बहुजन वाद आणि महाजन वाद

बहुजनवाद की महाजनवाद १ श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय राजकारण असो किंवा समाजशास्त्र असो हल्ली बहुजनवाद हा शब्द त्याच्या केंद्रस्थानी असतो मात्र बहुजन नेमके कोणाला म्हणायचे याबद्दल काही एकमत होत नाही हे असे का होते या प्रश्नाचा एकदा नीट विचार केला पाहिजे 

भारतीय समाजामध्ये शेवटी कोण टर्म्स आणि कंडिशन डिक्टेट करतो ते पाहावे लागते आणि मग लक्षात येते की प्रत्यक्षात सामाजिक चलनवलन हे बहुजन कोण या गोष्टीवर ठरत नसून महाजन कोण या गोष्टीवर ठरत असते आणि प्रत्येक जात प्रत्येक वर्ण प्रत्येक समाज हा महाजन होण्याच्या धडपडीत असतो कोणालाही बहुजन बनायचे नसते साहजिकच त्यातूनच मग महाजनीकरण नावाची एक प्रोसेस बनते आणि त्याला काउंटर म्हणून बहुजनिकरण अशी उलटी प्रोसेस महाजन लोकांच्याकडून सुरू होते भारतीय इतिहास म्हणजे महाजनीकरण आणि बहुजनिकरण यांचे आपापसामध्ये झालेले टकराव होय विशेषतः इसवी सन १००० नंतर हे सातत्याने घडलेले आहे कारण युरेशियन धर्म हे पूर्णपणे केंद्रस्थानी आलेले आहेत साहजिकच अपकास्टिंग आणि डीकास्टिंग या गोष्टी सातत्याने घडलेल्या दिसतात आणि यांची दिशा ही नेहमीच महाजन कोण या दिशेने असते बहुजन कोण या दिशेने नसते दुर्दैवाने ही बेसिक गोष्ट अनेकांच्या लक्षात आलेली नाही आणि त्यामुळेच इतिहासाच्या आकलनामध्ये काही घोड चुका झालेल्या दिसतात. ब्राह्मण धर्माचे खरे महाआमिष हे आम्ही तुमचे  महाजनीकरण करतो तुमच्या जातीला तुमच्या वंशाला ब्राह्मण करतो क्षत्रिय करतो वैश्य करतो असे असते आणि या महाजनिकरणाच्या आमिषाला अनेक शैव समाज बळी पडल्याने सर्व लोकांचे पतन सुरू झालेले दिसते अर्थात सर्वात प्रथम बळी पडलेले लोक म्हणून पंडितांचा उल्लेख करावा लागेल.

भारतामधील खरी स्पर्धा ही महाजन होण्याची आहे साहजिकच इथला प्रत्येक सामाजिक घटक प्रत्येक समाज किंवा प्रत्येक वर्ण अथवा जात महाजन व्हायला धडपडत असते आणि अनेकदा ही धडपड धर्म केंद्रीय राहिल्याने धार्मिक असते धर्म सातत्याने केंद्रस्थानी राहतो भारताची सामाजिक व्यवस्था ही कायमच धर्म नियंत्रित करत असतो आणि म्हणूनच जोपर्यंत धर्माचे विश्लेषण होत नाही तोपर्यंत भारतीय समाजाचे भारतीय समाज व्यवस्थेचे विश्लेषण होऊ शकत नाही अगदी बाहेरून आलेले मुस्लिम आणि इंग्रज सुद्धा याच ट्रॅप मध्ये अडकलेले दिसतात त्यातून कोणाची सुटका झालेली दिसत नाही

आपण जर का युरेशियन धर्माचा विकास पाहिला तर आपणाला असे दिसते की जो वैदिक धर्म आहे ज्याचे सांख्य धर्म आणि ब्रह्म धर्म हे दोन महत्त्वाचे भाग आहेत तो वर्ण जाती व्यवस्थेला कर्माच्या अनुषंगाने पेलायला बघतो जन्मदत्त ऐवजी त्याचा भर कर्मदत्त वर जास्त आहे ब्राह्मणांचा उदय झाल्यानंतर हळूहळू वेगळ्या गोष्टी घडायला लागतात कारण ब्राह्मणांना स्वतःला उच्च स्थानी ठेवायचे होते असते आणि वैदिक धर्मामध्ये उच्च स्थानिक ब्राह्मण नसतात तर ऋषी असतात आणि ऋषी अनेक वर्णजातीतून उदयाला येत असतात ब्राह्मण धर्माला स्वतःला वेदांच्यामुळे मिळणारा फायदा सोडायचा नसतो त्यामुळे ते साहजिकच अनेकदा स्वतःचा धर्म वैदिक धर्म असे सांगतात प्रत्यक्षात वैदिक धर्म वेगळा असतो आणि ब्राह्मण धर्म वेगळा असतो वैदिक धर्म कर्म दत्त  वर्णव्यवस्था मानतो तर ब्राह्मण धर्म हा जन्मदत्त वर्ण जात व्यवस्था मानतो वैदिक धर्मामध्ये जात या संस्थेला जागाच नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे जात ही ब्राह्मण धर्माने निर्माण करायला सुरुवात केली त्यामागची ऐतिहासिक कारणे इतरत्र मी दिलेली आहेत.

ब्राह्मण धर्म कर्मदत्ताला स्पष्ट आणि स्वच्छ नकार देत जन्मदत्त व्यवस्था केंद्रस्थानी आणतो आणि महाजनांची व्याख्या ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांमध्ये जन्मलेले लोक अशी करतो आणि आपोआपच शूद्र आणि आदिवासी लोक बहुजनांच्या मध्ये जातात ब्राह्मण धर्माच्या जन्म वेळी अतिशूद्र तयार झालेले नव्हते त्यामुळे त्यांचा उल्लेख करत नाही साहजिकच जो तो ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य बनायला धडपडतो ब्राह्मण धर्म सर्वोच्च स्थानी ब्राह्मणांना ठेवतो आणि साहजिकच हे मान्य नसलेले जे लोक आहेत ते उदयाला यायला लागतात त्यांना महाजनांच्या मध्ये ब्राह्मणांच्या इक्वल स्थान लागते आणि त्यासाठी एक पुन्हा नवीन धर्म निर्माण केला जातो त्यातूनच सांख्य ,जैन आणि बौद्ध धम्माचे बंड होते ते जन्मदत्त वर्ण व्यवस्था नाकारतात आणि कर्म दत्त वर्ण व्यवस्था स्वीकारतात अपवादात्मक वेळेला ते सरळ सरळ संपूर्ण वर्णव्यवस्थेलाच नकार देतात संपूर्णपणे समांतर अशी श्रमण व्यवस्था निर्माण करतात यांच्यामुळे वर्ण संकर निर्माण होण्याची भीती निर्माण होते आणि वर्णसंकर हे बहुसंख्य क्षत्रिय लोकांना कधीही आवडलेले नाही आणि आत्ताही बहुतांशी  क्षत्रियांचा वर्णसंकराला विरोध आहे

साहजिकच वर्ण संकर नको असलेल्या ब्राह्मण धर्माला व वर्णसंकर नको असलेल्या काही क्षत्रियांना युरेशियन श्रुतीला नवीन अवतार देणे आवश्यक वाटते आणि यातूनच मग जे जन्मदत्त व्यवस्थेवर विश्वास ठेवतात असे ब्राह्मण आणि क्षत्रिय मिळून वैष्णव धर्माची स्थापना करतात वैष्णव धर्म हा प्रामुख्याने जन्मदत्त वर्ण व्यवस्था मानणाऱ्या क्षत्रिय लोकांनी स्थापन केलेला धर्म आहे आणि ब्राह्मणांनी तिथे सुरुवातीला सपोर्टिंग भूमिका घेतलेली आहे साहजिकच राम आणि कृष्ण हे दोन क्षत्रिय केंद्रस्थानी येतात ब्राह्मणांच्यामुळे ते पुढे विष्णूचा अवतार बनतात क्षत्रियांना क्षत्रिय केंद्रस्थानी हवे असतात साहजिकच महावीर आणि गौतम बुद्ध यांना रिप्लेस करण्यासाठी म्हणून राम आणि कृष्ण यांची निर्मिती रामायण आणि महाभारताद्वारे केली जाते क्षत्रिय लोकांचे आदर्श म्हणून त्यांची समाजामध्ये स्थापना होते वैष्णव महाजन लोकांची व्याख्या पुन्हा बदलतात कारण याच वेळेला मौर्य साम्राज्यापासून ते हर्षवर्धन वगैरे व गुप्त साम्राज्यापर्यंत अनेक वैश्य लोक सत्तेवर आलेले असतात जे आता क्षत्रीय लोकांना आणि ब्राह्मण लोकांना सहन होत नाहीत क्षत्रियांना स्वतःच्या सत्ता शाबू ठेवायच्या असतात तर ब्राह्मणांना स्वतःची धार्मिक सत्ता शाबूत ठेवायची असते आणि त्यामुळे साहजिकच वैष्णव धर्मामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची युती होते आणि महाजन लोकांच्यामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय असे दोन वर्ण एकत्र येतात त्यांना पुण्य योनी असे एक नवीन नाव मिळते आणि बहुजन समाज म्हणून पापयोनी या नवीन गोष्टीची निर्मिती भगवद्गीता करते आणि पाप योनीमध्ये वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांचा समावेश करते त्यामुळे साहजिकच वैष्णव धर्मामध्ये महाजन म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय तर बहुजन म्हणजे वैश्य शूद्र आणि अतिशूद्र आणि आदिवासी यांचा समावेश होतो याशिवाय स्त्रियांचा स्पष्ट समावेश हा शूद्रांच्यामध्ये केला जातो वैष्णव धर्म निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट पाशुपत धर्म  , जैन धर्म आणि बौद्ध धर्माने केलेले बंड मोडीत काढणे हे असल्याने साहजिकच ते साध्य केले जाते आणि आठव्या शतकानंतर खरोखरच बौद्ध धर्म नाहीसा होतो आणि जैन धर्म हा चक्क ब्राह्मणी धर्माचा एक अवतार बनतो आणि वर्ण व्यवस्था स्वीकारतो मात्र शैव धर्म जिवंत राहतो उलट त्यामध्ये नाथ धर्माचा पुन्हा उदय होतो नवनाथ बनतो आणि तो पुन्हा जिवंत होतो शैव श्रुती तांत्रिक श्रुती म्हणून उदयाला येते तीही पुन्हा जिवंत होते 

आता यूरेशीयन धर्माला आपला अवकाश अधिक वाढवत न्यायचा असतो परंतु त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा शैव-धर्माचा असतो त्याला नष्ट कसे करायचे हा फार मोठा प्रश्न असतो कारण ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म हे बौद्ध आणि जैन या धर्मांचा बंदोबस्त करतात परंतु शैव धर्म मात्र नष्ट होत नाही तो तसाच आपल्या पायावर उभा राहतो इतकच नाही तर त्याचा विस्तार वाढत जातो शैव मंदिरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढायला लागते बौद्ध धर्म नष्ट झाल्याचा सर्वाधिक फायदा कळत नकळत शैव धर्माला होत राहतो आणि त्याचे काय करायचे असा एक मोठा प्रश्न ब्राह्मण धर्मापुढे निर्माण व्हायला लागतो आणि या सगळ्याला शह देण्यासाठी म्हणून मग आता नवीन अवताराची धर्माची पुन्हा एक नवीन निर्मिती व्हायला लागते आद्य शंकराचार्यांच्या द्वारे हे होते हिला कधी कधी सनातन धर्म असेही म्हटले जाते तर कधी कधीच वेदांत धर्म म्हटले जाते आपल्याकडे सनातन धर्म ही संकल्पना प्रत्यक्षामध्ये गौतम बुद्ध यांनी मांडली असली तरी आता ब्राह्मण पुरोहित ती वेगळ्या अर्थाने राबवायला लागतात आणि वेद प्रामाण्य मानणारा एक नवा धर्म निर्माण होतो दुर्दैवाने याच वेळेला इस्लामचे आगमन होते आणि मग इस्लाम या सर्व सनातन धर्माला किंवा ब्राह्मण धर्माला मिळून एक नाव देतो हे नाव असते हिंदू धर्म साहजिकच इथून पुढे आता जो नवा अवतार येतो तो हिंदू धर्म असतो आणि इथे महाजनांची व्याख्या पुन्हा बदलते ब्राह्मण आता क्षत्रियांची जबाबदारी घेत नाहीत कारण क्षत्रिय मुसलमानांच्या कडून पराभूत व्हायला सुरुवात होते साहजिकच यादवांचे साम्राज्य कोसळते तसे ब्राह्मण इथल्या मुसलमान राजवटींशी युती करायला लागतात त्यांना क्षत्रिय मानायला लागतात आणि त्यातूनच मग जो हिंदू धर्म निर्माण होतो त्या धर्मामध्ये महाजन म्हणजे फक्त ब्राह्मण आणि उरलेले सर्व ब्राह्मणेतर लोक शूद्र होऊन जातात आणि हिंदू धर्मामध्ये फक्त ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण उरतात म्हणजे महाजनांची व्याख्या फक्त ब्राह्मण धर्मापुरती शिल्लक राहते ब्राह्मण वर्णापुरती शिल्लक राहते आणि सर्व ब्राह्मणेतर बहुजन होऊन जातात म्हणजेच बहुजन समाजाची व्याख्या ब्राम्हणेतर लोक अशी होते आणि ही व्याख्या महाजन समाज ठरवतो आणि हा महाजन समाज प्रामुख्याने ब्राह्मण वर्ण असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे क्षत्रियांचाच पराभव झाल्यामुळे क्षत्रियांचा कसलाही मान सन्मान ब्राह्मणांच्या मनामध्ये शिल्लक राहत नाही आणि त्यातूनच मग परशुरामाने सगळे क्षत्रिय नष्ट केले अशा प्रकारचा सिद्धांत मांडला जातो आणि कलियुगामध्ये वैश्य राहिले नाहीत असाही सिद्धांत मांडला जातो जेणेकरून उरलेले सर्व शूद्र आहेत हे सिद्ध व्हावे हे सर्व काही इस्लाम मुळे घडलेले आहे पण इस्लामला क्षत्रियांना नष्ट करण्याचे श्रेय कसे देणार ? त्या ऐवजी हे श्रेय एका ब्राह्मणाला म्हणजेच परशुरामाला दिले जाते साहजिकच ज्यांना खरोखर पुन्हा एकदा राज्यकर्ता समाज बनायचे असेल त्यांच्यापुढे मुस्लिम धर्म स्वीकारण्याखेरिज दुसरा कुठला पर्याय राहत नाही ज्यांना व्यापारी बनायचे आहे त्यांना इस्लाम स्वीकारण्याखेरीज दुसरा कुठला पर्याय राहत नाही आणि यातूनच क्षत्रिय आणि वैश्य यांच्या मधून धर्मांतरे होतात त्याचबरोबर शूद्रांच्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू होते आणि इथेच इस्लाम वाढत जातो आता त्या धर्मांतराबद्दल ब्राह्मण लोकांना काही वाटत नाही कारण इस्लामचा वरवंटा ब्राह्मण वर्णावर आणि ब्राह्मण धर्मावर फिरत नाही कारण मुस्लिम राज्ययकर्त्यांना राज्य करण्यासाठी ब्राह्मण लोकांची आणि पंडित लोकांची गरज भासते हळूहळू पुन्हा एकदा ब्राह्मण धर्म हा शब्द प्रस्थापित व्हायला लागतो आणि इंग्रजांच्या काळामध्ये हिंदू धर्माला ब्राह्मण धर्म सुरुवातीच्या काळात म्हटले ते होते तसा उल्लेख एकोणिसाव्या शतकातल्या अनेक पुस्तकात आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे या पुस्तकांच्या मधून हिंदू धर्म असा शब्द वापरलेला नाही म्हणजेच या संपूर्ण काळामध्ये ब्राह्मण हाच फक्त महाजन वर्ण ठरलेला दिसतो साहजिकच जिथे जिथे ब्राह्मण धर्माचा प्रचंड प्रभाव आहे तिथे तिथे सुद्रांच्या मधून 1850 नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये धर्मांतर झालेले आहे किंबहुना जेवढे धर्मांतर इस्लामिक राजवटी होत्या त्याच्या डबल धर्मांतर 1850 नंतर इंग्रजांच्या काळात झालेले आहे असा मला संशय आहे ब्राह्मण सोडून त्यामुळेच बाकी सर्व बहुजन झाले आणि म्हणूनच मग बहुजन वादाची म्हणून स्वतंत्र चळवळ निर्माण करण्याची ब्राह्मणेतर चळवळ निर्माण करण्याची गरज महात्मा फुले यांना वाटायला लागते त्यातूनच मग ब्राह्मणेतर वाद असा स्पष्ट आणि स्वच्छ वाद महात्मा फुले मांडतात आता बहुजन म्हणजे सर्व ब्राह्मणेतर अशी व्याख्या प्रस्थापित होते आणि ही व्याख्या ब्राह्मणांनी फक्त स्वतःचाच समावेश महाजन वर्गामध्ये केल्यामुळे होते त्याचे पडसाद आपणाला वेदोक्त प्रकरणांच्या मध्ये स्पष्ट आणि स्वच्छ दिसतात शाहू महाराजांना क्षत्रिय म्हणून मान्यता देणे ब्राह्मणांना जड जाते कारण त्यांच्यामते आता कोणी क्षत्रिय उरलेलेच नसतात  मात्र राजकारणात याच वेळेला एक दैदिप्यमान बहुजन समाजाचे नेतृत्व निर्माण होते ते म्हणजे महात्मा गांधी ते वैश्य वर्णातून आल्याने साहजिकच बहुजन समाज त्या नेतृत्वाच्या मागे ठामपणे उभा राहायला लागतो आता प्रश्न महाजन कोण असा न होता बहुजन कोण असा होऊन जातो साहजिकच ब्राह्मणांच्या लक्षात येते की आपण आता अल्पसंख्यांक बनत चाललेलो आहोत हे लक्षात येण्यासाठी इंग्रजांनी जी जनगणना सुरू केली तिचा फार मोठा वाटा असतो साडेतीन टक्के हा शब्दप्रयोग हळूहळू त्यामुळेच विकसित व्हायला लागतो  त्यातूनच मग वर्णव्यवस्था ही संकल्पना नाकारून वर्ग व्यवस्था ही संकल्पना रूढ करणे आता ब्राह्मण लोकांना आवश्यक वाटते आणि त्यातूनच मग ब्राह्मण विशेषतः पुरोगामी ब्राह्मण अत्यंत जाणीवपूर्वक वर्ग व्यवस्था स्वीकारतात आणि जे हीी वर्ग व्यवस्था जोरदारपणे स्वीकारतात ते कम्युनिस्ट होतात कम्युनिझम ही ब्राह्मणांची सर्वाधिक गरज होती कारण वर्णव्यवस्थेमध्ये त्यांचे स्थान हळूहळू शोषक म्हणून दिसायला लागले आणि महाजन आणि शोषक असलेला असा हा वर्ण आहे अशी समजूत पसरायला लागलेली असते किंवा असे वास्तव लोकांना कळायला लागलेले असते कम्युनिििजम  किंवा समाजवाद स्वीकारणे हा एका अर्थाने पश्चाताप तरी असतो किंवा पाप क्षालन तरी  असते किंवा त्या वास्तवापासून वर्ण्ण व्यवस्थेच्या वास्तवापासून पळ काढणे असते किंवा महाजन कोण हे आम्ही आता कम्युनिजमच्या द्वारे ठरवू असाच गेम असतो साहजिकच सगळे समाजवादी अचानक व्यवहारामध्ये महाजनवादी झालेले दिसतात त्यांना सरकार दरबारी मोठ्या मोठ्या पोस्ट मिळतात तेच प्राध्यापक होतात तेच अभ्यासक होतात तेच विचारवंत होतात फक्त हा महाजन वाद समाजवादी महाजन वाद असल्याने तो स्पष्टपणे दिसत नाही किंबहुनाा तो स्पष्टपणे दिसत नाही म्हणूनच तो ब्राह्मणांच्या द्वारे स्वीकाराला जातो आणि आश्चर्यकारकरीत्या ब्राह्मणे तरांच्याद्वारे सुद्धा तो स्वीकारला जातो

साहजिकच या काळामध्ये ब्रिटिश लोक आणि डावे लोक काय म्हणतात ते फार महत्त्वाचे ठरायला लागते ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये ब्रिटिश लोक आणि डावे लोक काही क्षत्रिय नष्ट झाले म्हणत नाहीत कारण त्यांना प्रत्यक्षात क्षत्रियांशी लढावे लागलेले असते त्यांची राज्ये त्यांची संस्थाने आपल्या ताब्यात घ्यावी लागलेली असतात साहजिकच ब्रिटिश महाजन वर्गामध्ये सर्व मांडलिक झालेल्या क्षत्रियांचा समावेश करतात संस्थान अधिकारी संस्थांनाधिपती यांचा समावेश ते महाजन वर्गामध्ये करतात म्हणजे ब्राह्मण लोकांच्या हातून महाजन कोण हे ठरवण्याची सत्ता जाते आता ब्रिटिश महाजन कोण आहे ठरवायला लागतात आणि ब्रिटिशांच्या बाबतीत पंचायत अशी असते की ते स्वतः वैश्य असतात व्यापारी असतात व्यापारी कंपनी म्हणून आलेले असतात साहजिकच ब्राह्मणांना वैश्य स्वीकारण्याखेरीज पर्याय राहत नाही ते पुन्हा एकदा मूळच्या ब्राह्मण धर्माकडे गेलेले असतात जिथे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उच्च असतात महाजन असतात म्हणजे पुन्हा कर्मठ लोकांनी महाजन म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा स्वीकार करायला पाहिजे अशी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली असते आणि त्याला जबाबदार ब्रिटिशांची कलोनियल थिंकिंग सिस्टीम असते  मुळात उदारमतवादी ब्रिटिश लोकांची संख्या राज्यकर्त्यांच्या मध्ये लक्षणीय  असल्याने साहजिकच आता शूद्र लोकांना आणि अतिशूद्र लोकांना वर काढण्यासाठी म्हणून वेगळ्या गोष्टी ठरवल्या जातात आणि त्यातूनच महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिश स्वतः पाठिंबा देतात आणि ते ब्रिटिशांच्या बाजूने जाऊ नयेत म्हणून साहजिकच सर्व उच्चवर्णीय लोकांना त्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्यातूनच आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार होतो  ब्रिटिशांचे हे नवीन धोरण जिथे ते एकीकडे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना महाजन म्हणतात तर दुसरीकडे शूद्र अति शूद्र यांना प्रजा मानून त्यांचे प्रबोधन करणे हे कर्तव्य मानतात काँग्रेसलाही पुढे स्वीकारावे लागते साहजिकच काँग्रेसने हाच फॉर्मुला पुढे कंटिन्यू ठेवलेला दिसतो मात्र ब्राह्मणेतर चळवळीने मात्र सातत्याने सर्व ब्राह्मणेतर हे बहुजन अशी भूमिका घेतलेली दिसते आणि महात्मा गांधी यांना बहुजन समाजाचे नेतृत्व म्हणून मान्य केलेले दिसते 

भारत स्वतंत्र व्हायला लागतो आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहायला लागतो की आता महाजन कोण आणि बहुजन कोण यांच्या टर्म्स आणि कंडिशन कोण ठरवणार ? आणि नेमक्या याच वेळी महात्मा गांधी घोषित करतात की मी आता वर्ण जाती बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही मी वर्ण जाती व्यवस्थेचा अंत करणार आणि ब्राह्मणांना कळून चुकते की महात्मा गांधी हे त्यांच्या वर्णव्यवस्थेतील सर्वात मोठे अडथळे आहेत साहजिकच महात्मा गांधी यांचा खून करण्याचे प्रयत्न सुरू झालेले असतात ब्रिटिशांना हाकलून लावण्याऐवजी महात्मा गांधींचा खून कसा करता येईल याकडे लक्ष जास्त दिले जाते कारण शेवटी महाजन कोण यांची व्याख्या महात्मा गांधी यांच्यामुळे बदलायला लागलेली असते आणि ब्राह्मणांचे केंद्रीय नेतृत्व हेच मुळात ब्राह्मणेतर लोकांच्या ताब्यात जाणार असे दिसायला लागते किंबहुना टिळक यांच्याकडून महात्मा गांधी यांच्याकडे नेतृत्व जाणे याचा अर्थ महाजन म्हणजे  ब्राह्मण असा न राहता ब्राह्मणेतर असाही होऊ शकतो असा होणे असतो

महात्मा गांधीं यांना शह कसा द्यायचा असा एक फार मोठा प्रश्न ब्राह्मण धर्मापुढे निर्माण होतो त्यावरचा पहिला तोडगा म्हणून ब्राह्मण धर्म वर्ण व्यवस्था मानणारे जे वैश्य लोक आहेत त्यांच्याशी निगोशीयेएशन करायला लागतात आणि त्यातूनच कल्याण नावाचे सनातन धर्मीय मासिक निर्माण होते एक मोठा प्रोजेक्ट तयार केला जातो आणि त्या प्रोजेक्टचा प्रमुख जो प्रकाशक असतो एक वैश्य असतो ज्याचा वर्णव्यवस्थेवर विश्वास असतो इथे वैश्य वर्णाला दिलेला शूद्र हा दर्जा कॅन्सल करून उच्च वर्णाचा दर्जा दिला जातो ज्या संस्थानिकांशी चर्चा करता येणे शक्य आहे त्यांना चर्चा करून क्षत्रिय दर्जा पुन्हा एकदा परत दिला जातो आणि ब्राह्मण धर्म मूळची व्यवस्था स्वीकारतो ज्यामध्ये महाजन म्हणून पुन्हा एकदा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणले जातात मात्र ते आता समान आहेत अशी नवीन भूमिका स्वीकारली जाते जेणेकरून वैश्य आणि क्षत्रिय यांचे प्राचीन काळात झालेले बंड अर्वाचीन काळात होऊ नये  पुन्हा एकदा शूद्र अति शूद्र आणि आदिवासी यांचा समावेश बहुजनांच्या मध्ये केला जातो ब्राह्मण धर्माचे हे एका अर्थाने हिंदू म्हणून झालेले कमबॅक असते आणि या कमबॅकला एक हिंदुत्व असे नाव दिले जाते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघ हा त्यासाठी स्थापन होतो ज्याचे काम हिंदुत्वाचा प्रचार करणे हे असते त्याला काउंटर म्हणून बाबासाहेब आंबेडकर तीन प्रवर्ग निर्माण करतात ज्यामध्ये सर्वसाधारणपणे जे शूद्र आहेत त्यांचा ओबीसी जे अतिशूद्र आहेत आणि भटके  मागासलेले आहेत त्यांच्यासाठी बीसी आणि आदिवासी यांच्यासाठी एस टी आदिवासी असा प्रवर्ग निर्माण होतो आणि या सर्वांनी एकत्र यावे म्हणून फुले आंबेडकरवाद असा वाद निर्माण केला जातो म्हणजेच एकीकडे वर्ण अधिष्ठित अशी नवी हिंदूधर्म व्यवस्था आणली जाते आणि दुसरीकडे प्रवर्ग अधिष्ठित अशी फुले आंबेडकरवादी व्यवस्था आणली जाते आणि साहजिकच अंतिम संघर्ष हा हिंदुत्ववाद विरुद्ध फुले आंबेडकर वाद असा होऊन जातो भारतीय संविधान हे फुले आंबेडकरवादी संविधान आहे आणि संविधान वादी असणारे सर्व लोक हे अंतिमत: फुले आंबेडकरवादी असतात आपली लढाई ही त्यामुळे संविधान वादाशी आहे याची कल्पना आल्याने संविधान बदलले पाहिजे अशा प्रकारची मागणी हळूहळू हिंदुत्ववादी लोक करतात आणि आश्चर्यकारकरीत्या स्वतःला आता महाजन समजणारे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य एकत्र येतात आणि यांना एकत्र आणण्यासाठी म्हणून साहजिकच राम मंदिर चळवळ सुरू होते जय श्रीराम च्या घोषणा निनादायला लागतात हे वैष्णव धर्माचे कमबॅक असते पण अनेकांना हे कळत नाही फक्त हा नवा वैष्णव धर्म आता वैश्यांचां समावेश प्रस्थापित महाजन वर्गामध्ये करतो कारण नवीन बदललेल्या कमर्शियल युगामध्ये व्यापार उद्योग केल्याशिवाय गत्यंतर नाही हे ब्राह्मणांना कळून चुकलेले असते आपल्याला लागणारा पैसा पुन्हा एकदा वैश्य लोकच पुरवणार म्हणूनच वैश्य लोक हे सुद्धा आपल्या बरोबरीने असले पाहिजे हे कळून चुकलेले ब्राह्मण आता वैश्यांना अत्यंत मानाने आणि सन्मानाने वागवायला लागतात पुढची स्टेप सर्वच्या सर्व व्यवसाय सर्व धंदे सर्व बिजनेस सर्व कार्पोरेट हाऊसेस आपल्या ताब्यात घेणे ही आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की वैश्य वर्णाला नेमकं काय चाललंय हे कळत नाही त्यांना असं वाटतंय की आपला हा सन्मान वाढवलेला आहे परंतु हा सन्मान फक्त ताब्यात घेण्यासाठीच केला जात आहे हे कळण्याची अक्कल या देशातल्या वैश्य वर्णामध्ये नाही कारण या संदर्भामध्ये सर्व धार्मिक गोष्टी ब्राह्मणांच्याकडे सोपवायच्या अशी त्यांची पद्धत आहे पण ही पद्धत खरोखर वर्कआउट होणार आहे का केवळ महाजन लोकांच्या मध्ये आपणाला आता स्थान मिळते म्हणून वैश्य सध्या पूर्णपणे हिंदुत्ववादाच्या बाजूने झुकलेला दिसतो परंतु ज्या पद्धतीने आता पुन्हा एकदा सनातन धर्म परत आणणे चालू झालेले आहे ते बघता पुढची खेळी वैश्य लोकांच्या ताब्यात असलेली पैशाची व्यवस्था ताब्यात घेणे हीच आहे हीच असणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा क्षत्रिय व्यवस्था आपल्या ताब्यात पाहिजे म्हणून क्षत्रियांची युती सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आत घेतलेले आहे 

ब्राह्मण धर्माला आपली व्यवस्था राबवण्यासाठी शासकांची गरज असते आणि हे शासक कुठूनही आले तरी त्यांना चालणारे असते या अंगाने जर का शासक वैश्य वर्ण मधून निर्माण होत असेल तर त्यांना ते हवे आहे होते आणि यामुळेच अमित शहा आणि मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले जाते नेहमीचे क्षत्रिय खेळाडू घेऊन ही खेळी खेळण्याऐवजी वैश्य व शूद्रांना जे पुन्हा एकदा ब्राह्मण धर्म स्वीकारतील त्यांच्यातून क्षत्रिय निर्माण करणे सुरू झालेले आहे वैश्य लोकांच्या मधून क्षत्रिय म्हणजे सत्ताधारी लोक निर्माण करणे पूर्ण झालेले आहे आणि त्यातूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा असे दोन वैश्य वर्णी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले गेले अर्थात याला आणखी एक कारण होते ते म्हणजे प्रमोद महाजन यांचा नवा हिंदुत्ववाद!  त्यांनी वर्ण व्यवस्थेचा धिक्कार करून ती पूर्णपणे त्यागण्याची गरज सतत प्रतिपादली होती हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याने हिंदुत्ववादाने ते घेतले परंतु आता हिंदुत्ववादी खरोखर पुन्हा एकदा याच दिशेने जाणार आहेत की ब्राह्मण धर्मात परतणार आहेत असा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मुख्य म्हणजे महाजन वाद हा आता कर्माने ठरवण्याऐवजी पुन्हा एकदा जन्माने ठरवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे जर होणार असेल तर भारतामध्ये वर्णव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होणे अटळ आहे या क्षणी हिंदुत्ववादामध्येच वर्णवादी विरुद्ध कर्मवादी लोक अशी दुफळी पडलेली दिसते सर्वांना सामावून घेण्याची मोदी यांची वृत्ती असल्याने ते दोन्ही बाजू सांभाळताना दिसतात खरे परंतु आज ना उद्या त्यांना या संदर्भात एक निर्णय घ्यावा लागेल जय श्रीराम म्हणत ते कळत नकळत ब्राह्मण धर्म सुद्धा सांभाळताना दिसतात तर हर हर महादेव म्हणत शूद्र आणि अतिशूद्र आदिवासी यांना सांभाळायचे असे काहीतरी चाललेले आहे कुंभमेळा इतका मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट करण्याचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे बहुजन समाज सोडायचा नाही असे काहीतरी ठरलेले आहे त्यामुळेच कुंभमेळ्यामध्ये उच्चवर्णी लोकांच्यासाठी एका बाजूला जय श्रीराम आणि बहुजन समाजासाठी दुसरीकडे हर हर महादेव असे दोन्ही गजर झालेले आहेत शैवांचे काय करायचे हा कायमच ब्राह्मण धर्मा पुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे प्रथम रुद्र म्हणून आणि रुद्रापासूनच शंकर निर्माण झाला आहे अशा दंतकथा रचून सामावून घेण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू झालेला दिसतो मग वैष्णव धर्माच्या साह्याने सर्व शैवधर्मी लोकांना पाप योनीमध्ये ढकलले गेले बहुजन समाजामध्ये ढकलले गेले पण त्यामुळेही जेव्हा नियंत्रण येईना उलट शिवाजी महाराजांच्या सारखे लोक निर्माण झाले तेव्हा मग पुन्हा एकदा सामावून घेण्याची प्रोसेस सुरू झाली पण याच वेळेला इस्लामचे आणि ब्रिटिशांचे राज्य आल्याने मुळात या संदर्भातला अधिकारच उरला नाही आता पुन्हा एकदा हा प्रश्न ज्वलंत प्रश्न म्हणून ठाकलेला आहे आणि महा कुंभमेळ्यामध्ये या प्रश्नाची सर्व बाजूने चाचपणी झालेली आहे शैवांचे सात आखाडे हे साधूंचे सात आखाडे ठरवण्यात आलेले आहेत मात्र वैष्णव आखाड्यांचे नाव मात्र वैष्णवच ठेवलेले आहे यातले राजकारण कळण्याची अक्कल शैव वा बहुजन समाजाच्या राजकारणी लोकांच्याकडे आहे का ? 

महा कुंभमेळा हे महान राजकारण होते व आहे ते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे  हिंदुत्वात नेमके काय चाललेले आहे हिंदुत्ववाद नेमका कसा विचार करतो आहे हे महा कुंभाच्या आरशामध्ये पाहणे आवश्यक होते पण आपल्याकडचे तथा कथित पुरोगामी लोक जे नेहमीच ब्राह्मण धर्माच्या जाळ्यात फसलेले असतात आणि विरोध करताना प्रत्यक्षात ब्राह्मण धर्माला प्रोत्साहन देत असतात आणि हे करताना ते सर्व वैष्णव धर्माच्या नावाने (महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय) हे चाललेले असते त्यांना या राजकारणाची कल्पना येत नाही आणि भारतीय राजकारणातली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे 

श्रीधर तिळवे नाईक

बहुजनवाद की महाजनवाद २ श्रीधर तिळवे नाईक 

 त्यांना राजकारण कळलेच नाही ते महा कुंभामध्ये काय चाललंय हे पाहण्याऐवजी भलत्याच गोष्टी पाहत बसले एका अर्थाने ब्राह्मण धर्माने पुन्हा एकदा पुरोगामी लोकांना चकवा दिला असे दिसते दुर्देवाची गोष्ट इतकीच आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असे तिन्ही वर्ण आता वैष्णव धर्माच्या नावाखाली ब्राह्मण धर्माला शरण जातायत ब्राह्मण धर्माला त्यामुळे सनातन धर्म असे नवीन नाव घेणे गरजेचे वाटत आहे एका अर्थाने वैदिक ब्राह्मण वैष्णव हिंदू या चार अवतारानंतर सनातन धर्म हा आता युरेशियन धर्माचा पाचवा अवतार असणार आहे कारण ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही उच्च वर्णांना आपल्याला सोबत घेऊन जावे लागेल त्यांना सर्वांना महाजन अशी कॅटेगरी द्यावे लागेल आणि हिंदू धर्मामध्ये कळत नकळत सर्व ब्राह्मणेतर हे शूद्र ठरवण्यात आलेले होते त्यामुळे हिंदू हे नाव वापरण्याऐवजी सनातन असे नाव वापरून पुन्हा एकदा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना महाजन आणि इतरांच्यासाठी बहुजन अशी कॅटेगरी निर्माण करण्याचे व या सर्वांना एक करण्याचे थाटले आहे ठरले आहे  त्यामुळेच हिंदुत्व अधिकाधिक सनातन धर्म हा शब्द वापरत सुटेल अर्थात त्यातून काही फायदाही होऊ शकतो उदाहरणार्थ शेतीतले सर्वच्या सर्व उत्पन्न हे ब्राह्मण धर्मानुसार टॅक्स मुक्त होते तर साहजिकच शेतीवरचे सर्व कर रद्द होतील आता त्यामुळे शेतकऱ्यांनी जर का सनातन धर्म ब्राह्मण धर्म स्वीकारला तर काय असा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो कारण शेवटी सर्व गोष्टी आर्थिक प्रश्नाशी निगडित होतात महा कुंभमेळ्यामध्येच हिंदू संविधान हिंदू राष्ट्राचे संविधान असे शब्द का उदयाला आले हे नीट तपासले पाहिजे जर का खरोखर असे काही संविधान तयार झालेले असेल तर त्याच्याविषयीच्या अफवा आधीच हवेत सोडल्या गेलेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे महा कुंभमेळा म्हणजे फक्त धार्मिक उत्सव असे ज्यांना वाटते त्यांना राजकारणातलं घंटा काय कळत नाही मुळात वसंत पंचमी दिवशी संविधान जाहीर करूया असे सांगणे हीच शैव धर्माचे उत्सव शैव धर्माच्या समतेच्या विरोधात वापरण्याची खेळी आहे वसंत पंचमी हा एका अर्थाने शैव धर्माचा प्रेम दिवस आहे व्हॅलेंटाईन डे वगैरे सगळे नंतर आले हा पार्वतीने शंकराला प्रपोज करण्याचा दिवस आहे नेमक्या ह्याच दिवशी हिंदू राष्ट्राचे संविधान आणण्याचे घाटावे याला मास्तर स्ट्रोकच म्हटले पाहिजे साहजिकच आता सगळीकडे या दिवशी सरस्वतीची पूजा करा असे विधान निघाले शंकर पार्वतीची ताकद कमी करत न्हेणे ब्राह्मण धर्माला अतिशय आवश्यक वाटते हे करताना चेहरा मात्र अतिशय गोड असतो त्यामुळे सर्व शैव उत्सव हे अधिकाधिक हिंदू अधिकाधिक वैष्णव अधिकाधिक् युरेशियन करत न्हेणे हे व्यवस्थितरित्या चाललेले असते महा कुंभमेळ्यामध्ये हेच घडलेले आहे पण अंतिम फेरीमध्ये शैव लोकांनी प्रचंड ताकद दाखवल्याने हा सगळा प्रयत्न हा सगळा खटाटोप प्रश्नांकित झाला आणि पुन्हा एकदा हर हर महादेव चा गजर झाला उमटला निनादला आणि प्रचंड वाढत गेला याचे एक प्रेशर आता निश्चितपणे हिंदुत्ववादावर आलेले असणार त्यामुळेच शंकर आणि महादेवावर अनेक हिंदुत्ववादी लोकांनी पॉझिटिव्ह मेसेज टाकायला सुरुवात केली योगी यांच्या नेतृत्वाची प्रचंड तारीफ झाली गोरखनाथ मठाची पुन्हा एकदा चर्चा झाली भाजपाची सर्वात मोठी गोची हीच आहे की जय श्रीराम च्या जीवावर ते निवडणूक जिंकू शकत नाहीत हे लोकसभेला स्पष्ट झाले आहे आणि हे पुन्हा एकदा आता स्पष्ट होत जाईल खुद्द महाराष्ट्र मध्ये सुद्धा हळूहळू जय श्रीराम कमी करत नेण्यात आले आणि एकता एक राहिला तरच टिकू वगैरे वगैरे भाषा सुरू झाली शेवटच्या सात दिवसांमध्ये हे सर्व घडल्याने निकाल फिरला एकंदरच बहुजन समाज हा काही हर हर महादेवाचा त्याग करायला तयार नाही आणि त्यामुळे भाजपची चांगलीच पंचायत झालेली दिसते अगदी उच्चवर्णीय हिंदू सुद्धा हर हर महादेवाचा त्याग करायला तयार नाही तो एका बाजूला जयश्रीराम  म्हणतो तर दुसऱ्या बाजूला हर हर महादेव ही म्हणतो अनेक पुरोगामी लोकांना ही घोषणा वाटते परंतु हर हर महादेव हे स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचेच प्रतीक होऊन बसलेले आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना हे जेवढ्या लवकर कळेल तेवढे बरे अन्यथा पुरोगामी वादाचा अस्त अटळ आहे आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा भाजपालाच होणार हे काही सांगण्याची गरजच नाही 

श्रीधर तिळवे नाईक



कर्मफलसिद्धांत कर्म /कष्ट करणाऱ्यांनी फळ मागू नये म्हणून धर्माकडून निर्माण करण्यात आलाय का 

श्रीधर तिळवे नाईक

लोक धर्म घरात शिकतात त्यामुळे शाळेत वैज्ञानिक तर्कनिष्ठता शिकवावी लागेल अन्यथा एकांगी वाढ अटळ आहे आणि ती ह्या देशाला परवडणारी नाही

 श्रीधर तिळवे नाईक

जात गणना आणि जातीवास्तव श्रीधर तिळवे नाईक

 

सर्वात पहिली गोष्ट मोक्ष ! मोक्षाचा ना वर्णाशी संबंध आहे ना कुठल्या जातीशी ! तुम्ही कुठल्याही वर्णात जन्मा किंवा जातीत जन्मा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो मोक्षाची असलीच तर फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे जीव! मोक्ष म्हणजे जीव आणि शिव यांचे मिलन ! तेव्हा जर तुम्हाला कोणी वर्ण किंवा जाती यावरून मोक्ष नाकारत असेल तर तो माणूस मोक्षाच्या विरोधात आहे असं खुशाल समजा आता प्रश्न दुसरा येतो की मग जात ही धर्माधिष्ठित आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे मात्र तिचा उगम धर्मात नसून तो शैवांच्या समाज नावाच्या संकल्पनेत आहे ही संकल्पना काय होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी खूपदा सांगितलं की भगवान शंकरांच्या काळात वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळी कौशल्ये असणारे अनेक लोक वेगवेगळ्या गणांमध्ये काम करत होते आणि त्यांच्या काळात जी व्यवस्था होती ती गणव्यवस्था होती त्यातल्या अनेक गणांची जी नावे आहेत ती एक तर प्रदेशावर अवलंबून आहेत किंवा भाषांच्यावर अवलंबून आहेत उदाहरणार्थ पैशाची हा महाराष्ट्रातला जो गण आहे तो नंतर पिशाच गण म्हणून अत्यंत जाणीवपूर्वक नामला गेला कारण तो भ्रष्ट आणि नष्ट करायचा होता त्यासाठी पिशाच्च नावाची संकल्पना सुद्धा ब्राह्मणांनी विकसित केली होती. प्रत्यक्षात पैशाची भाषा बोलणारे लोक ज्या गणात होते त्या गणाला पैशाची गण असे म्हटले जात होते हेच भूतगणाबद्दल आहे हे लोक पंचमहाभूतांची पूजा करत होते म्हणून त्यांना भूतगण म्हटले जात होते किंवा पंचमहाभूत गण म्हटले जात होते त्यांना नष्ट आणि भ्रष्ट करण्यासाठी भुते नावाची संकल्पना आली ज्यांना इंग्लिश मध्ये घोस्ट् म्हटले जाते शैव व्यवस्थेला अधिकाधिक बरबाद करणे हाच त्यामागचा उद्देश आहे या गणव्यवस्थेमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या कौशल्याने युक्त होते भगवान शंकरांनी वेगवेगळ्या गणांमध्ये हिंडत असताना एक गोष्ट पाहिली ती म्हणजे वेगवेगळ्या गणामध्ये वेगवेगळी कौशल्य एकाच कामाबाबत विकसित झाली आहेत साहजिकच त्यांनी या सगळ्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून बारा वर्षांनी एकदा म्हणून कुंभमेळा नावाचा मेळा अस्तित्वात आणला ह्या मेळ्यामध्ये हे वेगवेगळे तंत्रज्ञान जाणणारे लोक आपली कौशल्य विकसित करत एकमेकांशी देवाणघेवाण करत त्यातून भारतातील तंत्रज्ञान हे जगातील इतर सर्व संस्कृतींच्यापेक्षा अधिक विकसित होत गेले इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा हा पाया आहे पुढे ज्यांच्याकडे एकाच प्रकारचे तंत्रज्ञान आहे असे लोक समाज म्हणून एकत्र येऊ लागले थोडक्यात तंत्रज्ञानाच्या आधारे समाज नावाची संकल्पना विकसित झाली ही जन्मानुसार नव्हे तर कर्मानुसार होती आणि ती सर्वांना खुली होती ज्याला जे कौशल्य शिकायचे आहे ज्याला जे तंत्रज्ञान शिकायचे आहे तो त्या समाजात प्रवेश करू शकत असे भारतात आलेल्या युरेशियन लोकांनी सुरुवातीला ही समाज व्यवस्था स्वीकारली आणि स्वतःच्या वैदिक धारेत ती इंट्रोड्यूस केली तिथेही समाजच होते दुर्दैवाने युरेशियन लोकांच्यात नंतर ब्राह्मण समाजाचे लोक समुदाय म्हणून एकत्र झाले आणि त्यांनी ब्राह्मण धर्मात प्रथम वर्ण निर्माण केला आणि समाज जन्मानुसार केले मग त्या समाजाला ते जात म्हणू लागले त्यांनीं जात निर्माण केली याचा एक दुष्परिणाम असा झाला की संपूर्ण भारत हा जातीय आणि वर्णीय समाज झाला आज आपण ह्याला वर्ण जातीय समाज असे म्हणतो ही हिंदूंच्या समाज व्यवस्थेचीच एक खासियत होऊन बसली जी सर्व हिंदूस्थानी धर्मात अस्तित्वात आली अगदी जैनांच्या सारख्या नास्तिक धर्मात सुद्धा ती स्वीकारली गेली आणि पुढे हिंदू धर्मात अस्पृश्यता आली ती इतरांच्याही धर्मामध्ये हळूहळू शिरत गेली कारण हिंदू लोक संख्येने जास्त होते इस्वी सन १००० नंतर ही जात व्यवस्था हिंदुस्थानच्या डोक्यावर बसली ती अजूनही उतरलेली नाही तेव्हा सर्वात प्रथम जातीचे मूळ हे समाजात आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि समाज ही एक ओपन व्यवस्था होती अनेक शैवांच्यात ती कायमच ओपन व्यवस्था राहिली दुर्दैवाने उत्तर पेशवाईनंतर हे सर्व गाणे बदलत गेले आणि शैवांच्यात सुद्धा ती अत्यंत जाणीवपूर्वक घुसवण्यात आली. याने संपूर्ण भारतीय समाज जातीनिष्ठ बनत गेला हे का गेले गेले याचे कारण शैवांच्यात तंत्राला आणि तंत्रज्ञानाला असलेले महत्त्व या लोकांच्या तंत्रज्ञानाला व कामाला दुय्यम लेखण्यासाठी आणि पौराहित्य इत्यादी कामे महत्त्वाची ठरवण्यासाठी व्यापारी व कारागिरांची कामे ही जाणीवपूर्वक शूद्रांच्यात ढकलण्यात आली आणि शूद्र वर्ण जो फक्त सेवकांच्यासाठी लागू होता तो संपूर्ण शैवांच्यासाठी लागू झाला शैवांच्यातीलच योध्ये असणाऱ्या लोकांना अस्पृश्य करण्यात आले विशेषता जे लडाखू लोक होते लढणारे होते त्यांना जाणीवपूर्वक अस्पृश्यांच्यात ढकलण्यात आले जेणेकरून शैव बंड करू नयेत आणि पुन्हा शिवाजी महाराज निर्माण होऊ नयेत अनेक शैव स्व इच्छेने तर काही अस्पृश्यतेला घाबरून वर्णव्यवस्था स्वीकारून बसले उदाहरणार्थ मराठा समाज हा योद्धा समाज होता आणि त्यांचा आजही जो कुलदेव आहे तो खंडोबाच आहे वा कुलदेवता तुळजा भवानी आहे जी शैव आहे

शूद्र अतिशूद्र लोकांच्यातून एक वर्ग तयार झाला ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आणि बीसी असे नाव दिले वैष्णवांनी व इंग्रजांनी या दोन्ही समाजांची जितकी नांगी ठेचता येईल तितकी ठेचली कारण हे लोक बंड करतील असा त्यांना संशय होता त्यांनी जाणीवपूर्वक शैवपूरहितांना शूद्रांच्यात टाकले याचा परिणाम असा झाला की ज्यांना शूद्रांच्यात जाण्याची भीती होती असे शांभवी पंडित किंवा इतर काही पंडीत हे स्वतःला आता ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले हे मूळचे शैव पंडीत होते साहजिकच ब्राह्मणांची संख्या ६ टक्क्यांच्यावर गेली. हे सहा टक्के ब्रिटिश काळामध्ये संपूर्ण भारतीय समाज बळकावून बसले आणि शैवांचा पंडित समाज यांना सामील झाल्यामुळे आपणाला असं दिसतं की संपूर्ण शैव बौद्धिकताच युरेशियन कडे सरकत गेली आणि हळूहळू ती हिंदू धर्मात विलीन झाली. यामुळे शैवांचे नुकसान अधिकच झाले कारण बौद्धिक नेतृत्वच हिंदू धर्माला सामील झाल्यामुळे त्यांचे नष्टचर्य वाढले. मी नेहमीच सांगत आलेलो आहे की जे अद्यापही शैव पंडीत - ब्राह्मण म्हणून धगधगते उरलेले आहेत त्यांनी आता पुन्हा एकदा शैवांची विरासत त्यांना परत केली पाहिजे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शैवांना चिन्हसृष्टीमध्ये नवीन मानाची जागा मिळणे शक्य नाही हे कधी होईल हे मला माहीत नाही परंतु हे झाले पाहिजे हे होण्यासाठी जातीनिहाय नेमकी काय परिस्थिती आहे हे कळणे आवश्यक आहे 

 नेमकं काय झालं आणि हे कोणी आणले हे स्पष्ट झाले की मग जातगणनेला का विरोध केला जातो हे सहज लक्षात यावे . बिजू पटनाईकांनीच ही मागणी केली होती याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही मी नेहमीच सांगितलेले आहे की नाईक वा नायक हे आदिवासी लोकांच्या प्रमुखांचे नाव होतं हे आदिवासींच्या प्रमुखांचे नायक होते हा नाईक वर्ग आजही मोठ्या प्रमाणामध्ये वावरत असतो आणि तो बहुजन समाजाच्या बाजूने अनेकदा उभा असतो हे लक्षात घ्या प्रश्न असा आहे की ही जातीनिहाय गणना का आवश्यक आहे आणि ह्याला हिंदूत्व वादी कर्मठ लोक का घाबरतात ? 


याचे कारण जर का चुकून जरी यांची संख्या 52% किंवा 42 टक्के निघाली आणि बीसिंची संख्या 12% 15% निघाली आदिवासींची संख्या 10% किंवा 15% निघाली तर तब्बल 60 टक्के समाज हा शैव निघतो आणि हे कोणालाच नको आहे वास्तविक अशी शक्यता असेलच असं नाही कारण अनेक शैवांनी अलीकडच्या काळामध्ये धर्म परिवर्तन करून हरीहर धर्म स्वीकारलेला आहे किंवा असे म्हणुया काही लोकांनी शिव आणि विष्णू अशी दुहेरी रचना स्वीकारून एक नवीन धर्म जन्माला घातलाय हा धर्म नव हिंदू धर्म आहे हिंदू धर्म नाही हा नव हिंदू धर्म ज्याची सुरवात विवेकानंदांनी केली होती ही आजच्या हिंदुत्वाची ताकद आहे साहजिकच हा नव हिंदू धर्म जर का विकसित होत गेला तर आजचे हिंदुत्व हे कळत नकळत बहुजन समाजाच्या हातात जाईल याची सार्थ भीती उच्च हिंदुत्वाला वाटते विशेषतः जे ब्राह्मणी हिंदुत्व आहे त्याला ही भीती वाटते आणि काही प्रमाणात जे कडवे क्षत्रिय ब्राह्मण्य हिंदुत्व पाळणारे लोक आहेत त्यांना ही भीती वाटते या दोघांनाही ही जनगणना नको आहे मात्र हिंदुत्वामधल्या क्षात्र लोकांच्यात मात्र जे स्वतःला योद्धे म्हणवतात (अनेक यादव हे शैव योद्धे होते आणि त्यांचे यादव हे आडनाव योद्धा हया शब्दाचा अपभ्रंश आहे) आणि जे अनेक समाजामध्ये विभागलेले आहेत त्यांना मात्र ही जातीनिहाय गणना आवश्यक वाटते 

 प्रश्न असा आहे की ही जातीनिहाय गणना हिंदुत्वात फूट पाडेल का? माझ्या मते जर काय हिंदुत्व ब्रॉड झालं नाही मनाने मोठे झालं नाही तर ही फूट पडणे अटळ आहे आणि म्हणूनच जातीनिहाय गणना करायला अनेक हिंदुत्ववाद्यांनी विरोध केलेला दिसतो त्यांना हिंदू हीच एक आयडेंटिटी आता हवी आहे मात्र ही आयडेंटिटी वर्णजातीमुक्त असणार की वर्ण जातीयुक्त असणार याबाबत मात्र हे लोक काहीच बोलायला तयार नाहीत एकीकडे मनुस्मृती अभ्यासक्रमात आणायची आणि दुसरीकडे आम्हाला वर्णजातीमुक्त हिंदू हवा आहे अशी मखलाशी करायची असा दुटप्पीपणा ब्राम्हण्यी हिंदुत्ववाद्यांचा चाललेला दिसतो हा दुटप्पीपणा जर का त्यांना सोडायचा असेल तर त्यांनी ही जातीनिहाय गणना होऊ द्यावी. त्यामुळे हिंदुत्वांचे ज्याला मी शैव हिंदुत्व असं म्हणत असतो विकसित होऊ शकते. शैव धर्म भारतीय जनता पक्षात असो अन्यथा काँग्रेसमध्ये असो शैव धर्माला काहीच फरक पडत नाही कारण शैव धर्माचे लोक हे सर्व पार्ट्यात पक्षात आहेत मला स्वतःला असं वाटतं की सर्व भारतीय पार्ट्या आहेत आणि वेगवेगळ्या पार्ट्यात शैवांच्यातले वेगवेगळे लोक जात असतात याला विरोध करणारा मी कोण ? किंबहुना सर्वच पार्टीतल्या शैव लोकांना मी व्यवस्थित प्रेमाचे सल्ले देत असतो आणि हे सल्ले मागितल्याशिवाय दिले जात नाहीत मी अनेकदा सर्व पार्ट्याच्या बाजूने बोलतो असा जो भास निर्माण होतो त्याचे खरे कारण शैवाचार्याने कुठल्याच पार्टीत असता कामा नये हे गृहितक आहे आणि ते अत्यंत स्पष्ट आहे कारण सर्व धर्माचे लोक वेगवेगळ्या पार्ट्यात विभागलेले असतात गमतीचा भाग असा आहे की सर्व पक्षात असणे हे वैदिक धर्म लोक करतात ब्राह्मण धर्मीय लोक करतात वैष्णव धर्मीय लोक करतात मुसलमान लोक हे करतात तेव्हा हे चालतं फक्त एखाद्या शैवाचार्याने हे केलं की त्याच्याबद्दल व्यवस्थित मौन आणि शांतता पाळली जाते मग हे शैवाचार्य सद्गुरू असोत की श्रीधर तिळवे असो किंवा आणखी कोणी असो आणि याचं एकमेव कारण मुळात ह्यांना शैवांच्या बाबतीतच प्रॉब्लेम आहे विशेषतः कर्मठ वैष्णवांना हा प्रॉब्लेम असतो आणि महाराष्ट्रात वारकरी ह्या वैष्णव संप्रदायातल्या काही कडव्या लोकांनाच हा प्रॉब्लेम असतो त्यांना असे वाटते की शैव विरुद्ध वैष्णव अशी लढत होऊ नये परंतु ही लढत वैचारिक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही जातीनिहाय गणनेमुळे ही लढत तीव्र होईल असाही अनेकांना संशय आहे माझ्या मते असे होणे शक्य नाही कारण आपण आता एकविसाव्या शतकात आलेलो आहोत तिथे आपणापुढे दोनच पर्याय आहेत एक तर आरक्षण स्वीकारावे किंवा आरक्षण नाकारावे आता एकदा जर तुम्ही आरक्षण स्वीकारलेले असाल तर मग जातीनिहाय गणना करण्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एकतर जातीनिहाय जनगणना स्वीकारा किंवा जाती निहाय आरक्षण नाकारा मतासाठी जाती निहाय आरक्षण ठेवायचं आणि जातीनिहाय जनगणना मात्र नाकारायची हे दुटप्पीपण आहे हे चालणार नाही जाती या मूळच्या समाज प्रधान आणि ओपन आणि खुल्या होत्या त्या कौशल्याशी निगडित होत्या जी कौशल्य नष्ट झाली त्या कौशल्याच्या लोकांनी इतर जातीत सहजरीत्या प्रवेश केला ही वस्तुस्थिती अनेकदा शैवांच्यातल्या पंडित लोकांनी ब्राह्मण प्रवर्गात प्रवेश करून स्वतःला ब्राह्मण म्हणवुन घेतलेले आहे विशेषता दक्षिणेतल्या देशस्थ मूळचे चित्पावन जे सुरुवातीला शैव होते कोकणस्थ , द्रविड, शांभवी ज्यांना अलीकडे सारस्वत म्हटले जाते हे सर्व ब्राह्मण हे ब्राह्मण नव्हते हे पंडित होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक बिहार कडचे शर्मा वगैरे जे पंडित आहेत किंवा ज्यांना पांडे व पंडे म्हंटले जाते ते शैव आहेत उत्तरेकडे तर भरपूर संख्या आहे त्यांच्या कुलदेवता आजही शैव आहेत या लोकांना खरंतर वैदीकांच्यात प्रवेश करणे भाग पडले आणि स्वतःला हिंदू म्हणवून घेणे भाग पाडण्यात आले तेव्हा आता तरी जागृत व्हा मी सगळ्या शैव पंडितांना पुन्हा पुन्हा सांगतो आपली रूट्स का नाकारता आहात ? त्याने काहीच होणार नाही एकीकडे खंडोबाला आणि तुळजाभवानीला कुलदेवता म्हणून साकडे घालायचे आणि दुसरीकडे मात्र ब्राम्हण धर्मी वर्णीय आयडेंटिटी मिळवायची हे कसं काय चालेल ? माझे व्यक्तिगत मत असं आहे की देशस्थ ब्राह्मण एक जात आहे आणि तिची जर गणना होत असेल तर त्यात वाईट काय आहे ? विशेषता आरक्षणाच्या संदर्भात तर ही प्रोसेस अटळ आहे हे होणारच होते आणि आज ना उद्या हे करावेच लागेल कारण खरोखरच जाती किती आहेत आणि कुठल्या जातीत किती लोक आता आहेत हे समाजशास्त्राच्या पातळीवर एक समाज शास्त्री एक समाजशास्त्रज्ञ म्हणून मला अभ्यास करण्यासाठी अत्यंत आवश्यक वाटतं म्हणूनच मी जातीनिहाय जनगणनेला एक समाजशास्त्रज्ञ म्हणून मान्यता देतो हे होणे समाजशास्त्राच्या फायद्याचे आहे तेव्हा जर आपला समाजच आता जातीनिहाय घडलेला असेल तर तो नाकारण्यात काय अर्थ आहे ? नेमक्या संख्या कळू देत अनेकांची डोकी कदाचित त्यामुळे ठिकाणावर येतील 

केवळ बिजु पटनाईक यांनी ही मागणी केली होती म्हणून ती नाकारण्यात काय अर्थ आहे उलट अनेक नायकांना नाईकांना मी जेव्हा सांगतो की तुम्ही एकेकाळी आदिवासींचे प्रमुख होता आणि आदिवासींच्या प्रमुखाला नाईक म्हटले जायचे तर त्यांना ते झेपत नाही (कोळ्यांच्यात वां आदिवासी लोकांच्यात व इतर ओबीसी बिसिच्या मध्येही नाईक असतात)पचत नाही वास्तविक हे जेव्हा घडत होते तेव्हा सगळेच आदिवासी होते फक्त तुम्हीच आदिवासी नव्हता सगळेच होते फक्त युरेशियन काळात तुम्हाला प्रमोशन मिळाले आणि तुमची गणना अचानक क्षत्रीयांच्यात वैश्यांच्यात व्हायला लागली पण म्हणून आपली मुळे कशाला नाकारता? उलट आपली जबाबदारी वाढते ती त्यामुळे नीट सांभाळून घ्या पार पाडा ओबीसीना आदिवासींना न्याय देण्याची जबाबदारी सगळ्या नायकांची नाईकांची आहे दलितांना न्याय देण्याची जबाबदारी सगळ्या नायकांची नाईकांची आहे ती नाईक म्हणून पटनाईक म्हणून आपण निभावलीच पाहिजे म्हणूनच ती जबाबदारी निभावण्यासाठी का होईना नेमकं समाजवास्तव काय आहे हे कळलं पाहिजे आणि भारतातले समाज वास्तव काय आहे हे कळण्यासाठी जनगणना जातीनिहाय आवश्यक आहे मला वाटते हे इतके पुरेसे आहे मी श्रीधर तिळवे नाईक बोलत होतो आपण मला शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद 


श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना