नामदेव ढसाळ यांचे समकालीन कवींच्या विषयीचे म्हणणे व वस्तुस्थिती श्रीधर तिळवे नाईक
फेसबुक वर नामदेव ढसाळ यांनी अनुष्ठुभच्या नामदेव ढसाळ विशेष अंकात जी मुलाकात दिली होती त्यात त्यांच्या समकालीन कवींच्या विषयी त्यांनी जे म्हंटले होते ते फिरते आहे ढसाळांच्या सारख्या उत्तम कवीचे हे म्हणणे असल्याने त्याचा विचार करणे भाग आहे ढसाळ म्हणतात
हे जे असं स्वतःच्या समकालीन लोकांच्या बद्दल बोलणं असतं ना ते फार महत्त्वाचं असतं . त्या त्या काळातल्या माणसांच्या इनसाइट्स काय होत्या हे स्पष्ट करतात या इन्साइट्स आपणही तपासायलाच हव्यात म्हणजे उदाहरणार्थ अरुण कोल्हटकर यांच्या कवितेत अतिवास्तववाद फार कमी आहे असे म्हणतात तर ते काही खरं नाही किंवा अरुण कोलटकर यांची ग्रोथ झाली नाही असं ते म्हणतात तर तसं दिसत नाही त्यांच्या काही कविता अद्भुत आहेत उदाहरणार्थ तक्ता ही कविता ही अस्सल सर रियल कविता आहे अशा किमान पाच कविता आहेतच नामदेव ढसाळ म्हणतात म्हणून आपण ते स्वीकारालाच हवे असे नाही त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी कल्पनाशक्ती आहेच की ! आता वारकरी संप्रदायाच्या वारी विषयी अरुण कोल्हटकर यांच्यात का येते तर आतून आध्यात्मिक किंवा मोक्षिक काही आहे का तसं काही कोलटकरांच्या कवितेत दिसत नाही किंबहुना नामदेव ढसाळ यांचे निरीक्षण याबाबतीत खरं आहे वारीचा काही परिणाम झालेला दिसत नाही पण मग वारीला निर्वानाच्या दृष्टिकोनातूनच पाहता येईल असं म्हणता येईल का? जर अरुण कोलटकर यांच्यासारखा कोणी एक तिरकस नजरेने बघू शकतोच त्यांच्या जेजुरीवर नेमाडेनीं अशीच टीका केलेली आहे मुळात मराठी शैली नावाचा काही प्रकार असतो का ह्या प्रश्नाचे आधुनिक उत्तर अरुण कोलटकर यांनी दिले पुन्हा भिजकी वही मधले अरुण कोलटकर वेगळेच आहेत तर ग्रोथ नव्हती वगैरे काही खरं नाही मुळात ही ग्रोथ दिसायला थोडा ओपन चष्मा असायला हवा तसा तो ढसाळ यांचा आहे असे वाटत नाही काही नामदेव ढसा ळ यांच्याच मर्यादा आहेत परिवर्तन वादाच्या ज्या आंबेडकरवादी दृष्टिकोनातून ते बघतायत ती फक्त एक आयडियालॉजी आहे आताच प्रत्येक जणच त्या आयडियालॉजीला अनुरूप असं काही लिहिल असं थोडंच असणार ? चंद्रकांत पाटलांच्या विषयीचे त्यांचे निरीक्षण बरोबर आहे पण हे सतीश काळसेकर यांच्या बाबतीतही आहे दोघेही सारखेच उथळ आहेत पण ते डाव्या असल्याने डासा मूल्यमापन करताना थोडे उदार होतात त्या काळामध्ये हा उदारमतवाद ठीकच आहे पण आमच्या पिढीने तो का स्वीकारावा ? सतीश काळसेकर कमिटमेंटबाबतीत छान पण कवितेत एकंदरीत सपाट आहेत पण ढसाळ यांना हे कोण समजणार ? ढसाळ म्हणतात त्याप्रमाणे दिलीप चित्रे हे जास्त प्रोलिटरीयेट वर्गाच्या जास्त जवळ आहेत हे खरं आहे पण प्रयोगाच्या दृष्टीने कोल्हटकर जास्त प्रायोगिक आहेत चित्र्यांची स्वतःची म्हणून एक शैली आहे ती ऑक्टोविया पाझपासून आलेली आहे तर ढसाळ यांनी ते बहुदा वाचलेले नसावेत ते वाचले असते तर चित्रे फार ओरिजिनल आहेत हा त्यांचा गैरसमज दूर झाला असता किंवा वाचूनही मित्र प्रेम आडवे आले असावे पाझने मानवी जीवनात स्त्री रुष स्त्री-पुरुष यांच्यात जे देहभोग्lक्षण असतात त्यांचा आधुनिक जल्लोष आणि उत्तराधुनिक उत्सव साजरा केला उशिरागे यांनी पुरोगामी पद्धतीने हे सर्व आणले होते आणि ह्या देहभोगक्षण ह्या अंगाने चित्रे यांनी ते ते पाच यांच्याप्रमाणे आधुनिक आणि उत्तर आधुनिक पद्धतीने देहाला देहाला उत्सव आणि जल्लोष भिडवत त्यांचे सेलिब्रेशन करत जे लिहिलं आहे ते मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे मुळातच स्त्री आणि पुरुषांचे देह हे अत्यंत सनातन आहेत त्यात नवीन काय असणार असाच प्रश्न पडावा पण या प्रश्नाचे नवीन उत्तर ऑक्टोवेया पाच पाच याने शोधले चित्रे यांनी ते मराठीत दाखल केले त्याचा थेट प्रभाव आपणाला नामदेव ढसाळ यांच्यावर पडलेला दिसतो मात्र नांदेड असा नामदेव ढसाळ हे चित्रांच्यासारखे वैयक्तिक राहत नाहीत ते तिथेही आंबेडकर वाद घेऊन देहभो क्षणात शिरतात आणि स्त्रीच्या शोषणाच्या तरा सुद्धा त्या जल्लोषात आणतात एका अर्थाने चित्रे यांना त्यांच्या स्वतःच्या डोळ्यादेखत त्यांच्या कवितेला पुढे घेऊन जाणारा माणूस लाभावा हा. विलक्षण योगायोग म्हणावा दुर्दैवाने चित्रे यांच्या या सर्व कवितांच्यात पु शी रेगे यांच्या कवितेप्रमाणे एकसुरीपणा आहे सगळ्या स्त्रिया सारख्याच दिसतात आणि ही त्या स्त्रियांची मर्यादा नाही ती कवींची मर्यादा आहे आजही आमच्या पिढीत देह भोग सणांचे काय करायचे हा प्रश्न पुरेसा सुटला असं वाटत नाही काही कारण स्त्री पुरुष देह सनातन आहेत अगदी थेट आपण गाथा सप्तशती पासून ते ट्रेस करत आणले अजंठा एलोरा ते पडताळले तरी प्रत्येक काळात या देह भोग क्षणांना काही नवीन त्याचेस टचेस त्या त्या काळातल्या कलावंतांनी शोधलेले दिसतात कोलटकर स्त्रियांच्या बाबतीत फार सरफेस वर रेंगाळतात की काय अशी शंका येते याबाबत त्यांचा सर्वश्रेष्ठ रह संग्रह हा भिजकी वही हाच आहे चेरीमध्ये तल्या चिरीमीरी मधल्या वेश्या या खऱ्या वाटत नाहीत त्यांना त्यांच्या शोषणाची काही जाणीव आहे असे वाटत नाही एका विशिष्ट पद्धतीने जणूकाही त्यांचे प्रेझेंटेशन होते आणि ही गोष्ट फार ऑड आहे जणूकाही त्यांनी वेश्याव्यवसाय स्वीकारलेला आहे असे वाटते हे वैष्णव संवेदनशीलतेमुळे घडलेले आहे जी शोषण पाहू देत नाही कोलट करा ना ते दिसत नाही ढसाळ यांना बौद्ध व आंबेडकरवादी अँगल प्राप्त झाल्याने त्यांना मात्र स्त्रियांचे शोषण दिसतेच दिसते पु शी रेगे व दिलीप चित्रे यांना हे जाणवते पण दिसत नाही रेगे तर आपली मध्यमवर्ग चौकट ओलांडायलाच तयार नाहीत एक प्रकारचा रोमँटिक गुलछबूपणा त्यांच्या कवितेत आहे ज्याचे अनेकांना आकर्षण आहे त्याचे मूळ थेट गालिब पासून सुरू होते
चित्रे यांचे वारकरी संप्रदाया विषयीचे प्रेम कृत्रिम वाटते म्हणजे अरुण कोल्हटकर तिरकस आहेत तर दिलीप चित्रे चौकस आहेत दोघांपैकी कोणी सकस नाही वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक वारकरी संप्रदायाला जाऊन मिळाल्याने त्यांनी आधुनिकतेपासून मिळणारी ताकद गमावली दुसरी गोष्ट ढसाळांची बरोबर आहे की वारकरी चळवळीचा खोलात जाऊन तळ तपासलाच नाही. पण ढसाळ यामागचे कारण तपासत नाहीत वस्तुस्थिती अशी आहे की या लोकांना देशी सपोर्ट हवा होता परंपरेचा आधार हवा होता तो त्यांनी वारकरी चळवळीत शोधला प्रत्यक्ष परखड मूल्यमापन केलेच नाही
तुळशी परब यांच्या विषयी त्यांनी जे मांडले ते खर आहे कारण त्यांच्याकडे मात्र ओरिजिनलच काहीतरी आहे म्हणजे असं काही मी जागतिक कवितेत वाचलेलं नाही म्हणजे चित्रे वाचताना किंवा कोलटकर वाचताना असा फील येत नाही पण तुळशी परब वाचताना वाटतं की अरे असं काही जगात लिहिले गेलेले नाही पण त्यांनी खूप कमी लिहिले त्यामुळे कंगोरे खूप कमी आहेत मला तुळशी परब जितके माहित होते त्या तुळशी परब यांच्या व्यक्तिमत्वात खूपच कंगोरे होते आहेत त्यातलं काही कवितेत आलं नाही किंवा त्यांच्या ह्या कविता अत्यंत जाणीवपूर्वक पुढे आणल्या गेलेल्या नसाव्यात कारण त्या चळवळीला हानिकारक आहेत किंवा असाव्यात अर्थात एक मर्यादा आहे तुळशी परब यांच्यातही चळवळीचे आत्मपरीक्षण मिसिंग आहे आणि ते नामदेव ढसाळ यांच्यात पण मिसिंग आहे कारण आयडिया लॉजी बाबत हे आयडिया लॉजिक कडून प्रचंड जखडले गेले होते त्यामुळे चळवळीचे मूल्यमापन करतानाही त्या लोकांनी ते आयडियालॉजीच्या चौकटीतच केले आहे पण इतरांच्यापेक्षा ढसाळ याबाबत फार पुढे आहेत हेच खरं आणि याचे एकमेव कारण त्यांनी आयुष्य जगत असताना घेतलेली रिस्क आणि त्यामुळे लाभलेली विविधता होय अशा रिस्कस त्यांच्या समकालीनापैकी फार कमी लोकांनी घेतल्या म्हणजे चित्रे यांनीही घेतल्या पण ढसाळ जितके असुरक्षित वाटतात तसे चित्रे वाटत नाहीत त्यांना कळत नकळत प्रस्थापित व्यवस्था मदत करते असं वाटतं वास्तविक प्रस्थापित व्यवस्थेला व्यवस्थेने नामदेव ढसाळ यांना जास्त मदत केलेली दिसते आणि ढसाळ यांनी ती घेतलेली दिसते पण नामदेव ढसाळ यांची असुरक्षितता कधीच जात नाही त्या उलट चित्रे हे जास्त असुरक्षित असूनही त्यांना मात्र सुरक्षितता प्राप्त झालेली दिसते हे नेमके कशामुळे होते की आंतरराष्ट्रीय आधार मिळाल्याने चित्रे बदललेले आहेत? कि नामदेव ढसाळ हे दलित वर्गातून आल्यामुळे ही असुरक्षितता जात नाही आणि त्यामुळे हे घडलेले आहे? मुख्य म्हणजे ढसाळ यांनी ज्या तडजोडी केल्या त्याही वारे माप होत्या त्याच्याही कविता झाल्या स्वतःच्या तृष्णांचे कंगोरे जितक्या सहजपणे कोलटकर चित्रे साईडलाईन करतात तसे ढसाळ करत नाहीत उलट ते अनेकदा अत्यंत प्रामाणिक राहून कवितेत आणतात आणि यामुळेही ढसाळ वेगळे वाटतात
ढसाळ यांचा आणखी एक मुद्दा असा की चळवळीत म्हणून काहीजण दादा असतात ते चित्रे आणि नेमाडे यांना कळत नकळत दादा म्हणतात माझे स्वतःचे निरीक्षण असे की चित्रे हे कवितेबाबत आणि नेमाडे हे कादंबरी आणि इतर गद्यबाबत असे दादा होते आणि आहेत मी जेव्हा अभिधाचा संपादक होतो तेव्हा दिलीप चित्रे विशेषांक काढण्यामागे माझ्या ज्या काही भूमिका होत्या त्यात चित्रे यांचे हे दादा असणेही महत्त्वाचे वाटत होते दिलीप चित्रे नेमके कविता विषय काय विचार करतात हे जाणून घेणे कायमच गरजेचें बनलेले आहे आणि होते मी स्वतः ढसाळ यांना ग्रंथालीच्या कार्यक्रमात या संदर्भात विचारले असता ते म्हणाले होते की दिलीपची रेंज प्रचंड आहे ती आमच्यापैकी कोणाकडेच नाही तर ही रेंज असणे ही त्या त्या व्यक्तीने कमावलेली गोष्ट असते चित्रे यांनी ती कमावली होती चित्रे यांच्याशी गप्पा मारताना जगातल्या अनेक मोठमोठ्या कवींच्याविषयी तुम्ही सहज बोलू शकत होता अर्थातच माझ्यासारख्याला त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत होत्या आणि मी त्या त्यांना स्पष्टपणे दाखवूनही दिल्या होत्या हीच गोष्ट नेमाडे यांच्या बाबतीत कादंबरी संदर्भात म्हणता येते त्यांनीही कादंबरी बाबत अशी रेंज कमावलेली होती. आमच्या पिढीत मात्र अर्धवट अभ्यासराव खूप झाले वाचायचं नाही खोलात जायचं नाही आणि फक्त मिरवायचं किंबहुना आमच्या पिढीत आणि आत्ताच्या पिढीतही करिअरिस्ट लोक भरपूर आलेले आहेत कवितेत नाव कमवायला आलेले हे करिअरीस्ट लोक सगळीकडेच माजलेले दिसतात अगदी काही कवियत्रीही याला अपवाद नाहीत दादा माणूस हा मुळात करिअरिस्ट असत नाही त्याच्याकडे मुळात Passion असावी लागते अशा प्रकारची पॅशन माझ्या समकालीन लोकांच्यापैकी कितीजणांच्यात होती हा प्रश्न मला कायमच पडलेला आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की चित्रे आणि नेमाडे हे पुढे करिअरिष्ट झाले आणि अत्यंत चुकीचे लोक जातील काही करिअरिस्ट होतें प्रमोट करण्यामध्ये त्यांनी म्हातारपण वाया घालवले घालवत आहेत वास्तविक चांगल्या आणि सशक्त लोकांच्या मागे उभे राहणे हे अत्यंत आवश्यक असते हे घडलेले दिसत नाही आपला देशीवादाचा अजेंडा पुढे नेण्यात यांना जास्त रस आहे त्याने आमच्या पिढीचे आणि आमच्या पुढच्या पिढीचे प्रचंड नुकसान केलेले दिसते नामदेव ढसाळ यांचे वैशिष्ट्य असेल की त्यांनी हा उद्योग केला नाही कदाचित त्यांना दादा मानलेच जात नव्हते आणि त्याचा त्यांना फायदाच झाला नाहीतर माहित नाही किती वाईट कवी प्रमोट झाले असते
थोडक्यात काय तर ढसाळ यांनी समकालीन कवींचा जो विचार केला त्याचा आमच्या पिढीतल्या आणि आमच्या नंतर आलेल्या पिढीतल्या लोकांनीही खोलवर विचार करावा ढसाळांची मतं विचारात घ्यावी पण ती काही अंतिम मानू नयेत मुख्य म्हणजे ती मते खरोखरच खरी आहेत का हे तपासावे साठोत्तरीत प्रत्येक कवीचे स्वतःचे म्हणून एक राजकारण आहे एक साहित्यकारण आहे हे लोक स्वतः फार शुद्ध असल्याचा सुंदर आव आणतात प्रत्यक्षात त्यांची सगळी मांडणी एक हिशेब लावून झालेली असते ढसाळ याला अपवाद नाहीत त्यांचेही स्वतःचे काही आयडियालॉजिकल हिशेब आहेत याचे भान ठेवावे अनेक लोक देशीवादाला मान्यता मिळाल्याने आणि त्यांनाही ही मान्यता हवी असल्याने परखड परीक्षण करत नाहीत हा माझा अनुभव आहे असे ज्येष्ठ लोकांच्या वाहत जाऊ नये अन्यथा आपण देशीवादाचा विस्तार बनतो याचे भान राखावे
श्रीधर तिळवे नाईक
अनुष्टुभ, ९७ या नामदेव ढसाळ यांच्या बाबतीत काढलेल्या विशेषांकात, सतिश काळसेकर यांच्या, अरुण कोलटकर यांच्या बाबतीत, नामदेव ढसाळ यांना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना,
प्रश्न: आता तू तुझ्या चार पाच समकालीन कवि विषयी बोलावंस असं मला वाटतं.
नामदेव ढसाळ: अरुण कोलटकर माझा मित्र आहे. चांगला माणूस आहे चांगली जाण असलेला. चांगल्या कविलेखकाच मधल्या काळात असं लक्षण मानलं जायचं, की त्याला वैश्विक वाड्मयीन किती ज्ञान आहे, त्यानं काय वाचलंय, किती लोक वाचलेत वगैरे. खरं तर कवीची साहित्यिक कृती हेच त्याला तपासायचं परिमाण असलं पाहिजे. ही साहित्यिक कृती व्यक्ती, समष्टीच्या व्याकुळतेतून येते. अरुणची सर्व कविता जर पाहिली तर टोटल वक्रोक्तीच आहे. इझमच्या दृष्टीनं सर- रिअॅलिझमच्या ज्या डेफिनेशन्स वाङ्मयातले लोक सांगतात, मला वाटतं, की अरुणच्या कवितेत त्याचा शंभरावा भाग पण येत नाही. मी असा विचार करतो, की ज्या व्हिजननं या माणसानं सुरुवात केली तर शेवटपर्यंत, आयुष्याच्या अंतापर्यंत तेच व्हिजन ठेवणं म्हणजे वाढ खुंटलीच. लाईफभर त्याच व्हिजननं तो कसा काय चालणार? म्हणजे जीवनातल्या एका विशिष्ट फॅक्ट्च्या शिवाय त्यानं बाकीचं सर्व नाकारलेलं आहे. ती एक त्याची स्टाईल आहे. त्याची एक व्हिजन आहे पण ती काही फार मोठी ग्रेट नाही. त्याचे बाकीचे जे काही फॅन्स आहेत तसा मी काही त्याचा फॅन नाही. मी काही बाबतीत जरा विचक्षणच आहे. तर कशातून आला हा विचक्षणपणा ? तर मी फार ग्रेट आहे असं दाखवण्यासाठी नाहीच पण मी असं पाहिलंय, की लाईफ असं नसतं ना रे सरळसोट. बैलाच्या मुसंडीसारखं. काहीतरी फडकं दिसलं लाल की धावलं त्याच्यावर. शिवाय साठच्या दशकानंतरच्या कवींनी वारकरी संप्रदायाचं जे उदात्तीकरण केलं त्याचंही नीट विश्लेषण किंवा ते स्वीकारणं या मंडळींकडून झालेलं नाही.
त्या वेळचा जो पारमार्थिक विचार आहे किंवा ईश्वरवादाचा .. जो विचार आहे, तसाच सामाजिक लोकशाही वगैरेचा जो मुद्दा मांडला गेला त्याचाही स्वीकार या मंडळींनी किती केला? तुकारामाच्या कॉन्ट्रडिक्शन्स, त्याच्या लाईफमधल्या, त्याचे प्रतिस्पर्धी, त्याच्या मारामाऱ्या, या सगळ्यामधलं पॉझिटिव्ह अरुणनं किती घेतलं, मला माहीत नाही. तर अरुण जे सर्व सांगतो, की तो पंढरपूरला गेला, यात्रा केली, आळंदीला गेला तर त्याचा तसा परिणाम त्याच्या कवितेत कुठं आलाय ? त्याच्यातलंही जे असं मनस्वी पकडणं आहे ना, ते कुठं आलेलं मला दिसत नाही. मोठा कवी म्हणून जर पहायचं झालं, तर हा मोठा आहे, तो मोठा आहे, असं म्हणण्यापेक्षा या सर्व साठनंतरच्या किंवा सत्तरनंतरच्या काळातल्या वाङ्मयीन व्यवहाराच्या अंगानं काय-काय पॉझिटिव्ह आलंय आणि आपल्या मर्यादा काय, हे कळण्याची चांगली गोष्ट म्हणजे आपल्या समकालीन मित्रांवर बारीक लक्ष ठेवणं. तर तसं मी खूप बारीक लक्ष ठेवतो. दिलीपचं एक छान आहे, तो स्वतःला नॉनकमिटेड म्हणतो. नॉनकमिटेड पोलिटिकल अर्थानं आहे, पण विविध बाह्य सृष्टीतली व्यामिश्रता तो छान पकडतो. दि.पु. चित्रे आणि अरुण कोलटकर या दोघांमध्ये जर तुलना करायची झाली तर अरुण कोलटकर मला एलीट क्लासचा वाटतो. सेक्सच्या अंगानंच जीवनाचा विचार करणारा असतानाही दिलीप मला बूर्जा वाटत नाही, प्रोलेटेरिअन वाटतो. जेवढी व्यामिश्रता त्याच्या कवितेत सापडते तितकी अरुण कोलटकरच्या कवितेत सापडत नाही. मला या दोघांच्या तुलनेत दिलीप जास्त जवळचा वाटतो. त्याची आणि माझी मैत्री आहे म्हणून नाही, तर भाषेच्या, नादाच्या, लयीच्या, आशयाच्या दृष्टीनं आपण काय काय प्रयोग करू शकतो याचा ठळक प्रत्यय त्याच्या कवितेतून दिसतो. त्याची कुवतत्च आपल्याला दाखवते, की हा मोठ्या रेंजचा आहे. तसं कोलटकरच्या कवितेत नाही.
"मैं भाभीको बोला
क्या भाईसाबके ड्यूटीपे मैं आ जाऊँ?- भडक गयी साली"
या अरुणच्या कवितेत जी ट्रीटमेंट आहे ती कशी आहे, तर स्त्री-पुरुषसंबंधामध्ये आपला देश किती ट्रेंडीशनल आहे, त्याला हे धक्का देणं आहे. जिथं अॅक्ट करण्याची डायरेक्ट गोष्ट आहे तिथं कवितेतनं कशाला तुम्ही धक्का देता? मग सोशल रिफॉर्म करा ना. तर ही असली विचित्र मानसिकता तुम्हाला सर्व समष्टीपासून दूर नेते असं मला वाटतं. हा : लोनलीनेसमधला कवी आहे आणि लोनलीनेस फार चमत्कार करतो असं मानणाऱ्यांपैकी मी नाही.मनोहर ओकमध्ये एक पोटॅन्शिलिटी आहे. तर ती कशी ? त्याच्या कवितेतून जे व्यक्त होतं ते महानगरी अधोविश्वाच्या एका परिसीमेवरलं आहे. तो पुढं जाऊ शकला नाही पण त्यानं भाषेच्या अंगानं ज्या नवीन गोष्टी केल्या किंवा काही नवीन फ्रेशिस केल्या, नवीन वाक्यरचना केल्या त्या संपूर्ण महानगराचं जे वातावरण आहे ते विदित करतातच पण कवीची मानसिकताही सांगतात. सर्व तन्हेची बंधनं मोडून विमुक्तपणे लिहिणारा असा तो कवी होता. त्याच्या कवितेची रचना रामदासाच्या खडाष्टकासारखी आहे. तिला आधुनिकतेची जोड मिळायला हवी होती. काही काळ त्यानं मराठी कवितेत आशयरचनेच्या अंगानं बरा प्रयोग केला पण त्याची अनुभूती सीमित होती. नंतर तो संपूर्ण ट्रॅक पुढं नेणं त्याला जमलं नाही. त्याच्यातल्या ज्या कॉन्ट्रडिक्शन्स आहेत त्याही त्याला झेपल्या नाहीत आणि तिथपर्यंत त्याची झेपही नव्हती. किती महानगरी पातळ्यांवर तुम्ही जगता आणि हे जगण्याचं भाग्य किती लोकांना मिळतं? जर तुमचं व्हिजन द्रष्टं असेल कवितेतलं, तर तुम्ही फार छान लिहू शकता. या दृष्टीनं आपल्याकडे तसा फार दुष्काळ आहे. उदा. आता बघ, मध्ये आम्ही पाटीवाल्यांची संघटना बांधली, वेश्यांच्या युनियन चालवल्या, हे आता कुठल्या थरावरलं जगणं आहे? एक म्हणजे यासाठी तुम्ही न्यूट्रल पाहिजे. कमिटमेंट माझी आहे पण न्यूट्रल या अर्थानं की या अॅटमॉस्फिअरमध्ये तुम्ही कुठं आहात? मोर्चा नेऊन मी त्या वेश्यांना सांगीन की बायांनो, तुम्हाला या व्यवस्थेनं कसं नागवलं. पण ती जेव्हा माझ्या कवितेचा विषय होईल त्या वेळेला माझ्या मनातले जे आयडिअल्स आहेत ते तिच्या कॅरॅक्टरच्या माथी मी मारणार नाही.आता तुळशी परब, त्याच्यामुळे मला ओझरते, जसजसे जमेल तसे परदेशी कवी, लेखक वाचण्याची सवय लागली आहे. एकेकाळी पोलिटिकल कार्यकर्ता म्हणून त्यानं लाईफ स्वीकारलं. आज तो कुठं आहे तेही आपल्या समोर आहे. त्याच्या कवितेत अनुस्यूत असा गूढवाद जो एकनाथाशी किंवा अजून कुणाशी साधर्म्य सांगतो, मी त्याचं अजून नीट विश्लेषण करत नाही, अशी गूढ पद्धतीची काहीतरी त्याची स्टाईल त्या काळात होती. तिचा एक इम्पॅक्ट माझ्यावर असायचा पण मला जेव्हा व्हिजन आलं ना तेव्हा वाटलं हे फसवं आहे. याच्यात फसायचं नाही. जेव्हा एक चर्चा होते... कवितेची, वाङ्मयाची, गिव्ह आणि टेकची त्यावेळी काही लोक टेन्शनखाली असतात. कोणीतरी दादा असतो तुमच्या ग्रुपमध्ये. समजा, नेमाडे आला तर सर्व जे लोक आहेत ते कान बारीक करून ऐकतील. दिलीप चित्रे आला तर कानाचे दहा कान करून ऐकतील. असं एक ठरलेलं असतं, की दादा कोण असेल त्याचं जरा सीरिअस होऊन ऐकायचं. तर अशी जेव्हा भूमिका येते ना, तेव्हा बऱ्याचदा आपण कुठंतरी पक्षपाती होतो. माझ्या बाबतीत मी एक केलं, मी कधी पक्षपाती नाही झालो. तुळशीवर माझा जो राग आहे तो -वेगळाच आहे. त्यानं पोलिटिकल गोष्टीसाठी काम करायला पाहिजे आणि त्यानं जे स्वीकारलं त्याच्यातून पराभूत होण्याच्या पलीकडे काहीच आलं नाही. कास्टचा जो विचार आहे तो आमच्या लिटल मॅगझीनमध्ये नव्हता. आता कास्टचा विचार करून साहित्यात राजकारण चाललंय. त्यानं काहीतरी मोठा अॅक्ट करावा असं मला वाटतं. अशी निकोप चर्चा करणारे जे चार-पाच लोक होते त्यांत तुळशी होता. तुळशी आणि मी तसं आयुष्यभर बोलतोच आहोत.चंद्या पाटील नावाचा माझा एक मित्र या मधल्या काळात माझ्याजवळ आला. माझ्या एक लक्षात आलं, की त्याच्या प्राध्यापकी पोपटपंचीतून मला काहीच मिळालं नाही. समजा,मी निरक्षर आहे, माझा बुद्धयंक खालच्या लेव्हलचा आहे आणि मला जर वाङ्मयीन व्यवहार समजून घ्यायचा आहे तर चंद्या पाटील मला कसं समजावेल? तो खाली येईल?तर चंद्याच्या कविता जेव्हा आल्या 'निःसंदर्भ' या संग्रहातल्या तेव्हा नावापासूनच मला आवडल्या नाहीत; कारण निःसंदर्भ आयुष्यच नसतं, निःसंदर्भ सृष्टीच नाही. जेव्हा त्याचं दुसरं पुस्तक आलं 'बायका आणि इतर कविता', तेव्हा मला जरा. त्याची ग्रोथ वाटली पण ही ग्रोथ स्त्री-पुरुषांतल्या शोषणालाव्यक्त करणारी नव्हती. चंद्याचा बाईकडे पहाण्याची दृष्टिकोन परंपरावादीच आहे. आयडिऑलॉजीच्या अर्थानं देखील चंद्या मला माझ्याजवळचा कधीच वाटला नाही. कवी म्हणून कवितिक व्यवहार अभिव्यक्तीचा. तुमचा दर्जा काय? तुम्ही निर्माण केलेले त्याचे मापदंड काय? त्यांचा दर्जा काय?त्याची चर्चा होऊ शकते पण हे सर्व करताना माणसाचं रिलेशन ठेवणं, नातं ठेवणं महत्त्वाचं आहे. असे चार-पाच लोक माझ्याजवळ आहेत, की ज्यांच्या कविता मला आवडतात. उदा. तुळशी परबची आवडते, सतीशच्या तर आवडतातच, अरुण कोलटकरचीही काही अंशी आवडते पण आता तो पुढं नवं काहीच लिहीत नाही.
Comments
Post a Comment