बाळबोध कविता फेब एप्रिल
Don't quit,
लाईफ is quick .
suicide ke bareme sochte sochte निकल जायेगी
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
अंत तक पता ना चला क्या मसला था
क्या दुनिया चलाने वाला कोई खुदा था?
जिंदगी हमेशा इंतजार करती रही
मगर पता नही इंतजार किस बातका था
हमेशा दिल मेरा टूटते टूटते रह गया
पता नही मेरे अंदर क्या बचा था
तमाम उम्र मैं उनके हमले झेलता रहा
उनकी नजरमें मेरा हमला मेरा हौसला था
औरत है तो आजमाईश होती रहेगी
खुद रामही सीताकी अग्निपरीक्षा था
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
बहुजनाचे मोहिनी साठी स्वगत श्रीधर तिळवे नाईक
अस्तित्वात नसलेल्या नरकाची गोड शब्दांत दाखवलेली वाट
आणि तरीही कोणी फसला नाही तर भयाचा बांधलेला घाट
बहुजन आहे ही माझ्या रक्तात उधळपट्टी कोणी आहे रचली
समोरचा मागतो साधा रस्सा मी त्याला देऊन टाकतो ताट
बारकावासुद्धा मिळत नाही चालून येतो थेट टोककावा
नंतर कळते त्यानें टाकली होती फार पूर्वीपासून घरात खाट
थांबव बाई ग तुझी अदाकारी तिच्यामुळे आमची विकेट जाते
तू दिसतेस मोहिनी सारखी अन आयुष्याची लावतेस वाट
तू आमची कड घेऊच नकोस तू कड घेतेस नि कडेलोट करतेस
तू कळेस्तोवर गेलेले असतात गळा कापून तुझे केस घनदाट
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मेरा वजूद सिर्फ मेरा वजूद होता है
कभी कभी उस पे तू मोहब्बत होता है
मै नही जानता इस दुनिया का आगाज क्या
मेरी दुनिया शुरू होती है जब तू मेहरबान होता है
एक दुसरे के अंदर बंदर की तरह नाचते है
मजा आता हैं जब अंदर इश्क का डांस होता है
कभी तो पर्दा उठा चूपचूपके मिलना छोड
इश्क वो इलजाम है जो खुलेआम होता है
जो होता है वो होने दे क्या किसी से डरना
इंडियन सोसायटी मे हमेशा इश्क बगावत होता है
ज्यादा से ज्यादा क्या होगा मार डालेंगे और क्या ?
मरने के अलावा इस जहांमे क्या बुरा और होता है
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
भागीरथी मावशी श्रीधर तिळवे नाईक
भागीरथी मावशी वेडी नव्हती
पण ती वेड पांघरून वडगावला जायची
ती जन्मलीच मुळात बांदिवड्यात
वडांच्या बांदित
त्यामुळे वड अटळच होते
माझ्या गावात जन्मलेल्या लोकांसाठी
तिच्या त्या वडावर संपूर्ण सृष्टी टांगलेली
ती फक्त तिचीच
ती बागेची काळजी घ्यायची
मला फुले तोडू द्यायची नाही
अपवाद चाफा
मात्र काजूगर पाडू द्यायची
ती दिवस लांब करायची
आणि रात्री आखुड
गात राहायची दिवस रात्र एक दुःख
आणि लोकांच्यावर अशी हसायची
जणू सगळे लोक मूर्ख
लोक तिच्या वेडेपणावर स्टॅम्प मारून निघून जायचे
पण मला मात्र जगातली ती सर्वात शहाणी स्त्री आहे की काय अशी शंका यायची
स्वतःच्या लंगडेपणावरही हसण्याची कला
तिने प्राप्त केली होती
ती एक जग बांधायची
तिचे स्वतःचे
आणि त्या जगात ती मला कधी राजा कधी प्रधान काहीही बनवायची
मी तिचा तिच्या पोटी न जन्मलेला मुलगा होतो
आणि माझ्या आईच्या पोटी जन्मलेला भाचा
माझ्या आईच्या पोटात प्रचंड प्रेम
याबद्दल मात्र तिला शंका नव्हती
तिला वाटायचं आईने गोव्यात राहवं
मग अचानक कधीतरी
ती खूप धूर्त असल्यासारखी वागायची
हा ओढून ताणून आणलेला धूर्तपणा टिकायचा नाही
आणि तिचे जग आम्ही शाबूत ठेवलेले आहे असे कळाले कि ती उघडी पडायची
ती तिचे आयुष्य संपूर्ण जगायची
कदाचित तिच्याच अटीवर
मला कधी कधी वाटायचे
हीच जगतीये
बाकीचे तर फक्त जगण्याचं नाटक करतायत
कदाचित तिला बाकीच्यांचे जग खरं न वाटता
लंगडं आहे असं वाटत असावं
तिचा एक पाय लंगडा होता
आणि ती देवाचा एका पायाने लंगडा म्हणून उल्लेख करायची
जणु लंगडा सुपरमॅन
तिच्या आवाजात दुःख होतं
पण ते बारकाईने ऐकलं तरच कळायचं
तेही ती गात असताना
माझ्या आजोबांना ती जन्मायच्या आधीच
तिची डेस्टिनी कळाली होती
आणि ती फॉलो होऊ नये म्हणून
तिला आईवेगळं काढायचा सल्लाही दिला होता
पण तिच्या आईची माया
ती आईजवळ राहिली
आणि लंगडी झाली
माझ्या आजीला आजोबा माहित असूनसुद्धा तिचा नियतीवर विश्वास नव्हता
पण भागीरथीपासून ती आजोबांची फॉलोअर झाली
माझ्या आजोळात डेस्टिनीचे साम्राज्य होते
आणि आम्ही सर्वच त्या साम्राज्याचे नागरिक
मला आजोबा शिवाचे अवतार म्हणायचे
आणि माझ्या अंगावर ओझे टाकायला बघायचे
मी नेहमीच पळत आलो माझ्या अवतार कार्याच्या जबाबदारीतून
देव अंगावर वाहणारे लोक कृषीफाय होतात
अशी माझी ठाम समजूत
आणि आज घरात चर्चा
भागीरथी घरात आणायची की नाही
भागीरथी मावशीचं नशीब बदलायला
तीनं कोल्हापुरात यावं
अशी माझी इच्छा
जी फळत नाहीये
ती कोल्हापुरात काय करणार
एक व्यवहारिक प्रश्न
ज्याचे उत्तर कोणाकडेच नाहीये
भागीरथी म्हणजे गंगा
हे मात्र मी लहानपणापासून ऐकतोच आहे
आत्ताही
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मी कशाला कुठे जाऊ जोवर बनून तू पेशी आहेस
तू आहेस आयुष्यात माझ्या आणि तू पुरेशी आहेस
मी कधीही तुला माझी माझी परी म्हंटले नाही
पंख कशाला हवेत जर चालणारी तू पुरेशी आहेस
मला कधीही चंद्रामध्ये तुझा चेहरा आढळला नाही
तुझ्या चेहऱ्याचा प्रकाश आहे आणि तू पुरेशी आहेस
जो तो आहे हरवलेला भोवतालच्या गर्दीमध्ये
तुझा हात माझ्या हातात आणि तू पुरेशी आहेस
आयुष्य एक फर्मान आहे कोणी काढले माहित नाही
तू आहेस स्वाक्षरीसारखी आणि तू पुरेशी आहेस
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
दुःख इतके झाले कि कलेत सुख हवेसे वाटते
खोटे असेल पण आनंदाचे मुख हवेसे वाटते
स्वतःशीही लोक आता खोटे बोलायला शिकले
बोचणारे खरे कोणास सन्मुख हवेसे वाटते?
हे तर व्हायचेच होते असेच तर व्हायला हवे
उद्वेगाने होणाऱ्या उद्घोषाचे मुख हवेसे वाटते
काहीतरी आत हिट होते वेगांचा आवाज येतो
प्राण्यांपेक्षा कार्समधले सुख हवेसे वाटते
सगळेच तसे आता इथे सज्जन झालेले आहेत
क्राईमच्या सरावातील चोरटे सुख हवेसे वाटते
कळत नाही कोणापासून लोक आता पळत आहेत
आपण निसटलो हेच बहुदा सुख हवेसे वाटते
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
वफा करने से पहलेही उसने बेवफाई की
मिलन होने से पहले सेलिब्रेट जुदाई की
बडा नाज था मुझे उसके कॅरेक्टर पर
लोगो मे ले जाऊ उससे पहलेही ढिलाई की
वो शर्माती ऐसी थी जैसे कोई तजुर्बा नहीं
पता चला सेक्समे उसने पीएचडी तक पढाई की
जिन्हे अदा समझा वो उसकी प्रॅक्टिस थी
इश्कके नामपे पेश एक्टिंग की परछाई की
शायद कभी मै मोहब्बत पे यकीन ना करू
रुह तक न बची उसने ऐसी धुलाई की
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मेरा वजूद सिर्फ मेरा वजूद होता है
कभी कभी उस पे तू मोहब्बत होता है
मै नही जानता इस दुनिया का आगाज क्या
मेरी दुनिया शुरू होती है जब तू मेहरबान होता है
एक दुसरे के अंदर बंदर की तरह नाचते है
मजा आता हैं जब अंदर इश्क का डांस होता है
कभी तो पर्दा उठा चूपचूपके मिलना छोड
इश्क वो इलजाम है जो खुलेआम होता है
जो होता है वो होने दे क्या किसी से डरना
इंडियन सोसायटी मे हमेशा इश्क बगावत होता है
ज्यादा से ज्यादा क्या होगा मार डालेंगे और क्या ?
मरने के अलावा इस जहांमे क्या बुरा और होता है
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
सहन केले असते जर त्यांनी असते पिंजरे मागितले
पण त्यांनी माझ्या घरी येऊन माझे घरटे मागितले
मी दुकानच थाटले होते कपडे माझे विकण्यासाठी
त्यांनी कपड्याच्या किमतीत माझे चेहरे मागितले
नको तेव्हा भेटतात हवे तेव्हा गायब असतात
अशांचे काय करू ज्यांनी क्षण गुंतागुंतीचे मागितले
कधीही कळले नाही खाऊ चॉकलेट की ओठ तिचे
तोडगा म्हणून चॉकलेटच्या बदल्यात ओठ तिचे मागितले
कोणत्या मालकाने मला माहित नाही दिले घर
आणि हेही माहित नाही कोणी भाडे मागितले
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
तुम्हारे इश्क में मैं अकेला हुआ
मै और जियादा तुम पे फिदा हुआ
मोहब्बत मुझको रास आई
अपनेही अक्सका दिवाना हुआ
अपने आप हजारो दुश्मन हुए
मैं सचके साथ खडा हुआ
जानता हूं वो लौटेगी, हमेशा
बादमे प्यार पहले झगडा हुआ
ये सितम हैं या प्यार की तस्वीर
पहले भी शायद यहीं नजारा हुआ
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment