इतिहास आणि कालगणना श्रीधर तिळबे
भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न १
श्रीधर तिळवे नाईक
शैव श्रुती मधल्या लोकांच्या मध्ये अनेकदा शंकराचा उल्लेख निळकंठ असा होतो या उल्लेखा मागे नेमके काय आहे याचीही कल्पना सध्या अनेकांना नाही
नीलकंठ याचा अर्थ आहे इतिहास कंठीत करणारा ! त्यामुळेच युवान स्वांग च्या प्रवासवर्णनामध्ये इतिहास सर्व प्रादेशिक राजवटी जतन करत असल्याचा उल्लेख येतो. मात्र त्यांचा उल्लेख निलपिठ असा येतो आणि तो शंकराच्या नीलकंठावरून आलेला आहे
इतिहास आणि पुराने या दोन गोष्टी वेगळ्या मांडल्या जात होत्या
लोकांच्या मध्ये 1000 नंतर सर्वसाधारणपणे दंतकथेच्या स्वरूपातला इतिहास हाच भारतात जास्त प्रचलित झाला होता पण निदान बाणाच्या कालखंडात तरी गोष्ट वेगळी असावी बाणाच्या कादंबरी या ग्रंथात राजकुमार चंद्रपीड याला जे शिक्षण दिलेले आहे त्यात महाभारत इतिहास पुराण आणि रामायण एवढेच विषय शिकवले जात होते असे दिसते याशिवाय प्रबंध, कहानी यांचाही समावेश दिसतो हे सर्व पौराणिक धर्माचे लक्षण आहे हे तर उघडच आहे आणि पौराणिक धर्मात वाढलेल्या राजकुमारांचे काय होणार ? प्रश्न इतकाच आहे की पुराण आणि इतिहास या दोन गोष्टी वेगळ्या काढलेल्या दिसतात मग हे इतिहास कुठे गेले ? इथे स्पष्टपणे पुराण आणि इतिहास वेगळे काढलेले आहेत
वैदिक धर्मात मात्र गोष्टी वेगळ्या झालेल्या होत्या विशेषता वैष्णव धर्मात उदाहरणार्थ महाभारतात तर एके ठिकाणी इतिहासाचा उपयोग हा वेदार्थ दृढ करण्यासाठी होतो असा उल्लेख आहे
तंत्र श्रुतीमध्ये आपणाला इतिहास वेगळा दिसतो उदाहरणार्थ शैव पंडित कल्हन ने आपल्या इतिहासामध्ये त्याच्यापूर्वी 11 इतिहासाचे ग्रंथ होऊन गेले ते सांगितलेले आहेत आणि हे सर्व कश्मीरच्या इतिहासाशी निगडित आहे हे सर्व कुठे गेले आजही समजलेले नाही एक गोष्ट नक्की आहे इतिहास फक्त शैवलोक जैन लोक आणि बौद्ध लोकं लिहीत होते तर वैष्णव धर्माचा मात्र पुराण लिहिण्याकडे महाकाव्य लिहिण्याकडेच कल होता शैव लोकांच्या मध्ये इतिहास हा विद्या होता पण नंतर मात्र त्याचे रूपांतर कलेत झालेले दिसते ६४ कलांच्यापैकी एक कला म्हणजे इतिहास असाही उल्लेख झालेला आहे
मुसलमान आक्रमकानी इतिहास नष्ट केला ही वस्तुस्थिती आहे आपल्या प्रेषिताच्या आधी जगात इतरत्र काही झालेच नव्हते हे सिद्ध करण्यासाठी हे सर्व झालेले आहे मात्र फार काळ हे झाकून ठेवणे शक्य झालेले दिसत नाही पुढे पुरोगामी कालखंड आल्यानंतर मात्र या अंगाने वेगळा विचार झालेला आहे
भारतीय इतिहासाची वैज्ञानिक मांडणी करणे हा पुरोगामी कालखंडाचा एक विशेष प्रयत्न होता असे सर्वसाधारणपणे मत आहे. मला हे व्यक्तीश : अमान्य असले तरी बऱ्याच जणांना ते मान्य असल्याने त्याचा उल्लेख केला प्रत्यक्षामध्ये पुरोगामी युगामध्ये विचार प्रणाली या गोष्टीचा प्रचंड हस्तक्षेप होता हा हस्तक्षेप सर्वच पुरोगामी विचारवंतांनी मांडलेल्या इतिहासामध्ये दिसून येतो प्रत्येक इतिहासकार स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या प्रवर्गाचे किंवा स्वतःच्या किंवा ज्याच्याबद्दल ममत्व आहे त्या वर्णाचे आणि जातीचे हितसंबंध सांभाळत इतिहासाची रचना करताना दिसतो त्यामुळे पुरोगामी इतिहासाबद्दलच्या ज्या अत्यंत आदराच्या अशा प्रतिमा होत्या त्या उत्तराधुनिकतेने फोडल्या कारण उत्तराधुनिकतेला असे लक्षात आले की हे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या वर्गीय किंवा प्रवर्गीय किंवा वर्णीय किंवा जातीय हितसंबंधांमध्ये गर्क होते आणि ज्ञानाचे संबंधसुद्धा इतिहासाचे, इतिहास लेखनाचे संबंध हे सुद्धा हितसंबंधांच्या वर आधारित होते पुढे पुढे हे अधिकाधिक स्पष्ट होत गेले विशेषता मिशेल फुको याने यासंदर्भामध्ये आर्किऑलॉजी ऑफ सेक्स अँड मॅडनेस मांडून अनेक गोष्टी उलगडल्या त्यामुळे पुरोगामी इतिहासाची भांडेफोड झाली साहजिकच पुरोगामीवादाची अजूनही जी रोमँटिक कल्पना भारतीय इतिहासकारांच्या मध्ये विशेषता मार्क्सवादीं आणि आंबेडकरवादी लोकांच्या मध्ये आहे ती उत्तराधुनिक किंवा चौथ्या नवतेच्या नवीन लोकांच्या इतिहासरचनेमध्ये आढळत नाही याउलट आपण जर का हिंदुत्ववाद्यांच्या कडे पाहिले तर त्यांना आपण काय करतो आहोत आणि आपण इतिहास वैज्ञानिक पद्धतीने मांडत नसून आपण इतिहास रचत आहोत याची स्पष्टपणे जाण होती असे दिसते किंवा अशी शंका येते स्वतःचे प्रतिगामी हितसंबंध सांभाळणे हीच सुरुवातीची मनशा दिसते अशी जाणीव समजा नसेल तर एक गोष्ट नक्की आहे हिंदुत्ववादी लोक सुद्धा स्वतःचा इतिहास स्वतःचे हितसंबंध जपतच इतिहास निर्माण करत असतात रचत असतात करत होते रचत होते .
भारताच्या पाठ्यपुस्तकातले इतिहास असे अनेकदा हितसंबंधांच्यावर आधारित विशेषत: सरकारच्या हितसंबंधावर आधारित आणि त्या सरकारने स्वीकारलेल्या विचारप्रणालीवर आधारित असलेले दिसतात त्यामुळे आपण शाळेत आणि कॉलेजला शिकलेला इतिहास हा एक रचला गेलेला इतिहास आहे हे कळणेच अनेक विद्यार्थ्यांना अशक्य होऊन बसले आणि आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या मध्ये शिकवला गेलेला इतिहासच खरा आहे असे मानणारे अनेक विचारवंत निर्माण झाले जे आजही कार्यरत आहेत ज्याचे राज्य त्याचा अभ्यासक्रम ही प्राचीन काळापासून असलेली एक वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीचे काय करायचे हे भल्या भल्या इतिहासकारांना आणि विचारवंत लोकांना कळत नाही आश्चर्याची गोष्ट अशी की किमान ही वस्तुस्थिती स्वीकारावी असेही अजूनही अनेकांना वाटत नाही साहजिकच आमची पिढी जी चिन्हकी मध्ये जन्मली आणि जालकीमध्ये वाढली होती तिला यासंदर्भामध्ये अत्यंत खोलात जाऊन चौकशी करण्याची वेळ आली आहे त्यातूनच चौथ्या नवतेचे इतिहास आता आकाराला येताना दिसतात
भारत हे कधीही धार्मिक दृष्ट्या एकधर्मी भौगोलिक सातत्य नसल्याने वेगवेगळ्या धर्माच्या आणि दर्शनाच्या आणि मोक्षाच्या मांडणीमुळे वेगवेगळ्या काल खंडाची निर्मिती करताना दिसतो वेगवेगळ्या काल गणनांची निर्मिती करताना दिसतो साहजिकच भारतामध्ये अनेक कालगणना गजबजलेल्या दिसतात प्रत्येक जण आपल्या हिशेबाने काल गणना करत असल्याने कालगणनांची एक दाटीवाटी आपणाला भारताच्या इतिहासामध्ये आढळते आणि प्रत्येक स्कूल ला स्वतःची कालगणना सुनिश्चित करून घ्यावी लागते म्हणजे डाव्या लोकांना इतिहास लिहिताना लोकायतांचा आधार असतो आणि ते शक्यतो त्यांचा इतिहास लोकायतांच्या पासून सुरुवात करायला बघतात किंवा मग प्राक्ऐतिहासिक कालखंडातील उत्पादन साधनांच्यावर ते लक्ष केंद्रित करतात तर आंबेडकरवादी इतिहासकार शक्यतो बुद्धाला केंद्रस्थानी ठेवायला धडपडतात खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्मावर असलेल्या कपिलच्या प्रभावाची चर्चा केलेली असूनही ते कपिलकडे येत नाहीत कारण कपिल कडे आले की शैव लोकांच्याकडे यावे लागते आणि ते त्यांना करायचे नाही.
आज 21 व्या शतकात सुद्धा त्यामुळेच श्रद्धा, धर्म किंवा मोक्ष (धम्म) या तीन गोष्टी इतिहास लिहिताना डॉमिनेट करत जातात उदाहरणार्थ व्हीं डी महाजन यांच्यासारखा अत्यंत प्रोफेसर टाईप लिखाण करणारा मनुष्य सुद्धा नकळतपणे हिंदुत्ववादी आणि वैदिक असतो आणि हा भारतीय अभ्यासक्रमामध्ये फार प्रमाण मानला जाणारा विद्यार्थी प्रिय लेखक आहे आणि असे असून सुद्धा तो त्याच्या वैदिक धर्मापासून मुक्त होत नाही असेच आपण जर का आंबेडकरवादी लोकांचा विचार केला तर आपणाला स्पष्टपणे दिसते की त्यांच्या कालगणनेवर गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे त्याचबरोबर गौतम बुद्ध हा केंद्रस्थानी ठेवण्याची ही धडपड दिसते त्यामुळेच आंबेडकरवादी इतिहासकार व इतिहास भारतीय इतिहास हा बुद्ध पूर्व , बुद्धकालीन आणि बुद्धोत्तर अशा तऱ्हेने विभागताना व विभागणी करताना दिसतात प्रत्यक्षामध्ये हा अहंकार आहे या उलट आपण जर का वैदिक लोकांच्याकडे गेलो तर ते आपल्या कालगणनेची सुरुवात वेदांच्या पासून करतात सिंधू संस्कृतीचा शोध लागण्याआधी भारतामध्ये इतिहास लिहिताना कायमच वेदांच्या पासून सुरुवात केली जात होती आणि आर्य हेच भारतीय संस्कृतीचे निर्माते आहेत असे भासवले जात होते साहजिकच सिंधू संस्कृतीचा जेव्हा शोध लागला आणि तिथे शिवलिंगे आढळायला लागली तेव्हा मात्र या सर्व लोकांची पंचाईत होऊन गेली कारण अशा प्रकारचा काही इतिहास या लोकांनी गृहीत धरला नव्हता आजही या इतिहासाचे काय करायचे या शिवलिंगांचे काय करायचे याबद्दल अनेक वादविवाद आहेत त्यातूनच मग हे शिवलिंग शिवलिंग नाही ते ग्रीक लोकांच्या मध्ये आढळणाऱ्या सृजनपूजेचा व अंधश्रद्धेचा भाग आहे हे सिद्ध करायला धडपडावे लागते पशुपतिनाथ हा पशुपतिनाथ नाही अशातऱ्हेची मांडणी करत चकवा द्यावा लागतो त्यासाठी अनेक फालतूचे सिद्धांत मांडावे लागतात अलीकडच्या काळात तर वैदिक लोकांनी सिंधू संस्कृती आपली संस्कृती होती असे भासवायला सुरुवात केलेली आहे जे अत्यंत चुकीचे आहे काही बौद्ध विद्वानांनी यासंदर्भामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक बुद्धाच्या आधीचा जो बुद्ध वंश होता त्याची रिलेशनशिप सिंधू संस्कृतीशी जुळवता येईल का ते ताडायला सुरुवात केलेली आहे किंवा मग आदिवासी लोकांशी ही संस्कृती निगडित करण्याची धडपड चालू झालेली दिसते काही लोकांनी तर आपले क्षत्रिय वंशज या संस्कृतीत शोधायला सुरुवात केली आहे येन केन प्रकारे बहुजन समाजाचा इतिहास डावलायचा आणि त्या जागी ब्राह्मण इतिहास किंवा क्षत्रिय इतिहास रचायचा असा हा डाव आहे आणि यामागे ब्राह्मणी इतिहासकारांचे संबंध आणि क्षत्रिय इतिहासकारांचे हितसंबंध कार्यरत असतात हे अत्यंत स्पष्ट आणि उघड आहे त्यामुळेच भारतीय इतिहासामध्ये अलीकडे ब्राह्मणी विचारवंत आणि क्षत्रिय विचारवंत यांच्यात लढाई चाललेली दिसते गमतीचा भाग असा की दोघेही स्वतःला वैष्णव किंवा ब्राह्मणी म्हणून घेत असतात दोघांनाही राम आणि कृष्णाची गरज लागते दोघांनाही रामायण आणि महाभारत प्रमाण मानावेसे वाटते
अशा या हितसंबंधांच्या वर आधारित असलेल्या अनेक प्रकारच्या भारतीय इतिहासांच्यातून मार्ग काढणे हे अत्यंत कठीण आहे या सगळ्यातून एक विचित्र गोष्ट पण उदयाला येते ते म्हणजे पुरातत्वीय पुरातत्वशास्त्रीय विवेचन! अनेक लोक पुरातत्त्व शास्त्राला प्रमाण मानत आणि बौद्ध इतिहास हा प्रामुख्याने पुरातत्वीय प्रमाणामध्ये सर्वाधिक पुरावे देणारा इतिहास असल्याने संपूर्ण भारत बौद्धमय असल्याची अत्यंत रोमँटिक कल्पना करत राहतात त्या उलट वैदिक विशेषता सर्व यूरोशिअन त्यातही अधिक ब्राह्मणधर्मीय लोक ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि आता अलीकडे काही शूद्रही येऊ लागलेले आहेत सर्वच काही वैदिक असल्याचे भासवत राहतात इथे अनेकदा वैदिक म्हणजे ब्राह्मणी असे समीकरण असते आणि त्यामुळेच खरोखरच वैदिकतेचे ब्राह्मणी धर्माशी काय नाते आहे याची चर्चा सुद्धा केली जात नाही
मी सातत्याने सांगतो आहे की वैदिक धर्म वेगळा आणि ब्राह्मण धर्म वेगळा ! अजून तरी हे फार काही मान्य होताना दिसत नाही अनेकदा ब्राह्मणांनी वैदिक धर्म ताब्यात घेतल्यामुळे वैदिक धर्म हाच ब्राह्मण धर्म असे समीकरण सरसकट स्वीकारण्याची प्रवृत्ती झालेली दिसते वास्तविक चार वेदांच्या मध्ये जी सूक्ते दिलेली आहेत ती स्पष्टपणे ऋषींची नावे सांगतात आणि त्यावरून वेद हे ऋषींनी रचलेले आहेत हे स्पष्ट आहे परंतु तरीही ब्राह्मण कोणत्या अधिकाराखाली वेद आपले म्हणतात हा एक खरोखरच प्रश्न आहे आणि ब्राह्मणेतर वैदिक लोक वैदिक धर्माला ब्राह्मणांच्या हवाली का करतात हा एक खरे तर भारतीय इतिहासातील कळीचा प्रश्न आहे वैदिक धर्माला ब्राह्मणांच्या हवाली करणारे विचारवंतांना सर्व ब्राह्मणेतर वैदिक कसे स्वीकारतात हाही खरोखर प्रश्न आहे . की अजूनही या ब्राह्मणेतर इतिहासकारांना आपल्या लिहिलेल्या इतिहासाला ब्राह्मणांनी मान्यता द्यावी असे वाटत असते ? असाही प्रश्न उद्भवतो उदाहरणार्थ सदानंद मोरे यांना नेहमीच ब्राह्मण इतिहासकारांची मान्यता गरजेची वाटत असते असे दिसते
एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे युरेशियन लोकांनी वैदिक श्रद्धेपासून धर्मापासून सुरुवात करत मग ब्राह्मण धर्म मग वैष्णव धर्म आणि अलीकडे हिंदू धर्म निर्माण केलेला आहे या हिंदू धर्मात सामील व्हायचे की नाही असा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये काही इतिहासकारांनी वैदिक विरुद्ध हिंदू अशी ही मांडणी केलेली दिसते उदाहरणार्थ पार्थ पोळके किंवा नंतर संजय सोनवणी वास्तविक हिंदू हे वैदिकांच्या पेक्षा वेगळे नव्हेच परंतु ते तसे असल्याचे सांगितले जाते खरी गोष्ट अशी आहे की शैव हा संपूर्णपणे स्पष्टपणे स्वतंत्र श्रुती असलेला असा मुख्य भारतीय आणि भारतीयांचा आदीधर्म आहे सततचा खोटा प्रचार झाल्याने अनेक शैव स्वतःला हिंदू समजतात आणि त्यातूनच आत्ताचे बहुजन समाजातले अनेक गोंधळ निर्माण झालेले आहेत आणि सर्व विचारवंतांनी हा सगळा गोंधळ कमी करण्याऐवजी अधिकाधिक वाढवलेला दिसतो ब्रिटिशांनी त्यांचे भारतीय साम्राज्य संघटित राखण्यासाठी जे कलोनियल हिंदू मेटॅनारेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण केले आणि मग भारतीयांनाही ते स्वीकारायला भाग पाडले आणि सुरुवात करून ते डेव्हलप करायला पुढे हातभारही लावला आणि सर्वांनाच हिंदू या कॅटेगरी खाली एकत्र आणण्याचा जो खटाटोप केला त्या साम्राज्यवादी व वसाहतवादी खटाटोपामुळेच हे सर्व घडते आहे आज अवस्था अशी आहे की सर्व शैव जे इथल्या एका अर्थाने आदिवासी पासून ते पंडितांच्या पर्यंत मोठा आणि विशाल असा कॅनवास घेऊन उभे आहेत त्यांना आता पूर्णपणे स्वतःची आयडेंटिटी नव्याने शोधण्याची गरज निर्माण झालेली आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतीय उच्चभ्रू इतिहासकार हे होऊ देत नाहीत त्या मागचे नेमके राजकारण काय आहे हे एकदा गजानन मुक्तिबोध यांच्या शैलीत विचारले पाहिजे क्या पॉलिटिक्स हैं?
अलीकडे हिंदुत्ववाद्यांनी त्यामुळेच सनातन धर्म ही संज्ञा वापरायला सुरुवात केलेली दिसते. हिंदूही संज्ञा वापरणे परवडत नसल्याने हे घडलेले दिसते पण हा यावरचा उपाय आहे का हाही खरे तर प्रश्न आहे हिंदू या शब्दाबाबत असून अडचण नसून खोळंबा अशी ही पंचायत आहे
प्राचीन भारतीय इतिहास हा साधारणपणे १ आदि शैव कालखंड २ वैदिक आणि लोकशैव कालखंड ३ ब्रह्म सांख्य कालखंड ४ ब्राह्मण आणि लोकशैव कालखंड ५ आगम कालखंड ज्यामध्ये लोकशैव व जैन आणि बौद्ध हे तीन येतात लोक शैव मध्ये भक्तीशैव , पाशुपतांच्यापासून नाथ संप्रदायापर्यंत अनेक जण येतात ६ लोकशैव आणि वैष्णव आणि वेदांत कालखंड
अशा सहा कालखंडांच्या मध्ये वाटचाल करतो
मुस्लिम आक्रमणानंतर भारताचा इतिहास बदलतो मध्ययुगीन होतो आणि आपणाला मुळातच अनेक लिखित पुरावे सुद्धा अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ स्वरूपात दिसतात मिळायला लागतात याचे श्रेय अर्थातच आपणाला मुस्लिम इतिहासकारांना द्यावे लागेल कारण तपशीलवार वृत्तांत जितके मुस्लिम इतिहासकारांनी लिहिले तसे तपशीलवार वृत्तांत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लिहिले गेले नव्हते अर्थातच अपवाद आहेत परंतु ते अपवादच आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे या अपवादांनाही अर्थातच जबाबदार शैव आहेत विशेषता कल्हण याचा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ यासंदर्भात फार महत्त्वाचा आहे
भारताचा प्राचीन इतिहास हा प्रामुख्याने मुसलमान पूर्व इतिहास आहे हे कबूल करावे लागते
हा इतिहास हा प्रामुख्याने लिखित आणि पुरातत्वीय प्रमाणाच्या आधारे निश्चित करण्याकडे कल असल्याने आणि शैव लोकांचा इतिहास हा प्रामुख्याने मौखिक असल्याने अनेकदा सर्वच विशेषता शैव इतिहासकाराची फार मोठी पंचाईत झालेली दिसते गमतीचा भाग असा की आफ्रिकेच्या इतिहासामध्ये मौखिकतेला जे स्थान मिळालेले आहे त्याचे कौतुक करणारे भारतीय विचारवंत लोक किंवा आदिवासी संस्कृतीतील मौखिकतेचे कौतुक करणारे लोक जेव्हा हीच मांडणी शैव धर्मासंदर्भात उदयाला यायला लागते तेव्हा नाकारायला लागतात म्हणजे ब्राह्मण धर्मी लोकांनी जर का वेद हे मौखिक होते आणि त्यांची जडणघडण इसवी सन पूर्व १५०० पासून सुरू होते असे मांडले तर तिथे मौखिक परंपरा मान्य केली जाते (प्रत्यक्षामध्ये वैदिक लोकांचा लिखित इतिहास इसवी सन 1000 पासून उपलब्ध होतो ) परंतु शैव लोकांचा इतिहास हा जर का अशाच मौखिक परंपरेमध्ये फार प्राचीनतेपर्यंत जात असेल तर तो नाकारला जातो या मधला विरोधाभास आणि दांभिकता उघड आहे
वास्तविक ब्राह्मण धर्मी लोकांनी आठव्या शतकापासून अत्यंत जाणीवपूर्वक शैव श्रुतीचा उल्लेख तंत्र श्रुती असा केलेला आढळतो अनेकदा तर वैदिक इतिहास मानणारे लोक सुद्धा तंत्रश्रूती ही आधीची श्रुती आहे आणि म्हणूनच तिला वैदिक श्रुती इतकेच महत्त्व आहे हे मान्य करतानाही अधून मधून दिसतात याचे कारण हळूहळू तंत्र हा शब्द व तंत्र हेच जास्त प्रचलित होत गेले आणि साहजिकच त्यामुळे बदनामी करता येणे सुद्धा अधिक सोपे होते बौद्ध आणि जैन या दोन धर्मांनी तर तंत्र स्वीकारले पण वैष्णव लोकांनी मात्र तंत्राचा प्रचंड मोठा स्वीकार केला कारण सामान्य माणसाशी निगडित असलेले हे तंत्र त्यांना आकर्षित करायला लागले आणि मुख्य म्हणजे शैव श्रुती मधील भक्ती त्यांना स्वीकारावी लागली कारण तिथे त्यांचा धार्मिक धंदा होता मुळातच सामान्य माणसे अनेकदा भावतंत्राने मार्गाने मोक्षाला पोहोचवतात किंवा मग त्यांना व्यवहारिक पातळीवर देवाकडून काही आवश्यक वाटते म्हणून भक्ती स्वीकारली जाते ती चायना आणि जपानच्या संस्कृतीमध्ये सुद्धा आपणाला आढळते आणि म्हणूनच आपल्याला अनेक बौद्ध मंदिरे तिथेही आढळतात भारत हा एकमेव देश कदाचित असा असेल की जिथे ज्ञान , शक्ती, शरीर ,क्रिया यांना सुद्धा मोक्ष किंवा ईश्वराच्या प्राप्ती संदर्भात महत्त्वाचे मानलेले गेलेले दिसते
प्रश्न असा आहे की मौखिकतेचा इतिहास म्हणून कितपत स्वीकार करावा आणि शैवांचा इतिहास कसा लिहावा म्हणजे पोतराजाने शंकराबद्दल म्हणताना वेदांच्या आधी तू होतास असे म्हटले (आपल्याकडे बाबुराव बागुलांनी माणसाबाबत असे म्हटलेले आहे की वेदांच्या आधी तू होतास आणि ती कविता फार गाजली होती पण अनेकांना हे माहीत नाही की पोतराजांचे हे मूळ शैव काव्य आहे आणि या पोतराजाच्या काव्याची मुख्य प्रेरणा शैव आहे आणि ते शिवाला उद्देशून आहे ) तर आपण मौखिक परंपरा प्रमाण मानून हे स्वीकारणार आहोत का की वेदांच्या आधी सुद्धा शिव होता ? वास्तविक जवळजवळ सर्वच समाजशास्त्रीय विचारवंत ऐतिहासिक विचारवंत ज्यात बाबासाहेब आंबेडकर पण येतात इरावती कर्वे पण येतात आडवाटेने शंकर हा वेदांच्या आधी आहे अनार्य आहे किंवा शंकर हा भारताचा मुख्य देव आहे हे कबूल करत असतात परंतु प्रत्यक्ष इतिहासाची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ही गोष्ट कशी स्वीकारायची हे समजत नसल्याने आणि लिखित पुरावे तर सापडत नसल्याने करायचे काय असा फार मोठा प्रश्न पडत असतो इंग्रजांच्या कालखंडामध्ये निदान पुरातत्वीय पुरावे शोधण्याची धडपड होती पण ही धडपड सुद्धा प्रामुख्याने बुद्ध केंद्री आणि जैन केंद्री होती साहजिकच भगवान शिवांना त्यांच्यामध्ये स्थान नव्हते पण निदान वैदिकतेच्या विरोधात ठाकलेल्या या दोन धर्मांना काहीतरी मान्यता मिळालेली दिसते. शैव श्रुती बाबत हे घडताना दिसलेले नाही स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये तर काँग्रेसने अत्यंत जाणीवपूर्वक शैवांच्या दिशेने होऊ घातलेली उत्खनने होऊच दिलेली नाहीत एकीकडे बहुजन समाजाचे नाव घ्यायचे पण बहुजनांचा असलेला धर्म मात्र स्वीकारायचा नाही हे काँग्रेसचे धोरण होते आणि या धोरणासाठीच अनेक झारीतले xxचार्य व्यवस्थित वाट अडवून नोकरशाहीत बसलेले होते खरे तर शुक्राचार्य हा शब्द सुद्धा मला वापरायचा नव्हता कारण शुक्राचार्य स्वतःच शैव होते
सर्वसाधारणपणे ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये हिंदू धर्माऐवजी ब्राह्मण धर्म हा शब्द वापरला जात होता कारण या काळातले सर्व हिंदू ब्राम्हणांनाच आपले पुरोहित मानत होते असे ब्रिटिशांचे मत होते (प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये या काळात जणू काय सर्व काही ख्रिश्चन असल्याच्या थाटात चाललेले होते. प्रत्यक्षामध्ये युरोपमध्ये अनेक वेगळे संप्रदाय अस्तित्वात होते हे आता नवीन इतिहासांच्या मध्ये सिद्ध झालेले आहे)प्रत्यक्षामध्ये ते खरे नव्हते कारण अनेकदा या काळामध्ये गावांच्यामध्ये आणि अनेक शहरांच्या मध्ये सुद्धा गुरव किंवा तत्सम शैव पुरोहितच ज्यांना ब्रिटिश हिंदू म्हणतात त्यांचे पुरोहित म्हणून काम करत होते ब्रिटिशांनी ब्राह्मणांना दिलेला आश्रय हा त्यांना आंधळा बनवणारा ठरला त्यामुळे जनतेकडे थेट पाहण्याऐवजी ते ब्राह्मणांच्या चष्म्यातून पाहत होते यामुळे वसाहत वादाला कळत नकळत ब्राह्मणी वसाहत वादाचे किंवा वसाहतीक ब्राह्मणी वादाचे स्वरूप प्राप्त झाले भारतातल्या वसाहतवादाची चर्चा करताना आपणाला अनेकदा इतर देशांच्यातली मॉडेल्स बाजूला काढून ठेवावी लागतात हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या स्थानिक जमातींच्या मध्ये अनेकदा अशा काही जमाती दिसतात जिथे पुरोहित शाही प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉमिनेट आहे आपल्याकडेही अशीच काहीशी वस्तुस्थिती आहे आणि हे घडण्यामध्ये मुस्लिम राजवटीचा प्रचंड मोठा वाटा आहे प्रथम मुस्लिमच होते ज्यांनी केवळ किताबी धर्म आहे म्हणून ब्राह्मण धर्माला मान्यता दिली आणि ब्राह्मण ग्रंथाचा वेद हा लिखित धर्मग्रंथ किंवा किताबी धर्म ग्रंथ आहे या एका किताबी गृहीतकाला मान्यता देऊन ब्राह्मण धर्मालाच सर्व भारतीय धर्मांचे मेंदू मानले भारतीय इतिहासाचे सर्वाधिक नुकसान हे मुस्लिमांनी केलेले आहे त्यांचीच ही विरासत वारसा पुढे ब्रिटिशांनी चालवला गेली हजार वर्षे त्यामुळेच भारताचा इतिहास आणि त्याचे लेखन हे अत्यंत गुंतागुंतीचे बनत चाललेले दिसते इतकेच नव्हे तर स्वतःच्या इतिहासावर क्लेम करण्याची बुद्धी सुद्धा शैव लोक विसरून गेलेले दिसतात ज्या लोकांना स्वतःची परंपरा दिसत नाही इतिहास दिसत नाही ते आपले भविष्य नीट बघू शकत नाही शैव लोकांच्या बाबतीत हे जितके खरे आहे तितके ते इतर कोणातच कोणाबाबतच खरे नाही
भारताचा इतिहास हा प्रामुख्याने दोन वर्ण लिहीत असतात पहिला ब्राह्मण वर्ण इतिहास लिहीत असतो आणि दुसरा हा क्षत्रिय वर्ण लिहित असतो सिंधू संस्कृतीचे काय करायचे हे न कळल्याने अलीकडे हे दोन्ही लोक वेगवेगळ्या मार्गाने ही संस्कृती बळकावण्याच्या दिशेने प्रयत्न करतात बहुजन समाजाला xx नसते अशा प्रकारचे गृहीतक यामागे आहे बहुजन समाज काही निर्माणच करू शकत नाही असेही इन डायरेक्टली या लोकांना सांगायचे असते वास्तविक या देशांमध्ये जे काही निर्माण केलेले आहे ते बहुजन समाजाने निर्माण केलेले आहे किंवा बहुजन समाजातल्या नायकांनी निर्माण केलेले आहे आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांनी या नायकांना क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्ण देऊन केवळ भडकवण्याचे काम केलेले आहे जेणेकरून सर्व श्रेय आपल्या पदरात पडावे इंग्रजांच्यामुळे वैश्य लोक हे केंद्रस्थानी आले आणि त्यांनी थोडा इतिहास वेगळा लिहिला परंतु त्यांना सुद्धा स्वतःच्या वैश्य वर्णत्वातून मुक्ती मिळालेली दिसत नाही याचे कारण भारतीय वैश्य समाज हाच मुळात कधीही ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णांच्या प्रभुत्वातून मोकळा झाला नाही बहुजन समाजातील बहुसंख्य लोकांनी नेहमीच या लोकांनी काही दावा केला की त्याला लगेच स्वीकारण्याची तत्परता दाखवलेली दिसते आणि आजही ते अशी तत्परता दाखवतात ही तत्परता अत्यंत हानिकारक ठरलेली दिसते आता हे स्पष्टपणे सांगायची वेळ आलेली आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण आणि वैश्य या वर्णांशी आमचा काडीचाही संबंध नाही आम्ही बहुजन आहोत आणि आम्हीच या देशाचे मालक आहोत यामध्ये प्रामुख्याने शैवपुरोहितांना मुख्य भूमिका निभावावी लागेल कारण जोपर्यंत पंडित किंवा गुरव हे स्वतःला स्वतंत्र आणि वर्णमुक्त करत नाहीत तोपर्यंत त्यांची शैव ही आयडेंटिटी प्रस्थापित होणे अशक्य आहे अनेकांना इतिहास लिहावासा वाटतो परंतु वैदिकतेपासून सुटका मात्र करून घ्यायची नसते याचा परिणाम असा झालाय की शैव मंदिरातून सांगितला जाणारा इतिहास हा प्रामुख्याने वैदिक इतिहासच असतो शैव इतिहास नसतो
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग ३ श्रीधर तिळवे नाईक
भारतातील भक्ती संप्रदाय हा फार प्राचीन भावतंत्राचा भाग आहे आणि तो प्रामुख्याने शैव तंत्राचा भाग आहे जैन आणि बौद्ध हे दोन्ही धम्म ज्ञानतंत्रातले आहेत साहजिकच तिथे मूर्ती पूजेची शक्यताच निर्माण झालेली नव्हती असे असताना सुद्धा भारतीय इतिहासामध्ये अनेकदा काही अति शहाणे इतिहासकार बुद्ध आणि महावीर यांच्यापासून शिवाची आणि विष्णूची मूर्ती निर्माण झाली असे भासवत असतात वास्तविक शैव-धर्मामध्ये भक्ती किंवा भावतंत्राचे जे तंत्र आहे त्यात शिवलिंगाची पूजा केली जात होती. पर्शियन आणि ग्रीक लोकांच्या आक्रमणानंतर मात्र आपल्याकडे ही मंदिरातील मूर्ती पूजा सुरू झाली त्यापूर्वी शैवधर्मी लोकांच्यात फक्त देव्हाऱ्यातच मूर्ती ठेवली जात होती
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवाची मूर्ती पूजा ही वेगळी गोष्ट आहे आणि शिवाची लिंग पूजा ही वेगळी गोष्ट आहे पण या गोष्टीतला फरक जाणीवपूर्वक समजून न घेता भावतंत्र किंवा भक्ती संप्रदाय हा जैन आणि बौद्ध धर्मातून निर्माण झालेला आहे अशा प्रकारची मांडणी काही लोक करत असतात त्यामुळे ही भारतीय कालगणना अधिक गुंतागुंतीची बनते वास्तविक यासंदर्भातले सत्य इतकेच आहे की युरेशियन लोकांनी शैवधर्म संस्कृतीकडून लोकांच्याकडून भक्ती स्वीकारली भाव स्वीकारला भाव तंत्र स्वीकारले आणि मूर्ती पूजा ही स्वीकारली मूळ बौद्ध धम्मामध्ये मूर्ती पूजा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे खुद्द जिवंत असताना सुद्धा गौतम बुद्धांनी कधीही आपली पूजा अलाव केली नाही किंबहुना स्वतःलाच प्रमाण मानाने हा त्यांचा उद्देश आहे उपदेशही आहे मग बौद्ध धर्मामध्ये मूर्तिपूजा कशी आली ?
बौद्ध धम्मातील आद्य असलेल्या गौतम बुद्धाच्या मूळ उपदेशातून निर्माण झालेल्या ज्ञानतंत्राचा जसा जसा पराभव होत गेला त्याचा प्रभाव कमी होत गेला तसा तसा भावसंप्रदाय स्वीकारून गौतम बुद्धाची आणि महावीराची पूजा प्रस्थापित केली गेली जेणेकरून जैन आणि बौद्ध धम्मातले लोक धम्म सोडून जाऊ नयेत आजही आपण हे पाहू शकतो की इस्लामची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे याचे कारण बहुतांशी लोक अजूनही भावतंत्रामध्येच अडकलेले असतात मुख्य म्हणजे तिथे मोक्षाच्या ऐवजी अनेकदा नवस बोलणे मन्नत मागणे अशा प्रकारच्या श्रद्धांजन्य गोष्टी करता येतात ज्या इतर तंत्रांच्या मध्ये अशक्य आहे ज्ञानतंत्रामध्ये नवस बोलणे बसत नसल्याने पुढे पुढे बुद्धाला नवस बोलणे शक्य व्हावे म्हणून बुद्धाच्या मूर्ती निर्माण करण्यात आल्या धर्म टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे हे तत्कालीन बौद्ध धर्म गुरूंना वाटले आजही हे योग्य होते की नाही हे ठरवणे अवघड आहे त्यातूनच मग बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना निर्माण झालेल्या दिसतात
सगुण ईश्वर हा प्रत्येक माणसाला हवासा
भारतीय इतिहासातील कालगणनेचे प्रश्न २
श्रीधर तिळवे नाईक
भारतामधील सिंधू संस्कृतीचे काही पुरावे विशेषत: पुरातत्वीय पुरावे उपलब्ध झालेले दिसतात पण सर्वात आश्चर्याची गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे वैदिक कालखंडाचे कसलेही पुरातत्वीय पुरावे उपलब्ध नाहीत याचा एक दुष्परिणाम असा झालेला आहे की असे पुरावे का नाहीत असा प्रश्न विचारण्याऐवजी अनेक युरेशियन लोक सिंधू संस्कृती मधील पुरातत्वीय पुराव्यांच्या वर वैदिक संस्कृतीचा क्लेम लावताना व ती वैदिक संस्कृतीच होती हे सिद्ध करताना दिसतात हा खोटारडेपणा आहे आणि तो स्वीकारला जाणार नाही याची जोपर्यंत युरेशियन इतिहासकारांना स्पष्ट जाणीव होणार नाही तोपर्यंत त्यांचे भवितव्य अंधारात लटकत राहणे अटळ आहे कारण जग आता तुमची थापेबाजी स्वीकारायला तयार नाही जग आता पुन्हा एकदा तुमच्याकडे पुरावे मागते आहे आणि तुमच्याकडे ते नसल्यामुळे तुम्ही लिहीत असलेला इतिहास हास्यास्पद होत चाललेला आहे
वास्तविक युरेशियन लोकांनी असा प्रश्न विचारला पाहिजे की असे पुरावे का नाहीत आणि या प्रश्नाचे उत्तर अनेकदा शैव संस्कृतीशी मिळते जुळते आहे आणि हे उत्तर आहे मुळातच या काळामध्ये वैदिक संस्कृती ही प्रामुख्याने मौखिक होती पुरातत्वीय पुरावे मागे सोडण्यासाठी मुळातच लिखित संस्कृती ही त्या संस्कृतीत विकसित व्हावी लागते आणि त्याचबरोबर नंतर कुठल्या ना कुठल्यातरी साधनावर असे लिखाण करता येण्याची किंवा उमटवण्याची कोरण्याची कला प्रगत व्हावी लागते शैव संस्कृतीच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे मुळात झाडावर झाडाच्या पानावर लिखाण केले जात असल्याने हे लिखाण टिकलेले नाही वैदिक संस्कृतीत मुळात लिखाणावर फारसा भरच नाही सर्व काही पाठांतर करायचे अशा प्रकारचा उद्योग प्रामुख्याने ब्राह्मणांनी आरंभल्याने फार मोठा सांस्कृतिक पुराव्यांचा घोळ वैदिक संस्कृतीत निर्माण झालेला दिसतो अलीकडे हा घोळ अत्यंत जाणीवपूर्वक निर्माण झाला की वैदिक लोकांनी विशेषता ब्राह्मणधर्मी लोकांनी असे पुरातत्वीय पुरावे नष्ट केले असा प्रश्न काही लोकांनी विचारायला सुरुवात केलेली आहे कारण बौद्ध धर्माचे असे पुरावे ब्राह्मणांनी गाडून टाकले होते अशा प्रकारचा सिद्धांत उदयाला येतो आहे मुळातच आपण जर का या संदर्भात कंबोडियाचे उदाहरण घेतले तर तिथले मंदिर मग कोणी गाडले असा प्रश्न विचारता येईल वस्तुस्थिती अशी आहे की मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या देशाच्या इतिहासाचे पुरातत्वीय पुरावे नष्ट करण्याचे आणि त्या सर्व पुराव्यांना मूर्ती पूजा या एका टायटलखाली बरबाद करण्याचे अनेक उद्योग मुस्लिम राजवटींनी केलेले दिसतात बुतखाना मान्य नसल्याने बुतखाना नष्ट करता करता भूतखानासुद्धा म्हणजेच भूतकाळखानासुद्धा नष्ट झालेला दिसतो अगदी नालंदा विद्यापीठाचे उदाहरण यासंदर्भात वारंवार दिले जाते आजही बख्तीयार खिलजीचा यासंदर्भातला रोल काय होता हे वादग्रस्त आहे
आपण मौखिक होतो ही गोष्ट जोपर्यंत वैदिक लोक स्वीकारत नाहीत तोपर्यंत ते असेच सांस्कृतिक परस्परविरोध प्रसवत राहणार
दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कृतचा प्रमाणभाषा म्हणून करण्यात आलेला स्वीकार ! संस्कृतमुळे प्रगती झाली नाही तर उलट प्रगती थांबली हे अजूनही अनेकांच्या लक्षात आलेले दिसत नाही ज्या वेळेला बहुजन समाज नवीन नवीन गोष्टी निर्माण करत होता तेव्हा तेव्हा वैदिक लोक हे ज्ञान संस्कृत भाषेत सुरुवातीच्या कालखंडात आणत असावेत परंतु नंतर मात्र ब्राह्मणांच्या ठाई अकारण वर्ण अहंकार निर्माण झाल्याने असे भाषांतर करणे थांबलेले दिसते उलट ब्राह्मण पुन्हा पुन्हा आपल्या प्राचीन ग्रंथांच्या मध्ये गटांगळ्या खात होते नवीन काही प्रत्यक्ष पाहण्याऐवजी शब्द प्रामाण्यामध्ये गुंतलेले होते संस्कृतने केवळ ज्ञान स्टोर केलेले आहे आणि त्याचा एक सार्थ अभिमान मी नेहमीच बाळगलेला आहे मात्र नवीन ज्ञान निर्माण करण्याच्या संदर्भात किंवा विज्ञान निर्मितीच्या संदर्भामध्ये मात्र जितके काम व्हायला हवे होते तितके काम झालेले नाही बहुजन समाजामध्ये त्या ज्ञानाला मान्यता मिळाल्यानंतर मग त्याचे संस्कृतकरण झालेले आहे
बाराव्या शतकापासून तर इतके संस्कृत प्रामाण्य वाढले की नवीन निर्मिती जवळजवळ थांबलीच सर्व काही रामायण आणि महाभारत यांच्या आधारेच लिहायचे किंवा पुराणांच्या आधारेच लिहायचे या गृहीतकामुळे भारतीय संस्कृती पुराणांच्या पलीकडे जायला तयार झाली नाही आणि यामुळे युरेशियन लोकांचे प्रचंड नुकसान झालेले दिसते पुढे अनेक शैवलोक युरेशियन संस्कृतीचे गुलाम बनल्यामुळे त्यांचेही यामध्ये नुकसान झाले अर्थात अधून मधून शैव राजवटी निर्माण होत राहिल्या आणि त्यांनी काही ना काही चांगले काम केलेले दिसते म्हणजे शिवाजी महाराजांची राजवट किंवा शिखांची राजवट मुळातच संस्कृत मध्ये ज्ञान साठले जाते पण ज्ञान निर्माण होण्याची प्रोसेस किती आहे हे विचारण्याची गरज आता आहे कारण नवीन युगाचे कसलेही ज्ञान संस्कृत मध्ये निर्माण होणे अशक्य बनत गेलेले दिसते त्यामुळे फक्त गौरव करण्यापूरती संस्कृत भाषा ठीक आहे पण तिच्यामध्ये कोणी आता नवीन संशोधन करेल किंवा नवीन संशोधन करून ते संस्कृत मध्ये मांडेल अशी शक्यता दिसत नाही आज ना उद्या ब्राह्मण लोकांनाही ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल दुर्दैवाने ती अजूनही स्वीकारली जात नाही हे घडले कारण ज्याला आज आपण विज्ञान म्हणतो ते निर्माण होण्याची प्रक्रिया संस्कृत भाषेने थांबवली पूर्वी निदान प्राकृत अथवा देशी भाषेत जे काही विज्ञान व्हायचे ते अनुवाद करण्याची तरी शक्यता होती तीही शक्यता पाचव्या सातव्या शतका नंतर नष्ट होत गेलेली दिसते याचे कारण विज्ञान हे पूर्णपणे वैश्य आणि शूद्र वर्णाकडे सोपवलेले दिसते आणि वैश्यशूद्रांना संस्कृत पासून वंचित केले गेले त्यामुळे संस्कृत मध्ये विज्ञान येण्याची शक्यता जवळजवळ संपलीच अपवाद फक्त काही शैव पंडित होते असे आता दिसते या सर्व पंडितांच्या वर अलीकडे ब्राह्मण ते ब्राह्मण होते असा युक्तिवाद करतात परंतु ते ब्राह्मण नव्हते पंडितच होते म्हणूनच ते हे विज्ञान निर्माण करू शकले हे आपण लक्षात घेतले पाहिजे अन्यथा विज्ञाननिष्ठ असे काही निर्माण झालेलेच नाही उलट सोवळ्यात आणि ओवळ्यात ब्राह्मणग्रंथ गुंतलेले आढळतात विशेषत: बाराव्या शतकानंतर हे वारंवार घडलेले दिसते आणि काल्पनिक ग्रंथ जास्त गजबज करताना दिसतात
अनेक संस्कृत ग्रंथांच्या मध्ये आपणाला ग्रंथकार त्याने कुठल्या ग्रंथांच्या आधारे हा ग्रंथ रचला हे सांगताना दिसतो परंतु प्रत्यक्षात ते ग्रंथ मात्र उपलब्ध होताना दिसत नाहीत म्हणजे कौटील्याच्या अर्थशास्त्रा आधीच आपल्याकडे शैव लोकांची अर्थशास्त्रे लिहिली गेलेली होती आणि ती प्राकृत भाषेत लिहिली गेलेली असावीत मात्र संस्कृत मध्ये त्या पुस्तकांच्या आधारे ग्रंथ निर्माण करताना त्याला पूर्णपणे ब्राह्मण ग्रंथ बनवलेले आहे असे स्पष्ट दिसते त्यामुळे वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार आपणाला या अर्थशास्त्रात झालेला दिसतो कारण लिहिणारा कौटिल्य व ब्राह्मण धर्मीय आहे त्यामुळे अनेकदा संस्कृत ग्रंथांच्या मधले हे उल्लेख केलेले ग्रंथ नेमके कुठल्या भाषेत होते हे आजही सांगता येत नाही ते संस्कृत मध्येच आहेत असं आपण गृहीत धरायचं
हे सर्व का घडले हे ही स्पष्ट आहे शैव धर्मातल्या लोकांना सुद्रांचा दर्जा अतिसुंद्राचा दर्जा देऊन आणि आदिवासी लोकांना जंगलात ठेवून किंवा वाणी आणि पणी लोकांचा व्यापार थांबवून त्यांचे सर्व ज्ञान हे संस्कृत पासून दूर ठेवण्यात आले. परिणाम इतकाच झाला की संस्कृत नुकसानीत गेली
एखादी भाषा फक्त संपर्क भाषा होणे आणि ज्ञानभाषा होणे यामध्ये फरक असतो प्राकृत किंवा देशी भाषांच्या मध्ये निर्माण झालेले साहित्य हे संस्कृत मध्ये आणून संस्कृतच्या द्वारे संपर्क साधणे ही गोष्ट वेगळी आणि खुद्द संस्कृत भाषेलाच ज्ञानभाषा बनवून तिच्यामध्ये वेगवेगळ्या नवीन ज्ञानाची भर टाकणे वेगळे ! संस्कृत ही आता ज्ञानभाषा वाटते याचे कारण अनेकदा प्राकृत भाषेत किंवा देशी भाषेत निर्माण झालेले ग्रंथ किंवा मौखिक परंपरा नष्ट झालेल्या आहेत अन्यथा संस्कृत भाषेतल्या अनेक ज्ञानाचे संदर्भ हे इथल्या लोक संस्कृतीमध्ये दडलेले आहेत किंबहुना शैवधर्माला लोकधर्म असा शब्द प्रचलित असलेला दिसतो त्याचे कारण शैव धर्माचा लोकभाषांशी आणि लोकांशी असलेला संबंध! प्राचीन काळातले पंडित हे लोकांशी संबंधित असलेले लोक होते ते हवेतल्या हवेत लिखाण करत नसत त्यामुळे त्यांनी केलेली लिखाण मात्र काही प्रमाणात विज्ञानाशी निगडित आहे
सर्वसाधारणपणे ज्याला बौद्ध लोक बुद्ध पूर्व कालखंड म्हणतात तो बारा हजार ते चार हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होता असे म्हणता येते
ज्याला आज आपण आगम कालखंड म्हणतो तो मात्र नकुशीश यांच्या पाशुपत दर्शनानंतर उदयाला आलेला दिसतो पुढे पुढे या पाशुपत दर्शनाचा पाशुपत धर्मही झालेला दिसतो ज्याचा उल्लेख अनेकदा मार्क्सवादी इतिहासकार करत असतात पाशुपत दर्शनानंतर त्यातून कपिलाचा षष्ठीतंत्रातून सांख्य धर्म उदयाला आला आणि या सांख्य धर्मातून आपणाला जैन आणि बौद्ध हे धर्म निर्माण झालेले दिसतात एकंदरच आपण हा आगम कालखंड पाशुपत ,सांख्य ,जैन आणि बौद्ध या चार आगमांचा कालखंड आहे असे म्हणू शकतो यामध्ये सुरुवातीला आपणाला ज्ञानमार्ग किंवा ज्ञानतंत्रे अधिक प्रभावी झालेली दिसते ज्यांनी ही दर्शने किंवा हे धर्म किंवा हे आगम स्थापन केले त्या सर्वांशी अनेकदा या आगमचे पालक प्रामाणिक राहिलेले दिसतात साहजिकच मूलधर्म नाहीसा झालेला दिसत नाही नंतर मात्र या धर्मांच्या मध्ये भक्ती तंत्र घुसलेले दिसते आणि अगदी भक्तीला प्रचंड विरोध करणारे जैन आणि बौद्ध धर्म सुद्धा महावीरांची आणि गौतम बुद्धांची पूजा करताना दिसतात यातूनच महायान निर्माण झालेले दिसते आणि ज्ञानतंत्राला यानंतर हीनयान समजले गेले आहे या भक्ती संप्रदायचा उदय झाल्यानंतर आपणाला अनेक बौद्ध जैन आणि शैव मंदिरे आणि पुढे वैष्णव मंदिरे निर्माण झालेली दिसतात इथूनच साहजिकच मग आपणाला पुरातत्वीय पुरावे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागतात आणि नंतर अनेक पुस्तके ही लिहिली गेलेली दिसतात यातून एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे लिखाणासाठी किंवा लिखित संस्कृतीसाठी भक्ती ही अधिक पूरक आहे की काय ? कारण आपण जर प्राचीन काळातल्या आफ्रिकन संस्कृतीकडे लक्ष दिले तर तिथे टॅबलेटस निर्माण झालेली दिसतात आणि ती प्रामुख्याने राजाला देव मानल्याने निर्माण झालेली दिसतात किंवा देवा विषयक दिसतात
या कालखंडानंतर अस्तित्वात असलेले पण फार प्रचलित नसलेले कारण जैन आणि बौद्ध या लोकांनी ब्रह्मचर्याचा केलेला गवगवा! तर ब्रह्मचर्याला ला झुगारून देणारे शक्तितंत्र सर्वच धर्मांच्या वर प्रभाव टाकताना दिसतात आणि प्रामुख्याने त्यातूनच बौद्ध तंत्र जैनतंत्र आणि वैष्णव तंत्र निर्माण झालेले दिसते हा सरळ सरळ शैव-धर्माचा थेट पडलेला प्रभाव आहे मात्र शैव-धर्मामध्ये जी विविधता दिसते ती विविधता इतर तंत्रांच्यात दिसत नाही कारण शैवधर्मी लोकांना जितके स्पष्टपणे तंत्राचे आकलन झालेले दिसते तितके ते इतरांना झालेले नाही
शक्ती तंत्रामध्ये अनेकदा यंत्रे फार महत्त्वाची असतात आणि ती या कालखंडात फारच बोकाळलेली दिसतात आणि याचाच एक दुष्परिणाम किंवा सुपरिणाम आपणाला असा दिसतो की अनेक शाक्तविधींचा आपणाला कागदोपत्री पुरावा दिसायला लागतो यातील सर्वात विचित्र गोष्ट ही बौद्ध धर्मामध्ये आहे कारण बौद्ध धर्मामध्ये वज्रयान नावाचे एक स्वतंत्र यान निर्माण झालेले दिसते आंबेडकरांनी याला बौद्ध धर्माचे पतन मानलेले आहे या शक्ती तंत्राचा प्रतिवाद करण्यासाठीच लक्ष्मी आणि सरस्वती यांचे महत्त्व वाढवणे व वैदिक लोकांच्यासाठी आणि ब्राह्मण लोकांच्यासाठी अटळ बनले आणि त्यानंतरच अनेक महालक्ष्मी आणि सरस्वतीची मंदिरे निर्माण झालेली दिसतात अनेक शाक्त देवता लक्ष्मी म्हणून नाम रूपाला आणण्याची धडपड केली गेलेली दिसते पुढे मग साहजिकच शक्ती तंत्रापाशी भारत थांबलेला दिसत नाही तो नंतर शरीर केंद्री योगकेंद्री झालेला दिसतो एका अर्थाने भोगाकडून योगाकडे ही वाटचाल आहे याच काळामध्ये शैव-धर्मामध्ये आपणाला राजयोग हा शब्द उदयाला आलेला दिसतो जो पुढे विवेकानंद यांनी वापरलेला आहे हठयोगाचे वाजवीपेक्षा जास्त स्तोम माजलेले दिसते आश्चर्याची गोष्ट अशी की क्रिया तंत्र मात्र या काळामध्ये फारसे ॲक्टिव्ह झालेले दिसत नाही ज्ञानतंत्रामधून आलेल्या नाथ तंत्रामधून आपणाला पुन्हा एकदा नवनाथ संप्रदाय उदयाला आलेला दिसतो
ज्याचा मध्ययुगीन महाराष्ट्रावर प्रचंड प्रभाव आहे
थोडक्यात हा कालखंड जर का आपण मांडायचे ठरवले तर
१ ज्ञानतंत्रिय कालखंड
२ भक्तीतंत्रीय कालखंड
३ शाक्ततंत्रिय कालखंड
४ शरीर तांत्रिय कालखंड
अशा चार कालखंडामध्ये विभागता येतो
मी मागेच एकदा म्हटल्याप्रमाणे तंत्रांच्या पैकी फक्त भक्ति तंत्रिय म्हणजेच इस्लामजवळ फक्त इबादत म्हणजेच भक्ती असल्याने सर्वच्या सर्व भारत भक्ती तांत्रिकीय झाला ज्ञान , शरीर आणि शक्ती यांची उपासना थांबली आणि सर्व भारतीय भक्तीमध्ये तुडुंब डुबून गेले ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत भक्ती हा एक अर्थाने फार चांगला शॉर्टकट आहे मात्र भारतीय भक्ती आणि इस्लामिक इबादत यांच्यामध्ये जो नैतिकतेचा फरक होता त्या नैतिकतेच्या फरकामुळेच इस्लाम विजयी होत गेला कसलीही नैतिकता नसलेली व स्वतःचा विस्तार वाढवणारी अशी ही इबादत आहे साहजिकच भक्ती आणि इबादत यांच्या स्पर्धेमध्ये इबादत विजयी होताना दिसते मुख्य म्हणजे क्रौर्य हे इस्लामच्या हातातील सर्वात मोठे शस्त्र आहे जे त्यांच्या धार्मिक ग्रंथानेच दिलेले आहे त्याचा मुकाबला करण्याची कसलीही तरतूद भारतीय भक्ती मध्ये विशेषत : वैष्णव भक्ती मध्ये नव्हती
प्रश्न असा आहे की हा भक्तीचा प्रसार योग्य आहे का ? वस्तुस्थिती अशी आहे की समाजामध्ये शरीर केंद्री ,ज्ञान केंद्री ,शक्ति केंद्री ,भाव केंद्री , क्रिया केंद्री अशी पाचही प्रकाराची माणसे वावरत असतात जेव्हा एखादे तंत्र सर्वात श्रेष्ठ बनते तेव्हा फक्त त्याच कालखंडातील लोकांना मोक्षाची संधी जास्त मिळत जाते इतर तंत्रातून कोणी मोक्षाला पोहोचला असेल तर त्याचा गाजावाजा होत नाही उदाहरणार्थ या काळामध्ये ज्ञान तंत्रा मधून बौद्ध किंवा शैव लोकांच्यातून कोणी निर्माणच झाला नाही असे म्हणता येत नाही परंतु इतिहासामध्ये त्यांचा तसा उल्लेख नाही बुद्ध आणि नाथ दोघेही गायब झालेले दिसतात मात्र संतांच्या मात्र अनेक दंतकथा प्रचलित झालेल्या दिसतात आणि त्यांचे साहित्य सर्वाधिक गाजलेले दिसते याचे कारण इस्लामच्या प्रभावामधून आपण स्वीकारलेली भक्ती आणि केवळ भक्ती होय सुफीधर्माने या काळामध्ये भक्तीचा कल्लोळ उडवून दिला आणि भारतीयांनी जणू काय भक्ती हाच एकमेव तंत्राचा पर्याय उपलब्ध आहे असा गैरसमज करून घेत स्वतःचा सत्यानाश करून घेतला
खरे तर आठव्या शतकामध्येच भक्ती तंत्राचा प्रभाव प्रचंड प्रमाणामध्ये वाढताना दिसतो आणि यामुळेच कदाचित आपण शेवटी इस्लाम कडून हारलेलो आहोत कारण या काळामध्ये प्रत्यक्ष इस्लाम मध्ये मात्र ज्ञानाची सुद्धा प्रचंड उपासना सुरू होती पण दुर्दैवाची गोष्ट अशी की इस्लाम मध्ये सुद्धा चौदाव्या शतकानंतर सर्वकाही इबादतमय होऊन गेले आणि त्याचा सर्वात मोठा फटका नंतरच्या मुस्लिम राजवटींना पडला आणि ज्ञान तंत्रातून उदयाला आलेले इंग्रज आणि युरोपीय सर्वत्र विजयी होत गेले
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग ३ श्रीधर तिळवे नाईक
भारतातील भक्ती संप्रदाय हा फार प्राचीन भावतंत्राचा भाग आहे आणि तो प्रामुख्याने शैव तंत्राचा भाग आहे जैन आणि बौद्ध हे दोन्ही धम्म ज्ञानतंत्रातले आहेत साहजिकच तिथे मूर्ती पूजेची शक्यताच निर्माण झालेली नव्हती असे असताना सुद्धा भारतीय इतिहासामध्ये अनेकदा काही अति शहाणे इतिहासकार बुद्ध आणि महावीर यांच्यापासून शिवाची आणि विष्णूची मूर्ती निर्माण झाली असे भासवत असतात वास्तविक शैव-धर्मामध्ये भक्ती किंवा भावतंत्राचे जे तंत्र आहे त्यात शिवलिंगाची पूजा केली जात होती. पर्शियन आणि ग्रीक लोकांच्या आक्रमणानंतर मात्र आपल्याकडे ही मंदिरातील मूर्ती पूजा सुरू झाली त्यापूर्वी शैवधर्मी लोकांच्यात फक्त देव्हाऱ्यातच मूर्ती ठेवली जात होती
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवाची मूर्ती पूजा ही वेगळी गोष्ट आहे आणि शिवाची लिंग पूजा ही वेगळी गोष्ट आहे पण या गोष्टीतला फरक जाणीवपूर्वक समजून न घेता भावतंत्र किंवा भक्ती संप्रदाय हा जैन आणि बौद्ध धर्मातून निर्माण झालेला आहे अशा प्रकारची मांडणी काही लोक करत असतात त्यामुळे ही भारतीय कालगणना अधिक गुंतागुंतीची बनते वास्तविक यासंदर्भातले सत्य इतकेच आहे की युरेशियन लोकांनी शैवधर्म संस्कृतीकडून लोकांच्याकडून भक्ती स्वीकारली भाव स्वीकारला भाव तंत्र स्वीकारले आणि मूर्ती पूजा ही स्वीकारली मूळ बौद्ध धम्मामध्ये मूर्ती पूजा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे खुद्द जिवंत असताना सुद्धा गौतम बुद्धांनी कधीही आपली पूजा अलाव केली नाही किंबहुना स्वतःलाच प्रमाण मानाने हा त्यांचा उद्देश आहे उपदेशही आहे मग बौद्ध धर्मामध्ये मूर्तिपूजा कशी आली ?
बौद्ध धम्मातील आद्य असलेल्या गौतम बुद्धाच्या मूळ उपदेशातून निर्माण झालेल्या ज्ञानतंत्राचा जसा जसा पराभव होत गेला त्याचा प्रभाव कमी होत गेला तसा तसा भावसंप्रदाय स्वीकारून गौतम बुद्धाची आणि महावीराची पूजा प्रस्थापित केली गेली जेणेकरून जैन आणि बौद्ध धम्मातले लोक धम्म सोडून जाऊ नयेत आजही आपण हे पाहू शकतो की इस्लामची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे याचे कारण बहुतांशी लोक अजूनही भावतंत्रामध्येच अडकलेले असतात मुख्य म्हणजे तिथे मोक्षाच्या ऐवजी अनेकदा नवस बोलणे मन्नत मागणे अशा प्रकारच्या श्रद्धांजन्य गोष्टी करता येतात ज्या इतर तंत्रांच्या मध्ये अशक्य आहे ज्ञानतंत्रामध्ये नवस बोलणे बसत नसल्याने पुढे पुढे बुद्धाला नवस बोलणे शक्य व्हावे म्हणून बुद्धाच्या मूर्ती निर्माण करण्यात आल्या धर्म टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे हे तत्कालीन बौद्ध धर्म गुरूंना वाटले आजही हे योग्य होते की नाही हे ठरवणे अवघड आहे त्यातूनच मग बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्वर्ग आणि नरकाच्या कल्पना निर्माण झालेल्या दिसतात
सगुण ईश्वर हा प्रत्येक माणसाला हवासा का वाटतो हा एक फार मोठा प्रश्न आहे प्रत्येक माणसाला मोठा बिग ब्रदर किंवा बिग फादर आवश्यक वाटतो आणि त्यातूनच भावतंत्र हे प्रभावी बनत जाते मूळ भाव तंत्रामध्ये फक्त शिवलिंगाचीच पूजा अपेक्षित होती आणि आजही ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना फक्त शिवलिंग किंवा शक्ती लिंग यांचीच पूजा करण्याची अनुमती आहे पुढे या दोन्ही लिंगांचा समन्वय करून ईश्वरलिंग निर्माण करण्यात आले आणि आज भारतातल्या बहुतांशी शैव मंदिरामध्ये ईश्वर लिंगच आहे म्हणूनच या लिंगांची नावे ओंकारेश्वर त्रंबकेश्वर अशी असतात बाकीच्या सर्व पूजा यानंतर पंडित , गुरव आणि नंतर ब्राह्मणांनी आणलेल्या आहेत आणि त्या सर्व शैव पुरोहितांनी म्हणजेच गुरव किंवा सर्व पंडित शैवाचार्य यांनी स्वीकारलेल्या आहेत भारतात गणपतीची पूजा तर अत्यंत पद्धतशीरपणे आणली गेली आणि बाप से बेटा सवाई अशा तऱ्हेने फेर रचना करण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून शंकर ही देवता बाजूला व्हावी आणि गणपती हा देव अधिकाधिक बळकट व्हावा आता तर अवस्था अशी आहे की गणपती ही देवता ब्राह्मणांचीच देवता होऊन गेली आहे आणि यामध्ये पेशवाईचा वाटा प्रचंड होता कारण त्यांचे ते कुलदैवत होते आत्ताचा गणपती हा शैव कमी आणि हिंदु जास्त आहे त्याच्या निर्मिती कथेपासून सर्व काही बदलण्यात आलेले आहे आणि बरेचसे काल्पनिक आहे ही वस्तुस्थिती आहे पण ही काल्पनिकता हीच ब्राह्मण धर्माची सर्वात मोठी ताकद असते दंतकथा निर्माण करून इतिहास नष्ट करणे हा ब्राह्मणांचा सनातन धंदा आहे
भारतातील सर्वात प्राचीन कालगणना ही शैव कालगणना आहे आणि तिचे स्वरूप नेमके आजही स्पष्ट होत नाही भारताला मिळालेले पहिले नाव हे इंदू आहे आणि चिनी लोक याच अंगाने भारताचे नाव घेताना दिसतात दुसरे नाव अर्थातच मेरू पर्वत म्हणजेच सह्याद्री या अंगाने येते आणि त्यातूनच मेरूहाचे मेलूहा झालेले दिसते मेरू पर्वतापाशी राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून म्हणजे सह्याद्रीच्या आसपास राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून हे नाव आहे जे प्रामुख्याने दक्षिण भारतासाठी वापरले जात होते समुद्रमंथन करताना हिमालय पर्वताची कधीही रवी झालेली नाही कारण हिमालय समुद्रापासून प्रचंड दूर आहे पण मेरू पर्वत मात्र अनेकदा समुद्र ढवळताना दिसतो याचे कारण तो दक्षिण भारतात आहे आणि दक्षिण भारतीय लोक खरोखरच या काळामध्ये समुद्र ढवळून काढत होते आणि आफ्रिकेला पोहोचत होते आणि कदाचित अमेरिका या खंडा पाशी ही पोहोचत होते इंदू या शब्दाचा अर्थच चंद्र असा होतो आणि चंद्राप्रमाणे कालगणना करणारे ते इंदू अशी ही मूळ व्याख्या आहे या इंदूचाच अपभ्रंश होऊन पुढे हिंदू हा शब्द उदयाला आलेला आहे भारताचा इतिहास लिहिताना कायम उत्तर भारताच्या अंगाने लिखाण करणे ही उत्तर भारतीय लोकांची खोडी आहे ती आपण स्वीकारण्याची काही कारण नाही विशेषतः मराठी लोकांनी तरी भारतीय इतिहास कायम महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्या संदर्भात पाहिला पाहिजे उत्तर भारतीय धर्म ज्यामध्ये वैष्णव जैन बौद्ध असे धर्म येतात ते जास्तीत जास्त दक्षिण भारतात मोठे करून दाखवणे ही उत्तर भारतीय लोकांची आणि इतिहासकारांची गरज आहे कारण त्यामुळे ते हल्ली दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात करत असलेल्या स्थलांतराला आधार मिळतो त्यामुळेच ते इतिहासाच्या नावाखाली त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी अनेक दंतकथा लिहित असतात त्या आपण स्वीकारण्याची गरज नाही
आठव्या शतकानंतर उत्तर भारतीय इतिहासाचा प्रभाव फारसा पडलेला दिसत नाही आणि म्हणूनच मग दक्षिणेतून शंकराचार्य उदयाला येताना दिसतात याचे कारण कळत नकळत उत्तर भारतामध्ये एक प्रकारचा अनागोंदी कारभार झालेला दिसतो त्या उलट 800 ते 1200 या कालखंडात ब्राह्मण धर्माला मदत करणारे जे काही घडले ते दक्षिण भारतात घडले असे दाखवले जाते आणि या काळामध्ये उत्तर भारतात नवनाथांचा विशेषता गोरखनाथांचा जो प्रभाव वाढत गेला शैव प्रभाव वाढत गेला त्याविषयी अवाक्षर सुद्धा काढले जात नाही हिंदी भाषेची सुरुवात गोरखनाथांनी केली हे सुद्धा डावलले जाते
या काळात दक्षिण भारतात विशेषता केरळमध्ये वैष्णव धर्म वाढीला लागला आणि वैष्णव धर्म वाढीला लागला म्हणूनच वर्णव्यवस्था वाढीला लागली आणि वर्णव्यवस्था वाढीला लागली म्हणून तिथे हळूहळू वर्ण व्यवस्थेला शह देणारा धर्म म्हणून आचार्य शंकर यांच्या अवस्था दर्शनाचा आणि ख्रिश्चन धर्माचा उदय झाला आणि आज केरळमध्ये 30 टक्के लोक ख्रिश्चन झालेले आहेत याला कारण इथला वैष्णव प्रभाव आणि त्या धर्माने आणलेली अत्यंत कडक वर्णव्यवस्था होय ब्राह्मण धर्माने दक्षिण भारतात बळकावलेला हा पहिला भूप्रदेश आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित तामिळनाडूमध्ये फूट पाडून तामिळनाडू मधून केरळ नावाचा स्वतंत्र प्रांत निर्माण करून मल्याळम नावाची स्वतंत्र भाषा निर्माण करून प्रभाव निर्माण करत बळकावलेला आहे आज दक्षिण भारतामध्ये सर्वाधिक महत्त्वाची वैष्णव मंदिरे ही केरळामध्ये आहेत हा योगायोग नाही तिथली मूळची सर्व मातृसत्ताक पद्धत कशी पद्धतशीरपणे ब्राह्मण धर्माने ताब्यात घेतली हा एक करूण इतिहास आहे वर्ण व्यवस्थेचे सर्वाधिक घृणास्पद रूप आपणाला उत्तर भारतात दिसण्याएवजी केरळमध्ये दिसते याहून दक्षिण भारताला लाज वाटणारी कुठली गोष्ट असू शकते ? साहजिकच या वर्णव्यवस्थेच्या विरोधात इथे कम्युनिस्ट पक्ष सुद्धा आपोआप वाढीला लागला कारण इथल्या बहुजन लोकांना कम्युनिजम स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता आज अवस्था अशी आहे की केरळ मधून असा एक सिद्धांत उदयाला येतो आहे की भक्ती संप्रदाय भारतामध्ये ख्रिश्चन लोकांनी सुरू केला हे असे का घडते याच्या मुळात सुद्धा जाण्याची गरज हिंदुत्ववादी लोकांना वाटत नाही कारण त्यांना इथे पुन्हा एकदा कशी वर्णव्यवस्था आणता येईल हेच पाहायचे आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रभावाचा सखोल मागोवा घेण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्ड घेऊन प्रश्नाला बगल देणे चाललेले आहे जर का खरोखर हिंदुत्ववादी लोकांना केरळमध्ये काही करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांनी केरळमध्ये वर्णव्यवस्थेवर प्रचंड अटॅक केला पाहिजे पण असे काही न करता सनातन धर्माचा घोष करत हिंदुत्ववादी धार्मिक कार्ड खेळत असतात त्यामागे पुन्हा एकदा ब्राह्मणी सत्ता आणायची अशी इच्छा आहे की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे या सगळ्याची जर का बीजे आपण शोधायला गेलो तर ती आठव्या शतकापासून 12 व्या शतकापर्यंत पसरलेल्या केरळच्या इतिहासात आहेत आणि याच कालखंडामध्ये आद्य शंकराचार्य नावाची व्यक्ती होऊन गेली किंवा निर्माण केली गेली हा योगायोग नाही आचार्य शंकर होऊन गेले याबद्दल माझ्या मनात शंका नाही परंतु त्यांनी सांगितलेला पंचायतन उपदेश हा शैव होता हा उपदेश आणि आद्य शंकराचार्यांच्या सहाय्याने सांगण्यात येणारा ब्राह्मणधर्मी उपदेश याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे किंबहुना केरळ मधील सर्व शैव व्यवस्था ताब्यात घेण्याचे जे काही प्रयत्न झाले त्यातला हा आद्य प्रयत्न होय तो यशस्वी झाला आणि केरळची वाट लागत गेली तिथली वर्णव्यवस्था अधिकाधिक बळकट होत गेली
या कालखंडाबाबत नेहमीच इतिहासकार एक प्रश्न विचारत असतात तो म्हणजे या कालखंडामध्ये नेमके पुरातत्वीय पुराव्याचे काय होते ? आपण या कालखंडाकडे जर पाहिले तर हा कालखंड भावतंत्राच्या प्रचंड प्रभावाचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे इथले पुरातत्वीय पुरावे हे प्रामुख्याने मंदिरांच्यावर कोरले गेलेले शिलालेख किंवा इतर लेख आहेत त्यामुळे जमिनीत पुरावे शोधण्याऐवजी जमिनीवर उभा करण्यात आलेल्या मंदिरामध्ये पुरावे शोधणे योग्य होय या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी मंदिर शास्त्र हे अधिक उपयुक्त आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये लिहिले गेलेले धार्मिक वाङ्मय व धार्मिक शिलालेख दान शिलालेख राजकीय शिलालेख आपण नीट तपासले पाहिजेत कारण त्यामध्येच या कालखंडाचा खरा इतिहास लपलेला आहे 12 व्या शतकानंतर मात्र मुस्लिम इतिहासकारांनी अनेक गोष्टी तपशीलवार लिहिणे सुरू केले आणि त्याचा प्रभाव पडून भारतात सुद्धा अशा प्रकारचे वृत्तांत लेखन सर्व राजदरबारी सुरू झाले असे दिसते या लेखनामध्ये दंतकथांचा प्रचंड प्रभाव आहे किंबहुना भारतातल्या अनेक दंतकथा ह्या मुळात या कालखंडात निर्माण झालेल्या आहेत राज दरबारी असलेले इतिहासकार आपल्या राजाची अनेकदा देवासारखी स्तुती करत असतात त्याचा प्रचंड प्रभाव इस्लामिक इतिहासकारांच्या वर आहे आणि भारतीय दरबारी इतिहासकारांच्यावरही होता आणि आहे आणि त्यांनीच या कालखंडाचा इतिहास राज्यव्यवस्थेत आणि राजाच्या स्तुतीत बुडवत बुडवत धुसर केलेला दिसतो या कालखंडामध्ये पुरातत्व शास्त्र आपणाला जास्त मदत करत नाही त्याऐवजी लेखनशास्त्र ज्याला आज काल ग्रॅमॅटोलॉजी असे म्हटले जाते आणि मंदिर शास्त्र असे म्हटले जाते तेच जास्त उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे आपल्याकडचे काही इतिहासकार आजकाल 800 ते 1200 या कालखंडामध्ये पुरातत्वीय पुरावे नाहीत म्हणून खूपच शोक करत असतात म्हणून हे सांगावे लागते
महाकाव्ये आणि पुराणे बलवान होण्याचा हा कालखंड आहे याचे कारण मंदिरांची सातत्याने होत गेलेली निर्मिती ! शैव मंदिर हे फक्त कधीच भक्तांसाठी नव्हते तर त्यामध्ये अनेक सिद्ध आणि साधना करणारे साधक व दरम्यानचे साधू हे सुद्धा मुक्काम ठोकत असत हे आपण लक्षात घेतले पाहिजे अगदी जैन मंदिरे सुद्धा शैव मंदिरांनाच फॉलो करत होती जैनांच्यात सुद्धा सिद्ध साधू आणि साधक ही व्यवस्था आपणाला दिसते आणि त्यांच्या मूलमंत्रामध्ये हे स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे या सर्व मंदिरांच्या मध्ये तपस्या करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचंड जागा होती विशेषता जी मंदिरे डोंगरामध्ये वसत तिथे तर अनेक साधू तपस्या करताना आजही दिसतात शैव मंदिरांच्या मध्ये शरीर ,ज्ञान,भाव , क्रिया आणि शक्ती अशी पंचतंत्रे कार्यान्वित असत आणि ती तशीच असली पाहिजे अनेक मंदिरांना याचा हल्ली विसर पडलेला आहे निदान पक्षी शैव मंदिरांच्या मध्ये तरी ही सर्वच्या सर्व पंचतंत्रे आपण इंट्रोड्यूस केली पाहिजेत अन्यथा पुन्हा एकदा फक्त भक्तीचा सुळसुळाट सुरू राहील आणि ते भारताच्या विकासाला परवडणारे नाही भारतातली सर्वात प्राचीन मंदिरे ही सुद्धा शैव मंदिरे आहेत आणि पुढे त्यांना शह देण्यासाठी म्हणूनच वैष्णव मंदिरे उभी करण्यात आली किंवा मग शैव मंदिरे राजवटींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन त्याच्यात वैष्णव देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अगदी अलीकडे सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पद्धतशीरपणे महालक्ष्मीची स्थापना करण्यात आलेली आहे किंबहुना अंबाबाईच्या जागी कशी महालक्ष्मी येते हे पाहिले की वैष्णव धर्मीय लोक 800 ते 1200 या कालखंडात आपले राजकारण कसे खेळत असतात ते स्पष्टपणे कळू शकते या कालखंडातले बहुतांश शिलालेख आणि अनेक सोकार्ड पौराणिक लेखन हे काल्पनिक असल्याचा संशय सर्वच इतिहासकारांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे अनेक काल्पनिक पुराणे अत्यंत जाणीवपूर्वक देवळांशी जोडली जाऊन किंवा स्थलस्थळ पुराणे निर्माण करून त्या देवळांचा इतिहास पूर्णपणे बळकावण्याचा प्रकार आपल्याकडे घडलेला दिसतो अलीकडे तर बाळूमामासारखा शैव बहुदा लिंगायत संत वैष्णव करण्यात आलेला दिसतो हे सर्व ब्राह्मण धर्मीय लोक कसे पद्धतशीरपणे खेळी खेळत असतात त्याचे नमुने आहेत तरीसुद्धा बहुजन समाजाला काही xxx येते असे दिसत नाही 800 ते 1200 या कालखंडामध्ये हेच घडलेले आहे यामध्ये आपले विठ्ठल मंदिर सुद्धा येते जे मूळचे शैव होते पण नंतर वैष्णव करण्यात आले आणि तिथले मूळचे महादेव कोळी पुजारी हटवून त्या जागी वेगळे पुजारी आणले गेले जे विठ्ठलाला वैष्णव अवतार मानतात. जेव्हा दहाव्या शतकानंतर विष्णू सारख्या वैदिक देवतेला बहुजन समाजाकडून मान्यता मिळतच नाही हे लक्षात आले तेव्हा मग अत्यंत पद्धतशीरपणे राम आणि कृष्ण यांचे महत्त्व ब्राह्मण लोकांनी वाढवणे सुरू केले ते आजही वाढवणे सुरू आहे या कालखंडामध्ये सुद्धा जी कालगणना पद्धत अस्तित्वात आली ती अशीच स्थानिक राज्यकर्त्यांच्या कडून निर्माण झालेली दिसते
भारतातल्या सर्वात प्राचीन कालगणना या ऋषीमुनींची निगडित करणे ही ब्राह्मणांची गरज होती साहजिकच सप्तर्षीची कल्पना अत्यंत पद्धतशीरपणे वाढवण्यात येऊन सप्तर्षी कालगणना आणण्यात आली त्यासाठी अनेकदा शैव-धर्मामध्ये सुद्धा ढवळाढवळ केलेली दिसते म्हणजे शंकराला सर्वात प्रथम मोक्ष मिळाला हे मान्य करायचे मात्र त्याचे सर्वात पहिले सात शिष्य कोण तर हे सात ऋषी होते अशी मांडणी करायची प्रत्यक्षामध्ये हे सात ऋषी नव्हते तर ते सात शिष्य होते आणि त्यांची नावे वेगळी आहेत अपवाद फक्त अगस्ती असेल या सात शिष्यांना बळकावून त्यांना सप्तर्षी अशी संज्ञा देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या नावाने मग कालगणना सुरू झालेली दिसते इथे मूळ आद्यशैव कालगणना बळकावण्याचा प्रयत्न झालेला आहे
पुढे मग जेव्हा समाजात अनागोंदी कारभार वाढत गेला तेव्हा त्याचे समर्थन करण्यासाठी महाभारताच्या कालखंडामध्ये म्हणजेच सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 1000 या कालखंडामध्ये चार युगांची संकल्पना विकसित करण्यात आली आणि त्यातूनच आज-काल कलियुग कालखंड सुरू झालेला दिसतो
पुढे मात्र क्षत्रियांनी कालगणना ताब्यात घेतलेली दिसते त्यातूनच मग वेगवेगळ्या राजांच्या कालगणना , वेगवेगळ्या राज्यांच्या कालगणना सुरू झालेल्या आहेत भारत हा एकसंध राष्ट्र नव्हता त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या राज्यांच्या राजांनी आपल्या नावे कालगणना सुरू केल्या याचे आश्चर्य नाही म्हणजेच सर्वसाधारणपणे भारतामध्ये आपणाला असे दिसते की एक आद्यशैव कालगणना आहे त्यानंतर ब्राह्मणधर्मी ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या दोन ब्राह्मणी कालगणना आहेत आणि मग क्षत्रिय लोकांनी आपल्या नावे निर्माण केलेल्या क्षत्रिय कालगणना आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सातवाहन लोकांनी सुरू केलेली शक कालगणना शके दिसते तिच्याबद्दलचा वादविवाद अजूनही संपलेला नाही ह्या इतक्या सगळ्या चाळीसच्या आसपास असलेल्या कालगणना घेऊन आपण नेमके काय करू शकतो ? त्यामुळेच एक तर आपण इसवी सन पूर्व 20000 पासून कालगणना सुरू करावी हे उत्तम त्यामध्ये भारतातल्या सर्व प्राचीन पुरातत्वीय उत्खननांना न्याय देता येतो आणि शैव लोकांना स्वतःची कालगणना पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची संधी मिळते सर्वसाधारणपणे वीस हजार वर्षांपूर्वी भगवान शंकर (आदिवासी साहित्य प्रमाण मानल्यास आपणाला शंभू असे नाव द्यावे लागेल शिव हे तत्व आहे शंभू हा होऊन गेलेला पुरुष आहे) यांचा मृत्यू किंवा जन्म इथून ही कालगणना सुरु होते म्हणजे आपणाला इसवी सन 2000 असे न म्हणता इसवी सन 22000 असे म्हणावे लागेल आपल्या लोकांना हे कितपत झेपेल याविषयी मला शंका आहे पण आपले प्राचीनत्व सिद्ध करण्याची आणि ते व्यवहारात वागवण्याची कालगणना हीच एक संधी असते आपणाला अजूनही ही गोष्ट कळलेली नाही वैदिक लोकांच्या प्रचंड ब्राह्मक कालगणना आपल्या कामाच्या नाहीत कारण त्या बनावट वाटायला लागतात उत्खननशास्त्रामध्ये भारतामध्ये विशेषता दक्षिण भारतामध्ये जेव्हा उत्खनन होईल तेव्हा आपणाला इसवी सन पूर्व दहा हजार पर्यंत तरी किमान जावे लागेल असा माझा अंदाज आहे कदाचित त्या आधीचे ही उत्खनन शास्त्रीय पुरावे सापडू शकतात त्यांना जागा असावी म्हणून इसवी सन पूर्व 20000 ही काल गणना स्वीकारलेली आहे भगवान शंभू हे प्रामुख्याने पशुपालक कालखंडात जन्मलेले आहेत हे अत्यंत निर्विवाद आहे आणि पशुपालन हे साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी सुरू झालेले आहे म्हणूनच इतकी प्राचीन सुरुवात करावी लागते
या कालगणने विरोधात लढणे आपणाला शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर मग ब्राह्मण लोकांनी वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबलेली दिसते वेदांचा कालखंड आजकाल लाखो वर्षांपूर्वी नेण्याचा जो प्रयत्न होत आहे तो आत्ताचाच नाही तर पौराणिक महाकाव्यीक काळापासून चाललेला उद्योग आहे आणि यामागे उद्देश एकच आहे तो म्हणजे शैव कालगणनेला शह देणे बौद्ध आणि जैन कालगणनेला शह देणे प्रत्यक्षात हे साधलेले दिसत नाही याचे कारण वैदिक संशोधनामध्ये युरोपियन लोकांनी घेतलेला इंटरेस्ट ! युरोपियन संशोधक काही केल्या वेदांचा कालखंड हे इसवी सन पूर्व पंधराशे च्या पूर्वी घेऊन जात नाहीत त्यामुळेच अलीकडे युरोपियन लोकांच्या इतिहासाबद्दल शंका निर्माण करणे सुरू झालेले आहे
थोडक्यात काय जैन आणि बौद्ध धर्माला शह देता यावे म्हणून आणि शैव लोकांचा प्रभाव कमी करावा म्हणून 800 ते 1200 या कालखंडात रामायण आणि महाभारत यांचा दबदबा आणि गवगवा वाढवण्यात आला राम आणि कृष्ण यांची मंदिरे उभी करण्यात आली आज सर्वांनाच माहिती आहे की इसवी सन सातव्या शतकापूर्वी आपणाला एकही राम मंदिर किंवा एकही कृष्ण मंदिर दिसत नाही कारण रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांतून उदयाला आलेल्या या देवता आहेत आणि भारतीयांनी जेव्हापासून या महाकाव्यिक देवतांचा स्वीकार केला तेव्हापासून त्यांचे पतन सुरू आहे ते अजूनही थांबलेले नाही जगात सर्वत्रच महाकाव्य लिहिली गेली तशी ती भारतातही लिहिली गेली परंतु जगातल्या सर्व लोकांनी आपल्या आपल्या महाकाव्यातून निर्माण झालेल्या देवता नंतर सोडून दिल्या भारतात मात्र अशा प्रकारचा त्याग करता आला नाही किंबहुना भारतातल्या ब्राह्मण पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा त्याग होणार नाही याची काळजी घेतली याचे कारण एकच ते म्हणजे पौराहीत्य व्यवसाय आणि वर्ण व्यवस्थेला या रामायण आणि महाभारतातून मिळणारा सपोर्ट !
रामायण आणि महाभारतामुळे आठव्या शतकापासून वैष्णव धर्म प्रभावी होत गेला मात्र त्याला शैव-धर्मावर शेवटपर्यंत मात करता आली नाही आणि म्हणूनच मग भावतंत्र भक्ती संप्रदाय स्वीकारून हिंदू धर्माची निर्मिती अत्यंत पद्धतशीरपणे करून विष्णू आणि शिव या दोघांना सन्मान देणे सुरू झाले भारतात भक्ती संप्रदायाच्या अंगाने जर का आपण हिंदू या शब्दाची व्याख्या करायची ठरवले तर शिव शक्ती विष्णू लक्ष्मी गणपती आणि स्कंद या सा देवतांची पूजा किंवा त्यांच्या अवतारांची किंवा रुपांची पूजा करणारे लोक अशी करता येते भारतात ब्रह्मदेवाची पूजा आजही केली जात नाही कारण ब्राह्मणांनी त्याची हकालपट्टी केली कारण ब्राह्मणांच्या क्रिएशन सिद्धांतामध्ये ब्रह्मदेव जे काही करतो आहे ते स्वीकारणे इस्लामिक कालखंडामध्ये अशक्य बनत गेले ब्रह्मदेव आपल्या मुलीच्या मागे लागल्याने आणि तिच्यापासून संतती झाल्याने त्याच्यावर बंदी घालणे हे ब्राह्मणांसाठी आवश्यक झाले
आज आपण जर का दैनंदिन व्यवहारात हिंदू काय करतो हे पाहिले तर तो या सहा लोकांची सहा देवतांची त्यांच्या विविध रूपांची आणि अवतारांची पूजा करतो असे आपणाला म्हणता येते हे करताना पद्धतशीरपणे शिव आणि शक्ती यांचे सामर्थ्य कसे कमी करता येईल हे पाहिले जाते अलीकडे तर महालक्ष्मीलाच शक्ती म्हणण्याची आणि तशी प्रथा रूढ करण्याची चाल निघालेली आहे ब्राह्मणांचा उद्देश साफ आहे सर्वात प्रथम शैव धर्मी लोकांना बहुजनांना गोंजारायचे आणि हळूहळू सर्व शैव धर्म नष्ट करून टाकायचा असा हा प्लॅन आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुजन समाजाला यातल्या काहीही गोष्टी कळत नाहीत तो हे सर्व होऊ देत आहे त्यासाठी मग अनेक कथा वापरल्या जातात उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद काश्मीरमध्ये गेले तर तिथे कालीच्या मंदिराची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले तर स्वप्नात किंवा दृष्टांतात येऊन त्यांना काली म्हणाली की माझी काळजी तू करू नकोस माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आता ही कथा वारंवार सांगितली जाते कारण शैव लोकांनी कालीच्या रक्षणासाठी काहीच करू नये काली स्वतः स्वतःचे रक्षण करायला समर्थ आहे असे म्हटले की कालिचे स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी शैव लोकांच्यावर येत नाही ही मुद्दाम ठेवलेली पळवाट असते जेणेकरून शैवाने काही कृतीच करू नये हे अत्यंत पद्धतशीरपणे केले जाते त्यातच स्वामी विवेकानंद यांचे नाव असल्याने आणि हे कथन बहुदा सत्य असल्याने त्याचा प्रभाव ताबडतोब पडतो जर काली इतकी समर्थ होती, तर मग काश्मीरमध्ये सगळे मुसलमान झालेच नसते की कालीमातेनेच सर्व शैव लोकांना मुसलमान होऊ दिले ? शैव लोकांनी आता स्वतःची जरा बुद्धी वापरणे फार आवश्यक आहे आणि स्वतःच्या धर्माचे आणि स्वतःच्या नीतिमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे श्रद्धा किती ताणायची याचा पोच बाळगावा लागतो सर्व काही देव बघून घेईल या गोष्टीवर विश्वास ठेवून चालत नाही कारण जीव हाच शिव असतो आणि शिव हे आपणच या जगामध्ये जगताना अमलात आणायचे असते मुळात सर्व देवता या माणसाने त्या अमूर्त शून्यापाशी जाण्याकरता निर्माण केलेल्या असतात मोक्षासाठी निर्माण केलेल्या असतात किंवा निसर्गापुढे झुकून निर्माण केलेल्या असतात त्या संकल्पना असतात त्यामुळेच त्या संकल्पना काय आहेत त्या कशा विकसित होत गेल्या यांचा अत्यंत जमिनीवर राहून अभ्यास करावा लागतो शिव,शक्ती, संसार किंवा पसारा , ईश्वर आणि मोक्ष हे आदिपंचायतन सत्य आहे परंतु ते तुमचा इतिहास घडवतं या भ्रमात राहू नका ते इतकं अफाट आहे की पृथ्वी ही त्यांच्या संदर्भात नगण्य आहे इतिहास माणसाला माणसाचा घडवावा लागतो सध्या शैव धर्म दोन बाजूंनी संकटात आहे पहिले संकट भारत देशापुरते ब्राह्मण धर्माचे आहे तर दुसरे संकट जगामध्ये आणि भारतामध्ये इस्लाम धर्माचे आहे आणि एकाच वेळी या दोन्ही संकटांचा मुकाबला करावा लागणे अटळ आहे अशा वेळी नेमके काय पाऊल टाकायचे हे ठरवायचे असेल तर बसवेश्वर ,शिवाजी महाराज, संभाजी महाराज , पहिला बाजीराव , यशवंतराव होळकर , महात्मा फुले यांच्या इतके उपयुक्त मार्गदर्शन कोणीही करू शकत नाही
आपणाला यापुढे स्वत
भारतात सुरुवातीच्या कालखंडात शैव कालगणना फार काही वर्षांचे काउंटिंग ठेवत होती शैवलोक शतकांचे काउंटिंग ठेवत जगत होते असे वाटत नाही कारण मुळातच त्या काळात शतकाची किंवा सहस्त्रकाची संकल्पना अस्तित्वात होती की नाही याबद्दल शंका आहे नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ही गणना अस्तित्वात आलेली असावी
ब्राह्मणी कालखंडामध्ये मात्र कलियुगाची जी कल्पना आहे ती मात्र भारतात प्रचलित झाली मात्र तिचे लिखित पुरावे हे फार उशिराचे आहेत त्यामुळेच कलियुगाची कालगणना करायची म्हणजे नेमके काय करायचे याबद्दल खुद्द ब्राह्मण धर्मातच वादविवाद आहेत सर्वसाधारणपणे इंग्रजांच्या आगमनानंतर आपला कालखंड हा इसवी सन पूर्व 3000 च्या आसपास ठेवणे आवश्यक झाले कारण हळूहळू ग्रीक लोकांचा इतिहास हा इसवीसन पूर्व हजार दीड हजार पर्यंत भिडायला लागला आपण त्यांच्यापेक्षा प्राचीन आहोत हे सांस्कृतिक पातळीवर सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांनी हा उद्योग अवलंबला पराभूत झालो तरी आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि गिरे तो भी टांग उपर तसा हा प्रकार नेहमीच चाललेला असतो प्रत्यक्षात मात्र विजेत्याचे अनुकरणच केले जाते. साहजिकच युरोपियन लोकांच्या आगमनानंतर साहजिकच धर्मपुरुषाच्या मृत्यूपासून व जन्मापासून कालगणना सुरू करण्याचे उद्योग सुरू झाले याची प्रेरणा प्रामुख्याने जीजस पूर्व ईसा पूर्व आणि ईसा नंतर ही कालगणना करण्याची युरोपियन पद्धत होती आणि तिचा संबंध थेट येशू ख्रिस्ताशी त्याच्या जन्ममृत्यूशी होता साहजिकच आपल्याकडे बुद्धाच्या मृत्यूनंतर एक कालगणना सुरू झाली असा दावा पुढे आला आणि मग तो सिद्ध करण्याचेही प्रयत्न झाले त्यानंतर मग राम जन्म आणि कृष्ण जन्म अशा अंगाने मांडणी करणारे लोक आले शिवा बाबत मात्र सर्वांचीच मांडणी ही तो अनादी आणि अनंत आहे कालभैरव आहे महाकाल आहे अशीच आहे अगदी कट्टर ब्राह्मण आणि वैदिक म्हणवून होणारे लोक सुद्धा अनेकदा शिवाचे हे स्वरूप स्वीकारतात
पण त्यामुळेच शैव कालगणनेचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो
प्राचीन काळात शैव धर्मात कालगणना ही चंद्राच्या आधारे होती मात्र जो एक एक्स्ट्रा दिवस होता 31 दिवसांच्या महिन्याचा तो मुळात अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यात ऍडजेस्ट होत होता त्यातून मास संकल्पना आली एक अमावस्या अधिक एक पौर्णिमा म्हणजे एक मास महिना होय आठवडा ही संकल्पना भारतीय आहे की नाही याबद्दल मला प्रचंड शंका आहे भारतीयांच्यात नेहमीच अमावस्या आणि पौर्णिमा रूढ होत्या आणि प्रथमा द्वितीया तृतीया ते पौर्णिमा किंवा अमावस्या अशा तऱ्हेनेच तिथी गणना होत होती बारा वर्षाने एक तप होत होते आणि अशा 12 तपांचे मिळून एक मन्वंतर होत होते 144 वर्षांनी मानवी मन मानवी समाजाचे मन बदलते अशी समजूत त्यामागे आहे आपण तिला अंधश्रद्धाही म्हणू शकतो .
या शैव काळातील मनुष्य हा प्रामुख्याने ऋतू बघत होता आणि हे ऋतू सहा आहेत आणि प्रत्येक दोन मासांचा एक ऋतू बनतो याची त्याला कल्पना होती आणि ऋतू पुन्हा पुन्हा येतात त्यावरूनच त्याला वर्षाची संकल्पना सुचलेली आहे म्हणजेच पावसाळा हा ज्येष्ठ आषाढ या दोन महिन्यात येतो याची कल्पना त्याला होती आणि मग श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांमध्ये पावसाळा थोडा वेगळा होतो याची त्याला कल्पना होती साहजिकच जुन्या काळामध्ये शैव लोकांच्या मध्ये दोन काळ महत्वाचे होते पहिला सृष्टीच्या जन्माचा फुलणे पूर्ण झाले की मग चैत्र महिना होतो म्हणून तिथे वर्ष सुरू केले जात होते किंवा साधू लोकांचा सत्संग फार महत्त्वाचा असल्याने तिथूनच काळ सुरू करत हा महिना साधारणपणे ज्याला आज आपण श्रावण म्हणतो तो आहे आणि अशोक त्याचा उल्लेख करताना शीलवन असा करतो कारण त्याचा संबंध शील जागृत करणारा आणि शिलाचे वन निर्माण करणारा असाच आहे श्रावण हा सावन म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण साव या शब्दाचा अर्थ चांगला असाच होतो श्रावण या शब्दाचे मूळ सुद्धा श्रवण करणारा असा आहे हा सर्वकाळ गुरु च्या सानिध्यात राहण्याचा मोक्ष मिळालेल्या लोकांच्या सानिध्यात राहण्याचा काळ आहे आज सुद्धा श्रावण पाळणे याचा खरा अर्थ हाच आहे अनेकदा श्रावण महिन्यात मास मच्छी त्यामुळे सोडली जाते हा शैव लोकांचा संस्कार आहे सूर्याकडे बघून वर्ष सुचलेले नाही आपल्याकडे ही गैरसमजुत खूप लोकांची झालेली दिसते प्रत्यक्षामध्ये सहा ऋतूंनी मिळून एक वर्ष असे हे कॅल्क्युलेशन आहे आणि ऋतुचक्र सुरू होते आणि पूर्ण होते हे या लोकांनी पूर्ण पणे बघितलेले दिसते एक ऋतू मग दोन महिन्यात विभागला जातो म्हणजेच प्रत्येक ऋतू म्हणजे चार अमावस्येत आणि चार पोर्णिमेत विभागले गेला आणि त्याला चंद्रानुसार विभागले म्हणजेच ज्याला आज आपण शैव कालगणनांना म्हणतो ती चंद्र आणि ऋतू यांच्या आधारे उभी आहे तिचा आरंभ श्रावण महिन्यापासून म्हणजे शीलवन महिन्यापासून सुरू झाला होता का हा खरा प्रश्न आहे अशोकाच्या कालगणनेचा विचार आपल्याकडे अलीकडे सुरू झालेला आहे पण अशोकाने कालगणना काही बौद्ध लोकांच्याकडून घेतलेली नाही किंबहुना आयुष्याची 75 टक्के वर्षे त्याने शैव म्हणून घालवलेले आहेत याचा अनेकांना विसर पडलेला आहे खुद्द बौद्ध धर्म ग्रंथच त्याचा उल्लेख कालाशोक म्हणजेच कालीचा भक्त असलेला अशोक किंवा चंडाशोक म्हणजेच चंडीचा भक्त असलेला अशोक असा करतात हे आपण विसरता कामा नये पण त्याचबरोबर अशोक बौद्ध नव्हताच असा सुद्धा जो प्रचार चाललाय तो चुकीचा आहे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो स्वीकारताना त्याने तो धर्म म्हणून स्वीकारलेला नाही तर धम्म म्हणून स्वीकारलेला आहे आणि शाक्य मुनी म्हणूनच त्याने उल्लेख केलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे प्रत्येक राजाला स्वतःला कायद्याची संहिता तयार करण्याची अनुमती शैव-धर्मामध्ये आहे आणि म्हणूनच एखाद्या शैव राजाने जर का बौद्धाच्या धम्माला अनुसरून एखादी नीती संहिता स्वीकारली असेल तर त्यात आश्चर्य मानायचे काहीच कारण नाही मुळात शैव परंपरेमध्ये गौतम बुद्ध हा एक सिद्ध आहे जणू काय शैव ह्या काळामध्ये बौद्ध धर्माशी भांडत होते अशा तऱ्हेने चित्र उभे केले जाते त्यात तथ्य नाही या काळात बौद्ध धर्माचे भांडण असले तर ते जैन धर्माशी आहे साहजिकच अशोकाने जी कालगणना स्वीकारली ती शैव कालगणना आहे आणि त्याने सांगितलेले बारा महिने हे शैव महिने आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे जे मुळातच युरेशियन लोकांनी स्वीकारले होते मुळात सहा ऋतूंची संकल्पना ही फक्त भारतातच प्रामुख्याने त्या काळात अस्तित्वात होती युरेशियन लोक ती सोबत घेऊन आलेले नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे
ब्राह्मणी संकल्पनेत युग ही संकल्पना किती वर्ष ठेवावी याविषयी प्रचंड वाद आहेत
नंतर आलेली क्षत्रिय कालगणना ही प्रामुख्याने वैश्य आणि शूद्र यांच्यातून आलेल्या राजांनी निर्माण केलेली आहे आणि नंतर या राजांना वैदिक पद्धतीने किंवा पौराणिक पद्धतीने राज्याभिषेक करत देवाचा अवतार मानत आणि त्यांना यज्ञ करायला लावत वैदिक करण्याचा उद्योग इथल्या ब्राह्मणांनी केलेला आहे आणि मग अनेकदा राज्याभिषेक झाल्यानंतर कालगणना सुरू झालेली आहे शिवाजी महाराज हे याचे उत्तम उदाहरण आहे.प्रत्यक्षात या लोकांनी स्वकर्तृत्वावरच आपली राज्ये स्थापन केली होती आणि ही राज्ये स्थापन करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकलेला नाही कारण मुळात तथाकथित ब्राह्मणी वर्णव्यवस्था कधीही या देशांमध्ये प्रभुत्व गाजवत नव्हती हे सगळे चित्र ब्राह्मणांनी सातव्या शतकात बदलले आणि त्यांनी कृत्रिम चंद्रवंश आणि सूर्यवंशी निर्माण करत या शैव लोकांना आणि बाहेरून आलेल्या आणि शैव झालेल्या लोकांना क्षत्रिय दर्जा देऊन त्यांना देव बनवले किंवा देवाचा अवतार बनवले त्याची नशा इतकी चढली गेली की हे लोक खरोखरच स्वतःला क्षत्रिय समजू लागले वास्तविक हे तेच लोक होते ज्यांच्या पैकी जवळ जवळ किमान 50 टक्के लोक युरेशियन लोकांच्यातूनच आलेले होते पण वैदिक धर्माने आणि ब्राह्मणी धर्माने त्यांना सामावून घेण्यास नकार दिला होता त्यामुळे हे सुरुवातीला शैव होते आणि मग युरेशियन लोकांनी आपला धर्म त्यांना द्यायला सुरुवात केली याची सुरुवात प्रामुख्याने शैव ,जैन आणि बौद्ध धर्माने सुरू केली म्हणजे आपण जर काय शक कनिष्क राजवटीचा विचार केला तर सुरुवातीला हे लोक शैव होते मग ते बौद्ध झाले असे दिसते सातव्या शतकानंतर या बाहेरून आलेल्या आक्रमक लोकांचे प्रमाण प्रचंड वाढत गेले गोरा रंग जो फारसा दिसत नव्हता तो आता दिसायला लागला या आक्रमक लोकांना प्रथम शैव-धर्मानेच सामावून घेतले परंतु हे लोक नंतर कृतघ्न झाले आणि त्यांनी त्यांना वर्णव्यवस्थेत उच्च स्थान देणारे ब्राह्मण धर्म आणि वैष्णव धर्म स्वीकारायला सुरुवात केली आपल्याकडे बाहेरून आलेल्या लोकांच्या बाबतीत केवळ ते ब्राह्मण धर्मी होते अशी समजूत आहे ती खरी नाही अनेक क्षत्रिय आणि वैश्य झालेल्या बाहेरून आलेल्या लोकांना सुद्धा सुरुवातीला शैव लोकांनी सामावून घेतले परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की या लोकांनी त्याबद्दलची कसलीही कृतज्ञता नोंदवलेली नाही आज सुद्धा या लोकांच्यातून येणारे विचारवंत याबाबतीत प्रामाणिक असतीलच याची कसलीही खात्री आता उरलेली नाही उलट आपण बाहेरून आलोय त्याचा माज किंवा आर्य असल्याचा माज काही लोकांना चढलाय की काय अशी आता शंका येते मुळात सुरुवातीला बाहेरून आलेले युरेशियन लोक सुद्धा तीन वर्णात विभागले गेलेले होते आणि त्यांच्यात आपापसात मारामाऱ्या होतच होत्या त्यांच्यातल्या वर्ण युद्धाबद्दल संघर्षाबद्दल आपल्याकडे सोयीस्करित्या मौन पाळले जाते अनेकदा तर ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या ऐवजी वैश्यच विजयी झालेले दिसतात पण आश्चर्यकारकरीत्या वैश्य लोकांनी आपला इतिहास न लिहून ठेवल्याने युरेशियन लोकांचा इतिहास सुद्धा प्रामाणिक उरलेला नाही अर्थातच या काळामध्ये शूद्र ,अति शूद्र आदिवासी राजे (खरे तर ही संज्ञा त्यांच्यासाठी वापरणेही चूक आहे कारण ते स्वतःला शूद्र अति शूद्र वगैरे काही म्हणवून घेत नव्हते )त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये राज्य करत होते आणि हे राज्य प्रामुख्याने शैव पद्धतीने सुरू होते आणि त्यांचे त्यांचे स्वतःचे कायदे हे लोक स्वतःच करत होते मनुस्मृती नावाची गोष्ट त्यांना माहीतच नव्हती
त्यांच्या कालगणनांना ते स्वतंत्र पणाने सुरू करत होते आणि राज्यभर तीच कालगणना अस्तित्वात असायची मात्र ब्राह्मणांनी ज्यांची नोंद केलेली आहे ते सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजेच फक्त कालगणना सुरू करत होते अशी आपल्याकडे सर्वांची सोयीस्कर समजूत ब्राह्मणी इतिहासकारांनी करून दिलेली आहे यांना आपणाला आणि आपल्या कालगणनांना वैदिक वा क्षत्रिय कालगणना सुद्धा म्हणतात हे त्यांना माहीत नव्हते इतके ते क्षत्रिय भानगडी पासून वेगळे आहेत शैव धर्मी लोकांची स्वतःचा इतिहास न लिहिण्याची खोड त्यांना प्रचंड महागात पडलेली दिसते आणि म्हणूनच आता सर्वाधिक इतिहास लिहिण्याची गरज शैव लोकांना आणि शैव धर्माला आहे याला अपवाद फक्त पंडित लोक आहेत आणि पंडित लोकांनी जेव्हा जेव्हा इतिहास लिहिलेला आहे तेव्हा तेव्हा आपणाला काही ऐतिहासिक नोंदी सापडतात शर्मा आणि वर्मा हे प्रमुख पंडित उत्तर भारतात काम करत होते आणि त्या खालोखाल कायस्थ समाजातून आलेले पंडित होते महाराष्ट्रात त्यांना पंत म्हणून ओळखले जाते हे प्रामुख्याने स्वतःला गुप्त ही संज्ञा वापरत उदाहरणार्थ अभिनव गुप्त वसू गुप्त वगैरे ते पंडित असल्याने ते ब्राह्मण होते असा फार मोठा गैरसमज मुद्दाम म्हणून हल्ली पसरवला जातो लेखन कामाठी करणाऱ्या समाजाला शैव लोकांच्या मध्ये कायस्थ असेच म्हटले जात होते कारण ते इतिहासाला कायेचे रूप कायेचे स्थळ देत होते हिशेब ठेवणे ही गोष्ट त्या काळात महत्त्वाची होती आणि तो ठेवण्यासाठी आपोआपच इतिहास ठेवला जात होता शिवाय आपल्या पूर्वजांच्या नोंदणी ठेवण्याची नैसर्गिक प्रेरणा त्यामध्ये आहेच
भारतीय इतिहास लिहिताना पंडितांनी लिहिलेल्या ग्रंथांना डावलणे सातत्याने घडले आहे दुर्दैवाने याची साधी चौकशी सुद्धा कोणी करत नाही अनेकदा पंडितांनी लिहिलेले ग्रंथ पद्धतशीरित्या भ्रष्ट केलेले आहेत याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण अभिनव गुप्ताचे नाट्यशास्त्र आहे अभिनव गुप्ताने लिहिलेले हे नाट्यशास्त्र त्याने निर्माण केलेले भरत हे पात्र केंद्रस्थानी आणत भरताच्या नावाने हे नाट्यशास्त्र खपवण्याचा उद्योग करत ब्राह्मण लोकांनी ते युरेशियन करून टाकलेले आहे जर का ते भरताने लिहिले असते तर इतर ब्राह्मणांनी त्याची परंपरा चालवत अनेक नाट्यशास्त्रे घडवली असती पण हे घडलेले नाही कारण मुळात नंतर वैष्णव धर्माने या नाट्यशास्त्राचा वापर करत त्यात घाल घुसड करत सर्व नटांना शूद्र केले याचे कारण स्पष्ट आहे शंकर हा स्वतः नट आहे नटराज आहे त्याला शूद्र करायचा असेल तर एकच उपाय उरतो सर्व नटांना शूद्र करून टाकणे एकदा नट शूद्र झाले की शैव लोकांचा मुख्य कला वांग्मय प्रकारच आपोआप बंद पडतो कारण शैव महाकाव्य लिहिण्याऐवजी नाटक लिहीत आणि तीच त्यांची प्राचीन कला होती प्राचीन काळापासून समरसतेच्या नावाखाली हे उद्योग केले गेले जेणेकरून शैव नाटके बंद पडावित आणि शैव धर्माचा प्रचार बंद पडावा नंतरच्या काळामध्ये शैव नाटके का लिहिली गेली नाही कि ती नाटके पद्धतशीरपणे बंद पाडली गेली याची एकदा ऐतिहासिक चौकशी आपणाला करावी लागणार आहे प्राचीन काळातल्या सर्व शैव ग्रंथाबाबत असेच घडताना दिसते याचे कारण मुळात शैव धर्मी लोकांना आपल्या ग्रंथांच्या विषयी असलेली अनास्था होय परिणामी अनेक फक्त शैव असलेले आणि कुठलाही वर्ण आणि जात न पाळणारे आणि सांगणारे लोक ब्राह्मण धर्माच्या इतिहासात मात्र ब्राह्मण होऊन बसतात आठव्या ते दहाव्या शतकामध्ये हे वारंवार घडताना दिसते आणि मग वर्तमान काळातल्या लोकांनाही हे त्यांच्या मृत्यूनंतर ताबडतोब केले जाते मग ज्ञानेश्वर यांच्या समाधी बाबत तिथे असलेले सिद्धेश्वर लिंग जे ज्ञानेश्वरांनी स्वतः सिद्ध झाल्यानंतर स्थापन केले होते आपोआपच बाजूला जाते आणि आळंदीची समाधीची जागा त्यांच्या स्थापन केलेल्या शिवलिंगापेक्षा महत्त्वाची बनत जाते आणि ती वारकरी बनत जाईल याची काळजी घेतली जाते
शैव लोकांचा इतिहास डावलण्याचा प्रकार हा वारंवार घडतो आणि दुर्दैव हेच आहे की शैव लोकांना याची कसलीही खंत नाही
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग पाचवा श्रीधर तिळवे नाईक
शैव कालगणनेमध्ये अमावस्येला कधीही अमावस्या म्हटले गेलेले नाही हा नंतर डेव्हलप झालेला शब्द आहे प्रत्यक्षात शिवरात्र हाच खरा शब्द होय आणि तो आजही पंचांगात अनेकदा वापरला जातो शुक्ल हा शब्द शक्तीपासून येतो कारण ती गौरी आहे आणि दिवस गोरा असतो अगदी शुक्लकाष्ठ हा शब्द सुद्धा निगेटिव्ह अर्थाने येतो तो या अर्थानेच की शक्ती म्हणजेच संसार प्रपंच मागे लागला आहे आणि त्यातून सुटका नाही प्रश्न असा आहे शुक्ल आणि शिव यांचे रूपांतर शुक्ल आणि कृष्ण कुणी केले ?
तर हा कृष्ण हा शब्द काळा या अर्थाने म्हणजेच अमावस्या कडे चाललेला या अर्थाने आलेला आहे
सर्वसाधारणपणे
१चैत्र
२वैशाख
३ज्येष्ठ
४आषाढ
५श्रावण
६भाद्रपद
७अश्विन
८कार्तिक
९मार्गशीष
१०पौष
११माघ
१२फाल्गुन
हे बारा महिन्यांची नावे भारतामध्ये जवळजवळ सर्वच धर्मानी स्वीकारलेली आहे या महिन्यांच्या नावामध्ये फक्त एकच नाव असे आहे जे एका व्यक्तीशी संबंधित आहे आणि ती व्यक्ती आहे शिवपुत्र कार्तिकेय ! ही नवीन कालगणना त्यानेच अस्तित्वात आणली आणि ही बारा महिन्यांची नावे ही त्याच्यामुळेच अस्तित्वात आली आणि त्याची आठवण राहावी म्हणूनच एका महिन्याचे नाव कार्तिक असे देण्यात आले त्यामुळेच इतिहास आहे आपल्याला या महिन्यांची नावे असलेले लोक आठवत नाहीत फक्त श्रावण हे नावच त्यातल्या त्यात प्रचलित आहे कार्तिक व कार्तिकेय हे नाव मात्र अखंड भारतात सर्वत्र आहे श्रावण हे नाव सुद्धा नंतर महिन्याचे नाव प्रस्थापित झाल्यानंतर देण्यात आलेले आहे कारण रामायणात बारा महिने दिसतात म्हणजेच रामायणाच्या काळामध्ये बारा महिने प्रस्थापित झाले होते
या शब्दातूनच पुढे कीर्ती आणि कर्ता आणि कर्ती असे शब्द पुढे आलेले दिसतात याचे कारण स्पष्ट आहे कार्तिक किंवा स्कंद हा क्रिया तंत्राने मोक्ष मिळवणारा पहिला मनुष्य आहे गणपती हा ज्ञानतंत्राने जातो पण स्कंद मात्र क्रिया तंत्राने जातो म्हणूनच तो नंतर देवांचा सेनापती म्हणून मान्यता पावलेला दिसतो कारण त्याला सामावून घेण्यासाठी हे करणे आवश्यक वाटत होते आपल्याकडे मूळ स्कंद पुराण हे नाहीसे झालेले आहे आणि आता जे शिल्लक आहे ते थोतांड आहे त्याच स्कंद विषयीची मूळ माहिती मिळत नाही आपल्याकडचा खंडोबा म्हणजेच स्कंद होय स्वतःचा कंद म्हणजे स्वतःचा गाभा अबाधित राखणारा तो स्कंद होय महाराष्ट्र वरचा खंडोबाचा प्रभाव खोडून काढण्यासाठी अनेक खोट्या दंतकथा नंतर रचल्या गेल्या वास्तविक संपूर्ण दख्खन भर म्हणजेच दक्षिण भर खंडोबा हाच मुख्य देव आहे याचे कारण खुद्द भगवान शंकरानीं त्याला दक्षिण दिली होती त्याने आणि परशुरामाने जो दुसरा क्रिया तंत्राने मोक्षाला उपलब्ध झालेला शिव शिष्य होता आणि ज्याचा वैष्णवा अवताराशी काडीचाही संबंध नाही मिळून संपूर्ण दक्षिण राखलेली आहे यातील किनाऱ्यावर किनाऱ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी परशुरामावर होती आणि त्यानेच जंगले तोडून हा प्रदेश शेतीसाठी योग्य बनवला ग्रीकमधून आलेल्या लोकांना सामावून घेण्याची नंतरची परशुरामी परंपरा वैष्णव कशी झाली हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रश्न आहे मी नेहमीच म्हणतो की ज्यांनी आश्रय गेला त्या शैव लोकांच्या वरच अनेक बाहेरून आलेले लोक उलटले त्यात हे परशुराम वैष्णवावतार मानणारे लोक आहेत बाहेरून यायचे शैव लोकांशी घरोबा करायचा स्वतःचा आश्रय घ्यायचा आणि मग शैव लोकांची घरे तोडायची असेच धंदे परदेशातून आलेल्या लोकांनी केलेले आहेत का असे आता विचारायची वेळ आलेली आहे कारण आठव्या ते बाराव्या शतकात जो काही शैव धर्मी लोकांचा पाडाव होत गेला त्याला जबाबदार हेच लोक आहेत घर का भेदी लंका जलाये तसा प्रकार घडलेला आहे किंबहुना बिभीषणाचा गौरव करण्याचे कारण तेच आहे याच लोकांनी शैव पंचांगातून हळूहळू वैष्णव आणि वैदिक पंचांगे तयार करायला सुरुवात केली आणि ती प्राचीन आहेत असेही सांगायला सुरुवात केली अन्यथा सातव्या शतकापर्यंत वैदिक पंचांगांचा कसलाही पुरावा मिळत नाही प्राचीन काळापासून पंचांगे ही नेहमीच गुरव किंवा पंडित यांच्याकडे असत महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्वच ब्राह्मण हे मूळचे पंडित आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हे सर्व पंडित हळूहळू कारण नसताना वर्णव्यवस्था स्वीकारून बसले आणि ह्याचे एकमेव कारण त्यांना वर्णव्यवस्थेत मिळणारे सर्वोच्च स्थान होते याच लोकांनी प्रथम शैव राजांना फिरवले आणि त्यांचे यादव करण केले अन्यथा महाराष्ट्रातले यादव घराणे हे यादव घराणे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे इथूनच महाराष्ट्रातील पंचांगे बदलायला सुरुवात झालेली दिसतात आणि महाराष्ट्र यादव झाल्यानंतर वैष्णव झाल्यानंतर खिलजींच्याकडून पराभूत झाला ही वस्तुस्थिती आहे वारकरी पंथाची सुरुवातच अल्लाउद्दीन खिलजीच्या विजयाला सुरुवात करून देणारी ठरली होती
महाराष्ट्रातल्या पंचांगांचा इतिहास हा या कालखंडात बदललेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे ग्रीकांच्या राशी सुद्धा आपण ह्याच काळामध्ये संपूर्णपणे स्वीकारल्या आठवडा ही व्यवस्था ही स्वीकारली
याच काळामध्ये आपणाला सर्व कालगणना ही शालीवाहन कालगणना झालेली दिसते शैव असलेल्या सातवाहनांचे मूळ उखडून टाकणे आणि वैष्णव बनलेल्या यादवांचे आरंभ म्हणून स्थान ठसवणे हा या शालिवाहन शके चा उद्देश आहे आजही आपल्या पंचांगात विशेषत: कॅलेंडरात शालीवाहन शक विलसत असतो
हा एकच शक असा आहे जो अतिशय जुना आहे तो भगवान शंकरांच्यापासून सुरू होत बुद्धमार्फत प्रवेश करत अशोकातून स्थलांतर करत आपल्यापर्यंत पोहोचताना दिसतो मात्र त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्राह्मणीकरण झालेले आहे ते आता पुन्हा एकदा शैविकरण करून शुद्ध केले पाहिजे मुख्य म्हणजे राशी हटवल्या पाहिजेत आणि २७ नक्षत्रे आणली पाहिजेत 27 नक्षत्रांचा व दोन पंधरवड्यांचा महिना प्रस्थापित केला पाहिजे आणि राशीनुसार स्वभाव सांगण्याऐवजी पुन्हा एकदा महिन्यानुसार स्वभाव सांगितला पाहिजे तिथीनुसार स्वभाव सांगितला पाहिजे काही लोकांना ही सूचना आवडणार नाही परंतु कॅलेंडर प्रस्थापित करण्यासाठी ज्योतिषी लोकांचा खूप फायदा होतो हा माझा अनुभव आहे
थोडक्यात काय आपण शैव कालगणना सुरू करताना २२००० वर्षापासून सुरुवात करावी त्यामुळे भारताचा इतिहास नीट मांडता येऊ शकतो मुख्य म्हणजे अनेक उत्खननातून येऊ घातलेले नवे संदर्भ त्यामुळे नीट सामावून घेता येतील खुद्द युरोपमध्ये सुद्धा आता जुन्या संस्कृतींचे अवशेष नव्या उत्खननांच्या मधून सापडत आहेत त्यामुळे खुद्द त्यांचा इतिहास सुद्धा आता जीजस पासून सुरू होऊ शकत नाही तो त्यापेक्षा अधिक प्राचीन होत गेलेला आहे त्यामुळेच आता तिकडे जीजस पूर्व जीजस नंतर अशी विभागणी टाळावी असे मत प्रस्थापित झालेले आहे ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे आणि पुरोगामी इतिहासकार सुरुवातीच्या कालखंडात ख्रिश्चन असल्याने हे घडलेले दिसते मला वाटते आता हे बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग सहावा श्रीधर तिळवे नाईक
भारतीय कालगणनेचा निश्चित कालखंड हा लोक शैव धर्माचा आद्यसम्राट महापद्मशालीनंद आणि त्याचा वारसदार धनानंद यांच्या पासून सुरू होतो त्या दोघांच्या विषयी जे लिखाण आहे ते शैवेतर लोकांनी केलेले असल्याने साहजिकच या लोकांनी नंद घराण्याचा इतिहास हा स्वतःच्या सोयीने मांडलेला आहे एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे हे लोक ज्यांना अलीकडे वैश्य म्हणतात परंतु प्रत्यक्षात पणी होते वाणी होते मुळात या काळामध्ये मगध क्षेत्रावर शैवधर्मी लोकांचा प्रभाव असल्याने साहजिकच कोणीही राजा होत होता आणि कोणीही पणी आणि वणी होत होता या धनानंदाचा घात चाणक्य नावाच्या एका ब्राह्मणाने केला इतकीच माहिती आपणाला महावंश देतो याच्या व्यतिरिक्त कसलीही चाणक्य विषयीची माहिती आपणाला भेटत नाही हा नंतर कुठे गेला त्याचे काय झाले हे आपणाला माहीत नाही अनेक लोकांनी याच्या आधारे नंतर कथा रचल्या असल्या तरी प्रत्यक्षात नेमके काय झाले हे कोणालाच माहीत नाही चंद्रगुप्त हा धनानंदाला मुरा नावाच्या स्त्रीपासून झालेला होता ती स्त्री सत्ताक टोळी राज्यात होती साहजिकच मातृसत्ताक राजवटीत चंद्रगुप्त हा आपल्या आईकडे वाढला आणि मामाकडून त्याचे संगोपन झाले शैव लोकांच्यात मातृसत्ताक राजवटीचा प्रभाव त्या काळामध्ये टिकलेला होता त्यामुळे साहजिकच आपल्या आईचे नाव त्याने वंश म्हणून पुढे वापरले त्यात आश्चर्यकारक काहीच नाही ती दासी होती असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे असले तरी ठोस विधान करता येईल असे वाटत नाही त्या काळातील टोळीतून येणारी प्रत्येक स्त्री दासी असायची हा ब्राह्मण्यक इतिहासकारांचा रोमँटिसीजम आहे
या घराण्याचा कालखंड निश्चित होतो त्याचे कारण बौद्ध वांग्मय आहे आंबेडकर यांनी २५०० वर्षे पूर्ण झाली म्हणून योग्य वेळ साधत बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्यामुळेच आंबेडकर करांना प्रमाण मानले तर बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व ५५६ तर त्याचा मृत्यू ४७७ ते ४९१ असा मानता येतो आणि नंदवंश हा साधारणपणे ६५६ पासून सुरू करता येतो नकुलीशाचा कालखंड हा साधारणपणे इसवी सन पूर्व ९०० वर्ष आहे कपिल हा बुद्धाच्या आधीचा आहे हे निश्चित आहे आणि कपिलाच्या आधी नकुलिश होऊन गेला आहे कारण तो हिरण्याचा गुरु आहे आणि या हिरण्याच्या वंशात हिरण्य कश्यपू निर्माण झालेला आहे याला अलीकडे बळी वंश म्हटले जात असले तरी हा मूळचा हिरण्य वंश आहे जो पुराणे म्हणतात त्याप्रमाणे पाशुपत धर्माचा कट्टर पुरस्कार करत होता किंबहुना त्यामुळेच हिरण्यकशपूची नंतर हत्या झालेली आहे याच्याच वंशात नंतर एकापेक्षा एक तत्त्वज्ञानी राजे निर्माण झालेले आहेत हा लोकशैव कालखंडाचा आद्य सम्राट आहे आणि ह्या राजवंशातच कपिल यांचा जन्म झाला आणि त्यांनीच षष्ठीतंत्र लिहिले जे नंतर आर्य लोकांनी सांख्य तत्त्वज्ञान म्हणून फेमस केले आणि ज्याचा थेट प्रभाव हा महावीर आणि गौतम बुद्ध दोघांच्यावरही पडलेला आहे
नंदवंशाच्या राजवटीतील चंद्रगुप्ताने सर्वात प्रथम एकसंध साम्राज्य उभे करायला सुरुवात केली या काळामध्ये जैन स्वतंत्र धर्म नव्हता तो शैव-धर्मातील ज्ञानतंत्राचा व नाथधर्माचा भाग होता त्यातून स्वतंत्र धर्म निर्माण केला तो भगवान महावीरांनी ! अन्यथा तोपर्यंत मोक्ष प्राप्त झालेले जैन लोक हे साधारणपणे स्वतःला नाथ म्हणवूनच घेत होते हे वृषभनाथांच्या पासून पार्श्वनाथापर्यंत चाललेले होते अगदी अशोकाच्या अनेक लेखांमध्ये सुद्धा बुद्धाचा उल्लेख शाक्यमुनी आणि जीन असा आहे चंद्रगुप्त मौर्याने जैन म्हणजेच ज्ञान तंत्र स्वीकारले(उत्तर भारतात विशेषता पंजाब मध्ये आजही ज्ञानी माणसाला जैन आदमी म्हटलं जातं )आणि नंतर जेव्हा महावीरांच्या पासून स्वतःचा स्वतंत्र धर्म काढणे सुरू झाले तेव्हा साहजिकच चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला होता असा प्रचार सुरू झाला प्रत्यक्षात चंद्रगुप्त हा शैव होता बिंबिसार ही शैव होता आणि अशोक ही शैव होता यातील अशोक गौतम बुद्धांना शाक्य मुनी म्हणत होता आणि मुळातच गौतम बुद्ध हा सिद्ध असल्याने तो आपल्यापेक्षा काही वेगळा आहे ही भावनाच मुळात त्या काळात शैव लोकांच्यात नव्हती अशोकाच्याच काळात एका अर्थाने लिखित संहितांचे निर्माण बौद्ध धर्माने केले आणि त्यामुळे हळूहळू जैन आणि बौद्ध असे दोन नवे धर्म निर्माण झाले अशोक हा नंतरच्या काळात अधिकाधिक कट्टर बनत गेला त्याचाही फार मोठा वाटा बौद्ध धर्माच्या निर्मितीत आहे हिंसा करणारा मनुष्य आता त्याच्या धर्माविरुद्ध असणाऱ्या लोकांची हिंसा करू लागला त्याला अहिंसेचे प्रतीक मानणारे लोक इतिहास नीट वाचतात असं वाटत नाही खुद्द बौद्ध धर्म ग्रंथ त्याने बौद्ध धर्मासाठी किती हत्या केल्या याचे उदाहरण देत असतात पण अशोकामुळेच आपल्या उत्खननात्मक पुराव्यांची ऑथेंटिक सुरुवात होते आणि त्यामुळेच भारतीय इतिहासाला एक आधार शिला प्राप्त होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती बनत नव्हती तर स्तूप आणि बोधी वृक्ष ही परंपरा चालत होती आणि ही शैव परंपरा आहे जिथे स्तूप शिवलिंगा जागी आलेला आहे आणि वटवृक्ष ऐवजी बोधीवृक्ष आलेला आहे खुद्द बुद्धाच्या काळामध्ये फक्त यज्ञात हिंसा होत होती असे नाही आपण जर का या काळातले शैव राजे पाहिले तर ते प्रचंड हिंसक होते विशेषत: बिंबिसार आणि अजात शत्रू यांचा वंश हा पितृघातकी वंश होता अशी प्रतिमा बौद्ध धर्मग्रंथांनी निर्माण केलेली आहे आता हे खरे की खोटे हे ठरवणे अवघड आहे कारण आपल्या शत्रूला जास्तीत जास्त हिंसक दाखवणे बौद्ध धर्मीय लोकांना आणि इतिहासकारांना आवडते आपल्याकडे बौद्ध इतिहासकार म्हणजे कोणी सज्जन सद्गुनी आणि विज्ञाननिष्ठ लोक होते असा एक फार मोठा गैरसमज आहे प्रत्यक्षामध्ये आपल्या धर्मप्रचार च्या आड येणाऱ्या प्रत्येकाला अधिकाधिक हिंसक ठरवणे हा बौद्ध इतिहासाचा अजेंडा आहे अगदी अशोक सुद्धा यातून सुटलेला नाही तो बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर अहिंसक होतो पण आश्चर्यकारक रित्या जेव्हा इतर धर्मांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र तो हिंसक होतो हे सुद्धा कितपत खरे आहे हे तपासले पाहिजे शैव धर्माला मांसाहार मान्य होता व आजही आहे परिणामी शैव हे हिंसेमुळे मांसाहारामुळे कसे मागासलेले आहेत हेच दाखवणे बौद्ध धर्मीय जैन धर्मीय लोकांना आवश्यक वाटले आणि पुढे ब्राह्मणधर्माने हेच केले मांसाहार करणाऱ्या लोकांना अस्पृश्य करण्यात आले का आणि हे अशोकाने केले का हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे ज्याच्या विषयी अनेक लोक सोयीस्कर मौन पाळत असतात ज्यांना आज-काल पूर्वाश्रमेचे अस्पृश्य म्हंटले जाते ते योगायोगाने सारेच कसे शैव आहेत हा प्रश्न एकदा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य लोकांनी विचारायला पाहिजे ज्या लोकांच्या टाक मध्ये कधीही गौतम बुद्ध नव्हता पण शैव दैवते मात्र होती ते लोक आपल्या देव्हाऱ्यातला ढळढळीत पुरावा नाकारत स्वतःला आता पूर्वाश्रमीचे बौद्ध म्हणवून घेतात हे आश्चर्यकारक आहे
मात्र मांसाहाराविरोधात जी मोहीम सुरू झाली त्याची सुरुवात बौद्ध आणि जैन धर्माने केलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे अहिंसेचे स्तोम शैव धर्मी लोकांच्या शत्रूंनी माजवलेले आहे असो
पण ही जैन आणि बौद्ध धर्मग्रंथातील सगळी वर्णने जैनबौद्ध इतिहास असतात आणि त्यातून आपणाला कालखंडाचे काही पुरावे मिळत राहतात यानंतरच आपणाला नाणी मिळत असल्याने आपला इतिहास अधिक ऑथेंटिक बनवता येतो या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा वंश हा कनिष्काचा आहे आणि तो नाण्यांच्या इतिहासावरून असे दिसते की सुरुवातीला शैव होता आणि मग बौद्ध झालेला आहे हा प्रवास अनेकदा घडलेला आहे म्हणजे यादव वंश सुरुवातीला शैव आहे मग तो वारकरी वैष्णव होत जातो तरीही अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना ही यादववंशानेच केलेली असते कारण महाभारतातला कृष्ण सुद्धा शिवभक्त असतो
भारतात साधारणपणे इसवी सन पूर्व १५०० च्या आसपास वैदिक लोक आले आणि इसवी सन पूर्व ११०० च्या आसपास त्यांनी ब्राह्मण धर्म निर्माण करायला सुरुवात केली त्याला प्रतिकार म्हणून शैव परंपरेमधून आपणाला नकुलिश यांनी पाशुपत धर्म निर्माण केलेला दिसतो आणि हा साधारणपणे इसवी सन पूर्व ९०० च्या आसपास निर्माण झालेला आहे आणि पुढे त्यांचेच अनुकरण करत महावीरांनी आणि गौतम बुद्धांनी बंड केलेले दिसते
प्रश्न असाय आहे की भागवत धर्म हा मग कधी निर्माण झाला आज सुद्धा भागवत धर्मामध्ये ब्राह्मणधर्म आधी होता की भागवत धर्म आधी होता हा एक मोठा वाद आहे कारण अनेक भागवतधर्मी लोक महाभारताचा कालखंड इसवी सन पूर्व ११०० असा मानतात मुळातच मला असे वाटते की मथुरेच्या आसपास वासुदेव नावाचा धर्म जन्मला असावा आणि त्यातूनच पुढे भागवत धर्म उदयाला आला असावा जरासंध हा शिवभक्त होता हे सर्वश्रुत आहे आणि अनेक मगध राजे सुरुवातीला शैवच दिसतात आणि त्यांच्या विरोधात कदाचित हा आर्य लोकांनी वासुदेव धर्म निर्माण केला असावा आर्य लोकांच्यातील सामान्य माणसांचा हा धर्म होता का हा प्रश्न एकदा विचारणे आवश्यक आहे
असो थोडक्यात काय आपणाला नंदांच्या पासून काल निश्चिती करता येते आणि त्या पुढचा कालखंड एका विशिष्ट पद्धतीने मांडता येतो मी या विषयाची सुरुवात करताना म्हटले होते की प्रत्येक जण आपापला इतिहास मांडतो आहे आणि हे अटळ आहे ज्याचा त्याचा इतिहास आणि बाकी इतिहास हे विसाव्या शतकाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहासातील कालगणनेचा प्रश्न भाग सातवा श्रीधर तिळवे नाईक
आपण इथे कालगणनेची आणि इतिहासाची चर्चा करत आहोत आता प्रश्न असा येतो की कालगणनेचा उपयोग नेमका कशासाठी होतो आणि आपले पूर्वज संदर्भात नेमके काय विचार करत होते
भारतातले सर्वच अध्यात्मिक विचारवंत असे सांगतात की आपण नेहमी इतिहासापासून दंतकथा तयार करतो याचे कारण आपण त्या दंत कथेद्वारे जीवनाचा इसेन्स सांगतो अलीकडे ही मांडणी भगवान ओशो रजनीश यांनी अधिक प्रभावीपणाने केलेली आहे शैव परिभाषेत सांगायचे तर ज्ञानाचा काहीही उपयोग नसतो. ज्ञान शहाणपण देऊ शकत नाही त्यामुळेच इतिहास शहाणपण देऊ शकत नाही शहाणपणासाठी तुम्हाला मोक्ष मिळवावा लागतो किंवा किमान मोक्षाची साधना करत सविकल्प समाधी पर्यंत पोहोचावे लागते साहजिकच भारतामध्ये इतिहासापेक्षा गोष्टींच्याद्वारे शहाणपण सांगणे हेच प्रस्थापित झालेले आहे त्यामुळे अगदी बौद्ध इतिहास सुद्धा हे आरंभिक दंतकथांचे नमुने असतात जिथे जैन आणि बौद्ध सुद्धा दंतकथांच्याद्वारेच भूतकाळ सांगत बसतात महावंश आणि इतर बौद्ध धर्म ग्रंथातला इतिहास हा जितका वस्तुनिष्ठ भासतो तितका तो वस्तुनिष्ठ नाही हे स्पष्ट आहे जर बौद्ध लोकांची स्थिती असेल तर तिथे इतरांच्या विषयी काय बोलावे? शैवांचा तर स्पष्टपणे स्टान्स असा आहे की ज्ञानाचा फारसा मोक्षासाठी उपयोग नाही विशेषता शक्ती तंत्रामध्ये ज्ञानाचा अस्त झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशी संकल्पना आहे साहजिकच याचा एक सखोल परिणाम आपणाला 19 व्या शतकामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये दिसतो आणि पुढे तो जे कृष्णमूर्ती आणि नंतरचे युजी कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत फोफावलेला दिसतो या दोघांनीही सातत्याने ज्ञान नाकारले आहे आणि जे कृष्णमूर्ती यांनी कायमच ज्ञान नाकारत शहाणपणाचा पुरस्कार केलेला आहे दोघेही कळत नकळत इथे शैव झालेले दिसतात इतिहासाचे काम शहाणपण सांगणे हे असले पाहिजे हे शैव लोकांना फार क्लिअर आहे
प्रश्न असा आहे की मग इतिहास दंतकथेद्वारेच सांगायला हवा का तर नाही तुम्ही तो निवेदनात्मक पद्धतीनेही सांगून शेवटी शहाणपण सांगू शकता मोक्ष कालातीत आहे साहजिकच इतिहास हा कालातिततेकडे नेणारा असला पाहिजे मात्र तुम्ही इतिहास लेखन करता तेव्हा तुम्ही काललेखनच करत असता ही शैवधर्मी लोकांची मुख्य संकल्पना आहे शैव इतिहास प्रामुख्याने युरेशियन लोकांनी कसे नष्ट केले हे पाहावे लागते याबाबतीत उत्खननांच्यावर अवलंबून राहण्याशिवाय शैव इतिहासकारांच्या पुढे पर्याय नाही पुराणे आणि इषद म्हणजेच इशविषयी ईश्वराविषयी लिखाण करणारा सूत्र वा सुत समाज हा शैव समाज होता तो काही युरेशियन समाज नव्हे मुळात लाकडांच्या वर कोरीव काम करून सूत्र लिखाण करणे हा त्याचा मूळ धंदा यांच्यावरूनच पुढे सुतार ही संकल्पना विकसित होत गेली आणि लाकडावर काम करणारे आणि लाकडी काम करणारे सर्व लोक सुतार बनले धातूंचा शोध लागण्याआधी भारतामध्ये सर्व शैवलोक लाकडापासून अनेक गोष्टी तयार करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे यात घरापासून सूत्र लिखाणापर्यंत अनेक गोष्टी येतात त्या लाकडाच्या असल्यामुळेच टिकल्या नाहीत आणि त्याचे शैव इतिहासकारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले ही सूत्रे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इतिहास म्हणजे शहाणपण सांगण्याची कला याच्या आधारे केले गेलेले अविष्कार आहेत नंतर हे सर्व सूत्रलेखन तंत्र सूत्रांच्या स्वरूपात वेगवेगळ्या नावांनी येत गेले मी मागेच म्हटलेले आहे की शैव मोक्षकारांचा इतिहास थोडा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे जगात सर्वत्र जो मोक्षाचा किंवा धर्माचा उपदेश देतो त्याचे नाव संहितेला असते शैव-धर्मामध्ये नेमके उलटे घडते इथे गुरूच्या ऐवजी शिष्याच्या नावाने संहिता ओळखली जाते त्यामुळेच भैरवनाथाला केला गेलेला इतिहास हा विज्ञान भैरव तंत्र या नावाने येतो आणि त्याची मांडणी शिव आणि देवी अशा स्वरूपात येते ती मूळची शिव आणि शक्ती यांची मांडणी आहे किंवा नंदीला केला गेलेला उपदेश नंदी सूत्र म्हणून पुढे येतो आणि हाच पुढे नारद सूत्र बनतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे अपवाद फक्त असला तर तो शिवसूत्रांचा आहे कारण ही सर्व सूत्रे शिवाच्या आठवणीतच नंतरच्या लोकांनी जतन केलेली आहेत आणि शिवसूत्राचे सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे ज्ञान हा मोक्षामध्ये बाधा आहे वा मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अस्त ! तुम्ही जर का जे कृष्णमूर्ती वाचाल तर त्यामध्ये या वाक्याचे प्रचंड पडसाद दिसतील आणि पुढे पुढे युजी कृष्णमूर्ती या ज्ञानाचा अंतच करायला धडपडतात
आता ज्ञानाचीच ही जर अवस्था असेल तर मग इतिहासाचे काय ? इतिहासही ज्ञान आहे आणि ते भूतकाळ आहे आणि भूतकाळाचे ज्ञान माणसाला वर्तमान सुधारायला काडीचाही वाव देत नाही विशेषता मोक्षाच्या संदर्भामध्ये हे आपण लक्षात घेतले पाहिजे
मात्र जिथे अर्थ येतो तिथे काय करायचे ? तर अर्थ आणि काम या दोन अक्षांच्या मध्ये इतिहास हा मुख्य आधार बनतो जगातल्या सर्व कला आणि ज्ञान प्रणाली यांचा स्वतःचा इतिहास असतो साहजिकच हा इतिहास माहिती असल्याशिवाय तुम्ही कसलेही योगदान देऊ शकत नाही तुम्ही काहीही नवीन निर्माण करू शकत नाही आणि मुळातच समाज म्हणजे विशिष्ट क्षेत्राचा एका समुदायाने आत्मसात केलेला इतिहास आणि त्याची वर्तमानात केलेली एप्लिकेशन्स ही स्थिती असते आपण जेव्हा कुंभार समाज म्हणतो सुतार समाज म्हणतो तेव्हा या समाजातील लोक त्या त्या क्षेत्रातील सर्व इतिहास सर्व होऊन गेलेली यंत्रे मंत्रे तंत्रे आत्मसात करत त्यांचे वर्तमान काळातले इनोव्हेटिव्ह काम करत असतात अनेकदा समाज हा मौखिक इतिहासाने चालत राहतो साहजिकच लिखित स्वरूपात इतिहास हा फार उशिरा अवतरलेला दिसतो मात्र ज्याप्रमाणे युरेशियन लोक आपल्या स्मृती लादतात त्याप्रमाणे कुठलीही स्मृती शैवलोक लादत नाहीत प्रत्येक समाजाचा वर्तमान हा वेगळा असतो याची जितकी स्पष्ट आणि स्वच्छ जाणीव शैव लोकांना जगात होती तेवढी इतर धर्मी लोकांना नव्हती असे स्पष्ट दिसते त्यामुळे मोक्षतंत्र बाबत सुद्धा एकच एक ग्रंथ प्रमाण मानला जात नाही आणि धर्म नावाचा अक्ष शैव वैचारिकतेत उपलब्ध नाही तो नंतर आला आणि झरतृष्टामुळे मान्यता पावला अगदी भावतंत्र सुद्धा भावतंत्र म्हणूनच येते आणि पूजा म्हणजे पूज्य होणे म्हणजे शून्य होणे हेच भावतंत्राचे मुख्य सूत्र आहे हे प्राचीन काळातल्या शैव लोकांना नीट माहिती आहे या पूजेचे रूपांतर युरेशियन लोकांनी कर्मकांडात केलेले आहे आणि आत्ताच्या अनेक पूजा म्हणजे पुरोहित लोकांचे धंदे होय मग हे पुरोहित वैष्णव धर्मी असोत किंवा शैव धर्मी असोत
ही सूत्रे जतन करण्याची जबाबदारी पंडित लोकांच्यावर सोपवली गेली होती आणि नवव्या शतकापर्यंत त्यांनी ती उत्तम पार पाडलेली दिसते. नंतर मात्र पंडितांना युरेशियन धर्म चावला आणि मग शैव-धर्माला सुद्धा सूत्रांचे असलेले अधिष्ठान नष्ट होत गेले आणि याच पंडित लोकांनी ब्राह्मण बनून शैव धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मात करण्याचे काम सुरू केले याच वेळेला गोरखनाथांनी त्याला ठाम विरोध केला किंबहुना गोरखनाथ म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या विरोधात ठाकलेले शैव तंत्र होय परंतु हा विरोध सुद्धा हळूहळू वैदिक करण्यात आला जेव्हा पंडित ब्राह्मण लोकांचे उद्योग नको तितके वाढत गेले तेव्हा त्याला बसवेश्वर यांनी ठाम नकार देत पुन्हा एकदा नवशैव धर्माची स्थापना केली आणि शैवधर्म पुन्हा एकदा रिस्टोर केला
लोकशैव धर्माची सुरुवात ही नकुलीश यांच्यापासून झाली आणि त्याची अखेर ही नाथ संप्रदाय नवनाथ संप्रदायामध्ये झाली ज्याची सुरुवात मच्छिंद्रनाथांनी केली परंतु ज्याची मांडणी स्पष्ट आणि स्वच्छपणाने गोरखनाथांनी केली हे सर्वच पंडित घराण्यातून आलेले लोक होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांना ब्राह्मण होणे मान्य नव्हते दुर्देवाची गोष्ट अशी की त्यांचेही ब्राह्मणीकरण करण्यात आले आणि साहजिकच अनेक नाथांच्या संदर्भात नव्या नव्या दंतकथा ब्राम्हण लोकांनी रचल्या त्यांचे जन्म अलौकिक करण्यात आले हे सर्व पंडित अनेक वेगवेगळ्या समाजातून आलेले होते म्हणजे गोरख हे सरळ सरळ पशुपालक वर्गातून समाजातून आलेले पंडीत होते तर मच्छिंद्रनाथ हे मासे पकडणाऱ्या कोळी समाजातून आलेले पंडित होते गोरखनाथांचा समाज गोरक्ष समाज होता जो पशुपालनात आणि दुग्ध पालनामध्ये निपुण होता या समाजातून फार प्राचीन काळापासून वेगवेगळे पंडित तयार झालेले आहेत गोरखनाथ हे त्यामधले अत्यंत अव्वल दर्जाचे पंडित होय त्यांनीच आत्ताच्या हिंदी भाषेची स्थापना केली संस्कृत येत असून सुद्धा स्वतःच्या देशी भाषेत लिखाण करण्याची परंपरा गोरखनाथ यांनी पाळली दक्षिणेत ती आधीपासूनच पाळली जात होती या नाथ संप्रदायाचे एक झाड निवृत्तीनाथ ज्ञानेनाथ सोपाननाथ मुक्ताबाई यांच्या रूपाने महाराष्ट्रात उगवलेले आहे यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी मग ज्ञानेश्वरांच्या नंतर जन्माला आलेल्या ज्ञानदेवांना केंद्रस्थानी आणून आणि हे दोन्ही एकच आहेत असे सांगत वारकरी संप्रदाय निर्माण करण्यात आला पुन्हा एकदा वर्ण व्यवस्था आली आणि मग मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली ज्ञाननाथांनी लिहिलेली गीता ही कुठे गुप्त झाली हा आजही प्रश्न आहे मात्र ज्ञानेश्वरी मध्ये मात्र तिचे थोडे थोडे लिखाण सापडते ज्ञानदेवाची ज्ञानदेवी आणि ज्ञानानाथांची शैव गीता यांच्यातून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जन्मलेला आहे एका अर्थाने तो हिंदू ग्रंथ आहे आणि कदाचित आद्य हिंदू ग्रंथ आहे हा ग्रंथ एकनाथ यांनी निर्माण केला असे आता म्हणता येते कारण एकनाथ हे स्वतः सुरुवातीला शैव होते नंतर वैष्णव होत गेले साहजिकच त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही परंपरांचा समन्वय केला याची प्रेरणा अभिनव गुप्ताच्या लेखनामध्ये आहे हे तर उघडच आहे तिथेही ब्राह्मण लोकांनी असाच समन्वय घडवून आणलेला दिसतो आणि मूळची शैव गीता गायब झालेली दिसते हा समन्वयच नंतर मुसलमानांच्या पुढे महागात पडलेला आहे कारण वैष्णव गीता वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करते
प्रश्न असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सर्व घडामोडी घडत असताना शैवधर्म लोकांचा इतिहास का लिहिला गेला नाही जसा काश्मिरी शैव आगमाचा इतिहास काश्मिरी पंडितांनी लिहिला गेला आणि आज थोडा का होईना पण तो आपल्याला उपलब्ध होतो तसे महाराष्ट्रात का घडले नाही अगदी वामन पंडित आणि मोरोपंत यासारखे कवी पंडित असून सुद्धा का वैष्णव लिखाण करतात? अनेकदा तर वैयक्तिक पातळीवर सर्व उपासना आणि लिखाण शैव मात्र लिखाण प्रामुख्याने वैष्णव हे का घडलेले आहे ? की यांचे शैव लेखन नष्ट केले गेलेले आहे ? फक्त शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांच्याच कालखंडामध्ये का वस्तुनिष्ठ लिखाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे ? नानासाहेब पेशव्यांच्या नंतर जे पंडितांचे साहित्य येते ते सर्वच्या सर्व इतके वैदिक का ? याचे कारण उघड आहे नानासाहेब पेशवे यांच्यापासून शिवशाही शिवशाही राहिली नाही आणि पेशवाई बनली मुख्य म्हणजे पेशवाईला जो प्रतिकार झाला तो होळकरांचा झाला पण होळकरांचा तत्कालीन मराठी साहित्यामध्ये positive उल्लेखच दिसत नाही याचे कारण काय ? की ते शैव होते म्हणून नकोसे झाले ?
जोपर्यंत महाराष्ट्र शैव पद्धतीने महाराष्ट्राला बघत नाही महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा मांडत नाही भारताचा इतिहास पुन्हा मांडत नाही तोपर्यंत शैव कालगणना ही प्रस्थापित होणे अशक्य आहे आणि आता ती प्रस्थापित करण्याची वेळ आलेली आहे कारण ब्राह्मण धर्म अत्यंत वेगाने स्वतःचा विस्तार करत सुटलेला आहे तो तसाच राहिला तर नानासाहेब सत्तेवर आलेले आहेतच ते पेशवे होणारच नाहीत याची कसलीही खात्री आता या क्षणी नाही नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून महाराष्ट्रातला शैव मराठा समाज थंड पडला तो अजूनही जागा झालेला नाही अपवाद काहीसा शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा आहे आपण पेशवाईला वाट करून देतोय याचीही या लोकांना शंका आलेली नाही शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे मात्र सेवा पेशव्यांची करायची अशा प्रकारचा दुतोंडी कारभार या काळात चाललेला दिसतो अपवाद फक्त शिंदे आणि होळकर आहेत
आता तशीच स्थिती निर्माण झाली आहे का हा खरा प्रश्न आहे
ज्ञानाचा अस्त हा मोक्षाबाबत उत्तम परंतु काम व अर्थाबाबत अत्यंत वाईट हे प्रथम आपण स्वीकारले पाहिजे इतिहास ही युजलेस गोष्ट आहे हे प्रथम डोक्यातून काढले पाहिजे इतिहास एक तर डोक्यावर बसवुन घ्यायचा किंवा मग युजलेस म्हणून फेकून द्यायचा असा काहीतरी उद्योग महाराष्ट्रात होतो तो परवडणारा नाही अगदी कुठल्याही गोष्टीला युजलेस म्हणणारे लोक सुद्धा वापरत असलेली भाषा त्यांना इतिहासापासून प्राप्त झालेली असते ती काही त्यांनी निर्माण केलेली नसते हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना भाषा म्हणजे प्रत्यक्षात भाषेचा इतिहासच असतो जो वर्तमान काळामध्ये ॲक्टिव्ह राहत वर्तमान निर्माण करायला लागतो तो जितका भूतकाळापासून मुक्त राहतो तितका तो वर्तमान बाबत अधिक जागृत राहतो
इतिहासाचे मुख्य काम शहाणपण देणे आणि सतत समाजाला जागृत ठेवणे आणि भूतकाळापासून प्राप्त झालेली यंत्र तंत्र मंत्र प्राप्त करणे आणि त्यातून नवीन वर्तमान निर्माण करत नवीन यंत्रे तंत्रे मंत्र निर्माण करणे होय नवीन यंत्र तंत्र मंत्र निर्माण करताना जर का प्राचीन यंत्र तंत्र मंत्र नष्ट करावे लागत असेल तर ते नष्ट करावे परंपरेच्या नावाखाली त्याचे जतन करणे घातक असते येथे मंत्र हा शब्द वैज्ञानिक नियम म्हणून वापरलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी जर इतिहास भविष्यकाळ घडवण्यासाठी वापरला जात नसेल आणि तो जर का समाजाला भूतकाळात बुडवण्यासाठी वापरला जात असेल तर तो इतिहास अडगळ असतो ज्यांना अडगळ समृद्ध वाटते ते अडाणी असतात महाराष्ट्रात आणि भारतातही अनेकदा इतिहास हा परंपरेच्या नादाला लागून आडगळच निर्माण करत राहतो आणि भारतीय समाजाच्या पायातली बेडी बनतो हा इतिहास आहे ज्ञानाचा अस्त झाला पाहिजे याचा इतिहासातला अर्थ वेळप्रसंगी जर एखादे ज्ञान आऊटडेटेड झालेले असेल तर त्या ज्ञानाचा अस्त झाला पाहिजे असा होतो किंबहुना मोक्ष विषयी प्राप्त झालेले जुने ज्ञान जोपर्यंत अस्त पावत नाही तोपर्यंत मोक्ष मिळू शकत नाही हेच भगवान शंकरांना सांगायचे होते म्हणून त्यांनी ते सूत्र दिले होते शैव लोकांना याचा विसर पडला आहे म्हणून आता त्याची आठवण करून देणे भाग आहे इतिहासाचे मुख्य कार्य लहानपण देणे नसून शहाणपण देणे असेल तर काही गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे
श्रीधर तिळवे नाईक
इतिहास , परंपरा, एस्टॅब्लिशमेंट, संरचना , जालना आणि भूतकाळ श्रीधर तिळवे नाईक
"Establishment is the tradition he should use the word establishment instead of tradition establishment is the past which is working in lesson 10 and standing in front of you you can go against it you can enter into it. Challenges are yours. In our era communism was establishment democratic socialism was the establishment they have power in their hand naturally people like us are completely declined by them because they think that we are hindutvvadi actually we are talking about Islam and consistently attacking it natural you will be came and Islamic and whatever is anti Islamic turns into Hindutwavadi for purogamein people."
By Shridhar Tilve
इतिहासकारापुढचे जे काही प्रश्न असतात त्यामध्ये नेहमीच एक प्रश्न इतिहास नेमका कोणत्या विरोधात लिहिला जातो हा असतो आणि त्याचबरोबर तो कशाचे समर्थन करतो हा असतो अनेकदा इतिहासकार याबाबतीत गाफील असतात आणि आपण काय करतो हे त्यांना कळत नाही उदाहरणार्थ रोमँटिसीजम विचार प्रणाली म्हणून इतिहास लेखनामध्ये जेव्हा दाखल झाला तेव्हा त्याने जे चरित्र लेखन केले त्यालाच इतिहास लेखन मानले जाऊ लागले किंवा जे इतिहास लेखन केले ते प्रत्यक्षात ग्लोरीफाय करणारे हिरोचे चरित्र लेखन होते कारलाईल हा इतिहासकार अशा तऱ्हेने लिखाण करतो किंवा हेगेल ची सर्व मांडणी ही तुझ्या राजकीय संस्थेसाठी काम करत होता तिचे समर्थन करताना दिसते त्या धरतीवर सावरकरांनी कळत नकळत पुढे ब्रिटिश लोकांचे ब्रिटिश शासनाचे समर्थन केले का असा प्रश्न आपणाला विचारता येतो अगदी गांधी आणि नेहरू सुद्धा ब्रिटिश शासनाच्या प्रचंड विरोधात होते असे म्हणता येत नाही कळत नकळत ब्रिटिश आहे विचारप्रणालीनिष्ठ असल्याने त्यांच्या विचारप्रणालिष्ट असण्याचा या सर्वच इतिहासकारांच्या वर दबाव पडलेला दिसतो साहजिकच नेते सुद्धा या दबावाखाली आहेत
अर्थात् आपण हे सर्व काही रोमँटिसीझमच्या प्रभावाखाली करतो आहे याची जाणीव या लोकांना कितपत होती याबद्दल आता शंका आहे उदाहरणार्थ बुद्धाचे चरित्र कसे उभे केले गेले हे पाहण्याजोगे आहे किंवा अवताराची संकल्पना नेमकी या काळामध्ये इतकी का महत्त्वाची झाली आणि ती चरित्रात्मक असल्यासारखी का सादर केली गेली असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो विष्णूचे एक काल्पनिक का होईना चारित्र्य आणि चरित्र त्याच्या अवतारा मधून सादर होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंबहुना विसाव्या शतकातले रामायण आणि महाभारत हे प्रामुख्याने या अवतारांचे चारित्र्य आहे चरित्र आहे सावरकरांच्या इतिहास लेखनावर या हिरो केंद्री रोमँटिसीझमचा प्रचंड प्रभाव आहे हे लक्षात घ्यायला हवे म्हणूनच इतिहासाची पाने फक्त पाने असत नाही तर ती सोनेरी पाने असतात असाच प्रभाव मार्क्सवादी इतिहास लिखाणावर सुद्धा (हा रोमॅण्टिक प्रभाव )आहे मात्र मार्क्सवादी लोकांना आपण रोमँटिक आहोत ते पटत नसते एवढाच काय तो फरक आहे
पुरोगामी. इतिहासकार इतिहास लिहिताना एकतर परंपरेचे समर्थन करतो किंवा परंपरांना विरोध करतो विशेषतः पुरोगामी कालखंडामध्ये विज्ञाननिष्ठता आली आणि या विज्ञाननिष्ठतेने परंपरांना आव्हान देणे सुरू केले कारण परंपरा ही नेहमीच धर्मयुगाशी संबंधित असते आणि युरोपमध्ये इतिहास प्रथम धर्मयुगाशी लढला अगदी कार्ल मार्क्सलासुद्धा अर्थशास्त्राची चर्चा करताना धर्माविषयी लिहावेसे वाटले याचे कारण त्याचे पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी हे आवश्यक होत गेले भारतात त्यामुळेच हिंदू परंपरांचा प्रचंड द्वेष वाढत गेला त्या समजून घेण्याऐवजी अनेकदा तर विरोधासाठी विरोधी झाला याची कळत नकळत एक रिएक्शन म्हणून हिंदुत्ववाद निर्माण झालेला दिसतो पंडित जवाहरलाल नेहरू हिंदूंच्याकडे बघताना कळत नकळत त्यांच्या परंपरांना सातत्याने इतिहास मांडणीमध्ये विरोध करताना दिसतात आणि पुरोगामी वादाला पूरक असणारे सम्राट अशोकांच्यासारखे लोक गौतम बुद्धांच्या सारखे लोक त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाखाली येऊन मोठे करत जातात गूढवादालाही त्यांचा ठाम विरोध दिसतो तरीही ते महात्मा गांधी यांचे शिष्य असतात या उलट सावरकर अधिक विज्ञान निष्ठा असून सुद्धा चक्क हिंदू परंपरांचे समर्थन करतात हिंदू एकत्र येण्यासाठी परंपरा हा एकच घटक त्यांना पोषक वाटतो मात्र त्यांचा भर परंपरे इतकाच इतिहासावर राहतो आणि एका समान इतिहास आणि बांधला गेलेला समुदाय म्हणजे राष्ट्र अशा निष्कर्षापाशी ते पोहोचत जातात.
जेव्हा पुरोगामी विचारप्रणाली राज्यसंस्थेने स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांनी विज्ञाननिष्ठ इतिहासाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली तेव्हा साहजिकच इतिहास लेखन एक कळत नकळत तत्कालीन पुरोगामी राज्यकर्त्यांच्या राजदरबारी लिहिले गेलेले आणि त्यांच्या व्यवस्थेचे समर्थन करणारे असे इतिहास लेखन बनत गेले यामध्ये इंग्लंडच्या व जर्मनीच्या राजदरबारी असणारे अनेक इतिहासकार येतात पुढे मार्क्सवादी असलेल्या स्टालिन च्या राजवटीतही राज्यकर्त्यांनी त्यांना सोयीस्कर असलेले मार्क्सवादी इतिहास लिहून घेतले आज सुद्धा भारतामध्ये क्षत्रियत्वाचा ज्यांना अहंकार आहे असे क्षत्रिय इतिहासकार सरळ सरळ आपल्या राजे लोकांचा जितका प्रचार करता येईल तितका प्रचार करत असतात आणि जर कोणी त्यांचे वस्तुनिष्ठ असे इतिहास लेखन केले तर तुटून पडत असतात एका अर्थाने विचार प्रणालींच्या मधून निर्माण झालेल्या एस्टॅब्लिशमेंटच्या समर्थनासाठी चाललेली ही इतिहासाची धडपड असते आव विज्ञाननिष्ठतेचा पण ताव मात्र क्षत्रिय मनाचा किंवा राजेशाहीकरणाचा असा हा सगळा प्रकार चाललेला असतो त्यातूनच मग कादंबऱ्यांना इतिहास मानणारे काही लोक जन्मतात आपल्याकडे या अंगाने इतिहास म्हणजेच कादंबऱ्या लिहिणारे लोक खूप आहेत आणि त्यामध्ये रणजीत देसाई, शिवाजी सावंत ते विश्वास पाटील यांच्यासारखे अनेक लोक क्षत्रिय असण्याचे अत्यंत व्यवस्थितपणे समर्थन करत असतात उदाहरणार्थ तुम्ही जर काय मृत्युंजय ही कादंबरी पाहिली तर कर्णाचे क्षत्रियत्व सतत पानापानावर येत असते आणि जणू काय त्याला जे काही प्राप्त झालेले आहे ते तो जन्माने क्षत्रिय असल्यामुळे प्राप्त झालेले आहे असे छुपे समर्थन चाललेले असते त्या काळामध्ये राजकारणात डावलला गेलेला जो मराठा वर्ग होता जो क्षत्रिय म्हणवून घेत होता पण ज्याला कधीही सत्तेत सहभाग मिळत नव्हता त्यांचे प्रतिनिधित्व मृत्युंजय मधला कर्ण करत होता आणि आजही करत असतो आणि म्हणूनच आजही मराठा समाजामधील या कादंबरीची लोकप्रियता वाढतेच आहे ज्याला सत्ता प्राप्त होते तो श्रीकृष्ण किंवा अर्जुन आणि ज्याला ती मिळत नाही तो कर्ण अशी मराठा समाजाची विभागणी झालेली दिसते कादंबरी सारखा पुरोगामी फॉर्म हा कसा क्षत्रियत्वाच्या समर्थनासाठी जगभर वापरला गेला हे पाहण्या जोगे आहे आपल्या समाजाला या क्षत्रियत्वाच्या बाहेर काढण्यासाठी नेमाडे यांनी वर्तमानातील शैक्षणिक व्यवस्थेकडे फोकस सरकवत न्हेला आणि हे त्या काळामध्ये खूप क्रांतिकारक होते. पौराणिक कालखंडामध्ये भेलकांडणाऱ्या लोकांना थेट वर्तमान काळात या असे आवाहन कळत नकळत त्यामुळे केले गेले आणि त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम आपणाला मराठी कादंबरीवर झालेला दिसतो अर्थात यामागे सुद्धा आपणाला इतिहासाची पार्श्वभूमी दिसते कारण 1950 नंतर इतिहास लेखनाच्या सर्व परंपरा या हळूहळू वास्तववादी होत गेल्या आणि एहिक जीवनातले तपशील महत्त्वाचे होत गेले साहजिकच 1960 नंतरच्या बऱ्याचश्या मराठी कादंबऱ्या हळूहळू का होईना पण वास्तववादी बनत गेल्या आणि हे सर्व वास्तववादी इतिहास लेखनाचे झालेले साईड इफेक्ट आहेत
मात्र मराठी कादंबऱ्यांचा मूळ कल हा कायमच रोमँटिक राहिला त्यामुळेच मृत्युंजय मधली प्रस्थापित वर्णव्यवस्था ही कुठेही वैज्ञानिक तत्वांच्या आधारे धुडकवली जात नाही किंबहुना अनेकदा कर्ण केवळ मान्यतेसाठी तळमळत आहे की काय अशी शंका यायला लागते आता ही तत्कालीन क्षत्रिय समाजाची अवस्था होती का मृत्युंजय मधला कर्ण हा प्रत्येकामध्ये असा साचलेला होता का ज्याला शिवाजी सावंत यांनी आवाज दिला असा प्रश्न आपण निर्माण करू शकतो .
हिंदुत्व या संकल्पनेची मांडणी करताना कळत नकळत परंपरेचा आग्रह धरला जातो कारण वर्तमान हा गुलामगिरीचा असतो आणि तो घाणा ओढायला लावत असतो एका बाजूला वैचारिक मांडणीमध्ये परंपरे कडे जाणारे सावरकर प्रत्यक्ष माझी जन्मठेप मध्ये वर्तमानामध्ये असतात आणि या दोन्ही गोष्टी ते एकाच वेळी करत असतात
यातूनच इतिहासकाराच्या एस्टॅब्लिशमेंट कडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची चर्चा करावी लागते ब्रिटिश एस्टॅब्लिशमेंट पेक्षा मुस्लिम एस्टॅब्लिशमेंट ही सावरकरांना जास्त धोकादायक का वाटली असा प्रश्न विचारायला पाहिजे या उलट गांधी नेहरू मात्र ब्रिटिश एस्टॅब्लिशमेंट विरोधात लढले पाहिजे याविषयी जास्त जागृत होते या काळात लोकांना तातडीने मिळणारा जो अनुभव होता तो ब्रिटिश एस्टॅब्लिशमेंटचा होता साहजिकच मुस्लिम एस्टॅब्लिशमेंट ही एका अर्थाने अस्तित्वात नव्हती आणि या काल्पनिक एस्टॅब्लिशमेंटशी सावरकर लढत होते आणि म्हणूनच त्यांना जनतेचा पाठिंबा कधीही मिळालेला दिसत नाही अपवाद फक्त सनातनी कर्मठ लोक जे प्रत्यक्षात ब्रिटिशांची चाकरी करत आपल्या धर्माचे रक्षण करत होते सावरकरांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिम हिंदूंना गिळतील का असा प्रश्न पडला होता तर गांधी नेहरू मुस्लिमांचे जाऊ द्या आधी जे ब्रिटिश बोडक्यावर बसलेले आहेत त्यांना आपण हाकलून काढले पाहिजे या मताशी ठाम होते मुळातच या काळामध्ये इस्लाम फार धोकादायक कोणालाच वाटत नव्हता आया तुला खोमणे याची राजवट आली आणि मग जेव्हा हळूहळू इस्लामिक राजवटी सर्वत्र पसरू शकतात हे लक्षात यायला लागले तेव्हा मग इस्लामच्या विरोधामध्ये पाठिंबा वाढत चालला आणि त्याचाच फायदा पुढे हिंदुत्ववादाला झालेला आहे पाकिस्तान आणि बांगलादेश आणि अफगाणिस्तान मध्ये जे झाले ते भारतात मुस्लिम घडवून आणतील का असा एक फार खोल प्रश्न कायमच आता सर्व जनतेला सतावतो आहे आणि या प्रश्नाची दखल घेण्याऐवजी मुस्लिम एस्टॅब्लिशमेंट कशी भारतामध्ये अस्तित्वात नाही हे नेहरू गांधींचे प्रमेय सामान्य जनतेला पटवण्यात पुरोगामी लोक व्यस्त आहेत जनता जे एकेकाळी या गृहीतकाच्या प्रमेयाच्या मागे होती ती आता उभी नाही हे ह्या लोकांच्या लक्षातच येत नाही साहजिकच यांना हिंदुत्ववादी लेखकांनी लिहिलेल्या इतिहास हा काल्पनिक वाटतो दंतकथा वाटतो प्रत्यक्षामध्ये यामध्ये जी भीती आहे ती हिंदुत्ववादी लोक सादरच करत नाहीत ते काहीतरी तिकडचे तिकडचे बोलत बसतात आणि त्यांचा मोह हेतू व ब्राह्मणी राजवटांनी हा आहे का असा प्रश्न निर्माण होतो म्हणजेच मुस्लिमांच्या विषयीचे मुस्लिमांच्या इस्लामिक राजवटी जगभरात येण्याचे जे भय पसरलेले आहे त्याचा फायदा या देशांमध्ये ब्राह्मणी राजवट आणण्यासाठी ब्राह्मण करणार आहेत का असा हा प्रश्न आहे परंतु तो थेट पुरोगामी लोक ऍड्रेस करत नाहीत याचे कारण इतिहासामध्ये एस्टॅब्लिशमेंट म्हणजे नेमके काय याच्या विषयीच्या स्पष्ट आणि स्वच्छ कल्पना भारतीय इतिहासकार यांच्याकडे नाहीत जागतिक पातळीवर इस्लामिक एस्टॅब्लिशमेंट हीच आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्याप्ती वाढवलेली एस्टॅब्लिशमेंट आहे तुम्हाला ही गोष्ट आवडो अगर नको न आवडो पण हे सत्य आहे पण भारतात त्याचा पडणारा प्रभाव हा थांबवता येण्याजोगा आहे पण दुर्दैवाने हिंदुत्ववाद्यांच्याकडे हे कसे थांबवावे हा प्रभाव कसा नेसूनाबत करावा याविषयीचे कसलेही प्लॅनिंग नाही इतिहासाचे काडीचेही आकलन नाही नुसते इमोशन लोभाळे काढले म्हणजे इतिहास लेखन सार्थक होत नाही सिद्ध होत नाही
सावरकरांच्या इतिहास लेखनामध्ये मुस्लिमांशी असलेल्या शत्रुत्वाचा कळत नकळत प्रभाव ब्रिटिशांशी असलेल्या शत्रुत्वासंदर्भात पडतो कारण मुस्लिमांशी झालेल्या सर्व शिवशाहीच्या लढाया या हिंसेने आणि मनगटाच्या बळावर जिंकल्या गेल्या होत्या साहजिकच ब्रिटिश सुद्धा मुस्लिमांच्या पेक्षा काही वेगळे नाहीत असा सावरकरांचा ठाम समज आहे किंवा आकलन आहे शत्रू हा फक्त शत्रू असतो आणि त्याला फक्त मनगटाचीच भाषा कळते अशी मांडणी जेव्हा सावरकर करतात तेव्हा त्यांच्यावर असलेला इतिहास प्रभाव स्पष्टपणे आपणाला प्रतीत होत असतो शत्रूकडे मित्र म्हणून पाहणारे गांधी नेहरू आणि शत्रूकडे शत्रू म्हणून पाहणारे सावरकर ही त्यामुळेच दोन टोके वाटायला लागतात त्यामुळेच नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात मांडलेला इतिहास आणि सावरकरांनी सहा सोनेरी पाने किंवा हिंदुत्व या ग्रंथात मांडलेला इतिहास यांच्यामध्ये फरक पडत जातो नेहरू सॉफ्ट आहेत तर सावरकर कडक असे स्पष्ट दिसते प्रत्यक्षामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्याशी लढताना सावरकरच यासंदर्भात बरोबर होते हे आता स्पष्ट झालेले आहे नेहरूंच्या सगळ्या सॉफ्टनेसने संपूर्ण परराष्ट्रीय धोरण चुकीच्या दिशेने न्हेले हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललेले दिसते मात्र ब्रिटिशांच्या संदर्भामध्ये सावरकर नेमके कसे बघत होते जर काय त्यांना ते मुस्लिमांच्यासारखे वाटत होते तर मग ते तलवार घेऊन क्रांतिकारक होऊन हातात बॉम्ब घेऊन ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी का उतरले नाही की कृती करताना प्रत्यक्षामध्ये महात्मा गांधी कळत नकळतपणे त्यांच्या मनात काम करत राहिले ? भगतसिंग यांच्यासारखे त्यांनी आपले प्राण का पणाला लावले नाही हा प्रश्न सहजासहजी डावलता येईल असे मला वाटत नाही त्यांना कदाचित तात्पुरती माघार घेऊन पुढे काही खेळी खेळायची ही असेल हे नाकारता येणार नाही पण तरीही त्यांचे स्वस्थ बसणे कळत नकळत ब्रिटिशांच्या बाबतीत महात्मा गांधींचा दृष्टिकोन ब्रिटिश सभ्य आहेत हा जो होता त्याला पुष्ट करणारा आहे प्रश्न असा आहे की मुस्लिम इतिहासाचा अभ्यास करता करता कळत नकळत महात्मा गांधींना विरोध असे समीकरण तयार होत गेले का ? सावरकरांची महात्मा गांधीनी मुस्लिमांशी शत्रू म्हणून वागले पाहिजे अशी कळत नकळत अपेक्षा होती का ? की महात्मा गांधी हे मुस्लिमांच्या बाबतीत भाबडे आहेत असे मुस्लिमांचा इतिहास वाचून त्यांचे मत झाले होते ? तर दोन्ही गोष्टी ऍक्टिव्ह आहेत
पुरोगामी इतिहासकारांच्या समोर ब्रिटिश हे एक एस्टॅब्लिशमेंट म्हणून या काळात स्थिर झालेले होते साहजिकच या एस्टॅब्लिशमेंटचे आकलन कसे करून घ्यायचे की परंपरेचा झगा पुन्हा ओढून घ्यायचा हा एक फार मोठा तात्विक प्रश्न होता आणि तो तत्कालीन राजकीय नेत्यांना पद्धतशीरपणे सोडवता आला असे वाटत नाही विशेषतः हिंदू नेत्यांना जीना काय करतायेत हे शेवटपर्यंत कळलेले दिसत नाही माझे स्वतःचे मत असे की सावरकरांना मुस्लिम कळाले परंतु ब्रिटिश कळाले नाहीत किंवा ब्रिटिश कळले तरी ते त्यांनी ते आकलन अंगाला लावून घेतले नाही पुढे पुढे तर सावरकरांचे मुख्य शत्रु मुस्लिम आहेत असेच वाटायला लागते त्यामुळेच गांधीजींच्या लढायां त्यांना भोळसटपणा वाटत होता म्हणूनच पाठिंबा देण्याची संधी मिळताच त्यांनी सुभाष चंद्र बोस यांना पाठिंबा दिलेला दिसतो कारण त्यांना बोस जे करतायेत ते जास्त अचूक वाटत होते
थोडक्यात काय आपण जर का हा काळ बघितला तर तो परंपरेच्या बरोबर जातो किंवा परंपरेच्या विरोधात जातो एस्टॅब्लिशमेंटच्या बरोबर जातो किंवा एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात जातो खरा प्रश्न निर्माण झाला तो प्रतिसृष्टीच्या कालखंडात कारण आता इतिहास हा व्यवस्थेच्या बाजूने किंवा व्यवस्थेच्या विरोधात लिहिला जात नव्हता तर प्रत्यक्षात मॅनेजमेंटच्या संरचने विरोधात किंवा समर्थनात लिहिला जाऊ लागला म्हणजेच इतिहासच असा लिहायचा ज्याचा फायदा भारतीय उद्योगपतींना होईल अशा प्रकारचे उजवे इतिहास भारतामध्ये किती निर्माण झाले हा एक संशोधनाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळींचे जे इतिहास लिहिले गेलेले आहेत ते अनेकदा सहकार सम्राटांचे समर्थन करतात आणि अपवादात्मक वेळेला या चळवळीतली भोके दाखवतात यालाच मी मॅनेजमेंट म्हणून लिहिला गेलेला इतिहास म्हणतो अगदी चळवळीचा इतिहास लिहिताना सुद्धा मॅनेजमेंट वादी दृष्टिकोन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इतिहासकारांच्या भोकाळलेला दिसतो नेहरूंच्या भारतामध्ये या काळामध्ये कुठलेही सरकार मॅनेजमेंट मध्ये पडत नव्हते अपवाद फक्त गांधीजी होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता या काळातला प्रत्येक जण एक तर नेहरू वा काँग्रेसच्या डेमोक्रॅटिक सोशालिजमच्या व्यवस्थेमध्ये होता किंवा विरोधात होता मॅनेजमेंटच्या अंगाने या काळामध्ये फार ऐतिहासिक चर्चा झाल्या असे दिसत नाही १९८० नंतर मात्र हळूहळू भारतामध्ये सुद्धा संरचना उदयाला यायला लागल्या आणि साहजिकच या सरचना इतिहास लिहून घेणार का असा प्रश्न निर्माण झाला या कालखंडामध्ये वास्तविक सुरचना आणि विरचना अशा दोन इतिहासाच्या इतिहास शैली निर्माण झाल्या पण भारतामध्ये अशा प्रकारचे इतिहास किती लिहिले गेले हा एक फार मोठा प्रश्न आहे आयडियालॉजी ऐवजी एक सरचना म्हणून इतिहास उभा करणे भारतीय इतिहासकारांना कितपत साधले हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या पद्धतीचा इतिहास फुको याने लिहिला त्या पद्धतीचा इतिहास भारतात कोणी लिहिला का ? किंवा इतिहासाच्या किती विरचना आपण सादर केल्या ? किंवा आपण भारताची काही आरकीओलॉजी केली का ?
चौथ्या नवतेत रचना,सुरचना जाऊन विरचना जाऊन जालना, सुजालना आणि विजालना आलेल्या आहेत इतिहासाला एक नेटवर्क म्हणून सादर करणे हे आता अत्यंत आवश्यक आहे पण ते फार काही लोकांना जमते आहे असे दिसत नाही
कुठल्याही कालखंडाप्रमाणे याही कालखंडामध्ये परंपरा, व्यवस्था आणि रचनात सु रचना आणि विरचना सुजालना आणि वि जालना यांचा प्रभाव आहेच पण त्याचबरोबर नेटवर्क प्रोसेसिंगचा सुद्धा प्रभाव उमटलेला आहे आणि प्रस्थापित जालना त्यांना सोयीस्कर भूतकाळ निर्माण व्हावा म्हणून काम सुद्धा करत आहेत आपल्या नेटवर्क मध्ये जास्तीत जास्त लोकांना ओढून घेण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करणे हे जालनाचे मुख्य वैशिष्ट्य असते ते फक्त हिंदुत्ववाद्यांनीच प्राप्त केल्याने त्यांना दैदीप्यमान यश मिळालेले दिसते काँग्रेसला या बदलत्या प्रवाहाची जाणीवच न झाल्याने ते स्वतःची जालना आणि स्वतःचे नेटवर्क निर्माण करण्यामध्ये पूर्णपणे फेल गेलेले दिसतात व्यवस्थेत अडकून पडल्याने तिचा व्यवस्थित गेम झालेला दिसतो अशा या कालखंडामध्ये इतिहास लिखाण करणे म्हणजे काय परंपरेच्या विरोधात कुठे टाकायचे आणि परंपरेच्या कुठल्या बाजू आत्ताच्या समकालाला खूप योग्य वाटतात ते पाहायचे आत्ताच्या व्यवस्थेचे गुणदोष काय आणि रचनांचे गुणदोष काय हे कसे तपासायचे वगैरे वगैरे अनेक प्रश्न जालनेच्या संदर्भामध्ये निर्माण होत असतात जालन म्हणजेच नेटवर्किंग हे आता वर्तमानाचे प्रमुख वैशिष्ट्य बनत जात असताना हे नेटवर्किंग नेमके कसे कोण वापरत असते याचाही धांडोळा घेणे आवश्यक आहे डी नेटवर्किंगची आवश्यकता त्यातूनच निर्माण होते डी नेटिंग ची प्रोसेस सुद्धा त्यामुळेच महत्त्वाची होत जाते आत्ताच्या नेटवर्किंग सिस्टीमला कुठला इतिहास पुरवायचा आणि का पुरवायचा याचे जर भान नसेल तर आजच्या काळामध्ये इतिहासकार होणे व्यर्थ ठरुन जाते त्यामुळेच केवळ ज्ञान असून चालत नाही तर आता माहितीच्या साठ्या इतकेच ज्ञानाइतकेच मोक्षाचे शहाणपण जास्त गरजेचे बनत जाते दुर्दैवाने याबाबत फारशी जागृती नाही आणि आजच्या इतिहास लेखनाचे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे
श्रीधर तिळवे नाईक
इतिहास , काम, कामप्रणाली आणि इतिहास लेखन श्रीधर तिळवे नाईक
मागील लेखामध्ये आपण इतिहासाच्या संदर्भात परंपरा आणि एस्टॅब्लिशमेंट यांचे नाते पाहिले आता थोडेसे आणखी काही पुढे जायचे आहे
कुठल्याही संसार प्रणालीचे मोक्ष प्रणाली ,काम प्रणाली आणि अर्थ व्यवहार प्रणाली असे तीन मानवी जीवनाच्या अक्षांनुसार विभाग पडतात यातील अर्थ व्यवहार प्रणाली ही खऱ्या अर्थाने मानव जातीसाठी कायमच तापदायक गोष्ट ठरलेली आहे याचे कारण व्यवहार हा नेहमीच गुंतागुंतीचा असतो आणि तो कसा पार पाडायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो कारण तृष्णांचा अंत न झालेल्या आणि काम या जीवनार्थामध्ये असलेल्या प्रेम या गोष्टीच्या अभावामुळे तिथे फक्त आसकत्यांचे आणि तिच्या भूक तृष्णा आणि निकड यांच्या रूपांचे राज्य असते माणसाला शारीरिक पातळीवर सुद्धा अन्नाची भूक असते पाण्याची तहान असते आणि श्वासाची निकड असते आणि या तिन्ही गोष्टी अलीकडच्या काळामध्ये व्यवहाराने ग्रासलेल्या असतात साहजिकच या तीन गोष्टींच्या अभावापोटी माणूस सहज मृत्यू पाहू शकतो यातील सर्वात तातडीची म्हणजेच निकडीची गोष्ट प्राणवायू असते साहजिकच माणसाची ती पहिला प्राधान्यक्रम आहे आपल्याकडे अनेकदा रोटीची चर्चा असते पण खरी गोष्ट श्वासच आहे श्वास गेला की माणूस गेला आणि श्वासाचे स्पष्ट आणि स्वच्छ नाते हे मोक्षाशी जोडले गेलेले आहे किंबहुना श्वास म्हणजेच प्राण आणि प्राणा मुळेच प्राणायाम करावा लागतो प्राणाचा आयाम नीट तपासून घ्यावा लागतो अलीकडच्या काळामध्ये ऑक्सिजन ही सुद्धा विक्रीची गोष्ट झाल्याने आपणाला प्राणाच्या आम्हाला सामाजिक परिप्रेक्ष्यातसुद्धा पहावी लागते
साहजिकच भूक तृष्णा आणि निकड संपूर्ण समूहासाठी कसे भागवायचे हा खरा मुद्दा असतो आणि संपूर्ण टिकणे हे या तीन गोष्टींशी निगडित असते दुसरी गोष्ट अर्थातच टिकण्याच्यापुढे जाणे असते म्हणजेच सर्वांचा प्रश्न सुटला तरी स्वतःचा जेनेटिक प्रोग्राम माणसाला पुढच्या पिढ्यांच्या मध्ये द्यावासा वाटतो आणि त्यातूनच माणसाचा जन्म ही गोष्ट अत्यंत नैसर्गिकरीत्या घडत जाते अलीकडे या नैसर्गिक गोष्टीला चाप लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे कारण मुलांना जन्म देणे परवडत नाही परंतु यापूर्वीच्या इतिहासामध्ये हा मुद्दा फारसा महत्त्वाचा झालेला नव्हता त्यामुळेच मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे ही एक नैसर्गिक गोष्ट मांडली जात होती आणि म्हणूनच काम प्रणाली ही एक अत्यंत निसर्गाशी जोडली गेलेली गोष्ट होती म्हणजेच आपण जेव्हा अर्थव्यवहार प्रणालीकडून काम प्रणालीकडे जातो तेव्हा सर्वायवल कडून आपण अमरत्वाकडे जायला लागतो आणि त्यासाठी मुले मुली जन्माला घालायला लागतो माणूस कामवासणीशिवाय जगू शकतो परंतु श्वासाशिवाय किंवा अन्नाशिवाय भुका तहाने शिवाय जगणे त्याला अशक्य आहे हे खरे आहे पण कामवासनेशी रिलेटेड असणारा काम हा अक्ष त्याच्या आयुष्यात महत्त्वाचा रोल पार पाडत राहतो आणि हा रोल त्याची आणि त्या समाजाने स्वीकारलेली काम प्रणाली ठरवते या काम प्रणालीचा सर्वात मोठा अविष्कार म्हणजे कुटुंब व्यवस्था होय त्यामुळेच इतिहास लिहिताना अनेकदा आपण कुटुंब व्यवस्थेचा इतिहास लिहीत असतो अनेकदा सत्ताही सुद्धा कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातूनच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते माणूस आपली सर्व साधन संपत्ती सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देत असतो साहजिकच भूक तृष्णा आणि निकड यांची व्यवहार प्रणालीही अनेकदा काम प्रणालीने ग्रासलेली दिसते इतिहासकाराला याचे भान असावे लागते
मोक्ष प्रणाली ही जीवनाला निर्माण करत असली तरी प्रत्यक्ष जीवन जगताना जीवनाकडे संपूर्ण आणि समग्र परतणे हे निकडीचे बनत नाही म्हणजे शिवाकडे किंवा शून्याकडे परतणे महत्त्वाचे बनत नाही उलट जीवन जगण्याकडेच आणि ते अनंत विस्तारण्याकडेच त्याचा म्हणजे माणसाचा कल असतो साहजिकच मोक्ष प्रणाली सर्वात शेवटी येते मात्र शून्याकडे परतण्याची जी असोशी माणसांमध्ये असते ती त्याला कायमच आतून बोलवत राहते आणि त्यातूनच माणसाचे अनेक मोक्षिक प्रश्न निर्माण होत राहतात नुसते जगून चालत नाही तर मोक्ष प्रणालीच्या शिल प्रणालीच्या आधारे जगणे माणसाला आवडते व्यवहार प्रणालीला तुम्ही जंगलाचा कायदा लावू शकता काम प्रणालीमध्ये अर्धे जंगल असते आणि अर्धे होमो सेपियनीं असते पण मोक्ष प्रणाली मध्ये मात्र निखळ माणूसच असतो प्राण्यांच्या मध्ये मोक्षाची किती आस आहे असोशी आहे हे सांगणे खूप कठीण आहे पण माणसाच्या आतमध्ये त्याला लागलेली आनंदाची सौंदर्याची प्रज्ञेची सर्जनशीलतेची शून्याची अनंताची शांतीची असण्याची आस त्याचा पाठलाग कायमच करत राहते
मोक्ष प्रणाली इतिहासाच्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असे म्हणू शकते परंतु मी मागे म्हटल्याप्रमाणे कामप्रणाली आणि अर्थप्रणाली असे करू शकत नाही त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या वासनाप्रणाली आणि व्यवहार प्रणाली या कायमच माणसावर प्रभुत्व गाजवत राहतात
व्यवहार प्रणालीमध्ये प्रामुख्याने धर्म, आयडियालॉजी म्हणजेच विचार प्रणाली , रचनापन ज्याच्यासाठी अलीकडे व्यवस्थापन असा शब्द वापरलेला असतो , जालन यांचा समावेश होतो राज्यसंस्था ही व्यवहार प्रणालीचा कणा बनत जाते याचे कारण व्यवहार प्रणालीचे नियम राज्यसंस्था ठरवत असते हे नियम धर्माने ठरवायचे की विचार प्रणालीने ठरवायचे की रचनापनने ठरवायचे की जालनाने ठरवायचे हा सध्याचा सर्वात मोठा वाद आहे आणि अचानकपणे उत्तर आधुनिकतेमुळे धर्माचा पुन्हा एकदा उदय झाल्याने हे नियम ज्यांना आपण अलीकडे कायदा म्हणतो धर्माने ठरवायचे असा एक प्रतिगामी प्रवाह वाढत आलेला दिसतो आणि त्यामुळेच आजच्या जगातले संघर्ष अचानक धर्मापाशी येऊन थांबलेले दिसतात वास्तविक धर्म ही केवळ एक राजकीय प्रणाली आहे जी मोक्षाच्या किंवा श्रद्धांच्या आधारे निर्माण झालेल्या संकल्पनांना स्वतःच्या सोयीसाठी वापरत असते जो मनुष्य धर्म निर्माण करतो तो अनेकदा राजकीय मनुष्य असतो त्याला दैवी बनवून आपल्याकडे अनेक पद्धतीचे सत्ता कारण राबवले जाते धर्माला रिप्लेस करण्यासाठी म्हणूनच विज्ञाननिष्ठ विचार प्रणालीचा उदय झाला परंतु प्रत्यक्ष व्यवहार प्रणालीमध्ये विचार प्रणाली धर्माला कधीही ओलांडून जाऊ शकली नाही आणि त्याचा प्रचंड फटका इतिहासात आपणाला, आपल्या संस्थांना मिळालेला दिसतो आज सुद्धा पुरोगामी वाद पिछाडीला गेला याचे कारण धर्माचा न ओसरलेला प्रभाव आहे राजकीय व्यवस्थेसाठी लोकांना विज्ञानापेक्षा धर्म आवश्यक का वाटला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे आधुनिक विज्ञानामध्ये ज्ञानाविषयीची अनिश्चिती आली त्याचा यामध्ये प्रचंड वाट आहे पुरोगामी कालखंडामध्ये ज्ञान हे ऑब्जेक्टिव्हली सर्वांसाठी समान होते ते अचानक सब्जेक्टिव्ह होत गेले आणि आता अवस्था अशी आहे की ते पूर्ण सब्जेक्टिव्ह आहे की काय अशी शंका यायला लागलेली आहे मुख्य म्हणजे माणसांच्या इंद्रियांच्या मर्यादा इतक्या उघड्या पडायला लागलेल्या आहेत की या इंद्रियांच्या साह्याने त्यांनी पाहिलेले जग हे फक्त माणसापुरते माणसांसाठी माणसांनी पाहिलेले जग आहे हे आता हळूहळू स्पष्ट होते आहे अगदी साधे वस्तूंचे रंग सुद्धा त्या त्या व्यक्तीचे आणि जास्तीत जास्त फक्त मानव जातीचे असतात दुसऱ्या जातींना ते रंग तसेच दिसतील याची कसलीही खात्री आता उरलेली नाही रंग रूपावर अवलंबून जगाचे ज्ञान ठेवणे आता अशक्य होत चालले आणि याचा इतिहासावर कसा परिणाम होणार याचा कोणालाच अंदाज येत नाही
याचा एक दुष्परिणाम कुटुंब प्रणाली आणि व्यवहार प्रणालीवर झालेला आहे कुटुंबांचे नियम कोणी निश्चित करायचे असा एक फार मोठा प्रश्न आता निर्माण झालाय आणि त्यामुळेच कुटुंब संस्थेचा संपूर्ण इतिहास तपासून पाहणे हे अधिकाधिक आवश्यक बनत गेलेले आहे आर्किऑलॉजी ऑफ सेक्स हा एक भाग झाला पण आर्किऑलॉजी ऑफ रिलेशनचं काय करायचं याचीही चर्चा आता आवश्यक आहे उदाहरणार्थ जोपर्यंत पुरुषांना स्त्रियांच्या पोटात असलेले मुल निर्माण होण्यासाठी आपली आवश्यकता असते ही गोष्ट माहीत नव्हती तोपर्यंत स्त्री सत्ताक राजवटी चालल्या परंतु जसे पुरुषाला कळाले की हे आपल्यामुळेच होते जसा की पाऊस पडल्यानंतरच जमिनीत पीक उगवते साहजिकच आपणच आकाश तत्वाचे आहोत आणि स्त्री पृथ्वी तत्वाची आहे असा साक्षात्कार झाला आणि त्यातूनच पुरुष सत्ताकव्यवस्था डेव्हलप होत गेल्या कारण मुळातच पुरुषसत्ताक व्यवस्थांच्या जवळ पुरुषांच्या कडे असलेली शारीरिक ताकद स्त्रियांच्या पेक्षा जास्त होती मुळातच स्त्री आणि पुरुष यांच्या उंची मध्ये असलेला फरक हा इतका स्पष्ट आणि स्वच्छपणे स्त्रियांना दिसायला लागला होता की एकंदरीत पुरुष आपल्यापेक्षा उंच आहे अशी त्यांची धारणा होऊन गेली होती शारीरिक उंचीतला फरक पुढे पुढे मानसिक उंचीतला फरक होत गेला आणि मग बौद्धिक उंचीतला फरक होत गेला ही जी शारीरिक ताकद स्त्रियांच्याकडे कमी होती तिच्यामुळेच पुरुष सत्ताक राजवटी अस्तित्वात आल्या साहजिकच त्या राजवटींच्या पुरुषी ताकदीला त्या दबून गेल्या आजही शारीरिक ताकतीचा प्रश्न आला तर स्त्रिया दाबून जातात हा एक वस्तुनिष्ठ निष्कर्ष आहे
ज्ञानाचा काम प्रणालीवर होणारा आणि त्यातूनच लिंग प्रणाली आणि कुटुंब प्रणालीवर होणारा परिणाम हा आता अधिकाधिक दृगोचर होत चाललेला आहे काही बायका ऍडजस्टमेंटच्या नवीन गणितात शिरताना दिसतात कारण नेमके काय करायचे हे स्त्री प्रणालीला कळालेले दिसत नाही
यातूनच इतिहास या संदर्भामध्ये पुरुषांनी लिहिलेला इतिहास ही संकल्पना उदयाला येऊन त्याला काउंटर म्हणून स्त्रियांनी लिहिलेला इतिहास निर्माण करावा का असा प्रश्न निर्माण झाला इतिहास हा लैंगिक प्रणालीला किती शरण जातो? हा या पुढचा प्रश्न आहे. स्त्री पुरुषांचे अवयव जितके आता विज्ञानाच्या स्कॅनिंग खाली आलेले आहेत तितके कधीच यापूर्वी आलेले नव्हते यातून संपूर्ण निष्कर्ष अजूनही हाताला आलेले नाहीत मात्र काही फरक आहे का याविषयी निश्चित मते बनताना दिसत आहेत अंतिम मते मात्र अजूनही आपल्या हाती नाही त्यामुळे स्त्री प्रणालीला गृहीत धरून त्या अंगाने इतिहासाची मांडणी करणे कितपत शक्य आहे याचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर अजूनही आपल्याला ह्या २००० च्या कालखंडात आलेले नाही
मोक्ष प्रणाली सहजरित्या ज्ञानाला डावलू शकते ज्ञानाच्या पुढे जाऊन शहाणपणाच्या गोष्टी करू शकते बायका अनेकदा ज्ञानापेक्षा शहाणपणावर अवलंबून असतात का असा एक फार मोठा प्रश्न अलीकडे निर्माण झालेला आहे कारण बायका रॅशनॅलिटी पेक्षा अंत प्रेरणावर जास्त विश्वास ठेवून काम करतात असा वैज्ञानिक निष्कर्ष काढणारे अनेक शहाणे निर्माण झालेले आहेत हे निष्कर्ष खरोखरच वैज्ञानिक कसोटीवर टिकतात का हे सुद्धा पाहणे अत्यंत आवश्यक आहे
थोडक्यात इतिहासाच्या संदर्भामध्ये आणि इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये काम प्रणालींचा सुद्धा फार मोठा वाटा असतो आणि ज्याला आज आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणतो तिच्या संदर्भात काम करताना तिला केवळ मोक्ष प्रणालीचे डायमेन्शन नसते तर काम प्रणालीचेसुद्धा डायमेन्शन असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment