CHAUTHI NAVTA NAVAT JUNAT
नवाट आणि जुनाट श्रीधर तिळवे नाईक
जुनाट आणि नवाट श्रीधर तिळवे नाईक
नवाट म्हणजे परंपरेला समजून घेऊन तिच्या मर्यादा समजून घेऊन परंपरेच्या बाहेर येणारे नव्हता निर्माण करणारे आणि त्या नवतेच्या जोरावर संपूर्ण राष्ट्र आणि जग आणि समाज संपूर्ण बदलणारे लोक होय आणि जुनाट म्हणजे परंपरा हीच प्रमाण मानणारे लोक होय नवाट आणि जुनाट या दोन प्रवृत्ती कायमच जगात सर्वत्र वावरत असतात
नवाट परंपरेतून बाहेर येत काही नवीन निर्माण करू इच्छितात कारण परंपरा आपल्या कामाची नाही हे त्यांना नीट उमगलेले असते किंबहुना परंपरा नीट उमगलेली असते म्हणूनच तिची मर्यादाही त्यांना कळलेली असते त्यामुळेच ते काही नवीन नवतावादी समाजात आणू इच्छितात साहजिकच त्यांचा जुनाट लोकांशीं संघर्ष सुरू होतो आणि इथूनच ठिणगी पडायला सुरुवात होते कधी कधी ही ठिणगी क्रांतीपर्यंत घेऊन जाते जुनाट लोकांच्यापैकी अनेकांना असे वाटत असते की परंपरेत राहून काही नवीन काम करता येते. प्रत्यक्षात असे शक्य नाही नवता जोवर परंपरेच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आकारालाच येऊ शकत नाही किंबहुना याला अलीकडे आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतात आणि जुनाट नेहमी परंपरेच्या बॉक्समध्ये बसलेले असतात नवतेला फक्त क्रांती करून चालत नसते तर तिला आपली स्वतःची नवी वैश्विक मानके निर्माण करावी लागतात अनेक परंपरावादी लोक वैश्विक मानके नाकारतात कारण या मानकांच्यावर उतरणे आपल्याला अशक्य आहे असे त्यांना वाटत असते साहजिकच देशी मानकांचा पुरस्कार केला जातो प्रत्यक्षात अशी मानके विचारली की कुठली तर ती काही सांगता येत नाहीत तेव्हा मात्र हे लोक आंतरराष्ट्रीय मानके सांगायला लागतात अवकाश आणि काळ ही आंतरराष्ट्रीय नव्हे तर वैश्विक मानके असतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि देशीवादी लोक शेवटी अवकाशवादीच होतात कालवादीच होतात कारण शेवटी माणूस हाच जागतिक आहे होमोसेपियन आहे त्याचे 99.99% जेनेटिक कोड सारखेच आहे देशी माणूस नावाची गोष्ट अस्तित्वात नाही देशात राहणारा माणूस असू शकतो देशी माणूस अस्तित्वात नसतो देशी परंपरा असू शकतात परंतु त्या परंपराच असतात आणि अनेकदा त्या देशीपणाला देशीयतेच्या नावाने तुंबवतात थांबवून ठेवतात त्यांचा विकास होऊ देत नाहीत त्यामुळेच देशीपण गोठते कुजते म्हणूनच ज्यांना पुढे जायचे असते त्यांना देशीयता फेकावी लागते देशीवाद फेकावा लागतो कारण तो देशाच्या झाडावर उठलेला असतो अनेकदा तर देशातील सत्तास्थानांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तो जन्माला घातलेला असतो अनेकदा क्षत्रिय लोक देशीयतेचा उद्योग सेलिब्रेट करत असतात कारण त्यांना वाणी पणी (हे ओबीसी लोकांच्यातच होते घातलेले होते आता त्यांना जाणीवपूर्वक वेगळे काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे) उत्पादक कारागीर आणि सेवक लोकांच्यावर वर्गावर नियंत्रण हवे असते ते ओबीसींना जाणीवपूर्वक भटकवतात ते बिसी लोकांना जाणीवपूर्वक भटकवतात ते आदिवासी लोकांना जाणीवपूर्वक भटकवतात याचे कारण त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी हे आवश्यक असते आणि परंपरा ही दारू सारखी पाजली की हे होऊन जाते अनेकदा काही देशीवादी प्रामाणिक असतात पण त्यांनी काही करण्याआधीच मार्गी असणारे लोक त्यांची परंपरा घेऊन येतात आणि देशी लोकांची सत्ता कमावतात बळकवतात देशी लोकांच्यावर आपले वर्चस्व निर्माण करतात आणि हे करताना ते मार्गी परंपरा वापरतात परंपरा ही फक्त कधीच देशी असत नाही परंपरा ही मार्गीही असू शकतात आणि हेच देशीवादी लोकांच्या लक्षात येत नाही आणि त्यातूनच बरेच अनर्थ घडतात याविषयी अनेक वॉर्निंग देऊनसुद्धा देशीवादी लोकांना हे कळत नाही ते अत्यंत निरागसपणे पुरोहित वादाला मदत करत राहतात वसाहतवादी प्रवृत्तींना आणि साम्राज्यवादी प्रवृत्तींना मदत करत राहतात आपली सत्ता निर्माण करणे आणि निर्माण झालेली सत्ता टिकवणे यापलीकडे त्यांना काहीच दिसत नाही त्यामुळे कधी मार्गी लोक आले आणि त्यांनी सत्ता बळकवली हे त्यांना कळत नाही अनेकदा तर असेही होते की मार्गी लोक मार्गी सत्ता आणि देशी सत्ता बळकवतात आणि मग बाहेरून आंतरराष्ट्रीय आक्रमक येतात आणि ते देशी आणि मार्गी अशा दोन्ही सत्ता ताब्यात घेतात कारण परंपरा प्रिय लोक आपला समाज सडवतात तो इतका सडतो की बाहेरून आलेले मूठभर लोक हा समस्त समाज ताब्यात घेतात आपल्या आंतरराष्ट्रीय महामार्गी परंपरा लादतात आणि परंपरा परंपरा करत बसणारे हे मार्गी परंपरा वादी देशी परंपरावादी दोघेही हरतात आंतरराष्ट्रीय आक्रमक त्यांना त्यांच्याच देशात त्यांच्यावर उपकार केल्यासारख्या जागा देतात सरंजामशाही पद्धतीची साम्राज्यवादी पद्धतीची राजवट निर्माण करतात हे देशीवादी लोक इतके वेडे असतात की आंतरराष्ट्रीय आक्रमकाने दिलेल्या स्वतःच्याच देशातील सत्ता त्यांना स्वर्ग वाटायला लागते ते हे विसरतात की आपल्या पूर्वजांच्याकडे ही सत्ता होती ती कुठल्या आक्रमकाने दिलेली नाही ते आपलीच होती आणि आपण ती परंपरेमुळे गमावली ते परंपरेमुळे आंधळे होत जातात आपल्या देशात निर्माण झालेल्या आपल्या भाकर तुकड्यासारख्या सत्तेवर हे लोक खुश होतात आणि क्षेत्रपती बनतात आणि असे क्षेत्रपती कायमच मार्गी वर्चस्ववादी लोकांचे गुलाम असतात मग कधीतरी मार्गी वर्चस्ववादी लोक किंवा अंतरराष्ट्रीय वर्चस्ववादी लोक आपल्या पाटनरचाच काटा काढतात त्याच्या पाठीत खंजीर खुपसतात आणि मग या देशीवादी लोकांना जाग येते त्यांना कळून चुकते की मार्गी परंपरा वादी लोक आपले नाहीत आंतरराष्ट्रीय परंपरावादी लोक आपले नाहीत ते विस्तारवादी आहेत ते फक्त आपल्या धर्माचा आणि तत्त्वांचा प्रचार करायला आर्थिक शोषण करायला या देशात आलेले आहेत अशा वेळेला हे देशीवादी असणारे लोक बंड करायचा प्रयत्न करतात कधी हे बंड यशस्वी होते कधी कधी हे बंड अयशस्वी होते अनेकदा देशीवादी लोकच फुटतात आणि विखुरतात कधीकधी हे विखुरणे शौकात्म शॉकात्म आणि शौकात्म असते अशा वेळेला नवतेलाच पुढाकार घेऊन काही करावे लागत नवतेने असा पुढाकार घेतला नाही की मग मात्र खरी पंचाईत सुरू होते मग तो देश उठत नाही आतल्या आत पेटत राहतो आणि स्वतः जळत राहतो स्वतःच्याच राज्यकर्त्यांच्या कडून स्वतःला जाळून घेण्याची ही अवस्था त्या त्या देशातली त्या त्या प्रदेशातली भीषण अवस्था असते आणि याला जबाबदार तथाकथित पारंपारीक राज्यकर्ते असतात
भारतातल्या प्रत्येक धर्मात विचार प्रणाली मध्ये व्यवस्थापनामध्ये जालपणामध्ये प्रत्येक वर्णात प्रत्येक जातीत प्रत्येक जमातीत आपणाला नवाट आणि जुनाट असे दोन प्रकार आढळून येतात प्रश्न असतो तो वर्ण आणि ती जात तो धर्म आणि तो पंथ नवाटांनी व्यापलेला आहे की जुनाटानी व्यापलेला आहे ? जेव्हा एखादा वर्ण जात धर्म पंथ विचार प्रणाली व्यवस्थापन जालपन जुनाटतेने व्यापलेला -ले असतो-ते तेव्हा वर्ण जात धर्म पंथ विचार प्रणाली व्यवस्थापन जाल पण असहाय होत जातात तिथे नवतेला हळूहळू जागा मिळणे बंद होत जाते जुनाट लोक हे अनेकदा संस्कारामुळे तरी जुनाट असतात किंवा जुनाटता जूनता शाबूत ठेवणे त्यांच्या हितसंबंधाचे असते त्यांचे हितसंबंध जतन करणारे व राखणारे असते म्हणून ते जुनाट असतात आपल्या समाजावर असणारे आपले वर्चस्व नष्ट होऊ नये म्हणून त्यांची धडपड असते हे समाज कधी राष्ट्रीय असतात काही कधी प्रादेशिक असतात कधी कधी त्या त्या धर्मापुरते पंथापुरते वर्णापुरते आणि जातीपुरते किंवा त्या त्या विचारप्रणाली व्यवस्थापन आणि जाल पण यांच्या पुरते मर्यादित असतात
हे वर्चस्व आडवे किंवा हवे असते हुवे असते उभे असते कधी कधी खोल असते
भारतामध्ये नेहमी उभ्या वर्चस्वाचे पाच प्रकार तयार होतात
१ मार्गी वर्चस्व हे वर्चस्व राष्ट्रीय असते भारतामधले दोन वर्ण ब्राह्मण आणि वैश्य हे अनेकदा मार्गी असतात राज्य ही संस्था त्यांना मर्यादित करू शकत नाही हा इतिहास आहे कारण त्यांचा धार्मिक अथवा व्यापारी कारभार हा नेहमीच राज्य या संस्थेच्या पलीकडे असतो साहजिकच ते जास्तीत जास्त मार्गीयतेचा पुरस्कार करतात कधी कधी ते स्वतःचे राजे महाराजे निर्माण करतात सत्तेवर आणतात भारतातली जवळजवळ सर्व साम्राज्ये ही वैश्य वर्णामधून आलेल्या राजे महाराजांनी निर्माण केलेली आहेत किंवा मग वैश्य वर्णाच्या सहाय्याने निर्माण झालेली आहेत अनेकदा असे राजे महाराजे लोक शूद्र लोकांच्यातून उदयाला आलेले असतात आणि वैश्य त्यांच्या मागे उभे राहतात दोघे मिळून आपले साम्राज्य बनवतात वाढवतात
२ देशी वर्चस्व हे वर्चस्व फक्त आपल्या प्रदेशापुरते असते यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रीय आणि शूद्र यांचा समावेश होतो हा संघर्ष कायमच चाललेला असतो आणि आत्तापर्यंत तरी क्षत्रिय लोकांनी सूत्रांच्यावर कायमच राज्य गाजवलेले आहे असा आभास निर्माण करण्यात आलेला आहे प्रत्यक्षामध्ये अनेकदा सुधरांच्यातून निर्माण होणारे राज्यकर्ते हे वर्चस्व गाजवत असतात परंतु भारतीय वर्णव्यवस्था त्यांना शरीराचा दर्जा न देता क्षत्रियाचा दर्जा देऊन पुन्हा एकदा शत्रे यांचे वर्चस्व निर्माण करते हे वर्ष व इतके प्रबळ होते की खुद्दशूद्रांच्यातून आलेले राज्यकर्ते स्वतःला क्षत्रिय समजून त्यांना कोणी शूद्र म्हटले की खवळायला लागतात यामुळे शूद्रांची प्रचंड प्रमाणात पंचायत होते कारण राजा तर आपला आहे परंतु त्या राजाच्या वारसदारांच्यामुळे तो राजा आपला राहत नाही ज्याच्यासाठी आपण घाम गाळला मेहनत गेली कष्ट केली केले तो आपलाच राजा असा क्षत्रिय झालेला बघणे त्यांना फार दुःखी बनवते परंतु हे दुःख सुद्धा व्यक्त करण्याची संधी क्षत्रिय लोक देत नाहीत ब्राह्मणांचा नेहमीच अशा क्षत्रियांना क्षत्रिय म्हणून पाठिंबा असतो किंबहुना ब्राह्मण हा उद्योग अनेकदा करतात राज्याभिषेक करून एकदा त्या राजाला वैदिक आणि क्षत्रिय केला की आपले वर्ण वर्चस्व टिकते याची त्यांना पूर्णपणे माहिती असते आणि एकदा का देवाचा दर्जा सुत्रांच्यातून आलेल्या राजाला दिला की तो राजा पुन्हा सुधरांच्यातून आलेला आहे हे सांगणे सुद्धा अवघड बनते त्यामुळे अनेकदा पुढचे सुधरांचे राजे तयार होत नाहीत याला छेद कसा द्यायचा हा खरे तर प्रश्न आहे जोपर्यंत शूद्र स्वतःचा शैव धर्म म्हणून स्वतंत्र धर्म म्हणून मिरवत नाहीत त्याचा गाजावाजा करत नाही तोपर्यंत शूद्र हे कायमसूत्र राहण्याची शक्यता असते कारण तुम्ही एक तर शैव बनू शकता किंवा मग शूद्र बनू शकता कारण काही झाले तरी ब्राह्मणांनी निर्माण केलेले ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म आणि हिंदू धर्म तुम्हाला वरती खेचत नाहीत मान्यता देत नाहीत ते कायमच तुमची भलावन कशी शूद्र म्हणून होत राहील याची काळजी घेत राहतात अशा वेळेला आपला धर्म स्वतंत्र ठेवणे हेच सूत्रांच्या फायद्याचे असते तुमच्या वर्णनाच्या भानगडीतच नको आम्हाला तुमच्या वर्ण व्यवस्थेच्या भानगडीत आम्हाला नकोत असे ठणकवता येते. आम्ही सर्व आहोत आणि वेळ पडले तर तुमच्यावरही राज्य करू असा स्वाभिमान मिळवता येतो मिळवता आहे तो
३ पोटी वर्चस्व हे वर्ष व आपल्या आपल्या पोटी जातीपुरते किंवा पोटिलिंगापुरते मर्यादित राहते यामध्ये प्रामुख्याने आत्ताचे बीसी येतात आणि स्त्रिया येतात यांना कसलाच अधिकार नसल्याने केवळ इतरांच्या एकमेव एवढाच मार्ग उडतो अशावेळी धर्म नाकारण्याशिवाय पर्याय नसतो बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच हिंदू धर्माचा त्याग केला आणि तो योग्यच होता कारण जो धर्म तुम्हाला अस्पृश्य ठेवतो त्या धर्माला का कवटाळावे स्त्रियांना मात्र शूद्र म्हणून आणि पुन्हा जेंडर म्हणून पूर्ण स्वतंत्र काढण्यात आलेले आहे मी नेहमीच बनतो की स्त्रियांनी शैव धर्म स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे कारण हाच एक धर्म आहे जिथे शक्ती विश्वाची निर्माती आहे तर शिव ऍक्टिव्ह नाहीये म्हणजेच राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात शक्ती हीच मुख्य आहे आणि ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे त्यांच्यासाठी शिव उत्तम आहे स्त्री शक्ती हा शब्द नाही तरी आपण वापरतच असतो पण त्याचा अर्थ मात्र अनेकदा स्त्रिया समजून घेत नाहीत सर्व धर्म स्वीकारणे हे एकाच वेळेला परंपरेला आणि नव्हतेला आत्मसात करायला उपयोगी पडते मुख्य म्हणजे आपण ह्या विश्वाचे निर्माण केले आहे हा मुख्य आधार मिळून जातो
४ जमाती वर्चस्व जमाती वर्सेस व हे प्रामुख्याने आदिवासी लोकांच्यात असते आपापल्या आदिवासी जमाती किंवा भटक्या जमाती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणारे सत्ताधारी लोक हितेही असतात हे लोक कोणत्या टर्म्स आणि कंडिशन स्वीकारतात आणि नाकारतात ते पहावे लागते अलीकडे आदिवासी जमाती कमी झाल्या असल्या तरी प्रत्येक क्षेत्रात ग्रुप नावाची गोष्ट उदयाला आलेली आहे जी एखाद्या आदिवासी जमाती सारखीच फंक्शन करते यांना आपण नव्या जमाती म्हणू शकतो अनेकदा केवळ स्वतःच्या जमातीवर (टोळी किंवा ग्रुप वर) वर्चस्व गाजवण्यासाठी संपूर्ण ग् जमातीला जुनाट ठेवण्यात त्या त्या जमातीचे प्रमुख लोक तयार असतात अशा जुना टवादी सत्ताधाऱ्यांना हाकलून लावण्या अत्यंत आवश्यक असते कारण त्याशिवाय नवाट लोक नव्हता आणू शकत नाहीत
जुनाट लोकांच्यात जहाल आणि मवाळ असे दोन प्रवाह असतात यातील जहाल ज्याला आज आपण कर्मठ म्हणतो तसे असतात ते अजिबात सुधारणेला वाव देऊ इच्छित नाहीत नव्याला स्वीकारत नाहीत काही काही यामध्ये जुना आठवण म्हणतात बनतात ते त्यासाठी टोकाची हिंसा करायला तयार असतात आणि हेच लोक असतात ते अतिरेकी बनू शकतात त्यांना आपल्या विचारांच्या खेरीज आणि सनातन कर्मठ परंपरेखेरीज काहीही दिसत नसते साहजिकच त्यांचे रूपांतर मूलतत्त्ववादी लोकांच्यात होते हे लोक लोकांचे शत्रूच असतात जनतेचे हित ते कधीच लक्षात घेत नाहीत उलट जनता परंपरेप्रमाणे चालावी असे ते म्हणतात शब्द प्रामाण्या आणि चिन्ह प्रमाणे हा त्यांचा स्वभाव असतो हे पुस्तकातून बाहेर येत नाहीत एका अर्थाने हे पुस्तके असतात मात्र किडे नसतात तर डायनासोर असतात यांना आपण पुस्तकी डायनासोर म्हणू शकतो हे पुस्तके डायनासोर जगभरातच कहर माजवत आहेत किंबहुना उत्तर आधुनिकतेने जे काय फालतू उद्योग केले त्यात पुस्तकी डायनासोर्सना प्रचंड उत्तेजन हा एक उद्योग आहे आज गाजा पट्टी जे काही घडलेले आहे त्याला हेच डायनासोर ्स जबाबदार आहेत आता तर दोन्ही बाजूंनी पुस्तके डायनासोर्स लढत आहेत की काय अशी शंका येते आहे
याउलट जे मवाळ असतात ते सुधारण्याची शक्यता असते
नवाट लोकांच्यातही जहाल आणि मवाळ लोक असतात जे जहाल असतात ते क्रांतिकारक असतात त्यांना संपूर्ण व्यवस्था उलथून टाकावयाची असते ते त्याप्रमाणेच क्रांतिकारक ऍक्टिव्हिटी करण्यात मग्न असतात त्यांना सावकाश बदल पचत नाहीत अनेकदा त्यांना ती तडजोड वाटते हे नवाट लोक जेव्हा नवाठ बनतात तेव्हा मात्र खरी पंचायत सुरू होते कारण ते मग हिमसेला सोकावतात आणि असे लोक हिंसेचा अत्यंत धोकादायक खेळ निर्माण करू शकतात हे लोक नवतेला हानिकारक असतात कारण एकदा का कमालीची हिंसा स्वभाव आणली किती नव्हता नव्हता कमी आणि हिंसक राजवट जास्त बनते त्यामुळे अतिशय सावध राहणे आवश्यक असते त्या उलट जे मवाळ असतात ते उत्क्रांती कारक असतात त्यांचा क्रांतीवर विश्वास नसतो ते टप्प्याटप्प्याने नव्हता उत्क्रांत करण्यावर विश्वास ठेवतात आणि टप्प्याटप्प्याने सारी चळवळ पुढे नेऊ इ च्छितात
नवता :सर्जक , सर्जन, व्यवस्थापक आणि व्यवस्थापन श्रीधर तिळवे नाईक
कुठलीही नवता फक्त निर्माण होऊन चालत नाही तिला चांगल्या व्यवस्थापनाचीही गरज असते कलाक्षेत्रात व्यवस्थापन हे फार संवेदनशीलतेने करावे लागते हे व्यवस्थापन सत्तेचे राजकारण खेळायला लागले आणि हुकूमशहा बनून छाताडावर नाचायला लागले कि त्या नवतेची वाट लागते
मराठीत प्रबोधनवादी नवतेचे सर्जन महात्मा फुल्यांनी केले पण ह्या नवतेला चांगला व्यवस्थापकच लाभला नाही आणि प्रबोधनवाद मराठी साहित्यात नीट उमटलाच नाही साधं फुल्यांचं नाटक सुद्धा ह्या लोकांनी सादर केलं नाही त्याउलट केशवसुतांनी स्वछंदवादी नवतेचे सर्जन मर्यादित कुवतेनुसार केले आणि त्याचे व्यवस्थापन हे ब्राम्हणी परिघात घुटमळत राहिले वास्तविक ह्या नवतेला सावरकरांच्यासारखा क्रांतिकारक माणूस लाभला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेलाच नाही बालकवी आणि गडकरी ह्या उत्तम सर्जकांनी चांगले काम केले १९३० नंतर मात्र अचानक ह्या नवतेत एकापेक्षा एक दिग्गज कवी नाटककार निर्माण झाले आणि ही नवता बहरली कुसुमाग्रज बा भ बोरकर पु शि रेगे बहिणाबाई चौधरी ना घ देशपांडे पु ल देशपांडे आचार्य अत्रे ही ठळक नावे तिसरी फळी आली तीही दमदार ना धो महानोर ग्रेस आरती प्रभू लोकांचाच पाठिंबा असल्याने हिला व्यवस्थापनाची गरजच भासली नाही
व्यवस्थापनाची खरी गरज भासली ती आधुनिकतावादी नवतेला ! मर्ढेकरांनी आपला सर्जकाचा रोल उत्तम निभावला तर पुरुषोत्तम चित्रेंनी अभिरुचीद्वारा उत्तम व्यवस्थापन केले पुढे ह्या नवतेचे व्यवस्थापन केले ते श्री पु भागवत ह्यांनी त्यांनीच ह्या नवतेचा व्यवस्थापकीय प्रपंच नेटका उभा केला मात्र प्रतिमावाद हा आधुनिकतावादी चळवळीचा अनेक वादांपैकी केवळ एक वाद होता ह्याचाच त्यांना विसर पडला स्वतःच्या मनमानीने त्यांनी ही चळवळ फारच संकुचित केली आणि व्यवस्थापन सर्जनावर हावी झाले प्रतिमावादी चि त्र्यं खानोलकर जी ए कुलकर्णी ग्रेस ह्यांना मेन ट्रेंड बनवण्यात ह्या व्यवस्थापनाचा बराच हात होता त्यामुळे आधुनिकतावादी असूनही अस्तित्ववादी विलास सारंगही मागे पडले ह्यांचेच असूनही ! गोतावळा प्रतिमावादीही वाटत असल्याने प्रमोट केली गेली पण प्रतिमावादातून वास्तववादाकडे आणि नंतर फुलेवादाकडे वळलेले आनंद यादव नकोसे झाले आणि झोंबी मौजेबाहेरून आली
देशीवादी नवतेत सर्जक आणि व्यवस्थापक ह्या सीमारेषा अंधुक झाल्या आणि सर्जकांनी व्यवस्थापन न सांभाळता धडाक्याने पुस्तके काढली उदा नेमाडेंनी काढलेले चित्र्यांचे पुस्तक कवितेनंतरच्या कविता अपवाद अशोक शहाणे खरेतर अशोक शहाण्यांनी आपला व्यवस्थापकीय रोल अधिक नीट ओळखायला हवा होता आणि वर्षातून किमान चार पुस्तके काढायला हवी होती पण टाईमपास जास्त झाला आणि कोसलासारखी कादंबरी देशमुखीनंतर पॉप्युलर प्रकाशनासारख्या अतिशय उमद्या व्यवस्थापनाकडे गेली आणि ते बरेच झाले कारण अरुण कोलटकरांच्या कविता आणि गद्य काढायला शहाण्यांनी जो उशीर केला तो बघता कोसलाही अशीच रेंगाळत आली असती साहित्य मठांच्याविरुद्ध बंड करण्याचा आव आणणाऱ्या अनियतकालिकांची चळवळ नंतर पॉप्युलर प्रकाशनाच्या व्यवस्थापनात विसर्जित व्हावी हा क्रांतीचे व्यवस्थापन बोंबलले कि काय होते त्याचा नमुनाच म्हंटला पाहिजे मात्र साठोत्तरी व्यवस्थापनाने विशेषतः अशोक शहाण्यांनी मराठी पुस्तकांचा चेहरा बदलला हे मान्यच करावे लागले
चौथ्या नवतेचे आम्ही जेव्हा साहित्यात आलो तेव्हा आमच्यापुढे तिसऱ्या नवतेच्या व्यवस्थापनाचे काय झाले ते समोर होते श्री पु भागवत व्हायचं नाही आणि अशोक शहाणेही हे पक्के होते विंदा करंदीकरांनी मला कविता पॉप्युलर किंवा मौजेला पाठव असा सल्ला दिला माझी ह्या काळातील अक्कल झिरो होती त्यामुळे कसलाही विचार न करता मी एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार पॉप्युलरला पाठवून दिला बहुदा १९८५ ८६ साली आणि कवी काळा कि गोरा हे माहीत नसतांना पॉप्युलरने तो ताबडतोब स्वीकारला मी हा सस्पेन्स बऱ्यापैकी सांभाळला होता पण राजन गवस ह्या आमच्या मित्राने तो कोल्हापुरात येऊन फोडला मला २१ व्या वर्षीच थेट पॉप्युलरमध्येच एंट्री मिळाल्याने माझ्या वाट्याला काही लेखकाचा संघर्ष बिंघर्ष आला नाही मात्र नवता पसरवण्यासाठी हे पुरेसे न्हवते पॉप्युलर प्रकाशन जसे तिसऱ्या नवतेमागे ठामपणे उभे राहिले तसे चौथ्या नवतेमागे राहिले नाही आणि ही आपली चूक आहे हेही ह्या प्रकाशनाला कधी कळले नाही त्यामुळे आपल्याला चौथ्या नवतेचा प्लॅटफॉर्म उभे करणे गरजेचे आहे हे कळून चुकले १९९० पासून ह्या अंगाने माझ्या जे एस हॉल हॉस्टेलला आणि रूईयाच्या कट्ट्यावर अनेकांशी मिटींगा व्हायला लागल्या भालचंद्र कुबल हा माझा त्यावेळचा परम मित्र आशुतोष आपटे संजय सावंत संतोष क्षीरसागर हे चित्रकार मित्र व त्यांची जेजे गॅंग शेखर सरतांडेल गजेंद्र अहिरे निशिकांत कामत अभिजित पानसे ज्ञानदा समीर परांजपे मंगेश सोमण हे रुईयायिट असा त्यावेळचा माझा मित्रपरिवार होता ह्यातून चित्र स्पष्ट होत गेले आणि मी सर्जकाचा संपादकाचा आणि भालचंद्र कुबलने प्रकाशक व्यवस्थापकाचा रोल पार पाडायचा असे ठरले पुढे चंदू हा जयराज साळगावकरांचा मित्र असल्याने जयराजही ह्यात पुढे आला आणि सौष्ठवचा पहिला अंक आम्ही दणक्यात प्रकाशित केला कालनिर्णयने तो मस्त छापला होता ह्या अंकानेच प्रभावित होऊन एक तरुण पुढे आला त्याचे नाव हेमंत दिवटे ज्याला साहित्यात काहीतरी करायचे होते पण काय करायचे हे स्पष्ट न्हवते तो आता काहीही म्हणत असला तरी चौथ्या नवतेतलं त्याला शस्पही माहित न्हवते मात्र उत्साह भरपूर होता त्याच्या माझ्या मीटिंगमध्ये मी सर्जक आणि त्याने व्यवस्थापक अशी जबाबदारी वाटून घ्यायची ठरली आणि माझ्या मते ही एक चांगली जोडी होती आणि तिने आपले काम चोखपणे पार पाडले पुढे माझ्या कवितेमुळे जी केस झाली त्याने चित्र बदलले आणि उत्तरोत्तर राजकारणही वाढत गेले पण मी सर्जनाच्या अंगाने आणि हेमंत व्यवस्थापनाच्या अंगाने वाढत गेला दुर्देवाने इथे श्री पु भागवत नव्याने जन्मला आणि त्याने सर्वांनाच आपल्या कानाच्या खाली उभे करायला सुरवात केली ज्यांची उंचीच कमी होती ते थांबले आणि चमचे झाले ज्यांची जास्त होती ते बाहेर पडले
ह्यानंतरची पिढी हा सर्जक व्यवस्थापक प्रकार कसा पेलतीये हा प्रश्न आहे मुळात ह्या पिढीत असा काही प्लॅटफॉर्म का तयार झाला नाही जो नवी संवेदनशीलता प्रकट करेल वास्तविक मेघना भुस्कुटे आणि अभिजित रणदिवे ह्यांनी फार छान सुरवात केली पण घोडे नेमके कुठे पेंड खायला लागले ? नितीन वाघ कायतरी करतील असे वाटले होते त्यांचे काय झाले ? कि मुळात फेसबुक मीटिंग मेटींग आणि मेल्टिंग स्पॉट असल्याने अशा काही प्लॅटफॉर्मची गरजच उरलेली नाही ?कि प्रत्येकाचे इगो आडवे येतायत ?
ह्या पिढीचा एक चेहरा तयार झाला आहे काय ही पिढी आमच्या पिढीपेक्षा खरोखर कुठे वेगळी आहे त्याची मांडणी नेमकी कोण आणि कधी करणार ? ह्यांनी नव्वदोत्तर पिढी मुळात समग्र वाचायचा साधा प्रयत्न तरी केलाय का ? आम्ही हेलपाटे टाकून साठोत्तरी लेखन कमावले तसं ह्यांनी काही केलं का ? कि होम डिलिव्हरीची सवय झाल्याने ह्यांना सगळ्या क्रिएटिव्ह लेखनाचीही होम डिलिव्हरी हवी आहे ? माझा अनुभव असा कि हेही साठोत्तरीच्या मागे लागले हे म्हणजे आमच्या पिढीने मर्ढेकरांच्या नादाला लागण्यासारखं होतं त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि नव्वोदत्तरी पण साठोत्तरी च्या प्रभावाखाली आणि ही पिढीही ! ह्या पिढीने केलेल्या अनेक गोष्टी तुमच्या पिढीच्या आधीच कुणी केल्या असल्या तर ह्या पिढीला त्याचं श्रेय मिळणे अवघड आहे लेखनाला मान्यता मिळवण्याचा जो आटापिटा नव्वोदत्तरी पिढीने केला त्याच्या झाश्यात हे पण आलेत काय आणि त्या नादात आता स्वतःच्या क्रिएटिव्ह प्रोसेसकडे ही पिढी दुर्लक्ष्य करत आहे काय ?
पुढच्या पिढीचे कौतुक करून त्यांना सोकावून ठेवणारे साहित्यिक प्रत्येक पिढीत असतात त्याने काहीच फायदा होत नाही मुळात संपूर्ण जागतिक काव्यक्षेत्रातच एक प्रकारची मरगळ आहे मी माझे समकालीन युरोपियन अमेरिकन वाचतो तेव्हा फार ग्रेट कविता वाचतोय असं मला वाटत नाही आमच्या पिढीतले खरे कवी सर्वत्रच झाकले गेले असं दिसतंय आणि सर्वत्रच साठोत्तरीने पुढच्या पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्यातून फक्त तेच वाचलेत ज्यांनी मान्यतेचा टिळा लावायला नकार दिला एक मात्र खरे जोवर सर्जन आणि व्यवस्थापन ह्यांचा समतोल कसा साधायचा हे ह्या पिढीला स्पष्टपणे कळणार नाही तोवर ह्या पिढीचे साहित्य एक क्रिएटिव्ह चळवळ म्हणून उभे राहणे कठीण आहे आऊटडेटेड लोकांच्या मान्यता तुम्हाला अपडेट करत नाहीत त्या तुम्हांलाही ऑऊटडेटेड करत जातात धिस इज द हाय टाइम टू रिअलाईझ इट .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment