FREEDOM SWATANTRYA DIN

फेसबुक वर टाकलेली पोस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त १ श्रीधर तिळवे नाईक

स्वातंत्र्य दिन आला की आपण एका विशिष्ट संदर्भात बोलतोय याची जाणीव लोकांना व्हायला लागते आणि लोक स्वातंत्र्याची चर्चा सुरू करतात यात अनेक प्रश्न असतात म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले स्वातंत्र्य खरोखरच मिळवले गेले की दिले गेले स्वातंत्र्यात कोणाचा काय रोल होता स्वातंत्र्य ही चळवळ होते की नाही ? 


आमच्या पिढीने काही स्वातंत्र्यसंग्राम बघितला नाही मात्र आम्ही आमच्या बापज्याद्यांच्याकडून त्या विषयाच्या कथा ऐकलेत(माझी स्वतःची फॅमिली ही गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होती ) त्यामुळे स्वातंत्र्याची आपण कल्पना करतो म्हणजे नेमकी काय कल्पना करतो किंवा काय विचार करतो हा प्रश्न कायमच माझ्या फॅमिलीत आणि माझ्या मनात गुंजणारा प्रश्न राहिला आहे साहजिकच स्वतःच्या दृष्टीने स्वातंत्र्याकडे पाहणे अटळ झाले मी आयएएसचा अभ्यास करत असताना बीए मध्ये हिस्टरी आणि राज्यशास्त्र असे विषय घेतले होते कारण आयएएससाठी हे दोनच विषय मी निवडणार होतो साहजिकच राज्यशास्त्राचा मी माझ्या स्टाईलने अभ्यास सुरू केला सुरुवातीला या संदर्भात नेहमीच ना य डोळे यांचे राजकीय विचारांचा इतिहास हे पुस्तक वाचले आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला तो शेवटी उत्तर संरचनावादी राजकीय विचारवंतांच्या पर्यंत पोहोचला नेहमीप्रमाणे सगळ्या राजकीय विचारांचा इतिहास आणि विचारवंत सूक्ष्मपणे अभ्यासले त्यामध्ये एक गोष्ट मला नक्की कळली ती म्हणजे आपण जिला स्वातंत्र्य म्हणतो ती स्वातंत्र्य ही संकल्पना म्हणजेच फ्रीडम ही एक पुरोगामी कल्पना आहे आणि ती प्रथम धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात उभी राहिलेली आहे सर्वात प्रथम विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि नंतर तो विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य अशा दोन पद्धतीने हा विचार झालेला आहे म्हणजेच एका अर्थाने आशय स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे दोन्ही स्वातंत्र्याचे प्रकार सुरुवातीपासूनच पुरोगामी चळवळीत अस्तित्वात आहेत यातील जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट होती ती प्रामुख्याने त्या काळामध्ये विचार छापण्याचे स्वातंत्र्य या अंगाने अस्तित्वात होती कारण मनातल्या मनात तुम्ही विचार करू शकता परंतु हा विचार जेव्हा तुम्ही वक्ता म्हणून व्यक्त करता आणि जेव्हा लेखक म्हणून तुम्ही तो विचार लिहिता मुख्य म्हणजे तो छापता तेव्हा तो पब्लिक डिस्कोरसेस ज्यांना म्हटले जाते त्यांच्यासाठी खुला होतो. विशेषतः लिखित संस्कृतीचा आणि छापील संस्कृतीचा यामध्ये प्रचंड वाटा आहे किंबहुना पुरोगामी वाद हा छापीलतेवर उभा झालेला वाद आहे या पुरोगामी वादाचा चेहरा हा कधीही एकच नव्हता तो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांच्या अंगाने उमलत राहिला आणि त्यातून स्वातंत्र्यांचे अनेक प्रकार उदयाला आले म्हणजे धार्मिक विचारप्रणाली ज्या उदयाला आल्या त्यातून धार्मिक स्वातंत्र्य ही संकल्पना उदयाला आली आपल्याकडे याची सुरुवात बसवेश्वर आणि केली यांनी केली तर परदेशामध्ये याची सुरुवात रॉजर बेकन यांचे गुरु व रॉजर बेक्कन यांनी केली यातील बसवेश्वरांची हत्या झाली तर रॉजर बेकन यांना तुरुंगवास झाला पुढेही अनेक नास्तिक व रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्माविरुद्ध प्रोटेस्ट करणाऱ्या प्रोटेस्टंट विचारवंतांना जिवंत जाळण्याचा उद्योग तिथल्या ख्रीश्चनटीने केला अगदी अलीकडेही जेव्हा बर्ट्रांड रसेल याने वाय आय एम नॉट ख्रिश्चन नावाचे पुस्तक लिहिले तेव्हा त्याला ख्रिश्चन विरोधी म्हणून संस्थेतून काढण्यात आले होते


या बंडाची मांडणी ज्यांनी सुरुवातीला केली त्या रॉजर बेकन यांनी निसर्गप्रामाण्यवाद मांडला आणि परलोकाकडे असलेले लक्ष इहलोकांकडे वळवले व्यक्तिगत पातळीवरही ह्युमन नेचर महत्त्वाचे झाले मानवाचा स्वभाव म्हणजेच मानवाचा निसर्ग होय साहजिकच मानवी स्वभावाचा विचार सुरू झाला मॅकॅवलीचे प्रिन्स हे राज्यशास्त्रीय लेखन मानवी स्वभाव स्वार्थ मूलक स्वभाव आहे असा विचार मांडते त्याचा सखोल परिणाम तत्कालीन युरोपियन राजे लोकांच्यावर झालेला दिसतो म्हणजेच एका अर्थाने निसर्ग प्रामाण्य वाद व स्वभाव प्रामाण्य वाद असे दोन विचार जन्मलेले दिसतात आणि यातूनच शेक्सपियरची जागतिक दर्जाची नाटके जन्मलेली दिसतात यातूनच स्वातंत्र्य हा माणसाचा स्वभाव आहे की माणसाने स्वातंत्र्याच्या दिशेने जाणे हे अध्यात्मिक आहे असा प्रश्न निर्माण झाला कारण काही लोक असेही मानत होते की मनुष्य स्वातंत्र्याला घाबरतो त्याला स्वातंत्र्य नको असते उलट तो एका चाकोरीत जगायचा प्रयत्न करतो विशेषतः मेक्यावलीचे असे म्हणणे होते अर्थात हे म्हणणे फार काळ टिकले नाही आणि मनुष्य हा मूलतः स्वातंत्र्यप्रेमी आहे असा विचार पुढे आला विशेषता रुसोने मनुष्य स्वातंत्र्य घेऊनच जन्मतो मात्र आता तो सर्वत्र साखळ्यांच्यात जखडला गेलेला आहे अशी मांडणी केली 


ह्या उलट मनुष्य हा राज्य यंत्रणेचा किंवा राष्ट्रीय यंत्रणेचा केवळ एक भाग असतो आणि राज्य जेवढे स्वातंत्र्य त्याला देते तेवढे स्वातंत्र्य त्याला मिळते अशी मांडणी करणारे काही विचारवंत पुढे आले हा राज्यवाद होता आणि त्याचेच रूपांतर पुढे राष्ट्रवादात झाले जुन्या काळात धर्म हाच राष्ट्र होता आणि परमेश्वर हा राज्य होता आणि परमेश्वराच्या राज्यातच स्वतःला विरवून विलीन करून टाका अशी धर्माज्ञा होती नव्या पुरोगामी कालखंडामध्ये राष्ट्र हेच परमेश्वर आहे आणि जुन्या काळातल्या भक्ताप्रमाणे व परमेश्वराप्रमाणे मनुष्याने देखील राष्ट्रात स्वतःला विलीन करून टाकावे असा विचार यातून पुढे आला आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा विचार आधारशीला आहे राष्ट्र प्रथम ही घोषणा त्यातूनच आलेली आहे ही मांडणी युरोपमध्ये पंधराव्या शतकापासून सतत पुढे आलेली आहे आणि नंतर तिचे कलमिनेशन हेगेवादात झालेले आहे आणि पुढे मार्क्सनेही नकळतपणे हेच सांगितले आहे फक्त आपण हेगेल डोक्यावर म्हणजे चैतन्यात होता त्याला आपण जडात उभे केले म्हणजे पायावर उभे केले असे मार्क्स म्हणतो म्हणजे हेगेल नागरिकाला राज्य म्हणजे पुरोगामी काळात राष्ट्र हे परमेश्वर असल्याने राज्यात म्हणजे पुरोगामी काळात राष्ट्रात विलीन व्हायला सांगतो तर मार्क्स त्याला कॉम्रेड म्हणून प्रोलिटरीएट लोकांच्या आर्थिक राज्यात विलीन व्हायला सांगतो हेगेल अध्यात्मिक आणि धार्मिक खरे तर ख्रिश्चन राज्यात विलीन करायला सांगतो तर कार्ल मार्क्स त्याला जडवादी राज्यात विलीन वेळेला सांगतो पण दोघेही मनुष्याला विलीनच करायला सांगतात साहजिकच इथे स्वातंत्र्य नाकारले गेलेले आहे आणि त्याचा दुष्परिणाम कम्युनिस्ट राजवटीत प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसला हिटलर आणि स्टॅलिन एकाच राज्यवादी ( स्टेटीझम) नाण्याच्या दोन बाजू आहेत हे कळायला १९६० साल यावे लागले ते आल्यानंतर मात्र युरोप मधले मार्क्सवादी बदलत गेले आणि स्वातंत्र्याचा अधिक विचार त्यांनी सुरू केला आपल्याकडे हिंदुत्ववादी हाच राज्यवादी विचार घेऊन हे गेलीयन तत्त्वज्ञानाला फॉलो करत हिंदू धर्माच्या लोकांना हिंदू राष्ट्रात विलीन व्हा हिंदू राष्ट्र निर्माण करायच्या कार्यक्रमात विलीन व्हा असे सांगत असतात अलीकडे तर सरकारी कर्मचाऱ्यांनी ही अशा प्रकारे विलीन व्हावे अशी व्यवस्था केली गेलेली आहे हेगेल ज्याप्रमाणे ख्रिश्चनिटीची भाषा वापरतो त्याचप्रमाणे हिंदुत्ववाद सनातन धर्माची भाषा वापरतो


हे सर्व कशातून येते याचे उत्तर पुरोगामी काळ असेच आहे पुरोगामी काळामध्ये दोन प्रश्न अतिशय राजकीय पातळीवर महत्त्वाचे होते पहिला प्रश्न राष्ट्राचा आधार काय आणि दुसरा प्रश्न राष्ट्रांमध्ये नागरिकाचे अधिकार काय असावेत 


या प्रश्नाचे पहिले उत्तर ज्ञानव्यवस्था असे होते म्हणजेच विज्ञानाच्या आधारे राष्ट्राचे कायदे निर्माण व्हावेत संविधान निर्माण व्हावे आणि त्या संविधानाच्या आधारे राष्ट्रनिर्मिती व्हावी यातूनच पुरोगामी राष्ट्रवादाची संकल्पना जन्मली पण दुर्दैवाने भारतात हा पुरोगामी राष्ट्रवाद कधीही आला नाही राष्ट्रवादीमध्ये धर्मापासून पूर्णपणे मुक्ती असते संविधानाचा आणि धर्माचा काडीचाही संबंध असत नाही पुरोगामी राष्ट्रांमध्ये फक्त विज्ञान आणि विज्ञानच कायद्याचा आधार असते अशा प्रकारचा पुरोगामी वाद जगात कुठे अस्तित्वात आला आहे की नाही याबद्दलच मला शंका आहे कारण बहुतेक तथाकथित पुरोगामी राज्यांच्या मध्ये धर्माचे काय करायचे हा प्रश्न कधीही सुटलेला दिसत नाही आणि बहुतेक पुरोगामी राष्ट्रवादी लोकांनी आपापल्या राष्ट्राच्या भूगोलामध्ये अस्तित्वात असलेल्या धर्माशी ,धार्मिक गोष्टींशी, धर्म संप्रदायांशी तडजोडी केल्या त्या प्रचंड महागात पडलेल्या आहेत असे दिसते


याला काउंटर म्हणून मी आधी उल्लेख केलेल्या चर्चेला घेतलेल्या धार्मिक राष्ट्रवादाचा उदय झाला या मागचे तत्त्वज्ञान काय होते तर ज्ञान व्यवस्थेमध्ये धार्मिक ज्ञान हेच उच्च असल्याने धर्माच्या आधारे राष्ट्राचे कायदे निर्माण व्हावेत संविधान निर्माण व्हावे आणि धार्मिक संविधानाच्या आधारे राष्ट्र निर्मिती व्हावी हे तत्त्वज्ञान मानणारे अनेक लोक होते आणि त्यांचा आदर्श ख्रिश्चन धर्माच्या आधारे उभे राहिलेले व्हॅटिकन राष्ट्र होते युरोपमध्ये हे लोक अल्पसंख्याक होते आणि व्हॅटिकन पुरतेच धार्मिक राष्ट्र शाबूत राहिले त्यामुळे उर्वरित युरोपमध्ये त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही ह्या उलट जिथे जिथे इस्लाम बहुसंख्यांक होता तिथे धार्मिक राष्ट्रवादाला प्रचंड आधार मिळत गेला कारण हे लोक कट्टर सनातन होते मूलतत्त्ववादी होते. त्यातूनच जगभरात अनेक इस्लामिक राजवटी आल्या


याचवेळी युरोपमध्ये एक विचित्र घटना हळूहळू घडली ती म्हणजे ज्यू धर्मीयांची झालेली स्थिती! पुढे ज्यू वाद वाढत गेला आणि त्यांनी ज्यू धर्मीय लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र असले पाहिजे अशी मागणी केली अशा प्रकारची प्रॉमिसड ल्यांड त्यांना स्वतः देवानेच प्रॉमिस केलेली आहे असा त्यांचा धार्मिक विश्वास होता साहजिकच अशा प्रकारची धार्मिक प्रॉमिस्ड लँड शोधणे सुरू झाले हिटलर मुळे ही प्रोसेस द्विगुणीत झाली आणि त्यातूनच इस्त्राईल नावाचे राष्ट्र पुढे निर्माण झाले


याच वेळेला इस्लाम मधील काही लोकांनी इस्लामिक कायद्यावर आधारितच राष्ट्र निर्माण झाले पाहिजे अशी भूमिका घेतली आणि भारतामध्ये सर सय्यद अहमद यांनी प्रथम ही भूमिका मांडली आणि भारताच्या फाळणीचे बीज रोवले गेले प्रथम भारतातच इस्लामने स्वतःच्या धर्माच्या आधारे स्वतंत्र राष्ट्र मिळावे अशी मागणी केली जी पुढे जीनांनी रेटत न्हेली आणि बहुतांशी मुसलमान त्यांच्या ह्या मागणी मागेच गेले कारण भारतात सेक्युलर मुस्लिम अस्तित्वात जवळजवळ नव्हतेच परिणामी सरते शेवटी पाकिस्तान आणि बांगलादेश असे दोन मुस्लिम राष्ट्रे आपल्या देशातच हिंद भूमीवर उभी राहिली साहजिकच हिंदू धर्मांचे हिंदू संविधान पाळणारे स्वतंत्र राष्ट्र हिंदूंनी निर्माण केले पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने हिंदू राष्ट्राची स्वप्ने पाहायला सुरुवात केली आणि त्यातूनच जनसंघ नावाचा पक्ष निर्माण झाला आणि आज त्यातूनच भाजप हा पक्ष निर्माण झालेला दिसतो आणि तो सत्तेवरही आलेला आहे कुणी कितीही सांगितले तरी हा धार्मिक राष्ट्रवाद आहे त्याला सांस्कृतिक राष्ट्रवादाचे लेवल देण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु हे लेबल कितपत खरे हा एक फार मोठा प्रश्न आहे मुख्य म्हणजे हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात आहे की नाही अस्तित्वात होता की नाही असा प्रश्न अनेक इतिहासकारांनी अलीकडे विशेषता 1990 नंतर निर्माण केल्याने हिंदू राष्ट्र म्हणावे की सनातन धर्माच्या आधारे उभे राहणारे सनातन राष्ट्र म्हणावे असा प्रश्न खुद्द संघामध्येच आणि भाजपमध्येच निर्माण झालेला आहे अलीकडे काही पोस्टमध्ये हिंदू धर्म हा शब्द वापरण्याऐवजी सनातन धर्म हा शब्द वापरला जात आहे हा बदल सूक्ष्म आहे पण तो सातत्याने सादर केला जात आहे या मागचे कारण उघड आहे वेद असो की उपनिषदे असोत की ब्राह्मण ग्रंथ असो की स्मृतिग्रंथ असो की आरण्यग्रंथ असो की रामायण असो की महाभारत असो त्यातली भगवद्गीता असो की पुराणे असोत की वैष्णव चळवळीतील वैष्णव संत आणि त्यांचे लेखन असो त्यातील नामदेव असो की तुकाराम असो की तुलसीदास असो कुठल्याही लिखाणात कोणाच्याही लिखाणात कुठेही हिंदू नावाचा शब्द अस्तित्वात नाही साहजिकच हिंदू हा शब्द वापरावा की नाही याबद्दल अनेकांच्या मनात आता संशय निर्माण झालेला आहे त्या ऐवजी सनातन धर्म हा शब्द वापरावा असा आग्रह धरणारे लोक हळूहळू निर्माण होताना दिसतात यामुळे २१ व्या शतकातला भाजप नेमका काय भूमिका घेईल हे आता इंटरेस्टिंग असेल


यातील धार्मिक राष्ट्रवादाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की या राष्ट्रांनी संविधान स्वीकारावे की धार्मिक ग्रंथ स्वीकारावा कारण विज्ञान तर आलेले आहे तंत्रज्ञान तर आलेले आहे आणि त्यांचा उल्लेख धर्मग्रंथात नाहीये तर त्या संदर्भातल्या कायद्यांचे काय करायचे हे काही या धार्मिक लोकांना कळत नाहीये. बरं एरवी धार्मिक असणाऱ्या या लोकांना प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मोबाईल वापरायचा असतो कंप्यूटर वापरायचा असतो सर्व विज्ञानाचे फायदे घ्यायचे असतात ईश्वर आपणाला बरे करेल हा विश्वास ठेवण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार करायचे असतात त्या वेळेला मात्र धर्माची त्यांना गरज भासत नाही हॉस्पिटलातच त्यांना बरे व्हायचे असते डॉक्टरांच्या कडून त्यांना बरे व्हायचे असते मात्र श्रेय मात्र देवाला द्यायचे असते साहजिकच बहुतेक धार्मिक राष्ट्रवादी लोकांना धर्माच्या आधारे संविधान निर्माण करणे सध्या गरजेचे वाटत असले तरी प्रत्यक्ष व्यवहाराचे काय करायचे हा प्रश्न काही सुटता सुटत नाही अगदी इस्लामिक किंवा हिंदू राजवटीचा कट्टर पुरस्कार करणारे लोक सुद्धा वेळप्रसंगी अमेरिकेत आणि युरोपमध्ये जाऊन उपचार घेतात हा अनुभव आहे साहजिकच मग एकदा संविधान नावाची गोष्ट स्वीकारली की मग धार्मिक ग्रंथाचे प्रामाण्य किती मानायचे आणि व्यवहाराची गरज कशी भागवायची असा मूलभूत प्रश्न निर्माण होतो धर्माने प्रत्येक व्यक्तीला दिलेले अधिकार नेमके काय आहेत त्यांची रेंज काय आहे आणि ही रेंज आपण आता नवीन संविधानाच्या आधारे कशी ठरवायची हा एक फार मोठा पेचप्रसंग धार्मिक राष्ट्रवादापुढे उभा आहे अगदी इस्लामिक राष्ट्रवादी लोकांच्या पुढेही संविधानाचा हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो


हा मोठा विरोधाभासच म्हटला पाहिजे की ज्या धार्मिक व्यवस्थेपासून प्रामुख्याने स्वातंत्र्य मिळवले गेले श्रद्धेपासून स्वातंत्र्य मिळवले गेले आणि धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या राजवटींच्यापासून स्वातंत्र्य मिळवले गेले तिथेच म्हणजे धर्मात धार्मिक राजवटीत धार्मिक पेज प्रसंगात श्रद्धेच्या पेचप्रसंगात आपण २१ व्या शतकात पोहोचलेलो आहोत म्हणजे स्वातंत्र्याचा प्रवास धर्माविरुद्ध सुरू होऊन पुन्हा धर्मातच विलीन होतो की काय अशी शंका येण्याइतपत सध्या आजूबाजूला घटना घडतात अशावेळी स्वातंत्र्याचा नेमका कसा विचार करायचा हा फार मोठा प्रश्न आहे


जगातला कुठलाही काळ हा कायमच कुठल्या ना कुठल्या प्रकारची गुलामगिरी निर्माण करत होता. श्रद्धांचां काळ हा इतर टोळ्यातल्या लोकांना गुलाम बनवत होता तर धर्मांचा काळ हा इतर राज्यातल्या इतर धर्माच्या लोकांना गुलाम बनवत होता पुढे पुरोगामी काळ आल्यानंतर इतर राष्ट्रातल्या लोकांना गुलाम बनवण्याचा पुरोगामी काळ सुरू झाला आणि या पुरोगामी वादाने भारतातल्या अनेक लोकांना गुलाम बनवून चक्क विकले सुद्धा आहे साम्राज्यवाद हा पुरोगामी गुलामगिरीची सुरुवात होता भारतीय स्वातंत्र्य हे ह्या साम्राज्यवादाविरोधात पुरोगामी गुलामगिरी विरोधात निर्माण झालेले आंदोलन होते चळवळ होती आणि सुदेवाने ते पुरोगामी पण साम्राज्यवादी विरोधकांच्या विरोधात होते म्हणूनच अहिंसेने यशस्वी होऊ शकले अन्यथा गांधीजींना कधीही यश मिळणे शक्य नसते गांधीजींच्या काळात असलेली गुलामगिरी ही पुरोगामी गुलामगिरी होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे ती जर श्रद्धेच्या काळातली गुलामगिरी असती किंवा धर्माच्या काळातली गुलामगिरी असती तर कधीही अहिंसक आंदोलने यशस्वी झाली नसती इस्लामिक गुलामगिरी विरुद्ध लढताना महात्मा गांधी कधीही कामाला आले नसते तिथे शिवाजी महाराजच लागतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या बरोबर अनेक समकालीन मुसलमान विशेषतः हिंदवी मुसलमान स्वातंत्र्याच्या बाजूने स्वराज्याच्या बाजूने उभे राहिले त्याप्रमाणेच पुरोगामी काळात देखील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या बाजूने इंग्लंड मधले अनेक पुरोगामी आणि बर्ट्रांड रसेल सारखे अनेकआधुनिक विचारवंत उभे राहिले हा संघर्ष विचारांचा संघर्ष होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे आज काही हिंदुत्ववादी महात्मा गांधींचे श्रेय काढून घेण्याचे प्रयत्न करत आहेत हे प्रयत्न अत्यंत चुकीचे आणि हिंदुत्ववादाला हानिकारक आहेत हे आता ठणकावून सांगणे गरजेचे आहे तुम्ही आज सत्तेवर आहात ते महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीमुळे सत्तेवर आहात याची खात्री बाळगा अन्यथा ब्राह्मणांना सत्ता देणे हे बहुसंख्यांकांना शक्यच नाही हे फक्त भारतीय लोकशाहीमुळे शक्य झालेले आहे तुमचा सर्व प्रचार आणि प्रसार हा पुरोगामी व्यवस्थेने आणि आधुनिक सरंचनेने दिलेल्या दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे सिद्ध झालेला आहे १५ ऑगस्ट हा ब्रिटिश पुरोगामी गुलामगिरीविरुद्ध भारतीय पुरोगामी स्वातंत्र्य चळवळीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे हे प्रतीक आपण सर्वांनी जपलेच पाहिजे आणि त्याचा उत्सव ही दणक्यात साजरा केलाच पाहिजे इंग्रजांचे राज्य ही एक पुरोगामी गुलामगिरी दासव्यवस्था होती राजकीय व्यवस्था होती आर्थिक व्यवस्था होती त्यात भारतीयांचे कमालीचे शोषण होत होते या शोषणापासून या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळवण्यात आले यानंतर आपण स्वतःची स्वायत्त्य संरचना उभी करायला हवी होती जिचा आधार आधुनिक असेल पण दुर्दैवाने हे घडले नाही संविधान निर्माण करताना आपण कळत नकळत पुरोगामी वादामध्ये जास्त अडकलो कारण आपला पुरोगामी वादाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नव्हता इंग्रजांच्या राजवटीने तो अपूर्ण तर ठेवलाच पण तो आतून पोखरला जर भारत स्वतंत्र असता तर कदाचित भारताने हा पुरोगामी प्रोजेक्ट आपल्या जीवावर पूर्ण केला असता एवढे काम निश्चितपणे बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराजआणि पहिला बाजीराव यांनी केले होते दुर्दैवाने या कामाला पुढे जो आकार यायला हवा होता तो ब्राह्मणवादाने कोसळला आणि पुन्हा एकदा पुरातन धार्मिक व्यवस्था भारतावर लादली गेली आणि साम्राज्यवादी पुरोगामी ब्रिटिशांना भारतात साम्राज्य करायला त्याने मोकळी वाट निर्माण केली


१९६० नंतर मात्र प्रत्यक्षात जे स्वातंत्र्य मिळाले ते फक्त भौगोलिक स्वातंत्र्य होते की काय असा प्रश्न निर्माण झाला कारण भौगोलिक पातळीवर आपण स्वतंत्र झालो परंतु वैचारिक पातळीवर आपण कितपत स्वतंत्र झालो असा प्रश्न निर्माण झाला युरोपियन मेट्यानॅरेटीवपासुन आपण किती स्वतंत्र झालो असा प्रश्न निर्माण झाला पण दुर्दैवाने उत्तर म्हणून नवीन व्यवस्था निर्माण करण्याऐवजी सरचना निर्माण करण्याऐवजी आपण परंपरेकडे वळलो आणि त्यातूनच उत्तर आधुनिक वाद आणि देशीवाद निर्माण झाला हे परंपरेकडे वळणे सगळ्या तिसऱ्या जगातल्या देशांना महागात पडलेले दिसते वास्तविक परंपरे कडे आपण वळलो होतो त्यामागे स्वतःची स्वतंत्र संरचना उभे करणे हा हेतू होता पण दुर्दैवाने स्वतंत्र रचना उभे करणे राहिले बाजूलाच आपण परंपरेचेच गुलाम बनलो आणि आज या परंपरेमुळेच सगळीकडे परंपरा बोकाळलेली दिसते प्रश्न असा आहे की या बोकाळलेल्या परंपरेच्या मागे कॅटवॉक करत जायचे की स्वतःची स्वायत्त कॅट फॅमिली निर्माण करायची ? 


चौथी नवता म्हणजे स्वतःची स्वतंत्र स्वायत्त कॅट फॅमिली निर्माण करणे किंवा एलिफंट फॅमिली निर्माण करणे होय मी स्वतः स्वतंत्र आणि स्वायत्त असलेल्या एलिफंट फॅमिली च्या मागे उभा आहे तिच्यावरच आरुढ आहे तुम्ही काय करायचे हे तुम्ही ठरवा


श्रीधर तिळवे नाईक 

स्वातंत्र्य दिन आला की आपण एका विशिष्ट संदर्भात बोलतोय याची जाणीव लोक व्हायला लागते स्वातंत्र्य म्हणजेच फ्रीडम ही एक पुरोगामी कल्पना आहे धार्मिक व्यवस्थेपासून प्रामुख्याने स्वातंत्र्य मिळवले गेले पासून स्वातंत्र्य मिळवले गेले श्रद्धेपासून स्वातंत्र्य मिळवले गेले आणि धर्माच्या आधारे निर्माण झालेल्या राजवटींच्या पासून स्वातंत्र्य मिळवले गेले भारताबाबत इंग्रजांच्या पासून स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांचे राज्य ही एक व्यवस्था होती राजकीय व्यवस्था होती आर्थिक व्यवस्था होत या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळवण्यात आले प्रत्यक्षात ते मिळाले की नाही हाय फार मोठा प्रश्न आहे 


या शब्दाचे अनेकदा गल्लत केली जाते निसर्गावर आपण अवलंबून असतो किमान आपले जगणे परावलंबी असते आणि आपल्या बालपणात तर ती खूपच परावलंबी असते मग आपण हळूहळू स्वावलंबी होऊन जात मात्र संपूर्ण स्वावलंबी होणे हे शक्य नसते कारण आपण निसर्गावर अवलंबून असतं त्यामुळेच आधी मी युगात परावलंबन आणि स्वावलंबन या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत प्रत्येक माणूस अधिकाधिक स्वावलंबन कमवत होता स्वतःचं घर स्वतःच बांधणे स्वतःच जेवण स्वतः बनवणे स्वतःची शिकार स्वतः करणे हे तो सहज करत बस त्याच्याजवळ अनेक स्किल्स होती तो ती शिकत होता हळूहळू काळानुसार आपण आणि स्किल बनत गेलो व आकुशल बनत गेलो पुढे टोळ्या सुरू झाल्या आणि आपण कैद नावाचे एक संकल्पना शोधली गुलामगिरी नावाचे एक संकल्पना शोधली आपण दुसऱ्या डोळ्यातल्या बायकांना पळवून आणायला लागलो आणि त्यांना आपली गुलाम बनवू लागलो. दुसऱ्या टोळ्यातून आणलेली पराभूत झालेली पळवून आणलेली माणसे दास म्हणून काम करू लागले श्रद्धा युगाचे गुलामगिरी हे फार मोठे देणे आहे आणि त्यातूनच पुढे गुलामगिरी अथवा कैद आणि सुटका या संकल्पना जन्मल्या ख्रिश्चन धर्म कधीही गुलामगिरीतून मोकळी झाले नाहीत जू ख्रिश्चन आणि इस्लाम हे तिन्ही धर्म गुलामगिरीला मान्यता देतात हे अत्यंत आश्चर्यकारक आहे आपल्याकडे वैदिक धर्मात गुलामगिरी मान्य होते जास्त मान्य होते आणि त्यामुळेच गौतम बुद्धाने सुद्धा गुलामगिरी मान्य केलेली दिसते जे आपल्याला आता शॉकिंग वाटतं पण त्यासाठी नैसर्गिकच वाटत होते   


मानवी आयुष्यात यानंतरचे युग आले ते मोक्षाचे युग होते भगवान शंकराने या सगळ्याचा विचार पाश आणि मोक्ष अशा अंगाने केलं हा विचार अधिक खोलवर देणार होता भगवान शंकर थेट आसपाशी पोहोचले आसच्या दोन डायरेक्शन असतात पहिले असोशी आणि दुसरी आसक्ती हे असती भूक प्रश्न आणि नेकड अशा तीन स्वरूपात वावरत असते नेकड म्हणजे श्वासाचे अस ती श्वासाची असती आसक्ती या अस या आसक्तीमुळे पाच निर्माण होतात आणि आपण पशुवत वागायला लागतो 


यानंतर आलेल्या धर्मयुगात मात्र साल्वेशन नावाची संकल्पना आली मुक्ती नावाची संकल्पना आली अनेकांचा असा ब्रह्म आहे की मोक्ष म्हणजे मुक्ती पण प्रत्यक्षामध्ये मोक्षासाठी जीवन मुक्ती असा शब्द वापरण्यात येतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे धर्म व्यवस्थित माणसावर अनेक बंधने आणण्यात आली या बदनांच्या पासून मुक्ती मिळवणे गरजेचे वाटू लागले 


पुढे विज्ञान युगाले आणि विज्ञान युगात खऱ्या अर्थाने व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला विशेषता धर्म व्यवस्था ही पहिली व्यवस्था म्हणून पाहण्यात आली आणि साहजिकच इथेच या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य ही संकल्पना आली पुढे धर्म व्यवस्थेबरोबरच राजकीय व्यवस्था ही तुल्यबळ असते हे लक्षात आले आणि राजकीय व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळवणे हे गरजेचे बनले भारतीय स्वातंत्र्य दिन हा या स्वातंत्र्याच्या संदर्भात येतो आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले पण वैचारिक स्वातंत्र्य मिळाले का की इंग्रजांना दिलेले फॉर्मुले आपण अवलंबत राहिलो हा प्रश्न स्वातंत्र्यानंतर निर्माण झाला आणि त्यातूनच पोस्ट कॉलनी आली जम नावाची चळवळ उभी राहील आजही पोस्ट कळवण्यात किंवा देशीवाद हे नेमके काय करतात असा प्रश्न निर्माण होतो या लोकांनी पुन्हा एकदा परंपरा परत आणली फर्स्ट कलन्यालिजम हा कल इफेक्टवर चर्चा करतो कलोनियल परिणामावर चर्चा करतो मात्र तो परंपरा पुन्हा आणणे ही गोष्ट करत नाही मात्र त्याच्या कार्यामध्ये आपोआपच विस्मृतीत गेलेल्या परंपरा पुन्हा आणणे हे केले जाते देशीवादी त्यानंतरची अवस्था आहे प्राप्त झालेल्या परंपरेत तुम्ही उभे राहतात औद्योगिक कालखंडात परिस्थिती पुन्हा बदलली आपण सगळे व्यवस्थांच्या ऐवजी रचनांच्या म्हणजे स्ट्रक्चर अशा ताब्यात गेलो स्ट्रक्चर्स आणि व्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहेत स्ट्रक्चर ऑफ असून मोकळीक मिळवता येते का? हा एक फार मोठा प्रश्न आहे भारताला जितकी स्वातंत्र्य देण्याची गरज आहे तितकीच मोकळीक दिनाची गरज आहे आणि अलीकडे आले नेटवर्क मध्ये आपण प्रोग्राम ला होतो स्वतःच प्रोग्राम बनतो आणि हितेच डी प्रोग्रामिंगची गरज भासते डी प्रोग्रामिंग ची गरज भासते आपल्याला प्रोग्राम बनवण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्था धडपडत असतात मग या व्यवस्था भाजपाच्या असो किंवा समाजवादाचे असत या सगळ्यांच्या प्रोग्राम पासून सुटका करून घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी डी प्रोग्रामिंग अत्यंत स्वातंत्र्याच्या पुढच्या अवस्था आता गरजेचे आहेत आत्ताची ही व्यवस्था तुम्हाला पूर्णपणे जखडून टाकते ती तुमचे फोनवरचे बोलणे वाढवते आणि प्रत्यक्ष बोलणे कमी करते प्रत्यक्ष बोलणे सुद्धा कॅमेराच्या कंट्रोलमध्ये येईल का यासाठी धडपड चाललीच आहे तिचं सर्वात मोठे हाती कला आहे या कलांच्या आधारे ती जाहिरात कला निर्माण करते आणि जाहिरातींच्याद्वारे तुमचे सगळे चॉईसेस फिक्स करते किमान तशी धडपड करते चिन्हसृष्टीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही स्पॉन्सर गेलेला प्रोग्राम बनते आणि तुम्ही फक्त होत राहतात स्पॉन्सड बाय होम एवढाच फक्त प्रश्न बनतो आता असं स्पॉन्सरींग होत असेल तर साहजिकच डिस्पॉन्सरिंग तुम्हाला शिकावे लागत आणि हे डीप रेस्पोंसलिंग शिकणे सोपे नसते कारण रिस्पॉन्स देण्याची तुम्हाला इतकी सवय लागलेली असते की ते रिस्पॉन्स सुद्धा तुम्ही त्यांच्या मर्जीने द्यायला लागतात एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रचंड आहे असे तुम्हाला वाटत राहते आणि दुसऱ्या बाजूला तुमचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याच प्रोग्रामिंगच्या कंट्रोल मध्ये कसे आणता येईल तेही पाहिले जातात म्हणूनच आजच्या काळात जितकी स्वातंत्र्याची लढाई महत्त्वाची ठरते तितकी कदाचित कुठल्याच काळात ती ठरत नव्हती सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे उत्तर आधुनिकतेत पुन्हा एकदा धर्माचे झालेल्या आगमन आज काल धर्म पुन्हा एकदा तुम्हाला संस्कार द्यायला लागलेला आहे संस्कार स्पॉन्सर करायला लागलेला आहे तुम्हाला धर्माचे पुन्हा एकदा गुलाम बनवतात अशावेळी अत्यंत सावध राहून निवड करावी लागते 


प्रोग्राम ने सर्वात मोठी स्पॉन्सर केलेली गोष्ट तुमची आयडेंटिटी आहे एक काळ असा होता की आयडेंटिटी ही स्वायत्त होती परंतु चिन्हसृष्टीमध्ये आयडेंटिटी ही स्वायत्त राहिली नाही ती प्रोग्रामिंगच्या प्रोग्राम खेळांच्या वेगवेगळ्या खेळींची केवळ एक अविष्कार बनले. अशावेळी आपण कोण मी कोण हे प्रश्न या प्रोग्रामिंगने ताब्यात घेतलेले दिसतात प्रोग्रामच सांगतो की तू अमुक धर्माचा किंवा तो अमुक जातीचा आणि तो असं वागलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. अशावेळी आपल्या आयडेंटिटी फेक तर राहिलेली नाही ना हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे कारण तुमचे आयडेंटिटी फेक करण्यामध्ये सगळेच इंटरेस्टेड आहेत यातूनच मग तुम्हाला टॉप नंबर सागराहक बनवणे सन्माननीय मतदार बनवणे संभाजी राजांच्या प्रमाणे धर्म रक्षक बनवणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात त्याबाबत सावध राहण्याची जबाबदारी तुमच्यावर पडते तुम्ही सावध राहिला नाही तर स्पॉन्सर्ड आयडेंटिटीचा अजगर तुम्हाला खेळायला बसलेलाच आहे तो वाटच पाहतोय तुम्ही कधी त्याच्या प्रोग्राम च्या झाडावर चढत आहे किंवा झाडाच्या खाली येता तेव्हा बघा स्वतःचे आयडेंटिटी चेक करा आणि ते आयडेंटिटी झालेली नाही ना हेही बघा अनेकदा आपणाला पुरोगामी लोक त्यांचे आयडेंटिटी लागतात हे सुद्धा कळत नाही तुम्ही जेव्हा नव बौद्धांच्या घरी जन्मता तेव्हा नव बौद्ध होणे केले गेलेले असते पण तुम्हाला हे कळत नाही तुम्हाला वाटते की 9 बौद्ध झाले म्हणजे मी क्रांतिकारक झाले पण प्रत्यक्षात तुम्ही फक्त स्पॉन्सर्ट झालेल्या असतात धर्म नेहमी घरातून स्पॉन्सड होतास जो घरातला धर्मापासून बाकीच्या धर्मांच्या कडे ओपन माइंडेड ने बनतो तो खरा माणूस आपल्यापुढे अनेकदा इस्लाम असा आहे इस्लाम तसा आहे अशी इस्लामच्या आयडेंटिटी स्पॉन्सिड केली जाते पुरोगामी लोक स्पॉन्सर करतात प्रत्यक्षात ती खरी आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आपल्यावर असते थोडक्यात काय बाळस होऊ नका प्रोग्राम ला होऊ नका आयडेंटिफाइड होऊ नका मोकळे राहा स्वतंत्र राहा किंबहुना स्वतंत्र याचा अर्थच स्वतःचे तंत्र होय आणि हाही शब्द साहेबांनी दिलेले आहे स्वातंत्र्य हे एक सामूहिक घटना असते पण स्वतंत्रता ही तुम्ही मिळवलेली घटनास्थ स्वतंत्रता स्वतःला मिळवावी लागते जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या कम्युनिटीला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही तोपर्यंत मोकळीक प्राप्त होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी मुक्ती नाही तेव्हा सर्वात प्रथम स्वतंत्र व्हा स्वतंत्र शोधा स्वतःचे तंत्र शोधणे आणि त्यासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य असणे हे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र होण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र ढुंढण्यासाठी शोधण्यासाठी दिल्या गेलेल्या अवकाश आणि काळ होय

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना