DECATHLON ELCETRA
आता इंटरेस्टही नाही तुझ्यात
ह्या कोड्यात कि
तेव्हा मी कसा सौंदर्यमोहात सापडलो
फायदा काहीच न्हवता
रीटर्न्सही न्हवते तुझ्या सौंदर्यापासून
ना शेअर वर जाणार होते
ना माझ्या मालाच्या किंमती
झकपक काय झाले आत
त्वचा कशी पेटली गात
सौंदर्य अस्तित्वात तरी होते का
कि नुसता इफेक्ट होता
विवेकाने राजीनामा कसा दिला
सौंदर्याचा कसा ससा दिला
उपयुक्ततावादी संवेदना गाजर खायला कशा गेल्या ?
इमोशनल आमिष तयार कसे झाले ?
स्पेशल इफेक्ट वाढता
का न घेतला पाय काढता ?
ठसा उमटला सर्वांगीण
आलिंगनात फसली वीण
मादक उदक
त्यात झालो बदक
उडालो उडालो चळलो
थेट ढगात आदळलो
चढत गेला चेव
घडत गेला अनुभव
ठिय्या दिला चंचल आसनात
परतलो ठेवून ठेव
कसे कसे कसे
लागले पिसे
मग गेले कुठे
फुफाटे
युटोपिया होता काय
कसा सापडला पाय
कसा गेला पाया
गेलो नाही वाया
बाहेर आलो इव्हेंटच्या
हीच अचिव्हमेंट
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या फाईलमधून )
Comments
Post a Comment