यम नियम

 यम , नियम , विधीनियम आणि संयम श्रीधर तिळवे नाईक 

यम ही संज्ञा सर्वाधिक मूलभूत शैव संज्ञा आहे तिच्यापासूनच मग इतर सर्व संज्ञा येतात सर्वात पहिली नियम मग विधी नियम आणि मग संयम ! यम हे मोक्षाचे आधार आहेत त्यांच्यात पंचशीलांचा समावेश होतो मी द्वादशशीलता सांगतो नियम हे कामाचे विशेषता त्यातील कुळाचे आणि घराचे आधार आहेत तर विधी नियम ज्यात कायदा म्हणजे विधी ही येतो हे अर्थाचे आधार आहेत आणि या तिन्ही गोष्टीसाठी जो पाळावा लागतो तो संयम आहे दुर्दैवाने आजच्या घडीला संयम हा शिकवला जात नाही त्यामुळे साहजिकच नियम पाळणे विधी नियम पाळणे आणि यम पाळणे या गोष्टी अवघड होत चाललेत मुख्य म्हणजे विधी नियम सुद्धा पाळण्याची तयारी लोकांची नाही कायदा व संस्था नियम यामध्ये येतात आणि ते पाळले जात नाहीत याचे कारण संयमासाठी लागणारे मेडिटेशनचे ट्रेनिंग आपण देतच नाही आहोत. पूर्वी दारू पिऊ नकोस सिगरेट ओढू नकोस अशा प्रकारचे संयम सांगितल्याने कळत नकळत त्यांचा संस्कार उमटत असे आणि संयमाची सवय होत असे शाळेचे नियम पाळण्यातून संघटनेचे नियम कसे पाळायचे ते शिकवले जाई त्यामुळे कंपनीचे जे नियम असतील ते कसे पाळायचे त्याचे आपोआपच ट्रेनिंग मिळे अलीकडे कला क्षेत्रामध्येच संयमाचा अभाव या गोष्टीने इतका थयाथयाट केलेला आहे की संयम कम्प्लीट ठेचला गेलाय आणि याला जबाबदार कलावंत आहेत या लोकांचा त्यांच्यातल्या बहुतांशी लोकांचा यमाशी काही संबंध असत नाही ते एक वेळ समजून घेता येते पण अलीकडे हे लोक संयमाशी काडीचाही संबंध नसल्यासारखे वागत असतात त्यांच्या आचरणाचा नियम आणि विधी नियमांशी काडीचाही संबंध असत नाही आपण काहीही केले आणि कसेही वागले तरी ते क्षम्यच आहे अशा थाटात अनेक जण जगत असतात साहजिकच यांच्या कलेमध्ये मोकाट दारू आणि बोकाट हिंसा यांचे निर्लज्ज समर्थन केले जाते त्यातून जे काही व्हायचे असते ते होतेच हीच गोष्ट काम या जीवनासंदर्भात आहे कामवासनेबाबत आहे कामाचा सगळा खेळच नियमांच्यावर अवलंबून असतो आणि या नियमांची सुरुवात घरातल्या नियमांच्या पासून होते अलीकडे घराला काही नियम असणे आवश्यक असतात असे अनेकांना वाटत नाही प्रत्यक्षात ते आवश्यक आहेत आणि ते ठरवण्याचा अधिकार घरातल्याच ज्येष्ठ लोकांना असतो संयमाचे ट्रेनिंग ही पूर्णपणे आई-वडिलांची जबाबदारी असते आजी आजोबांची जबाबदारी असते आणि ती शिकवावी लागते अनेक ठिकाणी जे मागितले जाते ते पुरवणे अशी काहीतरी गोष्ट झाली आहे त्यामुळे संयम ठेवणे हे अनेकदा आजच्या पिढीला माहित नाही एखादी गोष्ट मिळाली नाही की थयथयाट करून मिळवायची अशी प्रथाच काही मुलांच्या मध्ये पडते मग संयमाला काही अर्थ उरत नाही कारण हा थयथयाट नंतर सार्वजनिक जीवनात पण घातला जातो हीच गोष्ट शाळांच्या मध्ये आणि कॉलेजमध्ये आहे वास्तविक या दोन जागा अशा असतात की जिथे संयम शिकवला गेला पाहिजे परंतु तो शिकवला जात नाही स्वातंत्र्य संस्कारामध्ये आणावे लागते पण त्याचबरोबर स्वातंत्र्य कसे वापरायचे आणि किती वापरायचे याचा संयम पण शिकवावा लागतो फक्त स्वातंत्र्य शिकून फायदा नाही तर त्या स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी सुद्धा शिकवावी लागते आणि स्वातंत्र्य बाबतीत संयम पण शिकवावा लागतो


आपल्या आजच्या व्यवस्थेमध्ये सतत उत्तेजना पुरवली जाते सिडक्शन उभा केले जाते हे सर्व स्वतःच्या उत्पादनांच्या विषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी केले जाते परंतु त्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की उत्सुकता आणि उत्तेजकता हा स्थायीभाव बनताना दिसतो याला पूरक म्हणूनच सिगरेट आणि दारू आणि इतर नशा ज्या उत्तेजकता पुरवतात प्रमोट केल्या जात आहेत याचा एक दुष्परिणाम असा झालाय की संयम ठेवणे मूर्खपणाची गोष्ट बनत चाललीये त्यातूनच मग मी किती दारू पितो याचे गोडवे गाणारे लोक निर्माण झालेत अरे तुझा संयम आहे का ? चार पेग पोटात गेले की तू कंट्रोल बाहेर असतोस तुझा कसला आलाय स्वतःवर संयम ? आणि संयम नसेल तर कशाला तुझ्या व्यसनांचा गोडवा गातो ? पण हे केले जाते याचे कारण संयम असण्यापेक्षा उत्तेजक असणे ही काहीतरी महान गोष्ट आहे असा अनेकांचा गैरसमज झालेला आहे


याच्या मुळात गेले तर आपल्याला फक्त शिक्षण क्षेत्र दिसते अलीकडे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या नावाखाली हल्ली विद्यार्थ्यांना संयम शून्य बनवणे चालू आहे मी असे म्हणत नाही की छडी लागे छम छम विद्या येई घमघम करा फक्त मधला मार्ग शोधणे आवश्यक आहे आई आणि वडील आणि शिक्षक यांना मारण्याचा अधिकार असलाच पाहिजे पण त्याच्या मर्यादा कायद्यानुसार आता स्पेसिफाय करणे आवश्यक आहे याबाबतीत एकेकाळी नको तेवढा अधिकार दिला गेला होता म्हणजे कितीही छड्या मारल्या तरी चालायचे जे भीषणच होते आणि आता अजिबातच अधिकार नाही अशी काहीतरी उलटी स्थिती आलेली आहे याबाबतीत एक छडी फक्त हातावर मारण्याचा अधिकार शिक्षकाला नक्की द्यावा एकापेक्षा अधिक वेळा छडी मारली तर शिक्षकाला सस्पेंड करावे त्याचबरोबर पायाचे अंगठे धरायला लावणे ही शिक्षा अलाव करावी आणि तिचा कालावधी फक्त अर्धा तास असला पाहिजे अशी अट घालावी विद्यार्थ्याला सांगावे की अर्ध्या तासाने तू उठावेस आणि तरीही तुला शिक्षक म्हणत असेल की आणखी धर तर मग त्या शिक्षकाला शिक्षा द्यावी परंतु शिक्षकांच्या हातात काही अधिकार देणे आवश्यक आहे अमेरिका अनेकदा अतिरेक करून टाकते आपल्याला अमेरिकेकीकरण करण्याची गरज नाही मध्य काढण्याची गरज आहे अर्थात या सगळ्यापेक्षा संयम शिकवण हे सर्वाधिक महत्वाचे किंबहुना ते सर्वाधिक उत्तम तंत्र आहे किंबहुना प्रत्येक तंत्राचा पाया संयम असतो तो नसेल तर मग काही साध्य होत नाही मुख्य म्हणजे शिक्षण क्षेत्रातून स्पर्धा काढून टाकली पाहिजे ज्याने त्याने आनंदासाठी काम केले पाहिजे आणि ते मूल्यमापनाच्या कसोटीवर आणू नये याबाबतीत मात्र मी नवीन धोरणाच्या बाजूने आहे मात्र दहावीपासून परीक्षा चालू झाल्याच पाहिजेत तोपर्यंत जेवढ्या आनंदाने विद्यार्थ्यांना जे काही करता येईल ते त्यांना करू द्यावे शिक्षकांनी मुख्य म्हणजे त्यांचा आनंद शोधण्यात त्यांना मदत करणे आवश्यक आहे याबाबतीत शिक्षक मित्र असला पाहिजे अनेकदा शिक्षक हे स्पर्धाच लावून देण्यात मग्न असतात अनेक शिक्षक वैयक्तिक खुन्नस काढत असतात तर अशा लोकांना कसा चाप लावायचा तेही बघावे यासाठी सर्वोत्तम उपाय सर्व वर्गामध्ये कॅमेरा असणे आवश्यक आहे जेणेकरून प्रिन्सिपलला वॉच ठेवता येईल 


शिक्षकांच्यातल्या सुप्त स्पर्धा हा एक फार मोठा प्रकार सध्या उदयाला आलेला आहे याचेही काहीतरी करणे आवश्यक आहे विशेषत : प्राध्यापक लोकांच्या तर ही स्पर्धा प्रचंड दिसते जो उत्तम शिकवतो त्याला कसे ठोकता येईल हे पाहणाऱ्या नतंद्रष्ट व पैसा आणि वशिला लावून शिक्षक झालेल्यांची किंवा प्राध्यापक झालेल्यांची एक फौजच तयार झालेली आहे स्वतःला शिकवता येत नाही आणि ज्याला येते त्याची वाट लावायची असा एक उद्योग चालू असतो यासाठीच मुळात गुणवत्ता प्रधान शिक्षक भरती होणे आवश्यक आहे प्राध्यापक भरती होणे आवश्यक आहे आणि गुणवत्ता असलेल्या शिक्षकांच्या अभावामुळेच शिक्षण क्षेत्राचा विलक्षण खेळईठोबा झालेला आहे 


अर्थातच संयम हाच या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम आहे त्यासाठी हे सर्व करायचे आहे याचे संयम भान असले पाहिजे संयम हा जोपर्यंत नसानसात भिनत नाही तोपर्यंत चांगला नागरिक तयार होणे अवघड आहे


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना