तिळवे सरांची वॅाल सगळ्यांना वाचता येत नाही म्हणून शेअर करत आहे.

मला अर्थातच त्यांच्याबद्दल फारच आदर आहे आणि त्यांच्या मिमांसेत मला नेहमीच तत्थ्य वाटते.इतर विद्वानांनी त्याचा प्रतिवाद करावा म्हणजे आमचे प्रबोधन होईल.

आजच्या शिक्षणाच्या युगात,जागतिकीकरणाच्या झंझावातातात ,घटनात्मक खुल्या लोकशाहीत हे जुने चिवट पण सुक्ष्म फोर्सेस कितपत बदल घडवण्याची ताकद ठेवतात व ते सांगतात तसे बदल किती डिझायरेबल आहेत हा एक वेगळाच विषय आहे.


भारतातल्या विचार प्रणाली या वर्णप्रणाली बनत गेल्या आहेत का? श्रीधर तिळवे नाईक 


भारतातल्या बसवेश्वर यांनी सुरू केलेल्या मोक्ष प्रणाली ब्रिटिशांच्या काळामध्ये बदलत जाऊन त्यांना युरोपियन स्वरूप प्राप्त व्हायला लागले या पुरोगामी वसाहतवादामध्ये ज्याला नंतर साम्राज्यवाद असे नाव मिळाले ज्यांच्यावर आपण राज्य करतो आहोत त्यांना समजून घ्यायचे म्हणून ,त्यांचे शोषण अधिक नीटपणे करता यावे म्हणून आणि गुलामांना गुलामगिरीची जाणीव होऊ नये यासाठी काय करता येईल म्हणून या युरोपियन लोकांनी भारतामध्ये पुन्हा एकदा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कळत नकळत इतिहास केंद्रस्थानी येत गेला 


ज्याप्रमाणे माणसाला व्यक्तिरेखा प्राप्त होते त्याचप्रमाणे कुठल्याही देशाला देश रेखाप्राप्त होत असते ही देश रेखा त्याच्या इतिहासामुळे तयार होते आणि म्हणूनच कुठल्याही देशाचा इतिहास हा अतिशय महत्त्वाचा असतो साहजिकच जो तो देश रेखा आपल्या पद्धतीने तयार करायला बघतो जेणेकरून तो देश आपल्या ताब्यात यावा म्हणजेच इतिहास निर्माण करण्यामागे सर्वात प्रथम प्रेरणा ही नेहमी उत्सुकता आणि जिज्ञासा असते परंतु त्याचबरोबर नंतरची जी पर्यावरणा आणि प्रेरणा असते ती नेहमी सत्तेची असते आणि अनेकदा जे सत्ताधारी असतात ते सत्ता स्पॉन्सर करण्यासाठीच स्वतःचा निर्माण केलेला इतिहास स्वतःची निर्माण केलेली देश रेखा त्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येक व्यक्तीरेखा ही देशरेखा बनली पाहिजे या अंगाने ही मांडणी होत असते आणि व्यक्तीचा सर्वनाश करून तिच्या आत फक्त देश रेखा स्थापित करणे हाच या इतिहासा लेखना मागचा उद्देश असतो त्यामुळे इतिहास हा कधीही शुद्ध वैज्ञानिक इतिहास रहात नाही याचे कारण सत्ता नेहमी इतिहासांच्याद्वारे आपल्या दंतकथा स्पॉन्सर करत असते पूर्वीची राज्य तर नेहमीच धर्मराज्य असल्याने धर्मच इतिहास स्पॉन्सर करत होते आणि हा इतिहास पौराणिक बनण्याचे सर्वात मोठे कारण मुळातच त्यांचा उद्देश धर्मराज्य प्रस्थापित करणे हाच होता साहजिकच सर्व प्राचीन पुराने भारतामध्ये कायमच वर्ण जाती व्यवस्था स्पॉन्सर करताना दिसतात कारण समाजव्यवस्था कशी असावी यासंदर्भातली ही मांडणी होती आणि ती फक्त समाज व्यवस्थे संदर्भात नव्हती तर ती राज्यव्यवस्थेबद्दलही होती दुर्दैवाने पुराणांच्याकडे एक राजकीय डॉक्युमेंट म्हणून न पाहता आपण धार्मिक डॉक्युमेंट म्हणून पाहतो आणि त्यातूनच अनेक अनर्थ निर्माण होतात वास्तविक मागेच म्हटल्याप्रमाणे धर्म हीच राज्य प्रणाली असते आणि त्यामुळे धर्माने निर्माण केलेली प्रत्येक संहिता ही राजकीय संहिता असते अगदी बायबल असो किंवा खुराणा असो या प्रामुख्याने प्रथम धार्मिक राजकीय विचार प्रणाली असतात हे जर का आपण लक्षात घेतले नाही तर मग त्यातली कायदे व्यवस्था कशी काय फंक्शन करते हे आपल्या कधीही लक्षात येणे शक्य नाही जिथे कायदा तिथे राजकारण ही एक सिम्पल गोष्ट आहे परंतु अनेक लोक ती लक्षात घेत नाहीत ब्रिटिशांना काहीही करून घेतले पौराणिक इतिहास मांडण्याचे प्रकार नष्ट करायचे नव्हते म्हणूनच त्यांनी एकीकडे पुराणांना प्रचंड महत्व देणे सुरू केले आणि दुसरीकडे वैज्ञानिक पद्धतीचा आम्ही अवलंब करत आहोत असा आणात ओरिएंटालिझमच्या नावाने आपल्याला पाहिजे असलेला वसाहतवादी इतिहास वसाहतींना गुलाम बनवणारा इतिहास भारतातल्या गुलाम प्रजेला अधिक गुलाम बनवणारा इतिहास स्पॉन्सर केला ओरिएंटालिझम हे दिसायला अतिशय सोपे आणि अतिशय राजकीय असे प्रकरण आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामध्ये मुख्य उद्देश आर्थिक शोषणाचा होताच परंतु गुलामगिरी सारखी व्यवस्था आता पुरोगामी युग आल्याने इनडायरेक्ट करण्याची गरज असल्याने विचार प्रणालीच्या द्वारे व्यवस्थित इनडायरेक्ट गुलामगिरी मनामध्ये बिंबवता येते हे लक्षात घेऊन इतिहास हे या इनडायरेक्ट गुलामगिरीच्या स्पॉन्सरशिपचे साधन बनले पुरोगामी कालखंडातला भारतातला पुरोगामी इतिहास हा नेहमीच ब्रिटिशांनी स्पॉन्सर केलेला इतिहास आहे मग हे इतिहासकार स्वतःला कितीही स्वतंत्र म्हणोत मिर्वोत हे आपण लक्षात घेतले पाहिजे वास्तविक भारतातला पहिला वस्तुनिष्ठ इतिहास हा सुद्धा शैव लोकांनी निर्माण केला होता आणि तो लिहिणारा पहिला पंडित कल्हण होता ज्याने काश्मीरचा इतिहास पहिल्यांदा व्यवस्थितपणे मांडला पण भारतीय वैष्णव धर्माने स्पॉन्सर केलेला पौराणिक इतिहास हा नंतर व्यवस्थित कश्मीरमध्ये भगवान शंकरांचे नाव घेत बसवण्यात आला आणि निलपुराण हे त्यातूनच निर्माण झालेले आहे आज सुद्धा अत्यंत जाणीवपूर्वक हेच पुराण काश्मीरच्या इतिहासामध्ये स्पॉन्सर केले जाते


ब्रिटिशांना भारताच्या शैव इतिहासाशी काहीही देणे घेणे नव्हते किंबहुना तो जास्तीत जास्त कसा उपेक्षित राहील आणि ब्राह्मण धर्माचाच कसा एक पंथ म्हणून उदयाला येईल याविषयी ब्रिटिश भयंकर सजग होते आणि त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे हे सर्व काही स्पॉन्सर केलेले आहे उद्देश एकच होता शैव लोकांनी सशस्त्र बंड करू नये यामागे त्यांचे एक तर्कशास्त्र होते ते म्हणजे ब्राह्मण धर्माला ताब्यात घेतले ज्यात शैव धर्माचे पंडित पण होते तर सर्व भारतावर नियंत्रण ठेवता येते हे नियंत्रण मिळाले की भारतावर धार्मिक नियंत्रण मिळेल आणि म्हणूनच मग भारत म्हणजे धर्म प्रधान देश अशी रचना त्यांनी मांडली असे केले तर आपल्याला राज्य करताना फारसा संघर्ष करावा लागणार नाही अशी त्यांची ठाम समजूत होती आणि त्यामुळेच ब्राह्मणांना कसे आपल्या ताब्यात घेऊन त्यांचे वसाहतीकरण करता येईल तेच ब्रिटिश पाहत होते याचे उत्तम उदाहरण आर्य वंशाचा सिद्धांत आहे हा आर्य वंश सिद्धांत ब्रिटिशांनी व्यवस्थितपणे ब्राह्मणांच्या डोक्यात भिनवला त्यातूनच मग आर्य समाज निर्माण झाला आणि या आर्य समाजाने आपण हिंदू नाही आहोत तर आपण आर्य आहोत असे सांगायला सुरुवात केली. आता पुन्हा एकदा या गोष्टीचे पुनर्जीवन झालेले आहे कारण तेच तर्कशास्त्र आहे जे म्हणते की वेदात आपण आर्य आहोत हिंदू नाही आहोत स्मृतींच्या मध्ये आपणआर्य आहोत हिंदू नाही आहोत पुराणांच्या मध्ये आपण आर्य आहोत हिंदू नाही आहोत महाकाव्यांच्या मध्ये आपणआर्य आहोत हिंदू नाही आहोत तर आपण मग हिंदू कसे? आज ना उद्या हा सनातन धर्म किंवा आर्य धर्म पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणार आहे त्यातील जो आर्य धर्म आहे तो कर्मदत्त वर्णव्यवस्था मानतो तर जो सनातन धर्म आहे तो जन्मदत्त वर्ण व्यवस्था मानतो त्यामुळे पुढे या दोन नावांच्या वरून संघर्ष होणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हे व्यवस्थित ओळखून आर्य सिद्धांत नाकारला होता मात्र आयुष्याच्या शेवटी शेवटी मात्र ते आर्य संस्कृती वेगळी आणि द्रविड संस्कृती वेगळी या निष्कर्षापाशी यायला लागले होते 


ब्रिटिश लोकांनी निर्माण केलेल्या इतिहासाबरोबरच साहजिकचआर्य वंशासारख्या ब्राह्मण लोक बाहेरून आलेले आहेत ते आर्य होते त्यांनी आक्रमण करून जिंकले वगैरे काही गोष्टीही भारतात परतल्या इतिहासाची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे पुस्तकी पुरावे ग्राह्य मानले जाणे साहजिकच या पुस्तकी पुराव्यांच्या बाबतीत ब्राह्मणधर्म हा अग्रेसर असल्याने त्याने पुरविलेल्या पुस्तकांच्या आधारे भारतीयांचा इतिहास इंग्रजांनी लिहिला. ब्राह्मण व्यवस्था मुळात कशी काम करते याची त्यांना या काळात कल्पनाच नव्हती किंबहुना आपला वापर करून आता ब्राह्मणधर्म स्वतःच्या वापसीची तयारी करतोय हे त्यांच्या लक्षातच आले नाही आणि अजून सुद्धा ही कल्पना त्यांना आलेली आहे असे वाटत नाही त्यामुळेच ओरिएंटालिझमच्या नावाखाली भारतामध्ये प्रचंड मोठा वर्णजाती व्यवस्था वाद आला आणि त्याने भारतीय इतिहासाच्या केंद्रस्थानी वर्णजाती व्यवस्था आणली आणि तिच्या अवतीभवती जातीव्यवस्था खेळती ठेवली (कास्ट हा शब्द वर्ण आणि जात अशा दोन्ही अर्थाने वापरला जातो हे आपण लक्षात घेतले पाहिजे )


प्रश्न असा आहे की हे कसे घडले ? याचे कारण स्पष्टपणे दिसते की उत्तर मोगलाई आणि उत्तर पेशवाई या दोन्ही व्यवस्था या काळामध्ये वर्ण हाच प्रधान मानत होत्या साहजिकच यांच्याशी युरोपियन कंपन्यांच्या लढाया झाल्यामुळे वर्ण व्यवस्था ही कळत नकळत समाज व्यवस्था म्हणून या लोकांच्यावर बिंबवण्यात आली आणि या लोकांनी जणू काय ती भारतीय समाजाचा आधार फार प्राचीन काळापासून आहे असे गृहीत धरले आणि या गृहीतकानेच भारतीय इतिहासाचा सत्यानाश केला. प्रत्यक्षात इसवी सन एक हजार पर्यंत भारतीय व्यवस्था ही वर्णव्यवस्था प्रधान नव्हती फक्त जिथे जिथे ब्राह्मण डॉमिनेट करत होते त्या त्या काही मोजक्या प्रदेशांमध्ये ही स्मृती प्रधान वर्णव्यवस्था लागू झाली होती उदाहरणार्थ केरळ किंबहुना वर्ण व्यवस्थेचे राज्य यावे म्हणूनच ब्राह्मण धर्माने जाणीवपूर्वक केरळाला तामिळनाडू पासून वेगळे केले अन्यथा केरळ हे तामिळनाड राज्याचा भाग होते इतरत्र मात्र शैव राजवटीच होत्या ज्या समाज व्यवस्था प्रमाण मानत होत्या वर्ण जाती व्यवस्था नव्हे


मात्र युरोपियन लोक जेव्हा भारतात आले तेव्हा इंग्रज लोकांचा मुख्य सामना हा मराठ्यांशी झाला उत्तर पेशवाई मध्ये मराठ्यांना पराभूत केल्यानंतर मराठ्यांच्या पासून ज्या काही वाईट गोष्टी इंग्रजांनी घेतल्या त्यातली एक म्हणजे वर्णव्यवस्था होय त्यांनी भारतीय समाज वर्णव्यवस्थेनेच बनलेला आहे असा गैरसमज करून घेतला आणि हा गैरसमज आपल्या शिक्षण संस्थांच्याद्वारे अभ्यासक्रमाद्वारे संपूर्ण भारतभर पसरवला तो इतका पसरत गेला की उत्तर पेशवाईचे अपुरे राहिलेले स्वप्न इंग्रजांनी पुरे केले आणि साहजिकच मग शैव लोकांची ससेहोलपट सुरू झाली ही इतक्या टोकाला पोचली की संपूर्ण लिंगायत धर्म हाच ओबीसी मध्ये टाकला गेला शेवटी ही लढाई न्यायालयात गेली हे सांगण्याचे कारण असे की वर्णव्यवस्था किती टोकाला जाऊ शकते हे स्पष्ट व्हावे कारण या उदाहरणांमध्ये एक संपूर्ण क्रांतिकारक धर्म हा चक्क शूद्र म्हणून वर्ण बनवला गेला जगाच्या इतिहासामध्ये कुठेही इतरत्र असे काही घडलेले नाही हे फक्त शैव लोकांच्याच बाबतीत का घडावे हा खरोखर प्रश्न आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सर्व ब्राह्मणांच्या सल्ल्यावरूनच घडलेले असणार त्यांनीच हे लिंगायत लोकांचे बंड थेट शूद्र लोकांच्यात सामील करून जनगणनेमध्ये त्यांना शूद्र करून टाकले यामुळे शैव पंडित सुद्धा शूद्र लोकांच्यात जाणार हे स्पष्ट झाले साहजिकच शुद्ध वर्णात जाण्यापेक्षा या पंडीत लोकांनी ब्राह्मण बनणे पसंत केले. महाराष्ट्र मधले स्वतःला पंत पंडित म्हणवणारे अनेक लोक या काळामध्ये म्हणजे १८२० ते १८६० या काळामध्ये ब्राह्मण झालेले दिसतात अन्यथा रघुनाथ पंडित वगैरे वगैरे अशीच नावे लावली जात होती त्याची सुरुवात मुळात नानासाहेब पेशवे यांच्या काळापासूनच सुरू झाली होती


पंडिताचा ब्राह्मण कसा होतो हे लक्षात घ्यायचे असेल तर शैव परंपरेमध्ये चालत आलेली फुलवंतीची कथा उपयोगी पडते या कथेमध्ये संघर्ष आहे तो प्रामुख्याने पंडित वादक आणि माळी नर्तिका ! असे सांगितले जाते की बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्याच्या काळामध्ये ही घडली होती पण आश्चर्यकारकरीत्या ती फार वेगळ्या रीतीने सादर होत गेली विशेषता एकोणिसाव्या शतकात प्रथम हे घडले आणि विसाव्या शतकामध्ये पुरंदरे यांनी तिला जे स्वरूप दिले ते बदल कसे होत जातात त्याचे प्रतिनिधी आहे


त्यामुळे याच कथेवर आधारलेला अलीकडे आलेल्या फुलवंती या चित्रपटांमध्ये जो संघर्ष आहे तो पंडित आणि माळी या दोन शैव समाजातल्या कलावंतांच्या मधला संघर्ष ब्राह्मण आणि नर्तकी असा आहे कलावंतांच्या अहंकाराचा हा संघर्ष आहे पण पुरंदरे यांच्या कथेमध्ये तो कळत नकळत ब्राह्मणांच्या अहंकाराला गोंजारत राहतो कारण उत्तर पेशवाईच्या काळामध्ये माळी समाजावर त्याला शूद्रवर्णात टाकून जास्तीत जास्त अपमानित करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते त्यातून बाळाजी विश्वनाथाच्या काळामध्ये जो फक्त कलेमधला संघर्ष होता तो हळूहळू वर्ण संघर्ष बनत जातो आणि यातला पंडित कारण नसताना ब्राह्मण बनवण्यात येतो ब्राह्मण धर्मामध्ये वाद्य वाजवणे हे शूद्राचे काम आहे असे सांगितले जाते. साहजिकच ब्राह्मण वाद्य कसे काय वाजवणार म्हणूनच ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणतात पंडितच ठेवले जाते पण तरीही त्याला ब्राह्मणही म्हटले जाते ही पंडितांची ट्रांजिशनरी फेस आहे ती इथे अधोरेखित होत जाते वास्तविक पंडित अतिशय उत्कृष्ट पखवाज वाजवायचे आणि तशी त्यांना लहानपणापासूनच ट्रेनिंग असायची ज्या पंडिताच्या संदर्भात ही कथा सांगितली जाते तो शैव होता आणि लहानपणापासूनच संगीत शिकलेला होता त्यामुळेच तर तो हा संघर्ष जिंकतो अन्यथा पंधरा दिवसात आणि एक महिन्यात असा मृदुंग मास्टर करता येत नसतो पण बाबासाहेब पुरंदरे यांना हे कोण सांगणार उलट पंधरा दिवस किंवा दोन महिने किंवा तीन महिने मिळाल्यानंतर ब्राह्मण आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर काहीही करू शकतो काहीही शिकू शकतो असे आपण या कथेतून शिकतो आणि हे शिकवण्यासाठीच मूळ कथा बदलून आपल्या पद्धतीने सादर केली जाते आणि मग चित्रपटात सुद्धा ती तशीच येते तिचे नाव फुलवंती असल्याने साहजिकच ती माळी समाजाची आहे हे सर्वांना माहिती आहे आणि मग प्राजक्ता माळीने हा चित्रपट का केला हे स्पष्ट व्हावे हे अर्थातच योग्य केले गेले आणि आपण त्यासाठी प्राजक्ता माळी चे अभिनंदनच केले पाहिजे कारण तिने कुठेही फुलवंतीचा कणा सोडला नाही अपवाद फक्त शेवट! प्रत्यक्षामध्ये मूल दंतकथेत पंडितांचा विवाह होतो चित्रपटात तो होत नाही कारण आता कळत नकळत वर्ण व्यवस्थेचे झालेले पुनरागमन!


इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माळी समाज नर्तन करत होता पण तमाशा करत नव्हता हे मला तमाशा करणाऱ्या लोकांचा अपमान करायचा नाहीये तर एक सामाजिक वस्तुस्थिती सांगायची आहे नंतर नंतर तमाशात पठ्ठे बापूराव पण आले जे ब्राह्मण होते हे सर्वांना माहितीच आहे तमाशाचे लेखन मात्र पंडित लोक करत होते याआधीही 1992 ला ही कथा येऊन गेली होती मात्र फुलवंतीचा स्वाभिमान त्यात थोडासा मिसिंग होता प्राजक्ता माळी ही इथे स्वतःच प्रोडूसर असल्याने तो इथे व्यवस्थित दाखवला गेला आहे प्रत्यक्ष मूळ कथेमध्ये दंत कथेमध्ये शेवट लग्नात होतो तो मात्र बदलण्यात आला कारण एक पंडित एका माळी समाजातील स्त्रीशी लग्न करू शकतो (ज्यांना याबाबत फार शंका आहेत त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की त्यांनी खंडोबाच्या पत्नींची यादी बघावी माझ्या स्वतःच्या घरामध्ये असे विवाह झालेले आहेत) परंतु एक ब्राह्मण माळी स्त्रीशी लग्न करू शकत नाही बाबासाहेब पुरंदरे संपूर्ण कादंबरीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे वर्ण व्यवस्था मेंटेन करून आहेत अर्थात ते स्पष्टपणे दिसत नाही प्राजक्ता माळी यांनी फुलवंतीचे लग्न पंडिताशी होते असेच दाखवायला पाहिजे होते ते जास्त पुरोगामी पाऊल ठरले असते आणि अलीकडे जे ब्राह्मण आहेत ते जवळजवळ सगळे पंडितच झालेले आहेत फक्त बोलून दाखवत नाहीत कारण त्यांना ब्राह्मण असण्याचा फायदा सोडायचा नसतो त्यामुळे त्यांनी काही आक्षेप घेतला नसता


हे सांगण्याचे कारण असे की पंडितांची घालमेल ही या कथेच्या निमित्ताने पुढे येत राहते मूळ शैव धर्म हा वादन नर्तन करायला अनुमती देतो आणि ब्राह्मण धर्म वादन करणाऱ्याला शूद्र वर्णात टाकतो आता यावर तोडगा काढायचा कसा हा यातला पेच आहे पुरंदरे या पेचाला हातच घालत नाहीत चित्रपट ही घालत नाही कारण इतिहासाविषयी असलेले अज्ञान होय 


अर्थात या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर प्राजक्ता माळी बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करायला निघते याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही असो 


अठरावे शतक हे पूर्णपणे वर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येण्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे भारतामध्ये सहा वर्ण याच काळात प्रस्थापित झाले काय आणि याचे उत्तर स्पष्टपणे होय असे आहे हे वर्ण कोणते हे सर्वांना माहिती आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र दलित आणि आदिवासी असे हे सहा वर्ण आहेत आणि यातील आदिवासी वर्ण स्वतंत्र काढून त्याच्यासाठी वेगळे कायदे करून त्यांच्या सर्व जमिनी ब्रिटिश लोकांनी आणि त्यांच्या वतीने काम करणाऱ्या लोकांनी ज्यात पारसी लोक सुद्धा येतात बळकवण्याचे उद्योग या काळात केलेले दिसतात ब्रिटिश लोकांचा साम्राज्यवाद जेवढा आदिवासी लोकांच्या बाबतीत दिसतो तेवढा कुठल्याच बाबतीत दिसत नसेल पुरोगामी वाद म्हणजे पुरावा मागणारा वाद असे मी नेहमी म्हणतो कागदीपणा ही इथे शक्ती बनते कारण कागदपत्र या काळामध्ये कागदी होती हा कागद वाद व्यवस्थितपणे राबवून सर्व जमिनी विशेषतः आदिवासी आणि शूद्र अति शूद्र यांच्या जमिनी आपल्या नावाने करून घेणे हा या काळातला फार मोठा फिनॉमिना आहे पुरोगामी म्हणजे काहीतरी सभ्य सुसंस्कृत चेहरा असा ज्यांचा गैरसमज आहे त्यांनी तो आपल्या डोक्यातून काढून टाकावा माणसे नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नेहमीच आपला विस्तार करायला टपलेले असतात त्यांच्या तृष्णा त्यांच्या धोका त्यांच्या निकडी या टपोरी गिरी साठी जबाबदार असतात हे लक्षात घ्यावे यामध्ये अनेक ब्राह्मण आणि क्षत्रिय लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि याच काळामध्ये अनेक ब्राह्मण जमीनदार उदयाला आलेले दिसतात जे यापूर्वी कधीही जमीनदार नव्हते अर्थात या विरोधात युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये व्यवस्थित बंड करणाऱ्या लोकांच्या मध्ये सर्वात प्रथम रोमँटिक लोक येतात आणि त्यानंतर मग अब्राहम लिंकन आणि मग कार्ल मार्क्स येतो फुले अब्राहम लिंकन यांचा आणि आंबेडकर कार्ल मार्क्सचा त्याग करायला तयार नव्हते त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे साहजिकच या दोघांनाही ओबीसी आणि बीसी या वर्ण प्रणाली मध्ये टाकणे ही इथल्या उच्च वर्ण असलेल्या लोकांची गरज बनलेली दिसते यातील आंबेडकर वादाने स्पष्ट आणि स्वच्छ बनाने स्पष्ट आणि स्वच्छ पणाने हिंदू धर्माचा त्यागच केला त्यामानाने फुले यांनी सत्यशोधक समाज नावाचा नवीन धर्म निर्माण केला पण हा समाज हिंदूंच्या अंतर्गत राहिल्याने त्यांच्या बाबतीत फारशी फिकीर करण्याची गरज हिंदुत्ववादाला वाटत नाही पण बीसी समाजाबाबतीत मात्र ते इस्लाम मध्ये गेले तर काय म्हणून सांभाळून घेण्याची जबाबदारी येते आणि म्हणूनच बीसी संख्येने कमी असून सुद्धा हिंदुत्व नेहमी ओबीसींच्या पेक्षा महात्मा फुले यांच्या पेक्षा आंबेडकरांना आंबेडकरी जनतेला जास्त सांभाळून घेते हे लक्षात घेण्याजोगे आहे एका अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचे धर्म बदलणे हे कळत नकळत हिंदू धर्मांच्या मध्ये धमकी सारखे काम करते तुम्ही जर का आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही धर्म बदलू शकतो अशी ही निर्माण झालेली नवीन आंबेडकरी व्यवस्था आहे त्या मानाने ओबीसी हे खूप सेफ वाटतात कारण ते सर्व शैव आहेत आणि त्यांना वैष्णव होण्यामध्ये फार काही वावगे वाटत नाही आणि त्यामुळेच हरिहर एकच असा जप करत व्यवस्थितपणे त्यांना हिंदू या नावाखाली सांभाळता येते किंबहुना भाजप अजूनही हिंदुत्व म्हणत आहे आर्यत्व म्हणत नाही याचे कारण तेच आहे कारण एकदा का आर्यत्व स्वीकारले तर मग ओबीसींचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण ज्या संहितांचा ते पुरस्कार करतात त्या संहितांच्या मध्ये अनार्य लोकांचे प्रचंड आणि स्पष्ट उल्लेख आहेत ते कधी राक्षस आहेत कधी दैत्य कधी दानव तर कधी रावणासारखे राजे आहेत दुर्योधनासारखे राजे आहेत अशा वेळी नेमके काय करायचे हा फार मोठा प्रश्न आर्यत्व या संज्ञा खाली येतो म्हणूनच हिंदुत्व अजूनही सोडता येत नाहीये.


याच काळामध्ये क्षत्रिय समाज स्वतःला अधिकच क्षत्रिय समजायला लागला आता यातला विरोधाभास असा होता की ज्याला क्षत्रिय म्हणता येईल असा प्रतिकार यांच्यापैकी कोणीच केला नव्हता किंबहुना लोकमान्य टिळक यांनी वेदोक्त प्रकारणात जो मूलभूत प्रश्न निर्माण केला होता त्याच्याकडे अलीकडे फार दुर्लक्ष होते आहे तो म्हणजे यांना क्षत्रिय का म्हणावे जर या लोकांना आपल्या भूमीचे रक्षण करता येत नसेल आणि जे केवळ आता ब्रिटिशांच्याकडून पेन्शन घेत आपले सर्व कर्तव्य विसरलेले आहेत त्यांना मी क्षत्रिय का म्हणावे असा हा लोकमान्य टिळकांचा प्रश्न आहे परंतु वेदोक्त प्रकरणातील टिळकांच्या अत्यंत चुकीच्या आणि कर्मठ ब्राह्मणग्रस्त भूमिकेमुळे या सर्व प्रकरणात त्यांनी निर्माण केलेल्या जो बरोबर प्रश्न होता तो मात्र दुर्लक्षित झाला म्हणजे वर्ण व्यवस्थेने दिलेले संरक्षणाचे आणि युद्ध करण्याचे कर्तव्य पार पाडायचे नाही मात्र वर्णव्यवस्थेने दिलेले क्षत्रिय म्हणून असलेले सर्व फायदे घ्यायचे असा काहीतरी दुहेरी वर्तन व्यवहार यामध्ये दिसतो माझ्या स्वतःच्या कायस्थ असलेल्या आजी मध्ये याबद्दल एक प्रचंड अस्वस्थता होती आपल्या पूर्वजांनी पोर्तुगीजांना लढाई करून हाकलून द्यायला पाहिजे होते असे ती नेहमी म्हणायची कदाचित ही अस्वस्थता या काळामध्ये सर्व क्षत्रियांच्यामध्ये असावी आणि जेव्हा तुम्ही पराभूत झालेले असता तेव्हा तुम्ही मग विजयी झालेल्या क्षत्रियांची सतत आठवण काढत राहतात म्हणूनच या काळामध्ये सर्वाधिक कादंबऱ्या या शिवाजी महाराज बाजीराव पेशवे संभाजी महाराज राजाराम महाराज यांच्यावर लिहिल्या गेलेल्या आहेत 1820 ते 1947 या काळामध्ये आपण क्षत्रिय ब्रिटिश आक्रमकांच्या विरोधात क्षत्रिय म्हणून काय करत होतो हे सांगण्यापेक्षा आपला प्राचीन इतिहास सांगणे हे नेहमीच परवडणारे असते शिवजयंतीचे निर्माण आणि तिचा प्रसार होण्याचे सर्वात मोठे कारण शिवाजी महाराज हे या काळामध्ये विजयाचे प्रतीक होते जेव्हा खरे विजय मिळत नसतात तेव्हा इतिहासात विजय शोधावे लागतात


भारतीय विचारवंतांच्या पुढे त्यामुळेच एक विचित्र प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे इंग्रजांना कुठला वर्ण द्यावा ? हा प्रश्न मुस्लिम राजवटी संदर्भात सुद्धा निर्माण झाला होता आणि सर्वांनी मुस्लिमांना क्षत्रिय म्हणून स्वीकारले होते काही जणांनी तर त्यांना विष्णूचे अवतार पण मानलेले आहे. तशा रचना उपलब्ध आहेत हाच प्रश्न ब्रिटिशांच्यामुळे निर्माण झाला कारण इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीकडून आले होते साहजिकच स्वामी विवेकानंद ते आचार्य जावडेकर यांनी इंग्रजांना वैश्य हा वर्ण दिलेला दिसतो आणि आत्ताचा काळ हा वैश्यांचा असून वैश्य हेच आता क्षत्रिय झालेले आहेत असे त्यांचे प्रतिपादन होते. अर्थात पुढे स्वामी विवेकानंद असे सांगतात की वैश्य लोकांची ही राजवट संपली की पुढे शूद्रांची राजवट येईल म्हणजे इंग्रजांच्या बाबतीत सुद्धा आपण त्यांना क्षत्रिय वर्ण द्यायला तयार नव्हतो वास्तविक ते राज्य करत होते तरीसुद्धा हे हे घडले आहे याचे कारण जे व्हॉईसरा येत होते ते प्रत्येक वेळी क्षत्रिय राजवंशाशी रिलेटेड असे होतेच असे नाही त्यांच्यापैकी अनेकांचे पार्श्वभूमी ही वैश्य आणि शूद्र मानल्या गेलेल्या ज्या आपल्याकडच्या जाती जमाती आहेत त्यांच्यासारखी होती साहजिकच अशा लोकांना कसे काय क्षत्रिय म्हणणार असा यांच्या पुढचा तात्विक प्रश्न होता तो ते अप्रत्यक्षपणे गृहीत धरत होते पण मांडत नव्हते उलट तिथून जे राजे किंवा राजपुत्र राजकन्या किंवा सरदार कन्या किंवा सरदार पुत्र किंवा सरदार किंवा जे राजघराण्यातले लोक येत होते त्यांना मात्र स्पष्टपणे विष्णू तेव्हा तत्सम देवाचे अवतार मानायची या लोकांची तयारी होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण तोंडाने कितीही कर्मानुसार वर्ण बोलत असलो तरी प्रत्यक्षामध्ये आपला सगळा खेळ हा जन्मानुसार वर्ण असाच चाललेला असतो प्रश्न असा आहे की ब्राह्मण किंवा क्षत्रिय असा दर्जा का देण्यात आला नाही याचे कारण उघड आहे वैष्णव धर्माचा पडलेला प्रभाव वैष्णव धर्मामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय हे पुण्य योनी असल्याने त्यामध्ये फक्त जन्मदत्त असाल तरच प्रवेश मिळतो त्या उलट वैश्य हे पाप योनी असल्यामुळे त्यामध्ये इंग्रजांना ढकलणे सोपे होते शिवाय वैश्य हा वर्ण कायमच ओपन राहिलेला आहे त्यामध्ये पारशी लोकांना ऑलरेडी प्रवेश मिळालेला होता तसाच प्रवेश इंग्रजांना दिला तर त्याविषयी वैश्य लोक ऑब्जेक्शन घेणार

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना