इतिहासाचा इतिहास , फिनामिनॉलॉजी, उत्तर आधुनिक इतिहास आणि शैव श्रीधर तिळवे नाईक


शैव लोकांचा इतिहास कसा लिहायचा किंवा कसा लिहिला जात होता आणि पुढे कसा लिहावा हा कायमच सर्व शैव इतिहासकारांच्या पुढचा प्रश्न आहे 

शैव श्रुती मधल्या लोकांच्या मध्ये अनेकदा शंकराचा उल्लेख निळकंठ असा होतो या उल्लेखा मागे नेमके काय आहे याचीही कल्पना सध्या अनेकांना नाही इतके आपण शैव परंपरेपासून तुटलेलो आहोत समुद्रमंथनाच्या दंतकथेत गटांगळ्या खात आहोत

नीलकंठ याचा अर्थ आहे इतिहास कंठीत करणारा ! त्यामुळेच युवान श्र्वांगच्या प्रवासवर्णनामध्ये इतिहास सर्व प्रादेशिक राजवटी जतन करत असल्याचा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ आपणाला कळत नाही त्याच्या प्रवास वर्णनामध्ये प्रादेशिक राजवटींनी लिहिलेल्या इतिहासाचा  उल्लेख निलपिठ असा येतो आणि तो शंकराच्या नीलकंठावरून आलेला आहे मौखिक परंपरे कडून लिखित निळ्या पत्रांच्यावर इतिहास या काळात शि फ्ट झालेला आहे लिहिला गेलेला आहे आणि त्यांना हे निल पत्र किंवा निलपीठ म्हटले जात असे असो युरोपियन देशांमध्ये सुद्धा ब्लू डॉक्युमेंट्स हा शब्द आहेच आता इकडून तिकडे गेले की तिकडून इकडे गेले असा वाद निर्माण करता येतो पण त्याला काही फार अर्थ वगैरे अस वाटत नाही 

एक गोष्ट नक्की आहे शैव लोकांच्या मध्ये इतिहास आणि पुराने या दोन गोष्टी वेगळ्या मांnल्या जात होत्या 

पुढें हिंदवी लोकांच्या मध्ये १००० नंतर सर्वसाधारणपणे दंतकथेच्या स्वरूपातला इतिहास हाच भारतात जास्त प्रचलित झाला होता पण निदान बाणाच्या कालखंडा पर्यंत  तरी गोष्ट वेगळी असावी बाणाच्या कादंबरी या ग्रंथात राजकुमार चंद्रपीड याला जे शिक्षण दिलेले आहे त्यात महाभारत इतिहास पुराण आणि रामायण एवढेच विषय शिकवले जात होते असे दिसते याशिवाय प्रबंध, कहानी यांचाही समावेश दिसतो हे सर्व पौराणिक धर्माचे लक्षण आहे हे तर उघडच आहे आणि पौराणिक धर्मात वाढलेल्या राजकुमारांचे काय होणार ? प्रश्न इतकाच आहे की पुराण आणि इतिहास या दोन गोष्टी वेगळ्या काढलेल्या दिसतात मग हे इतिहास कुठे गेले ? इथे स्पष्टपणे पुराण आणि इतिहास वेगळे काढलेले आहेत 

युरेशियन धर्मात मात्र गोष्टी वेगळ्या झालेल्या होत्या कारण सर्व धर हे श्रद्धेच्या आधारे उभे असतात आणि श्रद्धेला वैज्ञानिक दृष्टिकोन परवडत नसतो त्यामुळे साहजिकच वैष्णव धर्मात उदाहरणार्थ महाभारतात तर एके ठिकाणी इतिहासाचा उपयोग हा वेदार्थ दृढ करण्यासाठी होतो असा उल्लेख आहे आणि भारतातली बहुतेक सर्व पुराने ही वेदार्थ दृढ करण्यासाठीच लिहिली गेली आहेत 

तंत्र श्रुतीमध्ये आपणाला इतिहास वेगळा दिसतो उदाहरणार्थ शैव पंडित कल्हन ने आपल्या इतिहासामध्ये त्याच्यापूर्वी 11 इतिहासाचे ग्रंथ होऊन गेले ते सांगितलेले आहे आणि हे सर्व कश्मीरच्या इतिहासाशी निगडित आहे हे सर्व कुठे गेले आजही समजलेले नाही एक गोष्ट नक्की आहे इतिहास फक्त शैवलोक ,जैन लोक आणि बौद्ध लोकं लिहीत होते तर युरेशियन  धर्मांचा मात्र  पुराण लिहिण्याकडे महाकाव्य लिहिण्याकडेच कल होता त्यामुळेच एक हजार नंतर वैष्णव धर्माचा प्रभाव वाढला तसा आपल्याकडे रामायण आणि महाभारताची पुराणांची भाषांतरे प्रचंड मोठ्या प्रमाणात इतिहास म्हणून होऊ लागली आणि ब्रिटिश काळात तर या भाषांतरांचे प्रमाण प्रचंड झाले कारण सर्व युरेशियन इतिहासकारांना  खात्री पटली होती की ते आर्य आहेत आणि ते जे काही लिहितायेत तो आर्य लोकांचा आर्या वर्ताचा इतिहास आहे  आणि गुलाम मानसिकता झालेले शैव लोक सुद्धा व अशैव लोकही त्यांच्यावर इतिहास म्हणून विश्वास ठेवायला लागले अन्यथा पेशव्यांच्या काळात किंवा यादवांच्या काळामध्ये जी भाषांतरे झाली ते अनेकदा का आपण काव्याची भाषांतर करत आहोत अशाच अंगाने झाली आहे आपण इतिहास सांगत आहोत असा आव कोणी आणलेला नाही

तत्पूर्वी शैव लोकांच्या मध्ये इतिहास हा विद्या होता पण नंतर मात्र त्याचे रूपांतर कलेत झालेले दिसते ६४ कलांच्यापैकी एक कला म्हणजे इतिहास असाही उल्लेख झालेला आहे 

अशोकाच्या सहाव्या शिलालेखात इतिहासकाराचा उल्लेख पत्रिवेत्ता असा येतो आणि अशोकाने राजा म्हणून लोकांना त्याला वृत्तांत सांगण्याची विनंती केली गेलेली आहे जेणेकरून कुठल्याही घटनेची माहिती सरकारकडे जमा व्हावी अशोकापसून ब बौद्ध इतिहास लेखनाचा प्रारंभ होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण अलीकडे मोर्चे मूळचे सोर्सेस न तपासता अजूनही सिंहलीज  सोर्सेस वर वर अवलंबून राहतो आता तिथला महावंश हा ग्रंथ श्रीलंकेत बौद्ध धर्म पूर्णपणे मान्य पावल्यानंतर साधारण सहाव्या शतकानंतर लिहिला गेलेला आहे त्यामुळे त्याच्यात इतिहास किती आणि भाकड कथा किती हा प्रश्न विचारायला लागतो 

हे सर्व इतिहास गेले कुठे? आणि ते फक्त भारतातच कसे नाहीसे झाले ? म्हणजे बौद्ध धर्माचा सर्व इतिहास आज आपल्याला उपलब्ध होतो याचे कारण भारताबाहेरचे रिसोर्सेस आहेत ते तिकडे टिकले पण इकडे टिकले नाही त्याचे कारण काय ? तिबेट किंवा चीन मुस्लिमांना कधीही जिंकता आला नाही त्यामुळे हे घडले का ? या उलट जिथे इंडोनेशिया सारखे देश मुस्लिम झाले तिथलेही इतिहास गायब झालेले आहेत जे स्थलांतरित झाले तेवढेच वाचले आहेत 

मुसलमान आक्रमकानी इतिहास नष्ट केला ही वस्तुस्थिती आहे आपल्या प्रेषिताच्या आधी जगात इतरत्र काही झालेच नव्हते हे सिद्ध करण्यासाठी हे सर्व झालेले आहे मात्र फार काळ हे झाकून ठेवणे शक्य झालेले दिसत नाही  मुस्लिमांनी फक्त लोकांचेच नाही तर इतिहासाचे सुद्धा शिरकाण केलेले आहे ही वस्तुस्थिती पण तिच्याविषयी आजकाल काही बोलले की सगळे पुरोगामी तुमच्यावर तुटून पडतात या देशात मुस्लिमांनी इतिहास मारले पण आणि स्वतःचे इतिहास रचलेपण हे लक्षातच घेतले पाहिजे 

पुरोगामी कालखंडामध्ये मात्र इतिहासाकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आला आणि विज्ञाननिष्ठ इतिहास लिहिण्याची प्रोसेस ही भारतात प्रामुख्याने ब्रिटिशांच्यामुळे उदयाला आली पुढे आधुनिक काळात मात्र इतिहास कसा पाहावा या अंगाने अनेक वादविवाद झालेले दिसतात आधुनिक इतिहास म्हणजे अनेक फिनॉमीनांची किंवा इव्हेंट्सची माळ आणि त्या माळेचे विश्लेषण असे आता म्हणता येते आयुष्य म्हणजे क्षणांचा निरंतर प्रवाह जो अधून मधून शारीरिक विराम घेत असतो आधुनिक इतिहास हा असाच सादर करावा लागतो अशा प्रकारच्या इतिहासातून वर्तमानाकडे लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती वाढते किंबहुना आधुनिक इतिहास हा वर्तमानावर लक्ष ठेवून रचला जातो त्यामुळेच वर्तमानपत्रे महत्त्वाची होत जातात आणि ती सुद्धा इतिहासाची साधने बनतात नाटक आणि चित्रपट महत्त्वाचे होत जातात विशेषता डॉक्युमेंटरीज हे सर्व ज्या गोष्टींच्या mulhe घडले तिला आता आधुनिक फिनामिनोलॉजी जबाबदार होती असे दिसते

फिनॉमिना या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ ऍपीअरन्स ऑफ थिंग्स असा होतो साहजिकच वस्तूंना आपण त्यांच्या drushya  रूपावरून ओळखतो आणि ह्या वस्तू रूपाचं काय चाललेलं असतं त्यावरून आपणाला फिनॉमिनोलॉजी सुचते इथे लक्ष फिनॉमिनाकडे असते साहजिकच सर्व लक्ष हे वस्तूंच्या इसेन्सकडे कमी आणि त्याच्या सरफेसवर जास्त फोकस्ड राहते यातूनच अनेक गोष्टींच्याकडे डाऊन टू अर्थ बघता येते त्यामुळेच आधुनिक फिनॉमिनॉलॉजीचा प्रवर्तक एडमंड हुसेर्ल फिनॉमीनॉचे "टू द थिंग्स देमसेल्वस" असे वर्णन करतो अर्थनिर्णयने लादण्यापेक्षा वस्तू जशा आहेत तसा पाहण्याचा प्रयत्न फिनॉमिनोलॉजी करते इतकेच नव्हे तर वस्तू  खऱ्या आहेत की खोट्या आहेत याचीही ती पर्वा करत नाही वस्तू खोट्या असल्या तरी त्यांची फिनॉमिनोलॉजी होऊ शकते आता आपण खोट्या वस्तूंची फििनॉमिनॉलॉजी पण खोटी असू शकते का असा प्रश्न विचारू शकतो 

विसाव्या शतकात मग फिनॉमिनोलॉजी पुढे जाते आणि अर्थात मग प्रश्न मनुष्याला जर का आपण वस्तू मानले तर मनुष्य हा फिनॉमिना म्हणून काय आहे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो साहजिकच मग फिनोमीनालॉजिकल प्रश्न मनुष्य असण्याचा येतो आपण आहोत being म्हणजे नेमके काय आहोत हा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे असे मार्टिन हायडेगरला त्यामुळेच वाटलेले दिसते युद्धजन्य परिस्थितीत सैनिक अस्तित्वात असतो म्हणजे काय असतो किंवा सैनिक जेव्हा सैन्यात असतो लढत असतो तेव्हा तो काय असतो आणि युद्ध हे त्याच्यासाठी इतर आहे म्हणजे नेमके नेमके काय आहे असे फार मोठेसे त्याला वाटते प्रश्न निर्माण व्हायला लागतात यातूनच मग बौद्धिक आवाज ऐकण्यापेक्षा समोर जे आहे ते जसेच्या तसे स्वतःला एक्स्पोज करेल रिवील करेल आणि ते आपण पाहू अनुभवू असे त्याला वाटते 

यामुळे होते काय की समोरच्या चहावर आणि चहाच्या कपावर लक्ष ठेवत तुम्ही स्वतःची फिलॉसॉफी रचू शकता अर्थात पूर्वी हे काम कवी लोक करायचे उदा ज्ञानेश्वरांचे मोगऱ्याचे फुल पहावे हे सर्व अस्तित्ववादातून आलेले आहे हे तर उघडच आहे किंबहुना अस्तित्व वादाने हेगेलने जन्माला घातलेली पुरोगामी फिनामीनालॉजि आधुनिक केली दैनंदिन जीवनाकडे तात्विक पातळीवर पाहण्याची क्षमता ही या नव्या तत्त्वज्ञानाची पायाभूत किल्ली होती तत्त्वज्ञानाचे मुख्य काम हे ज्ञान आहे त्यामुळे साहजिकच ज्ञानात्मक प्रश्न तत्त्वज्ञानात फार महत्त्वाचे होतात मुख्य म्हणजे ज्ञान कसे होते ? ज्ञान होताना नेमके काय गृहीत धरले जाते? हे गृहीत धरणे ज्ञान या प्रक्रियेवर काय परिणाम करते ? ज्ञानप्राप्तीसाठी प्रयोग करायचे म्हणजे नेमके काय करायचे ?वैज्ञानिक प्रयोग म्हणजे काय ?वैज्ञानिक प्रयोगाने होणारे ज्ञान हे खरोखर खरे ज्ञान असते का की विज्ञानाच्या मर्यादा अनंत देवापर्यंत पोहोचूच शकत नाहीत? मला ज्ञान होताना मला माझे ज्ञान होते का ?हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता आणि जर का मलाच माझे ज्ञान नसेल तर मग मला होणारे ज्ञान काय लायकीचे ? असा दुसरा महत्त्वाचा प्रश्न ! यासारखे अनेक प्रश्न तत्त्वज्ञानात घोंगावत होते आणि आजही ते टाळून पुढे जाता येत नाही 

भारतामध्ये अनेकदा कन्स्ट्रक्शन माहीत नसताना लोक डिस्ट्रक्शन अथवा डी कन्स्ट्रक्शन   करायला निघत असतात त्यातून काय हाती लागते ते त्यांनाच माहिती ! पुरोगामी वाद नको तर का नको याविषयी काहीही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित न करता हिंदुत्ववादी लोक इथे सत्तेवर येऊ शकतात किंवा हिंदुत्ववाद म्हणजे काय आणि तो नको असेल तर काय करायला पाहिजे तात्विक पातळीवर तो कसा चुकीचा आहे हे न सांगताच  हिंदुत्ववादी लोकांची उथळ वासरे चर्चेला घेत  पुरोगामी लोक हिंदुत्ववादाचा समाचार घेत राहतात अनेकांना तर हिंदुत्ववादाचा साधा इतिहास पण माहीत नसतो हा माझा अनुभव आहे अशावेळी जर एखादा तत्त्वज्ञ आला आणि म्हणाला की ते हिंदुत्व वगैरे जाऊ द्या आपण आता समोरच्या चहावर चर्चा करूया तर किती लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट येईल ? बहुदा अंदाज चुकला नाही तर ते सर्व डिस्कशन चहा वाल्याकडे म्हणजेच मोदींच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे 

मग अचानक युरोप मधून कॉफी येते आणि भारतात रूढ झालेल्या चहाला नकार देते उधळते हा फिनॉमिना आपण कसे पाहायचा ? युरोपियन लोकांनी पॅरिस मधल्या कॉफी टेबल यांचे महत्त्व वाढवत वाढवत कॉफी फिलॉसॉफीच्या केंद्रस्थानी आणली कॉफी फिलॉसॉफिकल बनवली फिलॉसॉफिकल ya फिना मिनाचे काय करायचे म्हणून आपल्याकडे काही भोरटे अर्ध युरोपियन लोक कॉफी विथ करण वगैरे बनवायला लागले अनेकांना तर कॉफी ही अलीकडे अरब लोकांना तिच्या मूळ शोधाचे श्रेय देते त्याची जाणीव पण नसते अतिरेकी वर्तमानवादाचे हे उत्तम उदाहरण आहे ही कॉफी का आणली गेली हा प्रश्न काही कोणी विचारत नाही मग साहजिकच दक्षिणात्य कॉफीकडे कसे बघावे असा प्रश्न कोणी विचारत नाही 

भारतात अनेकदा प्रत्येक वस्तू राजकीय वस्तू बनते किंवा करमणुकीची वस्तू बनते कॉफी विथ करण ही अशी कर्मणुकीची वस्तू बनलेली असते अशावेळी वस्तूवर ज्ञानात्मक पातळीवर कसे लक्ष केंद्रित करायचे ? वस्तू राजकीय केली की ती कर्मणूक करू शकते असा एक अद्भुत शोध भारतीयांना लागलेला आहे त्यामुळे भारतीय लोक कुठल्याही वस्तूचे रूपांतर करमणूकप्रधान वस्तुत करून टाकतात 

अशा पार्श्वभूमीवर शैव अथवा तंत्र श्रुती प्रमाण मानलेल्या वस्तूंचे विश्लेषण भारतीय लोक नीट करतील याची शक्यता नाहीच उलट या वस्तू राजकीय करून त्याच्यापासून कसा सत्तात्मक फायदा करून घेता येईल असाच विचार होण्याची शक्यता जास्त आहे यामुळेच जटेतली गंगा ,कपाळावरचे तीन रेषीय नाम , हातातला त्रिशूल , कपडे म्हणून घातलेले वाघाचे कातडे, निळा झालेला कंठ आणि अर्थातच लिंग हे सर्व काही जास्तीत जास्त राजकीय करून टाकण्यामध्येच अनेकांना इंटरेस्ट दिसतो साहजिकच हत्तीवर बसणारा गणपती मग नाहीसा होतो आणि हत्तीचा चेहरा गणपतीला दिला जातो त्याचे सार्वजनिकीकरण केले जाते आणि मुळात हत्ती व बैल ही शैव लोकांची कुलचिन्ह आहेत याचा तर पूर्ण विसर पाडला जातो हे सर्व राजकीय करण असते पण दुर्दैवाची गोष्ट अशी की शैव धर्मातील लोकांना या गोष्टी कळत नाहीत राजकारणाविषयीचा हा बालिश अनुत्साह अनेकदा शैव लोकांना महागात पडलेला आहे आपले आदिपंचसिद्ध ताब्यात घेतले जातात तेव्हा नेमके काय होते याविषयीचा कसलाही विश्लेषणाचा आकलनाचा साधा जागवा सुद्धा शैव लोकांच्यात दिसत नाही फक्त जागर दिसतात आणि ते फक्त ट्रॅडिशनल ब्राह्मणांनी स्पॉन्सर केलेल्या जागा सांगत बसतात मराठी भाषेत तर जोगवा (म्हणजे जोगी किंवा जोगिनीने मागवायचा शिधा )आणि जोगी जोगीण हे शब्द आता नाहीसे होऊन योगी हा शब्द प्रस्थापित झालेला आहे आणि जोगवा हा शोषण व्यवस्थेचा शब्द झालेला आहे तसा चित्रपटही निघालेला आहे 

फिनामिनालॉजिने सर्व वस्तूंच्या मागचा धार्मिकार्थ काढून घेतला आणि त्या वस्तू आत्ताच्या संदर्भात माझ्या वर्तमानात कशा दिसतात यावर लक्ष फोकस केले धर्माचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक होते हे खरे आहे पण प्रत्यक्षामध्ये त्या वस्तूला काही भूतकाळ असू शकतो याचा विसरच तिला पडला वस्तूंना भूतकाळ असू शकतो हे उत्तर आधुनिकतेच्या जास्त व्यवस्थित लक्षात आले किंबहुना ती वस्तू वर्तमानात पोहोचताना तिने एक भूतकाळाचा पारंपारिक किंवा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केलेला असतो हे उत्तर आधुनिकतेने अंडरलाईन केले किंबहुना सर्वकाही संहितेतून संहिते कडे वाटचाल करत निर्माण होते याकडे उत्तराधुनिकतेने जास्त चांगले लक्ष दिले ज्याकडे आधुनिक फिनामिनॉलॉजीने दुर्लक्ष केले होते उत्तराधुनिकतेने या परंपरेच्या किंवा इतिहासाच्या किंवा भूतकाळाच्या प्रवासाला आतोनात महत्व द्यायला सुरुवात केली आज अवस्था असे आहे की आपण सर्वजण भूतकाळातच डुबक्या घेत बसलेलो आहोत हे दुसरे टोक आहे 

वास्तविक वर्तमान केंद्री दृष्टिकोन हा सुद्धा अत्यंत आवश्यक असतो उदा आज जेव्हा आपणाला एखादा गणपती मूळ कृष्ण म्हणजे काळ्या रुपात एखाद्या मंदिरात दिसतो तेव्हा आपल्यापुढे अनेक प्रश्न निर्माण होत असतात इथे गणपतीला असलेले मनुष्याचे मुख हेच खरे असावे हे स्पष्ट दिसायला लागते आणि मग प्रश्न विचारावासा वाटतो की गणपतीला हत्तीचे मुख का दिले गेले असावे ? त्याला गोरे का केले असावे ? अनेक नेमका का हा देव फक्त ब्राह्मणांचा होत गेला ? आणि ब्राह्मणांचा देव झाल्यामुळेच की काय हा फक्त गोरा झाला काय किंवा त्याचे अत्यंत तंदुरुस्त आणि फिट असलेले शरीर अचानक पुरोहिताचे पोट सुटलेले असते म्हणून तसे झाले का? ब्राह्मण लोकांना मोदक आवडतात म्हणून त्याला मोदक आवडायला लागले का ?असे प्रश्न निर्माण होतात असे प्रश्न विचारण्यासाठी मुळातच परंपरेचा असलेला पगडा फिनामिनोलॉजीचा आधार घेत नाकारावा लागतो 

भारतात कधी काही विचित्रही घडते म्हणजे वसाहतवादाचा प्रभाव इतका पडत जातो कि आपल्या प्राचीन वस्तू सुद्धा आपणाला ग्रीक किंवा रोमन संस्कृती सारख्या दिसायला लागतात मग चिन्हार्थ रोमन किंवा ग्रीक ही इंग्रजांची प्राचीन संस्कृती असल्याने (प्रत्यक्षात हे फार काही खरे नव्हते हे आता नव्या इतिहासाने सिद्ध केले आहे ) या युरोपियन संस्कृतीतून चिन्हार्थ आयात करून तो भारतीयांना चिटकवणे म्हणजे काही अतिशहाण्या लोकांनी शिवलिंग आणि त्याचा अर्थ लावताना ग्रीक संस्कृतीने आणि त्या संस्कृती अभ्यासाने आणलेला सृजन सफलतेचा सिद्धांत आपल्या शिवलिंगाला अप्लीकेबल केला शून्य शिव आणि अनंत शक्ती यांचे प्रतीक असणारे शिवलिंग हे आपल्याच आचार्यांच्या कडून शिकणे सहज शक्य होते परंतु असे प्रयत्न झालेच नाहीत या शिवलिंग शिवशक्तीच्या गाभाऱ्यातून बाहेर आलात की संसार सुरू होतो आणि तो शिवालय करणे आपल्या हातात असते 

शैवांचा इतिहास लिहिताना या सर्व गोष्टी अतिशय जागृत होऊन आता पहावे लागेल फिनामिनॉलॉजीचा केवळ वर्तमान केंद्री विचार घेऊन चालणार नाही त्याला भूतकाळाची जोड द्यावी लागेल किंवा उत्तर आधुनिकतेचा मागे जाण्याचा प्रयत्न सुद्धा नीट तपासून त्याची सांगड आत्ताच्या नेटवर्क पद्धतीशी घालत शैव लोकांचा इतिहास लिहावा लागेल 

श्रीधर तिळवे नाईक final zale ahe


फिनॉमिनोलॉजी , उत्तराधुनिकता आणि शैव संस्कृतीचा इतिहास श्रीधर तिळवे नाईक 

इतिहासाचा इतिहास , फिनॉमिनॉलॉजी उत्तर आधुनिकता आणि शैव २ श्रीधर तिळवे नाईक 


इतिहासातला एखादा फिनॉमिना वर्तमानाच्या संदर्भात पाहिला तर काय काय वेगळे दिसू शकते उदाहरणार्थ परंपरेमध्ये रामायणाला इतिहास वेद म्हटले जाते ते घेऊ 

रामायणात एक गोष्ट आहे ती पण तिच्याकडे जसे लक्ष जायला हवे तसे गेलेले दिसत नाही गोष्टी योगायोगाच्या म्हणून सांगितल्या जातात तरी त्या प्रत्यक्षात नसतात म्हणजे नाव शंभूक असते तो शूद्र असतो त्याचे संस्कृत नाव शंबूक होते तो तपश्चर्या करतो ही तपश्चर्या कुठे चालली आहे तर शैवल पर्वतावर ! आता पर्वताचे नाव योगायोगाने "शैव"ल पर्वत आहे असे मानायचे तर माना पर्वत शैवल आहे याचा अर्थच तो शैव लोकांचा आहे आणि तो सुद्रांना तपश्चर्या करायला परमिशन देतो अनुमती देतो तिथे त्याची आरामात तपश्चर्या चालू आहे मग ब्राह्मणाच्या मुलाचा मृत्यू होतो आणि पुढचे सर्व घडते याचा अर्थ स्पष्ट आहे संघर्ष कोणाशी आहे हे व्यवस्थित लिखाण करणाऱ्याला माहित आहे 


रामायणात विश्वामित्र सुद्धा प्रथम पुरुष सत्ताकवादी असतो आणि वशिष्ठ सुद्धा पुरुष सत्ताक वादी असतो म्हणून तर विश्वामित्र चातुर्वर्ण्य व्यवस्थारक्षणासाठी रामाला ताटिकेचा वध करायला प्रोत्साहन देतो वास्तविक स्त्रीला मारणे पुरुषाच्या पुरुषार्थात बसत नाही तरीसुद्धा चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पुरुष सत्ताक व्यवस्थेपेक्षा अधिक बलशाली होते आणि राम ताटीकेचा वध करतो 


रामायणामध्येच प्रत्यक्ष कृषी व पशुपालन हे दोन्हीही व्यवसाय शूद्रवर्णाला दिले गेलेले आहेत कारण उघड आहेत कष्टाचे आहेत मग यांनी केलेले उत्पादन ब्राह्मण आणि क्षत्रिया यांच्याकडे कसे जाणार ? त्यासाठी मग वैश्य नावाची संस्था निर्माण केली जाते ही संस्था वर्ण म्हणून जरी निर्माण केल्यासारखे भासवले असले तरी प्रत्यक्षामध्ये ती एक ओपन संस्था असते तिच्यामध्ये नंतर मुस्लिम आणि पारशी लोक आणि सुरुवातीला इंग्रजी युरोपियन लोक सुद्धा सुद्धा आरामात सामील होतात हे लोक आरामात बसतात कारण कोण सामान आणून देतो हे आता महत्त्वाचे राहत नाही बस आम्ही शेती करणार नाही आणि व्यापार करणार नाही आणि पशुपालन करणार नाही कारण आम्हाला कष्ट करायचे नाहीत शारीरिक कष्ट तर बिलकुलच करायचे नाहीत आम्ही फक्त या वैश्य या संस्थेद्वारे या सर्व गोष्टी जास्तीत जास्त कमी श्रमात कमी भावात आणि बहुतेकदा फुकटात मिळवणार म्हणजे कायदे असे कडक करायचे की शेतकऱ्याने सर्व शेत यांच्यात राजवाड्यात न्हावे पशुपालकाने आपली गुरढोरे यांना देऊन टाकावी व्यापारी माणसाने जास्तीत जास्त कमी दरात हे सर्व द्यावे आणि मग दक्षिणेच्या दानाच्या रूपात किंवा लाच लुचपतीच्या रूपात कधी कर म्हणून कधी दंड म्हणून आम्ही सर्व वसूल करूच . वैश्य हा ऑफिशियल सॉफिस्टिकेटेड गुलामच होता हे दुर्दैवाने कधीच वैश्य लोकांना कळले नाही भारतात उद्योगधंद्याची वाढ सुद्धा त्यामुळेच नंतर आटत गेली कारण वैश्य सुद्धा शेवटी शूद्र झाले 


महाभारतात सुद्धा येणारा अंगराज कर्ण हा सूत नावाच्या शैव समाजातला आहे त्याला वर्ण व्यवस्था मान्यच नाही खरे तर द्रोणाचार्यच्याशिवाय त्याचे काहीही अडलेले नाही मूळशैव कथेत तो परशुरामा कडून जो शैव आहे सगळे विद्या शिकतो त्याचे त्यामुळे काही अडत नाही बाकी नंतर शाप वर परशुराम ब्राह्मण असणे वगैरे सगळ्या गोष्टी घुसडलेल्या आहेत हीच गोष्ट आपण एकलव्य बाबत घेऊ शकतो तो हिरण्य वंशातला आहे आणि त्याच्या बापाचे नाव ही हिरण्य धनु असे आहे हिरण्य वंश पाशुपत दर्शनासाठी व धर्मासाठी अत्यंत प्रसिद्ध होता आणि नंतर वैष्णव लोकांनी त्याच्याविषयी दंतकथा रचल्या सर्व समाजामध्ये स्मृती किंवा तस्सम गोष्टी प्रचलितच नव्हत्या या काळात कायद्याला विशेषत: समाजाच्या कायद्याला समय असे म्हटले जाईल आणि समय हा सम आणि आय म्हणजे समान डोळे असलेला समान अक्ष असलेला असा होता भारतात सर्वत्र वर्णव्यवस्था अस्तित्वात होती हे एक भारतीय इतिहासकारांचे आवडते गृहीतक आहे अपवाद कदाचित काही वर्गवादी विचारवंत जे वर्ण जात काल्पनिक मानतात प्रत्यक्षात अंगराज कर्ण ज्या श्रीमंतीने युक्त आहे ती पाहता ही श्रीमंती त्याला व्यापारातूनच आलेली असणार वणी आणि पणी व्यापारी होते आणि सूत पणी लोकांच्यात आणि वणी लोकांच्यात मोडत होते साहजिकच परशुराम नावाच्या शैव गुरूकडून कारण हा शैव शिष्य शिकला सूर्याला शिवलिंग म्हणून पुजणारे हे सुतलोक अनेकांना नीट समजून घेता आलेले नाहीत या काळामध्ये अंग राज्याचे समुद्र पर्यटन चालू असणार हे उघड आहे एकलव्य सुद्धा त्या अर्थाने स्वयंभूच तो तर स्वतःच शिकला द्रोणाचार्यांचा पुतळा वगैरे वगैरे सर्व दंतकथा आहेत त्या नंतर घुसवलेल्या आहेत 


निषाद हा जन म्हणजेच समाज होता आणि तो वर्णव्यवस्थेच्या बाहेर होता. त्याची संख्या मोठी होती जनपदाचा खरा अर्थ समाजपद असाच होतो कारण जन म्हणजे समाज होय वर्ण किंवा जात नाही जनपदांना वर्णव्यवस्था माहिती नव्हती किंबहुना समाजासाठी जन हा शब्द आहे आणि अनेक समाजांचे मिळून गण बनत असत हे मी मागे सांगितलेलेच आहे समाज नेहमी जन्मदत्त नसत तर कर्म दत्त असत एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या समाजाचे सदस्य असू शकत म्हणजे कर्ण हा योद्धे समाजात गेला तर त्याचा भाऊ रथकार झाला त्याचे वडील मात्र सुतार कामच करत राहिले ते आयुष्यभर सुतच राहिले 


एकलव्य योध्दा बनायला आला होता आणि नंतर स्वतःच्या जीवावर बनलाही अंगराज कर्णला राधेय म्हटले जाते कारण त्याच्या आईचे नाव राधा होते पिता अधीरथाच्या नावाने तो ओळखला जात नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे अगदी महाभारताच्या युद्धात सुद्धा त्याला स्त्रीसत्ताक राजवटीतला शल्यच सारथी होऊन मदत करतो हे लक्षात घेण्याजोगे आहे एकलव्य हा सुद्धा मातृसत्ताक पद्धतीतूनच आलेला होता महाभारतात एका बाजूला वर्ण व्यवस्थेची स्थापना करायला निघालेला आहे श्रीकृष्ण आहे तर त्या विरोधात असणारे अनेक लोक आहेत हे सर्व समाज आहेत त्यातूनच आलेल्या घटतकोच्याची हत्या सुद्धा कृष्णाने अत्यंत जाणीवपूर्वक घडवलेली आहे तशी महाभारतात तो कबुलीही देतो 


महाभारतातल्या क्षत्रिय नसलेल्या अशा या दोघांची कथा प्रत्यक्षात शैव समाजाकडे घेऊन जाते वर्ण आणि जाती व्यवस्थेकडे नव्हे हे आपण लक्षात घेतले म्हणजे या काळात सुद्धा शैव समाजांचेच वर्चस्व होते आणि हे वर्चस्व नंतर कसे मोडून काढले गेले ते पाहणे आवश्यक आहे 



श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना