DECATHLON ELCETRA NOV 24

श्रीधर तिळवे नाईक डेकॅथलॉन एलसेट्रा


किल्ले वाळूचे की मातीचे की दगडाचे

हा प्रश्न नाही

ते तात्कालीक की टिकणारे

हाही प्रश्न नाही

प्रश्न आहे ते आनंदाने उत्सवत कसे उत्साहात बांधले जातात ?


अक्षरत्व हा विचार आहे

आणि तो माणसाला का सुचतो हा खरा प्रश्न आहे


आता तू मला विचारू शकतेस की तुला का तो भुरळ घालत नाही ?


प्रिये ,

माणसे आता खुश नसली

की भविष्यात खुशी बघायला लागतात


मी आत्ताच खुश आहे तुझ्या शरीरात तुझ्या प्रेमात

संभोगाचे किल्ले बांधूया

आणि उठूया


सेक्स करताना

अक्षरत्वाचा विचार करणारे चू असतात


तेव्हा चूळ भर

आणि ये ओठावर

अंगभर घोळ करायला


श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन : एल्सेट्रा या काव्यफायलीतून)

लोक फार बेसिक मध्ये जगतात आणि तुला वाटत होतं लोकशाहीत लोक फिलोसॉफर होतात
मर्यादा असते आपणच ती अनलिमिटेड गृहीत धरतो
लोकांचे ऑलिम्पिक त्यांच्या घरापुरतेच दोन वेळच्या जेवणात ऍथलेटिक्स संपत आणि शिक्षणाच्या खर्चात कुस्ती
कपडे पुरतात दोन वेळचे सहा महिन्यात आणि दिवाळीला बोनस मिळाला की लोकांना घरात लक्ष्मी आल्यासारखं वाटतं
तेव्हा उगाच मोक्षवादी आहेस म्हणून बडेजाव उभा करू नकोस लोक पाय कापतील आणि त्यांच्या शिड्या बनवतील
तेव्हा रहा दोन पायावर शाबूत उभा आणि डोकं बेसिकमध्ये ठेवून दे कायमचं
श्रीधर तिळवे नाईक (डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा या काव्यफायलीमधून)

इन्फेक्शन आहे पण इन्स्पेक्शन करावेसे वाटतं नाही
न्यूज म्हणून केऑस किंवा मेलेल्या फुलांचा वास
पृथ्वी हवेत लटकलेल्या बाईसारखी
हे कळल्यावर
कोणता शहाणा मुळांच्यावर प्रेम करेल ?
जखम लटकण्यातून आलेलीही असेल
पण मुळांनी बरी होईल ह्याची काय गॅरंटी ?
टेरिफिक सुऱ्यांनी ट्रॅफिक ज्याम
त्यातला एक मांडीवर खेकसला
गरिबीही कोरडी
तिचीही स्वतंत्र शेती आत्महत्या धमकावत
आकाशाच्या सावळ्या सावल्या म्हणजे पाऊस
तरी बरं सूर्य अजून भारतीय झालेला नाही
शेड्युल पाळतो
सौंदर्याची कन्सल्टन्सी सुरु करून सर्वजण कुरूप
माझी जखम त्यांचा हुरूप खाणारी
ती कारच्या बॅकसीट वर
ड्राइव्ह करतीये हवेत लटकणारे शरीर
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सीरीजमधील डेकॅथलॉन एलसेट्रा ह्या फाईलमधून )

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना