मोक्ष स्पंद

 चाललो पुन्हा पंजाबला 

जिथे गुरुनानकांनी डोळा दिला 


डोळ्याचे झाले होते ऑपरेशन 

पण गुरुद्वाराने घेतले माझे सेशन 


पाहता पाहता लोकेशन झाले स्पष्ट 

मला स्वच्छ दिसायला लागले चष्मा लावण्याचे न घेता कष्ट 


चंदीगड म्हणाले अरे झाली तुझ्यावर कृपा 

शेवटी बापाने बाप पाठवला 

डोळ्यात गुरुनानकांच्या टापा 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष स्पंद या काव्यफायलीतून)


लाईफस्टाईल श्रीधर तिळवे नाईक


नुसत्या बघण्याने कामवासनेचे डोळे निवत 

आता बघणे तुडुंब

आणि स्पर्शशून्य प्रहर


दृश्यांच्यात किती टाइमपास करायचा ?

फुले दुरून न्याहाळायची वास न घेता 


दुरूनच देव बघायचे 

आणि म्हणायचे 

हा मोक्षाचा धर्माचा क्लोज शॉट आहे 


दुरूनच डिटेल्स जोजवत बसायचे शरीरांचे 

आणि उणीवांच्यावर टच ठेवत 

टची व्हायचं 

उसळायचं

तळमळायचं


सगळंच ठेवायचं स्क्रीनच्या अंतरावर 

आणि जगात रस असल्याचा खोटा फील 

स्किन मध्ये घ्यायचा 

स्कॅन करत राहायचं

डार्क मॅटर शार्क एनर्जी शार्प गती 

एक्सिलरेट करत राहायचं ॲक्सेसनां 

वापरायचं ॲक्सेसरीज समजून


दाखवायचं 

मिरवायचं 

तोरवायचं 

प्रदर्शन मांडायचं 


एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करायचा 

एक आर्टिफिशल लाईफ स्टाईल डेव्हलप करायची 

रोज तिचा एफएसआय मोजायचा 

आणि वाढला की खुश व्हायचं आतल्या आत इमोजी बनत इमौजी फाकवत 


दुरूनच जग जगायचं 

आणि आत जे पाझरतय 

त्याला झरा म्हणायचं

त्याच्यातूनच आर्टिफिशल पाणी प्यायचं 

फेक गळ्यानं 

गायचं थेंब थेंब


भ्यायचं आत मध्ये वाकून पाहायला सतत 

आणि भीतीने दात विचकले 

की पडद्यावर ठेवायचं लपवत 

स्वतःला 


दुसऱ्यांची माप काढायची 

स्वतःचे कपडे सादर करायचे 


इतकं आर्टिफिशियल व्हायचं 

की मरताना सुपर कम्प्युटर दिसलो पाहिजे

स्क्रीनवर 

लाइव्ह 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सिरीज मधील मोक्ष स्पंद या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना