क्रांती नवता आणि मोक्ष

 क्रांती नवता आणि मोक्ष 


गेली अनेक दशके मी क्रांती आणि नव्हता या दोन वेगळ्या गोष्टी म्हणूनच मांडतो आहे याचे कारण त्या तशा आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की क्रांती हा शब्द आपण अत्यंत स्वस्त केलेले प्रत्यक्षात तो जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यामागे एक व्यापक असे होता त्यामागे एक संपूर्ण परिवर्तन अभिप्रेत होते जगामध्ये क्रांती क्रांती ह्या फक्त सातच झाल्या त्यातली पहिली क्रांती ही होमो इरेक्टर्स बनणे ही होती त्यानंतरची दुसरी क्रांती ही होमोसेपियन बनणे ही होती या होमोसे पेन बनण्यातून एक विशिष्ट जीवनशैली निर्माण झाली जिला आज आपण आदीम जीवनशैली म्हणतो ही आदिम जीवनशैली माणसाला येणाऱ्या अनुभवाच्या आधारे हवी होती तिचा मुख्य आधार श्रद्धा होती या श्रद्धेतून अनेक रुढी निर्माण झाल्या आणि त्यांचे हळूहळू कायदे बनले या काळामध्ये प्रत्येक टोळीच्या स्वतःच्या रुढी होत्या. या रूढीच कायदा बनले आणि त्यानुसारच टोळी चालत होती ही एक आदिम व्यवस्था होती जी हजारो वर्षे नीट चाललेली होती. हिला चॅलेंज देता येईल असे कधीच कोणाला वाटले नव्हते पण भगवान शंकर नावाची एक व्यक्ती निर्माण झाली आणि तिने हे सर्व काही बदलून टाकले


मोक्ष ही मानवी इतिहासातील सर्वात महत्वाची अशी तिसरी क्रांती म्हणजेच आद्य क्रांति आहे आधीच्या क्रांती यहा सहज स्वाभाविक पद्धतीने घडल्या होत्या. हिते मात्र मनुष्याने प्रथमच एका व्यवस्थेला आव्हान दिले तोपर्यंत मनुष्य परिवर्तनावर विश्वास ठेवत नव्हता निसर्ग जसा आहे तसा समजून घ्यावा आणि स्वीकारावा अशीच त्याची वृत्ती होती. मानवी स्वभाव बदलता येत नाही यावर त्याचा ठाम विश्वास होता. समाज व्यवस्था नवीन निर्माण करणे तर त्याच्या स्वप्नात सुद्धा नव्हते जशी चालत आलेली आहे तशी रोडी आणि रिवाज चालू ठेवावेत हेच त्याचे ध्येय बनलेले होते साहजिकच सर्वत्र आदिवासी जमातींच्या मध्ये एक साचले पण आलेले होते हे सगळे साचले पण भगवान शंकराने धुऊन काढले म्हणूनच त्यांची प्रतिमा ही संवाराशी जोडली गेली हा संहार जितका व्यक्तिगत पातळीवर होतात तितकाच तो सामूहिक पातळीवरही होतात किंबहुना प्रस्थापित व्यवस्थेचा लय घडवून आणणे संवाद घडवून आणणे सहार घडवून आणणे ही जी प्रतिमान अंतर तयार केली गेलेली आहे ती यातूनच तयार झालेली आहे सातत्याने तिसऱ्या डोळ्याची चर्चा ही याच अंगाने होते कारण मोक्ष हा असा तिसरा डोळा आहे जो तुम्हाला संपूर्ण जग वेगळ्या पद्धतीने अनेक क्रांतिकारक बदलासहित दाखवून देतो म्हणूनच त्याला महा मोक्ष म्हणतात हर हा शब्द सुद्धा त्यातूनच आलेला आहे सर्व काही हरण करणारा तो हर प्रस्थापित मूल्ये हरण करतो तो हर आणि आणि याची सुरुवात संशय घेण्यातून होते जो प्रत्येक प्रस्थापित गोष्टीची शंका घेतो तो शंकर म्हणजेच शंकर ही आद्य अवस्था आहे एकदा शंकर आणि हर पूर्ण झाले की मग नवीन मुले तयार करायला घेतली जातात हा जो नवीन मूल्य तयार करतो तो आद्य योगी होय आद्य क्रांतिकारक होय तो भगवान होय म्हणजेच शंकर हर आणि भगवान अशी ही तीन रुपे आहेत यातील शंकर हा सतत शंका घेणार असल्यानेच त्याचे काय करायचे ते कळत नाही त्याच्याविषयी अनेक दंतकथा रचल्या जातात साहजिकच त्यालाच पुढे महादेव म्हटले गेले महादेवाने तत्कालीन सगळे देव स्वतःच्या छत्रछायेखाली आणले मोक्ष ही आत्मक्रांती असते ती माणसाला संपूर्ण बदलते साहजिकच माणूस जसा जन्माला आलेला आहे तसा शेवटपर्यंत राहतो या आद्य प्रमेयाला सिद्ध हक्का मारते किंबहुना माणूस बदलू शकतो हा विश्वास प्रथम भगवान शंकरांनी निर्माण केला शंकरांच्या पूर्वी श्रद्धा हाच मानवी जीवनाचा पाया बनला होता वास्तविक ्त बनणे होमो-इरेक्टस हा ही फार मोठी क्रांती होती मी हिला आरंभ म्हणतो त्यानंतरची दुसरी क्रांती ही भगवान शंकरानीं घडवून आणली त्यांनी कलेला एक शिस्त दिली नाट्यशास्त्र निर्माण केले त्यांनी तर्कशास्त्र आणले या तडकाच्या आधारे पुढे गणित आणि भूमिती निर्माण झाली आणि शेती ही निर्माण झाली. माणूस पशुपालनाकडून शेतीकडे सरकला त्याने प्रथम आयुर्वेदांना त्याला शिस्त दिली आणि त्यातूनच त्यांची प्रतिमा वैद्यश्वर अशी झाली हे सर्व जेव्हा इतिहास नावाची संकल्पना ही अस्तित्वात नव्हती तेव्हा घडल्याने केवळ दंतकथेच्या रूपातच किंवा काही सूत्रांच्या रूपातच आता जिवंत राहिलेले आहे हे ज्या प्रकारच्या कागदावर लिहिले गेलेले होते त्यातील काहीही शिल्लक नाही कारण ते सगळे ऑरगॅनिक होते आपल्याकडे अनेक लोक एक गोष्ट विसरतात ती म्हणजे टॅबलेटची संकल्पना फक्त वाळवंटा तयार होऊ शकते किंवा नदीच्या वाळवंटात तयार होऊ शकते त्याला विशिष्ट टेक्निक डेव्हलप व्हावी लागते हे टेक्निक माणसाला इसवी सन पूर्व 5000 च्या आसपास सापडायला लागले तोपर्यंत ते धरतीवर अस्तित्वात नव्हते शैवांच्यबाबतीत झाले असे की झाडांच्या कागदावर हे सर्व लिहिले गेल्याने ते नष्ट झाले आणि सर्व धर्म फक्त मौखिक परंपरेच्या आधारेच उभा राहिला गमतीचा भाग असा की जे स्वतःच मौखिक परंपरेच्या आधारे उभे आहेत ते या अंगाने नेहमी प्रश्नचिन्ह उभे करत असतात वैदिक कालखंडानंतर श्रमण कालखंड निर्माण झाला तो लिखित कालखंडातच निर्माण झालेला आहे साहजिकच हा कालखंड आपणाला स्पष्टपणे लिखित रूपात उपलब्ध आहे आणि इथेच मॅन्युफिलेशन सुरू होते ब्राह्मण धर्माने ज्याप्रमाणे मौखिकतेचा फायदा घेतला त्याचप्रमाणे जैन व बौद्ध लोकांनी लिखित चा फायदा घ्यायला सुरुवात केली यामध्ये लोकांचा धर्म असलेला शैवधर्म मारला गेला आणि ही मोक्ष क्रांती स्पष्टपणे उलगडण्याआधीच तिच्या विरोधात प्रतिक्रांत्या झाल्या यातली पहिली प्रतिक्रांती ही झोराष्ट्रियन होती तिने पुन्हा एकदा श्रद्धा निर्माण केली तिचे अनुकरण करत वैदिक प्रतिक्रांती निर्माण झाली झेंद अवेस्ता आणि वेद या दोघांनी श्रद्धाच पुन्हा मानवी समाजाच्या केंद्रस्थाने आणायला सुरुवात केली. पुढे या विरोधात पुन्हा नकुलिश पतंजली हेरण्य बळी कपिल पार्श्वनाथ यांनी मोक्ष क्रांती घडवून श्रद्धेला आव्हान दिले तर त्या विरोधात पुन्हा एकदा ब्राह्मणांनी ब्राह्मण धर्म स्थापन करून प्रतिक्रांती केली याला पुन्हा एकदा आव्हान देऊन भगवान महावीर आणि भगवान बुद्धाने मोक्षाची स्थापना केली आणि पुन्हा एकदा श्रद्धा बाजूला पडली याच्या विरोधात पुन्हा एकदा मोजेस जीजस व्यास व मोहम्मद पैगंबर यांनी प्रतिक्रांती घडवून पुन्हा एकदा श्रद्धा स्थापित केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा धर्माचे पुनर्जीवन झाले याला पुन्हा आव्हान देऊन बसवेश्वर यांनी मोक्ष स्थापन केला शैव धर्म पुन्हा लिंगायत रूपात स्थापन केला त्यांची ही क्रांती पुढे गुरुनानक आणि शिवाजी महाराजांनी पुढे नेली या विरोधात पुन्हा एकदा प्रतिक्रांती झाली ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो या हिंदू धर्माने पुन्हा एकदा श्रद्धा वर्णव्यवस्था जाती व्यवस्था या सर्व गोष्टींची पुन्हा स्थापना केली इतकेच नव्हे तर मनुस्मृति पुन्हा एकदा आणली त्यांना वारकरी संप्रदायासारख्या अनेक वैष्णव संप्रदायाने मदत केली ही प्रतिक्रांती होती आणि ती अतिशय शांतपणे घडवली गेली


**"

पुस्तक परिचयात असत्य गोष्टी लिहू नयेत तो लेख अभिधानंतर संदर्भात आहे मी अभिधाच्या चळवळीला जाऊन मिळालेलो नाही कारण अभिधाची चळवळ अस्तित्वातच नव्हती मी सौष्ठवचा चौथा नवता विशेषांक काढला तेव्हा हेमंत दिवटे गझल विशेषांक काढत होते आता ह्यालाच चळवळ म्हणत असतील तर चळवळीची व्याख्याच बदललेली बरी हेमंत दिवटेने मला स्वतः हॉस्टेलवर येऊन एक ऑफर दिली होती तो चौथा नवतेच्या चळवळीला येऊन मिळू इच्छित होता त्यासाठी सौष्ठव हे नावसुद्धा घ्यायला तो तयार होता मीच त्याला म्हणालो की अभिधा हे नाव कंटिन्यू करू कारण माझ्यासाठी नावापेक्षा चळवळच महत्त्वाची होती बाकी माझ्याविषयी तुझी सर्व मते मला माहिती आहेत आणि मलाही तुझ्याबद्दल कवी म्हणून प्रचंड आदर आहे हे तू जाणतोस त्याबद्दल तुझ्या माझ्यात भांडणे नाहीत असले तर प्रेमच आहे पण अभिधांनंतर चळवळीची जी मांडणी केली जात आहे ती अत्यंत हेतूग्रस्त आहे त्यात स्वतःला प्रस्थापित करण्याची इच्छा स्पष्टपणे प्रतीत होते आणि माझ्या मते आजही देशीवादच प्रस्थापित आहे त्याला जाऊन मिळण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र चूल मांडली पाहिजे हा माझा कायमच आग्रह राहिलेला आहे कारण सैद्धांतिक पातळीवर तुम्ही एकदा साठोत्तरीशी जुळवून घेतले की ते आपोआपच तुमच्या कवितेत झिरपायला लागते आणि तुम्ही केवळ साठोत्तरीचा विस्तार बनता अभिधानंतर असे विस्तार बनलेले आहे या संचयनात ज्या बऱ्याचश्या कविता आहेत त्या सरळ सरळ साठोत्तरीच्या विस्तारच वाटतात आणि हे फार मोठे अपयश आहे हे हेमंतच्या लक्षात येत नाह

**


Anand Thatte ह्यांनी हे कुठल्याही काळाला लागू नाही का? असा प्रश्न विचारला म्हणून आणि राजेंद्र बाणाईत ह्यांनी त्यांच्या ह्या प्रश्नाला सहमती दर्शवली म्हणून ह्या प्रश्नाला हे माझ्या अल्प कुवतीनुसार दिलेले उत्तर 


प्रत्येक कालखंड स्वतःची नवता घेऊन येतो जसे कि

१८२० ते १८६० = सुधारणावादी नवता 

 १८६० ते १८९० = प्रबोधनवादी नवता 

१८९० ते १९४० = स्वच्छन्दवादी नवता 

१९४० ते १९६०= आधुनिकतावादी नवता 

१९६० ते १९८५ == देशी नवता 

ह्यातील प्रत्येक नवतेबाबत त्या त्या नवतावादी मंडळींनी कट्टरपणे मांडणी केली आणि आधीच्या नवंतांवर जोरदार हल्ले केले महात्मा फुलेंनी ब्राह्मणी सुधारणावादी नवतेवर जोरदार हल्ला केला . केशवसुतांनी सुधारणावादी व प्रबोधनवादी नवतेने कवितेच्या नावाने प्रचंड संख्येने समाज समाज पुढे येतोय म्हणून स्पष्टपणे व्यक्तिवादाला वाव देणारा सौन्दर्यवाद मांडला आणि कविता ही वीज असते आणि ती ९९% लोकांना पकडता न आल्याने खाक करते असे म्हणून त्याकाळी बोकाळलेल्या ९९% कवडे लोकांच्या कानाखाली वीज काढली पुढे मर्ढेकरांनी नवे सोंदर्यशास्त्रच मांडले आणि रोमँटिक मांडणी मोडीत काढली . पुढे सत्यकथीय आधुनिकतेला पूर्ण मोडीत काढत नेमाडे , चंद्रकांत पाटील ह्या दोघांनी देशीवाद मांडला .तर ढाले ढसाळांनी आंबेडकरवाद 

फुल्यांनी कधीही ब्राह्मणी सुधारणावादी साहित्याशी तडजोड केली नाही आणि केशवसुत कधीही फुलेवादाच्या दारात आले नाहीत . मर्ढेकरांनी कधीही केशवसुतांच्या सौन्दर्यवादी टोळीत बसण्याचा प्रयत्न केला नाही कि शहाणे , नेमाडे , ढाले , ढसाळ आणि पाटील हे भूमिका स्पष्ट झाल्यावर सत्यकथेच्या कंपूत शिरले नाहीत आधीच्या लोकांच्यावर लिहितांना त्यांच्या मर्यादा ह्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केल्या . 

प्रत्येक काळखंडात काही अभिजातवादी कलावंत असतात त्यांना हे नवता जूनता प्रकरण मान्यच नसते असे लोक स्वतःला क्रांतिकारक म्हणवून घेत नाहीत आणि कुठल्या नवतेची मांडणीही करत नाहीत त्यांची कसोटी एकच असते चांगले , वाईट आणि अभिजात (क्लासिक ) . मला असेही लोक आवडतात कारण ते ढोंगी नसतात . ते क्रांतिकारकत्वाचा आव आणत नाहीत कि नवतेचा मॅनिफेस्टोही काढत नाहीत . ते क्रांतीचे श्रेय पण घ्यायला येत नाहीत उदा पु शि रेगे पु ल देशपांडे रवींद्र लाखे ज्ञानदा चंद्रशेखर सानेकर सौमित्र 

पण काही लोक असे असतात कि त्यांना क्रांतीचे श्रेयही हवे असते आणि आधीच्या नवतावाल्यांच्याकडून मलिदाही खायचा असतो मराठीत ह्याची सुरवात दिलीप पुरुषोत्तम चित्रेंनी केली चित्र्यांचा मूळ पिंड अभिजातवादी पण का कुणास ठाऊक त्यांना नेमाडेंच्या चळवळीचे श्रेय खायचा मोह झाला आणि तिसरी नवता आम्हीच सुरु केली असा आव त्यांनी आणायला सुरवात केली वास्तविक त्यांचा पहिला कवितासंग्रह आणि त्यावेळच्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या सर्वच कविता ह्या पूर्ण मर्ढेकरी आधुनिकवादी संवेदनशीलतेच्या ! त्यांचे लघुअनियतकालिकही सर्वसमावेशक ! ते देशीवादी झाले ते नेमाडेंच्यानंतर ! पॉप्युलर प्रकाशनाने आयोजित केलेल्या चर्चेत फक्त नेमाडेच देशीवादाच्या बाजूने दणकून बोलतांना दिसतात आणि त्यांना थोडीफार साथ देतायत चंद्रकांत पाटील गो मा पवार चंद्रशेखर जहागीरदार ! ह्या चर्चासत्रात चित्रेंनी लिहिलेल्या कवितेवरील निबंधात कुठेही देशीवाद नाही . मग देशी नवतेचे श्रेय कुणाचे तर ते नेमाडेंचे ! दिलीप चित्रें कवितेत वा लिखाणात आयुष्यात कधीही आपला हा पूर्ण अभिजातवादी पिंड सोडत नाहीत आणि त्यांनी तो सोडला नाही हे बरेच झाले अन्यथा देशीवादाच्या नावाने त्यांनी कविता बिघडवून घेतली असती आणि देशी आणि मार्गीच्या अफलातून समतोलाला ते मुकले असते विलास सारंग नको तितके कवितेत मार्गीकडे कलले आणि व्याप्ती गमावून बसले तसे चित्रे देशीकडे कलून व्याप्ती गमावून बसले असते . चित्र्यांची नंतरची कविता देशीवादी असली तरी तिचा मूळ पिंड अभिजातवादाचा आहे जशी पु शि रेग्यांची कविता किंवा सावित्रीसारखी कादंबरी रोमँटिक असली तरी तिचा पिंड अभिजातवादाचा आहे . किंवा जी ए कुलकर्णींच्या कथा आधुनिकता वादी असल्या तरी त्यांचा पिंड अभिजातवादाचा आहे


माझे म्हणणे इतकेच जर तुमचा पिंड अभिजातवादाचा असेल तर तो निमूट स्वीकारा की ! जी नवता तुम्ही मांडलीच नाही ती पुढे आत्मसात करून पुन्हा ती आम्हीच मांडली असा तोरा कशाला ? दोन्हीकडून श्रेय उपटण्याचे कारस्थान कशाला ? आणि नवतेकडून उभे राहणार असाल तर पूर्ण उभे राहा . खरेतर नवतेकडून उभे राहणाऱ्यांना अभिजात म्हणजे काय ते नीट माहीत असते पण नवे अभिजात निर्माण होण्यासाठी जुन्या अभिजातच्या मर्यादा दाखवून देणे गरजेचे आहे हेही त्यांना पटलेले असते त्यामुळेच नवतावादी लोक जुन्या नवतावादी लोकांवर जेव्हा श्रद्धांजलीपर लिखाण करतात तेव्हा ते अनेकदा सार्थ गौरव करतात . ही श्रद्धांजली त्यांच्या कलाकृतींमधून किंवा श्रद्धांजलीपर लिखाणातून प्रकट होत असते . किंबहुना ज्याला जूनता नीट कळलेली असते त्यालाच नवता नीट कळते . ज्याला न्यूटन नीट कळलेला असतो तोच आईन्स्टाईन होऊ शकतो ज्याला न्यूटनच नीट कळलेला नाही तो आईन्स्टाईन काय घंटा होणार ?

आता न्यूटनच्या फिजिक्समध्ये बसून ज्यांना आईन्स्टाईन व्हायचे आहे त्यांचे काय करायचे ? थत्ते म्हणतात तसे संधीसाधू लोक सर्वच काळात असतात पण साहित्य अजरामर होते ते अभिजाततेमुळे पण पुढे सरकते ते नवतेमुळे आणि नवता पुढे सरकते ती महात्मा फुले , मर्ढेकर , नेमाडे , ढाले , ढसाळ ह्यांच्यासारख्या जहाल लोकांच्यामुळे प्रत्येक नवतेत असे लोक असावे लागतात आणि असतात 

 १९८५ ते आत्तापर्यंत जी चौथी नवता अवतरली तिला असे किती जहाल लोक लाभले आणि जे जहाल लोक लाभले ते का संघटित झाले नाहीत ? आणि जर संघटित झाले तर तो जहालपणा कुणी बिघडवला आणि का बिघडवला ? मुख्य म्हणजे ह्या जहालांनी सरड्यांना का कवटाळले कि हे जहाल जहाल न्हवतेच आणि फक्त जहालतेचे दलाल होते ? कि ह्या जहालांना सरडे ओळखताच आले नाहीत ? कि सरडे होण्यालाच पोस्टमॉडर्निझम म्हणतात ?माझे प्रश्न हे आहेत . देविदास चौधरी ह्या आमच्या जुन्या प्रेमळ मित्राने अजून बोल असे म्हंटले आहे म्हणून ते मी प्रस्तुत करत आहे 

-------------------------------------------------------------------------------------


श्रीधर तिळवे नाईक

Sunil Tambe make it new was the bus word of previous what is the buzzword of chouthi nota

Sunil Tambe Sir Make it new was the buzzword of dusri navta i. e. MODERN NAVTA formed much more in later period of modernism and proclaimed by EZRA POUND. The navta arose in Charles Baudelaire's poems MUCH BEFORE EZRA POUND. . After that TISRI NAVTA AROSE in form of postism with postmodernism, nativism , postcolonialism , postfeminism , postcapitalism , POSTSPIRITUALISM etc . POSTISISM reintroduced TRADITION and OLD .Both these navtas belong to PRATISRUSHTI consisted of MARKET ,COMMODITIES AND CONSUMERISM. . CHOUTHI NAVTA belongs to biosignoverse means CHINHSRUSHTI consisted of SEMIODITIES , NETWORK AND SIGNISM including BRANDISM.INTERNET EVERYTHING IS THE BUZZWORDOF CHOUTHI NAVTA. First expression is DIGITALISE EVERYTHING.

Rajendra banait

उकल केल्याबद्दल आभार ! दिलीप चित्रे यांच्याबद्दल मला आदर होता तो सदानंद रेगे यांची एक ललित मधली प्र श्री नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत वाचली आणि सगळा आदर संपला , स्वतः फार मोठे आहोत असे दाखवण्यात चित्रे फार पुढे होते असे जाणवले ! 

मराठीतील कित्येक कवी लिटिल मॅगेझिंन , सत्यकथा इत्यादी वादामुळे डायव्हर्ट झाले किंवा आकृतीबंधात बदल करत गेले , काहींना हे समजलेच नाही , काही एकटेच लिहीत गेले उदा : रॉय किणींकर , मनमोहन 

आमच्या पिढीला हे सगळे वाचायला मिळाले पण हे कोणते वाद असतात हे कुणी सांगणारे भेटले नाही , मराठी भाषेचे आणि साहित्याचे जाणकार फारच कमी आहेत , आता तर जवळ जवळ नाहीच ! 

तुम्ही हे सजगपणे उकलून काढले त्याबद्दल पुन्हा आभार !

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना