(बाळबोध कविता ह्या काव्य फायलीतून)
जीवनासाठी शब्द उथळ आहेत
नाईलाजाने तयार झालेले बळ आहेत
माणूस म्हणजे निसर्गाने तयार केलेले टीव्ही
निसर्गाला बोलायचे असते स्वतःशी त्याचे ते स्वबळ आहेत
प्रत्येक क्षण सण नाही जोक आहे
हसता आले तर हसण्याची कळ आहेत
कुणासाठी शिव आहेत कोणासाठी शिवी शब्द
कोणासाठी बासरी वाजवणारे पाणी कोणासाठी त्या पाण्याची ओंजळ आहेत
प्रेमाने मला माझी खरी औकात दाखवली
मला कळाले माझे शब्द फुटकळ आहेत
उन्हाळ्यातही सूर्य असतो थंडीतही सूर्यच
ऋतू सूर्याचे नव्हे पृथ्वीस लागलेले चळ आहेत
प्रेमाच्या नावाखाली वासनेचे धाकडधिंगाणे
तू टाळू शकणार नाहीस ते शरीराने मिळवलेले पाठबळ आहेत
कुठेही जा कशीही जा कधी ना कधी खिंडीत भय गाठणारच
धोके तर आयुष्यात अपरिहार्यपणे अटळ आहेत
सगळे आयुष्य त्याचे विचारात गेले
आता तो म्हणतो विचार तारांबळ आहेत
हजारदा म्हणेन मुस्लिम लडकी वर प्रेम केले
तू काहीही म्हण माझ्यासाठी ते क्षण सुगंधी दरवळ आहेत
शब्द संपले की युद्ध सुरू होईल
वाटाघाटी संपवू नकोस त्या शांतीच्या बळ आहेत
सावल्या पडण्यासाठी सुद्धा प्रकाश हवा असतो
उन्हाला शत्रू मानू नकोस किरणे आधारबळ आहेत
तुला तुझेच आयुष्य जगावे लागेल हा ऑप्शनल प्रश्न नाही
म्हणूनच तुझ्या उरावर उत्तरांचे अत्तरचळ आहेत
मी ही माझ्या छातीवर दगड ठेवून बघितले
श्वास सुद्धा असे झाले जणु हवेतले मळ आहेत
कॉलेजात आल्यावर दप्तर थोडे हलके झाले
बाकी नोट्स बुक म्हणजे कागदी वर्दळ आहेत
लोक काय कोणालाही मान्यता देतात
शहाण्यांच्या मान्यता विमानतळ आहेत
जे दत्तक घ्यायला सुद्धा धार्मिक. मनाई करतात
अशा धर्मात काय परिवर्तन होणार असे धर्म गळ आहेत
जे धर्मातून जाणाऱ्यांना मारतात ठार
असे धर्म माझ्यासाठी फक्त कट्टर वर्दळ आहेत
तू चुकीच्या जागी जन्मलीस हाच एक गुन्हा झाला
ती जागाच अडथळा झाली तिथेच सारे खळखळ आहेत
माझ्यातले काहीही तू हिसकावून घेऊ शकत नाहीस
ज्या हिसकावल्यास त्या गोष्टी उथळ आहेत
तुझा स्पष्टवक्तेपणा प्रत्यक्षात क्रौर्य आहे
तुझे शब्द चाकूंचे अवतारबळ आहेत
तुला ज्या कळतात त्या तुझ्या पुरत्याच मेंदूत मृग
इतरांच्यासाठी त्या गोष्टी कदाचित मृगजळ आहेत
तू म्हणालीस म्हणून मी नमाज सुद्धा पढून पाहिला
माझा नास्तिकपणा गेला नाही बहुदा धर्म माझ्यासाठी ढळ आहेत
माझी खरी ताकद माझ्या निरागसपणात आहे
नदीसाठी आसुसलेले माझ्या आत ओहळ आहेत
आयुष्य म्हणजे माझ्या वाट्याला आलेला काळ
आणि वाहून जायला त्याला शेकडो नळ आहेत
हा माझा गुन्हा नाही या वयात परिपक्वता आली
तुम्ही समजा मला कुमारवयात लागलेले म्हातारचळ आहेत
जितके समजवावयाचे होते तितके समजावले
शेवटचे सांगतो माझे प्रेमझरे निखळ आहेत
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
खुदको झूठ बोलना सीखा रहा हु
तुम पटोगी मुझे पटा रहा हु
तुम कहा खूबसूरत हो मेरी जान
मै चाहके तुम्हे खूबसूरत बना रहा हू
जिंदगी तुमबीन उदास गुजर जाती
सोचके की जिंदगीसे धोखा खा रहा हु
तुमने हा कहा और टेन्शन दूर हो गया
अब दिल से ना आता है तो कह "ना" रहा हुं
जब तक बनती है तब तक बनते रहो
वो भी बना रही है मै भी बना रहा हुं
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
फळ तोडताही येते आणि पाडता येते
शेवटी झाडाला येते आणि झाड झाडता येते
प्रेम तिथे सुरुवातीला दिखावाही नि देखावाही असणार
हळूहळू एकमेकांच्या पारदर्शकतेत वाढता येते
इथे आपल्या प्रेमात सुद्धा धर्म हा एक मुद्दा आहे
आणि लोक म्हणतात की या देशात धर्माला खोडता येते
मीही अवघडलो तर सगळे संबंध अवघड होतील
अन्यथा मलाही तुझ्याप्रमाणे अवघडता येते
मामला शरीराचाच असता तर फार बरे झाले असते
शरीराचे काय शरीराला कुठूनही काढता येते
बघता बघता डोळ्यादेखत संबंध व्यसन बनत गेले
आणि मी या भ्रमात राहिलो की तुला ताडता येते
आत एक अस्वस्थता आहे अन हृदय दोलायमान
वाट पहावी की तुला सोडावे काय केल्याने प्रेम सोडता येते
तू ज्याच्याकडे गेलीस तो जनावर आहे
एकच लक्षात ठेव जनावराला जंगलात धाडता येते
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
हिरा उगाळता येत नाही कोळसा उगळता येतो
हिरा संपता संपत नाही कोळसा संपून जातो
मी प्रेमाला वासना समजलो तू वासनेला प्रेम
आजही हा गैरसमज तुझ्यामाझ्यामध्ये गातो
गर्दी होती प्रतिमांची त्यात आपण कुठे होतो
आरशांना आरसे काचांना काचा म्हणाल्या पाहतो
मी माझ्या शब्दांच्या मध्ये वजन ठेवत नाही
जो अधिक बोलतो तो भाषेपेक्षा हलका होतो
मला मस्त झोप लागते प्रेमभंग झाले तरी
स्वप्नातसुद्धा गीत गात मी पावसात मस्त नहातो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीमधून)
निवडणूक प्रचार करायला पहिल्यांदाच नकार देताना श्रीधर तिळवे नाईक
जेव्हा सर्व बाजूंनी चोर असतात
निवडणूक लढवणारे तेव्हा दरोडेखोर असतात
कुणाचा पायपोस कोणाच्यात राहत नाही
सगळ्यांचेच कपडे हरामखोर असतात
कोणाला जनतेशी काही कर्तव्य नसते
आम्हाला मते द्या एवढ्यावरच जोर असतात
अनेकदा नेते झोपी जातात निवांत
त्यांच्या कार्यकर्त्यांनाच रात्री घोर असतात
अशा ह्या निवडणुकीत नका बोलवू मला
मला काळीज गमवायचे नाही माझ्या काळजात मोर असतात
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीमधून)
डोळे वाचायला जातो डोळ्यात ब्रेल लिपी असते
मी म्हणतो प्रेम आणि ती झालेली आंधळी असते
आयुष्य तर असेही आणि तसेही निघून जाते
जगतो तो ज्याच्या खांद्यावर आनंदाची पालखी असते
तिच्या रागावर तर आपण फुल टू फिदा आहोत
सरळ नाक तप्त असते सुरवातीला संतापलेली असते
मलाही वाटत राहते की आमची फक्त मैत्रीच आहे
शरीराने नकळत पण एक किल्ली फिरवलेली असते
प्रेम काहीही करू शकते प्रेम काहीही बदलू शकते
बघता बघता वाघीण बनते जी मांजर बनून आलेली असते
बुर्का असा काढते जसा सिंहासनाचा त्याग करतीये
माहित नाही कुठली राजवट तिने निर्माण केलेली असते
मित्रांनो आयुष्याचा निम्मा वेळ तिला द्यावा लागतो
उरलेला वेळ माझ्या मागे रोजची दुकानदारी असते
फार वाट पाहत नसतो सरळ तिच्या घरात घुसतो
तुम्ही शिव्या घाला म्हणा याची प्रीत अघोरी असते
आत्ताच कशाला विचार करू कोण कोण आडवं येणार
मी यातच खुश आहे ती माझ्या दारात उभी असते
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
गुलाबाशिवाय असलेले काटे वाट्यास आले
वाटा मिळाल्या नाहीत फाटे वाट्यास आले
जो जो जवळ होता तो परका होत गेला
संवाद तुटत गेले सन्नाटे वाट्यास आले
मित्रांसाठी नेहमी आयुष्य गहाण ठेवले
मित्र सावकार झाले ताठे वाट्यास आले
भिंतींनी बनले घर जमीन खाली राहिली
खिडक्या हवेत गेल्या ढगसाठे वाट्यास आले
एक तर आहे देखावा किंवा दिखावा आहे
दोन्ही जमले त्याच्या वाटे वाट्यास आले
आग आयुष्याची शेवटपर्यंत कळली नाही
दिसले नाही वारे फुफाटे वाट्यास आले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
आंधळ्यांचे डोळे गेले आंधळ्यांचे काय गेले
ज्यांना दिसत होते ते जागच्या जागी मेले
अस्तित्वाचा निरम्याने न कपडा निर्मळ होतो
हिंसेचे डाग अमर ते मेल्यानंतरच गेले
बुडताना तिच्या प्रेमात मी ओला होत नव्हतो
माझ्या वाट्यास आले नेहमी दमट तजेले
मला चंद्र नको होता जमीन हवी होती
हवेत उडत राहिले शरीराचे तिच्या शेले
मी मुसलमानही झालो तिच्या प्रेमामध्ये
नि ती म्हणत राहिली तुझे हिंदुत्व नाही गेले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीमधून)
इकबाल के नाम श्रीधर तिळवे नाईक
नींद बेवफा है और इल्जाम ख्वाबो पर
कितने थोप दिये है एक्झाम ख्वाबो पर
आसू पोछ दिये जैसे हाथ हवेली हो
बाकी सब छोड दिये इंतजाम ख्वाबो पर
जमी तो रख दी मेरी खुदा के नाम अपने पास
और कहा गुजरेंगे दिन तमाम ख्वाबो पर
उनके शायराना मिजाज सिर्फ दिखावा है
वो रख देते है फिलहाल इंतकाम ख्वाबो पर
इकबाल तूने पाकिस्तान मांगा तेरे उर्दू से मुझे क्या काम
सामने थे मगर रखे तूने अंजाम ख्वाबो पर
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
खुदको झूठ बोलना सीखा रहा हु
तुम पटोगी मुझे पटा रहा हु
तुम कहा खूबसूरत हो मेरी जान
मै चाहके तुम्हे खूबसूरत बना रहा हू
जिंदगी तुमबीन उदास गुजर जाती
सोचके की जिंदगीसे धोखा खा रहा हु
तुमने हा कहा और टेन्शन दूर हो गया
अब दिल से ना आता है तो कह "ना" रहा हुं
जब तक बनती है तब तक बनते रहो
वो भी बना रही है मै भी बना रहा हुं
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
क्या था वो प्यार था
दिल का किया इजहार था
फिर हम दोनो भागे
फिर एक दुसरे का इंतजार था
पता नही चला क्या ढूंढ रही थी
मिलेगा जरूर ऐतबार था
गुस्सा तो उसका जायज था
बस प्रॉब्लेम ये थी बार बार था
पता नही अब कब लोटेगी
लौटेगी गर प्यार समझदार था
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
एक कोल्हाच असतो जो सर्कशीत नसतो
आणि एक रिंग मास्टर जो माणसात असतो
मी भावूक झालो की मला येतो राग
अतिराग आला कि शांततेत जाऊन बसतो
एकांतात मला अजूनही राहता येत नाही
समाजात जाऊन राहावं तर समाज डसतो
तू कसा पाहतोस त्यावर सर्व काही अवलंबून
जगास कॉमेडी म्हणून बघतो त्याचा आत्मा हसतो
आयुष्याबाहेरचे कुठे काय स्वप्नात असते
आणि तू तर स्वतःच्या स्वप्नात असतोच असतो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून
फिर से मुझे किसी ने ना कहा
समंदर खोल उठा सिर्फ एक आसू बहा
फिर से किसीने मेरी हैसियत निकाली
फिरसे मैने हालतको तकियों में सहा
गरुर के लिए कहा बदनमें जगह थी
दिल चकनाचुर होके दिलमेही रहा
शायद युजही करना था मुझे उसने किया
मै युज्ड मालकी तरह कोनोमे पडा रहा
भूलना तो चाहता था मै भी एक हादसा
मगर बनके काटा दिनरात महकता रहा
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)
मुझे कौन सा इश्क का तजूर्बा हैं
एक दिल हैं और एक तर्जुमा हैं
ये इश्क के लिए मरना वरना छोड
ये मुकद्दरके साथ दिलने लिया पंगा है
चांद देखने कौन जायेगा रात मे
मुझे तो काफी तेरा खूबसूरत चेहरा है
शृंगार कौन गिनेगा शृंगारके समय
जानता हूँ तू आखरी तू पहला है
मिलन हुआ अभी तक पता नही
कौन किसके वजूद का हिस्सा है
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
माझ्या आई-वडिलांच्या मधले प्रेम माझ्या वडिलांचे स्वगत श्रीधर तिळवे नाईक
जोवर दोघांच्यातून विस्तव जातोय तोवर वास्तव टिकणारे आहे
जे आहे ते प्रेम आहे आणि ते विस्तवात जगणारे आहे
तिला माहित माझे प्रेम आहे मला माहित नाही तिचे काय
पण मला माहीत की जे आहे ते तिला माहीत असणारे आहे
शरीरांच्यात कुठे अंतर आहे अंतराय नावाचे तर काहीच नाही
फक्त एकच दिलासा आहे आपणालाही कुणी बघणारे आहे
नाराज व्हायला अपेक्षा नाहीत आनंदाला निमित्त पुरत आहे
कायमचे काहीच मानत नाही तात्कालीक पण वाहणारे आहे
वारा वाहिला की झुळूक बनते पारा आला की आरसा बनते
फेटाळून लावते सर्व मुखोटे चेहऱ्यांना जिवंत ठेवणारे आहे
कळत नाही पण भावते आहे दिसत नाही पण धावते आहे
रक्तातील उंबरे वितळून जातात पण घराचे दार सांभाळणारे आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मी माझ्यासोबत आहे कदाचित बॅड कंपनी आहे
दुकान ठेवू की काढू बार ? आत खणाखनी आहे
ती आलेली नाही म्हणून कदाचित अस्वस्थता
वाटेवरती डोळे आणि आत तनातनी आहे
हुतात्मा पार्कात बुरख्यामधून फुलवार सांगते
आजच्या युगाचासुद्धा हनी मनी मनी आहे
चेहरा पाहण्यास आईस्क्रीम खायला घालावे लागते
सोळंकी कोल्ड्रिंक्समध्ये बर्फ सनातनी आहे
आली आणि निघून गेली निघून गेली आणि आली
दरम्यान आयुष्यामध्ये धंदा आणि पापणी आहे
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
अभिनयाचा करिअर म्हणून विचार करताना श्रीधर तिळवे नाईक
जगात सर्वात लोकप्रिय कला अभिनय आहे
यावरून सिद्ध आहे की लोक किती खोटेपणावर प्रेम करतात
तेव्हा अभिनय करताना
खोटं बोलण्याची कला तर मास्टर करत नाहीस ना
स्वतःलाच विचार
ग्लॅमरच्या नावाखाली एक थोतांड तर चालवणार नाहीस ना
स्वतःलाच विचार
काय आहे
कवितेत लोकप्रियता नाही आणि अभिनयात लोकप्रियता आहे
निर्णयामध्ये कला किती आणि लोकप्रियतेची आसक्ती किती स्वतःलाच विचार
प्रत्येकालाच लोकप्रिय व्हावं वाटतं
तुला ते कितपत वाटतं
स्वतःलाच विचार
लोक एकमेकांवर लादत असतात
लोकप्रियता म्हणजे स्वतःला लोकांच्या वर लादणे काय
स्वतःलाच विचार
तू उत्तम अभिनेता आहेस
पण तुझा अभिनय तुला माणूस म्हणून घडवायला किती मदत करतो
स्वतःलाच विचार
काय आहे एक उथळ व्यवस्था आहे जी सगळ्यांनाच उथळता देते
अभिनय त्या उथळतेचे सार तत्व आहे का
स्वतःलाच विचार
लोक काय
कायमच मागे लागतात अभिनयाच्या अभिनेत्यांच्या
तुला लोक किती मागे लागून घ्यायचे आहेत
स्वतःलाच विचार
डॉक्टर होण्यापेक्षा
अभिनेता होणे
ज्या देशात ज्यादा प्रतिष्ठित असते
त्या देशाची लायकी काय स्वतःलाच विचार
आतला आवाज ऐक
आणि अभिनय आतला आवाजसुद्धा शिल्लक ठेवेल का
स्वतःलाच विचार
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
***************************************
------------**
Comments
Post a Comment