Final
धर्म म्हणजे काय आणि ब्राह्मण हे खरोखर पुरोहित आहेत का? श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये जे काही गैरसमज आहेत त्या मधला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ब्राह्मण हे पुरोहित आहेत प्रत्यक्षात हे कितपत खरे आहे हे ठरवणे आवश्यक आहे आणि हे ठरवण्यासाठी धर्म म्हणजे काय हेही ठरवावे लागते लागेल किंबहुना सर्व पुरोहित गिरिची अत्यंत कठोर चिकित्सा होणे गरजेचे आहे कारण ही चिकित्सा न झाल्यानेच ब्राह्मण्य नष्ट होत नाही कारण सर्व चर्चा अमूर्त दिशेने रेटत राहणे हे ब्राम्हण्याचे एक वैशिष्ट्य असते आत्ताही हे वैशिष्ट्य काम करताना दिसते उदाहरणार्थ एक हे तो सेफ है त्यातील एक म्हणजे काय तर ते अमूर्त असते
मुळातच हे खोलात जाऊन तपासायचे असेल समजून घ्यायचे असेल तर आपणाला एक गोष्ट उलगडायला हवी ती म्हणजे धर्म म्हणजे काय? आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज असा आहे की धर्म ही फक्त देवाविषयी आणि काहीतरी परलोकाविषयी असलेली मांडणी आहे वस्तुस्थिती अशी आहे की परलोकाविषयी किंवा ईश्वराविषयी किंवा देवाविषयी या मांडणीला काहीही पडलेले नसते मग परलोकाचा आधार का घेतला जातो तर परलोकाचा आधार स्वतःची ठोस ओळख प्रस्थापित करण्यासाठी घेतला जातो म्हणजेच हे सत्ता कारण आहे आणि हे सत्ता कारण खेळायला आवश्यक असणारे प्रत्यक्ष भांडवल प्रत्यक्ष सत्ता कारणांमध्ये अस्तित्वात नसल्यामुळे इहलोक नाकारला जातो आणि परलोक आणला जातो आणि तिथून राजकीय सत्तेचे भांडवल निर्माण करणे सुरू होते यासाठी श्रद्धा मदत करतात म्हणूनच श्रद्धांची मदत घेतली जाते श्रद्धा या नेहमीच परलोक केंद्रित असतात कारण त्या तशाच कल्पनेच्या सहाय्याने मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्या कलावंतांनी मांडलेल्या आहेत साहजिकच कलावंताने मांडलेल्या कल्पित कथांच्या आधारे ज्यांना सत्तेची आच असते असे लोक व्यवस्थितपणे एका नव्या राजकीय प्रणालीची मांडणी करतात आणि ही राजकीय प्रणाली म्हणजे धर्म होय हे सत्य लक्षात न घेतल्यानेच अनेक धार्मिक दृष्टिकोन व विवेचन बिघडले गेले धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच चुकल्यामुळे आत्ता सारी गडबड झालेली दिसते धर्म ही अथपासून इतीपर्यंत केवळ राजकीय आणि राजकीयच गोष्ट आहे आणि हे न कळल्यानेच सारा गोंधळ झालेला दिसतो आणि जो वर तुम्ही या राजकीय विचार प्रणाली मधून मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही मोक्ष हा त्यामुळे श्रद्धेपेक्षा वेगळा होतो आणि धर्म हा मोक्षाला मात देण्यासाठी जन्मलेला असतो
ह्यासाठी धर्म ही गोष्ट नेमकी काय करते हे पाहायचे असेल तर थोडा आपण ज्यू लोकांचा इतिहास तपासू.
प्रेषित मोजेस नेमके काय करतो आहे? तर तो प्रथम इजिप्शियन सत्ते मधला एक राजा निर्माण करतो जो प्रस्थापित सत्तेमध्ये एका रूपात अस्तित्वात असतो (असा काही राजा अस्तित्वात नव्हता असे आता आफ्रिकन इतिहासकार व्यवस्थित सिद्ध करतात) तर त्याच्या विरोधात तो बंड करून तो अशा लोकांचा राजा बनू इच्छितो जे आत्ता गुलाम झालेले आहेत त्याची राजा बनण्याची शक्यता ही फक्त गुलाम लोकांच्या बंडामधूनच निर्माण होऊ शकते साहजिकच गुलाम लोकांना संघटित करण्यासाठी तो एक विचार प्रणाली मांडतो आणि ही विचार प्रणाली राजकीय विचार प्रणाली असते प्रश्न असा आहे की तो असे का करतो याचे कारण स्पष्टपणे आपणाला दिसते ते असे की जी प्रस्थापित राजकीय प्रणाली आहे ती इहलोकांमध्ये संपूर्ण सत्ता बळकावून आहे आणि ज्यांनी ती बळकवलेली आहे त्यांची एक श्रद्धा आहे हे लोक श्रद्धेच्या सहाय्याने स्वतःला दैवी म्हणून घेतात आणि आपणच देव किंवा देवपुत्र आहोत असा दावा करतात किंवा आपणावर देवाची खास कृपा आहे असे दर्शवतात
आता या श्रद्धेने निर्माण केलेल्या दैवी सत्तेला शह कसे देणार साहजिकच यासाठी पुन्हा एकदा आपणच देवाचे लाडके कोणी आहोत हे दाखवणे आवश्यक बनते त्यातूनच मग प्रॉफेट ही संकल्पना उदयाला येते प्रॉफेट ही प्रस्थापित सत्तेमधील देव किंवा देवपुत्र या संकल्पनेला चॅलेंज देणारी संकल्पना आहे प्रॉफेट हा सर्वसामान्य लोकांच्या पासून तयार होऊ शकतो किंवा सर्वसामान्य लोकांच्या मधून उदयाला येऊ शकतो अशी संकल्पना असल्याने तो जमिनी बनतो आणि आकाशाला चटावलेल्या आणि सोकावलेल्या लोकांसाठी साहजिकच त्याची मुळे जमिनी दाखवण्याऐवजी आकाशी दाखवणे गरजेचे बनते त्याला स्पेशल बनवण्यासाठी त्याच्यावर आकाशाची कृपा आहे हे दाखवणे गरजेचे बनते आणि म्हणूनच मग एक कोणी देव या प्रेषिताला भेटायला लागतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला देव भेटतो त्याच्याशी बोलतो तेव्हा कोणीही तिथे उपस्थित नसतो आणि आश्चर्यकारकरीत्या तरीही कोणी सारे वर्णन धर्मग्रंथात मात्रकोणी लिहून ठेवतो आता हा धर्मग्रंथ लिहिणारा जो मनुष्य आहे तो कोण आहे त्याने हे केव्हा पाहिले? तर अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारायचे नसतात बस प्रेषिताने सांगितले म्हणून आपण हे लिहिले असे म्हणता येते थोडक्यात काय प्रस्थापित सत्तेला शह देण्यासाठी प्रायोगिक सत्तेने निर्माण केलेली पारेलौकिक प्रायोगिक सत्ता आणि सत्ता प्रणाली म्हणजे धर्म होय जी नंतर प्रस्थापित होत गेली
आता मग एक प्रश्न असा येतो की लोकांच्यावर कसे राज्य करायचे तर त्यासाठी म्हणून व्यवस्थितपणे त्याला फॉलो करणारे लोक कसे देवाचे लाडके आहेत हे सांगावे लागते त्यातूनच मग ज्यू ही जमात देवांची लाडकी असून ती खास देवाकडून निवडली गेलेली जमात आहे असे सांगितले जाते आता हे सर्व ज्यू कोण आहेत तर ज्यांनी मोजेस हा प्रेषित स्वीकारलेला आहे म्हणजेच राजकीय सत्तेचा उगम हा श्रद्धेप्रमाणेच आकाशात दाखवला जातो आकाशातील दैवि कृपा प्रेषितावर होते आणि त्यामुळेच तो राजाला प्रतिस्पर्धी म्हणून आपोआपच लोकांच्या मध्ये उभा राहत जातो. यानंतर गोष्ट येते त्याची हिस्ट्री तयार करण्याची साहजिकच त्यासाठी धर्मग्रंथ निर्माण केले जातात किंबहुना काल्पनिक इतिहास लेखन हाच धार्मिक ग्रंथांचा मूळ उद्देश आहे साहजिकच फर्स्ट टेस्टामेंट मध्ये आडम पासून इतिहास सांगितला जातो एक काल्पनिक प्रेषितांचा वंश तयार होतो आणि तो सादर केला जातो यातूनच अनुयायांना एक प्राचीनत्व एक ऐतिहासिक तथ्य प्राप्त होते भले ते काल्पनिक असेल त्यामुळे त्यांचा इगो अहंकार सुखावतो आणि आपण काही खास आहोत असे त्यांना वाटायला लागते
ब्राह्मणांची मांडणी यापेक्षा वेगळी नाही ते सुद्धा आपण पुरुषाच्या डोक्यापासून तयार झालेले स्पेशल लोक आहोत असा दावा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात नंतर घुसवलेल्या पुरुष सुक्तात करतात आणि आपण देवाचे लाडके आहोत आपण भूदेव आहोत असाही दावा करतात आणि पुढे जाऊन ते स्वतःला भूदेव राहू द्या देव सुद्धा आमचे ऐकतो असा दावा करतात आणि देवा पेक्षा मोठे होतात पुरोहिताने किती मोठे व्हायचे याचे काही भान ब्राह्मण धर्माला आहे असे वाटत नाही
यानंतर मग एक राजकीय प्रणाली मांडली जाते आणि ती प्रणाली वर्णव्यवस्था असते समाजाची व्यवस्था कशी लावायची आणि राज्य कसे चालवायचे यांच्या संदर्भामध्ये अत्यंत बारकाईने करण्यात आलेली मांडणी म्हणजेच स्मृती असते धर्मशास्त्र असते हे इतके पद्धतशीरपणे मांडले जाते की त्याला त्या काळामध्ये खोडून काढणे अवघड बनले होते कारण मूळ आकाशात होते तुम्ही जमिनी मुळे आरामात खोदून खोडू शकता परंतु आकाशातच मुळे असतील तर काय करणार? तुम्हाला हे सर्व काल्पनिक आहे असे स्पष्ट सांगावे लागते हेच काम चार्वाकी लोकायती लोकांनी केलेले दिसते मात्र स्वतंत्र समांतर राजकीय विचार प्रणाली त्यांनी निर्माण केली नाही याचे कारण त्यांना धर्म ही राजकीय विचार प्रणाली आहे ही गोष्टच कळली नाही ते तिला धर्मप्रणाली मानत राहिले यातूनच सगळा प्रतिकाराचा आवेग यज्ञसंस्थेपुरता मर्यादित राहून आणि मग मर्यादित ठेवून व्यवस्थितपणे कुंठवला गेला
राज्य प्रणाली नेहमीच कुठली ना कुठली तरी व्यवस्था स्वीकारते ब्राह्मण लोकांनी नेहमीच गणशाहीचा निषेध केलेला दिसतो आणि राजेशाही स्वीकारलेली दिसते साहजिकच ती अनुवंशिक करणे आवश्यक बनले कारण त्यांना याबाबतीत फार सावळा गोंधळ नको होता कारण शेवटी सर्व लोक कंट्रोल मध्ये आणणे आणि लोकांचा प्रतिनिधी कंट्रोलमध्ये आणणे यांच्यामध्ये फरक पडतो हा फरक ब्राह्मणांना फार नीट माहिती आहे म्हणूनच सर्व पुरोहित शाही ही नेहमी राजाला धर्मांतरित करायला बघते एक व्यक्तीचे धर्मांतर संपूर्ण समाजाचे धर्मांतर घडवू शकते आणि ही व्यक्ती फक्त राजाच असू शकते हे सत्य कळलेले जे काही लोक प्राचीन काळात झाले त्यामध्ये ब्राह्मण हे लोक अग्रेसर होते राजा स्थिर असला की राज्य स्थिर राहते अशी त्यांची धारणा होती आणि ती धारणा ते भारतीय जन मानसिकतेत रुजवण्यात यशस्वी ही झाले साहजिकच अनुवंशिकता रुजवली गेली आणि पुढे पुढे ती पुरोहितांच्या व्यवसायालाही लागू करण्यात आली आता एकदा राजे आणि पुरोहित अनुवंशिक झाले की बाकीच्या सर्व गोष्टी आपोआपच अनुवंशिक करणे भाग पडते आणि तसेच ते केले गेले आणि त्यातूनच भारतातील गुलामगिरी व्यवस्था शूद्र व्यवस्था अनुवंशिक करण्यात आली. अनुवंशिकते मागचे तर्कशास्त्र अत्यंत नैसर्गिक होते कारण त्या काळामध्ये शेती प्रचलित झाली होती आणि जे पेरते तेच उगवते किंवा बिजामध्ये जे असते तेच उगवते अशा प्रकारची धारणा होती साहजिकच राजकीय सत्ता सांभाळण्याचे कौशल्य किंवा धार्मिक सत्ता सांभाळण्याचे कौशल्य हे सुद्धा जन्मजात असते अशा प्रकारची विचारसरणी पटवून देणे सहजरीत्या शक्य झाले वर्ण जाती व्यवस्थेचे मूळ शेती मधल्या पेरते ते उगवते आणि बिजामध्ये जे असते तेच उगवते या तत्त्वांमध्ये आहे साहजिकच तो जातीने कलावंत आहे किंवा तो जातीचा वैश्य वाणी आहे अशा प्रकारच्या कौतुक करणारीं धारणा बहुजन समाजामध्ये रुजवल्या गेली आणि आश्चर्यकारकरीत्या शेतीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी या संकल्पना स्वीकारल्या आणि म्हणूनच जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था दृढ होत गेली ज्याचा फायदा ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांना कायमच मिळत राहिला पुढे पुढे वैष्णव धर्मामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच फक्त पुण्य योनी आणि वैश्य शूद्र यांना पापयोनी अतिशूद्र व आदिवासी यांना अयोनी म्हटले गेले याचे कारण हेच होते की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना त्यांनी मागील जन्मात केलेल्या पुण्यामुळे आत्ताचा ब्राह्मण आणि क्षत्रिय जन्म मिळालेला आहे असे तर्कशास्त्र देण्यात आले हा सगळा शेतीतून आलेल्या तर्कशास्त्राचा प्रताप आहे आजही या तर्कशास्त्राचा असलेला प्रभाव ओसरलेला दिसत नाही आजही जे बिजामध्ये असते त्याचे झाड बनते असे तर्कशास्त्र दिले जाते आणि साहजिकच मग झाड ही संकल्पना पुन्हा पुन्हा देशीवादी लोक वापरत राहतात कारण झाड या संकल्पनेच्या मागे संकल्पनेच्या द्वारे परंपरा रुजवता येते आणि साहित्यामध्ये परंपरा हेच बीज असते हेही बिंबवता येते त्यातूनच मग तुमच्या आत्ताच्या साहित्याचा वर्तमानकालीन साहित्याचा वृक्ष तयार होतो अशी मांडणी तयार करता येते यामागे असलेले शेतीचे तर्कशास्त्र अनेक विचारवंतांच्या लक्षात येत नाही यातून एक असा डिप्लोमॅटिक खेळ रचता येतो की जे जे शैव आहे ते कसे मूळचे देशी आहे ते पटवता येते म्हणजे विठ्ठल आणि खंडोबा हे देशी देव आहेत आणि मग या देशी परंपरांना स्वतःच्या ब्राह्मण परंपरेशी जोडून घेता येते म्हणजे विठ्ठल मूळचा शैव देव असतो मग त्याला देशी केले जाते आणि मग त्या देशी देवाचे रूपांतर वैष्णव देवात होते आणि हळूहळू हा वैष्णव देव मग ब्राह्मण देव बनत जातो साहजिकच मग सानेगुरुजींना साध्या मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करावा लागतो
दुर्दैवाने या मागचे तर्कशास्त्र व त्यातून निर्माण झालेली शृंखला अनेकांच्या लक्षात येत नाही
सर्वसाधारणपणे प्रत्येक धर्म हा शेतीचा उदय सुरू झाल्यानंतर उदयाला आलेला दिसतो अपवाद फक्त शैव धर्म तो मात्र पशुपालन अवस्थेत जन्माला आला
प्रश्न असा असतो की या राजकीय विचार प्रणालीने मग करावे काय? विशेषतः काल्पनिक युग संपून जेव्हा वैज्ञानिक सत्याचे युग येते तेव्हा करावे काय तर मग तडजोड म्हणून धर्मनिरपेक्षता नावाचं एक संकल्पना गारुड अत्यंत जाणीवपूर्वक आणून धर्म घर नावाच्या चौकटीत स्वतःची सत्ता प्रस्थापित करतो आणि त्यातून आपले स्वतःचे उत्पादन सुरू ठेवतो ही एक स्ट्रॅटेजी असते आणि ही स्ट्रॅटेजी अनेकदा पुरोगामी लोकांच्या लक्षात येत नाही ते त्या स्ट्रॅटेजीत वसत जातात फसत जातात मग धर्म राजकीय प्रणाली म्हणून पुन्हा परतण्याची मी परत येईन मी परत येईन म्हणत वाट बघत राहतो आणि मग उत्तर आधुनिकता येते आणि धर्माला पुन्हा एकदा आपली राजकीय विचारप्रणाली राबवण्याची संधी दिसायला लागते कारण खुद्द विज्ञानच आतापर्यंतच्या वैज्ञानिक सत्याच्या अंतिम सत्या बद्दल प्रश्न निर्माण करायला लागते आणि एकदा का अंतिम सत्या बद्दल प्रश्न निर्माण झाले की निर्माण झालेल्या केओसचा फायदा उठवून आपोआपच काल्पनिक अंतिम सत्य कन्व्हिन्स करणे सोपे जाते जे आत्ता घडलेले आहे आणि हे सर्व उत्तर आधुनिकतेच्या नावाखाली घडवले गेलेले आहे घडते आहे आणि हे घडवणारे सर्व लोक योगायोगाने ज्यू असतात आणि भारतात ब्राह्मण! अर्थात भाषा बदललेली असते आणि भारतातील ब्राह्मण लोकांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये जाऊन हा उत्तर वाद व्यवस्थित मांडलेला असतो यात होमी भाभांच्या पासून गायत्री चक्रवती पर्यंत सर्व येतात ही एक व्यवस्थित कॉन्स्पिरसी असते आणि हिला क्षत्रिय लोकांचा पाठिंबा स्थानिक भाषातून मिळणे अटळ असते आणि म्हणूनच मग स्थानिक संस्कृतीमधून देशीवाद उदयाला येत हा आंतरराष्ट्रीय जागतिक उत्तराधुनिकतेला आणि उत्तर वसाहत वादाला अत्यंत पूरकरीत्या काम करत असतो उद्देश ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे वर्चस्व पुन्हा निर्माण करणे हाच असतो दुर्देवाने बहुजन समाजाला हे कळत नाही कारण धर्म ही मुळात राजकीय विचार प्रणाली आहे ही गोष्टच कोणी लक्षात घेत नाही कुठलीही राजकीय विचार प्रणाली ही इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा आगमन करायला बघत असते कारण ती ज्यांनी मांडलेले असते त्यांचे राजकीय हितसंबंध त्यामध्ये लपलेले असतात ब्राह्मण हे फक्त या राजकीय विचार प्रणालीचे शिल्पकार असतात किंबहुना ब्राह्मणांची जर का पुरोहित शाहीच्या अंगाने जर का कोणी जनगणना केली तर 99 टक्के लोकांना वेद हे मूळ धार्मिक ग्रंथ येत नाहीत असे लक्षात येईल आता ज्या लोकांना स्वतःचे धर्मग्रंथ सुद्धा मास्टर करता आलेले नाहीत त्यामध्ये काय आहे ते माहित नाही ते लोक सत्ता वाजवताना मात्र स्वतःला ब्राह्मण म्हणून प्रमोट करत राहतात यामधला विरोधाभास उघड आहे हे सर्व घडते कसे? कारण ब्राह्मण लोकांना धर्माशी काही देणे घेणे नसते त्यांना फक्त स्वतःच्या जमातीची राजकीय आणि सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करणे एवढेच माहिती असते आणि तेवढेच आवश्यक वाटत असते म्हणूनच इसवी सन १४०० नंतर वेदावरची सत्ता सोडली जाते आणि संतांना उत्तेजन दिले जाते कारण आता वेदांचा उपयोग संपलेला असतो आणि संत अस्तित्वात असणे खूप गरजेचे असते जे स्थानिक देशी भाषेतील लोकांना तोच सनातन शाश्वत ब्राह्मण धर्म सांगत राहतील सर्व संत हे इमाने इतबारे करत असतात अपवाद फक्त शैव संत असतात आणि साहजिकच मग बसवेश्वरांचे जे काय करायचे ते केले जाते आणि हळूहळू त्यांचा क्रांतिकारक लिंगायत धर्म वीरशैव धर्मामध्ये ट्रान्सफॉर्म केला जातो आपली स्वतःची ब्राह्मणी राजकीय सत्ता प्रस्थापित केली जाते प्रश्न असा असतो की मग या सगळ्यांमध्ये ब्राह्मणी सत्ता कसे काम करते
सर्वसाधारणपणे लोकांच्या मध्ये लढण्या ऐवजी स्वतःची सत्ता प्रशासकीय ठेवणे हे आवश्यक मानले जाते कारण स्वतःच्या जीवाला जोखमीत टाकणे ब्राह्मण वर्णाला करायचे नसते म्हणजे सत्तेसाठी तुम्ही मरा पण प्रशासनामध्ये जिवंत राहून आम्ही आमची सत्ता कायम ठेवतो असा हा डावपेच आहे होता त्यामुळेच अनेकदा मुस्लिम राजवटींनी सुद्धा ब्राह्मण लोकांना प्रशासनामध्ये ठेवलेले दिसते हा ट्रेंड साधारणपणे 16 व्या शतकानंतर हळूहळू आला विशेषता विजयनगर साम्राज्य हे ब्राह्मण लोकांनी स्थापन केले असे मानले जाते त्यानंतर मग पेशवाई येते म्हणजेच आता जीवावरची जोखीम ही सेनापतींच्या वर टाकता येते सरदारांच्या वर टाकता येते असे जेव्हा समीकरण रूढ होते तेव्हा मग असा प्रकार केला जातो एकोणीसाव्या शतकामध्ये मात्र ब्राह्मण पूर्ण बदलतात आणि ते स्वतःच मिलिटरी ताब्यात घेतात मिलिटरी वर स्वतःचे प्रभुत्व निर्माण करतात आता त्यांच्यामध्ये नवीन आलेल्या शस्त्रांच्यामुळे स्वतःची संरक्षण करण्याची क्षमता वाढलेली असते साहजिकच सैनिक कमी आणि अधिकारी होण्याकडे ब्राह्मण लोकांचा फार कल असतो कारण अधिकारी म्हणून मरण्यासाठी लोक पाठवता येतात स्वतःचे संरक्षण करता येते शासन संस्थेमध्ये कसे ब्राह्मणांनी स्वतःला शाबूत ठेवायचे याचे अत्यंत उत्तम आदर्श हे आपणाला पेशवाईने घालून दिलेले दिसतात अपवाद फक्त पंडित असतात पंडित मात्र थेट रणांगणात उतरतात उदाहरणार्थ पहिला बाजीराव किंवा मग बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे कारण पंडितांना मुळातच रणांगणामध्ये उतरणे शैव लोकांच्या मध्ये आवश्यक मानले गेलेले असते त्यामुळेच जो रणांगणात उतरतो तो पंडित आणि जो प्रशासनात वावरतो तो ब्राह्मण असे तुलनात्मक अध्ययन दिसायला लागते
एकदा का धर्म ही राजकीय प्रचार प्रणाली आहे असे आपल्या लक्षात आले की मग सर्व गोष्टी बदलत जातात आणि मग आपणाला गौतम बुद्ध स्वतःला शास्ता का म्हणवून घेतो आणि आपण मांडत असलेल्या तंत्राला तो तंत्र न म्हणता धम्म का म्हणतो हेही कळते तंत्र हे फक्त मोक्षाशी संबंधित असते त्या उलट धम्म हा राजकीय सुद्धा असतो एकदा हे स्पष्ट झाले की बाबासाहेब आंबेडकरांनी का बौद्ध धम्म स्वीकारला हे लक्षात येऊ शकते मला नेहमीच हा प्रश्न विचारला जातो की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांचा सत्यशोधक धर्म का स्वीकारला नाही याचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर हेच आहे की सत्यशोधक हा शेवटी तंत्र आहे त्याच्यात प्रस्थापित सत्तेविरोधात इंग्रजी सत्तेविरोधात काहीही नाही त्या उलट नवयान हे तंत्र अधिक राजकीय विचार प्रणाली आहे म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाविषयी सर्वाधिक जागृती आपणाला नव बौद्ध लोकांच्यात दिसते ते संविधान सोडायला तयार नाहीत त्याचे कारण त्यांच्यासाठी तो केवळ धम्माचा प्रश्न नाही तर तो राजकीय विचार प्रणालीचा सुद्धा प्रश्न आहे जी प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये ऍक्टिव्ह असते आपण जर का संविधान सोडले तर राजकीय पातळीवर आपणाला प्रचंड त्रास दिला जाऊ शकतो आणि सामाजिक पातळीवर आपल्याला हवे तसे वळण दिले जाऊ शकते याची कल्पना फक्त नव बौद्धांना आहे म्हणूनच तिथे एक प्रकारची राजकीय जागृती दिसते आणि प्रत्येक राजकीय घटनेविषयी न घाबरता कॉमेंट करण्याची वृत्ती ही दिसते
शैव लोकांच्या मध्ये जे अनुशासन आहे ते गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये धम्म बनते आणि पुढे ज्यू आणि इस्लाम मध्ये त्याचे रूपांतर पूर्णपणे संविधानात होते कायदे व्यवस्थेत होते म्हणजेच आपण जर का आपण हे नीट तपासात गेले तर प्रथम शैव संस्कृतीचे अनुशासन मग ज्यू लोकांचा रीलिजन मग ब्राह्मण लोकांचा धर्म मग गौतम बुद्धाचा धम्म मग अरब लोकांचा मजहब अशा तऱ्हेने विकसित होत गेलेले दिसते ही श्रद्धा वा निब्बान केंद्री राजकीय प्रणाली अशा तऱ्हेने विकसित केलेली होत गेलेली दिसते आणि आज 21 व्या शतकामध्ये ती प्रमुख राजकीय विचार प्रणाली म्हणून केंद्रस्थानी येते आहे आणि आपले राजकीय विचारवंत मात्र तिच्याबाबतीत धार्मिक विचार करत झोपलेले आहेत त्यांना अजूनही हा प्रश्न सेक्युलॅरीझमचा वाटतो हा प्रश्न सिक्युलॅरिझमचा राहिलेलाच नाही तो मुळातच राजकीय विचार प्रणालीचा होता आणि तो पुन्हा एकदा राजकीय विचार प्रणाली म्हणूनच केंद्रीय स्थानी आलेला आहे 21 व्या शतकातले जागतिक राजकीय पटल मॅपिंग समजून घ्यायचे असेल तर धर्म म्हणजे नेमके काय आहे हे नेमके तपासून घेणे आवश्यक आहे परलोक पाहू नका त्यापेक्षा त्या परलोकाच्या आधारे कोणती राजकीय सत्ता प्रस्थापित केली जाते ते पहा त्या राजकीय सत्तेच्या आधारे कोणते कायदे येत आहेत ते पहा नाहीतर हे राजकारण कळणे अवघड आहे
आज काल ख्रिश्चन देशांच्या मध्ये सुद्धा कळत नकळत पुन्हा एकदा रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्म आणावा का असा प्रश्न विचारणारे अति शहाणे निर्माण होत आहेत आणि हा सगळा इस्लामला टक्कर देताना निर्माण झालेला प्रश्न आहे कारण इस्लाम राजकीय विचार प्रणाली आहे आणि ती फोफावत जाणे अटळ आहे कारण शेवटी लोकसंख्या ही नेहमीच राजकारणामध्ये मॅटर करत असते स्वतःच्या केवळ 18% लोकसंख्येच्या जीवावर सुद्धा मुसलमान भारतीय राजकारण त्यांना हवे तसे नाचवत असतात ते एकदा 50 टक्के झाले की काय होईल याची अनेकांना कल्पना नाहीये आणि कल्पना आली तरी ती कल्पना करायला ही ब्रेन शिल्लक राहणार नाही आज देवेंद्र फडणवीस यांना मतं मिळतात याचे कारण इस्लामची भीती आहे जनसामान्यांच्या मधली इस्लामची भीती ही काल्पनिक आहे असे तुम्ही समजत रहा परंतु ती भीती तरी निदान भयाचे वास्तव अस्तित्वात आहे हे तरी स्वीकारा पण तुम्हाला तेच स्वीकारायचे नाही जणू काय सगळे सामान्य शैव वैष्णव हिंदू हे मूर्ख आहेत आणि तुम्ही अतिशय शहाणे आहात हा वैचारिक उद्दामपणा आहे आणि काही नाही
प्रश्न असा आहे की ब्राह्मण लोक मग सत्ता ताब्यात का घेत नाहीत किंवा घेत नव्हते याचे कारण ते भारतात स्थलांतरित झाले तेव्हा अत्यंत मायनॉरिटीत होते साहजिकच आपल्याला आवश्यक असलेले लोकसंख्या बळ आपल्या मागे नाही याची त्यांना कल्पना होती जसे जसे जनतेचे पाठबळ त्यांना मिळत जाते तसे तसे ते राज्य करायला सुद्धा तयार होतात उत्तर पेशवाई मध्ये हेच घडलेले आहे आणि आता पुन्हा एकदा हे घडलेले आहे राजकारण कसे करायचे हे जितके ब्राह्मण वर्णाला समजते तितके ते इतरांना समजत नाही कारण धर्म हा अथपासून इतीपर्यंत राजकीय विचार असतो राजकारणच असतो ब्राह्मणाने स्वतःला ब्राह्मण धर्मामध्ये सर्वोच्च ठेवले आहे हा धर्म स्वीकारायचा की नाही हे तुम्ही ठरवा असे ते नेहमी ब्राह्मणेतरांना सांगत असतात ते कधीही तुमच्या दारात येऊन आम्ही तुमचे पुरोहित होतो असे सांगत नाहीत त्यांना पुरोहित म्हणून स्वतःच्या घरात घेणे हा ब्राह्मणेतरांचा स्वतःचा चॉईस असतो प्रश्न असा आहे की ब्राह्मणेतर हे सर्व का स्वीकारतात तर ब्राह्मणेतर नेहमीच स्वतःच्या राजाला फॉलो करत असतात आणि राजाने एकदा का पुरोहित म्हणून ब्राह्मण स्वीकारले की मग हेही ब्राह्मण पुरोहित म्हणून स्वीकारतात पंडितांना किंवा गुरव लोकांना पुरोहित म्हणून स्वीकारणे यांना जड वाटायला लागते महाराष्ट्र मधल्या पंडित लोकांचे ब्राह्मण होणे याला कळत नकळत हा फिनॉमिना सुद्धा जबाबदार आहे अन्यथा एकेकाळी काशीवरून आलेल्या पंडिताला सुद्धा मान देणारे ब्राह्मणे तर पंडित लोकांच्याकडेच पाठ फिरवून बसले नसते याबाबत शिवाजी महाराज आदर्श होते महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळात सर्वच्या सर्व पंत म्हणजेच पंडित ठेवले होते. हा धडा इथले मराठा 96 कुळी लोक विसरले नंतर तर खुद्द पंडितच स्वतःला इतके ब्राह्मण समजायला लागले की बोलायची सोय उरली नाही महाराष्ट्रामध्ये मराठा 96 कुळी या वर्णाने ब्राह्मणांना स्वतःचे पुरोहित म्हणून स्वीकारले म्हणूनच मग इतर सर्व लोकांनी स्वीकारले याबाबतीतले ब्राह्मणे तरांचे वैचारिक नेतृत्व हे नेहमीच मराठा 96 कुळी लोकांच्या ताब्यात होते आणि दुर्दैवांना त्यांना हे वैचारिक नेतृत्व म्हणजे काय आहे याची कल्पना आली नाही याचे एकमेव कारण त्यांचे स्वतःचे शैव-धर्माशी असलेले नाते तुटले जय शिवजी जय भवानी हर हर महादेव हे फक्त रणांगणात राहिले आणि प्रशासनात मात्र नेहमीच ब्राह्मण धर्म काम करत राहिला ज्या ज्या राजवटी याला अपवाद होत्या त्यांनी मात्र नेहमीच सामान्य माणसांच्या साठी काम केलेले दिसते
प्रश्न असा आहे की ब्राह्मण धर्म ही राजकीय विचार प्रणाली क्षत्रिय लोकांना का स्वीकारावीशी वाटते याचे उत्तर मी दिलेले आहे कारण ही राजकीय विचारप्रणाली शासकांना देवाचा दर्जा देते आणि हा देवाचा दर्जा सर्व क्षत्रीयांना आवश्यक वाटतो त्यांच्या अहंकाराला तो कुरवाळत राहतो अलीकडच्या काळामध्ये तर अनेक क्षत्रिय लोक असे सांगतात की त्यांनी प्रशासकीय कामे किंवा इतर बिझनेस सांभाळण्याची कामे ब्राह्मण लोकांच्यावर सोपवली कि ती अत्यंत व्यवस्थित पद्धतशीरपणे पार पाडली जातात साहजिकच ब्राह्मणांच्या वरचा आमचा विश्वास जास्त आहे असे ते स्पष्ट सांगतात कळत नकळत कामाबाबत अतिशय चोख राहणे हे ब्राह्मणांना नेहमी फाप्रश्न असा आहे की ब्राह्मण धर्म ही राजकीय विचार प्रणाली क्षत्रिय लोकांना का स्वीकारावीशी वाटते याचे उत्तर मी दिलेले आहे कारण ही राजकीय विचारप्रणाली शासकांना देवाचा दर्जा देते आणि हा देवाचा दर्जा सर्व क्षत्रीयांना आवश्यक वाटतो त्यांच्या अहंकाराला तो कुरवाळत राहतो अलीकडच्या काळामध्ये तर अनेक क्षत्रिय लोक असे सांगतात की त्यांनी प्रशासकीय कामे किंवा इतर बिझनेस सांभाळण्याची कामे ब्राह्मण लोकांच्यावर सोपवली कि ती अत्यंत व्यवस्थित पद्धतशीरपणे पार पाडली जातात साहजिकच ब्राह्मणांच्यावरचा आमचा विश्वास जास्त आहे असे ते स्पष्ट सांगतात कळत नकळत कामाबाबत अतिशय चोख राहणे हे ब्राह्मणांना नेहमी फायद्याचे ठरलेले आहे विशेषता आजच्या लोकशाहीमध्ये ! शिवाय ब्रा ह्मण ज्ञानाची परंपरा चालवत असल्याने सर्व अद्ययावत तपशील ते आपल्या मालकाला पोचवत राहतात त्यामुळेही ब्राह्मण प्रशासनामध्ये अतिशय आवश्यक वाटायला लागतात राजकीय लोंकांचे म्हणणे असे असते की आम्हाला एफिशियन्सी लागते आणि ती ब्राह्मण पुरवतात सगळ्याचा कलेक्टिव्हली एकच परिणाम होतो की हळूहळू ब्राह्मण धर्म हा कळत नकळत क्षत्रिय लोकांच्याकडून सुद्धा स्वीकारला जातो आणि मग क्षत्रिय लोक स्वीकारतात म्हणून उरलेले वैश्य शूद्र अति शूद्र आणि आदिवासी लोक हा धर्म स्वीकारायला लागतात महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आता याची सुरुवात झालेली आहे हे एका अर्थाने धर्म या राजकीय विचार प्रणालीची सर्वत्र घोडदौड चालू आहे याचे लक्षण आहे साहजिकच ही घोडदौड कोण थांबवणार हा फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे ती कोणत्या दिशेने आवश्यक आहे हे आपण ठरवावे का असाही प्रश्न आहे माझ्यापुरता मी तो शैव दिशेने असा सोडवलेला आहे इतरांनी त्यांची दिशा शोधावी मात्र धर्म ही राजकीय विचार प्रणाली आहे हे सर्वात प्रथम स्वीकारावे तरच या प्रश्नाचे काही प्रामाणिक उत्तर सापडणे शक्य आहे अन्यथा पुरोगामी लोक जसे भरकटले तसे आधुनिक आणि उत्तराधुनिक आणि चौथ्या नवतेचे लोक सुद्धा या संदर्भामध्ये कायम भटकत राहतील
श्रीधर तिळवे नाईक फायनल सेमीफायनल
Comments
Post a Comment