शंकर शंभोपूर्व समाज श्रीधर तिळवे नाईक

युरेशियन स्थलांतरांच्या आधीची दोन आफ्रिकन स्थलांतरे श्रीधर तिळवे नाईक


भारताच्या इतिहासाची सुरुवात आर्यांच्या पासून करण्याची जी खोड आपल्याला लागलेली आहे तिने भारतीय इतिहास लिहिण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण केलेले आहेत 


भारतामध्ये ज्यांना इंडियन म्हणता येईल होमो इंडियन म्हणता येईल असे मानव जातीचे एक वेगळे रूप अस्तित्वात असावे आणि ते होमोसेपीयन यांचे भाऊरूप असावे 


आफ्रिकेतून भारतामध्ये प्रामुख्याने तीन स्थलांतरित झाली यातील पहिले स्थलांतर हे समुद्राच्या मार्गाने दक्षिण भारतात झाले दुसरे स्थलांतर हे व्हाया आशिया युरोप  करत हिमालयाच्या पायथ्याशी विसावले आणि तिसरे स्थलांतर हे इराण मार्गे प्रवास करत संपूर्ण भारतभर पसरले या तिन्ही स्थलांतरांचा विचार आता आपण केला पाहिजे कारण आपणापुढे दोनच पर्याय आहेत एक तर आऊट ऑफ आफ्रिका हा सिद्धांत स्वीकार किंवा होमो इंडियन सिद्धांत ज्यामध्ये माणसाची एक स्वतंत्र प्रजाती जी नंतर भारतात आलेल्या होमोसेपियनशी संकरित झाली आणि जिच्यातून सिंधू संस्कृतीचा एक विशाल पट निर्माण झाला सिंधू संस्कृती ही होमोसोपियन आणि होमो इंडियन यांनी मिळून जन्माला घातलेली आहे 


त्यामुळेच भारतामध्ये काळे आणि सावळे असे दोन वर्ण आपणाला दिसतात यातील जे सावळे होते तेच पुढे नंतर हिमालयाच्या पायथ्याशी पिवळे झालेले आहेत मात्र चायनीज जितके पिवळे असतात तितके हे पिवळे असत नाहीत सावळ पिवळेपणा असा काहीसा त्यांचा रंग दिसतो 


या इंडियन लोकांच्या हिंदवी लोकांच्या अनेक टोळ्या अस्तित्वात आलेल्या असाव्यात त्यांचे गण झाले असावेत हे लोक आपापसात लढाया करत असावे अनेक राक्षस एकमेकांशी लढताना दिसतात त्याचे कारण हेच असावे आणि त्यातूनच पुढे शंकराच्या नेतृत्वाखाली प्रगल्भ अशी गण व्यवस्था निर्माण झालेली असावी 


या लोकांची आदिम श्रद्धा नेमकी काय होती याविषयीची पुरेसे तपशील हळूहळू उत्खननशास्त्राला सापडत जातील पण ते सापडतील तेव्हा सापडतील मात्र ते मातृसत्ताक असावेत याबद्दल मात्र शंका नाही


वृक्ष पूजा वगैरे पद्धती अस्तित्वात असाव्यात आणि पूर्वज पूजा देखील अस्तित्वात असावी या संदर्भात आदिवासी समाजाचा अभ्यास हा अत्यंत उपयुक्त ठरतो या आदिवासी समाजाचे स्पष्ट आणि स्वच्छ दोन भाग पडतात शिवपूर्व आदिवासी समाज आणि शिवोत्तर आदिवासी समाज ! 


भगवान शंकरांनी या सर्व श्रद्धांशी जुळवून घेत मोक्षाच्या संदर्भात एक अतिशय व्यापक अशी मांडणी केली आणि त्यातूनच सिंधू संस्कृती आकाराला आलेली दिसते शिवलिंगाची पूजा सिंधू संस्कृतीमध्ये स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आलेली दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे हा पशुपतिनाथ हा शंकर आणि त्याचे शिव,शक्ती, संसार ,ईश्वर ,जीव, मोक्ष व मोक्ष मिळवण्याचे तंत्र असे सप्तायन सिंधू संस्कृतीमध्ये प्रभावी झालेले होते मात्र शिवपूर्व समाजाच्या श्रद्धा आपले सातत्य टिकवून असाव्यात 


होमो आफ्रिकन ज्यांना राक्षस म्हटले जाईल म्हणजे रक्षण कर्ते म्हटले जाईल आणि होमो इंडियन या दोघांनीही शंकराचा आणि या सप्तायनाचा सहर्ष स्वीकार केलेला दिसतो 


इराण मधून आलेल्या होमोसेपी यन लोकांनी लिंग पूजा ही सूर्यालाच शिवलिंग मानून केलेली दिसते त्यातूनच त्यांना असुर म्हणजेच सूर्यलिंगाची पूजा करणारे असे म्हटले जाऊ लागलेले दिसते हे असून लोक सुद्धा शंकराचे भक्त होते 


हीच गोष्ट हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन तिथे गोरे झालेल्या होमो सेपियन लोकांची आहे हेही आफ्रिकेतून आलेले असले तरी ते युरोपमध्ये किंवा स्टेप मध्येही गेले मात्र त्यांच्यातले काही हिमालयाच्या पायथ्याशी आले ज्यातून आजचे ब्राह्मण लोक आलेले आहेत हे स्वतःला पूर्वी ब्राह्मण म्हणवत नव्हते तर पंडित म्हणत होते आणि हे सर्व ब्रह्मदेवाचे फॉलोवर होते शंकराचा प्रभाव पडून त्यांनीही मोक्षाचा स्वीकार केलेला होता त्यांचा सामना युरेशियन लोकांशी झालेला दिसतो आणि त्यांना होमो इंडियन आणि होमो आफ्रिकन लोकांनी हा संघर्ष करायला मदत केलेली दिसते त्यातूनच पुढे शिवपुत्र स्कंद हा देवांचा सेनापती झाला अशी कथा तयार झाली हा स्कंद नेमका कितवा होता हे सांगणे कठीण आहे 


थोडक्यात काय युरेशियन लोक येण्यापूर्वीच भारतामध्ये होमो आफ्रिकन होमो इंडियन आणि होमो हिमालयन असे तीन प्रकारचे लोक एकमेका बरोबर चांगले संबंध ठेवत अस्तित्वात होते. 


त्यांचा इतिहास सध्या धुसर असला तरी हळूहळू उत्खननामध्ये तो स्पष्ट होत जाईल असा माझा अंदाज आहे 


सर्वसाधारणपणे आपणाला असे दिसते की हिमालयन लोकांच्या पाशी कृषी ही संस्था होती ऋषी ही संस्था होती आणि तीन प्रकारचे ऋषी त्यांच्यात वावरत होते पहिले ऋषी ब्रह्मर्षी हे ब्रह्माची साधना करत होते राजर्षी हे राज्य चालवता चालवता शासन चालवता चालवता संरक्षण करता करता मोक्षाची साधना करत होते ब्रह्माची साधना करत होते यांचा प्रामुख्याने सूर्य हा शिवलिंग आहे यावर विश्वास होता आणि तिसरे महर्षी हे प्रामुख्याने म्हशी व गाई सांभाळत पशुपालन करत होते आणि हे करता करताच मोक्षाची साधना करत होते 


या तिघांनाही अतिशय चांगला मान होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे 


कश्यप असोत कि सुवास (दुर्वास )असोत की कणव असो हे शंकराचे शिवाचे उपासक आहेत त्याचे कारण तेच आहे 


सिंधू संस्कृतीनाशामध्ये त्यांचाही बहुदा पूर येऊन विनाश झाला असावा आणि ते हिमालयाच्या आश्रयाला गेले असावेत 


त्या उलट बहुतांशी होमो आफ्रिकन लोकांनी जंगलाचा रास्ता पकडलेला दिसतो तर होमो इंडियन मात्र दक्षिण भारतात येऊन पुन्हा सेटल झालेले दिसतात 


भारतीय शैव संस्कृती ही होमो आफ्रिकन आणि होमो इंडियन या लोकांनी जन्माला घातलेली आहे 


श्रीधर तिळवे नाईक


भारताच्या इतिहासात हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि आरंभीचा कालखंड आहे शंकर ही व्यक्तिरेखा ऐतिहासिक मानावी की काल्पनिक मानावी हा एक फार मोठा प्रश्न इतिहासकारांच्या पुढे उभा टाकतो नंतरच्या काळामध्ये शंकराचे संपूर्ण दैवतीकरण शक्य झाले आणि त्याची सांगड रुद्र ह्या वैदिक देवतेशी घालण्यात वैदिक लोकांना आणि विशेषत: ब्राह्मण धर्मीयांना कमालीचे यश मिळाले मुख्य म्हणजे शैव-धर्मातले पंडित लोक हेच ब्राह्मण झाल्याने हा सगळा खटाटोप यशस्वी झाला असे आता स्पष्ट दिसते याबाबतीत तुलनाच करायचे असेल तर येऊ दे धर्मातील सर्व पुरोहित नंतर ख्रिश्चन होत गेले आणि युरोपमध्ये ख्रिश्चन एटी प्रस्थापित होत गेली तसेच काहीसे शंकराच्या बाबतीत झालेले दिसते आणि याचा प्रभाव असा झाला परिणाम असा झाला की शंकर हा माणूस राहिला नाही देव झाला वास्तविक शंकराने प्रतिपादित केलेली जे तत्व होते ते शिवतत्व होते आणि शक्ती तत्व होते दोन तत्त्वांच्या मधून संसार निर्माण होतो आणि या संसाराचा प्राण म्हणजे ईश्वर हा प्राण प्रत्येक जीवाच्या ठायी थोडा थोडा येतो कारण तो मीतींनी बांधला जातो हा बांधला गेलेला प्राण मोक्ष मिळवू शकतो आणि त्यासाठी 114 तंत्र शंकर आणि सांगितलेली दिसतात भगवान शंकरांनी सांगितलेली दिसतात 


रुद्राने असे कुठलेही तंत्र ऋग्वेदामध्ये सांगितलेले दिसत नाही याचे कारण त्याला ते माहीतच नव्हते मुळात ब्राह्मणांनाच अनेक ऋषींना अशा प्रकारच्या तंत्राची शक्यता फारशी दिसत नव्हती त्यांचा तंत्र श्रुतीशी परिचय नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे मात्र आज ना उद्या आपणाला भारतातल्या स्थानिक लोकांनी डेव्हलप केलेला हा तंत्रश्रूतीचा पर्याय आत्मसात करावा लागेल याची जाणीव मात्र वैदिक लोकांच्या ठाई दिसते 


शंकराच्या भवती जे गण होते त्यांची नावे वारंवार वारंवार येत असतात याचे कारण हे सर्व गण त्याच्या काळामध्ये समाज झालेले दिसत नाहीत समाज ही नंतरची अवस्था आहे गण या शब्दाचा अर्थच गणता येतील मोजता येतील अशा माणसांचा समुदाय असा होतो हे समुदाय त्या काळामध्ये फार आकाराने मोठे नव्हते आणि त्यांना पशुपालन येत असावे जवळजवळ संपूर्ण जम्बुद्वीपातुन शंकराकडे गण आकर्षित झालेले दिसतात यामध्ये नाग आहेतच पिशाच्च आहेतच भूत आहेत मार आहेत जे महाराष्ट्रातून आले होते आणि जे शैव झाल्यानंतर मारहर झाले आणि ज्यांना बौद्ध वाङ्मय शत्रू म्हणून बघत होते कारण बुद्धाला त्याच्या मार्गापासून पद्धत करणारे म्हणून सातत्याने मारचा उल्लेख आलेला दिसतो येथे मार आहेत जे दक्षिण भारतात आलेले नव्हते तर उत्तर भारतातच प्रामुख्याने जंगलात स्थलांतरित झाले होते आणि बुद्ध हा तंत्र श्रुतीच्या ठाम विरोधात आहे याची त्यांना खात्री होती त्यांनी नेमके काय युक्तिवाद केले हे आता पुढे येत नाही याचे कारण त्यांना बौद्ध वाङ्मयांनी विलन करून टाकलेले आहे आणि सैतान बनवलेले आहे महाराष्ट्रात आलेल्या मार लोकांना मात्र नंतर महाहर व मरहर पुढें मरहट शेवटी मराठा अशी नाव पडत गेली ब्राह्मण ग्रंथांमध्ये शेवटी त्यांचा उल्लेख पिशाच्च म्हणजे पैशाचि भाषा बोलणारे असा झाला हीच गोष्ट नागांच्या विषयी बोलता येते सिंधू संस्कृतीतले अनेक नाग हे दक्षिणेत सुद्धा परतले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे प्रमाण फार मोठे होते अथवा आहे शिवाय गौड अथवा गोंड हे सुद्धा असेच बांगलादेशात आणि आजच्या पश्चिम बंगालात गेलेत अफगाणिस्तानात असलेल्या गोंड जमातीतून पुढे ज्यांना आजकाल गौड सारस्वत ब्राह्मण म्हटले जाते ते पंडित म्हणून आणि पीडित म्हणून गोव्यासारख्या ठिकाणी आलेले दिसतात कोकणच्या किनारपट्ट्या ह्या त्यांच्यामुळे गजबजलेल्या होत्या आणि हे सर्वशैव होते त्यांच्यात आणि इथे मूळ असलेल्या शांभवी पंडितांच्यात सोयरिकी झाल्या पुढे हे दोघेही गौड सारस्वत ब्राह्मण आणि शांभवी ब्राह्मण झाले आणि शेवटी आता ते सर्वच गोड सारस्वत ब्राह्मण झालेले आहेत आपण गौड गोंड समाजाचे पंडित होतो हे सांगायचीहो या लोकांना आता लाज वाटते याशिवाय पंचद्रवीड देशस्थ वगैरे वगैरे पंडित होतेच जे मूळचे दक्षिण भारतीय होते सिंधू संस्कृतीतून वागेलाही आणि ज्यांना आज गुरुदेव म्हटले जाते तेही गुर्जर म्हटले जाते तेही स्थलांतरित झालेले दिसतात गुजरात हे नाव नंतरचे आहे हा प्रदेश प्रामुख्याने लाट म्हणून ओळखला जात होता आणि त्याचे मूळ कारण मी मागे सांगितल्याप्रमाणे हे सर्व पणी आणि वाणी होते यातले अनेक जण मूळचे कोळी समाजातले आहेत पण नावाज अशा जशा विकसित होत गेल्या तशा तशा व्यापार करायला लागल्या आणि त्यातूनच व्यापार करणाऱ्या कोळी लोकांना पुढे पणी असे नाव मिळाले कारण ते पाण्यावरून जहाजे चालवत हे तेच लोक आहेत जे नंतर फिनिशन म्हणून युरोपमध्ये ओळखले जाऊ लागले फिनिशियन हा पणी या शब्दाचा अपभ्रंश आहे ज्यांना आजकाल आपण ज्यू लोक म्हणतो ते प्रामुख्याने सिंधू संस्कृतीतून स्थलांतरित झालेले पणी लोक आहेत पिरॅमिड बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना कसे मिळाले आणि मुसा त्यांचा कसा नेता झाला हा एक फार मोठा प्रश्न आहे सतत स्थलांतर करणे स्वभावात असल्याने आणि व्यापार करणे हेही स्वभावात असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचा एक प्रदेश निर्माण केला आणि त्यातूनच एक स्वतंत्र संस्कृती जन्माला घातली या संस्कृतीच्या केंद्रस्थानी आजही व्यापार आहे या पाणी लोकांच्या पेक्षा थोडे वेगळे वंजारी आणि वंजारी होय हेही व्यापारी लोक आहेत मात्र हे प्रामुख्याने वनातून व्यापार करतात आणि जंगलातील सामानाचे व्यापारीकरण त्यांनीच घडवले पुढें त्यांच्यातूनच कसे जिप्सी निर्माण झाले हा एक वेगळा इतिहास आहे शंकराच्या काळामध्ये पणे हे प्रामुख्याने कोळी होते आणि त्यांचा उल्लेख सतत येतो निहाल आणि कोरकू हेही प्रामुख्याने वेगवेगळ्या गणात होते पुढे त्यांची ओळख स्वतंत्र बनत गेली आंध्र कर्नाट ज्यात महाराष्ट्र ही येतो तमिळ अशा तीन संस्कृती दक्षिण भारतात नांदत होत्या तमिळमध्ये नंतर दहाव्या शतकात फूट पाडून केरळ वेगळा काढला गेला हीच गोष्ट कर्नाट मधून महाराष्ट्र वेगळा काढला गेला अन्यथा दक्षिणेकडशी राज्य ही अनेकदा या सगळ्याच प्रदेशांमध्ये विशेषतः आंध्र आणि कर्नाट घुमताना दिसतात या सर्व प्रदेशांमध्ये हत्ती हा फार महत्त्वाचा प्राणी होता आणि तो शहाणपणासाठी प्रसिद्ध असल्याने या लोकांचा कुलक होता गुजरात कर्नाट किनारा हा अपरांत प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता आणि त्याच्यावर कोळी आणि पणी यांचे वर्चस्व होते आजही या दोन्ही वर्गाची संख्या या किनाऱ्यांच्यावर लक्षणीय प्रमाणावर आहे अगदी गोव्यात सुद्धा पणी लोकांची संख्या 23 टक्के आहे 


सिंधू संस्कृतीवर नेमकी कोणती आपत्ती आली हे आजही माहीत नाही मात्र युरेशियन लोक जेव्हा आले तेव्हा त्यांना संपूर्णपणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिकामी जागा उपलब्ध झाली सिंधू लोकांनी मागे सोडलेली नगरे ज्यांना पूर म्हटले जाते त्यांना आयती मिळाली मात्र ती कशी वापरायची याचे ज्ञान त्यांच्याकडे नव्हते त्यांचा मुख्य देव इंद्र म्हणजेच पाऊस याने ही नगरे पुरे बुडवली म्हणून ते इंद्राला पुरंदर म्हणू लागले त्यामुळे अनेकदा प्रचंड पाऊस पडल्याने सिंधू संस्कृती नष्ट झाली का असा प्रश्न निर्माण होतो सिंधू संस्कृतीवर इंद्राचे आक्रमण हा आपल्याकडच्या लोकांचा अत्यंत आवडता विषय आहे आणि त्यातूनच मग इंद्र नावाच्या कुठल्या आर्याने इथल्या लोकांच्या वर विजय मिळवला अशी दंतकथा तयार होऊ लागली प्रत्यक्षामध्ये पावसाने सिंधू संस्कृतीचा केलेला सत्यानाश असा त्याचा खरा अर्थ आहे इंद्राने म्हणजेच पावसाने आयतीच आपल्याला ही सर्व रिकामी जागा दिली म्हणूनच त्याची प्रार्थना करणे आणि त्याचे मुख्य देव होणे अटळ बनत गेलेले दिसते त्याचबरोबर या पावसाचा आपल्यावर कोप होऊ नये म्हणून या इंद्राचा आपल्यावर कोप होऊ नये म्हणून त्याची सतत प्रार्थना करणे हे वेदांच्या मध्ये वारंवार घडताना दिसते कारण एक संपूर्ण संस्कृती कदाचित रशियात सुद्धा आणि मंगोलिया मध्ये सुद्धा पावसामुळे बुडली गेलेली असू शकते आणि तिथून हे लोक जेव्हा आले तेव्हा त्यांना आयतीच रिकामी जागा भेटली आणि ती प्रचंड होती त्यामुळे त्यांना ही आपल्याला इंद्राने दिलेली भेटच वाटली असणार साहजिकच मग स्वतःच्या राजालाही ते पुढे इंद्र म्हणू लागले आणि राजाची स्तुती करणारे लिखाण हे सुद्धा इंद्राला धरून होऊ लागले राजा हा इंद्राचा अवतार असल्यानेच अनेक इंद्र झालेले दिसतात मात्र दुर्दैवाने वैदिक राजांच्याकडे म्हणजे इंद्राकडे कसलीही नैतिकता होती असे दिसत नाही त्यामुळेच भोगविलासात मग्न असणे असेच काहीसे त्यांच्या राजवटीचे स्वरूप दिसते आणि त्यांना नैतिकता कशी प्रदान करावी हा फार मोठा प्रश्न वैदिक श्रद्धे मधल्या ऋषीमुनींना वाटत होता असे दिसते मुळात पाऊस हा चंचल साहजिकच इंद्रामध्ये पावसाचा सगळा चंचलपणा दिसतो आणि अनेकदा इंद्र म्हणजे पाऊस आणि भूमी यांच्या संबंधांना व्यक्तिगत रुपे दिली गेलेली दिसतात इंद्राच्या या पावसाळी रूपाला लक्षात न घेता त्याला मनुष्य समजून त्याच्या अंगाने आर्यांचा इतिहास लिहिणारे लोक शब्द कशा तयार होतात याविषयी अनभिज्ञ असतात ज्याप्रमाणे वैष्णव-धर्मामध्ये नंतर राजा विष्णूचा अवतार झाला आणि त्यांचाच प्रभाव पडून पुढे सर्व लोकांनी सुद्धा राजा हा शिवाचा अवतार असतो असे म्हणायला सुरुवात केली त्याचप्रमाणे वैदिक श्रद्धेमध्ये राजा हा इंद्राचा अवतार होता अनेकदा तर साक्षात इंद्र होता आणि ऋषी लोक त्याची चाकरी करत होते की काय अशी शंका येते ऋषी लोक आणि इंद्र यांच्यामध्ये सातत्याने झगडे चाललेले दिसतात कारण इंद्रधर्माप्रमाणे वागावा अशी ऋषींची अपेक्षा होती ती फारशी फळलेली दिसत नाही 


मुळात एक प्रश्न असाही आहे की ज्या गोष्टीमुळे उत्तरेकडची सिंधू संस्कृती ही दक्षिणेकडे सरकली त्याच कारणामुळे उत्तरेकडे म्हणजेच रशियाच्या स्टेप भागात किंवा मंगोलिया भागात असलेले लोक दक्षिणेकडे म्हणजेच हिमालयाकडे सरकले नाहीत ना ? शक्यता अशी आहे की हिमालय पार करत हे लोक तिबेट पार करत आहे लोक भारतामध्ये उत्तर प्रदेश बिहार झारखंड वगैरे प्रदेशात सेटल झाले आपल्याकडे अनेकदा वायव्य कडूनच लोक आले असे गृहीत धरले जाते शक्यता अशी असू शकते की तिबेट कडून सुद्धा युरेशियन लोक आले आणि कदाचित याच लोकांना नंतर आर्य अशी ओळख मिळाली त्यांचा संकर इथल्या नागवंशाशी झाला नाग समाजाशी झाला नाग संस्कृतीशी झाला गौतम बुद्ध हा दिसावयाला नागवंशी वाटतो याचे कारण सुद्धा कदाचित तिबेट मधून येणे असावे याच प्रदेशांमध्ये आर्य या शब्दाचा अर्थ सभ्य असावा त्या उलट इराणकडून सरकत आलेले युरेशियन लोक स्वतःला आर्य म्हणवून घेत त्याचा अर्थ भटके असा असावा 


मी मागेच एका लेखात म्हटल्याप्रमाणे युरेशियन तीन प्रकारचे आले आणि त्यांचा संपर्क हिमालयाची पायथ्याशी असलेल्या ब्रह्म गणाशी आला जो शंकराच्या काळापासूनच हिमालयाच्या पायथ्याशी राहत होता आणि याच गणा मधल्या पार्वतीशी त्याचा विवाह झाला त्यामुळेच अनेक गौरवलोक हे भारता मधले एतदेशीय लोक आहेत आणि जे अधिकाधिक उन्हात हिंडले ते पिवळे होत गेले त्यांच्यातूनच नागवंश तयार झाला दक्षिणेकडचे नाग मात्र रंगाने सावळे आणि काळेच होते त्या उलट पूर्वेकडचे नाग हे वर्णाने पिवळे दिसतात आणि सर्वच नाग हे हत्तीचे पूजक होते आणि ते राजाला सुद्धा हत्तीच्या रूपातच हत्तीसारखे शहाणपण असलेल्या रूपातच पाहत होते आणि त्यातूनच गणपतीचे नंतर हत्तीवर बसलेला नायक हे रूप तयार होत गेले पुढें मग पंडितांच्या मधल्या ब्राह्मण झालेल्या लोकांनी हा चेहरा पूर्णपणे हत्तीचा करून टाकला 


थोडक्यात काय शैवपुर्व समाज हा नक्कीच अनेक जणांचा बनलेला होता गणांचा बनलेला होता तो साधारणपणे सिंधू संस्कृतीमध्ये समाजप्रधान बनत गेलेला दिसतो मात्र गणराज्य अस्तित्वात होती अचानकपणे आलेल्या नैसर्गिक संकटामुळे बहुदा प्रचंड पुरामुळे (पूर हा शब्द सुद्धा प्रामुख्याने पाण्याचा लोंढा जो पूर वेढून टाकतो बुडवून टाकतो या अर्थाने आलेला आहे) युरोपच्या दिशेने गेली जंगलाच्या दिशेने गेली इराणच्या दिशेने गेली आणि दक्षिण भारताच्या दिशेने गेली 


यामुळे आयता भूप्रदेश युरेशिशन लोकांना प्राप्त झाला आर्यांचा तथाकथित संघर्ष व त्यांनी केलेली युद्धे हा प्रत्यक्षात फार मोठा संघर्ष नव्हताच बहुदा अफगाणिस्तानांमध्येच हा संघर्ष झालेला असावा भारतामध्ये तो कितपत झाला हा एक प्रश्न आहे 


श्रीधर तिळवे नाईक


भगत विरुद्ध पंडित जागतिक इतिहासातला एक अपरिहार्य संघर्ष श्रीधर तिळवे नाईक


जगाच्या इतिहासातले जे काही संघर्ष अस्तित्वात होते आणि आता सुद्धा आहेत त्यातील एक संघर्ष म्हणजे भगत आणि पंडित यांच्यातला संघर्ष!


भगत म्हणजे जे श्रद्धेच्या आधारे स्वतःच्या टोळीची संपूर्ण व्यवहार प्रणाली चालवायला पाहतात असे लोक! हेच पुढे धर्म ही निर्माण करतात जेणेकरून श्रद्धा केंद्री व्यवहार प्रणाली कायदेशीर व्हावी . युरोप मधला रोमन कॅथोलिक धर्म आणि भारतामधला ब्राह्मण धर्म हा यांचीच देणगी आहे 


भारताच्या इतिहासामध्ये हा सर्वात आदिम संघर्ष आहे याची कसलीही दखल भारतीय इतिहासकार घेत नाहीत 


हा संघर्ष प्रामुख्याने भगवान शंकर यांच्या कालखंडामध्ये निर्माण झाला त्याचे कारण अतिशय उघड होते शिवपूर्व कालखंडामध्ये भारतीय अर्थात इंदवी वा सिंधवी वा हिंदवी लोकांच्या मध्ये शिवपूर्व काळामधले काही भगत हे आपली श्रद्धा सोडायला तयार नव्हते या भगतांना साधारण वेगवेगळी नावे होती त्यांना आपल्या टोळ्यांच्या वर असलेले वर्चस्व सोडायचे नव्हते साहजिकच त्यांनी कधीही शैव तंत्र श्रुती स्वीकारली नाही त्याऐवजी ते फक्त टोळीमध्ये चालत आलेली पंचमहाभूतांचीच पूजा करत राहिले आणि या पंचमहाभूतांच्या वर आपले वर्चस्व आहे असा आव आणत राहिले या लोकांच्या मधूनच पुढे ब्रह्मदेव पुढे आले आणि त्यांनी शैव धर्म स्वीकारला भगवान शंकरांनी त्यांना ब्रह्मसूत्रे दिली जी आजही प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याच आधारे नंतर अनेक ब्रह्म उपनिषदांचा उदय झाला 


परंतु ब्रह्मदेवाला आणि मोक्षाला नकार देणाऱ्या भगतांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी होती ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली अनेक भगतांनी शैवधर्म स्वीकारला मोक्ष स्वीकारला परंतु उरलेल्या भगतांच्या पैकी काहीजणांनी शैव धर्म स्वीकारायला संपूर्ण नकार दिला आणि होमो हिमालयन लोकांच्या मध्ये ब्राह्मण आणि पंडित अशी फूट पडली ज्यांनी शैव धर्म स्वीकारला ते पंडित झाले आणि ज्यांनी शैव मोक्ष स्वीकारला नाही आणि त्याला विकृत करण्यामध्ये धन्यता मांडली असे हॅलो पुढे ब्राह्मण झाले. ब्रह्म विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष त्यांनी उभा केला आणि ब्रह्मदेवांची जितकी बदनामी करता येणे शक्य होते तितकी वेगवेगळ्या कथांच्या मधून केली


या भगत लोकांना इराण मधून आणि अफगाणिस्तान मधून आलेल्या स्थलांतरित टोळ्यांच्या भगत लोकांनी साथ दिलेली दिसते. 


हे सर्व संधी साधू आणि टोळ्यांच्या वर श्रद्धा केंद्री प्रभुत्व चालवू इच्छिणाऱ्या लोकांनी स्वतःचा एक संघ निर्माण केला आणि त्यातूनच आजचे सर्व भगत ज्यामध्ये सामावले जातात अशा भगत लोकांचा ब्राह्मण नावाचा एक पूर्ण स्वतंत्र वर्ण तयार झाला हा वर्ण स्वतःला पूर्ण वेगळा ठेवत होता स्वतःची ओळख शाबूत ठेवत होता आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत होता त्यासाठीच त्यांनी स्वतंत्र वर्णव्यवस्था निर्माण केली जी जन्मदत्त होती त्यासाठी या लोकांनी पुढे ब्राह्मण धर्म नावाचा धर्म निर्माण केला जो श्रद्धेवर आधारित होता त्यांनी वर्ण व्यवस्थेची संकल्पना ही इराण मधून आलेल्या लोकांच्याकडून स्वीकारली जी युरेशियन लोकांनी फार आधीपासून मांडली होती कारण त्यांच्याकडे ती प्राचीन काळापासून होती ही बहुदा स्टेप मध्येच उदयाला आलेली होती कारण रोमन साम्राज्यात सुद्धा हे लोक कर्म दत्त वर्ण संकल्पना घेऊन गेलेले दिसतात . मात्र युरोपमध्ये रोमन साम्राज्यात राबवताना तिथेही गुलाम वेगळे आणि उच्च वर्ण वेगळे अशीच वस्तुस्थिती दिसते एकंदरच युरेशियन लोकांना वर्णव्यवस्था संपूर्ण जगात आणायची होती असेच दिसते 


भारतातल्या भगत लोकांनी व्हाया इराण मधून आलेली ही संकल्पना आत्मसात केली आणि स्वतःला सर्वोच्च म्हणून घोषणा केली त्यांच्या या ब्राह्मण ओळखीमध्ये इराण आणि अफगाणिस्तानातून आलेले भगत लोक सुद्धा सामील होते 


यामुळे होमो हिमालयनमध्ये आपणाला पुरोहित वर्गामध्ये पंडित , ऋषी आणि नंतर नव्याने उदयाला आलेले ब्राह्मण भगत दिसतात शंकरांचा सर्वच टोळ्यांच्या मधल्या भगतांशी सामना झालेला दिसतो कारण हे भगत इतके टोळीवादी होते की त्यांना पार्वतीचा विवाह शंकराशी व्हावा हे मंजुर नव्हते त्यांनी हिमालयावर प्रेशर टाकून आणि भडकवून या लग्नाला कट्टर विरोध केलेला दिसतो शेवटी पार्वतीने आपला गण सोडला आणि ती शंकराच्या पाठोपाठ आली हे लक्षात घेण्याजोगे आहे. आता शक्ती किंवा दुर्गा म्हणून तिची पूजा करणारे भगत त्या काळात मात्र शंकराच्या व पार्वतीच्या कट्टर विरोधात होते पार्वती आणि शंकर यांचा विवाह हा भारतामधल्या अंतरगणीय लग्नाचा प्रारंभ आहे आणि सुदैवाने हा इतिहास दंतकथेच्या रूपात का होईना परंतु आपल्याकडे उपलब्ध आहे इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या दंतकथेची सुद्धा उपलब्धी नाही शैव लोकांनी मौखिक परंपरेद्वारा हा इतिहास टिकवलेला दिसतो पुढे मग कालिदासाने कुमार संभवम नावाचे नाटकच लिहून हा इतिहास अत्यंत तपशीलवार पणे परंतु काव्यात्मक पातळीवर सादर केला जो पुढे महाभारताने स्वतःमध्ये सामावून घेतला 


भारतीय ब्राह्मण ही कधीही एका टोळीची किंवा एका गणाची व्यवस्था नव्हती ज्यांना शैव आणि मोक्ष मान्य नव्हता ज्यांना तंत्र श्रुती मान्य नव्हती अशा लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले ते एक सातत्य होते जे आजही टिकलेले आहे हे लोक मूळचे भगत आहेत आणि या ना त्या कारणाने लोकांना श्रद्धेच्या आणि भ्रमाच्या आधारे आपल्या नादाला लावायचे आणि आपले साम्राज्य आपले राज्य आपली सत्ता टिकवायची इतका साधा या लोकांचा अजेंडा आहे जो आजही तितक्याच प्रभावीपणाने राबतांना दिसतो याच लोकांनी पुढे वासुदेव धर्मातून भागवत म्हणजेच भगतांचा धर्म निर्माण केला आणि त्यातूनच पुढे वैष्णव धर्म निर्माण केला याच लोकांनी पुढे या तीन धर्मात शैव धर्माचे सगळे आशयबिंदू सामावून घेऊन हिंदू धर्म निर्माण केला आणि भारताचा इतिहास म्हणजे युरेशियन लोकांचे सातत्य झाला हे लोक जे स्वतः हिमालयाच्या पायथ्याशी राहत होते किंवा युरेशियन म्हणजेच रशिया, मंगोलिया वगैरे मधून आले होते स्वतःला युरेशियन आर्य म्हणवून घेऊ लागले हे आश्चर्यकारकच आहे पण यांच्यामध्ये मुळातच इराण आणि अफगाणिस्तान मधून आलेल्या भगत असलेल्या पण नंतर ब्राह्मण झालेल्या ब्राह्मण लोकांची संख्या इतकी प्रचंड होती की हळूहळू हे लोक स्वतःलाही परकीय मानू लागले यानंतर शैव-धर्मातून जे पण युरेशन धर्मात (पंडित )लोक गेले तेही स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले विशेषता ज्या लोकांना शैवधर्मीय लोकांनी आपल्या घरामध्ये किंवा टोळीमध्ये किंवा राज्यामध्ये स्थान दिले होते परंतु जे बाहेरून म्हणजे ग्रीस मधून आले किंवा इराण मधून हाकलले गेले त्या सर्वांनी शैव लोकांशी द्रोह करून स्वतःला ब्राह्मण म्हणून घोषित केले सर्वसाधारणपणे गौर रंग हीच या सगळ्या बंडखोरांची कसोटी होती की काय अशी आता शंका येते त्यामुळेच गोऱ्या रंगाला सर्वश्रेष्ठ रंग मानण्याची आणि त्याला प्रमोट करण्याची स्पर्धा अशा लोकांच्यात लागलेली दिसते दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुजन समाजातल्या लोकांनी हा गोरा रंग श्रेष्ठ मानायला सुरुवात केलेली दिसते हा मूर्खपणा आहे हे सांगायला नकोच परंतु स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड पाडून घेण्यामध्ये बहुजन समाज नेहमीच एक्सपर्ट असतो 


प्रथम भगत असणे हे जवळजवळ जगातल्या सर्व टोळ्यांच्या मध्ये कॉमन दिसते अगदी दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकेतल्या टोळ्यांच्या मध्ये सुद्धा आपणाला भगत त्या त्या टोळ्यांच्या परंपरेनुसार त्यांच्या फॉर्ममध्ये दिसत असतात आणि ते श्रद्धेवरच संपूर्ण टोळी चाल वत असतात श्रद्धे कडून धर्माकडे अनेकदा टोळ्यांची वाटचाल झालेली दिसत नाही आणि याला अपवाद फक्त पणी व पशुपालक लोकांच्या टोळ्या दिसतात याच लोकांनी जगामध्ये सुरुवातीला धर्म निर्माण केले आणि त्यांच्या या धर्माची कॉपी मारत पुढे भगतांनी भारतामध्ये ब्राह्मण धर्म निर्माण केला 


भगतांनी हे शत्रुत्व का घेतले ? स्पष्टपणे सांगायचे तर या लोकांना पशुपालन व्यवस्था सोडायची नव्हती त्यांच्या दृष्टीने भूमी पवित्र होती आणि तिच्यामध्ये नांगर घुसवणे किंवा तत्सम काही घुसवणे हा पृथ्वी मातेचा अपमान होता बायबल मध्ये या प्रोसेसची संपूर्ण कहाणी आलेली आहे आणि ज्युड्याईक लोकांच्या देवाने शेतीच्या विरोधात कौल दिलेला आहे (adam पुत्र केन Cain आणि Able एबल यांची ही कथा कथा आहे जिथे देव एबलला व त्याच्या बळीला स्वीकारतो जो मेंढपाळ असतो याउलट केन ला नाकारतो त्याचा बळी नाकारतो रागाने केन टेबल ची हत्या करतो हा खून आहे आणि अनेकांच्या मते हा पहिला खून आहे फार प्रतिकात्मक पाहिले तर हा पशुपालनाचा खून आहे आणि पशुपालनाच्या प्रेतावर शेती उभी राहिली याचे प्रतिक आहे ) साहजिकच जो पाऊस पडतोय त्याच्या आधारावर पशुपालन करावे आणि जो पाऊस पाडतोय तो इंद्र किंवा ती मातृशक्ती हिच्या हिशेबाने चालावे असाच या लोकांचा आग्रह होता ते शेतीच्या विरोधात होते याउलट पंडित जे होते त्यांना शेतीमध्ये जबरदस्त रस होता (भारतातल्या अनेक पंडितांच्या घरी आज सुद्धा शेतजमीन दिसते शेती बाबतचा उत्साह पंडित लोकांचा आजही संपलेला दिसत नाही)साहजिकच पशुपालना बरोबर शेती असे समीकरण सर्व लोकांनी डेव्हलप केले आणि पंडित लोकांनी त्याचा विस्तार करण्यामध्ये वैचारिक भूमिका निभावली साहजिकच जगात सर्वत्र भगत हळूहळू पराभूत होत गेले आणि सर्व जगाने शेती स्वीकारली असे दिसते जिथे हे घडलेले नाही तिथे मात्र भगतांचे साम्राज्य त्या त्या टोळीवर दिसते विशेषतः आफ्रिकेमध्ये शेती जितकी डेव्हलप व्हायला हवी होती तितकी झालेली नाही कारण तिथे भगत लोकांचे आणि टोळ्यांचे प्रचंड वर्चस्व आहे 


भारतीय इतिहास लिहिताना विशेषता प्राचीन इतिहास लिहिताना आपणाला भगत विरोधात पंडित हा इतिहास लक्षात घेणे आवश्यक आहे जे योद्धे होते त्यांना मात्र पंडितांना पाठिंबा देणे आवश्यक वाटले त्यामुळेच पंडित आणि योद्धे एकत्र आलेले दिसतात आणि म्हणूनच ते विजयी झालेले दिसतात जगात सर्वत्र भगतांचे ट्रान्सफॉर्मेशन हे पंडितांच्यात झालेले दिसते आणि याच पंडितांनी नंतर विद्वत्तेची परंपरा चालवलेली दिसते युरोपच्या इतिहासात सुद्धा स्कॉलॅस्टिक ट्रॅडिशन ही पंडितांनीच निर्माण केलेली आहे किंबहुना ग्रीक लोकांच्या धर्मामध्ये सर्वात प्रथम जी उलथापालच झाली ती भगत विरुद्ध पंडित ज्यांना फिलॉसॉफर म्हटलं जात होते यांच्यामध्येच झालेली आहे इथे पंडितांना फिलॉसॉफर असे म्हटले गेले आणि या फिलॉसॉफर लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केलेला दिसतो ग्रीक लोकांचा पहिला फिलॉसॉपर हा पणी फिनिशियन होता हा योगायोग नाही कारण पंडित हे मुळात पणी लोकांचेच पुरोहित होते 


फिलॉसफर लोकांनी पारंपारिक ग्रीक श्रद्धे विरोधात प्रचंड मोठा उठाव केला आणि त्यातूनच सॉक्रेटीस ते ॲरिस्टॉटल अशी एक प्रचंड पंडिती परंपरा तिथे निर्माण झालेली दिसते जी पुढे विस्तारत राहिली अर्थातच ज्याप्रमाणे भारतामध्ये ब्राह्मण धर्माने उठाव केला आणि इथल्या पंडित लोकांना पराभूत केले त्याचप्रमाणे ग्रीक लोकांच्या सुद्धा रोमन कॅथोलिक धर्म अत्यंत पद्धतशीरपणे निर्माण करण्यात आला विशेषता फिलॉसफर लोकांनी कळत नकळत लोकशाहीच्या अंगाने विचार करायला सुरुवात केली होती आणि लोकशाही येऊ नये असे वाटणारा एक शासक वर्ग युरेशियन लोकांच्यातून स्थलांतरित झालेला युरोप वर्गात होता आणि तो रोमन म्हणजेच युरेशियन होता या युरेशियन लोकांना मात्र ही पंडिती परंपरा नको होती आणि त्यांनी पद्धतशीरपणे ती आत्मसात करत रोमन कॅथोलिक धर्म निर्माण केला जो ब्राह्मण धर्मापेक्षा फार काही वेगळा नव्हता सगळीच्या सगळी श्रद्धेच्या आधारावरची कर्मकांडे ही रोमन कॅथोलिक धर्मामध्ये होती आणि इथे सुद्धा युरेशियन परंपरेनुसार राजा हा देवाचा अवतार होता ज्याप्रमाणे भारतामध्ये मूळशैवधर्म आदीशैव धर्म गाडला गेला किंवा काढण्याचा प्रयत्न केला गेला त्याचप्रमाणे रोममध्ये सुद्धा मूळ ख्रिश्चन धर्म गाडला गेला जो लोक धर्म बनला होता हा लोकधर्म भगतांनी पूर्णपणे ताब्यात घेऊन त्यातून आपला धंदा चालवला जो आजही चालू आहेच 


जगाच्या इतिहासाचे आकलन व्हायचे असेल तर आपणाला दोन संघर्ष नेहमीच लक्षात घ्यावे लागतात पहिला संघर्ष हा पशुपालक विरुद्ध शेती यांच्यातला आहे तर दुसरा संघर्ष हा भगत विरुद्ध पंडित असा आहे जगात तो सर्वत्रच अवतरताना दिसतो अलीकडच्या काळामध्ये आफ्रिकन tribes मध्ये सुद्धा पंडितांचा उदय होताना दिसतो आहे आणि आज ना उद्या तिथे हे पंडित लोक तिथल्या भगतांच्या विरोधात बंड करणाऱ याबद्दल माझ्या मनात शंका नाही


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना