DECATHLON WORDS 24 NOV

 मिट्टी की गुडिया थी सितारा नही थी

मिट्टी की गुडिया थी सितारा नही थी जिसने मेरा दिल चुराया वो आवारा नही थी
कैसे आईना बनता हमारे ताल्लूकातका मोहब्बत हुई और वो पारा नही थी
नदी थी इसीलिए उसके किनारे बैठ गया मेरी विटंबना मेरी मोहब्बत धारा नही थी
उन्होने खफा हो के मेरे खिलाफ कुछ लिखा लोगोने उसे शायरी कहा जो शरारा नही थी
तितलीया मेरे फुल पे कभी बैठी नही और दिमक को मेरी खुशबू गवारा नही थी
श्रीधर तिळवे नाईक (डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन :वर्ड्स या काव्यफायलीतून)

इतका मोठा भवती गोतावळा हवा कशाला 
जे झाड आहेत त्यांना पाचोळा हवा कशाला 

इतकी माणसे भोवती हवीत का खरोखर?
भेटीच्या नावाखाली चाळा हवा कशाला

जे अजून चालतात वाट त्यांना वाट चालू दे 
तू बस स्टॉपवर उभा तुला त्यांचा माळा हवा कशाला 

तू अस्तित्वात आहेस ह्याहून अधिक काय हवे 
ह्याहून चमत्काराचा पडताळा हवा कशाला 

सेक्सवेळी माझे शरीर तिच्यात परफेक्ट बसले 
आता काय झाले काय नाहीं ताळा हवा कशाला 

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलोन वर्ड्स या काव्यफायलीतून)



Dec 

बगळ्यांनो, 
तुम्ही त्याच्यातला राजहंस ठार मारला 

तुमच्या चोचीतील वचावचा 
ऑथेंटिक नव्हती 
तिला फक्त खाता येत होते

तुम्हाला डेरेदार वृक्ष बनवता येत नव्हते 
तुम्ही बनवल्या फक्त सावल्या 
आणि तो होता जंगल

तुम्ही मागत राहिला तुरे आणि हंगाम सुद्धा त्याच्याकडे 
आणि तो ही इतका उदार 
की त्याने फक्त हात नाही वाटला 
हातावरचे नशीब सुद्धा वाटले

तो गरुड बनण्याची शक्यता होती 
तुम्ही त्याला गारुड म्हणून बदनाम केलं 

त्याने देव मासे बनवले समुद्रातून 
तुम्ही त्या देवमाशांना घरमाश्या बनवले 
आणि त्यांच्यावर डासांचे प्रयोग आपलाय केले 

तुम्ही संघटित झालात 
आणि तळी स्वतःच्या नावावर करत राहिला 

तुम्हाला विसर पडला की 
जेव्हा तुम्हाला तहान लागली की नाही तेही कळत नव्हते 
तेव्हा तो तुमच्यासाठी पाणी भरत होता 

आणि आता तो विकलांग झाला 
तर तुम्हाला त्याच्या दारिद्र्याच्या पुटकुळ्या दिसतायत

तुम्हाला वाटले 
हा सडेल आणि मरेल 

तुम्ही त्याच्या मरणाची वाट पाहत होता
हे त्याला कळाले 
आणि त्याला ताकद मिळाली

आता तो चालला एकटा 
त्याचे उडणे तुम्ही झुरळावर आरूढ करायला पाहताय म्हणून

त्याला कळून चुकलय डुकरे ही डुकरेच असतात 
त्यांना पंख देण्याचा उद्योग करायचा नसतो 
कारण तो नासतो 

यापुढे दिसला 
तर दृष्टीभ्रम समजा

तो इतका तरबेज नक्कीच आहे 
की आपली सुगावाही तुमच्यावर पडू देणार नाही

श्रीधर तिळवे नाईक 
( डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन वर्ड्स या काव्यफायलीतून)


श्रीधर तिळवे नाईक 
(डे कॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन वर्ड्स या काव्यफायलीतून)


वैयक्तिक आयुष्यात 
व्यवस्था म्हणजे तुमच्यावर मत्सराने जळणारे लोक

तुमच्या रक्ताला सत्तेच्या पाण्याने पाडलेले भोक

तुमच्या चोख व्यवहाराचा केलेला चोखा चुथडा आणि चोथा 

मेंदूला बटाटा समजून दिलेली वागणूक 

कांदा समजून 
तुमच्या स्वतंत्र त्वचेची सोलली गेलेली पाती 

व्यवस्था म्हणजे तुमच्या जन्माआधी जन्माला आलेली 
तुमची आत्महत्या 

श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरिजमधील डेकॅथलॉन वर्डस ह्या काव्याफाईलीतून)

तुमची मराठी संस्कृती गुंडाळायला सुरुवात करा 
हा उडता गालीचा बसलेला टाळायला सुरुवात करा 

माझ्या काळजामध्ये थोडी मराठीची धुगधुगी आहे 
मी हाडाचा मराठी कवी मला फेटाळायला सुरुवात करा

मानवी संस्कृतीला एक पाठीचा कणा असतो भाषा 
तुमच्यात तो मिसिंग आहे पाठ जाळायला सुरुवात करा 

तुम्हीच समुद्र मांडला ज्याने तुमच्या नद्या बोंबलल्या 
तुमचे पाणी पळून गेले खारे पाणी पाळायला सुरुवात करा

जो आपल्या संस्कृतीत पावसाळे जपतो तो टिकतो 
तुम्ही उन्हाळ्यांना आमंत्रण दिले वाळायला सुरुवात करा 

श्रीधर तिळवे नाईक 
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन वर्ड्स या काव्यफायलीतून)

अगर बचाने वाले के लिए रब था 
तो फिर जो मर गये उनके लिए कौन था कब था 

 हादसा सिर्फ हादसा होता है
और इतना पता चलता है हुआ कब था 

गम करते करते आँखें थक गई है 
फिर भी अंदर गम सहने वाला इंसान अजब था 

मुझे इंतजार ही नही था कभी किसी मदतगार का 
फिर भी लोग आ गये उनका आना गजब था 

इतने सारे लाशों से उठकर निकल जाना 
फिर जिंदगी मे बताना ये हुआ कब था 

श्रीधर तिळवे नाईक 
(डे कॅथलॉन सिरीज मधील डे कॅथलॉन : वर्ड्स या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

A I

DHARM ANI CHAUTHI NAVTA