Posts

Showing posts from May, 2025
 भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १ श्रीधर तिळवे नाईक  भारतीय इतिहासाची वैज्ञानिक मांडणी करणे हा पुरोगामी कालखंडाचा एक विशेष प्रयत्न होता असे सर्वसाधारणपणे मत आहे. मला हे व्यक्तीश : अमान्य असले तरी बऱ्याच जणांना ते मान्य असल्याने त्याचा उल्लेख केला प्रत्यक्षामध्ये पुरोगामी वादामध्ये विचार प्रणाली या गोष्टीचा प्रचंड हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप सर्वच विचारवंतांनी मांडलेल्या इतिहासामध्ये दिसून येतो प्रत्येक जण स्वतःच्या वर्गाचे किंवा स्वतःच्या प्रवर्गाचे किंवा स्वतःच्या वर्णाचे आणि जातीचे हितसंबंध सांभाळत इतिहासाची रचना करताना दिसतो त्यामुळे पुरोगामी इतिहासाबद्दलच्या ज्या अत्यंत आदराच्या अशा प्रतिमा होत्या त्या उत्तराधुनिकतेने फोडल्या कारण उत्तराधुनिकतेला असे लक्षात आले की हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या हितसंबंधांमध्ये गर्क होते आणि ज्ञानाचे संबंधसुद्धा इतिहासाचे संबंध सुद्धा इतिहास लेखनाचे संबंध सुद्धा हे हितसंबंधांच्या वर आधारित होते पुढे पुढे हे अधिकाधिक स्पष्ट होत गेले त्यामुळे साहजिकच पुरोगामीवादाची अजूनही जी रोमँटिक कल्पना भारतीय इतिहासकारांच्या मध्ये विशेषता मार्क्सवादी...
 माणसाचे सुरुवातीचे तीन हस्तक्षेप श्रीधर तिळवे नाईक  माणूस जोवर शाकाहारी होता आणि झाडाची फळे खात होता किंवा छोटे छोटे मुंग्यांसारखे प्राणी खात होता तोपर्यंत तो नैसर्गिक होता एका विशिष्ट प्रकारच्या कयामतीमध्ये किंवा जगबुडीमध्ये त्याला नाईलाजाने मांसाहारी बनावे लागले पण तो फक्त तिथेच थांबला नाही त्याने शिकार करायला सुरुवात केली आणि ही शिकार करण्यासाठी त्याने साधने शोधली इथेच त्याने शस्त्राचा शोध लावून त्यांचा वापर करत स्वतःच्या हाताचा हातातील ताकतीचा विस्तार केला हा त्याचा स्वतःमध्येच हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप प्रामुख्याने साधनांच्याद्वारे स्वतःच्या शरीराचा विस्तार या स्वरूपाचा होता साहजिकच तेव्हापासून माणूस हा विस्तार करतो आहे तो अजूनही चालू आहे म्हणजे आपल्या दुर्बिणी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या काही नसून आपल्या डोळ्याचा त्या विस्तार असतात आपल्या अवयवांचा हा विस्तार इतका व्यापक बनवण्यात आला आहे की माणसाने तयार केलेली साधने आणि शस्त्रे आता कुठेही घुसू शकत पृथ्वीवर सर्वात मोठा धुमाकूळ माणसाने निर्माण केलेल्या या साधनांचा आहे ज्यामध्ये शस्त्र येतात  माणसाचा दुसरा हस्तक्षेप हा पश...