विद्या वैद्य

 भारतातील जीवक , वैद्य वेदु आणि अश्विनी कुमार 


भारतातील जे काही शैव संघर्ष आहेत त्यापैकी एक जीवक आणि आजीवक आहे जीवक हे नावाप्रमाणे जीव जगवणारे होते आणि मनुष्य जीव जगू शकतो यावर त्यांचा विश्वास होता त्या उलट गोशालक सारखे आजीवक हे सर्व काही मनुष्याच्या हातात नसते नियतीच्या हातात असते असे मानत होते ते जे नीतीची व्याख्या करत होते ते पूर्णपणे वेगळी होते आणि आपल्याकडे ग्रीक प्रभावाखाली ग्रीक लोकांची व्याख्या स्वीकारली गेली


जीवकांचा आपल्या वेदावर आणि ज्ञानावर विश्वास होता पण पुढे हा तट अधिकाधिक शवविच्छेदन करायला लागला आणि शरीरशास्त्राचा अभ्यासही करायला लागला युरेशियन लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जर काय असेल तर तो म्हणजे ते शरीराला अत्यंत पवित्र वगैरे मानायचे त्यामुळे साहजिकच त्यांना शवविच्छेदन वगैरे झेपले नाही साहजिकच त्यांच्यापैकी ज्यांना ते झेपले त्यांना सुद्धा त्यांनी नीट वागवले नाही एकोणिसाव्या शतकामध्ये हा संघर्ष अधिक तीव्र झाला कारण युरोपियन लोकांच्या मुळे जो ऍलोपॅथिक डॉक्टरकीचा व्यवसाय आला होता तो शरीर विज्ञान आणि शरीर ॲनाटोमी आणि त्याचबरोबर शव विच्छेदन प्रमाण मानत होता साहजिकच सुरुवातीला त्याला विरोध केला गेला आणि जे जे सुरुवातीचे डॉक्टर होते त्या सर्वांना ब्राह्मणांनी विरोधच केलेला दिसतो हळूहळू हा विरोध मावळत गेला जेव्हा पेशंट बरे व्हायला लागले


प्राचीन काळात जे दुसरे डॉक्टर होते त्यांना वेदू म्हटले जाईल ज्याचा संस्कृत अपभ्रंश होऊन पुढे वैद्य हा शब्द तयार झाला हे मात्र शेवटपर्यंत आयुर्वेदाप्रमाणे उपचार करत राहिले त्यासाठी शवेविच्छेदन करायची गरज नाही असा आग्रह धरत राहिले जीवक असोत किंवा वैदू असत दोघांनाही अतिशय आदराचे स्थान शैव समाजामध्ये होते दुर्दैवाने ही स्थिती आर्य अथवा युरेशियन लोकांच्या मध्ये नव्हती युरेशियन लोकांच्या मध्ये अश्विनी कुमार नावाची एक वैद्यांची जमात उदयाला आली ती पुन्हा आयुर्वेदावर विश्वास ठेवणारीं होती त्यांचा प्रकाशावर उपचार म्हणून प्रचंड विश्वास होता आज आपणाला प्रकाश प्रचंड उपचार आहे की नाही असा प्रश्न पडतो परंतु एके काळी प्रकाशात हिंडणे हा सुद्धा उपचार मांडला जात होता आणि प्रकाशाचे महत्व अश्विनी कुमारांना सर्वाधिक जास्त कळले होते एकेकाळी हे लोक ब्राह्मण मांत्रिक असल्याने त्यांना सुरुवातीला आदराचे स्थान होते पण पुढे महाभारत काळामध्ये हे स्थान नष्ट झाले असे दिसते महाभारताच्या १२: २०८ : २३ ते २५ मध्ये स्पष्टपणे अंगीरस हे ब्राह्मण आदित्य हे क्षत्रिय मारुती हे वैश्य आणि अश्विनी कुमार हे शूद्र देव आहेत असा उल्लेख आहे म्हणजेच हे लोक अश्विनी कुमारांना चक्क शूद्रच मानत होते याचे एकमेव कारण हे लोक या काळामध्ये शैव लोकांच्याकडून वैद्यकी शिकत होते आणि हळूहळू शवविच्छेदन शिकायला लागले होते साहजिकच त्यांचा दर्जा ढासळत शेवटी शूद्रवर्णापर्यंत पोचला पुढे पुढे जेव्हा जीवक लोक शवविच्छेदन करायला लागले तेव्हा त्यांच्यावर अनेक आरोप होऊ लागले आणि यातूनच पुढे शैव-धर्मामध्ये एक पंथ निर्माण झाला ज्याला कापालिक असे म्हटले जाऊ लागले आणि वैष्णव समाजामध्ये किंवा युरेशियन समाजामध्ये त्यांच्यावर कंपल्सरी स्वतंत्र आयडेंटिटी घेण्याची सक्ती झाली आणि हे आयडेंटिटी काय असावी हे ठरवले गेले


मालती माधव सारख्या नाटकांमध्ये जेव्हा कापालिकांवर नरमास भक्षणाचा आरोप होतो तेव्हा प्रत्यक्षात काय घडत असते तर तिथे हा शैव पंथ बदनाम करणे हा पहिला उद्योग असतो आणि दुसरा उद्योग अर्थातच त्यांचा शस्त्रक्रिया करणारा वैद्यकीय व्यवसाय बंद पाडणे हा असतो आणि होता  


हे कापालिक कसे निर्माण झाले ?मी फार पूर्वीपासून हे सांगत आलेलो आहे की जिवक हे आर्य युरेशीयन परंपरेनुसार शूद्र वर्णामध्ये गणले गेले याचे सर्वात मोठे कारण ते शैव होते आणि त्यांनी शवविच्छेदन कधीच बंद केले नाही त्यांनी आरोग्यशास्त्र कधीही बंद केले नाही त्यामुळे साहजिकच शस्त्रक्रिया करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती तशीच राहिली आणि खुद्द शिव हा वैद्यश्वर असल्याने तो आपल्या मागे आहे अशी त्यांची धारणा होती आजही या वैद्येश्वराची मंदिरे आहेत कधी कधी वैद्यनाथ असेही म्हटले जाते पुढे वैष्णव समाज व्यवस्थेने त्यांच्यावर गळ्यात कवट्या घालण्याची शक्यता सक्ती केली आणि या लोकांना कापालिक असे नाव मिळाले ह्या सक्तीमुळेच हा लोकांचा पंथ आऊटसाईडर ठरत गेला यातील अनेकांना पुढे ढोर दर्जा मिळाला पुढे शिवाजी महाराजांच्या राजवटीत या सगळ्यांना पुन्हा सन्मान मिळाला आणि कवट्या घालण्याची सक्ती नष्ट झाली मात्र हे वैद्य स्वतःची शैव मुळे विसरले आणि हळूहळू वैष्णव बनत त्यांनी नंतर युरेशियन व्यवस्थेत स्वतःची जागा करून घेतली पुढे पुढे तर अनेक जण अश्विनी कुमार ब्राह्मण होते असे खोटे सांगू लागले वास्तविक सुरुवातीला ते ब्राह्मण होते पण नंतर महाभारत काळात ते शूद्र बनत गेले होते पुढे मग अनेक स्मृतींच्या मध्ये वैद्य लोकांचा उल्लेख हा शूद्र म्हणूनच झालेला दिसतो अनेकदा डॉक्टर लोक हे वाचत नाहीत त्यामुळे त्यांना हे माहीत नसते की त्यांचा उल्लेख स्मृती वाङ्मयात शूद्र म्हणून होतो . अपवादात्मक वेळेला बारा बलुतेदार किंवा आलूतेदारांच्या मध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख झालेला दिसतो त्यामागे कारण एकच आहे ते म्हणजे माणसाच्या सर्व प्रकारच्या घाणीला वैद्य लोकांना सुद्धा स्पर्श करावा लागतो आणि घाणीला स्पर्श करणारे सर्व काही वाईटच असे ठरलेले असल्यामुळे आपोआपच त्यांची गणना शूद्र आणि अतिशूद्र यांच्यामध्ये होते जगातील हा एकमेव देश असावा जिथे मातीला स्पर्श करणारा कुणबी हा शूद्र गणला जातो हीच गोष्ट शैव कारागीर लोकांचे आहे त्यांना सुद्धा हळूहळू शूद्र हा दर्जा देण्यात आला


मुळात जे जीवक वैद्य वैदू होते तेच लोक पुढे ब्रिटिश काळामध्ये अधिक जोमाने शरीरशास्त्राकडे वळले आणि हळूहळू त्यांच्यापैकीच काही डॉक्टर होऊन ऍलोपॅथिक डॉक्टर झाले माझ्या स्वतःच्या आजोबांना शरीराचे अनाटोमी व्यवस्थित माहिती होती आणि त्यामुळेच ते औषधे देत असत कारण शैव आचार्यांना ज्या काही गोष्टी याव्या लागतात त्यामध्ये वैद्यकीय ज्ञान पण येते किंबहुना साहेब आचार्यांची संख्या कमी झाली याची सर्वात मोठे कारण आचार्यांना आवश्यक असलेले ज्ञान सांभाळणे हळूहळू अनेक लोकांना कठीण वाटायला लागले कारण शाखा अधिकाधिक विस्तारित होत गेल्या केवळ ज्ञानाने भागत नव्हते तर कला पण आल्या पाहिजेत अशी शक्ती होती साहजिकच त्यामुळे कला आणि ज्ञान या गोष्टी आणि पुन्हा साधना बॅलन्स करत जाणे अवघड बनत गेले त्यापेक्षा वैष्णव बरे होते एकदा तुम्ही जन्मजात ब्राह्मण झाला की तुम्हाला कायमचाच पुरोहित होण्याचा चान्स होता आचार्य झाला तरी फार व्यापक ज्ञानाची सक्ती नव्हती साहजिकच सर्व पंडितांनी हा मार्ग निवडला आणि ते युरेशियन बनत गेले वैद्यकीय व्यवसायात सुद्धा फार काही वेगळे घडले नाही


सगळ्याच डॉक्टरांना आता शंकराचा विसर पडलेला आहे मी मागे म्हंटल्याप्रमाणे वैद्यकीय इतिहासामध्ये शंकर यांनी पहिल्यांदाच भांगेचा वापर हा अनेस्थेशीया म्हणून केला त्यामुळे शरीर विच्छेदन शक्य झाले आणि जीविक लोक त्यातूनच निर्माण झालेले आहेत अन्यथा ते अशक्यच होते भारतामध्ये सुश्रुत तयार झाला त्याच्यामागे शैव पार्श्वभूमी आहे पण हल्ली ती वैदिक असल्याचे जोरदार आवाजात सांगितले जात असल्याने तिचा विसर पडलाय म्हणून हा लेखन प्रपंच !


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना