माणसाचे सुरुवातीचे तीन हस्तक्षेप श्रीधर तिळवे नाईक 


माणूस जोवर शाकाहारी होता आणि झाडाची फळे खात होता किंवा छोटे छोटे मुंग्यांसारखे प्राणी खात होता तोपर्यंत तो नैसर्गिक होता एका विशिष्ट प्रकारच्या कयामतीमध्ये किंवा जगबुडीमध्ये त्याला नाईलाजाने मांसाहारी बनावे लागले पण तो फक्त तिथेच थांबला नाही त्याने शिकार करायला सुरुवात केली आणि ही शिकार करण्यासाठी त्याने साधने शोधली इथेच त्याने शस्त्राचा शोध लावून त्यांचा वापर करत स्वतःच्या हाताचा हातातील ताकतीचा विस्तार केला हा त्याचा स्वतःमध्येच हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप प्रामुख्याने साधनांच्याद्वारे स्वतःच्या शरीराचा विस्तार या स्वरूपाचा होता साहजिकच तेव्हापासून माणूस हा विस्तार करतो आहे तो अजूनही चालू आहे म्हणजे आपल्या दुर्बिणी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या काही नसून आपल्या डोळ्याचा त्या विस्तार असतात आपल्या अवयवांचा हा विस्तार इतका व्यापक बनवण्यात आला आहे की माणसाने तयार केलेली साधने आणि शस्त्रे आता कुठेही घुसू शकत पृथ्वीवर सर्वात मोठा धुमाकूळ माणसाने निर्माण केलेल्या या साधनांचा आहे ज्यामध्ये शस्त्र येतात 


माणसाचा दुसरा हस्तक्षेप हा पशुपालनापासून सुरू होतो इथे माणसाने शिकार करण्याऐवजी पशुपाळणे सुरू केले ज्यामध्ये नंतर नंतर खुद्द माणूस सुद्धा एक पशु म्हणून पाळला जाऊ लागला आणि त्यातूनच शत्रु पक्षातील ही माणसे गुलामगिरी मध्ये ढकलली गेली गुलामगिरी हा पशुपालनाचा साईड इफेक्ट आहे हे अनेकांना आजही उमगलेले दिसत नाही त्यामुळेच पशुपालनातून आलेले सर्व धर्म मग तो ज्यू धर्म असो किंवा ख्रिश्चन धर्म असो किंवा इस्लाम धर्म असो गुलामगिरीला अनुमती देतात जगातले शैव धर्म सोडला तर सर्वच धर्म पशुपालनातून जन्मलेले आहेत आणि त्यामुळेच ते गुलामगिरीला मान्यता देतात आपल्याकडे ब्राह्मण धर्माने अशी गुलामगिरीची व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि ती प्रचंड व्यापक आहे माणूस पशुपालनासाठी केवळ थांबला नाही तर त्याने नंतर इतर पशुंचे अस्तित्व धोक्यात आणायला सुरुवात केली. जे जे पशु आपल्याला उपयुक्त आहेत तेथे कसलाही विचार न करता वापरायचे इतकेच माणसाला ठाऊक आहे यामध्ये हत्तींचा बळी सुद्धा पडलेला दिसतो माणसाच्या दृष्टीने पशु हा केवळ एक उपयुक्त वस्तू आहे आणि तो या वस्तूंचा वापर करताना अनिर्बंध होत जातो आणि परिणामी आज जगातील जवळजवळ सर्वच पशुंच्या प्रजाती माणसाने नष्ट केलेल्या आहेत आणि ज्या काही शिल्लक आहेत त्या सुद्धा तो नष्ट केल्याशिवाय गप्प बसेल असे वाटत नाही 


माणूस फक्त पशुंच्या जगात हस्तक्षेप करून थांबला नाही त्याने शेवटी वनस्पतींच्या म्हणजेच किंगडम प्लांटमध्ये सुद्धा हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि या हस्तक्षेपातूनच प्रथम बाग आणि नंतर शेती जन्मलेली आहे बागेमध्ये मनुष्य शक्यतो नैसर्गिकरीत्या वनस्पती वाढू देतो पुढे पुढे अर्थात तिथेही शेती घुसली आणि बाग शेती आली प्रत्यक्ष शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून निसर्गाच्या किंग्डम वनस्पती मध्ये केलेला माणसाचा तिसरा हस्तक्षेप आहे आणि या हस्तक्षेपाने संपूर्ण जंगले माणसाने कापायला सुरुवात केली आणि सर्व जमिनी या जणू काय मानवी शेतीसाठी जन्मलेले आहेत अशा तऱ्हेची धारणा समाजामध्ये रुजवली परिणामी आपण शेतीच्या द्वारे काहीही करू शकतो असा एका ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मनुष्य जमात पोहोचलेली आहे याचे परिणाम व्हायचे तेच झाले पृथ्वीच्या समतोलासाठी आवश्यक असलेल्या वनस्पती सुद्धा माणसाने नष्ट केलेल्या आहेत आणि आता मनुष्य समुद्रामध्ये घुसतोय जिथून जवळजवळ 50% ऑक्सिजन आपणाला मिळतो या ऑक्सिजन मध्येच एकदा माणसाने हस्तक्षेप केला की कदाचित माणसाच्या विनाशाचा आरंभ होईल कारण निसर्ग स्वतः कधीही नष्ट होणे शक्य नाही स्वतःला नष्ट करू देणे शक्य नाही त्यामुळे त्याच्याकडून प्रत्युत्तर येणारच आणि बहुधा तीच नंतरची जगबुडी किंवा कयामत आहे ती येणे अटळ आहे 


माणसाचा वायू आणि हवामानामध्ये हस्तक्षेप नव्हता तो सुद्धा आता हळूहळू होईल आणि वाढत जाईल आणि कदाचित मग ही भ्रष्ट झालेली हवाच माणसाला खाऊन टाकेल 


मानवी जीवनाचे आधीचा इतिहास तपासायचा असेल तर हे तीन टप्पे लक्षात घ्यावे लागतात 


श्रीधर तिळवे नाईक

भारतातील स्वातंत्र्याचा आणि स्वतंत्रतेचा अर्थ श्रीधर तिळवे नाईक 


भारतात स्वतंत्र असण्याचा अर्थ वेगळा आहे मुळातच केवळ स्वतंत्र असण्यापाशी भारतीय थांबत नाहीत ते त्यापुढे जाऊन मुक्तीचा शोध घेतात मोक्षाचा शोध घेतात निर्वाणाचा शोध घेतात कैवल्याचा शोध घेतात आणि म्हणूनच भारतीय इतर देशांच्यापेक्षा वेगळे ठरतात अर्थात असे लोक इतर देशात सुद्धा जन्मलेले आहेत मात्र त्यांची जेवढी संख्या भारतात दिसते तेवढी इतर देशांमध्ये दिसत नाही 


प्रश्न असा आहे की मुक्ती आणि स्वातंत्र्य यांच्यामध्ये फरक आहे की नाही तर हो हा फरक आहे हा फरक समजून घ्यायचा असेल तर प्रथम मोक्ष म्हणजे काय हे समजून घ्यावे लागते आणि मग मोक्ष (निर्वाण कैवल्य वगैरे सुद्धा मोक्षाचीच वेगवेगळी नावे आहेत असे मी मानतो)मिळवण्यासाठी समाजामध्ये स्वातंत्र्य असावे लागते हे लक्षात घ्यावे लागते मोक्ष म्हणजे मिती मुक्त समग्र स्वातंत्र्य समग्र मोकळीक म्हणता येईल परंतु स्वातंत्र्य हा शब्द वापरण्यापेक्षा आपल्याकडे कायमच मुक्ती असा शब्द वापरलेला आहे आणि तो योग्य आहे मोक्ष म्हणजे तुमच्या असोशीं(भूक , तृष्णा, निकड)च्यापासून संपूर्णपणे मुक्ती !


मात्र ही मुक्ती हा मोक्ष सहजासहजी साधत नाही त्यासाठी द्वादशशीलतेची साधना करावी लागते आणि ही साधना करण्यासाठी आवश्यक त्या मिती उपलब्ध करून देणे हे अत्यंत आवश्यक असते या मितींच्यामध्ये सध्या आपणाला पाच मिति स्पष्टपणे दिसतात 

१लांबी २रुंदी ३खोली ४काळ आणि ५ दिशा

यातील लांबी रुंदी खोली ह्या आपण आता अवकाशाच्या रूपाने पहात असतो आणि त्यामुळेच अनेकदा त्यांची स्वतंत्र चर्चा होण्याऐवजी आपण अवकाश म्हणूनच त्यांची चर्चा करतो त्यामुळे प्रत्यक्षामध्ये अवकाश, काळ आणि दिशा या तीनच गोष्टींची चर्चा अधिक होते यामध्ये अनेकदा होते काय की लांबी आणि रुंदी यांच्यामध्ये सर्व चर्चा रंगत जातात आणि खोली मात्र येतच नाही खोलीमध्ये अनेक गोष्टी असतात त्यामध्ये मुख्य म्हणजे जिला आज आपण इंग्लिशमध्ये डेप्थ म्हणतो मराठीत गहनता म्हणतो ती फार महत्त्वाची असते आणि ही गहनता गाठण्याचे स्वातंत्र्य जर का समाजामध्ये नसेल तर मग तो समाज रसातळाला जायला लागतो 


सर्वसाधारणपणे पंचशील ही अनेकदा फेमस झालेली आहेत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पंचशीलांच्यापाशी थांबून आता चालत नाही तर आपणाला द्वादशशीलतेपाशी यावे लागते कारण समाज बदललेला आहे आणि त्या बदललेल्या समाजात आता फक्त पंचशील आपणाला पुरत नाहीत तर आपणाला बारा शिलांचा विचार करावा लागतो ही बारा शिले पुढील प्रमाणे 

१ सत्य : समाजामध्ये सत्य काय आहे , वास्तव काय आहे , तथ्य काय आहे याचा शोध घेता येणे तो शोध मांडता येणे आणि त्या शोधा संदर्भात कुठलाही वादविवाद मोकळेपणाने करता येणे हे अत्यंत आवश्यक आहे

२ अहिंसा : कुठल्याही माणसाने दुसऱ्या माणसाची हत्या करता कामा नये अपवाद फक्त जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आक्रमण अनेकांचे बळी घेऊ शकते अशी शक्यता अशा वेळी मात्र संरक्षण करण्याचा अधिकार आहे

३ अचौर्य : कसल्याही प्रकारची कुठल्याही गोष्टीची चोरी समाजामध्ये होता कामा नये व्यक्तीने अशी चोरी करता कामा नये यामध्ये श्रमिकांच्या श्रमांची सुद्धा चोरी मालकाने करू नये त्यांच्या श्रमांच्या बदलात योग्य तो मोबदला दिला पाहिजे 

४ अपरिग्रह आवश्यकतेपेक्षा अधिक गोष्टीचा संग्रह करणे आणि तो अनेक दिवसांच्या साठी करणे हे सुद्धा निषिद्ध आहे

५ अव्यसन किंवा निर्व्यसन : सिगरेट दारू जुगार यासारख्या सर्व व्यसनांच्यापासून नशा देणाऱ्या सर्व पदार्थांच्यापासून मुक्ती ही अत्यंत आवश्यक असते

६ करुणाआनंद: सर्व प्राणीमात्रांच्याकडे करूणेने आनंदाने पाहणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे अलीकडे निसर्गाकडेच करूणेने आनंदाने पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे 

७ सुकाम : काम संबंधांमध्ये कोणावरही कसलीही सक्ती न करणे , बलात्कार न करणे

८ मृत्यू, रोग, म्हातारपण यांचा आनंदाने स्वीकार करणे विशेषतः आपण मर्त्य आहोत याची सतत जाणीव ठेवणे खोट्या अमरतेत न अडकणे 

९ अस्तेय : दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या कामाची चोरी न करणे ज्याचे श्रेय आहे त्याला ते देणे आणि जर कोणी असे श्रेय घेत असेल तर त्याला विरोध करणे हे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा समाजातील सगळी सृजनशीलताही चोरीला जाते आणि मग सृजनशीलतेचे सारे मार्ग खुंटायला लागतात 

१० अप्रसिध्दी: सिद्ध होण्याआधी कुठल्याही किर्तीची अपेक्षा न करणे व कीर्तीची आसक्ती न धरणे

११ अप्रमाद निर्णय घेताना कुठल्याही वैयक्तिक आसक्तीचा हस्तक्षेप होऊ न देणं म्हणजेच प्रमाद न करणे प्रमाद हा नेहमीच आसक्तींच्यामुळे निर्माण होतो ज्याला आज बायस म्हटले जाते तो आसक्तीमुळे निर्माण होतो ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अप्रमात अतिशय महत्त्वाचा असतो आणि विज्ञानामध्ये सातत्याने प्रमाद होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरली जाते म्हणूनच वैज्ञानिक स्वातंत्र्य हे अतिशय आवश्यक आहे जर एखादा देश वैज्ञानिक स्वातंत्र्य नाकारत असेल तर तो रसा तळाला जातो झालेले प्रमाद दुरुस्त करण्याचे स्वातंत्र्य ही असले पाहिजे. विशेषतः ज्ञानाच्या क्षेत्रात तर हे कमालीचे आवश्यक आहे 

१२ निरहंकार अहंकाराचा समूळ नाश मीपणाचा समूळ नाश होणे


या द्वादशीशीलतेंला सांभाळण्याची असलेली मितिय मुभा म्हणजे स्वातंत्र्य होय ज्या देशांमध्ये असे स्वातंत्र्य दिले जात नाही तो देश स्वतंत्र देश आहे असे म्हणता येत नाही 


जोपर्यंत भारतात हे स्वातंत्र्य येत नाही तोपर्यंत तो राजकारणी लोकांचा गुलामच आहे असे म्हटले पाहिजे तेव्हा राजकारणी लोकांची गुलामगिरी आपण करत आहोत का? याची चौकशी आता करण्याची वेळ आलेली आहे 


भारत हा मोक्ष केंद्र स्थानी असलेला देश आहे याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो पण या विसर पडण्यामुळेच भारतातली अनैतिकता प्रचंड प्रमाणात वाढत गेली आणि भारताचा मूळ स्वभाव लक्षात न घेताच पुरोगामी लोकांनी काही भलतेच उद्योग केले. प्रत्येक देशाचा स्वतःचा एक सांस्कृतिक स्वभाव असतो तो स्वभाव डावलून काहीही करता येत नाही भारताचा मोक्षिक स्वभाव नाकारल्यानेच आज भारतातले अनेक पेचप्रसंग निर्माण झालेले आहेत तुम्ही एकदा मोक्ष नाकारला की त्या जागी बरोबर धर्म येऊन बसतो मोक्ष ही स्वयंभू गोष्ट आहे तर धर्म ही त्या जागी असलेली अत्यंत चुकीची रिप्लेसमेंट आहे ही रिप्लेसमेंट शक्य होते कारण मोक्षाला आपण वारंवार प्लेसमेंट नाकारत राहतो तेव्हा स्वातंत्र्याचा विचार करताना आपण तो भारतीय चौकटीतच करावा हे उत्तम आणि ही भारतीय चौकट फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर जिथे जिथे मोक्ष स्वीकारला जातो , मोक्षशीलता स्वीकारली जाते , द्वादशशीलता स्वीकारली जाते तिथे तिथे हा मोक्ष ,ही मोक्षशीलता , ही द्वादशशीलता लागू होते 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

मोक्ष LOVE