MUSIC AND OTHER ARTS

 आशुतोष दिवाण यांच्या संगीत विषयक एका पोस्टवर केलेली कॉमेंट श्रीधर तिळवे नाईक

आशुतोष दिवाण यांच्या संगीत विषयक एका पोस्टवर केलेली कॉमेंट श्रीधर तिळवे नाईक
गायकीमध्ये धर्माचा विचार न करता गायकीचाच विचार करावा हे उत्तम ! कुठलाही गायक जेव्हा भाव तंत्र निवडतो तेव्हा त्याच्या भावकीचा विचार गायकीमध्ये करावा लागतो आणि तुम्ही म्हणता त्या निरीक्षणात तथ्य आहे असे दिसते विशिष्ट प्रकारच्या दबावाखाली हे भावगायन चाललेले असते हा दबाव हिंदू धर्मातल्या गायकांच्या वर सुद्धा येऊ शकतो ख्रिश्चन धर्मातल्या चर्चमधल्या गायकीमध्ये तर हा दबाव कायमच होता रोमँटिक शैलीने हा दबाव झुगारून दिला आणि त्यातूनच पुढे आधुनिक गायन सुद्धा निर्माण झाले 
धर्म ही गायकीची कसोटी होऊ शकत नाही किंबहुना कुठल्याच कलेमध्ये धर्म ही कसोटी होऊ शकत नाही पण धर्माचा कलेवर परिणाम होत असतो हे स्वीकारावे लागते हा परिणाम नेमका काय स्वरूपाचा आहे याची चर्चा आपण करत नाही कारण आपणाला ही चर्चा करणे समाजापासून दूर लोटू शकते अशी भीती असते अलीकडे भारतातली संगीतघराणी ही कशी सर्व मुसलमानांच्या पासून सुरू होतात अशी मांडणी केली गेली होती हे फेसबुक वर झळकत होते. वास्तविक या पुरोगामी  लोकांना कोणीतरी सांगणे आवश्यक आहे की नाट्यशास्त्रामध्ये कायमच संगीतावर एक स्वतंत्र चाप्टर होता आता हा काय मुसलमानांनी लिहिला काय? घराणी ही संकल्पना भारतामध्ये इस्लामने आणली का अशी चर्चा व्हायला हवी आणि जर का इस्लामने आणली असेल तर असे काय घडले की इस्लामला घराणी निर्माण करावीशी वाटली ही चर्चा  व्हायला हवी ती करताना भारतीय संगीतामध्ये इस्लाम कळत नकळत भारतीय इस्लाम होऊन जातो हे आपण लक्षात घेतले पाहिजे अर्थात या सर्वाला सुफियाना टच देण्याचा प्रयत्न सतत चाललेला असतो उदाहरणार्थ अलीकडे ए आर रहमानने असा प्रकार जोरात चालू केला पण त्याला जितका प्रतिसाद हिंदूंचा मिळायला हवा होता तितका मिळालेला दिसत नाही त्या उलट मुसलमानाने मात्र त्याच्या अधिकच प्रेमात पडायला सुरुवात केली पण सेलवर त्याचा परिणाम निगेटिव्ह झालेला दिसतो
प्राचीन काळात हे जे गायक होते त्यातले कित्येक जण मूळचे शैव ब्राह्मण म्हणजे पंडित होते आणि पंडितांना गायन केले म्हणून कोणी शूद्राचा दर्जा देत नव्हते कारण शैव धर्मामध्ये कला ही अतिशय महत्त्वाची आहे परंतु मनुस्मृती जशी जशी झिरपत गेली तसे तसे पंडित गायक सुद्धा शूद्र आहेत का असा प्रश्न निर्माण होऊ लागला कारण वैष्णव लोकांच्याकडे नाट्यशास्त्र नव्हते त्यांनी शैव नाट्यशास्त्रामध्ये घाल घुसळ करून सर्व नट शूद्र होते अशी मांडणी अभिनव गुप्ताच्या नाट्यशास्त्रात शिरुन केली ज्याला आज भरताचे नाट्यशास्त्र म्हटले जाते ते प्रत्यक्षात अभिनव गुप्ताचे नाट्यशास्त्र आहे आणि त्याचा चेहरा मोहरा वैष्णव लोकांनी बदलून टाकला आणि ते आपल्या नावावर करायचा प्रयत्न केला शैव आणि वैष्णव यांच्यात जे काही फरक पडले त्यामध्ये नटांना शूद्र मानायचे की नाही असा प्रश्न होता शैवांच्या मध्ये खुद्द शंकर हाच नटराज असल्याने त्याच्या वर्ण जातीचा प्रश्नच नव्हता पण वैष्णव लोकांनी नाट्यशास्त्रात घुसून नट शूद्र केला आणि पुढे नट हेच गायक असल्याने गायक सुद्धा शूद्र होत गेले याचा एक दुष्परिणाम असा झाला की भारतातल्या पंडित गायकांना सुद्धा शूद्र ठरवायचे की नाही हा एक फार मोठा धर्म प्रश्न निर्माण झाला हळूहळू आपल्याला शूद्र हा दर्जा मिळण्याची शक्यता लक्षात आल्यावर या पंडित गायकांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला सुरुवात केली अपवाद फक्त बसवेश्वरांच्यामुळे कर्नाटक होता आणि त्यातूनच कर्नाटक संगीताची वेगळी परंपराच उभी राहिली ती पूर्वी फक्त दक्षिणात्य होती ती आता कर्नाटक झाली कारण कर्नाटकात सुरुवातीच्या कालखंडामध्ये वर्ण जातीभेदाविरोधात शैव धर्म लिंगायत धर्म म्हणून उभा राहिला होता हिंदुस्तानी म्हणजेच उत्तर भारतीय संगीतामध्ये हे घडले नाही आणि तुम्ही जर का बारकाईने पाहिले तर घराणी ही संकल्पना उत्तर भारतातच हिंदुस्तानी संगीतातच अधिक प्रभावी झालेली दिसते दक्षिणेतले जे लोक या हिंदुस्तानी परंपरेत घुसले त्यांनाही ती झक मारत फॉलो करावी लागली साहजिकच श्रद्धा शिव चरणी आणि गायकी अल्लाह केंद्री असा एक पॅराडॉक्स तयार होत गेला थोडे पुढे शिवचरणी गेले व विष्णू चरणी आले राम चरणी आले कृष्ण चरणी आले विशेषतः मुघल कालखंडात किंबहुना इस्लामचा कालखंड म्हणजे मुघल कालखंड ही जी प्रतिमा तयार झाली त्यात संगीताचा वाटा प्रचंड होता त्यातूनच तानसेन नावाचा फिनॉमिना तयार झाला आणि या तानसेनाने मुस्लिम धर्म स्वीकारून संपूर्ण संगीत मुस्लिम धर्मात लोटले त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झाला गायकीमध्ये एक प्रकारचे दुभंगले पण आले विशेषता विसाव्या शतकामध्ये हे वाढतच गेले कारण घराण्यांच्याकडून आलेली रागदारी हीच मुळात हिंदू होती आणि त्याची अभिव्यक्ती मात्र इस्लामच्या अंगाने करणे गरजेचे बनले तुम्ही जर बारकाईने संगीत ऐकले तर हा दुभंगलेपणा वाद्य संगीतात नाहीये हे तुमच्या लक्षात येईल कारण तिथे शब्दांची गरज भासत नाही त्यामुळे धार्मिक दबाव पण कमी होतो त्यामुळे झाकीर हुसेन च्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम येत नाही गायकीमध्ये मात्र घरंदाजपणा डोकावणे आवश्यक आहे या घराणेशाहीच्या आग्रहाखातर अनेक गायक आरटीफिशियल होत जातात हा घराण्याचा दबाव हा मुस्लिम गायकांच्या वर जास्त आहे त्यामुळे साहजिकच तेथे हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात दिसतो यावर खूप काही लिहिण्यासारखे आहे पण थांबतो.
श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना