उत्तर परंपरा वाद

 उत्तर परंपरा वाद आणि चौथी नवता श्रीधर तिळवे नाईक


चौथी नवता ही केवळ उत्तर आधुनिकतेच्या विरोधात उभी ठाकत नाही तर ती संपूर्ण उत्तरवादाच्या विरोधात ठाकते हे मी सौष्ठवच्या पहिल्याच अंकात एका कवितेद्वारे जाहीर केले होते या कवितेची चर्चा विश्राम गुप्ते आणि मीनाक्षी पाटील या दोघांनी थोडी थोडी केलेली आहे 


उत्तर वादाला माझा असलेला विरोध का आहे हे अनेकांना कळलेले दिसत नाही याचे कारण उत्तर म्हणजे उत्तराधुनिकता वाद असे एक समीकरण आपल्याकडे रूढ झालेले दिसते अनेकांच्या तर हे गावी नाही की आम्ही जेव्हा 1980 नंतर चर्चा करत होतो तेव्हा प्रामुख्याने उत्तर संरचनावाद हा शब्द अधिक प्रचलित होता आणि आम्ही तोच वापरत होतो याचे कारण असे होते की सर्व उत्तर संरचनावादी लोकांनी ठाम आणि स्पष्टपणे उत्तर आधुनिकता ही संज्ञा त्यांच्या संदर्भात वापरायला पूर्णपणे मनाई करायला या काळामध्ये सुरुवात झाली होती त्यांनी हे का केले याची सुद्धा अनेकांना अजूनही कल्पना आलेली नाही आणि मराठीत तर ती बिलकुलच नाही मिशेल फुकोसारखा विचारवंत स्वतःला उत्तराधुनिक म्हणून घ्यायला नकार देतो हे आता सांगण्याची वेळ आलेली आहे तेव्हा उत्तरवादामध्ये उत्तर संरचनावाद पण येतो आणि उत्तर आधुनिकता वाद पण येतो उत्तर औद्योगिक वाद पण येतो आणि उत्तर स्त्रीवाद सुद्धा येतो जे जे उत्तर हे विशेषण लावून येते त्यातले बरेचसे हे उत्तर वादात येते आणि म्हणूनच सौष्ठवच्या पहिल्या अंकात मी तो शब्द वापरला होता कुठल्याही काळामध्ये व्यवस्थित मध्ये व्यवस्थेमध्ये आपली जागा निर्माण करून घेण्यात काही लोक व्यवस्थित यशस्वी होतात आमच्या काळामध्ये अशा प्रकारची व्यवस्थित जागा तयार करण्यामध्ये उत्तरवादी लोक यशस्वी झाले होते आणि त्यांचे राजकीय नेतृत्व सुद्धा हळूहळू उदयाला यायला सुरुवात झाली होती ज्यातून पुढे अनेक प्रकारच्या उत्तरवादी राजवटी अस्तित्वात आल्या 


मराठीतही प्रस्थापित व्यवस्था ही वर्तमान काळामध्ये पूर्णपणे उत्तर वादाने भारावली गेलेली आहे आणि हा उत्तर वाद 1950 पासून युरोप आणि अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि हळूहळू संपूर्ण जग त्याने व्यापले ज्यात महाराष्ट्र सुद्धा हळूहळू यायला लागला अर्थातच याला शह देणारी पहिली पिढी ही आमची होती आणि ती जगभरातच १९८०नंतर उदयाला आली तिचा सुरुवातीला उदय हा अमेरिकेत आणि युरोपमध्ये झाला आणि हळूहळू तिचे मेग्यानेट्यानॅरेटिव्ह तयार होत गेले कव्ही या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये मी याची थोडीशी चर्चा केलेली होती 


महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आधुनिकतेला छेद देणारा जो वाद निर्माण झाला त्याला मी उत्तर परंपरा वाद असे म्हणतो आणि याचे कारण असे आहे की हे जे काही महाराष्ट्रात घडले ते सर्व काही परंपरेला पुनर्जीवित करू इच्छिणारे होते परंपरेतच उभे राहून आपल्याला सर्व केले पाहिजे असे मानणारे होते आणि साहजिकच हे सर्व लोक परंपरावादी आहेत परंपरेचे समर्थन करतात आता कोणी परंपरेमध्ये आधुनिकता शोधते तर कोणी पुरोगामी वाद परंतु मूळ जो स्वभाव आहे तो परंपरेला शरण जाण्याचा आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारतभर जे पारंपारिक लोक होते त्यांना हा उत्तर परंपरावाद जो पुन्हा एकदा महाराष्ट्रातून जन्माला हा प्रचंड भावलेला दिसतो या उत्तर परंपरा वादाचे चार चेहरे 1980 पर्यंत स्पष्ट होत गेलेले आहेत 

पहिला उत्तर मार्गी चेहरा : यामध्ये प्रामुख्याने हिंदुत्ववादाचा समावेश होतो ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला ज्याचा पाया विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक या महाराष्ट्रीयन लोकांनी घातला सावरकर आणि ठाकरे या दोन मराठी लोकांनी तो विस्तारला

दुसरा देशीवादी चेहरा ,: हा देशी परंपरेला आणि वादाला धरून आला आणि त्याचीही मांडणी ही महाराष्ट्रात झाली आणि तिच्यात अनेक विचारवंतांचा ही समावेश होतो साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने भालचंद्र नेमाडे यांनी तो अत्यंत जबाबदारीने वापरला

तिसरा पोटी वादी चेहरा या चेहऱ्यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरांच्या नंतर उदय झालेल्या दलित पॅंथरचा आणि दलित साहित्याचा समावेश होतो जो नवबौद्ध परंपरा हीच प्रमाण मानतो आणि सर्व ओबीसीबीसी आणि आदिवासी लोकांनी हीच परंपरा मानली पाहिजे असा आग्रह धरतो त्यांचा समावेश बौद्ध परंपरेत करण्यासाठी येथे धडपड करतो 


देशीवादी चेहरा हा तुम्हाला देशील परंपरेमध्ये मराठी परंपरेमध्ये उभा करायला तडफडतो आणि पोटी चेहरा तुम्हाला बौद्ध परंपरेमध्ये उभा करायला धडपडतो स्त्रीवादाचा या काळातला आवाज थोडासा क्षीण होता आणि तो अनेकदा मुख्य मार्गी किंवा महामार्गी आंतरराष्ट्रीय परंपरेलाच भिडलेला दिसतो 


जमातीवादी चेहरा हा प्रामुख्याने नव्याने उदयाला आलेल्या आदिवासी साहित्यामुळे तयार झाला असला तरी त्याचे पालन पोषण अनेकदा आदिवासी साहित्याच्या बाहेरच्या लोकांनी केलेले आहे आणि हे पूर्ण पणे जाणीवपूर्वक केलेले आहे विशेषता देशीवादी लोकांच्या पैकी काही लोकांनी आदिवासी साहित्याला प्रचंड पाठिंबा दिला उदाहरणार्थ भुजंग मेश्राम याच्या कविते मागे चंद्रकांत पाटील ठामपणाने उभे राहिले होते भुजंग माझा वैयक्तिक दोस्त असल्याने त्याबाबतीतले अनेक वैयक्तिक तपशील मला माहिती आहेत 


हा सगळा उत्तरपरंपरावाद परंपरेला शरण का गेला हा एक फार मोठा प्रश्न आहे कदाचित 19 30 नंतर इंग्लंडच्या साहित्य सृष्टीमध्ये टीएसीलेट नावाचा प्रचंड मोठा उत्तर परंपरावादी माणूस निर्माण झाल्याने आणि हे लोक त्याच्या प्रभावात आल्याने हे घडलेले असावे याची चर्चा आम्ही इतरत्र एका दिवाळी अंकात बहुदा रंग वाचा केलेली आहे या काळामध्ये शैव हा एक पंथ आहे हा ब्राह्मणी विचार सेटल झालेला दिसतो आणि त्याला हिंदूवादी आणि हिंदुत्ववादी दोघेही आपल्या पंखाखाली घेऊ इच्छितात असेही दिसते अनेकदा आपण असे पाहतो की बहुसंख्य शैव विचारवंत या काळामध्ये हिंदू धर्माचा किंवा हिंदुत्वाचा भाग म्हणून काम करताना दिसतात अगदी सद्गुरूंच्या पर्यंत आपल्याला हे दाखवून देता येते 1980 नंतर शैव हा स्वतंत्र धर्म आहे ही मांडणी पुढे यायला सुरुवात झाली सुरुवातीला लिंगायत धर्म हा स्वतंत्र आहे या रूपामध्ये ती आली अर्थातच उत्तर परंपरा वादी लोकांना हे सहन होण्यासारखे नव्हतेच मग ते कुठेही असोत त्यातूनच गौरी लंकेश ची हत्या झाली माझे यासंदर्भातले म्हणणे असे होते की लिंगायत हा सुद्धा शेवटी शैव श्रुतीतून उगम पावलेला धर्म आहे आणि तो सर्वश्रुतीतल्या अनेक धर्मांच्या पैकी एक अशी आपण मांडणी करायला हवी पण अर्थातच काही लोकांना हे मान्य होते काहींना नव्हते मी मात्र शैव धर्म स्वतंत्र आहे हा स्टान्स सुरुवातीपासून घेतलेला आहे लिंगायत धर्म स्वतंत्र आहे हे तर ब्रिटिशांनी ही नंतर मान्य केले होते त्यामुळे माझ्या मते हे खूप जुने मत आहे प्रत्यक्षातले खरे मत शैबधर्म स्वतंत्रच मानत होते असेच आहे आणि चौथ्या नवतेमध्ये त्याचा विस्तार करणे आवश्यक आहे कारण संपूर्ण जगभरातल्या नेटवर्किंग साठी हे आवश्यक आहे असे मी मानतो साहजिकच या मताला सुरुवातीला मान्यता मिळणे शक्यच नव्हते आणि माझा हळूहळू सर्वकाही होईल या गोष्टीवर विश्वास असल्याने संयम सुटला नाही मी जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म शैव-धर्म मानतो त्यामुळे नंतरच्या काही कवितांच्या मध्ये यांचा प्रचंड प्रभाव दिसेल विशेषतः 1997 ते 2005 हा कालखंड संपूर्ण चॅनेल सिरीज असे सुद्धा म्हणायला हरकत नाही मी तसे का मानतो ही एक वेगळी मांडणी केली गेलेली आहे कारण या काळामध्ये उत्तर परंपरा वाद आलेला होता आणि हळूहळू तो पुरोगामी बनण्याऐवजी प्रतिगामी बनत गेलेला दिसतो आणि साहजिकच मला लढाई पुढे घेऊन जायची होती या काळामध्ये नव बौद्ध धर्माला मिळणारा पाठिंबा हळूहळू कमी व्ह्यायला लागला होता आणि अनेक दलित धर्मांतर करायला नकार द्यायला लागले होते दुर्दैवाने ही परखड वस्तुस्थिती अनेक नव बौद्ध विचारवंतांच्या लक्षातच आली नाही 


भारतावर परंपरेचा हा जो काही दबाव साठोत्तरी कालखंडात निर्माण झाला त्यामुळे साहजिकच भारतामध्ये उत्तराधुनिकतेचा जितका विचार करावा लागतो त्यापेक्षा अधिक विचार आपणाला या उत्तर परंपरावादाचा करावा लागतो आणि परंपरेविषयी कोण काय बोलतोय याविषयी थोडासा विचार करावा लागतो उदाहरणार्थ हिंदुत्ववादी परंपरावाद हा कर्मठ होत जाताना दिसतो तर देशीवादी हिंदुत्व वादापेक्षा परंपरा ही अधिक ओपन व्यवस्था आहे अशा प्रकारचे गृहीतक सातत्याने मानताना दिसतो मात्र प्रत्यक्षामध्ये मात्र परंपरेत या लोकांनी फार काही भर टाकलेली मला दिसलेली नाही या लोकांची प्रामुख्याने जी भर आहे ती साहित्याच्या क्षेत्रात झालेली आहे वैचारिक क्षेत्रात नाही पुढे पुढे तर वारकरी संप्रदाय थेट हिंदुत्ववादाला जाऊन भेटला आणि दुर्दैवाने हा हिंदुत्ववाद प्रमोद महाजनांच्या वैश्य हिंदुत्वा पेक्षा ब्राह्मणे हिंदुत्वाला जास्त पसंत करायला लागला हे असे का घडले याचे वारकरी चळवळीतल्या विचारवंत लोकांनी अत्यंत परखड परीक्षण करणे आवश्यक आहे तुम्ही हिंदुत्ववादी होणार असाल तर किमान पुढच्या दिशेचे हिंदुत्ववादी व्हा मागच्या दिशेचे नाही असे मला नम्रपणे सांगावेसे वाटते


याबाबत आपण जर का पोटी चेहऱ्याकडे बघितले तर आपणाला तेच चित्र दिसते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे जाऊन कोणी काही मांडणी केलेली आहे असे दिसत नाही मुख्य म्हणजे नव बौद्ध हा हळूहळू अतिवाद होत गेलेला दिसतो आणि त्यातून अनेक पेचप्रसंग निर्माण झालेले दिसतात सर्वात मोठे अपयश ओबीसी लोकांना सामावून घेण्यात अपयश येणे हे आहे अलीकडे तर ओबीसी वर्गाला नव बौद्ध लोकांशी काही कर्तव्यच नाही असे वाटणे इतपत वेगळे वळण लाभलेले दिसते साहजिकच हा ओबीसी ग्रुप हा एक तर मार्गी हिंदुत्ववादी झाला किंवा देशी हिंदूवादी झाला असे आपणाला दिसते आणि अनेक ओबीसी हिंदूवादी लोक हे तुम्हाला नेमाडे वादी बनलेले दिसतात आणि दुर्दैवाने 2014 नंतर हळूहळू आपणाला असे दिसते की जो ओबीसी देशी हिंदूवादी झाला होता तो हळूहळू मार्गी हिंदुत्ववादी बनत गेला 


त्या मानाने पोटी लोकांनी आपल्या अस्मिता जास्त चांगल्या रीतीने टिकवलेली दिसते परंतु बाबासाहेब आंबेडकर यांची उंचीच एवढी प्रचंड आहे की त्यांच्या खांद्याला सुद्धा अजून कोणी भिडलेला नाही सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे दैवतीकरण केले याचा परिणाम असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चिकित्सा झाली नाही त्यांच्या मर्यादा दाखवून देणे हा एक फार मोठा अपवाद मानला जाऊ लागला आणि त्यामुळे आंबेडकरांच्या पासून मुक्त होऊन अधिक पुढचा विचार मांडणे अधिकाधिक कठीण होत गेलेले दिसते याचे कारण या लोकांनी आंबेडकरांना धारा मान्य ऐवजी परंपरा मानले आणि एकदा का तुम्ही एखादी गोष्ट परंपरा म्हणून मान्य केली की मग त्याची चिकित्सा अनेकदा थांबते आंबेडकरांच्या विचारांचे काहीसे असेच झालेले दिसते वास्तविक तो केवळ प्रारंभबिंदू आहे आणि पुढे जाऊन त्याची नदी बनवायचे असेल तर त्यात प्रचंड मोठी भर टाकावी लागेल


आदिवासी जमातीय चेहरा मात्र अलीकडच्या काळामध्ये कसा वाढणार हा एक फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे साहित्य निर्माण होते परंतु ते नेमके कोणत्या दिशेने न्यायचे हे स्पष्ट नाही 


अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर चौथी नवता जेव्हा अस्तित्वात यायला लागली तेव्हा अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती होती 


चौथ्या नवतेने यातल्या मार्गी देशी पोटी आणि जमाती या साऱ्या अंगाने आपली मांडणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आता काळ पुन्हा एकदा इंटिग्रेशनचा नेटवर्किंग चा आलेला आहे असे मी मानतो आणि म्हणूनच माझ्या बाजूने मी सर्व प्रकारचे नेटवर्किंग करत असतो लोक म्हणतात की तुम्ही एक तर दलित साहित्यिक व्हा किंवा आदिवासी साहित्यिक वा किंवा मुंबईकर मार्गी साहित्यिक व्हा किंवा देशी साहित्यिक व्हा मी हे सर्व नाकारलेले आहे आणि हे सगळे कसे एकमेकांशी जुळलेले असते याची एक समग्र नेटवर्किंग मांडणी मी केलेली आहे जी अजूनही मराठीच्या लोकांना डायजेस्ट झालेली नाही काहीतरी उथळ भाष्य केली म्हणजे आपण शहाणे झालो असे वाटणारे लोक निर्माण झाल्याने चौथ्या नवतेला आवश्यक असलेला पाठिंबा मिळालेला दिसत नाही पुन्हा या काळातला संपूर्ण मीडिया हा उत्तर परंपरा वादी असल्याने त्याने या उत्तर परंपरावादी मांडणीच्या विरोधात उभे ठाकलेल्या लोकांना आपल्या वाऱ्याला सुद्धा उभे केले नाही उलट त्यांनी उत्तर परंपरा वादी चेहरा धारण करणाऱ्या सर्व देशीवादी नेमाडपंथी लोकांना आश्रय दिलेला दिसतो कारण हिंदुत्ववाद बळकट करण्यामध्ये या लोकांचा न कळत हातभार लागतो साहजिकच मीडियामध्ये हेच लोक प्रमुख झालेले दिसतात आणि हेच लोक समकालीन आवाज आहेत असा डंका वाजवता येतो तुम्ही वारकरी संप्रदायाला पाठिंबा द्या मग आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो अशा प्रकारची सगळ्या चॅनेलची मांडणी आहे डील आहे त्याला नकार देणारे लोक चॅनेलच्या संस्कृतीतून बाहेर फेकले गेले याचे कारण सर्व चॅनलस उत्तर परंपरावादी चौकटीच्या आहारी गेलेली आहेत आणि तिच्यातच वावरत आहेत कारण भारतीय जनता हीच मुळात आता उत्तर परंपरावादी बनलेली आहे तिला परंपरेचा गाजावाजा आवडतो साहजिकच उत्सवांचे सेलिब्रेशन आणि परंपरांचे उत्सव सुरू झालेले आहेत आता हेच करायचे असेल तर मग आणखीन काही वर्षाने हिंदी चॅनेल्स ही मराठी चॅनलच्या अत्यंत पुढे गेलेली दिसली तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण उत्तर परंपरावाद ह्या लोकांना जास्त चांगला जमतो आणि त्यामुळेच त्याला विरोध केला पाहिजे याची जाणीव जितकी हिंदी किंवा साउथ इंडियन माध्यमातून आहे तितकी ती मराठी माध्यमांमध्ये नाही आहे साहजिकच एक दिवस असा येणार आहे ज्या वेळेला मराठी चॅनल्स संपलेली दिसतील. ज्याप्रमाणे मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री साउथ फिल्म इंडस्ट्री वाल्यांनी टेक ओव्हर केलेली आहे त्याचप्रमाणे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री साउथ वाल्यांनी टेकवोर केली तर मला आश्चर्य वाटणार नाही दुर्दैवाने अशा प्रकारची लागणारी माणसे अजूनही तिथे उपलब्ध नाहीत कारण मराठीत अशी माणसेच नाही तसा त्यांचा गैरसमज आहे पण हा गैरसमज टिकणार नाही जसा तो फिल्म इंडस्ट्री मध्ये कोसळला तसा तो मराठीत सुद्धा कोसळणे अपरिहार्य आहे आणि या कोसळण्यातूनच कदाचित मराठी संस्कृतीला काही नव्या वाटा मिळू शकतात या देशांमध्ये उत्तर परंपरा वाद कोसळणं अत्यंत आवश्यक आहे कारण चौथ्या नवतेला वाट नाही मिळाली तर आपण पुन्हा एकदा सनातन कर्मठ धार्मिक राज्यात परतू. यावर नवा हिंदुत्ववाद मांडणे हा ही एक उपाय असू शकतो परंतु यासाठी हिंदुत्ववाद किती ओपन आहे याबद्दल मला प्रचंड शंका आहे २०१९ नंतर उलट उत्तर परंपरा वादी चेहरा अधिक बळकट करण्याचे पाप भाजपने केले आहे आणि लोकांनी त्याला पाठिंबा दिल्यामुळे सर्व काही बिघडत जाणार हे अटळ आहे अर्थात आर्थिक संरचनांचा नेटवर्कचा दबाव जर का पडला तर कदाचित भाजपला नवे हिंदुत्व निर्माण करावे लागेल आणि ते सेलिब्रेट पण करावे लागेल अन्यथा जो नवा पर्याय उपलब्ध होईल त्यामागे लोक जातील या बद्दल शंका नाही सर्वात विचित्र आणि वाईट गोष्ट या महाराष्ट्रात जर कुठली घडली असेल तर ती म्हणजे पुरोगामी लोकांनी वारकरी संप्रदायाला दिलेला पाठिंबा या लोकांना हे लक्षातच आले नाही की ते ज्या गोष्टींच्या विरोधात लढताहेत त्याच गोष्टीला ते प्रत्यक्षात पाठिंबा देत आहेत आंधळेपणा म्हणतात तो हाच आणि म्हणूनच पुरोगामी लोक पुरोगामी वादाची लढाई हारलेली दिसतात ही लढाई ते हारणे अटळ होते कारण त्यांनी इतिहासाशी बेमानी केली होती त्यांनी आपला इतिहास 12 व्या शतकापासून चालू होतो विठ्ठलापासून सुरू होतो नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या पासून सुरू होतो ही गैरसमजुत बाळगली त्याआधी जणू महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता अशी त्यांची कल्पना अशी भुक्कडगिरी कळणारे मग आपोआपच मागे पडतात तेच झालेले आहे म्हणजे एका अर्थाने पुरोगामी वाद हा हिंदुत्ववादी लोकांची बी टीम म्हणूनच खेळत होता आणि आश्चर्यकारकरीत्या त्यांना याची कल्पना झाली नाही 


वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना पुढे जायचे आहे परंतु त्यांच्यापुढे त्यांना पुढे नेणारा पर्याय नाही तुकारामाचे नाव घेतल्याशिवाय पुढे जात नसतील तर मग लोकांना तुकाराम आधीच माहिती आहे त्यासाठी त्यांना स्वतंत्र पुरोगामी लोकांची गरजच नाही पण पुरोगामी लोकांना कोण समजावून सांगणार पुरोगामी लोकांनी चळवळीच्या संघटनासाठी म्हणून ज्या तडजोडी केल्या त्या तडजोडीच त्यांच्या मुळावर आलेल्या आहेत एका अर्थाने उत्तर परंपरावादाने परंपरेच्या साह्याने पुरोगामी वादावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे 


श्रीधर तिळवे नाईक


अरुण कोलटकर यांची मर्यादा आणि दिलीप चित्रे श्रीधर तिळवे नाईक


अरुण कोलटकर हे मराठीतील एक अतिशय महत्त्वाचे कवी! ज्यांना कारागिरी आवडते त्यांना तर ते सर्वात श्रेष्ठ साठोत्तरी कवी वाटतात प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांच्याइतकेच आकाराचे प्रयोग दिलीप चित्रे यांनीही केलेले आहेत परंतु त्या प्रयोगांना दाद मिळत नाही याचे कारण दिलीप चित्रे जो प्रयोग करतात तो फक्त एकदाच वापरत नाहीत तो ते वारंवार वापरतात साहजिकच तो इतक्यांदा त्यांच्या कवितेमध्ये येतो की आपल्याला तो प्रयोग अत्यंत प्रचलित आहे असा संशय यायला लागतो अर्थातच जी वरायटी अरुण कोल्हटकर यांच्यामध्ये आहे ती दिलीप चित्र यांच्याकडे ७५ टक्के आहे अरुण कोलटकर मात्र नेहमीच प्रयोग एकदाच करतात म्हणजे अरुण कोलटकर यांच्या कविता या संग्रहातील ईराणी रेस्टॉरंट वरील त्यांची कविता ते फारशी रिपीट करत नाहीत त्या उलट अशाच प्रकारचे मुक्त सोनट्स दिलीप चित्रे मात्र अनेक लिहितात प्रयोगाला रिपीट करतात एकूण कविता हा संग्रह या दृष्टीने पाहण्यासारखा आहे याउलट अरुण कोलटकर त्यांचा प्रयोग सहसा रिपीट करत नाही म्हणजे ज्ञानेश्वर यांच्या समाधीवर ते एक अभंग लिहितात मग तशा पद्धतीचा अभंग ते फारसा लिहीत नाही या उलट दिलीप चित्रे अनेक अभंग लिहितात ज्यांना आज आपण मुक्त अभंग म्हणू शकतो आणि तरीही जे अस्सल देशी बाजाचे असतात मग कोलटकर यांच्या चिरीमीरी मधल्या बळवंतबुवाच्या कविता येतात तिथे मात्र हा प्रयोग वारंवार होतो कारण तो वारंवार झालेला असतो आणि तुकारामाच्या प्रयोगापेक्षा तो फारसा वेगळा नसतो विंदा करंदीकर यांनी केलेल्या अभंगांच्या अर्वाचीन करण प्रयोगापेक्षा हा प्रयोग फार वेगळा नसतो 


 वास्तविक कविता म्हणजे फक्त कविताच असते हे दर्शवणारे हे दोन्हीही कवी आहेत चित्रेपण आणि अरुण कोल्हटकर पण ! पण अरुण कोल्हटकर आशयाच्या अंगाने जर आपण पाहिले तर कधी कधी प्रचंड उथळ असल्याचा संशय यायला लागतो कारण अनेकदा असे वाटते की हा आशय खोलात किती आला? मग असे असून सुद्धा कोलटकर यांचा गवगवा का याचे कारण दिलीप चित्रे यांनी अत्यंत चुकीच्या कवितांचे आणि कवींचे केलेले प्रमोशन! साहजिकच २००० नंतरचे अनेक लोक हे कळत नकळत त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी अरुण कोलटकर केंद्रस्थानी आणायला सुरुवात केली वास्तविक दिलीप चित्रे यांच्या मूर्खपणाची सर्वाधिक किंमत मी मोजलेली आहे पण तरीसुद्धा मला असे वाटते की आपण बायस होऊ नये आणि मूल्यमापन करावे वैयक्तिक पातळीवर अरुण कोलटकर यांनी मला कायमच पाठिंबा दिलेला होता त्यामुळे मी बायस न होता मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतोय कारण अनेकदा प्रेम आंधळे बनवते आणि मोक्षवाद्यांना आंधळे बनून चालत नाही


कोलटकर यांची सर्वात मोठी मर्यादा आणि दिलीप चित्रे यांची सर्वात मोठी शक्ती एकच आहे ती म्हणजे प्रेम कविता! अरुण कोल्हटकर यांच्या कवितेत प्रेम कविता शोधाव्या लागतात अनेकदा तर ही प्रेमाची अभिव्यक्ती त्यांची नाहीच आहे ते कोणाच्यातरी वतीने बोलतायत असा संशय येतो म्हणजे आता अरुण कोल्हटकर यांच्या कविता या संग्रहातील जाड्या बाई विषयी ते बोलत असतील तर ते कोलटकर बोलतायेत असे वाटतच नाही असे वाटते की एक प्रयोग करणारा मराठी माणूस हे सर्व बोलतो आहे त्यांची परिवर्तन वादाशी असलेली कमिटमेंट संशयास्पद आहे अशा प्रकारचा संशय कधी चित्रांच्या विषयी येत नाही त्यांचे स्टान्स अतिशय ठामपणे येतात आणि ते कवितेत सुद्धा येतात दुसरी गोष्ट कळत नकळत प्रेम कवितांच्या बाबतीत दिसते प्रेम कवितांच्या बाबतीत दिलीप चित्रे अक्षरशः कित्येक मैल अरुण कोल्हटकर यांच्या पुढे आहेत किंबहुना त्यामुळेच ते अनेक सोवळ्या लोकांना आवडत नाहीत शारीरिक आणि लैंगिक हिंमत नसणाऱ्या अनेक लेखकांना त्यांचा प्रॉब्लेम होतो पण त्याचे कारण दिलीप चित्रे यांच्यामध्ये नसून या लेखकांच्यात लपलेला पारंपारिक माणूस आहे स्त्रियांच्या वेगवेगळ्या रूपाविषयी दिलीप चित्रे यांच्या इतकी विविधता यापूर्वी मराठी कवितेत कधीही आलेली नव्हती. किंबहुना ते ज्या प्रकारचे आयुष्य जगले त्यातून झालेली ही निर्मिती आहे अशा प्रकारचे जगणे किती कठीण असते हे मला स्वतःला वैयक्तिक पातळीवर व्यवस्थित माहिती आहे आयुष्य झुगारून देऊन जगणे हे दिलीप चित्रे यांनी अतिशय मोठ्या प्रकाराने केलेले आहे आणि त्याचे काही फायदे दिसतात म्हणजे सलमावरच्या कविता ह्या दिलीप चित्रेच लिहू शकतात मुस्लिम संस्कृतीचे संपूर्ण पडसाद अशा कवितेत येतात आणि हे अरुण कोल्हटकर यांना जमलेले दिसत नाही वारकरी संप्रदाय कोल्हटकर यांच्या कवितेमध्ये पुढे जातो तो अर्वाचीन होतो परंतु आधुनिक होत नाही उलट तो कळत नकळत परंपरेला सशक्त करत जातो पण चित्रे वारकरी संप्रदायाला आधुनिक बनवतात त्या संदर्भातल्या सगळ्या आधुनिक मराठी माणसाच्या समस्या मांडतात अर्थात त्या पूर्णपणे मांडले गेलेत असे नाही पण त्या येतात हे मात्र खरे आहे जेजुरी या संग्रहातल्या खंडोबा वरच्या अरुण कोल्हटकर यांच्या कविता खुद्द नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे काही ठिकाणी उपरोधिक होत जातात परंतु ही आधुनिकता पुढे बळवंत बुवाबाबत येत नाही कारण कोलटकर कळत नकळत अधिकाधिक वैष्णव होत जातात चित्रांच्या बाबतीत हे घडत नाही ते एकाच वेळेला शैव आणि वैष्णव दोघांनाही बॅलन्स करून जातात ते विठोबा आणि खंडोबा दोघांनाही बॅलन्स करत जातात खंडोबावरच्या त्यांच्या कविता ह्या खूप मुळात जाणाऱ्या कविता आहेत मात्र १९६० नंतर उदयाला आलेले देशीवादाचे गृहीतक उत्तराधुनिकतेचे गृहीतक ते कळत नकळत सांभाळतात आणि विठोबा आणि खंडोबा दोघांनाही देशी देव म्हणून ट्रीट करतात उत्तर आधुनिक तत्त्वज्ञानातील लोकलचे प्रचंड प्रभुत्व त्यांच्या या कवितेमध्ये दिसते अर्थात कोलटकर ही याबाबतीत त्यांच्यासारखेच आहेत किंबहुना ही या दोघांच्यातली कॉमन लाईन आहे

मात्र देशी वादामुळे दिलीप चित्रे यांना मर्यादा पडली एका अर्थाने देशीवाद हा अनेकदा दिलीप चित्रे यांच्या कवितेचा शत्रू बनलेला दिसतो त्याउलट अरुण कोलटकर यांच्या बाबतीत मात्र देशीवाद त्यांना सशक्त बळ पुरवत राहतो एकाच काळात जन्मलेल्या दोन महान कवींच्यावर देशीवादाचे दोन भिन्न परिणाम व्हावेत हे खूप विचित्र वाटते पण ते तसे झालेले दिसते चित्रे कळत नकळत चालढकलवादी देशीवादी आहेत त्या उलट कोलटकर ठाणपणाने(मी ठाम म्हणत नाही हे कृपया लक्षात घ्यावे) नंतर परंपरेत उभे राहतात आणि त्यांची परंपरा ही फ्लो मध्ये आहे ती सॉलिड होत नाही त्यामुळे ती अधिक देशी असूनही अर्वाचीन सुद्धा होण्याची धडपड करते उदाहरणार्थ चिरीमीरी या संग्रहात मार्केटमध्ये ते जेव्हा येतात तेव्हा त्या मार्केटचे वर्णन हे अर्वाचीन पद्धतीने येते प्राचीन नाही आणि पुरोगामी वादाचा ट्राझीशनल पिरियड आहे तो इथे खूप उत्तम येतो त्या उलट दिलीप चित्रे थेट सुपर मार्केटमध्ये जातात आणि अमेरिकेतल्या सुपर मार्केट वर कविता लिहितात दोघांच्या मधला हा फरक खूप लक्षणीय आहे म्हणजे मुंबईत येऊन सुद्धा कोल्हटकर कळत नकळत कोल्हापूरमध्ये थांबलेले आहेत किंबहुना जे कुलाबाच्या परिसरात हिंडलेले आहेत त्यांना कोल्हापूर आणि चर्चगेट कुलाबा यांच्यात काय फरक आहे असाच प्रश्न पडावा मी स्वतः या परिसरात सात वर्षे राहिलेलो आहे म्हणून सांगतोय त्याउलट बडोद्यामधून येऊन सुद्धा दिलीप चित्रे हे पक्के मुंबईकर होतात आणि नंतर अमेरिका ते रशिया असा सर्व अवकाश आत मध्ये मुरवतात आणि अलंकार पद्धतीने सालंकृत होऊन त्याच्या कविता मिरवतात एका अर्थाने त्यांची रेंज जास्त आहे अरुण कोलटकर एका अर्थाने कळायला फार सोपे कवी आहेत कारण गुंतागुंतीच्या प्रतिमा नंतर कमी होत गेलेल्या दिसतात त्या उलट दिलीप चित्रे यांच्या कवितेतली गुंतागुंत वाढत गेली मात्र वयाच्या पन्नाशीनंतर त्यांना अचानक काही अशा गोष्टी चावल्या ज्यांच्यामुळे त्यांची कविता सुद्धा फाफलली किंबहुना चुकीच्या लोकांच्या सहवासात राहिल्यानेच कळत नकळत कम अस्सल दर्जाचा परिणाम त्यांच्या कविता वर झाला माणसाला मान्यता मिळवावीशी वाटली की त्याच्या कवितेचेही अध:पतन सुरू होते दिलीप चित्रे यांच्याबाबतीत हे घडलेले आहे या उलट कोलटकर मात्र मान्यतेच्या रोगापासून दूर राहिल्याने त्यांना त्यांच्या कवितेशी कॉम्प्रमाईज करायची गरज भासली नाहीं आणि कळत नकळत नंतरच्या पिढीला याचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे शेवटी तुम्ही आयुष्यात कोणाच्या कविता प्रमोट करता यावरून तुमची संवेदनशीलता आणि निष्ठा काय लायकीची आहे हे ठरत जाते दिलीप चित्रे यांच्यासारख्या कविला हे कळू नये हे खरोखरच आश्चर्य आहे या उलट कोलटकर यांनी कोणाला प्रमोटच केले नाही त्यामुळे त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहीली आणि ते लाखो नाहीतरी किमान १०० एक कवींचे पोशिंदे बनलेले दिसतात


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना