WOMEN
स्त्रिया आणि भारतीय संस्कृतीतील मूळ तीन देवता श्रीधर तिळवे नाईक
ज्योतिबा फुले वर्णसंघर्ष न बघता आर्य विरुद्ध अनार्य असा संस्कृती संघर्ष बघतात राजवाडे राधा माधव विलास चंपूमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही तीन पात्रे एका बाजूला आणि शूद्र त्यांच्यातील स्त्रिया ह्या एका बाजूला अशा प्रकारच्या संघर्ष आहे असे मानतात अर्थात त्यांच्या मांडणीमध्ये एक गोष्ट कळतच नाही ती म्हणजे स्त्रिया विशेषतः ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या स्त्रिया नेमक्या कुठे येतात हे काही स्पष्ट होत नाही किंबहुना हे सगळीकडेच गोंधळात आहे असो इथे त्रिवर्ण किंवा उच्च वर्ण विरुद्ध अंत्य वर्ण म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र असा संघर्ष आपण गृहीत धरू शकतो. शरद पाटील हा वर्ण संघर्ष ब्राह्मण विरुद्ध अ-ब्राह्मण असा बघतात आणि मार्क्सवादी उत्पादन साधनांच्या चौकटीमध्ये तो बसवायला बघतात प्रश्न असा आहे की हा संघर्ष ते असा का बघतात तर त्याचे कारण असे की वैष्णव हिंदू धर्माचे निर्माण झाल्यानंतर हिंदू धर्मात दोनच वर्ण होऊ लागले एक ब्राह्मण आणि बाकीचे सर्व शूद्र त्यामुळे ही लढाई मार्क्सवादी चौकटीत बसवत ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण अशी करावी लागते आणि कळत नकळत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी झालेला वाद आणि नंतर शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाचा झालेला वाद यांचा प्रभाव या विभागणीवर आहे
या सर्व गोष्टींच्या मध्ये एक मूलभूत प्रश्न कायमच राहतो तो म्हणजे स्त्रियांचे काय? एकीकडे स्त्रिया शूद्र आहेत असे मनुस्मृति म्हणते गीता म्हणते आणि दुसरीकडे वर्तमानात ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णातल्या स्त्रिया स्वतःला ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यच म्हणवून घेतात यातील कोणीही स्वतःला शूद्र म्हणवून घ्यायला तयार नाहीत यातून एक विलक्षण पेज प्रसंग निर्माण होतो जो स्त्रीमुक्ती वारी चळवळीत आता वारंवार निर्माण होताना दिसतो
हा निर्माण होणारा प्रश्न म्हणजे निकष वर्तमानाचा लावायचा की वर भूतकाळाचा लावायचा इतिहासाचा लावायचा हा होय आत्तापर्यंत इतिहासात हा कायमच इतिहासात स्थान काय होते हा निकष लावून सोडवला जात असे म्हणजे बी सी किंवा ओबीसी लोकांना सवलती कशाच्या आधारे तर इतिहासात हे घडले. आता इतिहासात सर्व स्त्रिया शूद्र असतील तर मग ओबीसी लोकांच्या किंवा बीसी लोकांच्यात स्त्रियांच्यासाठी फक्त स्त्रियांना टक्केवारीनुसार आरक्षण द्यावे असे तर्कशास्त्र आपोआपच निर्माण होते प्रश्न असा आहे की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या स्त्रियांना अशा प्रकारचे आरक्षण देता येईल का आणि आता आपण जर का तसे ते देत असू तर नेमके करायचे काय? कारण या स्त्रिया काही स्वतःला शूद्र म्हणायला तयार नाहीत मग त्यांचे करायचे काय? इतिहासाचा आधार घ्यावा तर तो या स्त्रियांच्या हक्कात जातो आणि वर्तमानाचा आधार घ्यावा तर मग हा वर्तमानाचा निकष पुरुषांना लागू का करायचा नाही असा प्रश्न निर्माण होतो विशेषता बीसी आणि ओबीसी पुरुषांना सुद्धा मग वर्तमानाचे निकष का लागू करायचे नाहीत असे प्रश्न निर्माण होतात मग एकदा का वर्तमान निकष बनला की हळूहळू आरक्षण करायचे नाही इथेपर्यंत सर्व ठेपते
आणि जर का वर्तमानाचा निकष लावायचा नसेल तर मग इतिहास काय आहे ते जाणून घ्यावे लागते आणि स्त्रियांच्या संदर्भातला इतिहास हा प्रचंड गुंतागुंतीचा आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं लागते याची सुरुवात मुळातच आदीदेवतांच्या पासून होते व शेवटी आपणाला कळत नकळत मग नेमका आदीम आकार काय इथेपर्यंत घेऊन जातात आणि आपण शक्ती निऋती आणि आदिती यांच्या पुढे उभे ठाकतो
शक्ती ही पशुपालक संस्कृतीमध्ये निर्माण झाली आणि पार्वतीचे सगळे अवतार किंवा पार्वती ही शक्ती रूप म्हणून पुजली गेली जाऊ लागली तिची तंत्रे ही शाक्त तंत्रे म्हणून उदयाला आली आणि त्यामुळेच अनेकदा तांत्रिक श्रुती असा शब्द प्रयोग पण रुढ झाला
प्रश्न असा आहे की मग शक्ती निऋती कधी झाली?
या प्रश्नाचे उत्तर कृषी व्यवस्थेत आहे जशी जशी पशुपालक व्यवस्था पशुपालन समाज हा कृषी समाज बनत गेला शेतीनिष्ठ समाज बनत गेला तसा तसा एका शेतीनिष्ठ शक्तीचा आकार येणे अटळ बनत गेले आणि त्यातूनच निऋतीचा उदय झाला ती अनार्य देवता आहे याचे अनेक पुरावे आपणाला वेदातच मिळतात आणि त्याविषयी अनेकांनी लिहिलेले आहे मात्र वाद विवाद संपलेले नाहीत
प्रश्न असा आहे की ही मूळची अनार्य असलेली देवता वेदांच्या पर्यंत पोहोचली कशी? आर्यांच्या इतिहासातले जे काही प्रश्न आहेत त्यातील एक प्रश्न हा निऋतिचा आहे ही नेमकी कोण होती याबद्दल सतत वाद सुरू असतात
आर्य लोकांनी तिचा उल्लेख कायमच उपहासाने केलेला आहे की काय अशी शंका येते त्यामुळे साहजिकच तिच्याविषयी शैव धर्मी किंवा अनार्य लोकांना प्रेम वाटणे अटळ आहे परंतु कधीकधी प्रेमाचा अतिरेक होऊन ही आर्य देवता नव्हेच ती तांत्रिक श्रुतीतून आलेली आहे अशा प्रकारचा युक्तिवाद अगदी शरद पाटील यांच्यासारखा विद्वान सुद्धा करत असतो
युरेशियन लोक हे पशुपालक असल्याने त्यांना शेती येत नव्हती ही वस्तुस्थिती आणि ती ते इथल्या लोकांच्या कडूनच शिकले ही ही वस्तुस्थिती! त्यामुळे साहजिकच शिव आणि शक्ती यांचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढे ठाकलेला होता कारण शेती तर करायची होती परंतु आपल्या संस्कृतीचे करायचे काय आपल्या पशुपालक व्यवस्थेचे करायचे काय आणि मुख्य म्हणजे त्यातून निर्माण असलेल्या आपल्या श्रद्धेचे करायचे काय यासारखे अनेक प्रश्न या काळामध्ये आर्य लोकांच्या पुढे उभे होते आणि त्याची काही उत्तरे ऋषी लोकांनी शोधली असे आपणाला दिसते त्यातूनच निऋती स्वीकारली पण आणि नाकारली पण ! हे वैचारिक द्वंद्व सतत घडलेलं दिसतं असाच प्रकारचा पेचप्रसंग भगवान शंकरांच्या बाबतीत निर्माण झालेला दिसतो आणि शेवटी त्यांचे रुद्रीकरण करून हा पेचप्रसंग सोडवण्यात आला आणि पुढे उलटी गंगा करून रुद्रापासून शिव तयार झाला शंकर तयार झाले अशी मांडणी पुढे आली जी आज खूप वैचारिक विश्व डॉमिनेट करते आहे असा प्रकार निऋतीबाबतीत का घडला नाही किंवा घडला असेल तर त्याचे स्वरूप काय असा प्रश्न निर्माण होतो कारण कळत नकळत शक्ती मात्र पुन्हा वैष्णव धर्मामध्ये अवतरलेली दिसते की शेती या व्यवस्थेची अपरिहार्यता याद्वारे स्वीकारली गेली?
कारण शक्ती ही शैव लोकांच्या नुसार निर्माणक होती संसार तिने निर्माण केलेला होता साहजिकच तिचा स्वीकार कसा करायचा हा प्रश्न होता. आर्य लोक हे ऋतुजडीत लोक होते साहजिकच ऋतुच्या पलीकडे असलेली अशी ही देवता अशी त्यांना संकल्पना सुचायला लागली आणि मग त्यातूनच निऋति हे नाव आलेले आहे
आर्याने आपली जी कृषीमातृदेवता तयार केली तिच्यावर तांत्रिक श्रुतीचा संस्कार होणे अटळ होते परंतु पशुपालक असलेल्या संस्कृतीमध्ये सुद्धा मातृदेवता अस्तित्वात असतात किंबहुना शक्ती ही सुरुवातीच्या कालखंडात पशुपालक कालखंडातच होती जन्मली होती पुढे मग जसजशी शेती महत्त्वाची होत गेली तशी तशी ती शेतीला निर्माण करणारी शेतीला आवश्यक असणारा पाऊस धाडणारी अशी शक्ती म्हणून वाढली साहजिकच त्यांचे पूजन वाढत गेले आर्य हे मुळातच स्त्री सत्ताक नव्हते साहजिकच त्यांच्यामध्ये या गोष्टीचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला संसाराबरोबरच साहजिकच जीव आणि जीवांचे गण निर्माण करणे हे कार्य शक्तीकडेच असल्याने एका अर्थाने शक्ती सभा आणि समिती यांचीही निर्माणकर्ती झाली पाऊस आणि सृजनशीलता ही फार महत्त्वाची असते साहजिकच तिच्या मागे शक्ती आहे अशी संकल्पना होती. आर्य लोकांनी या गृहीतकापासून प्रेरणा घेत आता यामागे निऋती आहे अशी संकल्पना दृढ केली खरी परंतु प्रश्न असा निर्माण झाला की आर्यांची जी मूळची अदिती नावाची देवता होती तिचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न होता किंबहुना यावरूनच वाद सुरू झाले. शैव लोकांच्यातला शक्तिवाद स्वीकारायचा की नाही हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि हा शेतीतून निर्माण झालेला प्रश्न होता वैष्णव धर्मामध्ये हळूहळू या शक्तीला स्वीकारण्यात आले कारण दुष्काळांची संख्या अचानक वाढायला लागली आणि मग लक्ष्मी ही वैश्य लोकांची देवता हळूहळू व्यापार करणाऱ्या जैन लोकांनी पण स्वीकारली आणि मग नंतर आर्य लोकांनी पण स्वीकारली आणि तिला शक्ति रूप देणे सुरू केले साहजिकच जिला नकार दिला ती सरस्वती सुद्धा आता दहाव्या शतकात पुढे आणली गेली (तिच्यावर मी एक स्वतंत्र लेखच टाकला होता)
शेवटी युरेशियन लोकांची वैदिकता ही एक श्रद्धा होती आणि प्रत्येक श्रद्धेच्या उदयामागे हे मातृत्व तत्व कायमच उदयाला येत राहिले तसे ते इथेही घडले होते परंतु शक्ती ही काही श्रद्धेची देवता नव्हे ती मोक्षाची देवता होती आणि ईश्वराचे एक रूप यम मानून पंचयमांची संकल्पना डेव्हलप झाली होती हे एक नवे पंचायतन होते हा यम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सूर्य होता आहे आणि सकाळचा सूर्य राम सकाळ दुपारचा भैरव दुपारी मार्तंड संध्याकाळचा शाम आणि रात्रीचा कृष्ण जो पुन्हा यमाच्या म्हणजे सूर्याच्या यमलोकात म्हणजेच पाताळ लोकात जातो आणि पुन्हा राम बनून उगवतो आपण राम राम म्हणतो कारण सकाळचा सूर्य हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो एका अर्थाने हे गुड मॉर्निंग चे शैव वर्जन आहे आणि त्याचा वाल्मिकीच्या रामायणाशी काडीचाही संबंध नाही
युरेशियन लोकांच्या मध्ये एक मोठा पेचप्रसंग या सूर्याच्या अंगाने होता कारण पावसाचे श्रेय कुणाला द्यायचे? पाऊस कोण पाडतो याविषयी प्रश्न निर्माण झाले होते साहजिकच पुढे पावसाचे श्रेय हे सूर्याला द्यायचे की मग स्वतंत्र इंद्रदेवता मानायची असा संघर्ष अटळ झाला आणि त्याने पुढे उग्ररूप धारण केले शैव धर्मात हे श्रेय पुर्णपणे सूर्याला आणि हरीला दिले गेले होते कारण सिंधू संस्कृती ही शेवटी व्यापार करणारे संस्कृती होती समुद्र त्यांच्या परिचयाचा होता आणि हरी ही त्यांची समुद्र देवता होती आणि ती प्रामुख्याने दक्षिणेत होती आणि त्यामुळेच ती समुद्रावर झोपलेली असते तिला समुद्रातून हिमालयापर्यंत पोहोचवणे ही वैष्णव धर्माची विलक्षण कामगिरी आहे त्या आधीच दक्षिणेत हरीला शंकराचा धाकटा भाऊ म्हणण्यात आले होते (कदाचित मूळशैव धर्मात किंवा श्रुतीत हरी स्त्री देवता सुद्धा असू शकते असो )
समुद्र आणि सूर्य यांच्या संबंधातून पाऊस पडतो याची कल्पना मासेमारी करणाऱ्या व समुद्र पर्यटन करणाऱ्या शैव अनार्य लोकांना नेमकी कशी काय आली हा एक फार मोठा प्रश्न आहे कदाचित पाण्यात बुडणारा सूर्य बघून पाणीच सूर्य घेऊन जाते आणि पाणीच सूर्य धाडते आणि कधीकधी या सूर्याबरोबरच पाणी पण येते ते पाणी म्हणजे पावसाळा होय असे काहीतरी तर्कशास्त्र समुद्रावर त्यांना सुचले असावे
युरेशियन लोकांच्यात मात्र या अंगाने खूपच वाद झालेले दिसतात आणि काही लोक सूर्यवादी झाले आणि ते पावसाचे श्रेय साहजिकच सूर्याला द्यायला लागले तर काही इंद्राला देऊ लागले त्यावरूनच पुढे असुर आणि सूर असा संघर्ष निर्माण झालेला दिसतो आणि जे सूर होते त्यांना सर्वत्र हाकलून देण्यात आले आणि ते नंतर भारतामध्ये सेटल झाले हे सर्व इंद्रवादी लोक आहेत या संघर्षात आहुती मात्र निऋतीची पडली की काय अशी शंका येते कारण ह्या दोन्हीही म्हणजे सूर्य वादी आणि इंद्रवादी या पुरुष सत्ताक होत्या आणि शेती हळूहळू पुरुष सत्ताक होत गेली आणि निऋतीची सत्ता कमी होत गेली
नि:ऋतिचा ऋति नावाचा गण होता की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे शक्यता अशी आहे की जिला ऋतू नाही अशी ती म्हणून ती निऋति अशी ही व्याख्या होऊ शकते म्हणजे जी ऋतू चक्राच्या पलीकडे आहे ती नि:ऋती !
तिच्याविरुद्ध आर्य लोकांनी सर्वसाधारणपणे आदिती ही सूर्यस्त्री देवता आणली आहे पण ती काळापासून मुक्त नाही निऋतिचे मात्र तसे नाही ती कालातीत आहे
सीता आणि द्रौपदी यांना निऋतीच्या वाहक करण्यात काहीं आर्यांच्या आणि युरेशियन लोकांच्या छायेत वाढलेल्या विचारवंतांना मजा येते परंतु आर्य स्त्रिया विशेषता उत्तर काळातल्या या वर्णव्यवस्थेपासून मुक्त नव्हत्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे यांनी आपल्या क्षत्रिय वर्णातलाच नवरा निवडलेला आहे आणि द्रौपदीने तर करणाला नकार देताना त्याच्या सूत असण्याचाही उद्धार केला आहे त्यामुळे शैव अनार्य समतावादी निऋतिचा अधिकार द्रौपदीला सीतेला देणे म्हणजे विपरीत आकलन होय मुळात मूळ नि: ऋती समतावादी होती परंतु आर्य लोकांची निऋती समतावादी होती असे मान्य करणे फार कठीण जाते म्हणजे तिच्या चार वेण्या म्हणजे चार ज्ञाती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कळत नकळत आपण वर्णव्यवस्था मान्य करत असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे समस्त भारतात आलेल्या युरेशियन लोकांचा वृक्ष हा पिंपळ वृक्ष झाला होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यामुळेच निऋतीचा वृक्ष हा पिंपळ वृक्ष आहे ते स्वाभाविक आहे मग तो श्रीकृष्णाकडे गेला आणि गीतेत वृक्षात मी पिंपळ असे त्याने जाहीर केले पण मुळात हा पिंपळ निऋतीचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणजे वड हा शक्तीचा तर पिंपळ हा निऋतीचा अशी ही विभागणी आहे वंश वाढ ही शक्तीकडे असल्याने साहजिकच वडा वृक्ष तिच्याकडेच राहिला तर शेती मात्र आकाशाच्या दिशेने जितकी जाईल तितकी फळते या विचाराने पिंपळ वृक्ष निऋतिकडे गेला हा पिंपळ उलटा असतो याचे कारण पाऊस वरून खाली येतो आणि पिकाच्या रुपाने तो पुन्हा सुलटा होतो म्हणजे पुन्हा पावसाचेच पीक म्हणून उगवणे असते
मुळात निऋती मोक्षदायक नाहीच आहे त्यामुळे स्वाभाविकपणे कपिल यांचे षष्ठीतंत्र आर्य चौकटीत बसवताना शक्तिसाठी निऋति ऐवजी प्रकृती असा शब्द निवडण्यात आला आणि शिवासाठी पुरुष हा शब्द निवडण्यात आला अर्थात आपल्या आकलना नुसार मग पुरुषाचा अर्थ झाला आणि त्यातून वर्णव्यवस्था वगैरे बाकी सर्व गोष्टी घुसवल्या गेल्या मूळ कपिलच्या षष्टी तंत्रात मात्र अजिबात पुरुष आणि प्रकृती नाही किंवा सांख्यांचे जे तत्त्वज्ञान सांगितले जाते ते असे म्हणत नाही ते मुळात षष्ठी किंवा सांख्यतंत्रच आहे दुसरे तंत्र अर्थातच ब्रह्म तंत्र आहे ज्यांचा उपनिषदांच्यावर प्रचंड प्रभाव आहे या दोन तंत्रांच्या मुळेच नंतर युरेशियन श्रुतीला मोक्षाचे वळण लाभले आणि हे वळण लावताना निऋती कुठेही फारशी चमकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना कळत नकळत आर्य लोकांनी नंतर तिच्याशी असलेले नाते तोडले असेच दिसते आणि आज तर ती कुठल्याच मंदिरात मुख्य देवता वावरताना दिसत नाही किंवा पूज्य देवता म्हणून प्रभावी नाही
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment