CHANNEL WORDS NOV 24

 channnel words

खोटं बोलून बायकांना झाकता झाकता 

मी मिथ्या झालो आतून वाकता वाकता


मुखवटे चेहऱ्यावरचे झाले डोईजड 

थांबता थांबली नाही काळजातली पडझड 


रक्तातले मोबाईल लँड फोन झाले अडकून 

आलेले सगळे कॉल कळले नाही कधी गेले तडकून


हाकललाही गेलो जिथे ठोकला मुक्काम 

मला सहन झाला नाही संसाराचा तामझाम 


कमिटमेंटची कदाचित वाटत होती भीती 

पुरेसा पडणार नाही म्हणून व्याकुळली छाती 


मलाच नाही द्यायची होती मग मागणार कशी कमिटमेंट 

असा राहिलो त्वचेवर जसे वाऱ्यात राहतात टेन्ट 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल : वर्ड्स या काव्यफायलीतून)

फाशी दिल्यानंतर न्यायाधीशाचे स्वगत श्रीधर तिळवे नाईक
प्रत्येक वेळी जन्मलेल्या प्रत्येक जनावराला
माणूस बनवणे
एक अखंड सातत्य
टिकवावे लागणारे
तू जनावर म्हणून जन्मलास आणि माणूस झालाच नाहीस
का झाला नाहीस ?
तुझ्या आई-वडिलांची ही जबाबदारी नव्हती का ?
त्यांनी का तुला जनावरच राहू दिले की
त्यांनी मनुष्य प्रथम जनावरच असतो हे साधे सनातन सत्य डावलले
आणि जन्मजात माणूसपणाचा हट्ट ऑटोमॅटिक केला?
आईच्या पोटातून जे येते
ते जनावरच असते
त्याला माणूस बनवावे लागते
समाज हे कृत्रिम जंगल आहे त्याचे नियम नाही पाळले की ते पाशवी बनते
तू पाशवी बनलास म्हणून तर अत्याचार केलास
तू अपयश आहेस आमच्या सर्व व्यवस्थांचे
तू जाणीव आहेस की
अजूनही जनावर शिल्लक आहे
आणि शिल्लक राहतेच
संपत नाही
तू का संपत नाहीस ?
वासना इतक्या टोकेरी होतात कशा?
कायदा केवळ डोक्यावरचे केस कसे बनतो ?
कायद्याचा धाक खाक कसा होतो ?
बेभानपणा कसा स्वभाव बनतो ?
रक्त इतके पिसाळते कसे?
वीर्य संपूर्ण मेंदूचा ताबा कसा घेते?
मी तुझ्यासारख्या अनेकांना कानाखाली वाजवलेल्या आहेत
तुला फाशी देऊन नाहीसे करावे असे वाटावे
इतकेही नागडे निर्लज्जपण मी तुमच्यासारख्यांच्या चेहऱ्यावर पाहिलेले आहे
भोग हवा आत्ता नि इथेच
ही तडस येते कुठून ?
नकार झेलण्याची सभ्य रीत कशी शिकवावी ?
किं काही तुझ्यासारखेच राहणार कायम आडवे येणारे
कधीच न सुधारणारे ?
मी शार्प शूटर्सनाही गांधीवादी बनवलेले आहे
पण साला तुमची जमात मात्र संपत नाही
शार्पशूटर निदान कळतात
तुम्ही कुठे लपलेला असता ते कळतही नाही
सभ्यता शिकवण्याच्या सगळ्या शिक्षणतऱ्हा अपंग करून टाकणारे तुमचे व्यंग
की हे सर्व हिंसेचे मादक
आवर्तनाय ?
अहंकाराचा स्फोटक थयथयाट
ज्याचा कामवासनशी संबंधच नाही?
जेलमध्ये ठेवून तुझ्या सेल्स बदलतील?
की फाशीच द्यावे निर्लज्ज बेलगाम वासनेला?
माझ्या हातात ऑर्डर आहे
जिला एक सिस्टीम द्यायची आहे
तुझ्या बलात्काराने ऑर्डर
डीसऑर्डर बनवलीये
आणि माझ्यापुढे प्रश्न तुला सिस्टीम बाहेर ठेवण्यासाठी जेल पुरेशी आहे की मृत्युदंड ?
फाशीचा निकाल देताना मीही अनेकदा माझ्या शाईत खून वळवळताना पाहिलेला आहे
जणू एक झुरळ
मी तुला नाहीसा होण्याची सजा देत
आणि माझ्या पाठीवर एक झुरळ वळवळत
माझी पाठ अशा अनेक वळांनी भरून गेली आहे
मी सामोरा आहे आरशासमोर
आणि मला माहित नाही
तुझ्या चूकचूकणाऱ्या मृत्यूत माझा नेमका सहभाग किती
मी म्हणतोय मी शिकारी आहे आणि मी एका जनावराची शिकार केलेली आहे
शंभरदा हे पटविन
डायरीत लिहीन
आणि मग हा सगळा घटनाक्रम सवयीचे मेमरी कार्ड बनेल
काळ भल्या भल्या जनावरांना सपाट करतो
एवढा एकच दिलासा या आयुष्यात जगण्याला हलका करतो

शेवटी स्किन इज फ्लॅट
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील चॅनेल वर्ड्स या काव्य फा

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना