DHARM ANI CHAUTHI NAVTA
Yusuf Shaikh हे आपणा सर्वांच्या बाबतीतच गुंतागुंतीचे आहे मी ज्या गावात वाढलो ते गोव्याच्या माझ्या मामाच्या म्हणजे रोहिदास नाईक यांच्या आमदारकी क्षेत्रात येत होते आणि मामाने आणि माझ्या वडिलांच्या पिढीने ते गाव प्रथम शाळा काढून पुरोगामी बनवले नंतर आधुनिक बनवले आणि आता प्रत्येकाच्या घरी कम्प्युटर जाईल अशा तऱ्हेने योजना केली. अलीकडे त्याचे पर्यावरण शाबूत रहावे म्हणून माझा पुतण्या सुरेल तिळवे हा धडपडत असतो आयडियालॉजीचा संबंध हा पुरोगामी वादाशी आहे पण दुर्दैवाने आपल्याकडे आधुनिक हा शब्द पुरोगामी म्हणूनच वापरला जातो वास्तविक या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण मुळात पाश्चात्त्य देशातच याबाबतीत प्रचंड घोळ आहेत मॉडर्न या शब्दाचा अर्थ पुरोगामी असाही होतो आणि आधुनिकही! अलीकडे तिकडे आधुनिकता असा शब्द ते वापरतात आणि आधुनिकवाद आणि आधुनिकतावाद असा फरक करतात मराठीत सुदेवाने पुरोगामी असा वेगळा शब्द योजता येतो म्हणून मी पुरोगामी म्हणजे आयडियालॉजिकलीं कमिटेड असा अर्थ घेतो तर आधुनिक याचा अर्थ आयडियालॉजीला नकार देऊन इंडस्ट्रियल झोनचा विचार करणारा इंडस्ट्रियल कार्पोरेट असा घेतो मुळात हा फरक भांडवलशाही आणि कार्पोरेटशाही यांच्या मधला आहे पुरोगामी वाद भांडवलशाही आणि समाजवादाची निगडित आहे तर आधुनिक वाद हा कार्पोरेट आणि उत्तर कार्पोरेट वाद यांच्याशी निगडित आहे मुंबईसारख्या शहरात कार्पोरेट संस्कृती खोलवर झिरपलेली दिसते या संस्कृतीला कुठल्याही आयडिओलॉजीशी कमिटमेंट द्यायची नाही अगदी धारावीच्या झोपडपट्टीत सुद्धा ही कमिटमेंट तुटताना दिसते आहे मात्र कार्पोरेट वाद सामाजिकता सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून स्वीकारतो एनजीओ काढतो
दैनंदिन जीवनात आपण अनेकदा चौथ्या नवतेचे असतो पण वैचारिक लेवलला मात्र आपण अनेकदा पुरोगामी किंवा आधुनिकवादी किंवा उत्तरआधुनिक वादी असे असतो आता फेसबुकवर लिहिणे हे सरळ सरळ चौथ्या नवतेचे तंत्र आहे चौथ्या नवतेशी ते निगडित आहे पण त्यात कोणता आशय भरायचा हे आपल्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे भारतामध्ये अचानक धर्म परतल्याने आपल्याला पुन्हा एकदा पुरोगामीवादाची चर्चा करणे भाग पडते आहे खरे तर ही शोकांतिका आहे पण भारताने आणि इस्त्राईलने त्याची सुरुवात केलेली आहे भारतात पाकिस्तान निर्माण झाला तो धर्माच्या आधारे आणि इस्त्राईल हे राष्ट्र उभे राहिले तेही धर्माच्या आधारे तिथून धर्माचा कमबॅक झाला कारण कळत नकळत हा धर्माचा विजय होता आणि इथूनच उत्तर आधुनिकतेने धर्म हा केंद्रस्थानी चर्चेसाठी आणला कारण याच वेळेला हिटलरने धर्माच्याच आधारे ज्यू धर्म पाळणाऱ्या लोकांचे प्रचंड हत्याकांड केले आणि धर्म नाहीसा झालेला नाही हे जगाला पटवले या सगळ्या घडामोडींच्यामुळे बाराशे ते २०शे या दरम्यान पुरोगामी चळवळीमुळे किंवा आधुनिक चळवळीमुळे धर्म नाहीसा झाला धर्माचा प्रभाव नाहीसा झाला असा जो गैरसमज पसरला होता तो नाहीसा झाला आणि धर्म हा अजूनही प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या मनामध्ये ठासून भरलेला आहे हे जगाला कळाले त्यातूनच उत्तर आधुनिकतेत धर्म चर्चेला आला याचा एक विचित्र परिणाम म्हणजे इस्लामचा सर्वत्र झालेला पुन्हा एकदा उदय आणि त्यातूनच इस्लामिक स्टेट ची झालेली वापसी! हिंदुत्ववादाचा ह्या देशात जो कमबॅक झालेला आहे त्यालाही उत्तर आधुनिकता जबाबदार आहे दुर्दैवाने या चौकटीत विचार करण्याऐवजी पुरोगामी लोक अजूनही पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा द्वंद्वात्मक विचार प्रणालीत बसून विचार करत बसतात त्यातून उपाय तर नीट सापडतच नाहीत पण धर्माचे काय करायचे हेही कळत नाही खरंतर हा एक सखोल विषय आहे आणि मी तो अनेकदा मांडलेला आहे याला पर्याय म्हणून पुरोगामी वादाने जो नवा धर्म निर्माण करण्याचा अजेंडा घेतला होता उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्माने प्रोटेस्टन धर्म निर्माण केला तर भारतात महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्म निर्माण केला किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी नवयानी बौद्ध धर्म निर्माण केला त्याचाही पुन्हा विचार सुरू झाला मात्र याला एक पाश्चात्त्य देशात डायमेन्शन अशी होती की प्रोटेस्टन धर्मामध्ये मार्टिन ल्युथर आणि जे काही सांगितले त्यात कळत नकळत ज्यू चा द्वेष होता आणि त्यामुळेच पुरोगामी धर्मांचाही पुन्हा विचार करण्याची पाळी आली ही खरे तर पुरोगामी उपाययोजना होती पण आज ती व तिने निर्माण केलेले नवधर्म आपणाला आकर्षित करतात कारण धर्मावर मात करण्याचा विशेषता त्यातल्या सनातन वादावर कट्टरतेवर मात करण्याचा उपाय म्हणून हे नवे धर्म आपणाला आकर्षित करतात पण त्यातून खरोखर मार्ग सापडणार आहे का की नव्या धर्मांच्या नावाने पुन्हा धर्मच बोकांडीवर बसणार आहे? मी माझी चौथी नवता जिला मे जालीय महाजालीय नवता म्हणतो तिच्या संदर्भात अनेकदा वेगवेगळे मुद्दे मांडत असतो लोकांना वाटते मी काही आकाशातूनच मांडत असतो पण माझा स्वतःचा म्हणून एक इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्यातून विवेचन मी करत असतो हे विवेचन अनेकांना झेपत नाही पण माझा उद्देश असा आहे की पुन्हा एकदा सगळी चर्चा नव्याने होणे आवश्यक आहे दुर्दैवाने ते होत नाही आणि आता अवस्था अशी आहे की अशी चर्चा होऊ नये अशी धर्माची इच्छा आहे की काय अशी शंका येते इतका धर्म आणि आणि धार्मिक राजवटी सर्वत्र अवतारताना दिसत आहेत एक तर तुम्हाला सर्व धर्मांशी लढावे लागेल किंवा मग पुन्हा एक नवी मांडणी सर्व गोष्टींची करावी लागेल अशी मांडणी मी चौथ्या नवतेच्या अंगाने करत असतो असो थोडक्यात काय नुसते पुरोगामी किंवा आधुनिक होणे पुरेसे नाही किमान उत्तर आधुनिक किंवा चौथ्या नव्हतेचे होणे गरजेचे आहे सध्या तरी हे पोटेन्शिअल फार कमी लोकांच्यात आहे असे दिसते असो धन्यवाद
Comments
Post a Comment