय हेच माहीत नसलेले लोक आणि आपलं जग म्हणजेच सर्व काही मानणारे लोक अनेकदा झोपलेले असतात हे तेच लोक आहेत ज्यांनी एकेकाळी नेमाडे यांना डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली होती आता हे आम्हाला शहाणपण सांगतात पण यांचे स्टांसेस काय होते हे व्यवस्थित मला लक्षात आहे लोक बदलतात म्हणूनच लोक बदलण्यावर माझा विश्वास आहे अगदी नेमाडे सुद्धा अलीकडे शैव धर्माबद्दल बोलायला लागलेले आहेत याचा अर्थ मी चुका करत नाही असा नाही तुम्ही संसारात असला की चुका अपरिहार्य असतात त्या कोणी दाखवल्या की मी स्वागत करतो तुम्ही चुका दाखवा मी स्वीकारेन तुमचे बायस आडवे येणार असतील तर मी तुमच्याच भाषेत उत्तर देणार कारण आत्ताचा काळ बौद्ध पद्धतीला सूटेबल नाही असे माझे स्पष्ट मत आहे आता शैव पद्धतच योग्य आहे हा माझा आत्ताच्या काळाच्या संदर्भातला निष्कर्ष आहे तू माझा मित्र आहेस म्हणून तुला एवढे स्पष्टीकरण देतो आहे अन्यथा तेही देण्याची गरज आजकाल भासत नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment