महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ श्रीधर तिळवे नाईक
या निवडणुकीचा विचार करताना शेवटच्या दोन दिवसात काय घडले याचा विचार करायला पाहिजे कारण ह्या दोन दिवसांनी बऱ्याचशा गोष्टी बदलल्या तोपर्यंत वारे दोन्ही बाजूंसाठी समान ताकतीने वाहत होते
पहिली गोष्ट म्हणजे जरांगे पाटील हे शरद पवारांचे खास आहेत आणि प्यादेही आहेत असा झालेला प्रचार! साहजिकच ओबीसी लोकांची पवारांना मिळणारी मदत या वेळेला मिळाली नाही विशेषता ओबीसी लोकांना मिळालेल्या धमक्या ! त्यामागे कोण आहे हा कायमच प्रश्न होता पण याचे उत्तर म्हणून शरद पवारांचे नाव आले आणि या निगेटिव्ह पब्लिसिटी चा कळत नकळत प्रचंड परिणाम झाला मराठा विरुद्ध ओबीसी या राजकारणाचा दोन्ही बाजूने फायदा हा भाजप युतीला झालेला आहे किंवा त्याने तो दोन्ही बाजूने उठवला आहे
मुळात या संदर्भात एक ठाम विधान जाणे आवश्यक होते आणि ते विधान चक्क शिंदे यांनी केले गरजे पेक्षा अधिक ताणू नये आम्हालाही गेम करता येतो हे त्यांचे वाक्य बरेच बोलून गेले ते काहीसे ओबीसी लोकांच्यासाठी दिलासादायक ठरले साहजिकच ही ओबीसी मध्ये जी नेहमी शरद पवारांच्या कडे जायची कळत नकळत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्यामागे शरद पवार आहेत या दाव्यामुळे ती मते विरोधी पक्षाकडे न जाता या सत्ताधारी पक्षाकडे गेली ओबीसींनी आपली मते रातोरात भाजप आघाडीकडे वळवलेली आहेत मी नेहमीच म्हणत आलोय की या देशात अंतिम पातळीवर ओबीसी फॅक्टर फार महत्त्वाचा ठरतो
दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे की नाही याविषयी एक अंतर्गत वाद आहे त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे हा वाद म्हणजे काही लोक स्वतःला उच्च कुळातील ९६ कुळी क्षत्रिय म्हणवतात त्यांना स्वतःला मागासलेले म्हणवून घ्यायचे नाही म्हणूनच त्यांना मराठा म्हणून मिळणारे आरक्षण नको आहे बहुतेक जण जरांगे पाटील यांना शंभर टक्के मराठ्यांचा पाठिंबा आहे असे गृहीत धरतात पण ती वस्तुस्थिती नाही उलट आरक्षण घेतल्यानंतर आपण सुद्रांच्यात जाऊ अशी भीती उच्च कुलीन मराठ्यांना वाटते आणि म्हणूनच ते आरक्षणाला तयार नाहीत हा सगळा उच्च क्षत्रिय मराठा हा स्पष्ट आणि स्वच्छपणे या वेळेला भाजप शिंदे अजित पवार युतीकडे वळलेला आहे किंबहुना भाजप आणि शिंदे युती म्हणजे महाराष्ट्रातल्या ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांची युती असे समीकरण या निवडणुकीमध्ये तयार झालेले आहे आणि होते या दोन वर्णानी स्वतःची मते एक दिलाने भाजप आघाडीला दिलेली आहेत म्हणजेच एका बाजूला ओबीसींची आलेली मते आणि दुसऱ्या बाजूला उच्चवर्णीय मतदारांची आलेली मते असे काहीसे डेडली कॉम्बिनेशन या निवडणुकीत भाजप युतीला लाभले आणि त्याचा स्पष्ट परिणाम आपणाला निकालात दिसतो
अचानकपणे शेवटच्या पाच दिवसात वोट जिहाद ही कन्सेप्ट घराघरात पोहोचवली गेली आणि ओबीसी शैव असले तरी इस्लामचा प्रश्न आला की ते वैष्णव लोकांशी युती करतात इथेही तेच झालेले आहे मुस्लिम वोटिंग एक गठ्ठा होणार हे स्पष्ट झाल्यावर हिंदूंचेही एक गठ्ठा वोटिंग झालेच पाहिजे असे ओबीसी शैव आणि इतर लोकांच्यात ठरले आणि ते अंमलात आणले गेले आधीचा जरांगे फॅक्टर होताच त्यात ह्या फॅक्टरची ही भर पडली साहजिकच ओबीसी फॅक्टर अधिक मोठ्या प्रमाणात भाजप आघाडीकडे गेला
तिसरा फॅक्टर हा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या संदर्भात आहे शेवटच्या सात-आठ दिवसात या संदर्भात ज्या अत्यंत वाईट कॉमेंट्स केल्या गेल्या आणि मुख्य म्हणजे त्या वारंवार प्रचारात आणल्या गेल्या त्यामुळे बहुजन समाज विशेषतः स्त्रिया वैतागल्या आपल्याकडे स्त्रीशक्ती हा प्रकार मोठ्या प्रमाणात मतदान करताना ऍक्टिव्ह होतो ताईंची बदनामी सहन केली गेलेली नाही देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बायकांच्यात अत्यंत सुधारक आणि उत्तम नवरा अशीच आहे त्यामुळे या संदर्भात जी वैयक्तिक टीका होत गेली ती स्वीकारली गेली नाही उलट फडणवीसांच्या विरोधात हे काहीतरी कारस्थान चालू आहे अशी समजूत बहुजन समाजाची झाली त्यामुळे स्त्री बहुजन समाज त्यांच्या मागे आला आणि ब्राह्मण समाज तर एक दिलाने फडणवीसांच्या मागे होताच भारतामध्ये अजूनही ब्राह्मणांना आदर आहे त्यांच्या लाईफस्टाईल चे अनुकरण करण्याचा आग्रह आहे ते कोणत्या दिशेला देश नेतात त्यावर अनेकदा या देशाची दिशा अवलंबून असते फडणवीस यांच्यावर काही वेळा खूप खालच्या लेव्हलची टीका केली गेली ही टीका सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये बहुजन समाज नाहीये याची जाणीवच अनेकांना नव्हती त्याचाही एक फॅक्टर ऍक्टिव्हेट झाला आणि विनोद तावडे प्रकरणात तो शिगेला पोहोचला हे सर्व मुद्दामच विरोधी पक्षाने घडवलेले आहे असा काहीतरी विचित्र मेसेज गेला आणि तो महाविकास आघाडीला प्रचंड महागात पडलेला आहे ठाकूर सुद्धा त्यामुळे संपूर्ण हरले.
सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वर्ण आणि जाती जातीचा खेळ अत्यंत उत्तम रीतीने देवेंद्र फडणवीस यांनी हाताळला त्यांनी ओबीसी जाती-जमातींना अतिशय व्यवस्थितरित्या समजावून सांगितले की तुमच्या कुठल्याच हक्कांच्यावर गदा येणार नाही यासाठी अनेक मीटिंगज लावल्या उद्धव ठाकरे यांनी असे काही केल्याचे ऐकिवात नाही आणि शरद पवार थकले होते आणि काँग्रेसकडून तर काही प्रयत्न नव्हते त्यांना बहुदा लोकसभेत आयते सर्व मिळाले त्यामुळे विधानसभेतील जे सर्व काही आहे ते पुन्हा एकदा आयते भेटेल अशी त्यांची समजूत झाली असावी. शिवाय काँग्रेसला केंद्राकडून व केंद्रीय नेत्यांच्याकडून फार काही आधार मिळालेत असे दिसले नाही काँग्रेसची केंद्र पातळीवरची कमिटी फारच कमकुवत काम करत होती त्याचाही फायदा भाजपाला झालेला दिसतो
पाचवा फॅक्टर हा एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आहे कुणाला आवडो अगर ना आवडो पण ब्राह्मणेतर लोकांच्यामध्ये ते अतिशय लोकप्रिय होत चाललेत विशेषता ज्यांना परिस्थितीविरोधात टक्कर द्यावी लागलेली आहे त्यांना आदर्श वाटणारे असे ते नेते आहेत आणि त्यांची ही प्रतिमा नंतर धर्मवीर दुसरा भाग या चित्रपटाने अतिशय उजळ केली चित्रपटाचा म्हणून काही परिणाम आहे आणि त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे या संदर्भात ना कधी उद्धव ठाकरेंनी काम केले ना कधी शरद पवार यांनी हे लोक याबाबत काहीसे झोपलेले आहेत त्याचा पुरेपूर फायदा शिंदे शिवसेनेला झालेला आहे शिवाय धनुष्यबाण मिळाल्यामुळे केवळ चिन्ह बघणाऱ्या लोकांचे झालेले मतदान या वेळेला वाढलेले आहे एकंदरच काय लोकांनी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक हिरो शोधला आणि त्यांच्या या हिरोगिरीला लोकांनी मत देऊन दाद दिली आणि धर्मवीर चित्रपटाचा अगदी योग्य वेळी रिलीज होण्याचा टाईम व्यवस्थित काम करून गेला जहाल हिंदुत्वाचे खरे प्रतिनिधी आम्हीच आहोत आणि उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व जनाबी हिंदुत्व झालेले आहे असा स्ट्रॉंग मेसेज या वेळेला गेलेला दिसतो त्यामुळे जुन्या शिवसैनिकांनी कधी नव्हे ते या विधानसभेत शिंदे यांच्याकडे मोर्चा वळवलेला दिसतो
लाडकी बहीण योजना याबद्दल अनेकांनी लिहिलेले आहे त्यामुळे मी बोलत नाही पण हा एक फार मोठा फॅक्टर होता ज्याने मुस्लिम जिहादी वोटिंग चा बटवारा केला आणि अनेक मुस्लिम स्त्रियांनी भाजप युतीकडे मते वळवली
उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले वक्तृत्व हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तुलनेत खूप सौम्य आणि मंद वाटते एखादा दिवा जळत राहावा तसे ते भाषण असते लोकांना शिवसेना म्हणजे दिवा आठवत नाही विजेचा कडकडाट आठवतो अशा प्रकारचा कडकडाट त्यांनी केला तरी तो या वेळेला मॅनेजमेंट शिकल्यासारखा वाटला अपवादात्मक वेळेला तो आर्टिफिशियल झाला त्यामुळे वारसदार कोण या प्रश्नाबाबत कळत नकळत एकनाथ शिंदे हे जास्त प्रिफर केले गेले जनतेतून आलेला पुत्र आणि राजपुत्र असा काहीसा विरोधाभास एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन अंगाने निर्माण झाला साहजिकच जनतेने जनता पुत्र निवडला
मी मागील लोकसभा निवडणुकी संदर्भातच म्हणालो होतो की दोन शिवसेना आहेत हे या लोकसभेने अंडर लाईन केलेले आहे एक नेत्यांची शिवसेना आणि दुसरी कार्यकर्त्यांची शिवसेना या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेचे नेतृत्व त्या त्या ठिकाणचा लोकल भाई करत असतो आणि हा भाई डॉन नसतो तर गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारीचा बंदोबस्त करणारा स्त्रियांची इज्जत वाचवणारा त्यांची इज्जत करणारा वेळप्रसंगी मदतीला धावून येणारा असा असतो मी स्वतः रामभाऊ फाळके यांचे काम बघितलेले आहे आणि अपवादात्मक वेळेला केलेले हे आहे ही एक फंक्शनल सिस्टीम असते जिला मी कारटेल म्हणतो बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच या सिस्टीमचा आदर करत प्रत्येकाला व्यवस्थित सांभाळले होते उद्धव ठाकरे यांना हे जमलेले नाही किंबहुना ही कारटेल सिस्टीम आपण सांभाळायला पाहिजे याविषयीची त्यांची जाणीव थोडीशी मंद झाली ती बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे धगधगती नाही असे अनेकांना वाटून गेलेले होते आहे त्याचाही एक परिणाम लोकल मते शिंदे यांच्याकडे वळवण्यामध्ये झालेला आहे त्यातच त्याने दोन नवीन वक्ते आणले गेले एक अभिनेता किरण माने आणि दुसऱ्या सुषमा अंधारे यांची भाषणे उत्तम असली तरी या भाषणांनी मतांचा माहोल तयार केला नाही एका अर्थाने हे दोघे राज ठाकरे ठरले म्हणजे उत्तम करमणूक होतीये उत्तम गर्दी जमतीये पण मते मात्र तयार होत नाहीत लोकसभेच्या वेळी यांच्या बद्दलची उत्सुकता होती ती हळूहळू विधानसभेवेळी कोसळली त्यामुळेच मते मतपेटीत पडत नाहीत वास्तविक शिवसेनेत सुरुवातीपासून असणाऱ्या लोकांच्या पैकीच योग्य असे वक्ते हेरले गेले पाहिजे होते त्यांना आणले गेले पाहिजे होते परंतु एक नवीन शिवसेना तयार करायची अशी मानसिकता कळत नकळत होती आणि त्यातून नवीन वक्ते शोधले गेले या दोन्ही नवीन वक्त्यांच्या मध्ये एक प्रकारचा कलावंत बाजाचा विरोधकांचाही आदर करण्याचा पिंड होता विशेषता किरण माने यांच्यात तर खूपच कलावंत आहे त्यातून काही विरोधाभास निर्माण झाले कलावंत म्हणून तुमची प्रतिमा त्यामुळे उंचावत असेलही पण राजकारणाला ती कधीकधी घातक ठरू शकते इथे तसे झालेले आहे त्या उलट सुषमा अंधारे यांच्यावर लिहिलेल्या लेखात मी स्पष्ट म्हटले होते की हे बुमऱ्यांग आहे आणि हे उलटू शकते तसे ते उलटलेले आहे उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंत लोकांच्यात एकही वक्ता नव्हता का असा प्रश्न नेहमीच पडला आणि जर असा एकही वक्ता नसेल तर मग इतकी वर्ष शिवसेना काय करत होती असाही प्रश्न निर्माण झालेला आहे दुसरी गोष्ट कळत नकळत जनता राज ठाकरेंना त्यांनी शिवसेनेत आणावे या बाजूने आहे दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात घेतलेली भूमिका त्यांना योग्य वाटते पण जनतेला ही भूमिका योग्य वाटत नाही हे कोणीतरी त्यांना सांगणे आवश्यक आहे हे दोन भाऊ एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे दोघांनाही जो धडा शिकवायचा तो शिकवून झालेला आहे आणि तो धडा जर शिकायचा नसेल तर मग पुढे याहून काही वेगळे पिक्चर तयार होणार नाही अर्थात येऊ घातलेल्या सरकारने मोठी चूक केली नाही तर!
राज ठाकरे यांच्याकडे आयडिओलॉजी नाही आणि मग उरतो तो व्यवहार तो व्यवहार सुद्धा सतत उलटा पुलटा होत असेल तर मग लोकांचा विश्वास राहत नाही वास्तविक त्यांच्याकडे अतिशय दमदार वक्तृत्व आहे परंतु वक्ता आहे पण त्याला भूमिका नाही हे इतक्यांदा स्पष्ट झालेलं आहे की लोक अजूनही राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यातच बाळासाहेब ठाकरे यांचा माझ्या पुतण्या संदर्भातला व्हिडिओ हा सतत व्हायरल करत त्यांना पूर्णपणे नामोहरम केले गेलेले आहे त्यांनी जे केले त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा कसलाही पाठिंबा नव्हता असेच हा व्हिडिओ सांगतो त्यामुळे ज्या गोष्टीला खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचाच पाठिंबा नाही ती गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला आम्ही का मतदान करावे हा मतदारांचा विशेषता शिवसेनेच्या मतदारांचा प्रश्न अत्यंत वाजवी आहे खरंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे स्पष्टपणे जनतेने सांगितलेले आहे अर्थात हे ऐकले कितपत जाईल याविषयी मात्र मला शंका आहे
वंचित आघाडीला खुद्द त्यांच्याच समाजात पाठिंबा नाही हे आता स्पष्ट झालेले आहे याबाबतीत मनसे आणि वंचित एकाच ट्रॅक वर चाललेले आहेत वास्तविक हे दोन्ही नेते उत्तम नेते होऊ शकतात पण जनतेची नस ओळखण्यात कुठेतरी हे कमी पडतायत मुख्य म्हणजे यांचा स्वतःचा स्थिरअजेंडा दिसत नाहीये आणि स्थिर कार्यक्रम ही दिसत नाही साहजिकच यांना आपण मत द्यायचे म्हणजे कुठल्या विचारांना मत द्यायचे हा जनतेपुढेच प्रश्न आहे त्यातही एक गोची अशी आहे की बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आंबेडकरवाद हा पूर्णपणे नवबौद्ध लोकांच्यासाठीच आहे अशी प्रतिमा तयार झालेली आहे त्यातच नव बौद्ध लोक इतिहासाविषयी लिखाण करताना हिंदूंच्यावर प्रचंड आक्रमक टीका करत असतात प्रत्येक गोष्ट कशी बौद्ध धर्माने सुरू केली असे सांगतात आता नवबौद्धांना भारतीय संस्कृतीचे नेतृत्व देण्यामध्ये इतर लोकांना इंटरेस्ट आहे की नाही हा प्रश्नच नव बौद्ध स्वतःला विचारत नाहीयेत ते असे गृहीत धरतात की आम्ही सत्य मांडले की आपोआपच गोष्टी घडत जातील पण प्रत्यक्षामध्ये असे होत नाही एकीकडे गौतम बुद्धाला मूर्तीपूजा मान्य नव्हती हे सत्य आणि दुसरीकडे प्रत्येक हिंदूं-मूर्ती विशेषता शैव मूर्ती कशी बौद्ध धर्मातून आलेली आहे अशी आलेली मांडणी या मधला विरोधाभास उघड आहे बौद्ध धर्माचे सुरुवातीच्या काळात स्तूप होते मुर्त्या नव्हत्या कारण खुद्द गौतम बुद्धाचा मूर्तीपूजेला विरोध होता नंतर नंतर तर शिवलिंग सुद्धा गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये शोधले गेले अशी मांडणी करण्यात येऊ लागली हे काहीसे चमत्कारिक होते कारण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये शिवलिंगे सापडलेली आहेत आणि आता त्याचेही श्रेय बौद्ध धर्माला द्यायचे का असा प्रश्न शैव लोकांच्यात निर्माण झाला टोकाचा धर्मवाद या देशाला कधीच मान्य होत नाही नव बौद्ध सुद्धा याला अपवाद असणार नाहीत हे त्यांना कोणीतरी सांगणे आवश्यक आहे आपल्याकडे पुरोगामी लोक अत्यंत सोयीस्कर रित्या मौन पाळतात आंबेडकर वाद हा फक्त एका प्रवर्गापुरता मर्यादित होत चालला आहे मी यासंदर्भामध्ये एक पोस्ट टाकली होती तिचा अर्थ असा होता की फुले आंबेडकर वादामध्ये प्रथम फुले आहेत आणि किमान 50% फुले आहेत याचा विसर आंबेडकर वाद्यांना पडत चाललेला दिसतो त्यांना जर ओबीसीचे मन जिंकायचे असेल तर जरा फुले वाद त्यांनी पुन्हा एकदा नीट वाचणे आवश्यक आहे मी अनेकदा म्हटले आहे की सावित्रीबाई फुले यांच्या कवितेत मुख्य देव म्हणून शंकर येत असतो पण त्याचा काही परिणाम आंबेडकरवादी लोकांच्यावर होतो असे दिसत नाही त्यामुळेच लोकांनी आंबेडकरवाद म्हणजे नव बौद्ध वाद असे नवे समीकरण तयार केलेले आहे आणि नव बौद्ध वाद स्वीकारलेला नाही याला उत्तर म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मध्यंतरी विठ्ठलाची पूजा केली होती त्यामागे कळत नकळत मराठीतली वारकरी परंपरा आपलीशी करावी कारण ती ओबीसींच्या प्रबळ आहे आणि त्यामुळे ओबीसी आपल्याकडे येतील असा त्यांचा अंदाज होता हा भोळसट अंदाज होता कारण वारकरी कट्टर आहेत जे लोक विठ्ठल मंदिरात प्रवेश सुद्धा द्यायला तयार नव्हते ते लोक अचानक आंबेडकर यांना स्वीकारतील हा खोटा आशावाद आहे त्यामुळेच वंचित अपयशी होत गेली आणि आता कळस गाठला आहे एकीकडे आंबेडकर वादाचा प्रभाव कमी होत चाललेला तर आता अशी स्थिती दिसतीये की मराठी लोकांनी मराठी वाद ही स्वीकारलेला नाही हे खरंतर मराठी माणसाच्या आरोग्याला हानिकारक आहे पण मराठी माणसाने स्वतः जर का ठरवले असेल की सांस्कृतिक आत्महत्या करायची तर आपण त्या आत्महत्येला थांबवू शकत नाही शेवटी सांस्कृतिक आत्महत्या ही कधीच एका व्यक्तीच्या विचारधारेशी निगडित नसते ती त्या संस्कृतीच्या अनकॉन्सस माईंड मधून जन्मत असते वाढत असते मराठी माणसाच्या संदर्भात आता सांस्कृतिक आत्महत्या सेटल झालेली आहे हे स्पष्ट दिसते आहे त्यामुळे मराठीचा अभिमान धरण्यात काय अर्थ आहे हा प्रश्नच आहे मुख्य म्हणजे जे मराठीचा अभिमान धरायला सांगतात ते स्वतःच आपली मुले इंग्लिश माध्यमात टाकतात त्यामुळे हा अभिमान येणार कुठून उलट फक्त दुटप्पीपणा दिसतो याचा दुसरा उलटा फायदा मात्र पुन्हा भाजप युतीला झालेला आहे कारण अमराठी वोटिंग हे एक मताने भाजप युतीकडे सरकलेले दिसते म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झाले असे की मराठी मते तर मिळालीच नाहीत पण हक्काची जी मराठी मते असायची ती या वेळेला गेली कारण कळत नकळत हा संघर्ष मराठी व अमराठी आहे मराठी गुजराती आहे असे भासवले गेले मराठी लोकांना ते पटले नाही पण अमराठी लोकांना मात्र ते चांगलेच पटले आणि त्यांनी आपली सगळी मते एक दिलाने भाजप युतीच्या दिशेने सरकवली मी एका लेखात म्हटले होते की एक दिवस असा येईल की मराठी मुख्यमंत्री होईल ते दिवस दूर नाहीत हे या इलेक्शनने स्पष्टपणे सुचवलेले आहे मराठी लोकांचा भाषिक कणा कधीच ताठ नव्हता खुद्द शिवसेना नेत्यांच्या घराण्यातील अनेक मुले इंग्लिश माध्यमात शिकत असतात त्यामुळे तुम्ही कितीही काही बोलला तरी तुमच्या कृती वेगळे बोलतात जो भाषिक कणा तुमच्या सांस्कृतिक आणि राजकीय नेत्यांच्या जवळच नाही तो भाषिक कणा बाहेरून आलेल्या लोकांच्यात असला पाहिजे असा आग्रह तुम्ही धरु शकत नाही महाराष्ट्रातील उच्चभ्रू वर्ग हा वैष्णव वेदांती वारकरी झाल्यापासून कायमच प्रथम संस्कृत धार्जिणा मग फारसी धार्जिणा आणि आता इंग्लिश धार्जिणा झालेला आहे त्यामुळे मराठी लोकांची भाषिक चळवळ ही कधीच नेतृत्वशाली बनली नाही याचा खरा फटका राज ठाकरे यांना बसतो आहे हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने स्वतःकडे नेलेला आहे आणि मराठीचा मुद्दा राज ठाकरे यांना मदत करत नाही साहजिकच आज जी मनसेची गोची झालेली आहे ती फक्त राज ठाकरे यांची गोची नाही तर ती मराठीचीही सांस्कृतिक गोचीही आहे त्यामुळे भाषणे ऐकायला गर्दी करायची पण मते मात्र द्यायची नाहीत हा सांस्कृतिक दुटप्पीपणा खुद्द मराठी लोकांच्यातच आहे मुख्य म्हणजे राज ठाकरे इंग्रजीच्या विरोधी नाहीत मग मराठी असणे म्हणजे नेमके काय? हिंदी विरोधी असणे? तर स्वतः हिंदी फिल्म बघणारे हिंदी फिल्म यांचा इतिहास माहीत असणारे हिंदी फिल्म मधल्या हिरो हिरोईनबद्दल प्रचंड आदरपूर्वक बोलणारे त्यांना आदराने वागवणारे हिंदीच्या विरोधात आहेत हे कसे काय स्वीकारता येईल याबाबत दक्षिणेमध्ये जो कडक हिंदी विरोध आहे तशा प्रकारचा विरोध राज ठाकरे करत नाहीत त्यामुळे कुठेतरी सगळा प्रकार पातळ होत गेलेला दिसतो
आंबेडकर हा कायमच भारतीय संस्कृतीत नाईलाज झालेला आहे त्यांना टाळता पण येत नाही आणि फेटाळता पण येत नाही आणि वगळता तर अजिबात येत नाही त्यामुळे त्यांचे काय करायचे याचा भाजपने शोधलेला समरसता उपाय म्हणजे रामदास आठवले होते हा उपाय या निवडणुकीत तरी यशस्वी झालेला दिसतो दलित मतांच्या पैकी नक्की काही मते या युतीकडे सरकलेली आहेत कुणाला आवडो अगर न आवडो परंतु दलित समाजामध्येच आपण आता मुख्य समाजाशी समरस झालो पाहिजे हा विचार प्रवाह अत्यंत मजबूतपणे वाहतो आहे साहजिकच मुख्य प्रवाहातल्या पक्षांना मतदान करणे हे आता दलित लोकांच्यात अनेक आदिवासी लोकांच्यात कॉमन होत जाणार हे आता स्पष्ट झालेले आहे रामदास आठवले आणि नामदेव ढसाळ यांना हे फार पूर्वीच कळाले होते बाकीच्यांनाही हळूहळू कळत जाईलच.
यातच भरीस भर म्हणजे संविधानासंदर्भामध्ये आम्ही कसलाही संविधानात बदल करणार नाही आहोत हा विरोधी पक्षाने केलेला अपप्रचार होता त्याला तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बळी पडला पण आता विधानसभेच्या निवडणुकीत बळी पडू नका आम्ही संविधान विरोधी नाही आहोत हा फडणवीस शिंदे यांचा मेसेज अनेक मतदारसंघात दलित वस्त्यांच्यात व्यवस्थित पोहोचवला गेला होता त्याची दखल मीडियाने घेतली नसेल पण लोक मात्र व्यवस्थित घेत होते जो न देखे मिडिया वो देखे लोगोंकी अखिया असे काहीतरी यासंदर्भात झालेले आहे थोडक्यात काय भाजप मनुस्मृती आणणार ही अफवा आहे याची खात्री पटवण्यात भाजप या निवडणुकीमध्ये कमालीचा यशस्वी झाला आणि त्याचा प्रचंड फायदा भाजपला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झालेला आहे
या निवडणुकीत कधी नव्हे ते तिन्ही सहकारी म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एक दिलाने काम करत होते मुख्य म्हणजे लाडकी बहीण योजना ही यशस्वी करण्यामध्ये आणि तिचा यशस्वी प्रचार करण्यामध्ये या तिघांनी जे संघटन आणि इंटिग्रिटी दाखवली तिला तोड नाही या तिघांनी आपापसात बसवलेला ताळमेळ हा जर का विरोधी पक्षांच्यात असता तर कदाचित इतकी वाताहात झाली नसती पण दुर्दैवाने ताळमेळाचा पत्ताच नव्हता किंबहुना लोकसभेतले यश गृहीत धरूनच हे लोक वाटचाल करत होते आणि लोकांनी विधानसभा वेगळी असते हे यशस्वीपणाने दाखवून दिलेले आहे
म्हणूनच मी या तिघांच्या नेतृत्वाला प्रथम दाद दिली होती नेते आणि कार्यकर्ते इतक्या एक दिलाने काम करताना फार क्वचित एखाद्या निवडणुकीमध्ये दिसले होते मी जर चुकत नसेल तर इंदिरा गांधी यांना हरवण्यासाठी अशा प्रकारे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले होते आणि त्यामुळे इंदिरा गांधींच्या सारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी हरला पुढे त्यांच्यात बेदिली झाली आणि पुन्हा इंदिरा गांधी निवडून आल्या त्यानंतर हे प्रथमच घडल्याने विरोधी पक्षांना विरोधी नेतेपद सुद्धा मिळणार नाही इतकी वाताहात करण्याइतपत यश मिळवणे हे ही प्रथमच घडलेले दिसते
पुन्हा एकदा सर्व विजयी लोकांचे अभिनंदन शेवटी ते लोकांनी नेमलेले प्रतिनिधी आहेत आणि त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे
श्रीधर तिळवे नाईक
गद्दार गद्दार का वाटले नाहीत श्रीधर तिळवे नाईक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांना इतका दारूण का पराभव पत्करावा लागला याचे काहीसे विश्लेषण आपण मागच्या विभागात केले. या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेला सर्वात मोठा प्रश्न हा नैतिकतेचा आहे आणि ही नैतिकता गद्दारी या संकल्पनेशी निगडित आहे पुरोगामी लोकांचे म्हणणे असे होते की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत त्यामुळे या निवडणुकीत त्यांना धडा शिकवला पाहिजे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये असा धडा शिकवणे घडलेले नाही आणि निवडणुकीतले अनेक मराठी लोकांचे दुःख हेच असेल विशेषत: ज्यांना हे लोक गद्दार वाटत होते लोकांनी गद्दारांना का माफी दिली किंवा हे असे का व्हावे हा खरा प्रश्न आहे जो आपण विचारला पाहिजे
यासाठी पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाने स्वीकारलेल्या वैष्णव मानसिकतेकडे आपणाला वळावे लागेल साधारणपणे 11 व्या शतकामध्ये वैष्णवीजम महाराष्ट्रामध्ये प्रबळ होत गेला आणि तिथूनच वैष्णव मानसिकता झिरपायला सुरुवात झाली या मानसिकतेत महाभारत आणि रामायण यांचा प्रचंड वाटा आहे
रामायण स्पष्टपणे बिभीषणाला एक महापुरुष म्हणून उभे करते त्याला चिरंजीव बनवते वास्तविक त्याने आपल्या शत्रूला मदत केलेली आहे आणि ज्या राज्याचा तो नागरिक आहे त्या राज्याचे रक्षण करण्याची त्याची कमिटमेंट आहे पण ही कमिटमेंट तो तोडतो आणि रामाकडे येतो रामाला सर्व गोष्टी सांगतो रावणाच्या पराभवात बिभीषणाने आपल्याच भावाला दिलेल्या दग्याचा फार मोठा वाटा आहे प्रत्यक्षामध्ये हे धर्मयुद्ध आहे असे स्वरूप दिले गेले आणि त्यामुळे त्याचे उदात्तीकरण केले गेले त्यामुळे कुठल्याही लढाईला एकदा का धार्मिक धर्मयुद्ध आहे असे म्हटले की दगाबाजी करणाऱ्या सर्व लोकांना आपल्याकडे लगेच उदात्त केले जाते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे असे उदात्तीकरण भाजपने व्यवस्थित केले आणि जनतेने हे उदातीकरण स्वीकारले यातच धर्मवीर या फिल्ममुळे त्याला एक वेगळी झालंर आणि ताकद पुरवली
महाभारत तर सरळ सरळ स्वतःच्या भावांच्या विरोधात स्वतःच्या गुरुच्या विरोधात लढणे नैतिक बनवून टाकते पुढे यादवांच्या यादवीत तर ते संपूर्ण गणाविरोधातच उभे ठाकते पुन्हा प्रश्न धार्मिक असतो वास्तविकतेतील कोणाचा धर्म खरा हे लेखक ठरवतो प्रत्यक्षामध्ये दोन्ही बाजू लंगड्या आहेत पण लिहिणारा लेखक पांडवांच्या बाजूने म्हणून पांडवांच्या बाजूने धर्म आहे त्यामुळे प्रश्न मीडिया कोणाच्या हातात आहे हाच असतो आणि मीडिया हा फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने होता साहजिकच हे धर्म युद्ध असल्याने या लोकांनी जे केले ती गद्दारी नसून ती एक नैतिक कृती आहे असा मेसेज देण्यात हिंदुत्ववाद यशस्वी झाला हे यश वैष्णव वारकरी मानसिकतेला गृहीत धरत होते आणि हे खरोखरच तसे झाले एक अर्थाने वैष्णव धर्माचा हा फार मोठा विजय आहे ज्याला शैव-धर्माने ही लढत वोट जिहादविरुद्ध आहे असे गृहीत धरून मदत केलेली आहे
दुसऱ्या कारणाचा उल्लेख संजय राऊत यांनी केलेला आहे हे कारण आहे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेला निर्णय! न्यायालयाने जे काही घडले ते सर्व कायदेशीर करून टाकले त्यामुळे लोकांना ते नैतिक वाटले जेव्हा न्याय संस्था एखाद्या व्यक्तीला गद्दार म्हणत नाही तर कायदेशीर रित्या योग्य ठरवते तेव्हा जनता सुद्धा त्याचा स्वीकार करते त्यामुळे साहजिकच जे झाले ते गद्दारी नसून धर्मासाठी, न्याय बाजू साठी झालेले बंड आहे आणि न्याय संस्था सुद्धा असेच मानते असा मेसेज गेलेला आहे एका अर्थाने लोकांनी न्यायालयाचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि भारताच्या घटनेनुसार न्यायालयाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो. लोकांनी आपला नागरिकता धर्म पाळला विरोधकांची सर्वात मोठी ताकद हा गद्दारीचा मुद्दा होता आणि हा गद्दारीचा मुद्दाच मोडून पडल्याने लढत अधिक एकतर्फी झाली
श्रीधर तिळवे नाईक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , निवडणूक आणि नैतिकता श्रीधर तिळवे नाईक
या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काही नैतिक प्रश्न अनेकांनी विचारलेले आहेत त्यातील एक अर्थातच अविनाश दुधे हे आहेत त्यांची मांडणी मी उदाहरण म्हणून इथे घेतो आहे
ते म्हणतात,"विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बजावलेल्या भूमिकेची जोरात चर्चा आहे.
संघाचा या निवडणुकीत रोल होता का? हो...संघाने महायुतीला विजयी करण्याकरिता कंबर कसली होती, यात दुमतच नाही. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमयेपासून प्रत्येक विभागाचे, जिल्ह्याचे संघचालक, विभाग प्रचारक, प्रांत प्रचारकापासून तालुका स्तरावरील कार्यकर्ते भाजप, शिंदेंसेना व अजित पवार गटाला विजयी करण्यासाठी भिडले होते. मोदी- शहांच्या सभा किती मर्यादित ठेवायच्या, हे सुद्धा लिमये आणि त्यांची टीम ठरवत होती "
ही सुरुवात त्यांनी चांगली केलेली आहे या निवडणुकीत भाजप युतीला मिळालेल्या यशाची मीमांसा करताना लाडकी बहीण विरुद्ध संघाचा प्रयत्न असे द्वंद्व निर्माण झालेले आहे ते इथे स्पष्टपणे दिसते
पुढे ते विचारतात,"संघ गेल्या १०० वर्षापासून उत्तम माणूस आणि चारित्र्य निर्मितीच्या गोष्टी करतो आहे. पण विटंबना बघा. या निवडणुकीत संघाला भाजपसह, शिंदे सेना व अजित पवारांच्या भ्रष्ट, बदनाम, चारित्र्यहीन , सर्वांनी ओवाळून टाकलेल्या नमुनेदार नेत्यांच्या मागे आपली ताकत उभी करावी लागली. त्यांच्यापैकी अनेकांनी संघाला मनसोक्त शिव्या घातल्या आहेत. अशांनाही विजयी करण्यासाठी संघ झटला. त्यासाठी हिंदुत्त्वाची दुहाई देण्यात आली.====== छगन भुजबळ, राणेंचे दोन्ही पुत्र, तानाजी सावंत, हसन मुश्रीफ, संतोष बांगर, संजय गायकवाड, संजय राठोड, रवी राणा, मदन येरावार अशा अनेक नमुनेदार महाभागांसाठी संघ कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केला. ६०० पेक्षा जास्त मिटिंग घेतल्या, असे सांगितले जाते. वेगवेगळ्या माध्यमातून संघाचे ग्लोरिफिकेशन करण्यासाठी या अशा कथा कौतुकाने सांगितल्या जात आहेत.=≠ हिंदुत्त्वाच्या नावावर ही अशी माणसं निवडून आणल्याने महाराष्ट्र व देश आता मुसलमानांपासून अगदी सुरक्षित झाला, असे संघ मानतो काय?
की भारतीय जनता पक्षाप्रमाणेच आपल्या वॉशिंग मशीनमधून यासारख्या नेत्यांना काढलेत की ही नेतेमंडळी एकदम पवित्र, स्वच्छ होतील, असे संघाला वाटते?"
ही मांडणी झाल्यानंतर ते बडनेरा मतदार संघाचे उदाहरण देतात व तिथला तुषार भारतीय हा एकनिष्ठ स्वयंसेवक कसा पराभूत झाला आणि त्याला स्वयंसेवक संघाने कशी मदत केली नाही ते सांगतात
पुढे ते म्हणतात,"हे असे करण्यामागे लॉजिक एकच सांगितले गेले-मुसलमानांचा धोका मोठा आहे. हिंदुत्व धोक्यात आहे. त्यामुळे आपलं सरकार येणे आवश्यक आहे. शरद पवारांसारख्या जातीयवादी नेत्याला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी केल्या तरी त्या क्षम्य आहेत.संघ कितीही आदर्श, मूल्य, तत्वांचे गोडवे गात असला तरी व्यवहारात संघ हा असाच वागतो हा इतिहास आहे. या वागण्याचे समर्थन करतांना इतिहासातील अनेक चाणक्यांची उदाहरणं द्यायला ते तत्पर असतातच. ===संघाचे हे नैतिक पतन अनेक वर्षापासून सुरू आहे. संघाच्या १०० व्या वर्षात या पतनाचा वेग अचंबित करणारा आहे. काँग्रेसच्या विषयात अनेक वर्षांपूर्वी हे घडलं होतं, मात्र आम्ही इतरांपेक्षा वेगळे असा टेंभा मिरवणारे त्याच मार्गावर आहे.=={काळ कोणाला माफ करत नाही. आज काँग्रेस जात्यात आहे. संघ-भाजप सुपात आहे, एवढाच तो फरक. आणखी काही वर्षाने गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, असे म्हणण्याची पाळी संघावर आली तर नवल वाटायला नको!"
(आमचे परममित्र अद्वैत मेहता यांच्या वॉलवरून मी हे घेतलेले आहे प्रत्यक्षात त्यांनी काय लिहिले हे मला माहित नाही पण अद्वैतवर माझा प्रचंड विश्वास आहे तो काहीही खोटे टाकत नाही हा माझा अनुभव आहे)
मी हे सर्व मुद्दाम घेतोय कारण हे प्रश्न संघाच्या अंतर्गत जे अत्यंत निष्ठेचे आणि तळमळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात सुद्धा घोंगावत आहेत काहींनी तर बंडही केलेले आहे पण या बंडाला कसलीही सहानुभूती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवलेली नाही कारण संघाच्या शिस्तीत ते बसत नाही इथे संघटना हीच महत्त्वाची असते हा संघाचा नियम आहे मग भारतीय यांनी काय करायला पाहिजे होते त्यांनी संघाच्या प्लॅटफॉर्मवरून संघात हे बोलायला हवे होते माझ्या स्वतःच्या माहितीनुसार ते तसे बोललेले होते परंतु ते मनावर घेण्याच्या मनस्थितीत राष्ट्रीय परिस्थिती नव्हती अशावेळी मग प्रयत्न सोडून देऊन पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करावे लागते ही संघाची नीती आहे
अविनाश दुधे यांच्या मांडणीमध्ये इतिहासाच्या आकलनाचा अभावसुद्धा दिसतो ते इतिहासात गेले असते तर त्यांना आणखी काही गोष्टी कळाल्या असत्या मग पण जे त्यांनी केले नाही ते आपण केले पाहिजे म्हणजे थोड्या इतिहासात गेले पाहिजे
माझ्या मते मुळात संघ हा नैतिकतेचा पुतळा आहे हा जो गैरसमज आहे तो त्यांनी मनातून काढला पाहिजे संघ हा नैतिकता मानतो परंतु साधन सुचिता मानत नाही याबाबत त्याची स्थिती ही मार्क्सवादासारखी आहे म्हणजे विचार प्रणालीतली नैतिकता मान्य परंतु व्यवहार मात्र कसाही केला तरी चालतो अशी ही धारणा आहे त्यासाठी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भ्रष्टाचारी माणूस सुद्धा आपल्यात सामावून घेता येतो आता हे तत्त्वज्ञान आले कुठून तर ते संघाचा आदर्श असलेल्या भगवान राम आणि भगवान कृष्णांच्या दृष्टिकोनातून आलेले आहे विशेषता गीतेचा विलक्षण प्रभाव राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर आहे कारण भगवान श्रीकृष्ण हे त्यांचे आदर्श आहेत चाणक्याचा शोध हा अलीकडच्या काळातला शोध आहे तो काही वैष्णववादाचा भाग नव्हता कारण मुळात वैष्णव लोकांना आर्य चाणक्य माहीतच नव्हते त्यामुळे वैष्णववादाची नीतिमत्ता तपासताना अर्थशास्त्र हे आर्य चाणक्याचे खरे तर कौटील्याचे पुस्तक उपयोगाचे नाही हे अनेकांच्या लक्षात येत नाही चाणक्य नावाचा कोणी होता हे सुद्धा वैष्णववांदाला माहित नव्हते त्यामुळे त्याचं तत्व ज्ञान ही नंतरची झालेली वैष्णव वादामधली डेव्हलपमेंट आहे जी राष्ट्रीय सेवक संघाने स्वीकारली कारण ब्राह्मण धर्माला आपला नवीन व्यवहार हा विसाव्या शतकात कसा चालवावा या संदर्भात जे मनुस्मृतीतले मार्गदर्शन होते ते अपुरे पडत होते आणि नेमके त्याच वेळेला हे पुस्तक सापडले आणि त्याने व्यवहारवादाची नवीन वाट संपूर्ण वैष्णववादाला आणि अर्थातच पुढे हिंदू वादाला दाखवली आणि हिंदुत्ववादाला दाखवली मुळात वैष्णववादाचा स्वभावच ब्राह्मण धर्मातून आलेला आहे आणि तिथे साम दाम दाम दंड भेद ह्याच तत्त्वज्ञानाचा वापर होतो त्यामुळे ही वाट सुकर झाली आणि हे धोरण ऑफिशियल झाले साहजिकच भेद हे संघाचे हत्यार आहे आणि तेच वापरले गेले आणि पक्ष फोडले गेले ज्यांच्यात भेद पडले त्यांना खरं तर याची जाणीव असायला हवी परंतु समोरच्या पार्ट्यांच्यामध्ये सुद्धा याबाबत कसलीही नैतिक जाणीव नव्हती राजाने झोपलेले असू नये आपले गुप्तहेर सर्वत्र ठेवावेत असे चाणक्य सांगतो अशा प्रकारचे गुप्तहेर उद्धव ठाकरेंनी किंवा शरद पवारांनी ठेवले होते असे वाटत नाही कदाचित शरद पवार यांनी ठेवले असतील परंतु उद्धव ठाकरे या बाबतीत पूर्णपणे गाफील राहिले अजित पवारांच्याकडे नैतिक जाणीव आहे असे जर कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत किंबहुना राजकारणामध्ये नैतिकतेला जागा नाही असे मानणारे काँग्रेसमध्ये अनेक जण आहेत त्यापैकी एक अजित पवार आहेत विचार प्रणाली एक आणि व्यवहार एक हा दुटप्पीपणा मुळात प्रथम काँग्रेसमध्येच होता कारण काँग्रेस सुद्धा शेवटी वैष्णववादी आहे तिचे सारे जिल्हा पातळीवरचे सरंजामदार हे वैष्णववादी आहेत ते आयडियालॉजी बघत नाहीत ते व्यवहारच बघत आलेले आहेत त्यामुळे काँग्रेस कितीही तोंडाने स्वतःला सेक्युलर म्हणो अंतिमत: जेव्हा व्यवहार येतो तेव्हा ती वैष्णववादीच बनते सेक्युलर वाद हा काँग्रेसने केवळ व्यवहाराला उपयुक्त आहे म्हणून स्वीकारलेला आहे उद्या जर का हा सेक्युलरिझम त्यांना अडचणीचा वाटायला लागला तर ते आज ना उद्या त्याचा त्याग करतील किंबहुना बाबरी मशिद प्रकरणांमध्ये तो केला गेला होता त्यामुळेच बाबरी मस्जिद पाडण्याच्या प्रकरणांमध्ये नरसिंहराव आपोआपच मूग गिळून गप्प बसले होते कारण त्यांची व काँग्रेसची अंतर्गत सहमती या सर्व प्रकरणाला होती इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जे दिल्ली मध्ये हत्याकांड झाले त्या वेळेलाही अशीच सोयीस्कर वैष्णववादी भूमिका घेण्यात आलेली होती महाभारत आणि रामायण हेच संघाचे आणि काँग्रेसचेही आदर्श आहेत फक्त काँग्रेस युधिष्ठराप्रमाणे आणि विदुराप्रमाणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप राम आणि कृष्णांच्या प्रमाणे चालत असतात एवढाच काय तो फरक आहे रावणाला पराभूत करण्यासाठी ज्याप्रमाणे बिभीषण फोडला गेला त्याप्रमाणे आम्ही शिंदे आणि अजित पवार यांना आमच्या गटात आणले आता ते बिभीषणाप्रमाणे सज्जन होतील असा दावा आहे तो कितपत खरा उतरेल याविषयी मला शंका आहे कारण ज्यांना ते घेऊन आलेले आहेत ते बिभीषणाप्रमाणे मूळचे शैव नाहीत ते वैष्णव आहेत त्यामुळे त्यांची चाल त्याप्रमाणेच चालू राहणार आणि ते कायमच व्यवहार बघत राहणार आता या व्यवहारात सध्या बीजेपी फिट आहे म्हणून ते बीजेपीला सहकार्य देतात उद्या जर का बीजेपी अडथळा वाटेल तर हेच लोक बीजेपीला सरळ ओलांडून निघून जातील थोडक्यात काय इथे सारख्याला वारके भेटलेले आहेत
राष्ट्रीय सेवक संघाचा हा साम दाम दंड भेद प्रणित व्यवहार हा काही आजचा नाहीये पूर्वी सुद्धा मुस्लिम लीग बरोबर युती करताना संघाला काहीही वाटलेले नाही संघाचा जो पक्ष होता त्या हिंदुत्ववादी पक्षाला सुद्धा काही वाटलेले नाही त्यावेळीही संघ व्यवहारांमध्ये चाणक्य नीति आणि श्रीकृष्ण नीतीच वापरत होता आणि आत्ता सुद्धा तो तेच करत आहे त्यामुळे आता काहीतरी नवीन घडते आहे हाच मुळात गैरसमज आहे संघ याच दिशेने जाणार होता आणि याच दिशेने पुढेही जात राहील कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मनापासून साम-दाम-दंड-भेद यावर विश्वास आहे लाडकी बहीण योजना ही सुद्धा दाम या तत्वाची अंमलबजावणी आहे साम देऊन प्रथम शत्रूला कंट्रोलमध्ये करा म्हणजे गोड बोलून शत्रू कंट्रोल मध्ये करा तरीही तो कंट्रोल मध्ये राहत नसेल तर शत्रू फोडता आला तर शत्रू फोडा पराभूत करा किंवा त्याला शांत ठेवा किंवा साम काम करत नसेल तर दाम देऊन शत्रू फोडता आला तर तो दाम देऊन फोडा आणि जर या साम-दाम यांच्यामुळे जर का तो फुटत नसेल शरण येत नसेल तर त्याच्यात दंड भीती निर्माण करा जी अजित पवार यांच्या उदाहरणांमध्ये केली गेली आणि शेवटी दंडाने काम होत नसेल तर मग भेद पाडा जे उद्धव ठाकरे शिवसेना बाबत केले गेले थेट उद्धव ठाकरे यांना अटक करता येणे शक्य नाही म्हणून शिवसेनेतल्या काही लोकांना अटक करण्यात आली आणि दंड नीतीची भीती दाखवण्यात आली पण उद्धव ठाकरे नमले नाहीत तेव्हा मग फूट पाडली गेली संघाचे सगळे राजकारण याच संदर्भात होते आणि गेल्या दहा वर्षांमध्ये जे काही झालेले आहे ते या साम-दाम-दंड-भेद या नीतीनुसारच झालेले आहे ज्या लोकांना असे वाटत होते की संघ म्हणजे खूप नैतिक असा काहीतरी आहे त्यांना संघ म्हणजे काय आहे हे कळलेले नाही आता हे करताना मग चाणक्याचे जे उद्दिष्ट आहे की राज्य अतिशय बलवान करायचे आणि असे राज्य उभे करायचे जे वर्ण जातीभेद पॉलिसी म्हणून पाळेल हे तत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वीकारणार की नाही एवढाच प्रश्न शेवटी उरतो अर्थशास्त्रामध्ये ब्राह्मण टॉप वरच आहे आणि क्षत्रियाने नेहमी ब्राह्मण सल्लागारांचे ऐकावे असाच तिथला युक्तिवाद आहे संघ ब्राह्मणाचे काम करतो आणि त्यांनी सत्तेवर आणलेले शासक आणि भाजप चाणक्य नीतित सांगितल्याप्रमाणे क्षत्रियांचे काम करत असतात फक्त फरक काही पडला असला तर तो एवढाच आहे की आता एखादी व्यक्ती जन्मदत्त क्षत्रिय नसली तरी चालेल असा एक मनमोकळेपणा त्यांनी आणलेला आहे आणि तो त्यांनी पूर्वीही आणलेला होता जेव्हा क्षत्रिय नष्ट झाले असे त्यांना वाटले तेंव्हा गुप्त हे वैश्य असून देखील त्यांना पाठिंबा दिला गेला आणि जेव्हा तरीही विकसित साध्य होईना तेव्हा हे वैश्य साम्राज्य खिळ खिळे करण्यात आले मात्र सुरुवातीला ते वैश्य असून सुद्धा त्यांनी त्याला पाठिंबा दिलेला होता याचे कारण हेच आहे पुढेही अनेक त्यांच्या दृष्टीने शूद्र असलेलें राजे त्यांनी राज्याभिषेक करून क्षत्रिय करून टाकले त्याचे कारणही हे नवव्या शतकानंतरचे बदललेले धोरण आहे किंबहुना ही लवचिकता आणण्यासाठीच वैष्णव धर्माचा गजर करण्यात आला
थोडक्यात काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चाणक्य आणि वैष्णव परंपरेमध्ये ज्या गोष्टी बसतात त्याच गोष्टी करत आहे काहीही वेगळ्या गोष्टी करत नाहीये अगदी शिवाजी महाराजांचे चरित्र उभे करताना सुद्धा संघ वारंवार त्यांच्या डिप्लोमसीची चर्चा करत असतो याचे कारण सुद्धा त्यांच्या साम-दाम दंड भेद या नीतीला शिवाजी महाराज कसे अनुकूल होते हेच ते पटवत असतात अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे हा आदर्श कायम असतो कारण त्यामध्ये दगा देणाऱ्या व्यक्तीचा कोथळा दगा देऊनच बाहेर काढला गेलेला आहे पण यातली एक नीतिमत्ता कोणी सांगत नाही ती म्हणजे शिवाजी महाराजांनी हे सर्व काही संरक्षणासाठी केलेले आहे आक्रमणासाठी नाही इस्लामच्या ठेवणीनुसार अफजलखान कसा वागेल याची शिवाजी महाराजांना व्यवस्थित जाण होती आणि याबाबतीतले शैवधर्माचे धोरण स्पष्ट आहे ते म्हणजे जर का समोरचा दगाबाज असेल तर त्या दगाबाजी पासून स्वतःचे संरक्षण करणे ते महाराजांनी केलेले आहे महाराजांनी कुठेही अनैतिक कृत्य केलेले नाही त्यांचे वागणे शैव नीतिमत्तेला धरून आहे
प्रश्न असा आहे की जे शिंदे किंवा अजित पवार आणि त्यांचे सहकारी आत आलेले आहेत ते सुद्धा व्यवहार बघणारे लोक आहेत प्रश्न असा आहे की त्यांच्या व्यवहाराचे आकलन कसे करायचे आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे करताना नीतिमत्ता बाजूला ठेवायची की नाही हा खरा प्रश्न असतो आणि यामध्ये वैष्णववाद सांगतो की अशा लोकांशी वागताना नीतिमत्ता बाजूला ठेवली तरी चालते म्हणजे जर का द्रोणाचार्य गुरु असतील आणि जर ते भारी पडत असतील तर अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून प्रत्यक्ष अश्वधामा नावाचा पुत्रच मारायला गेलाय अशी हत्तीबाज अफवा उठवून त्यांना मारले तरी चालते हे वैष्णववादात बसणारे गणित आहे आणि हे गणित द्रोणाचार्यांचा सर्वात परमप्रिय शिष्य अर्जुन आरामात स्वीकारतो कारण तो वैष्णव आहे किंवा जर एखादा कर्णासारखा सत्पुरुष पण अद्वितीय योद्धा असेल तर त्याला निशस्त्र मारले तरी चालते ते सर्व काही वैष्णव नितिमत्तेच्या तत्त्वात बसते कारण वैष्णव धर्माच्या प्रस्थापितेसाठी ते आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंवा दुर्योधनाच्या अंगावर अधर्माने वार करून त्याला संपवले तरी चालते स्वतःच्या धर्मासाठी अधर्म वैष्णववादाला मान्य आहे वालीचा वध करताना नेमके अशाच प्रकारचे तर्कशास्त्र राम वापरत असतो आणि हीच नीतिमत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाळतो अजित पवारांच्या केसेस अतिशय वेळ साधून पुढे काढल्या जातील असा माझा अंदाज आहे जेव्हा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे असे संघाला वाटेल
त्यामुळे संघ काही वेगळा वागतो आहे असे नाही ज्या वैष्णव नीतिमत्तेच्या संदर्भ चौकटीत संघ उभा राहतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट राष्ट्र आहे हे सर्व काही राष्ट्रासाठी चाललेले असते असे संघाचे म्हणणे आहे प्रश्न नेहमी असा निर्माण होतो की राष्ट्राचे भले काय हे कोण ठरवणार तर याचे व्यवहाराच्या पातळीवरचे उत्तर हे नेहमीच क्षत्रिय ठरवणार किंवा सत्ताधारी ठरवणार हे असते आणि म्हणूनच संघ नेहमी आपल्या लोकांना सत्तेवर आणत असतो भाजपची स्थापना त्यासाठीच झालेली आहे
त्यामुळे अंतिमत : प्रश्न असाच निर्माण होतो की वैष्णव वादाची नीतिमत्ता स्वीकारायची की नाही मी स्वतः या क्रायसेस मधून कुमार वयात अनेकदा गेलेलो आहे कारण मी ज्या वातावरणात वाढलो तिथे मारामाऱ्या करताना नीतिमत्ता पाळायची की नाही हा कायमच प्रश्न असतो आणि याबाबतीत सर्वच लोकांच्या मध्ये वैष्णव वातावरण भिनलेले आहे सर्व अनैतिक कृती करताना नेहमीच रामायण आणि महाभारतातली उदाहरणे दिली जातात कारण ती या महाकाव्यांच्यातच तशी उपस्थित आहेत अनेकदा वैष्णव वाद रामायण आणि महाभारत याच आमच्या स्मृती आहेत असं स्पष्टपणे सांगत असतो त्याचा अर्थ जर का विचारवंतांना कळत नसेल तर तो विचारवंतांचा प्रॉब्लेम आहे संघाचा नाही
माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की जीवनामध्ये नितिमत्तेची प्रचंड आवश्यकता आहे भारतामध्ये या संदर्भात वैष्णव नीतिमत्तेपेक्षा अधिक चांगले पर्याय आहेत हे पर्याय म्हणजे बौद्ध नीतिमत्ता जैन नीतिमत्ता आणि शैव नीतिमत्ता यांना आपण कलेक्टिव्हली आगमनितिमत्ता म्हणू शकतो मी स्वतः शैव नीतिमत्ता स्वीकारतो कारण समोरचा शत्रू काय आहे याची मला साधारण कल्पना आहे बौद्ध धर्माचे संपूर्ण वाचन केल्यानंतर आणि इतिहास तपासल्यानंतर जेव्हा माझ्या हे लक्षात आले की खुद्द गौतम बुद्धाला शाक्य गण सुद्धा वाचवता आलेला नाही तेव्हाच माझ्या लक्षात आले की जर एखाद्या नेत्याला स्वतःचा गण सुद्धा वाचवता येत नसेल तर मग ती नीतिमत्ता राष्ट्रासाठी संपूर्ण स्वीकारता येत नाही म्हणूनच मी बौद्धांच्या कडून जाऊन पुन्हा शैवांच्याकडे परतलो नितीमतेचा खरा सुवर्णमध्ये हा फक्त शैव धर्मामध्ये आहे हे मला पटलेले आहे म्हणून मी तो मांडत असतो
संघाला हा सुवर्ण मध्य मान्य नाही त्यांना त्यांचा व्यवहार स्पष्टपणे साम दाम दंड भेद असा सापडलेला आहे ते त्याप्रमाणेच वागतात
प्रश्न असा आहे की ते पुढेही असेच वागत राहतील का ? गेली 40 वर्षे मी या अंगाने प्रयत्न केलेले आहेत पण कधी संघ बदलतो कधी बदलत नाही हा माझा अनुभव आहे अनेकदा समोर होय म्हटले जाते पण प्रत्यक्ष हा बदल घडला अशी खात्री वाटत नाही अलीकडचे व्यवहार बघितले तर ही खात्री जवळजवळ संपलेली आहे भविष्यात चांगले शैव हिंदुत्व स्वीकारले तर संघ वाचणार आहे अन्यथा वैष्णो हिंदुत्व हे हळूहळू संघाला संपत जाईल असा माझा अंदाज आहे जोपर्यंत संघ उच्च नित्यतेचा त्याग करत नाही तोपर्यंत काहीही खरे नाही मुख्य म्हणजे तो वर्तनात दिसला पाहिजे तो अजून तरी दिसत नाही जोपर्यंत ब्राह्मण ब्राह्मण व क्षत्रिय क्षत्रिय म्हणवून घेतात तोपर्यंत या देशातला वर्ण नष्ट होणे शक्य नाही
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा खरा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना संघ भेद सुद्धा स्वीकारतो हे लक्षात आले नाही आणि आपल्यातलेच काही जण भेदाला बळी पडून विभीषण होऊ शकतात हेही त्यांच्या लक्षात आले नाही गाफिल राहणाऱ्याला काळ माफ करत नाही तसेच इथे घडलेले आहे शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात दाम वापरला जाईल याची कल्पना सुद्धा विरोधी पक्षांना आली नाही
ही एक अशी निवडणूक होती जिच्यामध्ये साम दाम दंड भेद हे धोरण स्पष्ट आणि स्वच्छपणे हिंदुत्ववादाकडून सादर झालेले आहे आता ते कसे घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि हाच खरा नीतिमत्तेचा प्रश्न आहे
परंपरे कडे पाहायचे असते ते नवता निर्माण करण्यासाठी परंतु जर का परंपरा नवता निर्माण करण्याऐवजी फक्त सनातन कर्मठ व्यवस्था निर्माण करणार असेल तर ती परंपरा गोठत जाऊन शेवटी मरते संघाला या संदर्भात काय करायचे आहे हे एकदा संघाने नीट ठरवणे आवश्यक आहे
श्रीधर तिळवे नाईक
हिंदुत्व ठाकरे फॅमिली कडून हिसकावून घेतले गेले आहे का? श्रीधर तिळवे नाईक
प्रबोधनकार ठाकरे यांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिले आणि सावरकर यांचे हिंदुत्व आणि ठाकरे यांचे हिंदुत्व या दोन्ही चेहऱ्यांचे जवळजवळ एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये आगमन झाले याचा एक अर्थ असा आहे की ठाकरे फॅमिली ची सर्वात प्रथम जर काय कुठली आयडिओलॉजी असेल तर ती आयडिया लॉजी हिंदुत्वाची आहे मराठीवादाची नाही . हे सांगण्याचे कारण अनेकांना असे वाटते की मराठी वाद हा ठाकरेंचा पहिला वाद आहे तर ते सत्य नव्हे ऐतिहासिक दृष्ट्या ठाकरे यांचे हिंदुत्व हे पुस्तक आपण वाचले तर हिंदुत्वाची ही चिपळूणकर यांच्या ब्राह्मणी हिंदुत्व आणि टिळक यांचे वैष्णव हिंदुत्व यांच्यानंतर आलेली वैष्णव पण क्षात्र हिंदुत्वाची मांडणी होती प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा कृष्णालाच आपला आदर्श मांडलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे किंबहुना घरात असलेल्या शांत परंपरेचा काही प्रमाणात त्यांनी त्याग केला असे दिसते मात्र जगदंबा आणि तुळजाभवानी मात्र कुलदेवता राहिलेल्या दिसतात एका बाजूला सावरकरांचे वेदांतिक हिंदुत्व व दुसऱ्या बाजूला ठाकरे यांचे अवतरलेले हे क्षात्र हिंदुत्व हे हिंदुत्वाचे पूर्णपणे आक्रमक आणि वेगळे चेहरे होते एकीकडे हे कट्टर वैज्ञानिक असल्यासारखे वाटतात आणि दुसरीकडे ते धर्माच्या आधारे संघटन पण करू इच्छितात आणि दोघांचाही इस्लाम हा सामायिक शत्रू आहे हिंदुत्वाचा सामायिक क्षत्रत्व शत्रु इस्लाम असणे हाच त्याला आयडेंटिटी देतो शत्रूवर अवलंबून असलेली ही एक अर्थाने आयडेंटिटी आहे आणि त्यामुळेच विरोधकांना अनेकदा टीका करता येते साहजिकच ठाकरे यांच्या हिंदुत्वामध्ये अनेकदा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि ब्राह्मणे तर चळवळीचा आग्रह दिसतो ते हिंदुत्व मानतांना क्षत्रिय असल्याने कायमच ब्राह्मण्य विरोधी स्टान्स घेतात किंबहुना ब्राह्मणे तर सर्व आपल्या हिंदुत्वात आणल्यामुळेच त्यांचे हिंदुत्व हे सावरकर यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे होते आज सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे असे म्हणतात की आमचे हिंदुत्व शेंडीचे नाही तेव्हा त्यांना हेच म्हणायचे असते साहजिकच शिवसेनेमध्ये अनेक ब्राह्मणेतर शैव सामील झाले पुढे पुढे नामदेव ढसाळ यांना सुद्धा हे कळून चुकल्याने ते सुद्धा शिवसेनेला जाऊन मिळाले आंबेडकर वादाचे असे हिंदुत्ववादाला जाऊन मिळणे अनेकांना चमत्कारिक वाटले खरे परंतु वस्तुस्थिती अशी होती की व्यापक चळवळ उभी करायचे असेल तर आपणाला राष्ट्रीय आयडियालॉजी मध्ये सामील व्हावे लागेल याची कल्पना नामदेव ढसाळ यांना आली
प्रश्न असा आहे की मग या सगळ्यांमध्ये मराठी वाद आला कुठून ? तो आला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये प्रबोधनकार ठाकरे हे एक नेते होते त्यामुळे! त्यातूनच मग मराठी वाद आणि हिंदुत्ववाद यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू झाला जो बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे कंटिन्यू केला याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी वाद हा कधीच ठाकरे कुटुंबीयांचा मुख्य वाद नव्हता
मग मराठी वाद कोणाकडे होता तर तो कुणाकडेच नव्हता लिंबोना असा काही किंबहुना असा काही वाद मराठी मध्ये अस्तित्वात असल्याची दिसत नाही याचे कारण कुठल्याही वादासाठी एक तर वर्गाचा आधार लागतो किंवा संस्कृतीचा आधार लागतो मराठी संस्कृतीची स्वायत्तता कशी निर्माण करायची हा प्रश्न होता आणि याचे उत्तर ब्राह्मण लोकांनी वारकरी संप्रदाय असे दिले होते तर फुले यांनी खंडोबा ज्योतिबा भवानी असे मराठी शैव असे दिले होते यामध्ये साहजिकच ब्राह्मण लोकांना हे कळून चुकले होते की आपले खरे शत्रू महात्मा फुले आहेत आणि म्हणूनच मग महात्मा फुले यांना साईडलाईन करण्याचे सगळे प्रयत्न ब्राह्मण लोकांनी केलेले दिसतात शैव हे आपले मुख्य शत्रू आहेत हे ब्राह्मण लोकांना जेवढे कळलेले आहे तेवढे कोणालाच कळलेले नाही ठाकरे यांच्या संदर्भात हाच प्रश्न होता कारण ठाकरे कळत नकळत फुले यांना जाऊन मिळत होते मराठीचा हा शैव आधार जो महात्मा फुले यांनी व्यवस्थित कंटिन्यू केला होता तो डिस कंटिन्यू करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पण फार मोठा वाटा होता त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र उत्तरेच्या दिशेने सरकवला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकवला त्यामुळेच मराठी वादाला बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडणीमध्ये काहीही आधार मिळत नाही तो आधार फक्त महात्मा फुले यांच्याच भूमिकेत आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की नंतर ब्राह्मणे तर बाद हा वैष्णव लोकांनी भडकवायला सुरुवात केली सुरुवात केली यामध्ये प्रामुख्याने आह साळुंखे यांच्यासारखे विचारवंत येतात ज्याने ज्यांनी मराठी वाद हा वारकरी संप्रदायाशी जोडण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला याचे कारण एकच होते यांच्या दृष्टिकोनातून तुकाराम क्षत्रिय असल्याने वारकरी संप्रदाय हा मराठ्यांचा म्हणून सांगता येत होता त्यामुळेच या लोकांनी ज्ञानेश्वर साईडलाईन केले आणि तुकाराम केंद्रस्थानी आणले तुकाराम हे कळत न कळमत अनेकदा शैव लोकांच्या विरोधात दिसतात त्यांनी अनेकदा शैवांच्यावर टीका केलेली आहे ही टीका नेमकी कशामुळे आली याचे उत्तर मी दुसरीकडे दिलेले आहे याचाच परिणाम म्हणून आपल्याला संत तुकाराम या चित्रपटामध्ये चंद्रकांत कुलकर्णी खलनायक शैव दाखवतात म्हणजेच मराठी वादाचा आदर्श कळत नकळत वारकरी संप्रदाय झाला आणि तसा तो बनवण्यात ब्राह्मण लोकांचा प्रचंड वाटा होता यामध्ये अनेक नवीन दंतकथा तयार करण्यात आल्या ज्ञानेश्वरांना आद्य संस्थापक म्हणून दाखवणे आणि आपण या आद्य संस्थापकांच्या आई-वडिलांना नदीत बुडून मृत्यू पत्करण्याची शिक्षा दिली होती हे लपवणे असा प्रकारही झाला केशवसुतांचा सगळा काळ हा मैदानी होता आणि साहजिक वेदांती होता आणि साहजिकच सावरकर हे वेदांती झालेली दिसतात आणि म्हणूनच त्यांचा वेदांती हिंदुत्व दिसतो परंतु हळूहळू वेदांताचा जीवर महाराष्ट्रात ओसरत चालला कारण आद्य शंकराचार्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण करण्यात काही लोक यशस्वी झाले आणि त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा फार मोठा वाटा होता
एकदा मराठी वादाचा आधार वारकरी संप्रदाय झाल्यानंतर साहजिकच तो हळूहळू वैष्णव होत गेला आणि एकदा तुम्ही वैष्णव झाला की मग तुम्हाला मथुरेत आणि वृंदावनात पोहोचावेच लागते यमुनेतच गोदावरी बुडवावी लागते तेच इथे झाले साहजिकच मराठी वाद सुद्धा यमुनेत जाऊन बुडाला याचे पडसा देणे अटल होते येणे पडसाद येणे अटळ होते ते या इलेक्शनच्या मध्ये संपूर्णपणे आले
मराठी वादाची संस्कृती ही वारकरी असते निश्चित झाल्यानंतर साहजिकच विठोबा हा महाराष्ट्राचे दैवत झाला आणि खंडोबा आणि तुळजाभवानी बाजूला पडत गेले
1947 स*** भारत स्वतंत्र झाला आणि भाषावर प्रांत रचना प्रांत रचना स्वीकारावी की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला परंतु शेवटी भाषावार ही कसोटी स्वीकारण्यात आली मात्र महाराष्ट्राला ती लावली गेली नाही कारण प्रत्येकाला मुंबई आपल्या ताब्यात ठेवावी असे वाटत होते नेहरू या काळामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ आला की भाषिक संदर्भ साईडलाईन करत होते साहजिकच एक भूमिका घेणे आवश्यक ठरले आणि मराठीची संस्कृती भाषा केंद्रित करून मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य निर्माण करणे स्वीकारले गेले त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र आंदोलन निर्माण झाले
मराठी भाषेचं स्वतंत्र राज्य असावे ही मागणी पुढे आली परंतु ज्याला मराठी वाद म्हणता येईल अशा प्रकारचा कोणताही वाद या लोकांनी मांडलेला दिसत नाही याचे कारण असे होते की मराठी ही भाषा द्रविड संस्कृतीशी निगडित आहे असे कोणालाच वाटत नव्हते त्यामुळेच दक्षिणेत जसा भाषिक आंदोलनाला एक द्रविड संस्कृतीचा आधार होता तशा प्रकारचा आधार महाराष्ट्रातल्या स्वतंत्र महाराष्ट्र आंदोलनाला नव्हता आपल्याकडे ही बेसिक फॅक्ट विसरली गेल्यानेच सगळा गोंधळ उडालेला आहे मराठीचे आंदोलन सांस्कृतिक कमी आणि भाषिक जास्त होते आणि याचाच प्रचंड मोठा दुष्परिणाम होत गेला कारण संस्कृतीच्या पातळीवर मराठीची संस्कृती कुठली हा खरा मुद्दा होता आणि हा मुद्दा कोणीही विचारला नाही कारण कोणालाही मराठीची काही शोकांतिका होऊ शकते असे वाटले नव्हते मराठी आपोआपच जगेल आणि तगेल असे सर्वांनाच वाटत होते पण प्रत्यक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होईल आणि अमराठी लोकच महाराष्ट्र बळकावतील आणि मराठीला नष्ट करायला लागतील असे कोणालाच वाटले नव्हते हे काहीसे अमेरिकेसारखे होते अमेरिकेतल्या स्थानिक लोकांची संस्कृती पूर्णपणे इंग्रजी संस्कृतीने नष्ट करून टाकली महाराष्ट्राचे काही वेगळे भवितव्य आहे असे मला वाटत नाही त्याच दिशेने मग पावले पडली भविष्याच्या संदर्भामध्ये हे सर्व आंधळे निघाले पुढे काय ताटात वाढून ठेवलेले आहे याची कोणालाही कल्पना आली नाही एका अर्थाने राष्ट्रवादामध्ये महाराष्ट्रवाद बुडाला ठाणे महाराष्ट्र वादा बरोबरच मराठी ही बुडेल हे हळूहळू निश्चित होत गेले आणि त्याची कल्पना कोणालाही आलेली नव्हती हीकल्पना का आली नाही? की ही कल्पना आली परंतु अत्यंत जाणीवपूर्वक हे करण्यात आले?
एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचा फार मोठा वाटा आहे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर ज्यांचा पगडा होता त्यातले बरेच जण ब्राह्मण होते आणि दक्षिणेपेक्षा स्वतःला उत्तरेकडे घेऊन जाण्यात सर्व ब्राह्मणांना सुरक्षित वाटत होते कारण त्यामुळे त्यांना सर्वोच्च वर्णप्राप्ती होत होती जी त्यांना हवी होती हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना सर्वोच्च मान असतं होता आणि द्रविड संस्कृती स्वीकारणे हे त्यांना परवडणारे नव्हते कारण द्रविड संस्कृती स्वीकारली तर आपले स्थान ब्राह्मण म्हणून सर्वोच्च वर्णाचे राहणार नाही याची त्यांना व्यवस्थित कल्पना होती पेरियार आंदोलनाने ब्राह्मणांच्या विरोधात उभे केलेले आयडालॉजिकल पुरावे त्यांना कळून चुकले होते त्यामुळे ब्राह्मण नेमके काय करतायत तेच कोणाच्याच लक्षात आले नाही महाराष्ट्र आंदोलन चालवणाऱ्यापैकी कोणीही शूद्रांच्या वा शैव लोकांच्यापैकी नव्हते साहजिकच द्रविड आग्रह कोणीही पत्करला नाही आपण दक्षिणात्य आहोत डेक्कन आहोत याची कसलीही जाणीव या लोकांनी या काळात दाखवलेली दिसत नाही याचा प्रचंड मोठा दुष्परिणाम संपूर्ण मराठीवर झालेला आहे
मुळात उत्तर पेशवाई मध्येच महाराष्ट्राचे उत्तरिकरण संस्कृत कारण सुरू झाले होते कारण पेशव्यांना ब्राह्मणांचे राज्य आहे असा मेसेज द्यायचा होता आणि हा मेसेज उत्तरेकडच्या ब्राह्मणांच्याकडे व्यवस्थित पोहोचला होता आणि त्यांनीच उत्तरेकडे मराठ्यांना एक सॉलिड बॅकग्राऊंड दिले. साहजिकच होळकर असो की गायकवाड असो यांना सर्व ब्राह्मणांनी सहकार्य दिलेले दिसते जेव्हा पूर्ण पणे पेशवाई सेटल झाली तेव्हा मग होळकरांचे काय करायचे असा प्रश्न पडायला लागला आणि यातूनच होळकरांच्या विरोधात अनेक कटकारस्थाने झालेली दिसतात कारण होळकर यांचे धनगर शैव असणे हे या लोकांना परवडणारे नव्हते ब्राह्मणांनी केंद्रस्थानी राहावे आणि ही ब्राह्मणी राजवट क्षत्रियांनी विस्तारावी हे पेशवाईचे मूळ सूत्र होते त्याला होळकर यांचे अस्तित्व छेद देणारे होते साहजिकच या सूत्रानुसारच उत्तर पेशवाई चालली आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालत आहे हिंदुत्वाच्या मुळात हाच अजेंडा चिपळूणकरांनी मांडलेला दिसतो चिपळूणकर सतत शिवाजी महाराजांना दैवत बनवताना दिसतात त्याचे कारण तेच आहे किंबहुना वैदिक राज्याभिषेक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट केला जातो कारण तो तसा केल्याशिवाय उत्तर पेशवाईला शिवाजी महाराजांचा आधार मिळत नाही उत्तर पेशवाई ने संस्कृतकरण केले आणि संस्कृत केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली त्याचा एक परिणाम असा झाला की कळत नकळत संस्कृतची देवनागरी लिपी ही मराठीची लिपी म्हणून झिरपायला सुरू झाली आणि पुढे जेव्हा छपाई चा प्रश्न आला तेव्हा मोडी लिपीतले फॉन्ट करण्यापेक्षा देवनागरीतले फॉन्ट हे अधिक सुलभ आहेत असे सांगत या देशातल्या उच्चवर्णीय लोकांनी व्यवस्थित मोडी लिपी जी द्रविड संस्कृतीशी निगडित होती बाजूला केली आणि देवनागरी लिपी संपूर्ण मराठी संस्कृतीवर लादून मराठीचे संस्कृत करण एका परमोच्च बिंदूपाशी पोहोचवले इथून जे संस्कृतकरण झालेले आहे ते छापीलता या तंत्रज्ञानाशी निगडित झाल्याने वर्तमानपत्रांनी सुद्धा स्वीकारले आणि इथूनच मराठी संस्कृती ही उत्तरिक संस्कृती आहे हे खुद्द मराठी लोकांनी स्वीकारले आणि स्वतःची डेक्कन मुळे दक्षिण मुळे नाकारायला येथेच सुरुवात झाली आजतागायत ही मुळे अशीच उत्तरेकडे भिडवली जात आहेत आत्ताची जी शोकांतिका झाली तिच्या मुळाशी ही बॅकग्राऊंड आहे मोदींनी सुरुवात जरी शैव हिंदुत्वापासून केली असली तरी हे हिंदुत्व कोणालाही परवडणारे नव्हते कारण मुळात मोदी यांना ते स्वतःला स्वीकारायचे नव्हते ही फक्त शैव लोकांना चकवण्याची खेळी होती आणि सर्व लोक चकले आता काशीचे नाव सुद्धा विसरावे आणि वाराणसी हे नाव ठसावे असा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे आणि तो जवळ जवळ यशस्वी झालेला आहे हे काय चालले आहे हे सुद्धा शैव लोकांना कळत नाही
आता हिंदुत्व स्वीकारल्यानंतर मराठी वाद कसा काय स्वीकारता येईल तर हे शक्यच नाही तुम्ही एक तर हिंदुत्ववादी असू शकतात किंवा मराठी वादी असू शकतात आणि मराठी वादी होण्यासाठी जी एक काँक्रीट बॅकग्राऊंड तयार करावी लागते ती तर तुम्ही करतच नाही साहजिकच भाजपाला ठाकरे यांचे हिंदुत्व हे वर्चस्वाच्या आड येणारे वाटले होते प्रश्न असा होता की आपल्या आखत्यारीत कसे आणायचे? आणि इथेच मग भेद ही संकल्पना आणली गेली आणि शिवसेनेमध्ये फूट पाडण्याची कारस्थाने सुरू झाली क्षत्रियाचा अहंकार ज्यांना मिळवायचा असतो अशा सर्व लोकांना या गोष्टीची भुरळ पडली खरे तर हा ब्राह्मणांचा सनातन फॉर्म्युला आहे क्षत्रिय होण्याचे आमिष दाखवायचे आणि जे जे कर्तृत्ववान लोक आहेत त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यायचे जे याला बळी पडणार नाहीत नाहीत त्यांना व्यवस्थित साईडलाईन करायचे हे सर्व जनताजनार्दनाला पटावे म्हणून त्याच्यामध्ये वैष्णव धर्म रुजवत न्यायचा जेणेकरून या विरोधात क्रांती होणार नाही आणि विरोधाचा सशस्त्र उठाव होणार नाही
हे सर्व चाललेले असताना यात मराठीवाद कुठे होता तर तो कुठेही नव्हता किंबहुना मराठीचे कोणाला काही पडले आहे असे वाटत नाही फक्त साहित्यिक लोक गुजराती पाट्यांच्या विरोधात बोलत होते पण त्याची दखल काही मतदारांनी घेतली नाही असे दिसते गमतीचा भाग असा आहे की गुजरात मध्ये तरी कुठे गुजराती टिकते किंवा हिंदी बेल्ट मध्ये कुठे हिंदी टिकते तर दोघांनाही इंग्रजी भाषा गुगलच चालली गिळत चालली आहे म्हणजे इंग्रजी महासपाच्या तोंडात जी हिंदी भाषा आहे तिच्या तोंडात गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषा आहेत आणि आता मराठी भाषा गुजराती सापाच्या तोंडात आहे असा हा दृश्यात्मक प्रकार आहे त्यामुळे अंतिमता काय होणार आहे तर इंग्रजी सगळा हिंदी मराठी गुजराती यांना गिळणार आहे आणि तोपर्यंत आपल्याबरोबर राजकारण खेळणाऱ्या आणि आपल्याला खेळणाऱ्या सर्व राजकारणी लोकांच्या पुढच्या पिढ्या या अमेरिका किंवा इंग्लंड किंवा इतरत्र सेटल झालेल्या असणार आहेत
मग प्रश्न असा येतो की मराठी साहित्यिकाने मराठीचा त्याग करून हिंदी भाषा स्वीकारावी का ? लेखक म्हणून क्षितिज पटवर्धनाची दखल त्यांनी सिंघम 3 लिहिल्यानंतरच मित्र म्हणे मध्ये घेतली जाते ही आपल्याकडची शोकांतिका आहे
मराठी वाद केवळ गप्पा मारून उभारणे शक्य नाही मराठी वादाचा पहिला आधार हा धार्मिक असला पाहिजे किंवा मग मोक्षिक असला पाहिजे तुम्ही तो आधार वैष्णव आणि वारकरी स्वीकारल्यानंतर आपोआपच हा आधार तुम्हाला उत्तरेकडे घेऊन जातो इतके बेसिक सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला काय कळले ? कारण अशाच प्रकारे तामिळनाडूमध्ये सुद्धा वैष्णव संतांची चळवळ उभी केली गेली आणि नंतर वैष्णव संतांची चळवळ कशी शैव लोकांच्या आधीची चळवळ आहे हे सांगायला सुरुवात केली गेली तिथे सुद्धा हा प्लॅन व्यवस्थित यशस्वी झाला परंतु सुदेवाने द्रविड चळवळीने सर्व फेटाळून लावले अशा प्रकारचे फेटाळण्याचे जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न मराठी वादा ने केले का? तर ते केलेच नाही उलट साठोत्तरी पिढीने हिंदुत्ववादाला पूरक होतील अशाच प्रकारच्या वारकरी भूमिका घेतल्या याचा एक परिणाम असा झाला की उत्तरीं हिंदुत्ववाद हा आणखीन स्ट्रॉंग झाला आणि आता तो डोक्यावर बसलेला आहे एकदा का तुम्ही हिंदू संस्कृतीशी जोडला गेला की मग तुम्हाला दोनच पर्याय उरतात हिंदू वाद किंवा हिंदुत्ववाद ! हिंदू वादाने सेक्युलर भूमिका स्वीकारल्याने तो जिंकेल तर हिंदूवादी विजयी होतील पण ते शक्य नाही उलट औषधाला सुद्धा हे लोक शिल्लक राहतील की नाही आता असा प्रश्न पडलेला आहे आणि जर हिंदूवाद शिल्लकच राहणार नसेल तर मग तुम्हाला हिंदुत्ववादी होण्याशिवाय पर्याय उरत नाही अशावेळी स्वतःचा स्वतंत्र स्वायत्त हिंदुत्ववाद निर्माण करणे याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आणि म्हणूनच शैव हिंदुत्वाची गरज भासते किंवा मग तुम्हाला शैव काँग्रेसवाद निर्माण करावा लागेल शैव समाजवाद निर्माण करावा लागेल हे करण्याची तुमची तयारी आहे का? तर नाहीये ! तुम्ही कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृतीत वावरत असल्यासारखे बोलता आणि या देशातले जमिनी बॅकग्राऊंड तुम्ही लक्षात सुद्धा घेत नाही मी किती वेळा तरी सांगितलेले आहे की बौद्धांची लोकसंख्या धड एक टक्का सुद्धा नाही त्यांच्या जीवावर कसले राजकारण यशस्वी करायला बघता ? ते शक्यच नाही शेवटी ही लोकशाही आहे आणि इथे संख्या मॅटर करते आणि नव बौद्धांची संख्या ही एक टक्क्याच्या वर जाणे मला तरी शक्य वाटत नाही जास्तीत जास्त पाच टक्के! अशावेळी फक्त ओबीसी वर्ग तुमच्या मागे येऊ शकतो किंवा ज्यांचे कुलदैवत सेवा आहे असे उच्च वर्णीय लोक तुमच्याकडे येऊ शकतात ज्याच्याकडे स्वतःचा स्वतंत्र स्वायत्त असा शैव धर्म आहे ज्याला इतिहास आहे तुम्हाला त्याकडे यायचे नाही किंबहुना या संदर्भात मी सगळे प्रयत्न केले पण हे लोक काय शहाणे होणार नाही शैव समाजवाद किंवा शैव साम्यवाद असे काहीही निर्माण होणार नाही असे माझ्या लक्षात आलेले आहे अशा वेळेला शैव हिंदुत्व शिवाय दुसरा कुठला पर्याय उरतो? जेव्हा समोरची व्यक्ती समोरची आयडालॉजी धर्माधिष्ठित राजकारण घेऊन येते तेव्हा त्या वेळेला उत्तर आर्थिक राजकारणातून किंवा ज्ञानिक राजकारणातून मिळेल हा एक भ्रम आहे आणि एवढे रसातळाला गेल्यानंतर सुद्धा स्वतःचे भ्रम तुम्हाला सोडायचे नसतील तोडायचे नसतील तर तुम्ही भ्रमात अधिक अधिक गटांगळ्या खात जाणे अटळ आहे
महाराष्ट्रामध्ये शैव धर्माची एक अत्यंत दीर्घ परंपरा आहे त्याच्या साहित्यिक परंपरेविषयी मी महेश म्हात्रे यांना जो इंटरव्यू दिलेला आहे त्यामध्ये बोललेलोच आहे महाराष्ट्रात सर्वाधिक प्राचीन मंदिर ही शैव आहेत वैष्णव नाहीत इतकं सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांना काय घंटा महाराष्ट्र कळला?
वस्तुस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे हे कळत नकळत सेक्युलर वादाला मिळाले अशीच त्यांची प्रतिमा होत गेली आणि या निवडणुकीमध्ये तर ती जास्तच ठळक होत गेली आणि यामुळे आपल्याकडून हिंदुत्व हिसकावले गेले जात आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही त्यांचा बहुदा ठाकरे कुटुंबीयांचा महाराष्ट्रावर संपूर्ण पगडा आहे प्रभुत्व आहे असा गैरसमज झालेला होता प्रत्यक्षामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणचा एक एक बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे सारख्या रूपाने होता पण त्यांना हे बहुदा कळाले नाही सर्व काही आपल्या एकट्याच्या हातात आहे हातात एकवटले पाहिजे असा आग्रह राहिला आणि त्यांच्या मुठीतून वाळू सारखे हिंदुत्व निसटून गेले कुठलीही शास्त्र गोष्ट ही क्षेत्रीय बनत असते त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व हे मराठी हिंदुत्व बनले त्याचे मला कधीच आश्चर्य वाटले नाही पण त्याची अशा प्रकारची शोकांतिका होईल असे मात्र वाटले नाही ठाकरे यांचे हिंदुत्व नष्ट झालेले नाही तर ते शिंदे शिवसेनेकडे गेले हे कारखाने हिते वारसा एका अर्थाने हिते वांशिक वारसा नाकारल्या गेलेला आहे आणि हा वारसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वावरणाऱ्या स्वतंत्र ताकद निर्माण केलेल्या आनंद दिघेंचा आहे सरंजामी दादांनी मिळूनच आपल्या राजाची राजवस्त्रे उतरवावीत तसे काहीसे इथे घडले आहे पण याचा अर्थ कमबॅक अशक्य आहे असा नाही अशा प्रकारचे प्रकरण इंदिरा गांधी यांच्या बाबतीत घडलेले होते पण पुन्हा एकदा इंदिरा गांधींचा कमबॅक झाला कारण जनता पक्ष नेहमीच चुका करेल असे वाटत होते आणि अशा चुका झाल्या अशाच प्रकारच्या चुका जर का भाजप युतीमध्ये झाल्या तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना स्कोप मिळणे शक्य आहे त्यांना थोडा संयम ठेवला पाहिजे आणि शत्रू कधी चूका करतो याची वाट पहावी लागेल मुख्य म्हणजे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर ते नेमके काय रिएक्शन देतात त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत अजित पवार हे अशा वेळेला फायदा उठवून हमखास देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करणार हे उघड आहे कारण त्यांना आपल्या बाळाची जमिनी जाणीव आहे अशी जमिनी जाणीव एकनाथ शिंदे यांना असेल तर पेज प्रसंग उद्भवणार नाही परंतु जर अशी जमिनी जाणीव नसेल तर त्यांना उपमुख्यमंत्री पद आपल्या मुलाला किंवा स्वतःला ठेवून स्वतःसाठी किंवा मुलासाठी केंद्रीय मंत्रीपद मिळवता येईल प्रश्न असा आहे की शिंदे तरी मराठी वाद टिकवणार आहेत का? दुर्दैवाने याबाबतीतली कसलीही पॉसिबिलिटी आत्ता तरी दिसत नाही एका अर्थाने प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व हे राष्ट्रीय हिंदुत्वात विलीन होण्याची चिन्हे दिसत आहेत जर का शिंदे याला अपवाद ठरले तर मात्र तो चमत्कारच म्हणावा लागेल
उद्धव ठाकरे यांच्याकडून एका अर्थाने हिंदुत्वाचा कळत नकळत त्याग झाला आणि आणि ते त्यांच्या हातातून निसटत गेले कारण ते ज्या पक्षांच्या बरोबर होते ते पक्ष कट्टर सेक्युलर वादी आहेत त्यामुळे झाले असे की ठाकरे यांचे हिंदुत्व हे वारसा हक्काने नव्हे तर कर्तुत्वाचा हक्काने शिंदे यांच्याकडे आहे असा कॉल मराठी लोकांनी दिलेला आहे हा कॉल घ्यायचा की नाही हे उद्धव ठाकरे यांना ठरवावे लागेल एका कठोर आत्मपरीक्षणाची गरज आहे
पण यातून मराठी वादाचे काय हा मुद्दा उरतोच कारण मराठी वादाला मला तरी कधी महाराष्ट्रामध्ये कोणी वाली दिसलेला नाही हिंदीला कडक विरोध हे द्रविड संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे हे मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे हे आता द्रविड लोकांना व्यवस्थित कळून चुकले आहे साहजिकच तिथे हळूहळू लोक एकवटत चालले आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी लोक या द्रविड संस्कृतीला सामील व्हायला तयार असून सुद्धा मराठी नेते मात्र द्रविड संस्कृतीला सामील व्हायला तयार नाहीत दक्षिणात्य चित्रपटांना आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाठिंबा मिळतो त्याचे एक कारण कळत नकळत आपण द्रविड आहोत याचा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यानीं केलेला स्वीकार! साहजिकच या जिल्ह्यामधून तो मोडीत काढण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न केले गेले आणि या निवडणुकीमध्ये ते यशस्वी झाले कारण मराठी वादाला थेट द्रविड संस्कृतीशी जोडणे अजूनही कोणाला साध्य झालेले नाही आपण द्रविड आहोत असे कोणालाच वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये गोरागोमट्या लोकांचे राज्य आहे हे लोक गोरेवादी आहेत याची सुरुवात मुळात सारस्वत ब्राह्मणांनी केलेल्या त्यागापासून होते हे सर्व मूळचे लोक परंतु यांनीच प्रथम शैव धर्माचा त्याग केला आणि ते शंकराचार्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले आद्य शंकराचार्य शैव होते की नाही हा प्रश्न सुद्धा या लोकांनी विचारला नाही त्यानंतर मग कोकणस्थ ब्राह्मणांनी त्यांना शैव लोकांनी आधार दिला होता हे गोष्ट विसरले त्यांनी परशुरामाची दंतकथा तयार केली आणि स्वीकारली मूळ शैव परशुरामाचा त्याग केला आणि विष्णूचा अवतार स्वीकारला त्याच्यानंतर मग देशस्थांचा नंबर लागला मग कराडे थोडक्यात काय या महाराष्ट्रातले पंडित हळूहळू शैव धर्माचा त्याग करत हिंदू धर्मात किंवा वैष्णव धर्मात विलीन झाले आणि यानेच नंतर द्रविड संस्कृतीशी नाते तोडत स्वतःला उत्तराच्या संस्कृतीशी जोडून घेतले मी मागेच म्हटले आहे की ब्राह्मण किंवा पंडित काय करतात हे अनेकदा महत्त्वाचे ठरते महाराष्ट्रातल्या ब्राह्मण आणि पंडितांनी आपले नाते उत्तरेशी जोडले आणि महाराष्ट्र सुद्धा हळूहळू उत्तर
Comments
Post a Comment