uttarpurogamiwad
kkkjjhh
उत्तर पुरोगामी वाद भारत आणि चायना श्रीधर तिळवे नाईक
चेन जीयान या चायनीज इतिहासकाराने लिहिलेले झू एन लाय यांच्यावरचे झूएनलाय अ लाईफ या नावाचे पुस्तक सध्या चर्चेला आलेले आहे या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला काही गोष्टी नव्याने बघाव्या लागतात चायनामध्ये नेमके काय घडले याचे विश्लेषण करणारी जी काही महत्त्वाची पुस्तके अलीकडे आलेली आहेत त्यात हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे यामध्ये असलेले माओचे चरित्र अत्यंत रक्तरंजित आहे याची कल्पना मला होती सुदेवाने याचे ठोस पुरावे इथे दिसतात आणि त्यातून मग काही प्रश्न निर्माण होतात हे फक्त चायना मध्ये घडले की सर्वच देशात घडले असा प्रश्न निर्माण होतो आणि जर का यामध्ये इतिहासाचा एक आकृतीबंध दिसत असेल तर तो आकृतीबंध कसा आकलनाच्या कक्षेत आणायचा असा प्रश्न निर्माण होतो
कुठल्याही राष्ट्राच्या इतिहासामध्ये पुरोगामी वाद आणि उत्तर पुरोगामी वाद हे विशिष्ट टप्प्यावर अवतरत असतात म्हणजे प्रथम धर्माला सुरुंग लावणारा पुरोगामी वाद येतो आणि मग त्या नवीन धर्मामुळे निर्माण झालेले जे नवीन स्ट्रक्चर असते ते स्ट्रक्चर राज्याकडून राष्ट्राकडे प्रवास करायला लागते एक नवीन राष्ट्रवादी राजेशाही निर्माण होते जी नवीन ज्ञाननिष्ठ धर्मविद्रोही राजेशाही असते मग नंतर एक वेळ अशी येते की हा राजेशाही टिकवणारा राष्ट्रवाद पुरेसा ठरत नाही निर्माण झालेली व्यवस्था अडथळा वाटायला लागते आणि ऑब्जेक्टिव्ह वैज्ञानिक ज्ञानाविषयी काही शंका यायला लागतात अशा शंका प्रथम रोमँटिसीजम चळवळीला येते ती ऑब्जेक्टिव्ह विज्ञानाच्या विरोधात उभी राहते इमोशन्सना महत्त्व देते सब्जेक्टिव्हिटीला महत्त्व देते व्यक्तीला पुन्हा केंद्रस्थानी आणू पाहते पुढे मग काही असे लोक येतात जे ऑब्जेक्टिव्ह वैज्ञानिक ज्ञान नाकारतात आणि हे वैज्ञानिक ज्ञान सुद्धा एका व्यवस्थेचे भाग आहे असे सांगायला लागतात त्यातूनच कार्ल मार्क्ससारखा विचारवंत निर्माण होतो जो आयडालॉजीच्या मागे संपूर्ण अर्थव्यवस्था असते असे प्रतिपादन करतो साहजिकच त्या व्यवस्थेच्या विरोधात राज्यक्रांती होऊन उत्तर पुरोगामी वाद अस्तित्वात येतो उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये पुरोगामी वादाची सुरुवात ही रॉजर बेकन फ्रान्सिस बेकन यांनी केलेली दिसते तर उत्तरपूरोगामीवादाची सुरुवात ही इंग्लंडच्या क्रांतीनंतर झालेली आहे फ्रान्समध्ये पुरोगामी वादाची सुरुवात ही माँटेग्यू न केलेली आहे तर उत्तर पुरोगामी वादाची सुरुवात ही फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झालेली दिसते जिचा परिणाम संपूर्ण जगावर आहे रशियामध्ये पुरोगामी वाद अपुरा वाटायला लागला आणि मग लेनीन ने जी राज्यक्रांती केली ती उत्तर पुरोगामी वादी राज्यक्रांती होती असाच प्रकार आपणाला चीन बाबत दिसतो आणि यातूनच प्रश्न निर्माण होतो उत्तर पुरोगामी वादाला राज्यक्रांती करणे आवश्यक का वाटते याचं कारण प्रस्थापित फिडलिस्टिक व्यवस्था पुरोगामी वाद पचवायला सुरुवात करतो खरा पण त्याने निर्माण केलेली व्यवस्था ही हळूहळू आपलीच राजेशाहीची सरंजामवादी विस्तारित चौकट प्रस्थापित करायला लागते आणि ती बदलायला तयार नसल्याने तिच्या विरोधात क्रांती करणे याशिवाय पर्याय उरत नाही आपल्याला हे इंग्लंड फ्रान्स मध्ये जसे घडलेले दिसते तसेच अमेरिकेत सुद्धा दिसते अमेरिकन राज्यक्रांती ही अमेरिकेमधल्या पुरोगामी वादाची सुरुवात आहे तर तिथे झालेले सिविल वॉर ही उत्तर पुरोगामी वादाची सुरुवात दिसते जी क्रांतीच होती आणि जी लिंकन याच्या नेतृत्वाखाली झाली इथेही रक्तरंजित क्रांती झालेली दिसते कारण स्पष्ट आणि स्वच्छ युद्ध झालेले दिसते
भारतामध्ये पुरोगामी वादाची सुरुवात शैव लोकांच्या पासून झाली आणि नवा लिंगायत धर्म आला याची सुरुवात बसवेश्वरांच्या पासून झाली पण नंतरच्या मुस्लिम आणि इंग्रजांच्या राजवटीमुळे त्यात खंड पडला परंतु पुन्हा एकदा १९ व्या शतकामध्ये राजा राम मोहन रॉय यांचा हिंदूवाद स्वामी दयानंद सरस्वती यांचा वैदिक वाद महात्मा फुले यांचा शैववाद आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा हिंदुत्ववाद उदयाला आले आणि पुरोगामी वादाला एक नवे वळण लाभले अमेरिकेप्रमाणे आपणाला इंग्रजांच्या राजवटी विरोधात लढून पुरोगामी वाद पुन्हा प्राप्त करणे गरजेचे बनले. थोडक्यात अमेरिकन राज्यक्रांती जशी झाली तशीच आपल्याकडे भारतीय स्वातंत्र्याची चळवळ झाली आणि त्यातूनच आपला पुरोगामी वाद आकाराला आला जो संविधानाच्या रुपाने आपल्यापुढे साकार झाला यानंतर अर्थातच एक व्यवस्था निर्माण झाली. एक राष्ट्रवाद निर्माण झाला जो काँग्रेसच्या विचारसरणीनुसार चाललेला होता आणि त्यानंतर मग या व्यवस्थेविषयी आणि राष्ट्रवादीशी संशय निर्माण होणे हे इतिहासाला धरूनच होते. प्रश्न असा होता की हा उत्तर पुरोगामी वाद साकार करणार कोण ?
आपण जर का यासंदर्भात चीनकडे पाहिले तर तिथेही हेच घडलेले दिसते तिथे कोमिटांग पक्षाने नंतर सनयत सेन यांनी पुरोगामी वादाचा पाया घातलेला दिसतो चायनाला स्वातंत्र्य ही मिळालेले दिसते पण चायना तिथे थांबलेला दिसत नाही तिथे नंतर माओ तसे तुंग यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पुरोगामी वाद आलेला दिसतो त्यांनी घडवलेली राज्यक्रांती ही माओवादी राज्यक्रांती म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती रक्तरंजितच होती तिचे स्ट्रक्चर कसे हळूहळू फिडेलिस्टिक बनत गेले हे आपणाला या पुस्तकामुळे स्पष्ट होते डावा विचार असून सुद्धा सरंजामशाहीवादी बनणे हे कसे काय शक्य झाले याचा संपूर्ण आलेख ह्या पुस्तकामध्ये आलेला दिसतो माओ स्वतः राजाप्रमाणेच राजेशाही प्रमाणेच आपली सिस्टीम का चालवत होता हा एक फार मोठा प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने निर्माण होतो. पुढे हेच आपणाला अनेक कम्युनिस्ट राष्ट्रांच्यात राजवटींच्यात घडलेले दिसते अगदी रशियात सुद्धा जोसेफ स्टैलीनने हेच केलेले दिसते त्याचे जे काय कम्युनिस्ट स्ट्रक्चर आहे ते सरंजाम शाहीचे आहे आणि तिच्यावर राजेशाहीचा परिणाम आहे याची तुलना आपण अधिक मागे गेले गेलो तर इंग्लंडमधल्या राजेशाही राजेशाहीशी आणि फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आलेल्या नेपोलियनशी करू शकतो एका अर्थाने जोसेफ स्टॅलिन आणि माओ हे दोघेही अनुक्रमे रशिया आणि चायनाचे नेपोलियन आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे प्रश्न असा आहे की लोकशाही क्रांतीनंतर सुदृढ व्हायला हवी तशी न होता प्रत्येक वेळेला ती का बारगळते? अगदी जिथे एकपक्षीय लोकशाहीचा अविष्कार होणार होता त्या कम्युनिस्ट राजवटीत सुद्धा लोकशाहीचा खूनच होतो आणि एकाधिकारशाही येते हे असं का घडते? कि आपली मानसिकताच राजेशाहीची आहे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो फक्त नवीन राजेशाही साठी एकाधिकारशाही असा नवीन शब्द फार तर वापरता येईल पण बाकी ऑपरेटिंग सिस्टीम जुन्या काळातल्या राजे लोकांच्या प्रमाणेच दिसते हा उत्तर पुरोगामी वाद नेहमीच डाव्या चळवळीने जन्माला घातलेला आहे आणि तो क्रांती करतो आणि क्रांतिकारक राष्ट्रवाद निर्माण करतो अगदी आपण जर का अमेरिकेकडे पाहिले तर तिथेही हेच दिसते प्रथम अमेरिका नावाचे राष्ट्र निर्माण करणे आणि नंतर क्रांती होणे प्रश्न असाही निर्माण होतो की जगात सर्वत्र पुरोगामीवाद सरंजामवादी राजेशाही सारखा का आपली रचना तयार करतो? म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा इंग्लंडच्या राजवटी ह्या सरंजामशाही टिकवतात आणि नंतर साम्राज्यवादी म्हणतात आणि हा साम्राज्यवाद रोमन साम्राज्यवादासारखाच असतो वसाहती निर्माण केल्या जातात वसाहतींचे शोषणही केले जाते आणि चर्चिल सारखा माणूस त्याचे समर्थन ही करतो वास्तविक लोकशाहीचा प्रचंड डिंडोरा पिटत पुरोगामीवाद आलेला असतो तरीही हे असे का होते? की आधीचा सरंजाम वाद मोडीत काढणे पुरोगामी वादाला जमत नाही? की शासन संस्था पुरोगामीवादाच्या बाजूने उभ्या राहतात पुरोगामी वादाला मदत करतात आणि त्यामुळे त्यांच्या राजवटी याच पुढे पुरोगामी वाद ताब्यात घेतात? म्हणजे आपल्याला असे म्हणता येईल का भारतातील पुरोगामी वाद हा भारतातल्या ब्रिटिश राजवटीने आपल्या ताब्यात घेतला होता आणि त्यांच्या चौकटीतच तो वाटचाल करत होता? आणि काही प्रमाणात तो इथल्या राजे लोकांच्या ताब्यात होता? आणि त्यांच्या संस्थानात तो त्यांच्या हिशोबाने चाललेला होता? आणि मग पुढे जाऊन असेही म्हणता येईल का की असे तर नव्हते ना की नेहरू हे कळत नकळत ब्रिटिश साम्राज्यशाहीने स्पॉन्सर केलेले सेक्युलर पण राजेच होते? जिथे राजे नव्हते तिथे सहकाराच्या नावाने नवीन सरंजामदार पुरोगामी वादाने निर्माण केले का ? हे प्रश्न आता विचारणे गरजेचे आहे आजही आपली मानसिकता अशी तर नाही ? म्हणजे सरंजामवादी ! आणि म्हणूनच आपल्या निवडणुका सरंजामवादी पद्धतीने आजही चालवलेल्या आहेत? असे तर नाही ना की आपले सारे पुढारी स्वतःला राजे समजतात आणि जनतेकडून कर रूपाने घेतलेला पैसा जनतेला देताना जणू काही आपण महान कार्य करत असल्याचे प्रतिपादन दांभिक राजांच्या प्रमाणेच करत असतात? स्वतःच्या खिशातून एकही पैसा न देता लोकांच्या खिशातून पैसे काढून तेच नंतर राजाने दान दिले राजाने मंदिर उभे केले अशा पद्धतीने उद्योग करणे यालाच राजेशाही म्हणतात राजे लोकांची अत्यंत कुटील अशी ही आर्थिक नीती जनतेला कधीच कळायची नाही पण ती आत्ताही कळू नये? हे सर्व उत्तरपुरोगामीवादी प्रकरण असेल तर मग आपल्याला आधुनिकतेकडे कसे सरकायला लागेल त्यासाठी काय करावे लागेल आपला निवडणुका पुन्हा आधुनिक कशा होतील?
आणि या सगळ्या मुळाशी असलेल्या उत्तर पुरोगामी वादाविषयी मुख्य प्रश्न निर्माण होतो की हा उत्तरपुरोगामीवाद पुन्हा भारतीय जीवनात आला कसा?
प्रश्न असा आहे की भारतामध्ये पुरोगामी वाद तर सर्व बाजूंनी विकसित झाला मग उत्तर पुरोगामीवादी क्रांती डाव्या लोकांनी करायला हवी होती ती त्यांना करणे का जमले नाही ? नेहरूंनी डावा विचार न कळत नकळत आत्मसात केल्याने मूळचा डावा विचार सौम्य होत गेला का आणि त्यामुळेच उत्तर पुरोगामीवादी क्रांती भारतामध्ये बारगळली का? की नेहरू यांनी जी केली तीच उत्तरपुरोगामीवादी क्रांती होती?
उत्तर पुरोगामी वादाचा प्रश्न हा भारतात भारतात प्रथम शैव तांत्रिक श्रुतीच्या संदर्भातच उपस्थित होतो. कारण फक्त शैवच असे होते ज्यांना पुरोगामी क्रांती बसवेश्वरांच्या मुळे सुरुवातीपासूनच जमलेली होती. त्यांच्याकडे बसवेश्वरांच्या सारखा महान विचारवंत निर्माण झाला होता आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या सारखे सर्वोत्तम म्हणावे अशा कॅटेगरीतले नेतृत्वही निर्माण झाले होते तरीही ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये सर्व लोकांना उत्तर पुरोगामी वादी क्रांती करणे का जमले नाही?
यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो तो महात्मा फुले यांच्या संदर्भात कारण तेच एक असे होते जे बसवेश्वरांच्या पुढे पाऊल टाकू शकत होते साहजिकच ब्रिटिशांच्या पद्धतीने चालणारा पुरोगामी वाद उधळून लावून उत्तर पोरगं आम्ही वादी क्रांती त्यांनी करायला होती की नको ? आणि त्यांनी ती केली नसेल तर मग ती का केली गेली नाही की अचानक पेशवाई आल्याने सगळा अजेंडा जो पुरोगामी झालेला होता तो सगळा सरंजामशाहीला पुन्हा एकदा जाऊन मिळाला आणि पुन्हा एकदा पुरोगामी क्रांतीच महात्मा फुले यांना गरजेची वाटायला लागली? दिसते तरी असेच दिसते त्यामुळे झाले असे की पेशवाईमुळेच भारतातल्या बसवेश्वर आणि शिवाजी महाराज यांच्यामुळे निर्माण झालेल्या शैव पुरोगामी क्रांतीनंतर उत्तर पुरोगामी वादी क्रांती झाली असती ती झाली नाही खरे तर कळत नकळत महात्मा फुले यांना संधी संधी होती परंतु का माहित नाही पण ब्रिटिशांचे राज्य त्यांना योग्य वाटत गेले आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याऐवजी आपण ब्रिटिशांना सहकार्य करावे असे त्यांना वाटत गेले कारण पुन्हा एकदा पुरोगामी वाद फेकला जाईल आणि पुन्हा एकदा पेशवाई येईल असे त्यांना वाटायला लागले होते हे भय त्यांच्या ठायी कुठून निर्माण झाले तर हे पेशवाई मुळेच त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते आणि असे काही झाले तर आपल्या समाजाचे संपूर्ण वाटोळे होईल याची त्यांना खात्री असावी याही पद्धतीने एक वेगळा प्रश्न असाही येतो की असे तर नव्हते ना की महात्मा फुले हे सामाजिक गोष्टीत इतके अडकून राहिले की त्यांना राज्यक्रांतीचे भानच राहिले नाही? महात्मा फुले यांच्या मर्यादा याच शैव धारेच्या मर्यादा ठरल्या का असा प्रश्न आता विचारायला हवा कारण तर्कानुसार गेलो तर शैव पुरोगामी वादानंतर फक्त शैव लोकांनाच उत्तर पुरोगामी क्रांती करणे शक्य होते असा प्रयत्न कळत नकळत यशवंतराव होळकर यांनी केला होता परंतु दुर्दैवाने तो सफल झाला नाही त्यांचे पेशवाई विरोधातले बंड हे सरंजामशाही विरोधातलेही बंड होते त्यांना स्वतःच्या राज्यापुरता एक नवा राष्ट्रवाद निर्माण करता आला असता का एक फार मोठा प्रश्न आहे
दिसते ते असे की स्वातंत्र्यानंतर सुद्धा महात्मा फुले यांच्या प्रभावामुळे फुलेवादी आणि आंबेडकरवादी लोकांच्याकडून ब्रिटिश राजवटी चांगलीच आहे असे गृहीत धरले गेले तिच्याविरोधात उत्तर पुरोगामी राज्यक्रांती करणे हे स्वप्नात सुद्धा शैव लोकांच्या आले नाही साहजिकच उत्तर पुरोगामी वादी क्रांती करण्याची जबाबदारी ज्या लोकांच्यावर होती त्या लोकांना त्यांचा माओ किंवा लेनिन निर्माण करता आला नाही आणि चायना प्रमाणे भारतामध्ये उत्तर पुरोगामी क्रांती झाली नाही
याला एक डायमेन्शन अशीही होती की भारतातले जे ब्राह्मण होते त्यांनी संपूर्ण पुरोगामी चळवळ आपल्या ताब्यात ठेवायला सुरुवात केली आणि हे करताना एक मावळ धोरण त्यांनी स्वीकारले ब्रिटिश राजवट उधळून लावण्यापेक्षा या लोकांना ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये प्रशासकीय पारंपारिक व्यवस्थेने दिलेल्या जबाबदाऱ्या पुन्हा एकदा हव्या होत्या या लोकांची प्रवृत्तीच मुळात राजा कोणीही असो पण प्रशासन आमचे पाहिजे अशी होती ती पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भरासाठी आणि त्यातूनच सुरुवातीची काँग्रेसची चळवळ झालेली दिसते या चळवळीच्या सुरुवातीच्या मागण्या काय तर आम्हाला नोकऱ्या द्या अशा नोकरदारी मागण्या दिसतात आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याला हव्या तशा नोकऱ्या मिळणार नाहीत आणि प्रशासनावर कधीही आपल्याला हवे तसे नियंत्रण मिळणार नाही तेव्हा मात्र मग त्या लोकांना स्वातंत्र्य मिळवणे गरजेचे वाटायला लागले तोवर काही त्यांना स्वातंत्र्य मिळवणे गरजेचे वाटत नव्हते नंतर संपूर्ण स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा काँग्रेसच्या आणि हिंदुत्ववादाच्या नावाखाली ब्राह्मणाच्या हातात होती. साहजिकच हे लोक काय म्हणतात हे महत्त्वाचे होते आणि हे सर्व लोक मार्क्सवादी पद्धतीने क्रांती करायला उत्सुक नव्हते कारण मुळातच यांची मानसिकता ही कधीच डावी नव्हती तर हे आतून सगळे उजवे होते किंवा फार पुरोगामी झाले तर मधले होते मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थक होते त्यामुळे त्यांच्यात कोणी माओ किंवा स्टॅलिन निर्माण होईल अशी शक्यताच नव्हती म्हणजे ब्राह्मणांच्यात स्टालीन आणि माओ निर्माण होणे शक्य नाही अशी स्थिती होती तर ब्राह्मनेतरांच्या मध्ये विशेषता फुलेवादी आणि आंबेडकरी लोकांच्या मध्ये दोन्ही नेत्यांनी ब्रिटिश राजवट चांगली आहे असे प्रमेय मांडल्यामुळे उत्तर पुरोगामी वादी क्रांतीची शक्यता फाफलली थोडक्यात काय ह्या पुस्तकामध्ये माओने निर्माण केलेली उत्तर पुरोगामी वादी स्थिती भारतात कधीच निर्माण होणे शक्य झाले नाही आणि त्यामुळेच कदाचित पुढचे जे चायनाचे पाऊल पडले ते आपल्याकडून पडायला तब्बल बारा वर्षे उशीर झाला आजही हा उशीर आपणाला प्रचंड महागात पडलेला दिसतो आज चायना कुठच्या कुठे निघून गेला आहे आपण मात्र आपली लोकसंख्या फुगवत बेडकाप्रमाणे विहिरीत पडतो आहोत उडतो आहोत
आता प्रश्न निर्माण होतो की मग कम्युनिस्ट काय करत होते विशेषता माओवादी ! असे काय झाले की इथे डाव्या लोकांना अपयश आले ? वास्तविक सर्व पुरोगामी वादी लोक हे हळूहळू अपयशी होत जातात आणि त्यांच्या योजना फाफलत जातात अशा वेळेला त्यातून नेहमीच डाव्या लोकांना संधी मिळालेली दिसते उदाहरणार्थ रशिया पण भारतात मात्र अशा प्रकारची संधी डाव्या लोकांना मिळालेली नाही क्रांती करण्याच्या सर्व शक्यता डाव्या लोकांच्या बाबतीत कायमच बारगळलेल्या का दिसतात? अशा प्रकारचे क्रांति झाली असती तर भारत बदलला असता का? की उत्तर पुरोगामी वादाचे भारतीय प्रारूप तयार करण्यामध्ये कम्युनिस्ट लोक कमी पडले?
एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चीनमध्ये माओने जे काही केले त्यामुळे चीनला एक भव्य राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पडले आणि माओच्या सर्व निगेटिव्ह बाजू बघून सुद्धा एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे ती म्हणजे त्याने चीनला एक राष्ट्र म्हणून उभे केले या पुस्तकातल्या नायकाच्या म्हणण्यानुसार तो माऊ च्या सर्व चुकींना पोटात घालत राहिला कारण भावनेचे स्वप्न दाखवले होते ते फार भव्य आणि दिव्य होते दुर्दैवाने त्याच्या क्रांतीमध्ये इतक्या वाईट गोष्टी होत्या आणि ती इतक्या लेव्हलला फेल गेली की त्या संदर्भात काही ना काही करणे गरजेचे बनले आणि शेवटी आधुनिक डावा विचार तिथल्या कम्युनिस्ट पक्षाने जन्माला घातला जो जवळजवळ कार्पोरेटवादी आहे फक्त ही कार्पोरेट चळवळ कम्युनिस्ट पक्षाने चालवल्यामुळे ती डावी वाटते भारतात डाव्या लोकांना मुळात कधी राज्य मिळाले नाही आणि जिथे हे राज्य मिळाले विशेषता बंगालमध्ये तिथे ज्या क्रांतिकारक सुधारणा घडणे आवश्यक होते त्या घडलेल्या दिसत नाहीत इतकी वर्ष सत्ता असूनही बंगाल मधल्या कम्युनिस्ट पक्षाला एक नवा बंगाल निर्माण करता येणे का अशक्य बनले याची चाचपणी करणे फार आवश्यक आहे त्या मानाने केरळामध्ये मात्र कम्युनिस्ट पक्षाला बऱ्यापैकी नवीन केरळ निर्माण करता आला तर त्याचे यश कुठे आहे तेही आपण पाहिले पाहिजे एका अर्थाने भारतातला उत्तर पूरोगामी वाद सर्वच बाजूने आणि सर्वच विचार प्रणालींच्या संदर्भात दिशाहीन झाल्यामुळे त्याला उत्तर पुरोगामी वादी क्रांती करता आली नाही असे म्हणता येते
हा उत्तर पुरोगामी वाद पूर्णपणे फेल गेल्यानेच मग एक पोकळी निर्माण झाली आणि हिंदुत्ववादाला उत्तर पुरोगामी वाद आणण्याची संधी मिळाली आणि मग उत्तर पुरोगामी वादात नेहमीच एक डिक्टेटर निर्माण होतो तशा प्रकारचे राजवट निर्माण होणे अटळ होतो आणि ही अटळता शेवटी नरेंद्र मोदी यांच्या साह्याने आता स्थिर झालेली दिसते एकाधिकारशाही हे उत्तर पुरोगामी वादाचे लक्षण आहे आणि अशाच प्रकारचा एखाधिकारवाद सुरुवातीला काही प्रमाणात इंदिरा गांधींनी सुरू केलेला होता आणि आता मोदींनी सुरू केलेला दिसतो प्रश्न असा आहे की या उत्तर पुरोगामी वादाला कितपत यश मिळाले आर्थिक पातळीवरच्या घडामोडी या खरोखरच यशस्वी झाल्या का माओने व स्टैलीनने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण केले त्याप्रमाणे शोषण मोदी करत आहेत का ? मुख्य म्हणजे एक संपूर्णपणे नवे राष्ट्र आणि नवा राष्ट्रवाद उभा करणे हे उत्तर पुरोगामी वादाला अत्यंत आवश्यक असते ते मोदींना शक्य झाले आहे का ? जिथे हे घडलेले नाही तिथे प्रॉब्लेम निर्माण झालेले दिसतात उदाहरणार्थ सोवियत युनियन मध्ये आपणाला अनेक राष्ट्र एकसंध झालेली दिसतात आणि हळूहळू ती कधीतरी फुटणे अटळ होते त्याप्रमाणे ती फुटलेली आहेत पण आता फुटलेल्या राष्ट्रांमध्ये मात्र एक नवा राष्ट्रवाद संचाललेला दिसतो रशियावर सुद्धा एक नवा राष्ट्रवाद निर्माण करण्याची जबाबदारी आल्याने अत्यंत टोकाचा राष्ट्रवाद निर्माण करणे सुरू झालेले दिसते. प्रश्न असा आहे की हा उत्तर पुरोगामी वादाचा कायमच एकाधिकारशाहीकडे कल का जातो ? हे खरोखर आवश्यक असते का ? आणि मुख्य म्हणजे याने खरोखर राष्ट्र उभे राहणार आहे का? आपल्याकडे लोक फक्त पुरोगामीवादाची चर्चा करतात कारण आपल्याला फक्त त्याच संदर्भात यश मिळालेले दिसते अर्थात जगात कुठेही पुरोगामी वादाचा प्रोग्राम पूर्ण झालेला नाही परंतु माफक यश सर्वांनाच मिळालेले दिसते पण उत्तर पुरोगामीवादात मात्र भारत हा अपवाद का ठरला हा प्रश्न एकदा विचारणे आवश्यक आहे विशेषता ही जबाबदारी इंदिरा गांधींच्यावर होती आणि एकाधी कारशाही त्यांनी निर्माण पण केली होती परंतु त्या एकाधीकारशाहीला माओप्रमाणे यश का मिळाले नाही ? हा प्रश्न एकदा कधीतरी इतिहासाचा म्हणून विचारायला पाहिजे असे काय झाले की इंदिरा गांधी अपयशी झाल्या नंतर मग आपण राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कार्पोरेट वादाकडे सरकलो कारण तोपर्यंत राजीव गांधींच्या काळात चायना काय करतो हे आपणाला कळून चुकले होते आणि आपण त्याच मार्गाने चाललोय अजूनही चालतो आहोत पण अनेकदा असे होते की इतिहासाची जी स्टेप मिसिंग झालेली असते ती स्टेप पुन्हा एखादा बेसावध वर्तमान काळ पकडून अवतरते उत्तर पुरोगामी वादाची जी स्टेप राहिली होती ती अचानक हिंदुत्ववादाच्या रूपाने कशी काय उदयाला आली ? असे काय झाले की राजीव गांधींच्या कार्पोरेट वादाकडून आपण आणखी पुढे सरकणे आवश्यक होते परंतु पुढे न सरकता आपण अचानक पुरोगामी वादाच्या दिशेने म्हणजे मिसिंग स्टेपकडे आलो एका अर्थाने मागे आलो आपला राष्ट्रवाद खुळखुळा झाला होता त्यामुळे हे घडले का आणि जर का राष्ट्रवाद बलवान होता तर मग हे घडले कसे? काँग्रेसच्या राष्ट्रवादामध्ये असे काय मिसिंग होते की लोकांना दुसरा राष्ट्रवाद शोधावा लागला किंवा शोधावासा वाटला?
प्रश्न यापुढे आणखी एक येतो तो म्हणजे प्रमोद महाजन यांनी जो कार्पोरेट वाद मांडला होता तो हिंदुत्ववादी कॉर्पोरेट वाद होता त्याचाही परिणाम मोदी यांच्यावर झालेला दिसतो प्रश्न असा आहे की हा कार्पोरेट वाद अत्यंत व्यवस्थितपणे पुढे सरकणार आहे का कारण एकाच वेळेला हिंदुत्ववादी कार्पोरेट वाद आणि हिंदुत्ववादी राष्ट्रवाद एकत्रित सांभाळायचे हे गणित कसे काय जमणार आहे ? भारतातील ही एक ट्रांजेशनल पोझिशन म्हणून आपण स्वीकारली तरी सुद्धा प्रश्न कुठे सुटलेत?किंवा सुटतात? की अचानक आलेल्या इस्लामिक राष्ट्रवादामुळे आपण सुद्धा धार्मिक राष्ट्रवादी झालो ? एक गोष्ट नक्की आहे की काही प्रमाणात का होईना पण इस्लामचा झालेला हा साईड इफेक्ट आहे कारण जिथे जिथे इस्लाम होता तिथे इस्लामने राष्ट्र निर्माण करण्यासाठी इस्लामचा आदर्श ठेवला त्यांना असे वाटले की इस्लामच्या साह्याने धार्मिक राष्ट्रवाद उभा करून आपले राष्ट्र निर्माण करता येईल पण अनेकदा झाले असे की तुर्कस्तान सारख्या डेव्हलप झालेल्या देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारची इस्लामिक राजवट आली हे चक्क मागे जाणे होते मुख्य म्हणजे धर्माच्या आधारे उत्तरपुरोगामीवाद उभा करता येईल का असा प्रश्न आपण सर्वांनीच विचारायला हवा होता. या अंगाने काही चर्चा झाली असती तर फार बरे झाले असते प्रत्यक्षात अशी काही मीमांसा झालेली नाही मुख्य म्हणजे आपण वारंवार इंग्लंड आणि युरोप आणि अमेरिका यांच्याकडे का बघतो आहोत आपल्याला खरे तर लक्ष द्यायला हवे ते चायनाकडे आपल्या आसपासच्या अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशाने श्रीलंकेकडे परंतु हे न करता आपला काहीतरी भलताच गोंधळ चाललेला दिसतो याचा एक दुष्परिणाम असा झाला की कळत नकळत हिंदुत्ववादाला ताकद मिळत गेली
उत्तर पुरोगामी वादाने धर्म पुन्हा परत आणला आणि याचे अनेक दुष्परिणाम राष्ट्रवादावर झालेले आहेत तरीसुद्धा लोकांना त्याविषयी आकर्षण का वाटते हे सुद्धा पाहिले पाहिजे मुख्य म्हणजे कळत न कळत इस्लाम बाबतीतली सगळी मांडणी विचारवंत विशेषता पुरोगामी विचारवंत नाकारत असले तरी प्रत्यक्षात मात्र लोकांना ती योग्य वाटते हिंदू लोकांना इस्लामचा फोबीया झालाय असे म्हटले म्हणून प्रश्न सुटणार आहे का ? त्याऐवजी हे भय का निर्माण झाले हा प्रश्न निर्माण करणे जास्त गरजेचे आहे जर का हा फोबिया नसता तर हिंदुत्ववाद निवडून तरी आला असता का असा प्रश्न मला नेहमी पडतो दुर्दैवाने त्यानंतर समान नागरी कायदा वगैरे गोष्टी काही भाजपने केल्या नाहीत आणि आता भाजप या गोष्टी करेल यावरचा भाजपवरचा विश्वास उडत चाललेला आहे किंबहुना ब्राह्मण्याने हिंदुत्व ताब्यात घेऊन पुन्हा एकदा या देशाचा सत्यनाश करण्याची तयारी चालवलेली आहे का असाच प्रश्न पडावा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आता सुरू झालेल्या आहेत इतिहासाचा एक क्रम असतो इतिहास स्वतःच्या पद्धतीने उत्क्रांत होत असतो या उत्क्रांतीत पुरोगामी वादानंतर उत्तरपुरोगामी वाद हे योग्यच होते परंतु ज्या प्रकारची सरळ रेषीय रचना चायनाला लाभली तशी संरचना आपल्याला का लाभली नाही आणि जर लाभली होती तर मग इंदिरा गांधींनी ती गोष्ट नीट का मार्गी लावली नाही असा प्रश्न नेहमी पडतो
उत्तर पुरोगामी वादाची ही मिसिंग स्टेप पुन्हा भारतीय राजकारणामध्ये उत्तर कार्पोरेट वाद घेऊन हिंदुत्ववादी देहाने आलेली दिसते त्याचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम स्पष्टपणे आता दिसत आहेत म्हणजेच जे 1970 ते 1985 या दरम्यान व्हायला हवे होते ते आपल्याकडे आता अचानक अवतरलेले दिसते आणि त्यामुळेच अनेक लोकांना नेमके काय चाललंय हेच कळत नाही वास्तविक घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही राष्ट्रवाद हा पुन्हा एकदा उभा राहिलंच फक्त त्याचा आधार नेमका भक्कम काय असेल हा प्रश्न आहे आणि तोही प्रश्न येत्या वीस वर्षात निकाली होईल तोपर्यंत कार्पोरेट वादाच्या पातळीवर आणि उत्तर कार्पोरेट वादाच्या पातळीवर भाजप काय करणार आहे हा खरा प्रश्न आहे जर का या नव्या अर्थव्यवस्थेचे फायदे सामान्य जनतेला मिळाले तरच भाजप पुन्हा पुन्हा निवडून येईल अन्यथा भाजपचे आणि हिंदुत्ववादाचे नाहीसे होणे किंवा त्यांचा प्रभाव नाहीसा होणे हे एक अटळ भाकीत आहे भाजपने किमान समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा अत्यंत कडक पद्धतीने आणून इतिहासात काहीतरी क्रिएटिव्ह काम केले अशी पावती घेणे आवश्यक आहे अन्यथा हिंदुत्ववाद ही पूर्वीच्या ब्राह्मणांची आणि ब्राह्मण्यवादाची एक चळवळ होती अशी इतिहासात नोंद होईल
श्रीधर तिळवे नाईक
उत्तर पुरोगामी वाद आणि मंडल आयोग श्रीधर तिळवे नाईक
आज 16 नोव्हेंबर मंडल आयोगाचा एका अर्थाने वाढदिवस ! मागच्या उत्तरपुरोगामीवादावरच्या लेखात आपण उत्तरपुरोगामीवाद हा कसा अटळ असतो हे थोडक्यात पाहिले आता आपण मंडल आयोगाचा यासंदर्भात विचार करू
लाल बहादूर शास्त्री हे पुरोगामी वादाचे शेवटचे पंतप्रधान होय आणि त्यांनी ज्या तऱ्हेने युद्ध जिंकून सुद्धा युद्ध हरले म्हणजे युद्ध जिंकले आणि तहात हरले ते बघता रशिया मधल्या उत्तर पुरोगामी वादाने कसे आपले प्रेशर वाढवत नेले होते ते कळते साहजिकच या दबावाखाली इंदिरा गांधी सुद्धा होत्या उत्तर पुरोगामीवाद हा सोलुशन आहे अशी त्यांची मानसिकता बनत चालली होती आणि म्हणूनच त्यांनी एकाधिकारशाही स्वीकारून समाजवाद घटना दत्त केला आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण करून उत्तर पुरोगामी वादाच्या दृष्टीने दिशेने पावले टाकायला सुरुवात केली या सर्व विकासामध्ये त्यांची स्वतःची इच्छा किती आणि त्यांच्यावर रशिया मधल्या उत्तर पुरोगामी वादाने टाकलेले प्रेशर किती हा अजूनही प्रश्न आहे त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत असलेल्या तरुणतुर्काचा उत्तर पुरोगामी वाद या काळामध्ये किती प्रेशर टाकत होता हा ही प्रश्न आहे कुटुंब नियोजनासाठी सक्ती केल्याशिवाय पर्याय नाही हे सुद्धा याच काळामध्ये संजय गांधी यांना कळले दुर्दैवाने ही सक्ती लागू करायला जे बळ लागते आणि त्यासाठी जी शिस्त लागते ती प्रशासनाला आणता आली नाही आणि या सक्तीचा बल्ल्या उडाला
मंडल आयोगाचा विचार हा नेहरू काळात झालेला होता पण नेहरूंना आपले पुरोगामी मॉडेल यशस्वी झालेले आहे असेच वाटत होते वास्तविक ओबीसी लोकांच्यासाठी शिफारसी करण्यासाठी आलेले हे मॉडेल कळत नकळतपणे उत्तर पुरोगामी वादाकडे नेणारे होते मात्र पुरोगामी वादात अडकलेल्या नेहरूंना त्याचे गांभीर्य कळले नाही त्यामुळे जितकी चाल ढकल करता येणे शक्य होते तेवढी चालढकल केली गेली
मोरारजी देसाई यांच्या सरकार पुढे इंदिरा गांधींचा उत्तर पुरोगामी वाद जो अर्धवट यशस्वी झाला होता तो स्वीकारायचा किंवा मग स्वतःचे काही मॉडेल तयार करायचे असे दोन चॉईस होते साहजिकच उत्तरपुरोगामी वादाचे एक मॉडेल म्हणून पुन्हा एकदा मंडल आयोगाचे पुनर्जीवन झाले त्याने आपला अहवाल तयार करायला काही वर्षे घेतली आणि तोपर्यंत राजकीय स्थित्यंतर झालेले होते आता इंदिरा गांधी निवडून आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी हा इंदिरावादी उत्तर पुरोगामी वाद नव्हता तर जनता पक्षाचा उत्तर पुरोगामी वाद होता. साहजिकच त्यांना तो स्वीकारताना काही पूर्वग्रह दूषित अडथळा होता त्यांनी तो स्वीकारला नाही तसाच पेंडिंग ठेवला
नंतर बोफोर्सचे काल्पनिक प्रकरण झाल्यानंतर साहजिकच राजीव गांधी सरकार कोसळले आणि बीपी सिंग पंतप्रधान झाले
व्ही पी सिंग यांना आपल्या कारकीर्दीचा एक ठसा उमटवून जायचा होता साहजिकच ते त्यासाठी संधी शोधत होते आणि ही संधी मंडल आयोगामध्ये आहे याची त्यांना जाणीव झाली आणि ही जाणीव होताक्षणीच त्यांनी 1990 साली हा अहवाल प्रत्यक्ष कारवाईमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये आणला यामागे अर्थातच मतांचे राजकारणही होते आपण असे केले तर 52% असलेला ओबीसी समाज आपल्या मागे येईल अशी एक समजूत होती
जातीच्या जीवावरचे राजकारण आणि देशीवादाच्या नावाखाली स्वीकारण्यात आलेली जातिव्यवस्था आता प्रस्थापित व्हायला लागले होते साहजिकच जातींची फेर मांडणी सुरू झाली आणि अनेक ओबीसी नेते आणि साहित्यिक उदयाला यायला लागले होते त्या सर्वांनी मंडल आयोगाला पाठिंबा दिला या काळातील दलित पॅंथरने याला पाठिंबा दिला कारण त्यांना असे वाटत होते की यामुळे ओबीसी घटक आंबेडकरवादी चळवळीला येऊन मिळेल शिवाय अशा प्रकारची शिफारस प्रत्यक्षात बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली होती किंबहुना तेच हे आरक्षणाचे पायोनियर म्हणता येतील यामागे शैवधर्मी लोक ठाम पणाने उभे राहिले कारण या ५२ टक्क्यांच्या मध्ये जवळजवळ सर्व शैव होते किंवा एकेकाळचे शैव होते एकंदरच भारतीय समाजातला 70 टक्के समाज हा आरक्षणाखाली येत होता आणि साहजिकच त्याला प्रचंड पाठिंबा मिळणे अटळ होते साहजिकच 30% लोकांची चांगलीच पंचायत झाली कारण आता लढा थेट झाला एकेकाळी वैष्णव विरुद्ध शैव अशी लढाई होती ती आता मंडल आयोग वादी आणि मंडल आयोग विरोधी यांच्यात कन्वर्ट झाली भारतातल्या उत्तर पुरोगामी वादाला मिळालेले हे जातीय रूप होते आणि त्याचे काय करायचे हा प्रश्न भाजप पुढे ठामपणे उभे राहिला 70 टक्के लोक आपल्या विरोधात जाणे परवडणारे नव्हते आणि त्यांना जर का आपल्या बाजूने खेचायचे असेल तर आपणाला काहीतरी अशी खेळी खेळायला हवी जेणेकरून आपण सर्व एक आहोत अशी भावना निर्माण होईल असे भाजपला वाटायला लागले आणि त्यातूनच पुन्हा एकदा राम मंदिराचा प्रश्न व्यापक बनवण्याचे ठरवले गेले. या लढाईला मंडल विरुद्ध कमंडल असेही स्वरूप दिले गेले जो पुरोगामी वाद जातीयवाद आपल्या पुरोगामी तत्त्वांच्यात येऊ नये म्हणून धडपडत होता त्याला आता नाईलाजाने या जातीयवादाला स्वीकारावे लागले आणि मंडल आयोगाला त्यांनी पाठिंबा दिला साहजिकच घटना दुरुस्ती करण्यासाठी लागणारा पाठिंबा जवळ जवळ 70% झाला आणि घटना दुरुस्ती केली गेली या विरोधात असणाऱ्या लोकांनी साहजिकच मंडल आयोगाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि हे आव्हान नेमके कोणी दिले हे आजही गुलदस्त्यात आहे काहींच्या मते ते काँग्रेसने दिले काहींच्या मते भाजपची ही चाल होती भाजपने शह द्यावा म्हणून राम जन्मभूमी आंदोलन रथयात्रेच्या दिशेने नेले आणि भाजप काय करत आहे हे लक्षात आल्यावर व्हीं पी सिंग यांनी रथयात्रेला ठाम विरोध केला भाजपने त्यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला वास्तविक सिंग यांनी राजकारण समजून घ्यायला पाहिजे होते रथयात्रा कशी कुठे गोठवता येईल या दिशेने काही प्लॅनिंग करता येते का ते पाहता आले असते पण असे काही प्लॅनिंग अनेकदा पुरोगामी लोकांच्याकडे नसते नुसत्या बोंबा मारल्या कि प्लॅनिंग होते अशी त्यांची समजूत असते डिप्लोमसी नावाची काही गोष्ट असते हे त्यांच्या गावी नसते याबाबत काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंहराव खूप उस्ताद निघाले त्यांनी जेव्हा बाबरी मशीद पाडायला प्रचंड गर्दी झाली तेव्हा व्यवस्थित केंद्रीय फोर्स हटवले आणि पोलिसांना ही काही करता येणार नाही याचा चोख बंदोबस्त केला अशी डिप्लोमसी व्ही पी सिंग यांनाही करता आली असती पण ते शहीद व्हायलाच निघाल्यासारखे वागले साहजिकच पंतप्रधानपद गेले निवडणुका आल्या आणि भारतातला उत्तर पुरोगामी वाद हा दोन्ही बाजूने आता सळसळायला लागला एक जातीनिष्ठ होता तर दुसरा वर्णनिष्ठ होता. साहजिकच वर्ण आणि जाती दोन्हींचे भारतात पुनरागमन झाले यावर तोड म्हणून प्रमोद महाजन यांनी माधव नावाचा एक फॉर्मुला तयार केला ज्यात माळी धनगर आणि वंजारी असे तीन ओबीसी फॅक्टर एकत्र आणले गेले ज्यांना अतिशय पद्धतशीरपणे हिंदुत्ववाद शिकवला गेला त्यातूनच गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ असे नेते पुढे आले
16 नोव्हेंबर 1992 ला सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगाने केलेल्या सर्व शिफारशी या घटनेला धरून आहेत हे मान्य करून मंडल आयोगाच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे सर्व काही कायदेशीर झाले आता मात्र भाजपाला कळून चुकले की लढाई अटळ आहे परंतु नेहमीप्रमाणे थेट न लढता अत्यंत व्यवस्थित डिप्लोमॅटिक लढाई सुरू झाली. विद्यार्थी आंदोलने पेटायला लागली आणि ती अनेकदा त्रिवर्ण होती आणि मग प्रत्युत्तर म्हणून ओबीसी फॅक्टर त्यात उतरायला लागला एका अर्थाने पुन्हा एकदा युरेशियन विरुद्ध अनार्य अशी ही लढाई झाली साहजिकच युरेशियन लोकांचे नायक जे ओबीसी फॅक्टरला ही मान्य असतील पुन्हा एकदा आणणे एवढाच उपाय भाजपाच्या हातात उरला आणि भाजपने बाबरी मशीद आंदोलन उभे करायला सुरुवात केली देशभरातून अनेक हिंदुत्ववादी लोक राम जन्मभूमीत जमायला लागले काँग्रेसचा या आंदोलनाला अंतर्गत पाठिंबा होता परंतु विरोधाचे नाटक ही करणे भाग होते ते केले गेले मुख्य म्हणजे हे आंदोलन कुठल्याच पक्षाचे न राहता राम जन्मभूमीत जे लोक जमले त्यांचे झाले आणि त्यांनी आता ते स्वतःच्या ताब्यात घेतले खरे तर जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि ही जनता प्रामुख्याने इमोशनल होती तिला सायंटिफिक रीजनिंगशी काहीही कर्तव्य नव्हते तिचा सगळा जामा निमा उत्तराधुनिक आणि उत्तरपुरोगामी होता एकीकडे उत्तर आधुनिक पद्धतीने संघटित व्हायचे आणि दुसरीकडे उत्तर पुरोगामी कृती करायची अशी ही मांडणी जनतेमध्येच तयार होत गेली साहजिकच नेत्यांचेही न ऐकता लोक शेवटी बाबरी मशीद पाडायला पुढें सरसावले महाराष्ट्रातल्या शिवसेनेची संबंध नसलेले पण स्वतःचे नामकरण शिवसेना म्हणजे भगवान शंकराची सेना या अर्थाने केलेले लोक अत्यंत निधड्या छातीने पुढे सरकले गोळीबार होऊ शकला असता परंतु हे शेवटी हर हर महादेववाले असल्याने त्यांनी आगे कूच केली हे चांगले झाले की वाईट झाले हे ठरवणे अतिशय अवघड आहे पण हा निर्णय पक्षीय असण्याऐवजी जनतेचा किंवा तिथे जमलेल्या गर्दीचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे तिथला शिलान्यास तर सरळ सरळ काढून घेऊन या स्वतंत्र शिवसेनेचे नेते त्याची मिरवणूक काढत होते त्यांना अटक करण्याची हिंमत कुठल्याच सरकारमध्ये झाली नाही कारण हर हर महादेवला अटक करणे हे फार मोठे रिस्की झाले असते आणि ही रिस्क घेण्याची तयारी कोणाचीच नव्हती एका अर्थाने शैव हिंदुत्वाच्या दिशेने सरकवत नेण्याची चाल यशस्वी झालेली दिसते अर्थात श्रेय घ्यायला मात्र नेहमीप्रमाणे वैष्णव पुढे सरसावले मात्र न्यायालयात कबूल करण्याची हिंमत कोणातच नव्हती अर्थात हेही वैष्णववादाला धरून होते या सर्व प्रकरणावर मी अ डा हॉ का बा ना सु ना या कादंबरीमध्ये एक स्वतंत्र दीर्घ असे प्रकरण लिहिले होते पण नंतर ते मी वगळले कारण अभिजीत देशपांडे या माझ्या मित्राचे अयोध्या प्रकरण हे जास्त ऑथेंटिक होते कारण तो प्रत्यक्षात तिथे पोहोचलेला होता आणि त्याचे नंतर आलेले पुस्तकही गाजले तिथे जे घडले ते आजही संपूर्णपणे आकलनाच्या कक्षेत आलेले नाही आणि मी इथे जे सांगतो आहे ते अंतिम आहे असा माझा दावा नाही पण जे काही घडले ते उत्तर पुरोगामीवादी होते एवढे नक्की
पुरोगामी वादी लोक आजही 6 डिसेंबर 1992 हा भारताच्या इतिहासातला काळा दिवस मानतात कारण कळत नकळत दोन्ही बाजूने उत्तरपुरोगामी वाद ॲक्टिव्ह झाला म्हणजे काँग्रेसच्या बाजूचें असलेले उत्तरपुरोगामीवादी लोक सुद्धा उत्तरआधुनिक लोक सुद्धा या आंदोलनाच्या यशामध्ये कळत नकळत सहभागी होते किंबहुना नरसिंहरावांचे त्यासाठी आभार अनेकदा मानले गेलेले आहेत हा दिवस काळा दिवस म्हणून फक्त डावे लोक साजरा करतात किंवा आंबेडकरवादी लोक साजरा करतात हे लक्षात घेण्याजोगे आहे यामागे मुस्लीम मतांचे राजकारण किती हा प्रश्न आहेच
जो ओबीसी फॅक्टर मंडल आयोगाच्या बाजूने उभा होता तोच ओबीसी फॅक्टर राम मंदिराच्या बाजूनेही उभा रहावा हा भारतीय इतिहासातील एक फार मोठा विरोधाभास आहे आणि आजही त्याचे आकलन झालेले आहे असे वाटत नाही माझ्या मते राम हा शिवभक्त असल्याने शिवभक्त असलेल्या रामाशी शैव लोकांची जवळीक आहे साहजिकच ही मशीद पाडण्यामध्ये खरा पुढाकार त्यांनीच घेतला बाकीचे लोक जेव्हा फक्त घोषणाबाजी करत होते तेव्हा हे लोक कृतीत उतरले आजही हे चांगले झाले की वाईट हे सांगणे कठीण आहे माझे स्वतःचे मत असे आहे की यासंदर्भात कायदा मोडता कामा नये पाहिजे होता पण कधी कधी उत्तर पुरोगामी वादामध्ये भावना इतक्या अनावर होतात की संपूर्ण mob त्या भावनेच्या दिशेने सरकायला लागतो इथे नेमके हेच घडले असावे असा माझा अंदाज आहे कारण या काळामध्येसुद्धा मी शैव लोकांशी बोललेलो होतो आणि सर्वजण याबाबतीत कट्टर होत चाललेले मी पाहिले आहेत वैष्णव लोक हे नेहमीच मुस्लिम लोकांशी युती करत असतात खरे आपणच म्हणजे शैव लोक लढत असतो असे त्यांचे म्हणणे या काळामध्ये सतत शैव लोकांनी सुरू ठेवलेले होते हेच कार्यकर्ते भाजपमध्ये वावरत होते आणि त्यातूनच ही भावना अधिकाधिक तीव्र होत गेली याची दखल जर का वेळीच घेतली गेली असती तर बाबरी मशिद पडली नसती असे माझे मत आहे दुर्दैवाने हा प्रश्न फक्त वैष्णवांचा आणि वैष्णव हिंदूंचा आहे अशा प्रकारचा गोंडस गैरसमज अनेक लोकांनी करून घेतला आणि त्यातून हा जो अत्यंत छोटा फॅक्टर होता तो अचानक त्या दिवशी मोठा होत गेला आणि त्यातूनच सगळे पुढचे घडलेले आहे
याचा एक विचित्र परिणाम असा झाला की आत्तापर्यंत चालू झालेला असलेला ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा वाद कळत नकळत मागे पडला कारण ब्राह्मणेतर वाद मुळात महात्मा फुले यांनी शूद्र ज्ञातीसाठी प्रथम व सर्व ब्राह्मणेतरांसाठी नंतर जन्माला घातला होता याच प्रश्नांमध्ये अचानक मग क्षत्रिय असलेले लोक किंवा स्वतःला समजणारे लोक एका बाजूला आले आणि आरक्षणाला पाठिंबा देणारे लोक विरुद्ध बाजूला उभे राहिले एका अर्थाने ब्राह्मणेतर मंडलवादी आणि मंडल विरोधी अशा दोन गटांमध्ये आपोआपच विभागले गेले
या देशातील ब्राह्मण क्षत्रियांना नेहमी असे वाटते की धर्माचा प्रश्न आपण जर का उभा केला तर आपोआपच सर्व वर्ण आणि जाती संघटित होतात राम मंदिर हा असा धर्माच्या नावाने उभा केलेला प्रश्न होता आणि अपेक्षेप्रमाणे सर्व वर्ण आणि जाती या निमित्ताने एकत्र आले पण ओबीसी फॅक्टर मंडल आयोगा बाबतीतला आग्रह सोडायला तयार नव्हता अगदी राम मंदिर आंदोलनात भाग घेताना सुद्धा याबाबतीत हा वर्ग आपल्या स्थानांमध्ये ठाम होता त्यामुळे याच आंदोलनाच्या निमित्ताने अचानक भाजपाला साक्षात्कार झाला की आपल्याला जर का ते संघटित ठेवायचे असेल तर आपणाला मंडल आयोग स्वीकारावा लागेल आणि हळूहळू भाजपने मंडल आयोग सुद्धा स्वीकारायला सुरुवात केली म्हणजेच भाजप विरोधात जो सर्वात मोठा मुद्दा होता त्यातली हवा भाजपने काढून घेतली म्हणजेच ज्या जातीचा उल्लेख सुद्धा करू नका असे भाजपवादी म्हणत होते ते आता जातीचा उल्लेख करून आरक्षण घ्या असे सांगू लागले हा एक पुन्हा भाजपा मधला विरोधाभास होता पण सत्तेसाठी ही केली गेलेली तडजोड होती प्रत्यक्षामध्ये भाजपला आज सुद्धा जात नको असते आणि वर्ण मात्र हवा असतो पण तोही वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी मग कधी सोयीने जन्मदत्त तर कधी सोयीने कर्म दत्त अशा भूमिका बदलत जातात त्यात स्थैर्य नसते एक डिप्लोमॅटिक चंचलपणा सतत चाललेला असतो जो स्वतःचा वर्ण तर बदलू देत नाही पण कर्मदत्त असल्याचे खोटे समाधान देत राहतो आतापर्यंत ब्राह्मण वर्णांमध्ये विसाव्या शतकात किती ब्राह्मणेतरांना सामावून घेण्यात आले असा प्रश्न जर विचारला तर या प्रश्नाचे खरे उत्तर आपोआप मिळून जाते साधा एक शंकराचार्य सुद्धा या लोकांना ब्राह्मणे तर निर्माण करता आला नाही आणि हे लोक जेव्हा मग कर्म दत्त वर्ण व्यवस्थेची गोष्ट करतात तेव्हा प्रत्यक्षात ती फक्त वावडी वाटते साहजिकच जातीचा उल्लेख करू नका जाती नको जाती अस्तित्वात नाहीत वगैरे वगैरे युक्तिवाद सुरू राहतात आणि वर्ण मात्र शाबूत राहतात आणि वर्णाला बिलगुन जात असतेच ती काय जात नाही
आता राम मंदिर बनले आहे आणि मंडल आयोगही स्वीकारला गेलेला आहे म्हणजेच उत्तरपुरोगामीवादाचे दोन अजेंडे आता पूर्णपणे यशस्वी झालेले दिसतात प्रश्न असा आहे की या अजेंड्यांनी खरोखर समाज पुढे गेला आहे का याबाबत मंडल आयोगाला मिळालेले यश नक्की महत्त्वाचे आहे अनेक ओबीसींच्या मध्ये आज शिक्षणाविषयी जागृती निर्माण झालेली आहे आणि शिक्षणप्रमाणसुद्धा ओबीसीमध्ये वाढले आहे हा नक्कीच मंडल आयोगाचा झालेला फायदा आहे याशिवाय राजकारणामध्ये सुद्धा ओबीसी फॅक्टर कळत नकळत महत्त्वाचा आणि अनेकदा निर्णायक होत गेलेला दिसतो किंबहुना मोदी यांनी हा फॅक्टर दोन इलेक्शन मध्ये आपल्या बाजूने ओढला आणि आत्ताच्या इलेक्शन मध्ये तो सोडला आणि साहजिकच त्याची किंमत त्यांना मोजावी लागलेली आहे आणि आता सुद्धा भाजप ही किंमत मोजणार आहे भाजपला अनेकदा असे भास होत असतात की जय श्रीराम म्हटले की ओबीसी फॅक्टर आपल्या ताब्यात राहील राम मंदिर प्रश्नामुळे त्यांना असे वाटते की तिथे जी शैव फॅक्टरने मदत केली तीच मदत आता सुद्धा होईल परंतु परिस्थितीमध्ये आता फरक पडलेला आहे नेमके राजकारण कसे झाले हे शैव लोकांना व्यवस्थित कळलेले आहे त्यामुळे भाजपाला जे अपेक्षित आहे ते प्रत्यक्षात होणार नव्हते झालेले नाही आणि पुढेही होणार नाही ज्या दिवशी भाजपाला हे कळेल तो भाजपचा जागृत दिन असेल
मी स्वतः मंडल आयोग हा अत्यंत आवश्यक मानतो कारण त्यामुळेच एक मोठा घटक वाढत गेला मुख्य म्हणजे ऍक्टिव्ह झाला आणि आता तो ज्वालामुखीसारखा स्फोटक बनत चाललेला आहे त्यात फक्त वाईट जळावे आणि चांगले उरावे अशी आपण अपेक्षा करू शकतो हा ज्वालामुखी सध्या तरी शांत आहे हे सुदैव !
श्रीधर तिळवे नाईक
नरहर कुरुंदकर यांची शोकांतिका श्रीधर तिळवे नाईक
नरहर कुरुंदकर यांची शोकांतिका ही त्यांच्या इस्लामविरोधातून जन्मलेली आहे वास्तविक खरा पुरोगामी आणि समाजवादी हिंदुत्व विरोधात आणि इस्लाम विरोधात सारख्याच ताकतीने लढतो कुरुंदकर हे एकटेच असे करत होते समाजवाद्यांच्या पुरोगामीवादाविषयीच्या कल्पना फार भिन्न आहेत साहजिकच त्यांनी त्यांचा इस्लाम विरोध त्यांना हिंदुत्ववादी ठरवण्यासाठी वापरला याचा एक दुष्परिणाम असा झाला की हिंदुत्ववाद्यांना नरहर कुरुंदकर स्वतःच्या इस्लामविरोधी अजेंडासाठी अत्यंत आवश्यक वाटले आणि हळूहळू आज अवस्था अशी आलेली आहे ते नरहर कुरुंदकरांना हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्शन देणे हे खुद्द हिंदुत्ववाद्यांनाच गरजेचे वाटते कारण इस्लामच्या संदर्भातली सडेतोड टीका फक्त कुरुंदकरांनी केलेली आहे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारची टीका केलेली आहे त्या सर्वांना बहिष्कृत करणे ही पुरोगामी वाद्यांची एक लकब होऊन बसलेली आहे आता सुद्धा कुरुंदकरांच्याबाबतीत जे काही घडते आहे ते फार काही वेगळे नाही हे होणारच होते स्वतःच्या गोट्यातला माणूस असा पारंपारिक लोकांच्या हातात सोपवणे याबद्दल खरे तर पुरोगामी लोकांनीच पश्चाताप व्यक्त करायला हवा होता पण तो करायचा राहिला बाजूला आजही कुरुंदकर म्हटले की त्यांना हिंदुत्ववादी म्हणणारे अनेक शहाणे दीड शहाणे या समाजात अस्तित्वात आहेत इस्लाम हा एक प्रॉब्लेम आहे जसा ब्राह्मणधर्म हा एक प्रॉब्लेम आहे त्यांची सोल्युशन शोधताना एकाला एक वागणूक आणि दुसऱ्याला एक वागणूक हे चालणार नाही हा सापत्न भाव तुम्हाला मुसलमानांची वोटिंग मिळावीत म्हणून चालत असेल तर तुम्ही विचार दरिद्री आहात असेच म्हटले पाहिजे तुम्हाला जर असे वाटत असेल की हा लढा लांबणीवर टाकता येईल तर तुम्ही मूर्खांच्या नंदवनवानात वावरत आहात कारण तुम्ही हेच पाकिस्तान मागणीबाबत केले होते आणि तुम्हाला वाटले होते की हे सर्व टाळता येईल पण प्रत्यक्षात हे टळले नाही आणि बांगलादेश आणि पाकिस्तान नावाचे दोन देश आता निर्माण झालेले आहेत आज ना उद्या इस्लामचा पुढचा लढा तुमच्या दाराशी येणे अटळ आहे इस्लाम काही तुम्ही पुरोगामी आहात म्हणून तुम्हाला क्षमा करणार नाही ते नंतर काफीर म्हणून तुमच्याच विरोधातही ठाकणारच आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पुरोगामी लोकांच्या हे लक्षात येत नाहीये. ज्याप्रमाणे ब्राह्मण धर्म आज ना उद्या वर्ण व्यवस्था या समाजामध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत राहील त्याचप्रमाणे इस्लाम सुद्धा संपूर्ण जग इस्लाम बनवल्याशिवाय थांबणार नाही यात पुरोगामीही आले बहुतेक पुरोगामी विचारवंतांना असं वाटतं की ते करणाची कवच कुंडले घेऊन आलेले आहेत अशी कवच कुंडले कुणाकडेच नाहीत बहुदा बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था झाल्यावरच ते जागृत होणार आहेत
आजची नरहर कुरुंदकरांची शोकांतिका ही पुरोगामी लोकांनी त्यांना हिंदुत्ववादी ठरवल्यातून झालेली आहे त्यांच्यावर अदृश्य बहिष्कार टाकण्यात आला तो ठरवून टाकलेला नाही पण तो अदृश्य बहिष्कार सर्वांना दिसत होता आज त्याचाच फायदा कट्टर ब्राह्मण्यवादी लोकांना मिळतो आहे मताचे राजकारण फक्त हिंदुत्ववादी खेळतात आणि आम्ही खूप सज्जन आहोत असा जो साळसूदपणा चाललेला असतो त्यात फारसे तथ्य नाही मुसलमानांचा प्रश्न आला की मतांचे राजकारणच येते समाजवाद्यांना नेहमीच निवडून येण्यासाठी मुस्लिम मते मदत करतात कारण मुस्लिमांचा हितसंबंध हिंदुत्व विरोधात आहे त्यांना सध्या त्यांच्या अजेंडासाठी समाजवादी सोयीचे आहेत दुर्दैवाने हे डाव्या लोकांना कधीही कळले नाही आणि भविष्यात कदाचित कळणारच नाही हे तेव्हा कळेल जेव्हा प्रत्यक्ष इस्लाम त्यांच्या दारात कट्टर बनून ठाकेल दुर्दैवाने तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि समाजवाद कुठल्यातरी चितेवर जळत असेल.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment