मोक्ष LOVE

 सौंदर्यतऱ्हा सादर होत आहेत 


हाताने केसाचे अश्व उधळणे 

ओठाचा चंबू करून बांबू लावणे 

बोटांचे सर्प नाकासमोरून ओढणे 

दोन बोटांनी डोळ्यातील पाण्यासमोर मासे बनवणे 

जाणीवपूर्वक स्तनखळी उघडी टाकणे 

पापण्या लवलवत विजांना धार काढणे 

कारण नसताना स्तनांना फुटबॉल बनवणे 


देहाच्या थेंबातून तयार होत जाणाऱ्या नद्या 

डोळे ओले होत नाहीत वासना ओल्या होतात 


शिट्या वाजवणाऱ्या मिठ्या 

गरम होणारे हात 

टेकाडापोटी काडकन मोडणारे पुरुष 


शेकोट्या पेटवायला अग्नीची साधना 


स्क्रीन नेमके किती स्कीन खातात 


ऑफिसमध्येसुद्धा वेळ वाया घालवणारे लोक 


डोळे भाजून घेऊन नेमके काय आत भाजतात 

भास भासतात की पोळतात?


ब्युटी ही ड्रग बनत असेल 

तर नेमका कोणता ट्रॅफिक 

जाम होत असेल ?


की हे सर्व स्ट्रेस बस्टर आहे ?


मी विद्यार्थ्यांना आवरावे की सावरावे या विवंचनेत 


हा डिजिटल मधून वाहणारा निसर्ग आहे की डिजीरोगाची साथ?


भासच स्टॅंडर्ड सेट करत चाललेले 

आणि दिवसेंदिवस फिके पडत चाललेले वास्तव 


मेकअपचा भडिमार अधिकाधिक स्वतःला आभासी बनवणारा 


प्रथमच स्किन स्क्रीन फॉलो करतीये 


आता मी हृदयाच्या जागी हार्ट इमोजी प्लेस कराव्यात का? 


श्रीधर तिळवे नाईक 


(मोक्ष सिरीज मधील मोक्ष साइड इफेक्ट या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना