MANUSMRUTI

 आज मनुस्मृति दहनदिन ! ती कोणी लिहिली यावर प्रचंड वाद आहे त्यावर मी इतरत्र चर्चा केली आहे जो पहिला मनू होता तो नेमका काय होता याचा एक कलावंत म्हणून मी घेतलेला शोध अडा हो का बानासुना या कादंबरीमध्ये आलेला आहे तिचा एक भाग या मनुवर आहे मात्र त्याने मनुस्मृती लिहिली यावर माझा विश्वास नाही असो 


मनुस्मृति ही एक अशी स्मृती आहे जिचे ७०० पूर्वी भारतात कधी राज्यच नव्हते साधारणपणे ५०० च्या आसपास उत्तरेकडून आश्रय मागण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांनी ती दक्षिण भारतात आणली ७०० च्या आसपास ती दक्षिण भारतात काही ठिकाणी प्रवेश करायला लागली ८०० च्या आसपास ती उत्तर भारतात व केरळमध्ये प्रथम प्रस्थापित झाली आणि अत्यंत जाजवल पद्धतीने तिने आपले राजकीय करण प्रस्थापित केले बाराव्या शतकानंतर उत्तर यादव काळामध्ये ही महाराष्ट्रामध्ये व उत्तर भारतामध्ये पूर्णच प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली आणि तिने नंतर सर्वत्र राज्य केले आणि इथूनच भारताचे अध:पतन सुरू झाले. कारण ती आल्यानंतरच समाजाच्या वर्णांच्या मध्ये आणि जातींच्या मध्ये चिरफाळ्या झाल्या अर्थात फक्त तीच नाही तर अनेक स्मृतींच्या मुळे हे घडलेले आहे मुख्य म्हणजे त्या काळामध्ये शैव लोकांच्या मध्ये असणारे मराठा जाट गुर्जर परमार राजपूत यादव पंजाबी (हे आता शीख झाल्याने वेगळे काढता येत नाहीत) हे वीर समाज हे या काळामध्ये वैष्णव झाल्याने त्यांनी काही ठिकाणी मनुस्मृतीच्या राज्याला संरक्षण द्यायला सुरू केले अर्थात त्यामुळे या समाजांच्या मध्ये दुफळी पडली कारण काही वीर लोकांना मनुस्मृती पचनी पडली नाही शैव धर्मामध्ये राजाला स्वतःचे कायदे करण्याचे अधिकार असतात हे अधिकार आपण का सोडावेत असा प्रश्न या समाजांच्यापुढे पडला होता आजही या समाजाने आपले हे अधिकार का सोडले हा प्रश्न नेहमीच मला पडत असतो केवळ क्षत्रिय या संज्ञेसाठी ही धडपड या लोकांनी का करावी असाही प्रश्न मला नेहमी पडतो केवळ देवाचा अवतार म्हणून मान मिळतो म्हणून? पण हा मान फक्त राजाला मिळतो हे लक्षात घेण्याजोगे आहे इतरांना मिळत नाही आणि तरीही हे घडलेले दिसते आणखी एक कारण असावे ते म्हणजे शैव राजांच्या मध्ये पडलेली राज प्रथा या प्रथेनुसार दर पाच वर्षांनी राजाने आपली संपत्ती गरीब लोकांना व जनतेला दान करायची असते विशेषतः हर्षवर्धनाच्या काळामध्ये ती प्रचंड प्रस्थापित झाली होती आणि तिचा खूप गाजावाजा अलीकडे होतो कारण ह्यू एन स्तंग या चायनीज लेखकाने ती तपशीलासह सादर केली आहे मुळात ही प्रथा दर बारा वर्षाची होती आणि त्या मागचा उद्देश राज्यकारभारासाठी आवश्यक असलेला पैसा स्वतःकडे ठेवून जनतेकडून कर म्हणून घेतलेला अतिरिक्त पैसा जनतेला जावा इतकाच होता सर्वसाधारणपणे दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हे सर्व होत होते पुढे हे बदलत गेले आणि हर्षवर्धनामुळेच ही प्रथा पाच वर्षाची झाली नंतर नंतर मात्र ती हटतच गेली कारण राजे कळत नकळत हे पैसे मंदिर निर्माण करण्यासाठी वापरायला लागले आणि त्यातूनच सातव्या शतकानंतर केवळ लोकधर्म म्हणून वावरणारा शैव धर्म भक्तीप्रधान होत गेला आणि भारतामध्ये प्रचंड शैव मंदिरे उभी राहायला लागली हा ब्राह्मणवादाचा परिणाम आहे हे तर उघडच आहे पण यामुळेच कदाचित वैष्णवधर्म अधिक बरा वाटला असावा कारण त्यामध्ये राजे लोकांना पैसा असा लोकांना देण्याऐवजी स्मृतीनुसार पैसा स्वतःच्या ताब्यात ठेवता येत होता राज्याच्या ताब्यात राज्यातली सर्व जमीन येत होती आणि कुठलीही जमीन प्राप्त करण्याचा अधिकार राजाला मिळत होता इतकेच कशाला स्त्रियांच्या वरचे अधिकार सुद्धा वाढत होते आता अशी संहिता कोण सोडेल ? हे काय आहे हे बघायचे असेल तर या काळातल्या राजे लोकांच्या लीला बघाव्यात विशेषत: नानासाहेब पेशवे आणि दुसरा बाजीराव हा याचे साक्षात उदाहरण आहे


हा देश मनुस्मृतीच्या तडाख्यात बाराशे वर्ष सापडलेला असूनही बहुजन समाजाला ती वाचण्याचा अधिकारच नसल्याने तिच्यात नेमके आपल्याबद्दल काय म्हटले आहे हे सुद्धा ब्राह्मणांच्याकडून समजून घ्यावे लागते आणि यामुळेच ती काहीतरी फार पवित्र आहे असा गैरसमज निर्माण झाला साहजिकच तिची अंमलबजावणी ही झाली आणि याला कळत नकळत मुस्लिम राजवटीही जबाबदार होत्या कारण त्या हिंदू लोकांच्या बाबतीत स्मृती लागू करत होत्या किंवा त्यांचे स्वतःचे शरीयत लागू करत होत्या आणि मूर्ती पूजकांना जी वागणूक कुराणानुसार द्यायची होती ती हिंदूंना दिली जात होती जनतेपुढे या काळामध्ये दोनच प्रकारचे कायदे होते पहिला स्मृतीनुसार आणि दुसरा कुराणानुसार हे दोन्हीही कायदे इतके सरंजामवादी आणि राजेशाही वादी आहेत की यात डावे उजवे करणे अवघड जाते दोन्ही प्रकारच्या कायद्यांच्या मध्ये गुलामगिरीचे कट्टर समर्थन होते साहजिकच या कायद्यांच्या विरोधात बंड होणे अटळ होते त्या बंडाचे प्रारूप ठरवण्यासाठीच बसवेश्वर यांनी संपूर्ण भारतातून शैव तज्ञ बोलवले होते आणि अनुभव मंडपात आणि कल्याण मंडपात कल्याण सभा घडली होती तिच्यानंतरच बसवेश्वर यांच्या अनुयायांच्यावर हल्ले सुरू झाले दुसरे बंड गुरुनानक यांचे होते आणि त्यामुळेच शिखांचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले जे मनुस्मृती पाळत नव्हते दुर्दैवाने नंतर तिथेही झिरपायला लागली तिसरे सर्वात मोठे बंड छत्रपती शिवाजी महाराजांचे होते ह्या बंडाने मनुस्मृतीला सरळ सरळ बाजूला सारले आणि आपले कायदे पुन्हा एकदा शैव धर्मानुसार प्रस्थापित केले पुढे तर संभाजी महाराजांनी गुलामगिरी नष्ट करणाराच कायदा आणला आणि त्यामुळेच ब्राह्मणवादाशी त्यांचा कट्टर संघर्ष निर्माण झाला किंबहुना त्यामुळेच संभाजी महाराजांना जास्त टार्गेट केले गेले कारण गुलामगिरी नष्ट करणे कुणालाच आवडणारे नव्हते विशेषत: जे कट्टर सरंजामदार होते त्यापैकी कोणालाही हे पसंत पडले नाही यात ब्राह्मण होते तसे या प्रथेचे समर्थक काही क्षत्रिय आणि मुसलमानही होते साहजिकच त्यांच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थान रचले गेले असे माझे मत आहे आणि परिणाम इतकाच झाला की ते औरंगजेबाला सापडले या काळात काही पंडित आणि शैव मात्र त्याच्यासोबत होते हे लक्षात घेण्याजोगे आहे. सेवक म्हणून ठेवणे आणि गुलाम म्हणून ठेवणे यामध्ये प्रचंड फरक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे सेवकाला पगार द्यावा लागतो आणि त्याला नोकरी सोडून जाण्याचा अधिकार असतो गुलामाला असा अधिकार नसतो आणि पगारही नसतो शैव धर्म सेवक मानतो गुलामगिरी मानत नाही इस्लाम व वैष्णव धर्म गुलामगिरीचे दास पद्धतीचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना हे परवडणारे नव्हतेच म्हणूनच छत्रपती संभाजीच्या विरोधात संपूर्ण मुगल रियासत राजपुतांच्या सकट उभी राहिली 


पुढे नानासाहेब पेशव्यांना जो उच्चवर्णीय पाठिंबा मिळालेला आहे त्याच्यामागे स्मृति कायद्यानुसार या देशातल्या उच्चवर्णीय लोकांना मिळणारे अनेक फायदे आहेत त्यातील काही फायदे हे गुलामगिरीतून येतात दास प्रथेतून येतात इस्लाम मध्ये काही गुलामांना नंतर त्यांनी जी सेवा केली त्याबद्दल स्वातंत्र्य देऊन करिअर करण्याचा सुद्धा चान्स मिळालेला दिसतो त्यातून एक चक्क गुलाम नावाचे घराणेच स्वतःचे राज्य स्वतः प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेले दिसते अशा प्रकारे एखादा दास हिंदू लोकांच्या मध्ये राज्यकर्ता झाला का असा प्रश्न नेहमी उपस्थित करावा लागतो आणि तो प्रश्न उपस्थित केला की वर्ण व्यवस्था ही काय करत होती ते स्पष्ट दिसते पुढेही युरोपियन लोकांना गुलाम हवे होते आणि म्हणूनच त्यांनी गुलामगिरीचे कट्टर समर्थन केले आणि ख्रिश्चन धर्म हा गुलामगिरीचे समर्थन करणारा होता व आहे हे महात्मा फुले यांच्या लक्षात आले की नाही याबद्दल मला शंका आहे बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र या सर्व गोष्टी स्पष्ट होत्या आणि म्हणूनच अस्पृश्यांच्या गुलामगिरीचे मूळ हे मनुस्मृतीमध्ये आहे हे त्यांनी ओळखले होते कारण इंग्रजांच्या काळामध्ये स्मृती सुद्धा निश्चित झाली होती आणि ती प्रामुख्याने मनुस्मृतीच होती साहजिकच बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य की अयोग्य यावरून वाद सुरू झाले मुळात यातले सर्वच वाद हे व्यवस्थेच्या अंगाने नव्हते त्यातील एक वाद ज्ञानाच्या अंगाने होता या पक्षाचे म्हणणे असे होते की गुलामगिरीचे समर्थन हे सर्व ग्रीक विचारवंतांनी सुद्धा केलेले आहे किंवा ख्रिश्चन धर्माने सुद्धा केलेले आहे किंवा ज्यू आणि इस्लाम धर्माने सुद्धा केले आहे अगदी वैष्णव समर्थन करणाऱ्या रामायण आणि महाभारत या महाकाव्यांनी सुद्धा गुलामगिरीचे समर्थनच केलेले आहे म्हणूनच तर पांडवांना दास द्रौपदीला दासी बनावे लागलेले आहे आणि त्यातूनच तर सर्व महाभारत घडलेले आहे मग गुलामगिरीचे समर्थ आहे म्हणून ग्रंथ जाळायचे असतील तर कोणते कोणते ग्रंथ आणि काय काय जाळणार ? त्यापेक्षा यांच्यामध्ये असलेले ज्ञान हे मानवी समाजाचा इतिहास म्हणून आपण जतन केले पाहिजे आणि त्यानुसारच गुलामगिरीचे समर्थन करणारे सर्व ग्रंथ हे आपण विरोधक ग्रंथ म्हणून पाहिले पाहिजेत पण ते जाळण्याची आवश्यकता नाही कारण मग जाळायचे असतील तर गुलामगिरीचे समर्थन करणारे सर्वच ग्रंथ जाळा नाहीतर एक पण जाळू नका दुर्दैवाने ही बाजू समर्थपणे मांडण्यात आलीच नाही कारण या काळामध्ये कुठल्या कुठल्या धर्मग्रंथांमध्ये काय काय कसे कसे गुलामगिरीचे समर्थन आहे याविषयी प्रचंड अज्ञान होते यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने जो युक्तिवाद होता तो असा होता की इतरत्र गुलामगिरी पाळण्याची प्रथा असली तरी तिचे समर्थन असले तरी जन्मदत्त वर्णव्यवस्था नाही त्यामुळे काहीतरी स्वतंत्र होण्याचा चान्स आहे हिंदू धर्मामध्ये मात्र मनुस्मृतीमध्ये असा चान्सच नाही त्यामुळे मनुस्मृती ही पूर्णपणे इतर ग्रंथांच्या पेक्षा अस्पृश्यांच्या गुलामगिरी बाबत दासप्रथे बाबत वेगळी आहे ती जन्मदत्त गुलामगिरी लादते आणि म्हणूनच ती जाळली पाहिजे प्रत्यक्षामध्ये मात्र ज्यू लोकांचा धर्मग्रंथ जुना करार सुद्धा कळत नकळत जन्मदत्त गुलामगिरी स्पॉन्सर करत होता गुलामांच्या मुलांना गुलामच मानले जात होते आणि इस्लामने त्याची री ओढली होती मात्र मालकाच्या मर्जीनुसार काही वेळा गुलामाने चांगली गुलामी केली किंवा जीव वाचवला वगैरे कारणासाठी काही प्रमाणात का होईना परंतु सुटका होती ही वस्तुस्थिती आहे उदाहरणार्थ मोहम्मद पैगंबर यांनी त्यांचे स्वतःचे सर्व गुलाम हे मरणा पूर्वी गुलामगिरीतून मुक्त केले होते आणि माझ्या माहितीनुसार ऍरिस्टॉटल याने पूर्वी हेच केले होते मात्र आयुष्यभर हे लोक गुलाम पाळत होते हे लक्षात घेण्याजोगे आहे 


माझा स्वतःचा विरोध सर्वच प्रकारच्या गुलामगिरीला आहे त्यामुळे कुठल्याच गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या ग्रंथाला मी पाठिंबा द्यायला तयार नाही 


मग मनुस्मृतिदहनाकडे आता पाहायचे कसे ? माझ्या मते याकडे आपण अस्पृश्य समाजाने व्यक्त केलेला राग संताप, त्यांच्यावर लादल्या गेलेल्या वर्णव्यवस्थेविरोधात त्यांनी केलेल्या बंडाची सुरुवात आणि ह्या रागाला संतापाला पुरोगामी लोकांनी दिलेला पाठिंबा असे म्हणून पाहिले पाहिजे आणि माझ्या मते या देशांमध्ये एकदा तरी मनुस्मृती दहन होणे आवश्यकच होते कारण त्यामुळेच तिच्यामध्ये काय प्रकारचा आशय आहे याची निदान सर्वांगीण चिकित्सा सुरू झाली. पूर्वी ती होती परंतु ती इतकी दाहक झाली नव्हती मनुस्मृतीच्या विरोधात अनेकदा मी स्वतः लिहिलेले आहे अनेकांनी लिहिलेले आहे कुठलाही शहाणा मनुष्य ज्याने ही स्मृती वाचली आहे तिला पाठिंबा देणे शक्य नाही आणि जे लोक तिला पाठिंबा देतात ते माझ्या मते कळत नकळत वर्ण व्यवस्थेचे समर्थक असतात मग ते तोंडाने काहीही बोलोत कुठल्याही वाईट ग्रंथात चांगले काही ना काही असतेच ते काढून दाखवून त्यातल्या सगळ्या मूलभूत गोष्टींचे समर्थन करायचे असा एक नवीन पायंडा हल्ली पडतो आहे की काय अशी शंका मला येते आहे मुळात हा पायंडा साठोत्तरी पिढीने पुन्हा जिवंत केला मेहंदळे नावाचे गृहस्थ या बाबतीत अग्रेसर दिसतात काही बाबतीत चक्क मे पु रेगे यांनीही याबाबत काम केलेले दिसते ज्यामुळे दलित लोकांच्यात ते छुपे हिंदुत्ववादी आहेत अशी प्रतिमा तयार झाली माझ्या मते हिंदुत्ववाद्यांनी स्वतःला मनुस्मृती पासून दूर ठेवावे तिचे समर्थन करण्याच्या भानगडीत पडू नये कारण तिच्यात जे आहे ते अमानुष आहे मानवतेला काळीमा फासणारे आहे ते एक ना एक दिवस तुम्हालाही महागात पडणार आहे तिच्यामुळे तुमची सुद्धा अध् : पतनच होते तिचा वापर करून सर्वच बाजूने समाजाला आणि सामान्य जनतेला खायचे हे आता बंद झाले पाहिजे 


मनुस्मृती दहन दिवस साजरा झालाच पाहिजे कारण ती येऊ नये म्हणून समाजाला सतत सावध करणे गरजेचे बनते आपला समाज सतत झोपी जातो आणि अशा सतत झोपी जाणाऱ्या समाजाला जागृत ठेवण्यासाठी ढोल वाजवावे लागतात मनुस्मृती दहन दिवस हा असा ढोल आहे जोपर्यंत संपूर्ण समाज आधुनिक होत नाही तोपर्यंत तो वाजवत राहिला पाहिजे 


श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना