marathi sanskruti
MUKUND कुंद फणसळकर यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे इतका गुणी कलावंत वाया जातो कसा? माझे स्वतःचे एक मत असे आहे की मराठी माणसे नीच्चड गोडव्याला बळी पडतात आणि त्यांना ब्रेक देत राहतात आणि जो मनस्वी कलावंत असतो त्याला सांभाळून घेत नाहीत मग मेल्यानंतर हळव्या पोस्टी टाकत बसतात विशेषता तो मराठी कलावंत असेल तर हे सांभाळून न घेणे जास्त तीव्रतेने दिसते म्हणजे किशोर कुमार चे सगळे नखरे यांना चालतात परंतु मराठी गायकाचे नखरे मात्र चालत नाही परधार्जीणेपण किती असावे याला काहीही मराठी लोकांच्या बाबतीत मर्यादा नसते याचे कारण मराठी लोकांचा अहंकार आहे त्यांच्या अहंकाराला सुखावणारे गोड गोड बोलणारे कलावंत मराठी लोकांना परमप्रिय असतात त्यांना हेही कळत नाही की हे लोक फक्त संधीची वाट पाहत असतात आणि अशी संधी मिळाली की नंतर ते सगळे तुम्ही हिट आहात तोपर्यंत तुमच्या बरोबर राहतात आणि तुम्ही एकदा फ्लॉप झाला की सोडून निघून जातात
मराठी माणसांच्या भाषिक प्रवृत्तीतच गोडवा नाही त्यामुळे वास्तविक मराठी लोकांनी एकमेकाला समजून घेणे खूप आवश्यक असते आपण मराठी म्हणून काय आहोत हेच जर आपणाला समजत नसेल आपल्या स्वभावजन्य गोष्टी आपल्याला समजत नसतील तर आपल्याला आपली संस्कृती वाढवता येणे अशक्य आहे म्हणजे माझा काटेरीपणा तुम्ही समजून घ्या पण तुमचा काटेरीपणा मात्र मी समजून घेणार नाही तुम्ही माझी गोड गोड स्तुती करत रहा, खोटी खोटी स्तुती करत रहा अशी काहीतरी प्रवृत्ती मराठी माणसांची झालेली आहे आणि हे सर्व केवळ अहंकारापोटी होते मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसांचा फटकळ पणाच्या नशेत अपमान करतात ही एक प्रवृत्तीच आहे या प्रवृत्तीवर विजय मिळवणारे कलावंत झाले उदाहरणार्थ मंगेशकर कुटुंबीय पण हे अपवाद आहेत एरव्ही मराठी गायक सहन होत नाही म्हणून त्याला फाट्यावर मारून महेंद्र कपुर कडे वळणारे दादा कोंडकेच जास्त आहेत मग ते कितीही शिवसेनेचे कार्यकर्ते असोत बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिरेखी साठी सुद्धा यांना अजिबात फिट न बसणारा दुसरा माणूस चालतो पण मकरंद सारखा माणूस चालत नाही जो अगदी योग्य होता
मुकुंद फणसळकरसारख्या मनस्वी गायकाची शोकांतिका ही त्यातून निर्माण होते मराठी आणि हिंदी चित्रपटात जर मराठी परसेंटेज वाढवायचे असेल तर मराठी लोकांनी आधी स्वतःला आपण जसे आहोत तसे स्वीकारायला सुरुवात करावी नाहीतर गोड बोलणारे लोक गोड बोलून तुमची खोड मोडतच राहणार आणि शेवटी तुमच्या मुळांना हात घालणार आणि शेवटी तुम्हाला तुमच्या झाडासकट उखडणार हे स्पष्ट आहे नुसते मराठी लोकांच्या अस्मितेचे नगारे बडवून आणि परप्रांतीयांच्यावर टीका करून काय उपयोग आपण नेमके काय केले पाहिजे हेही पाहिले पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातले प्रतिभावंत लोक जे आहेत त्यांना जितके सांभाळून घेता येणे शक्य आहे तितके घेतले पाहिजे बाकीच्या सर्व संस्कृतीमध्ये हे केले जाते उदाहरणार्थ किशोर कुमार चे सगळे नखरे एस डी बर्मन आणि आर डी बर्मन यांनी सांभाळून घेतलेले दिसतात कारण बंगाली मधुरपणा आणि नखराईपणा सांभाळून घेण्याची वृत्ती! हीच गोष्ट पंजाबी लोकांच्या बाबतीत दिसते स्वतःच्या प्रादेशिक स्वभावजन्य प्रवृत्ती नेमक्या काय आहेत हे समजून घेऊन बाकीचे सर्व प्रादेशिक लोक व्यवस्थित टीम बनवत असतात मराठी लोक अशा प्रकारची टीम बनवण्यामध्ये आजही यशस्वी झालेले दिसत नाहीं अपवाद व्ही शांताराम दुसरी गोष्ट मराठी लोकांनी शॉर्टकट शोधायचे बंद करावे प्रत्येक वेळेला फास्ट पैसा हवा असतो सत्ता हवी असते (शिंदे आणि अजित पवार यांची शोकांतिका यातूनच आलेली आहे) किंवा मग पैशाची गॅरंटी देणारी नोकरी ! व्ही शांताराम किंवा मंगेशकर फॅमिली सोडली तर स्वतःची संपूर्ण फॅमिलीच फिल्म इंडस्ट्रीत सेटल केली पाहिजे ही जाणीव किती मराठी फिल्म कलाकारांच्यात दिसते किंवा दिसली?
तेव्हा इतर लोकांना गद्दार म्हणताना आपण सुद्धा आपल्याच माणसांच्या बाबतीत नको तितके खूंखार होतो किंवा आहोत याचे भान बाळगा. मुकुंद फणसळकर यांच्या केस पासून एवढा जरी धडा मराठी लोक शिकले तरी खूप झाले आणि हो मंगेशकर फॅमिली वर टीका करण्यापेक्षा ते एक आदर्श मॉडेल आहे विशेषता फिल्म इंडस्ट्री बाबत हे लक्षात घ्या आणि मुख्य म्हणजे यशस्वी मराठी माणसांना स्वतःच्या मत्सरात जाळू नका मराठी माणूस प्रचंड मत्सरी असतो त्याला दुसऱ्या मराठी माणसाचे यश सहजासहजी पचत नाही म्हणूनच लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर यांच्यावर सर्वाधिक टीका करणारे लोक मराठीत असतात अलीकडे तर याला मस्तपैकी वर्णीय आणि जातीय फोडणी देण्यात पण सर्वजण वाकबगार झालेले आहेत ते जितक्या लवकर सोडता येईल तितक्या लवकर सोडावे किंवा कसे सोडता येईल ते बघा
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment