Aesthetics
सौंदर्यशास्त्र विनायक श्रीधर तिळवे नाईक
कला अनुभव आणि कलेचे उद्देश
श्रीधर तिळवे नाईक
कलेचे तीन मुख्य उद्देश
१ अनुभवाची अभिव्यक्ती
२ अनुभव समृद्धी
३ अनुभव वृद्धी
हे आहेत
अनेकदा आपल्याला आयुष्यात अनुभव येत असतात परंतु आपल्याकडे त्यांना व्यक्त करायला लागणारी अभिव्यक्तीची ताकद नसते त्यामुळे अनेकदा असे होते की अनुभव तर आलेला असतो परंतु आपल्याला अभिव्यक्ती करता न आल्याने जेव्हा कोणी कलावंत अशी अभिव्यक्ती करतो तेव्हा आपण म्हणतो की अरे माझ्या मनातलेच तर तू बोललास आणि लिहिलास याला मी अनुभव अभिव्यक्ती म्हणतो स्वतःच्याच अनुभवाची अभिव्यक्ती झालेली आहे असे वाटणे हे हिते वारंवार घडलेले आहे कोसला या कादंबरीमध्ये हॉस्टेलचे अनुभव हा फार मोठा भाग आहे अरे हे तर मी अनुभवलेच होते पण नेमाडे यांनी ते अनुभव भाषेत मस्त पकडले अशी अनेकांची प्रतिक्रिया असते
अनुभव समृद्धी मध्ये मात्र आपल्याला असलेला अनुभव तो कडा असतो कलावंतामुळे आपल्याला त्या अनुभवाचे अनेक पदर उलगडत जातात जे आपण अनुभव घेताना अनुभवलेले नसतात साहजिकच इथे अनुभव आपला असला तरी लेखकाचा अनुभव आपला अनुभव समृद्ध करतो याला मी अनुभव समृद्धी म्हणतो स्त्री पुरुष संबंध अनेकदा आपल्याला अनुभवायला येतात परंतु कवी लोक आपल्या कवितांच्यातून त्या अनुभवाचे अनेक पदर मांडत असतात आणि अचानक आपल्याला कळते की अरे आपल्या या अनुभवाला हे पदर होते परंतु ते आपल्याला नीट दिसले नाहीत
कलेकडे वळणाचे वळण्याचे सर्वात मोठे कारण अनेकदा अनुभव वृद्धी असते म्हणजे होते असे की आपल्याला अजिबात न आलेले अनुभव कलेमुळे अनुभवता येतात आणि साहजिकच आपल्या अनुभवांचे अनुभव विश्वाची वृद्धी होते याला मी अनुभव वृद्धी म्हणतो
आणि चौथे कल्प अनुभव वृद्धी म्हणजे असे की आपण सुद्धा कल्पना करत असतो परंतु आपल्याला सुद्धा न सुचलेली अशी कल्पना आणि त्या कल्पनेच्या आधारे अनुभव कलावंत निर्माण करत असतात हे अनेकदा काल्पनिक असतात परंतु ते फार वेगळ्या विश्वात घेऊन जातात त्यामुळे आपली कल्पना वृध्दी होते आणि कल्प म्हणजेच काल्पनिक अनुभवांची ही समृद्धी होते
कलेच्या क्षेत्रातील ह्या फार बेसिक गोष्टी आहेत दुर्देवाने अनेकांना त्या कळत नाही आणि मग फालतूचे वाद निर्माण केले जातात आणि होतात आपल्या अनुभव विश्वाच्या बाहेर अनेक अनुभव असतात हेच जर मान्य नसेल आणि मला येतात तेवढेच अनुभव फक्त खरे असा जर कोणाचा आग्रह असेल तर त्या माणसाला रसिक म्हणता येणार नाही रसिक असण्याचा अर्थ मी नवीन अनुभवांच्यासाठी ओपन आहे हे स्वीकारणारा माणूस होय जो अनुभवांच्यासाठी ओपन नसतो तो रसिक असत नाही आता रसिकांचे पाच प्रकार पडू शकतात म्हणजे अभिव्यक्तीवादी रसिक , अनुभवसमृद्धीवादी रसिक, अनुभव वृध्दीवादी रसिक, कल्प अनुभव वृध्दीवादी रसिक , सर्व अनुभव स्वीकारवादी रसिक आणि शेवटचा बंदिस्त रसिक जो कलावंतांच्या अनुभवांच्या संदर्भात वेगवेगळ्या बाबतीत सेंसर शिप आणत असतो कलावंतांनी कोणते अनुभव व्यक्त करावेत आणि कोणते अनुभव व्यक्त करू नयेत या संदर्भात क** निकष लागू करतो त्याला बंदिस्त रसिक म्हणतात
सुदाम राठोड यांच्या पुढील अनुभवावरून सध्या वाद चाललाय म्हणून लिहितो आहे
आमच्या वर्गात आमच्याच तांड्याजवळच्या एका वाडीतली एक गरीब, सावळी अन हडकुळीशी पोरगी होती. तिच्यावर कुणी जीवतोडून लाईन मारावी अशी परिस्थिती नव्हती. तरीपण ती कोणत्याही पोराला दादा म्हणूनच हाक मारायची. दर राखी पौर्णिमेला वर्गातल्या सगळ्या पोरांना राखी बांधायची. तिचा बाप ऊसतोड कामगारांचा मुकादम होता. त्यामुळं पैसा मुबलक होता. शिवाय तिच्या राखी बांधण्याचं पोरांना पण फार काही वाईट वाटून घेण्याचं कारण नव्हतं. कारण ती इतर पोरींसारखी ओवाळणी सुद्धा घ्यायची नाही.
तर आमच्या पायी पायी शाळेत जाणाऱ्या टोळक्यातला एक पोरगा तिला दीदी म्हणायचा. दहावीचं वर्षे येता येता ह्या दादा दीदिंचं वह्या पुस्तकांचं देणं घेणं वाढत गेलं. तर कोणेएक्या शनिवारी शाळा सुटल्यावर हे दादा अन दीदी दोघेच पायवाटेने परत येत होते. वाटेत बाजरीचं दाट शेत लागलं. रस्ता घनदाट निर्मनुष्य. मागे पुढे कुणीच नाही. तसं दादाचं दादात्व गळून पडलं अन त्याने थेट दीदीचा हात धरला अन बाजरीत ओढू लागला. तशी दीदी बावरली. हात सोडवत म्हणाली, अरे दादा असं काय करतोस? मी तर तुला भाऊ मानते ना. तुला राखी पण बांधली. तर दादा म्हणाला, दादा गेला फोद्यात. आज दादा फिदा काय नाय आधी बाजरीत चल. शेवटी ती दादा असण्याच्या अडचणीवरून 'कुणी तरी बघेल ना' या अडचणीपर्यंत येऊन ठेपल्यावर त्याला फार बळजबरी करावी लागली नाही.
विशेष म्हणजे त्यानंतरही ते एकमेकांना दादा दीदीच म्हणत असत 😄
Sudam Rathod
वास्तविक येथे सुदामने जे जसे घडले आहे तसे मांडले आहे आता आपल्या समाजात हे घडतच नाही असे जर कोणी म्हणत असेल तर तो एका अर्थाने बंदिस्त रसिक आहे असे बंदिस्त रसिक कलेच्या क्षेत्रात अस्तित्वात असतात आणि त्यांच्यामुळे सेन्सॉर्शिप उगवत असतात कलेने अमुक प्रकारचे अनुभव मांडावेत आणि अमुक प्रकारचे अनुभव मांडू नयेत अशी बंदिस्त रसिकांची धारणा असते अनेकदा काही अनुभव तुमच्या नैतिकतेला आव्हान देत असतात पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कलावंत त्याबाबतीत जर का फक्त अनुभव मांडत असेल तर त्यांच्याकडे आपण अनुभव म्हणूनच बघितले पाहिजे शक्य आहे की त्या अनुभवामुळे आपले अनुभव वृद्धी होईल किंवा त्या अनुभवामुळे कदाचित आपल्याला शॉक ही बसेल दलित साहित्याने सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शॉक दिलेले आहेत पण प्रत्यक्षामध्ये हे अनुभव अस्तित्वात होते उपस्थित होते परंतु मराठी साहित्यामध्ये आणि मराठी रसिकतेमध्ये ते एका विशिष्ट बंदिस्त रसिकत्वामध्ये अडकल्याने हे अनुभव विश्व पेलण्याची ताकद नव्हती त्यामुळेच तिला ज्याला कल्चरल शॉक म्हणतात तसा शॉक बसला खरे साहित्य अनेकदा असा शॉक देते ते तुम्हाला संपूर्ण जीवनाबद्दल विचार करायला लावते या जगामध्ये असेही काही चाललेले असते याचा प्रत्यय त्या शॉक देणारा अनुभव ह्या अनुभवांच्या मुळे येत असतो कुठल्याही साहित्याची खरी थोरवी तेव्हाच वाढत जाते जेव्हा असे कल्चरल शॉक सहन करण्याची तिची क्षमता वाढत जाते अन्यथा त्या संस्कृतीमध्ये साहित्य संस्कृती आणि कला संस्कृती यांचा गळा घोटला जातो त्यामुळेच ही व्यवस्था सतत खोली ठेवणे आवश्यक आहे कारण समाजात काय चाललय कुठे कुठे काय काय घडतय हे आपणाला कळण्याचा तोच एक मार्ग आहे जर आपण न्यूज न मनाई करत नसू तर मग लेखकांच्या अनुभवांना मनाई का करावी ? सेंसर शिवी स्वतः लेखक सुद्धा लाजून घेत असतात उदाहरणार्थ भालचंद्र नेमाडे अनेकदा त्यांची स्वतःची सेन्सरशिप स्वतःवर लादून घेत असतात कोसला मध्ये ते जसे मोकाट होते तसे ते पुढे राहिलेले दिसत नाहीत आणि इथूनच मग अनेक प्रश्न लेखकाच्या अंगाने निर्माण होतात यातला सर्वात मोठा प्रश्न नेहमीच दोन्ही बाजूंनी असतो तो नैतिकतेचा असतो
म्हणजे हा प्रश्न कसा असतो लेखकाने नैतिकता माना विकी न मानावी म्हणजे असे की जेव्हा एखादी घटना वाईट असते शोषणकारी यंत्रणेची कामगिरी असते उदाहरणार्थ सती किंवा बलात्कार तेव्हा आपणाला त्या घटनेचे चित्रण करताना किंवा ती घटना सादर करताना तिची सगळी निगेटिव्हिटी दाखवता आली पाहिजे जर ती तुम्ही दाखवत नसाल तर तुमच्या नैतिकतेबद्दल शंका येणारच लेखकाची संवेदनशीलता इतकी तीव्र असलीच पाहिजे समाजामध्ये अनेक प्रकारचे शोषण चाललेले असते आणि ह्या शोषणांचा अनुभव जर कोणी सादर करत असेल तर त्याने ते शोषण सादर करताना त्यामागे असलेली व्यवस्था नीट समजावून मांडली पाहिजे शोषणामागे असलेली व्यवस्था मांडायची नाही आणि फक्त अनुभव मांडायचा याला फार अर्थ नसतो आता हे सर्व कलात्मकतेने कसे करायचे हा खरा कस असतो आणि जर का लेखकाने या संदर्भात व्यवस्थेची चिकित्सा केली नसेल तर मग समीक्षकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी या अंगाने साहित्यातल्या अनुभवाच्या अंगाने त्या व्यवस्थांची चर्चा करावी म्हणजे समाजशास्त्रज्ञाने अशी साहित्यातल्या कलेतल्या अनुभवाची सामाजिक चिकित्सा करणे अपेक्षित आहे किंवा अर्थशास्त्रज्ञाने त्या अनुभवातील आर्थिक शोषणाविषयी बोलणे आवश्यक आहे कधी कधी असेही होते की लेखकालाच मूळात शोषण व्यवस्था नीट कळलेली नसते त्याच्याजवळ फक्त अनुभव असतात अशावेळी त्याचा अनुभव येऊ देणे महत्त्वाचे असते आणि मग त्या अनुभवाची चिकित्सा तज्ञ लोकांनी करावी
भारतामध्ये प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या व्यवस्थेमध्येच किंवा रचनेमध्ये काम करत असतो मग ती व्यवस्था संरचना वैद्यकीय असेल किंवा शैक्षणिक असेल अनेक लेखक आपल्या स्वतःच्या व्यवस्थांच्याकडे किंवा संरचनांच्याकडे पाठ फिरवून बसलेले असतात वास्तविक तुम्ही ज्या व्यवस्थांच्यात संरचनांच्या मध्ये काम करत असता तिथले सर्व प्रकारचे अनुभव तुम्हाला पेलता आले तर ते उत्तम असते मला भालचंद्र नेमाडे यांच्या विषयी जो आदर आहे तो यामुळे आहे त्यांचे स्वतःचे काम करण्याचे जे क्षेत्र आहे ते शैक्षणिक क्षेत्र आहे आणि त्यांनी त्या शैक्षणिक क्षेत्रातला संपूर्ण अनुभव त्यांच्या कादंबऱ्यांच्या मध्ये पेललेला आपल्याला दिसतो शिक्षणाच्या क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या लोकांना या अनुभवांची कल्पना असेलच असे नाही त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र कसे चालत होते हे नेमाडे यांच्या सर्व कादंबऱ्या त्यातील अनुभवांच्याद्वारे आपल्याला दाखवतात कोसलामध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था येते तर नंतरच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये प्राध्यापक म्हणून येणारे अनुभव आहेत हिंदूच्या दुसऱ्या तिसऱ्या भागांमध्ये शैक्षणिक व्यवस्थेच्या व्यवस्थापना संदर्भात काही नेमाडे बोलणार आहेत का हा खरा प्रश्न आहे नेमाडे आर्थिक चिकित्सा टाळतात आणि त्यामुळेच त्यांच्या कादंबऱ्यांच्या अनुभवाला मर्यादा येते आणि याचे सर्वात मोठे कारण नेमाडे स्वतः अशा शैक्षणिक संस्थांच्या निर्माण व्यवस्थेत आणि अर्थव्यवस्थेत सामील नसावेत नंतर ते कुलगुरू झाले तेव्हा त्यांना या व्यवस्थेचा अंदाज आला असावा त्यामुळे ते पुढे हिंदू २३४ मध्ये काय लिहितील याविषयी मला भयंकर उत्सुकता आहे
भारतामध्ये धर्म व्यवस्था आणि मोक्ष व्यवस्था प्रचंड प्रमाणामध्ये काम करतात मी स्वतः धर्म व्यवस्था संरचना मोक्ष व्यवस्था संरचना चित्रपट टिव्ही व्यवस्था संरचना दुकानव्यवस्था संरचना अशा अनेक व्यवस्थांच्या मध्ये आणि संरचनामध्ये काम करतो म्हणून या व्यवस्थांच्या संरचनांच्या अंगाने प्रचंड कविता आणि कादंबऱ्या येत असतात प्रत्येक लेखकाने जर का स्वतःची व्यवस्था स्वतःच्या कार्यरत संरचना पहिल्यांदा आपल्या लेखनामध्ये आणली आणल्या तर संपूर्ण साहित्याला त्याचा प्रचंड फायदा होण्याचा संभव असतो अनेक प्राध्यापकांची आजकाल खरी गोची जर काय झाली असेल तर ती म्हणजे नेमाडे यांनी त्यांच्या शैक्षणिक व्यवस्थेची अनेक अनुभवांच्या अंगाने आणि घटनांच्या अंगाने केलेली अनुभव समृद्ध मांडणी होय शैक्षणिक क्षेत्रांबद्दल नेमाडे यांच्या पुढे जाऊन काही लिहिता येणे शक्य आहे का हा सर्वच प्राध्यापकीय लेखकांच्या पुढे ठाकलेला खरा प्रश्न आहे हा प्रश्न काही प्रमाणामध्ये रंगनाथ पाठारे आणि राजन गवस यांनीच नीट सोडवलेला दिसतो संजय भास्कर जोशी यांनी कार्पोरेट नावाची कादंबरी लिहिलीं आहे तिथे सुद्धा एक व्यवस्था येते मराठीमध्ये अशा व्यवस्थांच्या अंगाने आलेल्या खूप कादंबऱ्या आहेत किंबहुना कादंबरी म्हणजे संपूर्ण व्यवस्था पेलणारी सिस्टीम असते
मराठीतल्या सर्वात लोकप्रिय संस्था ह्या गृहसंस्था आणि लग्न संस्था आहेत साहजिकच संसार कथा मराठी मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लिहिल्या जातात याचे कारण त्या प्रत्येक लेखकाच्या अनुभवाच्या भाग असतात हीच गोष्ट प्रेमाबद्दल आहे शृंगार बद्दल आहे त्या प्रत्येक लेखकाच्या अनुभवाच्या भाग आहेत पण मराठी लेखक अनेकदा नको तितके मध्यमवर्गीय चिंचोळे होत जातात त्यामुळे हा अनुभव खूप एकरेषीय पद्धतीने प्रकटत राहतो पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा पुष्कळा हा काव्यसंग्रह म्हणूनच महत्त्वाचा ठरत गेला कारण हा पहिला असा संग्रह होता ज्यामध्ये शृंगार अनेक पद्धतीने आला आणि त्याची संपूर्ण देशी पद्धतीने अभिव्यक्ती आली जी आत्तापर्यंत कधीच शाक्त पद्धतीने आली नव्हती रेगे हे शाक्त असल्याने त्यांना हे जमून गेले
सुदाम राठोड यांच्या लेखनातला वरचा भाग हा भारतातल्या लैंगिक व्यवस्थेवर प्रकाश टाकतो लादलेले दादा ताई नाते कसे झुगारून दिले जाते त्याचा अनुभव सादर केला आहे प्रश्न असा आहे की हा अनुभव अस्तित्वात आहे की नाही तर तो नक्की अस्तित्वात आहे आता तो कोणी मांडला म्हणून बोंब कशाला करावी त्यापेक्षा अशी लादालादी न करणे हेच योग्य होय कुणाला भाऊ मानायच आणि कोणाला प्रियकर म्हणायचे हे त्या मुलीला ठरवू द्यावे तिचे ते स्वातंत्र आहे हेच मुलालाही लागू आहे कोणाला ताई म्हणायचे आणि कुणाला प्रेयसी म्हणायचे हे त्याला ठरवू द्यावे 21 व्या शतकामध्ये आपण जर का लैंगिक स्वातंत्र्य मान्य केले नाही तर मग आपण अजूनही मागासलेले आहोत असेच म्हणावे लागेल आता निवड करताना आपण पालक म्हणून आपल्या मुला-मुलींना कशी मदत करावी याबद्दल ठरवता येईल म्हणजे कोवळ्या वयामध्ये कसे कसे शारीरिक मोह असतात याची त्यांना नीट कल्पना देणे हे पालक म्हणून कर्तव्य आहे परंतु प्रथम त्यांचे स्वातंत्र्य स्वीकारले पाहिजे
थोडक्यात काय कलावंताला त्याचे अनुभव मांडू द्यावेत आणि त्याचे आपण चिकित्साही करावी एकादा अनुभव फारच विकृत असेल आणि जाणीवपूर्वक अनैतिक कृत्य करायला प्रोत्साहन देत असेल तर त्यावर चर्चा व्हावी सर्वसाधारणपणे साहित्याला मर्यादा असल्याने साहित्याचा फारसा इम्पॅक्ट पडत नाही मात्र चित्रपट प्रचंड प्रभाव टाकतो म्हणूनच आपण तिथे सेंसर बोर्ड आणलेले आहे
श्रीधर तिळवे नाईक
संगीत तंत्र आणि मोक्ष श्रीधर तिळवे नाईक
संगीताविषयी ज्याला प्रेम नाही त्याला पशु म्हणावे असे म्हटले जाते प्रत्यक्षात पशुंना सुद्धा संगीताचे भान असते ते सोडून द्या परंतु ज्याने ते लिहिले त्याला बहुदा पशुंना सुद्धा संगीताचे भान असते हे माहित नसावे
साहजिक संगीताचा विचार फार आदीम काळापासून सुरू आहे मोक्षाच्या संदर्भामध्ये संगीत हे फार महत्त्वाचे कारण नृत्य आणि संगीताच्या सहाय्याने मोक्ष मिळवता येण्याजोगीची तंत्रे आहेत त्यांची संख्या 10 आहे साहजिकच प्रत्येक आचार्याला यासंदर्भात विचार करावाच लागतो किंबहुना ज्याला हा विचार करता येत नाही त्याला आचार्य होण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दल शंका आहे
या सर्व तंत्रांच्या मुळाशी मुळात तीन गोष्टी बेसिक आहेत त्या
म्हणजे पहिली लय दुसरे ताल आणि तिसरा प्राण जेव्हा या तीन गोष्टी एकजीव होतात तेव्हा संगीताची साधना मोक्ष म्हणून सुरू होते आणि जेव्हा हे सर्व शून्यात विलीन होऊन जाते तेव्हा मोक्ष मिळतो एकेकाळी असे कलावंत होते पण दुर्दैवाने पुरोगामी कालखंडात ते नामशेष होत गेले आणि ज्यांनी मोक्ष मिळवला त्यांनी आपल्या मागे यासंदर्भात काहीच न ठेवल्याने प्रचंड मोठा अभाव संगीताच्या क्षेत्रात निर्माण झाला आजही तो जाणवत असतो काही प्रमाणात किशोर आमोणकर यांनी यासंदर्भात काही प्रयत्न केले होते परंतु हे प्रयत्नही प्रयत्न राहिले कारण परंपरेचा सर्वनाश झाला होता तरीही त्यांनी श्रुती विचारापर्यंत मजल मारलीच त्यांना मोक्ष मिळाला नाही परंतु एक दैवी स्पर्श त्यांच्या संगीतामध्ये अवतरला जो आपणाला जाणवत राहतो हीच गोष्ट लता मंगेशकर यांचा आहे त्यांना तर ही जन्मजात देणगी मिळालेली आहे आज सुद्धा त्यांच्या आसपास कोणी नाही यामध्ये मुळात असा गोंधळ झाला की चौदाव्या शतकानंतर भारतीय संगीत हे इस्लामच्या ताब्यात गेले आणि साहजिकच पंडित उस्ताद झाले पंडित आणि उस्ताद यांच्यातला फरक हाच होता की पंडितांचा मोक्षावर विश्वास होता आणि उस्ताद लोकांचा मोक्षावर विश्वास नव्हता ते इस्लामिक परंपरेला धरून आपले संगीत सादर करत होते जे धर्माशी जास्त संबंधित होते विशेषता इबादत म्हणजेच भक्ती
साहजिकच भाव उपायामध्ये संगीताचे क्षेत्र अधिक कार्यान्वित झाले किंवा मग इतर उपायांच्या मध्ये ते कार्यान्वित झाले असेल तर त्याचे पुरावे शिल्लक राहिले नाहीत ते इबादत वाल्यांनी शिल्लक ठेवले नाहीत
पुढे पुढे मोक्षतंत्रांच्या संदर्भात लय प्रधान संगीत आणि ताल प्रधान संगीत असे दोन प्रकार पडत गेले अपवादात्मक वेळेला प्राणप्रधान संगीत काही जणांनी व्यक्त केले पण कुमार गंधर्वांचा अपवाद वगळता फार थोडे लोक तिथपर्यंत गेले याबाबतीत अल्लारखाना मिळालेले यश सुद्धा फार महत्त्वाचे होते आणि त्यामुळे साहजिकच झाकीर हुसेन हे त्या दिशेने जाणे अटळ होते संगीतानेच इस्लाम मधली मोक्ष परंपरा सुफियाना नावाने जिवंत ठेवली झाकीर हुसेन यांच्यावर याचा कितपत प्रभाव पडला आहे याचा विचार करावा लागेल मात्र ते आधुनिकतेच्या अंगाने विचार करत होते हे नक्की आहे ते जेव्हा ड्रम कडे वळले तेव्हा त्यांच्यामध्ये फ्युजन चा विचार ऍक्टिव्हेट झाला जरी ते अमेरिकेतून परतले तरी या संदर्भात मग वेगवेगळे प्रयोग होत राहिले
प्राण संगीतामध्ये लय आणि ताल यांच्या पलीकडे जाऊन थेट प्राणातून गाण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्राण हे तत्व नेहमीच फ्लो मध्ये असते त्यामुळे साहजिकच प्राण आणि फ्लो यांना प्रमाण मानत ज्याची गायकी सादर होते तो मोठा कलावंत होत जातो मग तो लयप्रधान असो की ताल प्रधान असो अर्थात यामध्ये वेगळा विचार सुद्धा झालेला आहे म्हणजे काही लोक ताल हा लयच आहे असे सुद्धा मानतात ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पण ही शक्यता सुद्धा जोपर्यंत प्राणातून येत नाही तोपर्यंत ती एका सरफेस लेवललाच वावरायला लागते झाकीर हुसेन यांचे वैशिष्ट्य असे होते की ते या सरफेस मधून निसटून खोलात जायला नेहमीच धडपडायचे आणि कधीकधी अचानक त्यांची एखादी जागा थेट तळ गाठायची भारतातील खरे तर ज्यांनी संगीत आधुनिक बनवले त्यातले ते एक पायोनियर होते त्यांनी ताल आधुनिक बनवला आणि तालाचा विचार पुन्हा एकदा करणे भाग पाडले
ताल हा संपूर्ण विश्वामध्ये असतो आणि प्रत्येक वस्तूला एक ताल असतो असे आपली परंपरा मानते आणि त्यामध्ये बरेचसे तथ्य आहे पण त्याचबरोबर हेही खरे आहे की प्रत्येक वस्तूला सुद्धा एक लय असते मला स्वतःला व्यक्तिशः असे वाटते की लय ही कळत नकळत अवकाशाच्या अंगाने जाते आणि ताल हा कळत नकळत काळाच्या अंगाने जातो त्यामुळेच जेव्हा एखादी व्यक्ती तबला वाजवत असते तेव्हा ती अनेकदा गणिती बनू शकते कारण काळ हा असा आहे की जो गणिती बनू शकतो साहजिकच या अंगाने झाकीर हुसेन यांनी विचार केलेला होता आणि त्यातूनच मग अनेक वस्तूंचे आवाज साजरे आणि सादर करणे त्यांना जमून गेले अर्थात त्यामागे त्यांचे भाऊ मुळात होते त्यांनी सुरुवात केली होती असे म्हणतात हे वेगवेगळे आवाज का काढले जात होते तर त्यामागे एक बेसिक होते की प्रत्येक वस्तू तबल्यातून सादर होऊ शकते हे कळत नकळत आधुनिक कानांना वस्तूंच्या ऑडिओ मधून पटवणे गरजेचे वाटत होते अर्थात काही लोकांना हे फक्त कर्मकांड वा आजच्या भाषेत मिमस वाटले पण प्रत्यक्षात तसे नव्हते यामागचा उद्देशच ताल प्रत्येक वस्तूचा आहे तर मग प्रत्येक वस्तू तालातून सादर केली पाहिजे हा विचार आहे जर मी रेल्वेच्या आगगाडीचा आवाज तालातून काढू शकलो तर मग मी खरा कलावंत अशीही यामागे धारणा आहे ही काही मिमिक्री नव्हे तर या सगळ्या मागे जो विचार आहे तो हाच आहे की प्रत्येक वस्तूला लय असते किंवा ताल असते किंवा आवाज असतो आणि तो मी जर काय वाद्यातून सादर करू शकत असेल तर हे मी अधिक सहजपणाने कम्युनिकेट करू शकतो
आधुनिकतेने सर्वात महत्त्वाची गोष्ट काही केली असेल तर ती म्हणजे पुरोगामी लोकांनी प्रस्थापित केलेली घराणे पद्धत मोडून काढली ही घराणे पद्धत पुरोगामी वादाने जरी लवचिक केली होती तरी ती मोडून काढणे त्यांना जमले नव्हते ते काम आधुनिक संगीताने केले आणि त्याची सुरुवात प्रामुख्याने कुमार गंधर्वांच्या मुळे झाली होती झाकीर हुसेन हे लहानपणीच आपल्या वडिलांच्या घराण्यातून बाहेर जाऊन चाचपचाचणी करतच होते त्यामुळेच ते केवळ एका घराण्याचे होते असे म्हणता येत नाही मिश्र राग पुरोगामी परंपरेतच सुरू झाले होते म्हणजे बसंत बहार हा राग तो बसंत आणि बहार या दोन्ही रागांचे फ्युजन होते हा बदल घडवण्यामध्ये फिल्मी संगीताचा वाटा किती असा आपण प्रश्न खरे तर विचारायला हवा कारण याचे श्रेय फिल्मी संगीतालाच जाते कारण फिल्मी संगीतकारांनी अनेकदा हा उद्योग केला साहजिकच त्याचा प्रभाव क्लासिकल वर पडला अर्थात संगीतात काही चमत्कारही ओपी नय्यर यांच्यासारख्या लोकांनी केले म्हणजे एकाच रागात फागुंन चित्रपटाची सारी गाणी कंपोज करणे पण हे करताना त्याने ऑर्केस्ट्रेशन मात्र पूर्णपणे आधुनिक पद्धतीने केले चित्रपट संगीताने आणलेल्या या दबावामुळेच संगीतातल्या क्लासिकल लोकांना सुद्धा स्वतःला बदलणे भाग पाडले
झाकीर हुसेन यांनी त्यामुळे संगीतात चित्रपटात काम केले याचे आश्चर्य वाटत नाही कारण त्यांच्या पिढीमध्ये आता वातावरण खुले झाले होते किंबहुना रविशंकर यांच्यापासून अनेकांनी हे काम केलेले आहे आणि सत्यजित रे सारखे काही लोक यांना व्यवस्थित आपल्या चित्रपटाचा भाग म्हणून क्रिएटिव्ह पार्ट म्हणून संगीत वापरत होते
त्यामागे एक वस्तुस्थिती अशीच होती की अवकाशामध्ये फक्त व्हिडिओ असत नाही तर ऑडिओ असतो आणि हा ऑडिओ संगीताच्या मार्फत आणि नटांच्या आवाजामार्फत व्यक्त करावा लागतो व्ही शांताराम गुरुदत्त ऋत्विज घटक सत्यजित रे यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांनी याबाबतीत प्रचंड बारकाईने कामं केलेली दिसतात त्यांना सुदैवांने चित्रपट माध्यम कळणारे संगीतकार पण भेटले हे खूप आवश्यक असते यासंदर्भात काही अडाणी लोकांना मी बघितलेले आहे म्हणून हे आवर्जून सांगावे लागते साहजिकच जाकीर हुसेन चित्रपटांमध्ये जास्त कम्फर्टेबल होत गेले यात मला मुळीच आश्चर्य वाटत नाही अर्थात संपूर्ण कम्फर्टेबल होणे हे कुठल्याही कलावंताला होणे शक्य नाही याचे कारण शेवटी चित्रपट ही कला त्याच्या नावाने लागत नाही अपवाद फक्त गाणी!
प्रश्न त्यामुळे कलावंतांच्या संदर्भात हाच येतो की तो कलावंत लय प्रधान आहे की ताल प्रधान आहे यासाठी आमची कसोटी अशी असते की एखाद्या नवख्या कलावंताला नेहमीच एखादे क्लासिकल नृत्य शिकायला पाठवणे तिथे जर का त्याचा संपूर्ण देह नाचायला शिकला तर आम्ही समजतो की त्याला ताल कळतो आणि ताल त्याच्या अंगात आहे जर हा ताल त्याच्या अंगात आहे असे वाटले आणि जर त्यालाही वाटले की त्याचे संपूर्ण शरीर ताल प्रधान आहे तर मग त्याला आम्ही सांगतो की तू तालाच्या अंगानेच मोक्षाला जा आणि एकदा तुम्ही ताल ऐकायला शिकला की कुठल्याही सिच्युएशन मध्ये प्रसंगांमध्ये लोकांच्या आवाजात ताल ऐकायला लागता त्या प्रसंगातला आसपासचा सगळा ताल ऐकायला लागता आणि मग तुमच्यासाठी असे सगळे प्रसंग तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेसचे भाग होत जातात आणि तुम्ही हळूहळू त्या संदर्भात जोडल्या गेलेल्या भुका, तहान आणि निकडी यांच्यातून मुक्त होत जाता अन्यथा तुम्ही फक्त निकडी पोटी डिमांड आणि सप्लाय हे गणित सांभाळत बसता भारतातल्या अनेक संगीतकाराने असे कमर्शियालायझेशन कमावलेले आहे असे लोक मोक्षाच्या दिशेने जाऊ शकत नाही कला संगीताच्या संदर्भामध्ये नेहमीच प्राणाच्या आत न्यावी लागते त्याशिवाय फ्लो साधतच नाही या साधनेत प्राणापर्यंत पोहोचणे खूप आवश्यक असते किंबहुना प्राण ताल झाला पाहिजे किंवा प्राण लय झाला पाहिजे अर्थात हे तालावर नृत्य करणाऱ्या नर्तकाला सुद्धा लागू पडते तिथे लय नसतेच अनेकदा तालच असतो जो लयीशी एकजीव झालेला असतो मराठीत लय झालं म्हणजे जास्ती झालं अशा अर्थाने वाक्प्रचार आहे त्याचे मूळ ह्या संगीतात आहे लय भारी हा शब्द त्याचा विस्तार आहे लयाने भारून टाकणारी जी गोष्ट असते ती लय भारी असते अशा वाकप्रयोगांमधूनच सामान्य माणसं सुद्धा फार संगीताच्या जवळ असलेली कळतं दुर्दैवाने आपण आपली भाषा नीट ऐकत नाही
भारतामध्ये आता उत्तराधुनिक संगीताचा हायदोस चालू आहे हाय डोस चालू आहे तिथे मोक्ष जवळजवळ मिसिंगच आहे त्यामुळे चर्चा काय करणार पण आधुनिक लोकांना मात्र मोक्ष साधता आला नसेल पण त्यांना किमान यासंदर्भात काही जाणीव होती एक चलन वलन होते
माझा स्वतःचा संगीताशी संबंध फार गुंतागुंतीचा होता माझ्या वडिलांना संगीत आणि चित्रकला दोन्हीही येत होत्या पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरी देखील त्यांनी मला चित्रपट शिकवला परंतु चित्रकला शिकवायला नकार दिला संगीत शिकवायला नकार दिला हे खरंतर आश्चर्यकारक आहे परंतु माझ्या आयुष्यात हे घडले मला नेहमीच प्रश्न पडतो की समजा मला हे बालपणापासूनच देण्यात आले असते तर मी काही वेगळा झालो असतो का ? शक्यता नाकारता येत नाही पण एक गोष्ट मात्र मला नेहमी वाटते ती म्हणजे संगीत असो चित्रकला असो मी शेवटी मोक्षाकडेच वळलो असतो
माझ्या वडिलांनी या गोष्टी दिल्या नाही तरी माझ्या घराण्यात मात्र त्या कायमच वावरत होत्या आणि आजही त्या वावरत आहेतच अर्थात माझ्या घरात माझ्यापेक्षा बुलंद असणारे अनेक लोक आहेत उदाहरणार्थ दीपक तिळवे हा तबल्याचा जबरदस्त खेळाडू आमच्या घरात आहे माझा स्वतःचा भाऊ भारत तिळवें उत्तम तबलावादक होऊ शकला असता पण दुर्दैवाने त्याच्या हातात तबला न देऊन माझ्या वडिलांनी फार मोठी घोडचूक केली असे मला वाटते आम्ही कलावंत बनू नये कारण त्यामध्ये ससेहोलपट होते असे त्यांचे ठाम मत होते पण प्रत्यक्षामध्ये काही गोंधळ झालेच अर्थात हे कौटुंबिक गोंधळ होते माझ्या बहिणींना सुद्धा नृत्याची अतिशय आवड होती परंतु कोल्हापुरातल्या काही सरंजामवादी लोकांच्यामुळे माझ्या थोरल्या बहिणीचेसुद्धा नृत्य त्यांनी बंद केले
असे असूनही प्रत्यक्षात जे मिळत नाही ते कधी कधी स्वप्नात मिळते असे म्हणतात तसे माझ्या बाबतीत झाले म्हणजे अगदी जेव्हा मी उनाड आणि वांड होतो तेव्हाही मला संगीत स्वप्नात दिसत होते त्याचा नेमका अर्थ मला त्या काळात कळत नव्हता पण साधारण वयाच्या दहाव्या वर्षी मी स्वप्नात बंदिशी ऐकतोय याची मला जाणीव यायला लागली ज्या मी कधी आयुष्यात प्रत्यक्षात ऐकल्याच नव्हत्या पुढे पुढे हातात तलवार असताना सुद्धा संगीत ऐकणे असा प्रकार मी केलेला आहे नंतर एक विचित्र गोष्ट मी स्वप्नात करायला लागलो ती म्हणजे लता मंगेशकर यांचा आवाज आणि पाश्चात्त्य देशातल्या बंदिशी ज्या मी कधीच ऐकल्या नव्हत्या त्या माझ्या स्वप्नात फ्युजन म्हणून उगवायला लागल्या आणि चक्क लताबाई पाश्चात्त्य संगीत माझ्या स्वप्नात गायला लागल्या साहजिकच याविषयी मी मौन पाळायला लागलो कारण कोणाला काही बोलणे अवघड होते त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले मी आईला या संदर्भात विचारले तेव्हा ती म्हणाली की हे सर्व तुझ्या मागल्या जन्माचं संचित आलेले दिसतं त्यामुळे पुनर्जन्म हा कायमच माझ्यासाठी मोठा प्रश्न होता कारण मी ज्या बंदिशी ऐकत होतो त्या बंदिशी खरोखरच मी कधीच ऐकलेल्या नव्हत्या मग त्या आल्या कुठून?
साधारण वयाच्या सोळाव्या वर्षी मी थोडी माझी कॉम्पोझिशन्स करायला सुरुवात केली परंतु नंतर जे काही घडले त्यामुळे माझे आयुष्य बदलले आणि संगीत ही माझ्यासाठी फार वैयक्तिक गोष्ट बनून गेली मी कधी संगीताचा शास्त्रात पडलोच नाही किंवा चित्राच्या शास्त्रातही पडलो नाही याचे कारण मला शास्त्रात पडायचेच नव्हते मी पडलो तर मग आयुष्यभर याच्या मागे लागणार हे मला माहीत होते मी फक्त काव्यशास्त्राच्या मात्र फंदात पडलो कारण ती माझी मुख्य कला होती पण माझे सुरुवातीचे कलेतले आविष्कार हे कायमच चित्रातले आणि नंतर संगीतातले राहिले संगीता इतके शुद्ध काही नाही असे जे म्हटले जाते त्यात काही प्रमाणात तथ्य आहे म्हणजे प्राणाच्या जवळ काही असेल तर ते संगीत आहे व्हॉयझर मधून जेव्हा एलियन्स लोकांशी संवाद साधायचा होता तेव्हा शास्त्रज्ञांनी कुठलीही भाषा निवडली नव्हती तर संगीत निवडले होते याचे कारण संगीत हे मानवाच्या सुद्धा पलीकडे असणाऱ्या लोकांना कळू शकेल असा त्यांना आत्मविश्वास होता हा चुकीचा नव्हता कारण संगीताची भाषा ही ब्रह्मांडीक असू शकते असो
कुठलीही कला सौंदर्य निर्माण करते त्याला संगीत अपवाद नाही त्याविषयी मी इतरत्र बोललेलो आहे म्हणून येथे काही लिहीत नाही
सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की संगीतामार्फत मोक्ष मिळू शकतो फक्त त्यासाठी शरीराची तयारी असावी लागते आणि जन्मजात संगीताची प्रतिभा! माझे स्वतःचे मत असे आहे की संगीताची प्रतिभा ही गणिताच्या प्रतिभेशी मॅच व्हावी लागते त्यातून तुम्ही प्राणापर्यंत जाऊ शकता आणि नंतर एक वेळ अशी येते की जेव्हा सर्व गणित कोसळून पडते आणि तुम्ही शून्यात जाता
श्रीधर तिळवे नाईक
चौथ्या नवतेची कलाकृती काय करते ?
श्रीधर तिळवे -नाईक
जतनता ही एक अपरिहार्य गोष्ट आहे मानवात ही जतनता दोन प्रकारची असते
१ जैविक
२ चिन्हीक
चिन्हिकतेतून माध्यमता जन्मते आणि माध्यमतेतून मिडिया
जैविक जतनता ही जनुकांच्यातून वहात असते तिचे बायो-प्रोग्राम आपणाला अनेकदा स्वभावजन्यता देत असतात हे बायोप्रोग्राम प्रामुख्याने दहा प्रकारचे असतात
१ शारीरिक
२चीत्तीक
३ भवनीक
४ अहमिक
५ शाक्तिक
६ क्रीयीक
७ अवकाशीक
८ कालीक
९ अवस्थिक
१० स्थितीक
हे सर्वच बायोप्रोग्राम आपल्या अनेक गोष्टींना डीक्टेट करत असतात . ते जैविक असल्याने त्यांच्यावर सहजासहजी मात करता येत नाहीं . हे आपल्या आतून बाहेर जात असतात
चिन्हिक जतनता ही जनुकांच्यातून वहात नसते तर ती समाजाकडून आपणाला प्राप्त होत असते तिचे चिन्हप्रोग्राम आपणाला अनेकदा समाजजन्यता देत असतात हे चिन्हप्रोग्राम प्रामुख्याने दहा प्रकारचे असतात
१ कायिक
२ ज्ञानिक
३ भाविक
४ ओळखीक
५ सत्तीक
६ कर्तव्यिक
७ भौगोलिक
८ काळीक
९ समाजावस्थिक
१० समाजस्थितीक
हे सर्वच चिन्हप्रोग्राम आपल्या अनेक गोष्टींना डीक्टेट करत असतात . ते सामाजिक असल्याने त्यांच्यावर मात करता येते . हे आपल्या बाहेरून आत येत असतात
ह्या दोन्ही प्रोग्रामच्या घुसळमिसळीतून आपली जीवकक्षा निर्माण होत असते ही अणूंच्याप्रमाणे आपल्या आसपास भ्रमण करीत असते ही घुसळमिसळ कधी द्वंदात्मक असते कधी सहकार्यात्मक कधी तडजोडीय तर कधी संघर्षात्मक असते त्यातून
१ दैहिक
२ वैचारिक
३ भावनिक
४ अस्मितीय
५ शासकीय
६ कार्यीक
७ जागीक
८ वेळीक
९ स्वावस्थिक
१० स्वस्थितीक
असे दहा कक्षीय प्रोग्राम तयार होतात आणि आपल्या जीवकक्षेत भ्रमण करू लागतात
आपले चिन्हसृष्टीतील जगणे हे ह्या तीस प्रोग्रामातून स्पंदत असते
चौथ्या नवतेची कलाकृती ही ह्या जगण्याचे स्पंदन चिन्हांकित करत असते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment