INTERNATIONAL
TRUMP म्प यांच्या विजयाचे मुळीच आश्चर्य वाटत नाही उत्तर आधुनिकतेने ज्या काही गोष्टी धुळीस मिळवल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे सत्य! सत्याच्या अशक्यतेच्या अनेक थेरीज उत्तर आधुनिकतेने मांडल्या आणि त्या हळूहळू सामाजिक जीवनात झिरपायला लागल्या आणि शेवटी राजकारणात पोहोचल्या यातूनच खोटे बोलणारे लोक नेते होऊ शकतात असे जनतेला जी स्वतःही खोटं बोलताना अजिबात पोटातलं पाणी हलु देत नाही तिला वाटायला लागलं खरा खोट्याची चाड नसणाऱ्या लोक मतदारांनी खऱ्याखोट्याची चाड नसणारा नेता निवडून द्यावा हे आत्ताच्या उत्तराधुनिक स्थितीला धरूनच आहे फक्त सत्याला धरून पोस्ट ट्रूथ नावाचा एक फिनॉमिना उदयाला आलेला आहे ज्याला सत्तेचा एकही टूथ दात नाही पण सत्तेचा आव असलेला प्रचंड जबडा आहे . सत्याचा आणि वास्तवाचा आग्रह धरणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट करणारे हे उदाहरण आहे अर्थात हा बोध घेणे हे पोस्ट ट्रूथ वाल्यांना शक्य नाही त्यामुळे ते जयजयकार करतच राहणार
पुरोगामी म्हणवणारे नेते प्रत्यक्षामध्ये व्यवहार पार पाडताना अपयशी होताना दिसतात कारण ते अजूनही भांडवलशाहीत अडकले आहेत कार्पोरेट शाहीमध्ये शिरून काही वेगळे विश्लेषण करण्याची गरज आहे याची त्यांना कल्पनाच येत नाही मार्क्सवादाचा पगडा अजूनही सुटू नये हे आश्चर्यकारक आहे अमेरिकेतही काही वेगळे झालेले नाही साहजिकच केवळ यश हवे असणाऱ्या राजकारणात ट्रम्पसारखा नेता उदयाला येणे अटळ होते आणि आता तर जिंकणे ही अटळ होते भारताला अर्थातच हे सोयीचे आहे कारण ट्रम्प स्वतःला मोदींचे दोस्त म्हणवतात . दमदार विरोधकांचा अभाव हे जगातल्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य बनत चाललेले आहे केवळ भारतीय वंशाच्या असणे म्हणून कन्सेशन देता येणे अमेरिकेत शक्य नाही
आपण फक्त या दोस्तीचा आपल्या देशाला फायदा व्हावा अशी अपेक्षा करू शकतो अन्यथा गंडवणारे लोक दोस्तीत सुद्धा गंडवायला काचकूच करत नाहीत तसे झाले तर मात्र ट्रम्प ही फार महागात पडणारी गोष्ट असेल.
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment