फेसबुक वर गाजलेल्या कविता

 फेसबुक वर गाजलेल्या कविता

न्यू कॉलेजमधल्या कविता 

तेव्हापासून 


तिच्या दोन स्तनातून तिने दोन पहाड काढले 

व पाण्यात बुडवले 

तर नदी तयार झाली 


तिच्या नाकातून अनेक नाके निघाली 

तर तिने त्यांना झाड बनवून 

ती नदीकिनारी लावली 


तिचा मोह पडून 

आभाळ तिच्या ओठात वाकले तर 

त्या चुंबनाचा सूर्य झाला 


मग ती चालली तिथे कुरणे निर्माण झाली 

आणि तिच्या डोळ्यांपासून करुणा पाजणाऱ्या 

गायी तयार झाल्या 


मी तिच्या प्रेमात पडलो 

आणि म्हणालो 

" मला तुझा प्रियकर बनव "

तर म्हणाली 

"तू माझा मुलगा आहेस "


तेव्हापासून मी आईचा कवी झालो 


श्रीधर तिळवे नाईक 

(एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )


कॅम्पुटर बरोबर रोमान्स सुरू झाला आहे 

एक अशक्य असा डान्स सुरू झाला आहे 


वाटले नव्हते कधी मला मीही याच्या प्रेमात पडेन 

चिन्हांच्यातला ट्रान्स सुरू झाला आहे 


कधीच आदर दिला नव्हता मी कुठल्या उंदराला 

बिळात घुसण्याचा चान्स सुरू झाला आहे 


प्रथमच मला गोष्टींचे वेग उम जायला लागले

माझ्या वेगाबाहेर एक ग्लांस सुरू झाला आहे


असे काही न्यूड सारे स्क्रीनवर अवतरते की 

भारतात राहूनपण फ्रान्स सुरू झाला आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल वर्ड्स या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

A I

DHARM ANI CHAUTHI NAVTA