A I

 कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करताना कायमच कृत्रिम बुद्धिमत्ता ( क्रुबु)ही संपूर्ण मानव जातीला रिप्लेस करेल असे म्हटले जाते प्रत्यक्षामध्ये एक नवीन प्रकारची चिन्ह सत्ता उदयाला येईल आणि त्याबरोबर साहजिकच अर्थ सत्ता आणि धर्मसत्ता उदयाला येईल त्यांचे स्वरूप नेमके कसे असणार हे आजही स्पष्ट नाही मात्र ज्याच्या हातात चिन्हसृष्टी तो या नवीन युगाचे भाष्य घडवत जाईल साहजिकच मानवी जीवनाला या सगळ्या चिन्हसृष्टीमध्ये तुम्ही कसा सार्थ चिन्हार्थ पुरवणार हा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे माणसाला स्वतःच्या आयुष्याला अर्थ द्यावा लागतो कारण तो मोक्षाकडे वळत नाही आणि कामाबाबत असफल होतो. साहजिकच त्याचा सगळा खेळ अर्थ ह्या अक्षाभोवती घुटमळत राहतो अर्थ हा नेहमी संसार केंद्री असतो साहजिकच या संसारामध्ये स्वतःच्या आयुष्याचे सार्थकत्व तो ठरवायला धडपडायला लागतो आणि त्यातूनच मग त्याला पैसे हवे असतात कीर्ती हवी असती पैशांमध्ये सार्थकता स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या युगात कदाचित कमी होत जाईल पर्क्स आणि इतर सर्व सवलती work कल्चर वाढवत नाहीत असा त्याला साक्षात्कार होईल मनुष्याच्या मूळ जीवनाचा मूळ अर्थ काय हे अजूनही अनेकांना स्वीकारता येत नाही कारण शून्यात परतणे त्याला अजूनही सार्थक वाटत नाही म्हणून तर माणूस मोक्षाकडे वळत नाही शून्यात परतण्यासाठी सत्ता खेळाचा कंटाळा यावा लागतो तो बहुतेकांना येत नाही कारण सत्ताच अनेकांच्या हातात येत नाही ए आय मध्ये ही सगळी सत्ता चिन्ह सत्ता होत जाते आणि चिन्ह सत्ता मोक्षाकडे वळवायला भाग पडेल का हा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो चिन्हे हे किती स्वरूपात बोरडम करू शकतात ? या सगळ्या स्क्रीनी खेळाचा स्कीनला कंटाळा येईल का ? शेवटी डोळ्यातला डोळ्यात किती पाहणार ? त्वचेची स्पर्शाची आसक्ती थोडीच त्यामुळे विझणार ? आणि मग त्वचेचाही कंटाळा पोर्नो बघून बघून आला तर तुम्ही काय कराल ? पॉर्न ग्राफी ही सुद्धा आर्टिफिशियल फिजिकलिटी आहे ही आर्टिफिशियल फिजिकलिटी प्रत्यक्षामध्ये डॉल कल्चर मध्ये कन्व्हर्ट होऊन त्वचेचा स्पर्शाचा अनुभव हुबेहूब देऊ शकेल का? हा सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण होणार आहे बरं त्यातूनही नंतर मिनिंग लेस वाट्याला आला तर काय करणार ? हा सर्व प्रकार कधी ना कधीतरी शेवटी मोक्षाकडे घेऊन जाणे अटळ आहे यामध्ये ए आय मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यावर राज्य करणार नाहीये तर ज्यांच्या ताब्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील ते आपल्यावर राज्य करतील आणि त्यातूनच एक सत्तेचा नवीन खेळ उदयालां येणे अटळ आहे प्रतिमा प्रतिमा आयकॉन्स यांच्या मार्फत नेमके काय घडवले जाईल हे स्पष्ट आहे थोडक्यात काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी आला तरी आपण झकच मारणार आहोत 


आणि ज्यांना या झकमारीचा कंटाळा येईल ते आपोआपच मोक्षाकडे पुन्हा वळतील 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना