DHANSHASTRA
अनंत अंबानी ह्यांचे लग्न २ श्रीधर तिळवे नाईक क
गेले कित्येक दिवस अनंत अंबानी यांचे लग्न हा एक मेगाइव्हेंट महाघटन झालेला आहे तो तसा व्हावा अशी अंबानींची इच्छा होती की नाही हा एक प्रश्न आहे कारण तपशील अजूनही स्पष्ट नाहीत त्यांचे स्वतःचे व्हिडिओ जोवर येत नाहीत तोवर काहीही बोलणे शक्य नाही फक्त येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत असलेले व्हिडिओ अंबानींनी घेतलेले आहेत असे दिसते किंवा असे सांगितले जाते आहे आपल्याला प्रसारमाध्यमांनीच घेतलेले व्हिडिओ मिळत आहेत त्यात सत्य किती ते कालांतराने कळेलच
अनेकांनी हा सोहळा बटबटीत वाटल्याची तक्रार केलेली आहे उदाहरणार्थ गजू तायडे किंवा आलिया कश्यप जी म्हणाली ," The Ambani Wedding is not a wedding,
at this point, it’s become a circus. I am enjoying stalking everything though.”
Aaliyah also reveals that she was also invited to some functions but chose to
skip. “I was invited to some events because apparently they’re doing PR. But
I said no because I would like to believe I have a little more self-respect
than to sell myself out for someone’s wedding,” (इंडियन एक्स्प्रेस ) दुसऱ्या बाजूचे म्हणणे असे की सोहळा तुम्हाला बटबटीत वाटला म्हणून प्रत्येकाला
वाटेलच असं नाही कारण सोहळा आणि त्याचे चित्रीकरण यांच्यामध्ये
जबरदस्त अंतर होतं आणि आहे किंबहुना अंबानींनी सोहळा शूट करण्यासाठी स्वतःचेच लोक बोलवायला हवे होते मीडियाला बोलवायलाच नको होतं असं या बाजूचे म्हणणं आहे ते कितपत खरे आहे तेही तपासायला हवे
या सगळ्या सोहळ्यावर डाव्या लोकांचा प्रचंड आक्षेप आहे कारण त्यांना हे भांडवलशाहीचे ओंगळ व बटबटीत प्रस्तुतीकरण वाटते पूर्वी अशा प्रकारची टीका आध्यात्मिक लोक करायचे कारण दारिद्र्याचे
सेलिब्रेशन करणे ही एक खोडच भारतीय समाजाला घडलेली होती वास्तविक ज्या वेळेला भारत स्वतंत्र आणि श्रीमंत होता त्यावेळेला गरीबीचे दारिद्र्याचे
सेलिब्रेशन चालू शकत होते पण आता दारिद्र्य हाच भारताचा स्वभाव झालेला आहे 80 करोड लोक गरीब आहेत दरिद्री आहेत अशा वेळेला दारिद्र्याचे
सेलिब्रेशन काय करायचे उलट आता गरिबी हा रोगच मानायला हवा आणि तो कसा दूर करता येईल ते पाहायला हवे परंतु हा देशच असा आहे की इथे गरीब असणे यामध्ये काहीतरी मोठी गोष्ट आहे असे मानले जाते वास्तविक यातूनच काही गोंधळ ही निर्माण झालेले आहेत म्हणजे श्रीमंत असणे हा जणू गुन्हा आहे असे मानणे वास्तविक प्रत्येक जण कसा श्रीमंत होईल हे पाहायला पाहिजे असो कम्युनिझम म्हणजे सर्वांना गरीब करणे वा गरीबी वाटणे अशी कम्युनिझमची व्याख्या आहेच की ! या व्याख्येला गृहीत धरून अनेक समाजवादी आणि साम्यवादी लोक काम करत असतातच जे गरिबीचे वाटप करण्यास उत्सुक आहेत साम्यवाद हा खरे तर श्रीमंती वाटण्याचा उद्योग व्हायला हवा आणि त्यासाठी प्रथम श्रीमंती यायला हवी पण ते न होता आधीच गरिबी वाटण्याचा शौक अनेकांना जडलेला आहे बरं हे लोक वैयक्तिक आयुष्यात अनेकदा पैशाच्या मागे असतात आणि इतरांना मात्र शहाणपण शिकवत बसतात असो हा देशच एकंदर परस्पर विरोधाचा देश आहे
आता हा सोहळा कार्पोरेटशाहीचे प्रस्तुतीकरण
आहे हे तर उघडच आहे किंबहुना या संदर्भातल्या गोष्टी मी आधीच बोललेलो होतो त्या रिपीट करत नाही अनेकदा अशा समारंभात वेगवेगळी डील्स केली जातात अनेकदा जे इमोशनल बॉण्ड्स दाखवता येत नाहीत ते इथे दाखवले जातात प्रस्थापित केले जातात जगण्यासाठी ते अत्यंत आवश्यक असतात त्यांच्या आठवणी होतात ही महाअभिजन लोकांची जीवनशैली आहे आणि ती राजकारणी आणि उद्योगपती लोक नेहमीच प्रकट करत असतात याच काळात उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर झालेला सोहळा बघण्याजोगा आहे तिथेही हीच जीवनशैली आविष्कृत झालेली आहे आमचं हिंदुत्व हे शेंडीत नाही असे सांगणाऱ्या लोकांनी व्यवस्थितपणे ब्राह्मणांना
आमंत्रण दिलेले आहे हे असेच चालते कारण इव्हेंट करावा लागतो संघटनेसाठी तो आवश्यक असतो किंबहुना स्वतःची संघटनात्मक ताकद चेक करण्यासाठी हे केले जाते अगदी पूर्वीच्या प्राचीन राज्याभिषेकापासून ते अलीकडच्या अशा लग्नसोहळांच्या पर्यंत हेच चाललेले असते अंबानींच्याकडून त्यांनी फक्त रजिस्टर मॅरेज करावे अशी अपेक्षा करणे हे चूक आहे मुळातच त्यांनी जो पैसा खर्च केलेला आहे तो आपणाला अवाढव्य वाटतो प्रत्यक्षात
त्यांचे महिन्याचे उत्पन्न सहा हजार करोड आहे त्यातील फक्त पाच करोड ह्या सोहळ्यावर खर्च होत आहेत आपल्याला तेही जास्त वाटतात कारण आपण आपल्या उत्पन्नाच्या
हिशेबाने त्यांच्या उत्पन्नाकडे
बघत आहोत ही आपल्या दृष्टीची मर्यादा आहे त्यांची नाही माझी याकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे माझ्या मते या निमित्ताने अनेकांना मिळणारा रोजगार महत्त्वाचा आहे शिवाय माळ्यांना व बागायती शेतकऱ्यांना त्यांच्या फुलशेतीला आशाच सोहळ्यांच्या
आधार असतो व त्यातूनच त्यांना फायदा मिळतो अन्यथा फुले कोण विकत घेतो ? फुलशेतीचा सगळा व्यवसाय हा धर्मावरच उभा आहे आणि धर्माने स्पॉन्सर केलेल्या अशा प्रकारच्या इव्हेंट्स वर!
भारतात मॅरेज ही एक इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमुळे
साधारणपणे एक टक्का लोकांना रोजगार मिळतो म्हणजे किमान एक करोड आता उद्या हे एक करोड बेकार झाले तर टीका करणारे लोक त्यांना रोजगार देणार आहेत काय ? अर्थशास्त्र
कसे चालते याची काडीची कल्पना नसणारे हे अडाणी लोक आहेत अनेक नवीन नवीन व्यवसायांची गरज आहे जेणेकरून बेकारी कमी होईल मॅरेज इंडस्ट्री ही एक नवीन डेव्हलपमेंट आहे तिला विरोध करून चालणार नाही कारण ज्यांना रोजगार मिळतो आणि फायदा मिळतो त्यातले 90% लोक हे मध्यमवर्गीय किंवा गरीब आहेत तेव्हा उगाच ढगात बसून कॉमेंट करू नका
मग अजिबातच विरोध करू नये असे आहे का ? तर नाही ! विरोध कशाला हवा ? तर कर्जे काढून सण साजरे करणाऱ्या लोकांना त्यांच्या वृत्तीला! त्याबाबत विवेक शिकवणे गरजेचे आहे दुर्दैवाने अजून तरी विवेकाचा आवाज ऐकायला अनेक लोक शिकलेले नाहीत आजही श्रीमंतांचे उठवळ अनुकरण करण्यातच काही गरीब मग्न आहेत म्हणूनच मग सहा महिन्याच्या
उत्पन्नाइतकाच पैसा लग्नात खर्च करा असे सांगावे लागते ऋण काढून सण साजरे करू नका असे सांगावे लागते
मुळातच लग्न ही संस्था अत्यंत गुंतागुंतीची आणि वैयक्तिक आहे संविधान या संदर्भामध्ये किती पैसे खर्च करायचे हा वैयक्तिक इशू मानते व त्यावर कायदा करत नाही अशावेळी काय करायचे? ह्या घडीला तरी भारतात लग्न हे धार्मिक गोष्ट आहे आणि असते विशेषतः अशा प्रकारचा सोहळा हा धार्मिक असतो त्यामुळे धर्मस्वातंत्र्य मान्य असल्याने तो जसा आहे तसा स्वीकारावा लागतो प्रश्न इतकाच आहे की धर्माने यात पडावे की नाही ? साहजिकच एक शैवाचार्य म्हणून मी एक मर्यादा दिली जेणेकरून गरिबांनी या सोहळ्याच्या नादाला लागून कर्जबाजारी होऊ नये अनेकदा मोठ्या लोकांनी जे केले ते आपणपण करायचे अशी प्रथा असते अशावेळी आचार्यानेच एक दिशा दाखवावी लागते केवळ टीका करून भागत नाही तर नेमके काय व्हायला हवे ते सांगावे लागते मी याबाबतीत कमाल मर्यादा सहा महिन्याच्या
उत्पन्नाचीच सांगितली होती अनेक लोक कर्ज काढून लग्न करतात त्याला मी ठाम विरोध केलेला आहे जास्तीत जास्त सहा महिन्याचे उत्पन्न तुम्ही लग्न सोहळ्यावर खर्च करा असे मी सांगितलेले आहे हे करावे लागते कारण जिथे संविधान चूप होते तिथे धर्मालाच गोष्टी बोलाव्या लागतात या गोष्टी बोलायच्या नाहीत आणि नुसत्या वायफळ टीका करायच्या याला काही अर्थ नसतो शेवटी लोकांना काहीतरी सांगावे लागते हा माझा अनुभव आहे आणि हे सांगताना आपला विवेक जाऊ द्यायचा नाही हेही करावे लागते डावे लोक हे करत नाहीत ते फक्त टीका करतात आणि रजिस्टर लग्नाचा पर्याय सुचवतात हा पर्याय भारतातल्या 99% लोकांना मान्य नाही मग तुम्ही काय करणार की लोकांशी नाते तोडून बसलाय तेच कंटिन्यू करणार? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. उत्तर आधुनिकतेत प्रत्येक गोष्ट इव्हेंट झाली आणि इव्हेंटचा झगमगाठ हा प्रत्येकालाच हवासा झाला आहे (अगदी सेक्युलर म्हणून मिरवणारे लोक सुद्धा पार्टी करतच असतात पार्टी चालते पण लग्नसोहळा चालत नाही हा काय आगाऊपणा आहे ? )अशा वेळी आपण फक्त विवेक देऊ शकतो म्हणूनच सहा महिन्याच्या उत्पन्नाची मर्यादा मी घातली आणि कर्ज घेऊन लग्न करू नये असा आदेश काढला तो कोणी पाळावा न पाळावा पण निदान एक निर्देश झाला पाहिजे किंबहुना शैवाचार्य म्हणून मी या सर्व भानगडीत पडलो त्याचं कारणच असं होतं की लोक सतत प्रश्न घेऊन यायला लागले आणि माझ्या लक्षात आले की याबाबतीत लोकांच्याकडे
गायडन्स नाही त्यांना समजावून सांगेल असा माणूसच नाही अशावेळी मग जबाबदारी घ्यावी लागते लोकांचे प्रश्न अत्यंत साधे आणि दैनंदिन असतात आणि ते ताबडतोब सोडवावे लागतात नुसत्या फिलॉसॉफिकल डिंगा मारून काय फायदा? शैवाचार्य असणे अशा वेळी काम करून जाते
तुमचा स्वतःचा एक डावा विचार असू शकतो पण एक उजवा विचारही व सुवर्णमध्य विचारही अस्तित्वात आहे (मी स्वतः सुवर्ण मध्यवादी आहे ) तो तुम्हाला आवडो अगर ना आवडो पण सत्तेवर आहे स्वतःच्या मुलाला ज्या पद्धतीने लग्न हवे त्या पद्धतीने ते केले गेलेले आहे त्याच्या आजाराची एक पार्श्वभूमी याला आहे आपण काही सुख देऊ शकत नाही तर निदान सुखद सोहळा तरी करावा अशी ही पालककेंद्री भूमिका आहे जी वैयक्तिक आहे ती बघता तिला विरोध करणे मला तरी योग्य वाटले नाही अनेकदा वैयक्तिक गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात तशी ती आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस असतो तुमची एक विचाराची लाईन आहे जिला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही उलट लोक अंबानींनी काय काय केले त्यातलं आपल्याला आपल्या लग्नात काय काय करता येईल असा विचार करत असतात तुमचं लोकांशी नातं कुठे उरलय? प्रतिकाराला काही चांगले नवीन मुद्दे शोधा अन्यथा लोक पुढे गेलेत आणि विचारवंत मागे उरलेत अशी स्थिती येईल किंबहुना अशी स्थिती आलेली आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment