Posts

Showing posts from April, 2025
 एक्स्टर्नल रिलेशनशिप : गो मां पवार श्रीधर तिळवे नाईक  गो मा पवारांचं काय करायचं हा प्रश्न मला कधीच सुटला नाही आणि बहुधा त्यांनाही माझं काय करायचं हे कळलं नसावं . गो मांचे नाव मी प्रथम ऐकले ते पॉप्युलर प्रकाशनाच्या मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप ह्या चर्चासत्राच्या निमित्ताने ! ह्या चर्चासत्राचे पडसाद त्यावेळी कोल्हापुरातील डाव्या चळवळीत फारच उमटले होते नेमाडेंचा संरक्षक तट ही उपाधी त्यावेळी चंद्रशेखर जहागीरदार व गो मा पवार ह्यांना मिळाली होती  पुढे माझा थेट संबंध आला तो विलास कांबळे आणि राजकुमार यादव ह्या दोन मित्रांच्यामुळे ! मात्र प्रत्यक्षात माझे बोलणे जास्त झाले नाही राजकुमार यादव मला कुठेही न्हेताना "तोंड उचकटणार नसशील तर ये " ह्या अटीवर न्ह्यायचा . त्याकाळात वयाचा जोश जास्त असल्यानं आडवं जाण्याची वृत्ती भरपूर होती वादविवादात खेचायचं आणि युक्तिवादात फसवायचं अशी माझी त्यावेळची स्ट्रॅटेजी असायची आणि त्यात सत्याचा शोध कमी आणि बुद्धीचा अहंकारच जास्त होता तारुण्याचा मूर्खपणा असं आता त्याला म्हणता येईल त्यामुळे पहिल्या मीटिंगमध्ये मी खालमुंडी पाताळधुंडी करत बसून राहिलो...
 Final  धर्म म्हणजे काय आणि ब्राह्मण हे खरोखर पुरोहित आहेत का? श्रीधर तिळवे नाईक  भारतामध्ये जे काही गैरसमज आहेत त्या मधला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ब्राह्मण हे पुरोहित आहेत प्रत्यक्षात हे कितपत खरे आहे हे ठरवणे आवश्यक आहे आणि हे ठरवण्यासाठी धर्म म्हणजे काय हेही ठरवावे लागते लागेल किंबहुना सर्व पुरोहित गिरिची अत्यंत कठोर चिकित्सा होणे गरजेचे आहे कारण ही चिकित्सा न झाल्यानेच ब्राह्मण्य नष्ट होत नाही कारण सर्व चर्चा अमूर्त दिशेने रेटत राहणे हे ब्राम्हण्याचे एक वैशिष्ट्य असते आत्ताही हे वैशिष्ट्य काम करताना दिसते उदाहरणार्थ एक हे तो सेफ है त्यातील एक म्हणजे काय तर ते अमूर्त असते मुळातच हे खोलात जाऊन तपासायचे असेल समजून घ्यायचे असेल तर आपणाला एक गोष्ट उलगडायला हवी ती म्हणजे धर्म म्हणजे काय? आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज असा आहे की धर्म ही फक्त देवाविषयी आणि काहीतरी परलोकाविषयी असलेली मांडणी आहे वस्तुस्थिती अशी आहे की परलोकाविषयी किंवा ईश्वराविषयी किंवा देवाविषयी या मांडणीला काहीही पडलेले नसते मग परलोकाचा आधार का घेतला जातो तर परलोकाचा आधार स्वतःची ठोस ओळख प्रस्थापित करण्यास...
 वेद गुजरात महाराष्ट्रात कसे निर्माण झाले श्रीधर तिळवे नाईक  शैव सिंधू समाज नेमका कसा होता हा एक यक्षप्रश्न बनून आहे मुळात ही संस्कृती अफगाणिस्तान ते गुजरात ह्या एरियात मर्यादित होती असा एक गोंडस गैरसमज अनेकांचा झालाय प्रत्यक्षात झालं असं कि जेव्हा काही कारणांनी ह्या प्रदेशातील लोकांनी स्थलांतर केले तेव्हा हा मागे उरलेला भाग ओसाड झाला आणि हळूहळू गाडला गेला ज्याचे आपण उत्खनन करतो जो सेफ राहिला तो संगम संस्कृती , द्रविड संस्कृती व नाग संस्कृती म्हणून डेव्हलप होत राहिला आणि आपलं शैवपंणही मिरवत राहिला ह्या गाडल्या गेलेल्या भागालाच सिंधू सभ्यता म्हणणे व ती नाहीशी झाली असं म्हणणं हा आर्कियॉलॉजिकल आचरटपणा आहे आणि त्याला अकादमीक सपोर्ट आहे असो प्रश्न असा आहे कि गुरव आणि ब्राह्मण हे जसे दोघेही शैव संस्कृतीचे भाग होते व ब्राह्मणत्व हे सुरासुरांना सामावून घेण्यासाठीच निर्माण करण्यात आलं होतं आणि त्यातून पुढे फुटून जाऊन काही मूळ अशैव असलेल्या देशीवादी ब्राम्हणांनी जर वैदिक धर्म निर्माण केला तर त्यावेळी असुर काय करत होते ? त्यांनी अथर्ववेद कसा निर्माण केला आणि सुरांनी आपले तीन वेद कुठे न...

शैव समाज विद्या

 अनुराग कश्यप,शैव समाजविद्या (समाजशास्त्र) आणि भारतीय राज्यव्यवस्था श्रीधर तिळवे नाईक  भारतात समाजशास्त्र प्राचीन काळात अस्तित्वात होते की नाही हा एक वाद विवादाचा विषय आहे युरोपियन पुरोगामी वादाने विज्ञान जन्माला घातले आणि विज्ञानअधिष्ठित शास्त्रांचा उदय झाला त्याची एक शाखा म्हणजे सोशॉलॉजी होय मराठीत आणि एकंदरच भारतीय भाषांच्यात या शब्दाचा अनुवाद कसा करायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रात तो मराठी भाषेत समाजशास्त्र हा शब्द वापरून सोडवण्यात आला. प्रत्यक्षामध्ये हा शब्द अत्यंत चुकीचा असून त्या ऐवजी समाज विद्या हा शब्द वापरण्यात येणे आवश्यक होते परंतु विद्या, शास्त्र आणि विज्ञान यांच्यातला फरक न कळणारे लोक सातत्याने समाजशास्त्र हा शब्द वापरत राहिले आणि मग सोशालॉजी म्हणजे समाजशास्त्र असाच अर्थ रूढ झाला सर्वसाधारणपणे भारतामध्ये समाजविद्या उदयाला आल्यानंतर तिच्यावर ब्राह्मण वर्णातून आलेल्या लोकांचे प्रचंड प्रभुत्व होते साहजिकच या लोकांनी ब्राह्मण धर्माधिष्ठित समाजशास्त्र रचण्याचे उद्योग सुरू केले भारतामध्ये शास्त्रांची मक्तेदारी ही कायमच ब्राह्मणांच्याकडे आहे असा ब्र...

DECATHLON ELCETRA

 आता इंटरेस्टही नाही तुझ्यात  ह्या कोड्यात कि  तेव्हा मी कसा सौंदर्यमोहात सापडलो  फायदा काहीच न्हवता  रीटर्न्सही न्हवते तुझ्या सौंदर्यापासून  ना शेअर वर जाणार होते  ना माझ्या मालाच्या किंमती  झकपक काय झाले आत  त्वचा कशी पेटली गात  सौंदर्य अस्तित्वात तरी होते का  कि नुसता इफेक्ट होता  विवेकाने राजीनामा कसा दिला  सौंदर्याचा कसा ससा दिला  उपयुक्ततावादी संवेदना गाजर खायला कशा गेल्या ? इमोशनल आमिष तयार कसे झाले ? स्पेशल इफेक्ट वाढता  का न घेतला पाय काढता ? ठसा उमटला सर्वांगीण  आलिंगनात फसली वीण  मादक उदक  त्यात झालो बदक  उडालो उडालो चळलो थेट ढगात आदळलो  चढत गेला चेव  घडत गेला अनुभव  ठिय्या दिला चंचल आसनात  परतलो ठेवून ठेव कसे कसे कसे  लागले पिसे  मग गेले कुठे  फुफाटे  युटोपिया होता काय  कसा सापडला पाय  कसा गेला पाया  गेलो नाही वाया  बाहेर आलो इव्हेंटच्या  हीच अचिव्हमेंट     श्रीधर तिळवे नाईक (डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन...