शैव २०२३

शैव धर्माची मूळ तत्वे श्रीधर तिळवे 

शैव धर्मामध्ये अनेक वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळी दर्शन सध्या दिसत असली तरी त्यांची काही मूलभूत तत्वे आहेत जी त्यांना समानता देतात ही तत्वे कुठल्याच दर्शनाला वर्ज्य नाहीत त्यामुळे त्यांच्यावर बोलणे अत्यंत आवश्यक आहे 


शैव धर्माचे पाच मुलाधार आहेत पहिला आधार शिव हेच अंतिम तत्व ! शिव हेच आरंभ तत्व ! त्याला ना जन्म आहे ना मृत्यू ! शिवात जीव विलीन होणे म्हणजेच मोक्ष होय आणि माणसाचा जन्म स्वतःच्या मोक्षासाठी आणि इतरांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आहे 


दुसरा मूलाधार शक्ती आहे शक्ती शिवाच्या साह्याने ऍक्टिव्ह होते कार्यरत होते आणि तिच्यामुळेच जिला आज आपण अनंत म्हणतो ते येते साहजिकच सगळ्या प्रसरणामागे ही शक्ती असते तर सगळ्या संकुचनामागे शिव असते 


तिसरा मूलाधार हा संसार आहे शिव आणि शक्ती या दोघांनी हा संसार थाटलेला आहे ह्याला पसाराही म्हणतात हा संसार बिलियनस् ट्रिलियनस ब्रम्हांडांनी बनलेला आहे त्यातल्या प्रत्येकात खर्व निखर्व पद्म महापद्मामध्ये आकाशगंगा आहेत आजही याचा आकार कळत नाही या संसारात आपण जीव आहोत आणि प्रत्येक जीवाचे कार्य संसार उत्तम करणे आणि संसारात भाग घेता घेता शेवटी शिवात विलीन होणे हे आहे 


चौथा मुला धार हा महाप्राण आहे ह्या महाप्राणालाच ईश्वर असे म्हणतात ईश्वर म्हणजे जगाचा संसाराचा पमहाप्राण होय हा महाप्राणच जीवातही प्राण म्हणून असतो प्राण म्हणजे शिवशक्तीची देहात असलेले असलेली निर्गुण सगुण उपस्थिती होय या ईश्वरामुळे संसार सगुण वाटतो प्रत्यक्षात तो निर्गुण आणि सगुण असा असतो तो सगुण आहे म्हणूनच जीवांना सगुणत्व प्राप्त होते आणि इंद्रियत्व मिळते पृथ्वीवर हा संसार प्रामुख्याने काम आणि अर्थ या दोन डोळ्यांच्या किंवा अक्षांच्या आधारे उभा असतो मात्र शिवाचा तिसरा डोळा इथेही उपस्थित असतो हे लक्षात ठेवावे कामाचा संबंध हा केवळ कामवासनेशी नाही तर कामना इच्छा आकांक्षा महत्वकांक्षा अशा अनेक गोष्टींशी आहे कामातूनच कुटुंब निर्माण होते कुटुंबातून कुल निर्माण होते आणि कुलातून समाज निर्माण होतो समाजातून गण निर्माण होतो गणातून महागण आणि महागणातून राज्य किंवा राष्ट्र निर्माण होते आपल्या राज्याशी किंवा राष्ट्राशी प्रामाणिक राहणे हे शैवांच्यात सांगितले गेले आहे प्रत्येक शैवाचे राज्य राष्ट्ररक्षण करणे हे कर्तव्य मानले गेले असल्यानेच प्रत्येक युद्धात शैव हरहर महादेव किंवा जय भवानी जय शिवजी किंवा जय महाकाली जय चंडी जय अंबे अशा प्रकारच्या घोषणा देत उतरत असतात अनेकांना हे हिंसक वाटते परंतु रक्षणासाठी कधीकधी आक्रमणाचा प्रतिकार करावा लागतो त्याची अनुमती शंकरांनी दिलेली आहे अर्थ म्हणजे माणसाने कलेक्टिवली सामूहिक जीवनाला दिलेला अर्थ होय यामध्ये समाजाचे राष्ट्राचे समाजकारण अर्थकारण राष्ट्रकारण कायदे कारण धर्मकारण ज्ञानकारण विज्ञान कारण तंत्रज्ञान कारण चिन्ह कारण चिन्ह तंत्रज्ञान कारण असे सर्व काही येते


पाचवा मूलाधार हा मोक्ष आणि मोक्ष मिळवण्यासाठी भगवान शंकरानीं सांगितलेली ११४ तंत्रे होय जीवाचे मुख्य ध्येय मोक्ष हेच आहे मोक्षाकडे जाण्यासाठी भगवान शंकरांनी सांगितलेली ११४ तंत्रे किंवा नंतरच्या सिद्धांनी सांगितलेली अधिकची तंत्रे अस्तित्वात आहेत या तंत्रांच्या साहाय्याने मोक्ष मिळू शकतो प्रत्येक संप्रदाय हा कुठल्या ना कुठल्या तत्त्वालाआणि तंत्राला अनुसरत असतो ही तंत्रे पंचोपायात विभागली गेली आहेत हे पंचोपाय भिन्न भासतात याचे कारण मोक्षाकडे जाण्याचे प्रत्येकाचे वाहन वेगळे असते. शैवांची ही वाहनाची कल्पना नंतर भ्रष्ट झाली आणि ब्राम्हणांनी उंदीर मोर असली वाहने दिली ही वाहने खरी वाहने न्हवेत 


खरी वाहने ही शरीर , क्रिया , ज्ञान, पूजा आणि भाव आहेत या वाहनांच्या आधारावरच हे पंच उपाय उभे आहेत पहिला उपाय योग उपाय किंवा शरीर उपाय होय यात शरीर हे वाहन असते किंबहुना शारीरिकी हा याचा कणा. ही शारीरिकी देहामध्ये सात चक्र अवयव आणि १२४ ग्रंथी यांच्यामध्ये विभागलेली असते. अवयव यांना संघटित करतात आणि या संघटनांना आपण सिस्टीम म्हणतो 


दुसरा उपाय म्हणजे क्रिया उपाय होय क्रिया उपायात क्रिया प्रमुख असते क्रिया हे जीवाचे जीव असण्याचे आद्य लक्षण होय क्रिया सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही असू शकते निर्गुण क्रियेला मोक्षिक क्रिया असेही म्हटले जाते मोक्षाकडे ज्या क्रिया घेऊन जातात त्या करणे म्हणजे क्रिया उपाय होय तुम्ही राजकारणात समाजकारणात अर्थकारणात कलाकारणात राहून सुद्धा क्रिया करत निर्गुण क्रिया करत मोक्षाला पोहोचू शकता 


तिसरा उपाय हा ज्ञान उपाय होय ज्ञान उपायांमध्ये ज्ञान हे केंद्रवर्ती असते ज्यांचा पिंड ज्ञान आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे अगदी आचार्य शंकरसुद्धा याच उपायाने मोक्षाला पोहोचलेले दिसतात म्हणूनच मोक्षानंतर त्यांनी मी शंकर मी शंकर अशीच घोषणा केलेली आहे ज्ञान उपायांमध्ये अनेक सिद्ध येतात यातील काही सिद्ध श्रमन आहेत त्यात प्रामुख्याने भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध येतात


चौथा उपाय हा भाव उपाय आहे या मार्गाने जाणाऱ्या लोकांना भाविक असे म्हटले जाते अनेकदा कलावंत ह्या मार्गाने जाऊ शकतो भारतातील भक्ती चळवळ ही मुळातच शैवानी उभी केलेली चळवळ आहे आणि तिचा आरंभ नंदीपासून होतो नंदी हा आद्यभक्त त्यानंतर तामिळनाडूमध्ये नायनार संतांनी भक्ती चळवळ सुरू झाली आणि ती जगभर पसरत गेली या सर्वांना नयनार संत म्हटले जाते महाराष्ट्रातील भक्ती चळवळीवर तिचा प्रचंड प्रभाव आहे 


पाचवा उपाय आहे पूजा उपाय यामध्ये तंत्रयोजक हे मोक्षाची साधना करतात याची सुरुवात भगवान शंकरांनी पार्वतीला दीक्षा देऊन केली होती अलीकडे तांत्रिक हा शब्द फार बदनाम झालेला आहे कारण तो अत्यंत निर्बुद्ध आणि शोषक असणाऱ्या नालायक लोकांच्या हातात गेलेला आहे प्रत्यक्षात पुजेमध्ये शोषण करण्याची अनुमती नाही तुम्ही सर्व काही लोकांसाठी करता तेव्हा एकही पैसा घेता कामा नये असा स्पष्ट आदेश आहे तरीही काही लोक हा आदेश पाळताना दिसत नाही पूजातंत्र उपाय हा आठव्या शतका नंतर प्रचंड भ्रष्ट होत गेला विशेषता बौद्ध आणि वैष्णव लोकांनी तो जेव्हा स्वीकारला तेव्हा त्याने शैवांना उडवून लावण्यासाठी अनेक गोष्टी करप्ट करायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक गोंधळ निर्माण झाले ते आजही निस्तारता आलेले नाहीत पूजेत नैतिक आवश्यकता ही प्रचंड असते त्या मूलभूत गोष्टीची गरज संपलेली दिसते आणि त्यानेच हा उपाय नष्ट केला 


हे पंच उपाय ही शैवांची खासियत आहे जीव हा संसारात अडकतो भवसागरात अडकतो त्याला भवन आणि भुवन यांची आवश्यकता भासायला लागते त्यातूनच अनेक अनिष्ट गोष्टी निर्माण होतात तंत्राला भवन आणि भुवन यातून मुक्त करण्याची प्रोसेस अवलंबावी लागते 


शैवांचे हे मूलभूत आधार आहेत म्हणून त्यांना मुलाधार म्हटले जाते यानंतर शैवांच्या मध्ये आणखी पाच सिद्ध दाखल झाले ज्यांना आद्य सिद्ध म्हणून ओळखले जाते हे पाच आद्यसिद्ध म्हणजे शंकर पार्वती गणपती स्कंद व नंदी होय या पंच सिद्धांची पूजा सुरू झाली आणि शैव धर्म जन्माला आला अन्यथा शैवांमध्ये फक्त अर्थ काम मोक्ष असे तीनच डोळे कार्यरत होते आजही हे आद्यसिद्ध शैव धर्माचा मूलभूत कणा मानला जातो भारतातील सर्व शैव दर्शने व सर्व शैव संपदाय हे या आधारांना मानतात याबाबत कोणाच्यामध्येही कसलेही मतभेद नाहीत मतभेद आहेत ते तपशिलांचे मतभेद आहेत त्यामुळे त्यांना डोक्यावर घेत शैवांमध्ये चिरफाळ्या असल्याचा प्रचार करणे हे सर्व शैव अनुयायांच्यावर अन्यायकारक आहे शैव लोक काम आणि मोक्षाला नकार देत नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे एकदा का ते लक्षात घेतले तर शैवांना शैव सिद्धानां मुले बाळे का होतात हे सहज लक्षात येईल त्यामुळेच खुद्द शंकरांना दोन मुले झालेली दिसतात गणपती व कुमार स्कंद दोघेही मोक्षाला पोहोचलेले असल्याने त्यांना सिद्ध म्हणून मान्यता मिळालेली आहे ब्रह्मचर्य ही शैवधर्मि कल्पनाच नव्हे ती युरेशियन लोकांनी भारतात आणलेली कल्पना आहे आणि ती महावीरांच्या पासून सुरू झालेली दिसते तोपर्यंत ब्रह्मचर्य हे भारतात रूढ नव्हते विशेषता मोक्षाच्या संदर्भात हे आपण लक्षात घेतले पाहिजे प्रत्येक धर्म हा भक्ती प्रधान असतो असा गैरसमज झाल्याने शैव,जैन आणि बौद्ध या तीन धर्मांच्यावर अतोनात अन्याय झालेला आहे यामुळे भारताचे जे नुकसान झालेले आहे त्याला तोड नाही ज्ञानाकडे दुर्लक्ष होण्याचे सर्वात मोठे कारण भक्ती आहे आणि एकदा ज्ञान गेले की फुले म्हणतात तसे विद्येविना मती गेली मतीविना गति गेली मग सर्वकाही गेले असे होते 

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे लोक स्वतःला शैव म्हणवून घेतात त्यांनाही आपला धर्म काय आहे तेच माहीत नसते हे लोक साधी शैव पुस्तकेही वाचत नाहीत ५०% शेव पुरोहितांना भगवान शंकराने काय सांगितले हेही माहीत नसते केवळ परंपरेने काहीतरी आलेले आचार ज्यातले अनेक आचार हे अंधश्रद्धेने निर्माण केलेले असतात ते हे लोक पाळत असतात आचारांच्या तपशीलावर आणि मूर्तीच्या तपशिलांच्यावरच यांचा सगळा भर ! मूर्तीपेक्षा भाव महत्त्वाचा आणि भावापेक्षा यम नियम महत्त्वाचे हे यांना कळत नाही साहजिकच उथळ गोष्टींच्यावर अधिक चर्चा आणि तोच पुरोहित पणाचा बाजार ! हा बाजार केवळ शैव पुरोहितांनी मांडला म्हणून क्षम्य होत नाही 


वरील पंचमुलाधारात कुठल्याही वर्णाची किंवा जातीची दखल घेतलेली नाही कारण शैवांच्यात वर्ण आणि जाती यांना कसलेही स्थान नाही हे कृपया सर्व शैवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे जात आणि वर्ण मिरवतो तो शैवच नव्हे मग तुम्ही कितीही शैव असल्याच्या टिमक्या वाजवा. शैवांच्यात समाज असतात जाती वर्ण नसतात हे कृपया लक्षात घ्या सर्वां शैवांच्यासाठी एकच जात आहे - जीव ! आपण सगळे जीव आहोत एवढे लक्षात आलं तरी खूप झालं 

हीच गोष्ट स्त्री पुरुष संदर्भात सुद्धा आहे शैवांच्यात स्त्री आणि पुरुष समान आहेत तेव्हा स्त्रीची अवहेलना करू नका हा संसार शक्तीने म्हणजे स्त्रीने निर्माण केलेला आहे तुम्ही शक्तीच्या पोटातून म्हणजे स्त्रीच्या पोटातून जन्मलेले आहात पुरुषाच्या पोटातून नाही हे सत्य स्वीकारा जिच्या पोटातून आलोय तिलाच खालची समजणे याचा अर्थ तुम्हाला वर बुद्धी नाही एवढाच होतो 

तेव्हा माझे नम्र आवाहन आहे की कृपया ही पाच मुलाधार तत्वे समजून घ्या ती काय आहेत ते पहा आणि मगच स्वतःला शैवांचे पुरोहित म्हणवून घ्या अन्यथा ब्राह्मण धर्मात आणि तुमच्या शैव-धर्मात काहीही फरक राहणार नाही ज्याचे आचरण यमनियमयुक्त तोच खरा शैव होय आत्ताच्या भाषेत जो सत्य सुकाम अहिंसा अचौर्य आस्तेय निरंकार अव्यसन अप्रमादी सुपरिग्रह युक्त तोच खरा शैव होय


 धन्यवाद


श्रीधर तिळवे नाईक 


शैव सण आणि सुट्ट्या श्रीधर तिळवे नाईक 


काल राजेंद्र गुरव ह्यांचा फोन एका बारक्या सणाचा अर्थ सांगा म्हणून ! त्यांना जे सांगितले तेच मी इथे सांगतो 


१ शैवांनी बारके बारके सण साजरे करू नयेत नाहीतर सण साजरे करण्यातच आयुष्य निघून जाईल 


२ शैवांनी विज्ञान तंत्रज्ञान चिन्हविज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्यांची कास धरावी व्रत वैकल्यात वेळ वाया घालवू नये 


३ आठवड्यातून एक सुट्टी ही ज्युडायिक संकल्पना आहे ती आपण स्वीकारू नये अन्यथा वर्षातले आणखी पन्नास दिवस वाया जातील 


४ सणांच्या सुट्ट्या ही सापेक्ष कॅटेगरी असावी व वर्षातून फक्त ७० दिवस त्यात आठवड्यातला एक रविवार टाईप किंवा मुस्लिमांना शुक्रवारटाइप असे पन्नास व इतर सणांना २० दिवस अशीच सणांची सुट्टी असावी व ऑफिसेस रोज खुली ठेवावीत ज्यांना ह्या धार्मिक सुट्ट्या घ्यायच्या आहेत त्यांनी घ्याव्यात ज्यांना घ्यायच्या नाहीत त्यांच्यावर सक्ती करू नये 


५ हे सत्तर दिवस एखाद्या नास्तिकाला वर्षातून दोन महिने मौज मस्ती करायला वापरायला हवे असतील तर ते तसे द्यावेत 


६ ह्या सत्तर दिवसाखेरीज इतर सुट्ट्या देऊ नयेत ज्यांना हव्या असतील त्यांनी पगार सोडून सुट्टी घ्यावी सुट्टीही हवी आणि पगारपणाही हवा हे चालणार नाही 


७ अर्थात आजारपणासाठी वेगळ्या सुट्ट्या असाव्यात त्यातील १० फक्त पगारी व उरलेल्या बिनपगारी असाव्यात 


८ सिरीयस आजारात मात्र मदतीची तरतूद असावी 


९ शैवांनी वर्षातून फक्त ७० दिवस सुट्ट्या घ्याव्यात ज्युडायिक धर्मांचा गॉड सहा दिवसानंतर एक दिवस विश्रांती घेतो तसे शिव करत नाही पापणी लवते न लवते तोच ह्या तत्वाने शून्याने शिवांड निर्माण केले आहे आणि ते लयही असेच पावणार आहे 


१० शैवांनी साजरे करावयाचे सण पुढीलप्रमाणे आहेत 


१ चैत्र शुद्ध प्रथमा गुढीपाडवा सुट्टी १ दिवस शुद्ध नवमी पूर्वज पूजा आदिपूर्वज शिवपूजा शक्तिपूजा सुट्टी १ दिवस शुद्ध त्रयोदशी नाथ ज्ञान सर्व नाथांना वंदन ह्यात वृषभनाथांपासून पार्श्वनाथांपर्यंत सर्वांनाच वंदन सुट्टी १ दिवस 

चैत्र सुट्टी ३ दिवस 


२ वैशाख शुद्ध तृतीया बसवेश्वर जयंती सुट्टी १ दिवस वैशाख पौर्णिमा बुद्धपौर्णिमा बुद्धास वंदन सुट्टी १ दिवस 

वैशाख सुट्टी २ दिवस 

ज्या शिवारकऱ्यांना शिवाची वारी शिवारवारी करायची आहे त्यांनी करावी 


३ ज्येष्ठ शुद्ध १४ चतुर्दशी वट पौर्णिमा शक्तिपूजा सृजनाचा वृक्ष वृक्षलिंग म्हणून वडाची पूजा ही स्त्रीपुरुष दोघांनी करावी वृक्षवाढीचा वार्षिक कार्यक्रम तयार करून तो राबवावा सुट्टी १ दिवस 

ज्येष्ठ सुट्टी १ दिवस 


४ आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमा शिव आद्यगुरू नंदी आद्यशिष्य म्हणून दोघांना वंदन शिवपूजा नंदीपुजा  

आषाढ सुट्टी १ दिवस 


५ श्रावण शुद्ध पंचमी कुंडलिनी वा नाग पंचमी राजयोगाच्या साहाय्याने सर्व मूळ नाथ प्रत्येकाच्या कुळात किमान एका नाथाची परंपरा असतेच त्याची पूजा नसेल तर स्वीकारावा सुट्टी १ दिवस 


श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा समुद्राची नदीची सरोवराची पूजा जलवृद्धीचा कार्यक्रम व अंमलबजावणी ह्यांचा आरंभ मागील वर्षाचा आढावा सुट्टी १ दिवस 

श्रावण अमावस्या बैल पोळा बैन्दूर व नंदी पूजा भाविक पूजा नंदी भक्तीने मोक्षाला उपलब्ध झाला प्राणिसंवर्धनाचा कार्यक्रम व अंमलबजावणी मागील वर्षाचा आढावा सुट्टी १ दिवस 

श्रावण सुट्टी ३ दिवस 

६ भाद्रपद शुद्ध तृतीया गौरीहर तालिका मातृदिन आईची आजीची व आई झालेल्या आपल्या बायकोची पूजा करावी सुट्टी १ दिवस 


शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी पंचमी षष्ठी ज्ञानतंत्रास सुरवात सुट्टी ३ दिवस 


ते अनंत चतुर्दशी गणपती विनायक मोक्षाला उपलब्ध झाला ज्ञानमार्ग विद्वानांनी मानव्यविद्या उत्सव तर शास्त्रकार म्हणजे गणित भूमिती तत्वज्ञ ह्यांनी शास्त्र उत्सव साजरा करावा गरिबांना मोफत प्रवेश द्यावा मोफत शिकवावे पावसाळा असल्याने ह्या गोष्टी बंदिस्त गृहात शिकवता येतात सुट्टी १ दिवस 


सुट्टी ५ दिवस 


७ अश्विन शुद्ध प्रथमा दशरात्र सुरु शक्तितंत्र आरंभ दहा शक्तींची पूजा सुट्टी १ दिवस 


दसरा वा दशहरा पर्यंत दहा दिवस दहाव्या दिवशी पार्वती हरा झाली म्हणजे मोक्षाला उपलब्ध झाली शक्तिपूजा सुट्टी १ दिवस ( स्त्रियांना १५ दिवस सुट्टी पुरुषांना जर महारात्रीऐवजी दशरात्री सुट्टी हवी असेल तर दशरात्री १५ दिवस सुट्टी द्यावी )


अश्विन १३ १४ १५ दिवाळी अश्विन त्रयोदशी कुबेरत्रयोदशी सुट्टी १ दिवस 

नरक चतुर्दशी सुट्टी १ दिवस

अश्विन अमावस्या बळी सुट्टी १ दिवस 

सुट्टी पाच दिवस स्त्रियांना १८ दिवस सुट्टी 

८ कार्तिक दिवाळी शुद्ध प्रथमा कार्तिकेय जयंती व प्रथम दक्षिणेचा अधिपती म्हणून घोषणा यम द्वितीया पाच दिवस सुट्टी २ दिवस 


कार्तिक पौर्णिमा गुरु नानक जयंती सुट्टी १ दिवस 


कार्तिक अष्टमी कालभैरवनाथ जयंती व भैरव ह्या दिवशी मोक्षाला उपलब्ध होऊन नाथ झाले नाथ संप्रदायाची सुरवात म्हणून भैरवनाथांचे स्मरण सुट्टी १ दिवस 

कार्तिक सुट्टी ४ दिवस 

९ मार्गशीर्ष शुद्ध षष्टी स्कन्द म्हणजेच कार्तिकेय कर्ममार्गाने मोक्षाला उपलब्ध झाला ज्यांना मार्शल आर्टस् शिकायच्या आहेत त्यांना ह्या दिवशी दीक्षा द्यावी सुट्टी एक दिवस 


शुद्ध पौर्णिमा कपिल मोक्षाला उपलब्ध झाला व दत्त जयंती कपिल व दत्तात्रयांचे स्मरण सुट्टी १ दिवस 

मार्गशीर्ष सुट्ट्या २ दिवस 


१० पौष कृष्ण अष्टमी मकर संक्रांत किंवा पोंगल सुट्ट्या २ दिवस 

पौष सुट्ट्या २ दिवस 


११ माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी ह्यादिवशी पार्वतीने प्रपोज केले व शंकराने स्वीकारले म्हणून ह्यादिवशी युवक युवतींना प्रपोज करण्याची व स्वीकारण्याची नाकारण्याची अनुमती द्यावी सुट्टी १ दिवस 


 कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र तपश्चर्या सुरु साधना पक्ष कलावंतांनी मोक्षाला केंद्रस्थानी ठेवून शैव मंदिरात कला उत्सव करावेत नाटक चित्रपट वेब सिरीज टीव्ही सिरीज ह्यांचे आयोजन करावे नटराज पूजनाने आरंभ व शेवट करावा कृष्ण चतुर्दशी ते फाल्गुन शुद्ध चतुर्दशी १५ दिवस साधना करावी वैज्ञानिकांनी विज्ञान उत्सव तंत्रज्ञांनी तंत्रज्ञान उत्सव चिन्हवैज्ञानिकांनी चिन्हविज्ञान उत्सव चिन्हातंत्रज्ञांनी चिन्हतंत्रज्ञान उत्सव करावा गरिबांना मोफत प्रवेश द्यावा मोफत शिकवावे सुट्टी १ दिवस पुरुषांना १५ दिवस सुट्टी स्त्रियांना जर नवरात्रीऐवजी महाशिवरात्रीची सुट्टी हवी असेल स्त्रियांनाही द्यावी 

सुट्ट्या २ दिवस पुरुषांना १६ दिवस 


१२ फाल्गुन शुद्ध चतुर्दशी भगवान शंकर मोक्षाला उपलब्ध झाले म्हणून होळी धुळवड क्लाउत्सवांची सांगता रात्री शिव पार्वती विवाह साजरा करावा व ज्यांनी वसंत पंचमीला एकमेकांना स्वीकारले त्यांचा त्यांची इच्छा असेल तर शिव मंदिरात ह्या दिवशी विवाह करावा सुट्टी एक दिवस 

फाल्गुन शेवटचा दिवस सुट्टी एक दिवस

फाल्गुन सुट्ट्या २ दिवस 

एकूण सणावाराच्या ६५ दिवस सुट्ट्या अधिक वाढदिवस वैगरें वैयक्तिक सणांच्या ५ दिवस अशा ७० दिवसाच्या सुट्ट्या असाव्यात इतक्या सुट्ट्या पुरेश्या आहेत 

वैष्णवांच्या व शैवांच्या अनेक सुट्ट्या कॉमन आहेत स्कंद षष्ठीची सुट्टी त्यांना लागत नाही त्याऐवजी श्रीकृष्ण अष्टमीची सुट्टी द्यावी शैवांची पूर्वज नवमी वैष्णवांची रामनवमी आहे गुढीपाडवा दिवाळी दसरा गणपती उत्सव दोघेही एकाच तिथ्यांना साजरा करतात 

जैन व बौद्धांच्यात सुट्ट्यांची संकल्पना नाही त्यामुळे त्यांनी ७० दिवसाच्या सुट्ट्या कशा घ्यायच्या हे त्यांनी ठरवावं 

पारश्यांच्यातही फार सुट्ट्या नाहीतच त्यामुळे ७० दिवसाच्या सुट्ट्या कशा घ्यायच्या हे त्यांनी ठरवावं 

मुस्लिम लोकांना हिंदू सणांऐवजी मुस्लिम सणांच्या ८ प्रत्येक शुक्रवारी अर्धी सुट्टी अशा पन्नास शुक्रवारच्या २५ व रमजानच्या ३२ दिवस अधिक वाढदिवस वैगरें वैयक्तिक सणांच्या ५ दिवस अशा ७० दिवसाच्या सुट्ट्या असाव्यात 

 ज्यू ख्रिश्चन लोकांना ज्यू ख्रिश्चन सणाच्या ५ रविवारच्या ५० व नाताळच्या १० दिवस अधिक वाढदिवस वैगरें वैयक्तिक सणांच्या ५ दिवस अशा ७० दिवसाच्या सुट्ट्या द्याव्यात 

भारतात ३६५ दिवस ऑफिसेस सुरु राहणं आवश्यक आहे मालकांनी कशा सुट्ट्या घ्यायच्या हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे किंवा मग ते त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे सुट्ट्या घ्यायला मोकळे आहेत 

श्रीधर तिळवे नाईक 


ह्याशिवाय १५ ऑगस्ट व २६ जानेवारी प्रत्येक शैवाने भारतात हे व इतरत्र त्या त्या देशाचे महत्वाचे राष्ट्रीय दिवस साजरे करावेत राष्ट्राभिमान जरूर असावा फक्त दुराभिमान असू नये 


श्रीधर तिळवे नाईक

फुल्यांचा शैव देशीवाद हा ओबीसी लोकांना महागात पडला काय श्रीधर तिळवे नाईक


ज्याला खऱ्या अर्थाने देशी वादाची चळवळ म्हणता येईल ती महात्मा फुले यांनी सुरू केली खुद्द भालचंद्र नेमाडे सुद्धा आद्य देशीवादी म्हणून महात्मा फुले यांचाच गौरव करताना दिसतात या गौरवाने आपण अतिशय भारावून जातो आणि नेमके काय परिणाम झाले हे मात्र तपासत नाही प्रत्यक्षामध्ये महात्मा फुले यांनी नेहमीच मार्गी देशी पोटी आणि जमाती यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि हेच मुळात शैव धर्माला धरून आहे परंतु झाले असे की धार्मिक बाबतीत फुले हे कळत नकळत टोकाचे देशीवादी झाले आणि त्याचा एक वेगळा परिणाम संपूर्ण ओबीसी चळवळीवर आणि बहुजनांच्या चळवळीवर आणि ब्राह्मण्यतरांच्या चळवळीवर झालेला दिसतो 


हे घडले याचे कारण अतिशय उघड आहे फुले यांनी भगवान शिव किंवा भगवान स्कंद असा विचार न करता त्यांनी खंडोबा आणि ज्योतिबा हे स्थानिक देव आहेत आणि त्यामुळेच ते स्वाभाविक रित्या देशी परंपरेला जन्म देणारे आहेत अशा प्रकारची मांडणी शैव संदर्भात केली आणि ही गोष्ट कळत नकळत त्यांचा संपूर्ण विचार हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित करणारी ठरली दुर्दैवाने ते जेव्हा ही मांडणी करत होते तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले नाही वास्तविक एकदा आर्य विरुद्ध अनार्य असा संघर्ष मार्गी पातळीवर पाहिल्यानंतर खंडोबा आणि ज्योतिबा यांच्या संदर्भामध्ये देशीवाद स्वीकारणे हे कळत नकळत सत्यशोधक चळवळीला मर्यादित करणारे होते मुख्य म्हणजे शैव लोकांचा जो संपूर्ण राष्ट्रीय प्रवाह आहे तो यामुळे ॲक्टिव्ह होऊ शकला असता तो या देशीवादी भूमिकेमुळे ॲक्टिव्ह झालाच नाही वास्तविक वैष्णव लोकांच्या मध्ये ज्याप्रमाणे विठ्ठलाला नंतर संपूर्ण भारतभर पोहोचवले गेले त्याचप्रमाणे खंडोबा आणि ज्योतिबाला सुद्धा संपूर्ण भारतभर जोडले जाणे अत्यंत आवश्यक होते त्यामुळे भारतातल्या संपूर्ण शैव चळवळीला एक पुनर्जीवन लाभले असते पण दुर्दैवाने देशीवादी भूमिका घेतल्याने कळत नकळत ही सगळी भूमिका महा राष्ट्रा पुरती मर्यादित होऊन गेली आणि त्यामुळेच अनेकदा देशीवादी लोक फुले यांना स्वीकारतात कारण त्यामुळे त्यांच्या वारकरी चळवळीच्या मार्गीकरणांमध्ये जो मोठा अडथळा निर्माण झाला असता तो निर्माण होत नाही एकीकडे वैष्णव चळवळ ही संपूर्णपणे विठ्ठल संप्रदायाला आपल्या कवेत घेत जात असताना महाराष्ट्रातले खंडोबा आणि ज्योतिबा या मुख्य दैवतांच्या चळवळी राष्ट्रीय शैव चळवळी होऊ नयेत याहून दुर्दैव ते काय? परंतु अनेकदा ओबीसींचे व ब्राह्मणे तर आमचे आणि बहुजनांचे संघटन करणाऱ्या लोकांना धार्मिक पातळीवर आपलं कुठे चुकले याचे साधे आत्मपरीक्षण करणे सुद्धा हल्ली अवघड होऊन बसलेले आहे इतके महाराष्ट्राचे वैष्णवीकरण झालेले आहे त्यामुळेच राष्ट्रीय प्रवाहात ज्या ओबीसी व बहुजन लोकांना सामील व्हायचे होते त्यांनी कळत नकळत वारकरी संप्रदायाकडे लक्ष दिलेले दिसते आणि ते तसे दिले जावे अशीच वैष्णव लोकांची इच्छा आहे त्यामुळे साहजिकच जिथे जिथे शैवधर्मीलोक येतात तिथे तिथे मुद्दाम महाराष्ट्रामध्ये स्थानिकीकरणाचा आणि स्थानिक दैवतीकरणाचा महिमा गायला जातो हा महिमा ओरिएंटल लोक चालवतात त्यामुळे त्याला ग्लॅमर प्राप्त होते आणि अत्यंत जाणीवपूर्वक इथले देशीवादी विचारवंत त्यांच्या साह्याने देशीवादी चळवळ वाढवत बसतात खंडोबा ही स्थानिक देवता आहे ही जर्मन ओरिएंटल दृष्टिकोनातून जन्मलेली गोष्ट आहे याचे कारण या काळामध्ये मुळातच उत्तर आधुनिकतेचा प्रचंड प्रभाव संपूर्ण जगतावर विशेषता युरोप वर पडला होता आणि १९५० नंतर आलेले अनेक जण हळूहळू स्थानिक स्ट्रक्चरच्या आहारी जायला लागले होते आणि लोकल स्ट्रक्चर चे महत्व वाढवण्यासाठी आणि मान्यता मिळवण्यासाठी हे सर्व आवश्यक बनले होते आणि युरोपियन डिस्कोर्स मध्ये त्याला मान्यता होती हे युरोपियन अमेरिकन विचारवंत उत्तर आधुनिकतेच्या नावाखाली हे सर्व कॅश करून घेत होते आणि गणेश देवी सारखे विचारवंत त्याला खतपाणी घालत होते युरोपमधल्या उत्तर आधुनिक वैचारिक करन्सीचा फायदा उठवण्याचा हा एक प्रकार होता हे लक्षात न घेताच आपल्या लोकांनी हे सगळं काय चाललंय हे उत्तर आधुनिकतेच्या संदर्भात आणि युरोपियन मान्यतेच्या संदर्भात तपासलेच नाही आपल्याला प्रसिद्धी मिळते ना मग झालं पण यामध्ये ओबीसींचे आणि बहुजनांचे आणि आदिवासींचे दलितांचे काय नुकसान होते याचे कोणालाच काही पडलेले दिसत नव्हते म्हणजेच ज्या ओबीसींच्या बहुजनांच्या जीवावर हे लोक इंटरनॅशनल उड्या मारत होते त्यांना मात्र इंटरनॅशनल रस्ते मिळायला मुश्किल व्हायला लागले वास्तविक संपूर्ण शैव-धर्माचे इंटरनॅशनल होणे अत्यंत आवश्यक होते जागतिक पातळीवर शैव धर्माचे सुद्धा जागतिकीकरण अत्यंत आवश्यक होते परंतु प्रत्येक ठिकाणी शैवधर्माला प्रादेशिक अँगल द्यायचा आणि बंदिस्त करून टाकायचे हे ब्राह्मण्य पाळणाऱ्या लोकांचे धोरणच होते आणि हे धोरण कशासाठी चाललेले आहे हे हिंदुत्ववादी सत्तेवर येईपर्यंत अनेकांना पत्ता लागला नाही साहजिकच परिणाम इतकाच झाला की जय श्रीराम च्या घोषणा १९८५ नंतर ओबीसींच्या आणि बहुजनांच्या आणि ब्राह्मण इतरांच्या सुद्धा पचनी पडायला लागल्या आणि त्यामध्ये काशी विश्वनाथ मंदिराचा महत्त्वाचा मुद्दा जो अनेकदा कायदेशीर पातळीवर लढला जाऊ शकतो तो मागे पडला आणि राम मंदिराचा इशू अधिक पुढें येत गेला यातूनच अनेक ठिकाणी काशीविश्वेश्वरयाच्या समोरच जगातले सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर जे पूर्णपणे युरेशियन पद्धतीने उभे आहे स्पॉन्सर करण्यात आले आणि त्यासाठी अनेकांच्या जे कट्टर शैववादी होते जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर जसे सगळे वैष्णव किंवा सगळे आर्यन हे काँग्रेस आणि हिंदुत्ववाद यांच्या डिस्कोर्स मध्ये एकमेकांशी कनेक्ट झाले तसे ओबीसी आदिवासी हिंदु दलित नेते एकमेकाशी कनेक्ट झालेच नाहीत आणि याला एकमेव कारण त्यांचे जे शैव कनेक्शन होते ते शैव कनेक्शन सर्वच राज्यांच्या मध्ये अत्यंत प्रादेशिक ठेवण्यात आले अगदी लिंगायत धर्म सुद्धा कर्नाटका पुरता मर्यादित राहील किंवा शीख धर्म हा फक्त पंजाब पुरता मर्यादित राहील या दिशेनेच प्रयत्न करण्यात आले जेणेकरून राष्ट्रीय काहीच होऊ नये आणि ओबीसी दलित आदिवासी कधीही राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन ब्राह्मण धर्माला काटशह देऊ नये अशी ही योजना आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की ओबीसी नेत्यांच्या लक्षात हे आले नाही आणि याला कळत नकळत ज्योतिबा फुले यांनी मांडलेला देशीवाद जबाबदार होता देशीवादाचा फक्त फायदा वैष्णव लोकांना मिळत गेला आणि त्याच वेळेला त्यांनी वैष्णवीकरण केल्याने राष्ट्रीय फायदा सुद्धा मिळवला आणि पुढे अनेक अशा चळवळी उदाहरणार्थ भक्ती वेदांत या अधिकाधिक आंतरराष्ट्रीय होत गेल्या अशा प्रकारची शैव चळवळ उभा करणे आवश्यक आहे हे सुद्धा अनेकांना कळले नाही आणि ज्यांना हे कळले त्यांनी सुद्धा कळत नकळत शैवधर्म चळवळ हिंदुत्ववादी ठेवली आणि त्यामुळे शैव धर्म लोकांचा स्पष्ट आणि ठोस ठसा उमटलाच नाही सद्गुरु हे याचे उत्तम उदाहरण आहे ते अचानक कधी वैष्णव होतात हे सांगता सुद्धा येत नाही त्यांनी राम आणि कृष्णाचा ज्या तऱ्हेने कैवार घेतला तो कैवार वैष्णव होता हे सुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही अशाच प्रकारची चूक राजर्षी महाराजांनी सुद्धा केलेली होती हिंदू हे नेहमीच भगवद्गीतेलाच प्रमाण मानतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यामुळे हिंदू असणे हे कळत नकळत शेवटी वैष्णव होणे होऊन जाते अनेक शैव विचारवंतांना अजूनही यातली ही खाचाखोच लक्षात येत नाही ज्ञानेश्वर यांच्या नावाखाली नावाखाली शेवटी ज्ञानेश्वरीच मोठी होत जाते आणि अमृत अनुभव मागे पडते हे अजूनही अनेक शैव लोकांच्या लक्षात आलेले नाही हे खरे तर नीट समजणे आवश्यक आहे 


महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती उत्तम केली आणि सामाजिक वैचारिक उठाव उत्तम केला पण राजकीय सत्तेला आव्हान दिले नाही जे प्रत्यक्षात शैव लोकांनी केले होते मराठा असोत किंवा शीख असोत हे इंग्रजांच्या विरोधात लढले होते हे अनेकदा लक्षात घेतले गेले नाही पुढे मग सामाजिक समतेची चळवळ चालवताना स्थानिक दैवतांचा आग्रह किंवा शैव दैवत हे स्थानिक आहे असा आग्रह यामुळे मर्यादा येतच गेल्या जर ओबीसी लोकांना संघटित व्हायचा असेल तर त्यांच्यापुढे शैव होण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा राष्ट्रीय कनेक्शन कसे काय तयार होणार? उच्चवर्णीय लोकांच्यासाठी वैदिक धर्म ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म आणि आता हिंदू धर्म असे चार चार धर्म संघटनात्मक पातळीवर अतिशय व्यवस्थित रीतीने काम करतात आणि या सर्व धर्मांचे धर्मग्रंथ हे पूर्णपणे युरेशियन धर्मग्रंथ आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे अलीकडे शैव धर्मग्रंथसुद्धा जाणीवपूर्वक वैष्णव पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला जातो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हेही शैव विचारवंतांच्या लक्षात येत नाही मुळातच ब्राम्हण धर्मीय लोकांनी आपल्याला मान्यता दिली पाहिजे ह्या न्यूनगंडातून निर्माण झालेल्या अपेक्षेने अनेक मोठे गोंधळ निर्माण केलेले दिसतात आपल्याला कोणाच्याही कुबड्या गरजेच्या नाहीत हे जोपर्यंत बहुजन समाजाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत बहुजन समाज कधीही स्वायत्त होऊ शकत नाही बहुजनांचे राजकीय नेते हे फक्त स्वतःपुरते आणि स्वतःपुरतेच पहात आहेत की काय असे हल्ली शंका येते त्यामुळे हे नेहमीच राष्ट्रीय पातळीवर अत्यंत नकोशा वाटणाऱ्या तडजोडी करत बसतात आणि परिणामी स्वतःची ऑथेंटिसिटी गमावतात आपल्याकडे छगन भुजबळ हे याचे उत्तम उदाहरण आहे जोपर्यंत नैतिक आचरणाचे आदर्श आपण महात्मा फुले यांच्याकडून शिकत नाही तोपर्यंत ओबीसी दलित आदिवासी विचारवंत आणि नेते कधीही महान होऊ शकणार नाहीत प्रचंड करप्शन करायचे आणि मान्यता ही हवी आहे असे म्हणायचे हे जमणारे नाही बहुजनांनी आपली नैतिक पातळी अधिकाधिक उंचावत नेऊन आपला प्राचीन आदर्श हा किती उंच होता हे आपल्या वागण्यातून सिद्ध केले पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता तेव्हा त्यांना सुद्धा अशाच प्रकारची नैतिक उंची अभिप्रेत होती अशी उंची नसली की चळवळ फोपसी होत जाते हे आता दलित चळवळी बाबत घडलेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आता अशी स्थिती चळवळ उभा करण्याआधीच जर का बहुजन समाजाची होणार असेल तर मग चळवळ फारशी उंची गाठू शकणार नाही तेव्हा राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनासाठी केवळ शैव धर्म स्वीकारून चालणार नाही तर यमनियमांचा स्वीकार सुद्धा केला पाहिजे जेणेकरून संपूर्ण बहुजन समाजाबद्दल एक आदर जगभर निर्माण होईल बाकी ज्याचे त्याचे आदर्श आणि ज्याचा त्याचा आचार. 


श्रीधर तिळवे नाईक

अलीकडे अचानक कुंभ मेल्यानंतर काही लोकांनी प्रेताचे मांस खाणारे वगैरे व्हिडिओ सुरू केलेले आहेत जेणेकरून शैव धर्माबद्दल गैरसमज निर्माण व्हावेत म्हणून हा खुलासा !


शैव योगी हे स्मशानविधी करतात आणि हा स्मशानविधी अनेकदा अनेक तंत्रांच्या मधला कॉमन फॅक्टर आहे हा नेमका काय आहे हेच अनेकांना माहिती नाही माणसाला सर्वात घोर सर्वात मोठी भीती ही नेहमी मृत्यूची असते आणि या घोरातून (या भीती व चिंतेतून बाहेर काढण्यासाठी जे तंत्र डेव्हलप केले जाते त्याला स्मशानविधी म्हटले जाते आणि जो हे विधी करतो त्याला स्मशानियोगी असे म्हटले जाते. यामध्ये सतत जळती प्रेते पाहणे व स्मशानामध्ये राहणे आवश्यक मानले गेलेले आहे ही योगामधली एक अत्यंत तात्कालीक दहा दिवसाची किंवा पंधरा दिवसाची फेज असते यामध्ये स्मशानाच्या प्रेतांच्या सानिध्यात मुद्दाम ठेवले जाते जेणेकरून आज ना उद्या तू सुद्धा असा चितेवर ठेवला जाणार आहेस आणि जळणार आहेस अशी जाणीव करून दिली जाते आणि हळूहळू भुताप्रेतांची आणि तत्सम सर्व मृत्यू विषयी असणारी भीती काढून टाकली जाते माणसाच्या मृत्यूची माणसाला वाटणारीं जी भीती आहे जे घोर आहे ते पूर्णपणे काढून त्याला पूर्णपणे अघोर करण्यासाठी म्हणजेच चिंतामुक्त भितीमुक्त करण्यासाठी हा विधी सांगितला जातो हा विधी नेमका काय आहे ते समजून न घेता त्याच्याशी अनेक फिल्मी गोष्टी अलीकडे जोडल्या जातात त्यातील एक फिल्मी गोष्ट म्हणजे स्मशान योगी लोक स्मशानात जाऊन मास खातो आता हे कुठून आले? कुणीतरी एकाने अफवा उडवली आणि मग एकापाठोपाठ एक अफवा उडत चाललेत माझ्या संपूर्ण भारतभराच्या प्रवासामध्ये मी असा एकही शैव योगी बघितलेला नाही काही मांसाहारी लोक मात्र अशा प्रकारच्या शंका माणसाच्या मंसाविषयी सुद्धा विचारत असतात कारण त्यांना मांसाहाराची इतकी चटक लागलेली असते की ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतात अशा लोकांना शांतपणे बसून मी समजावलेले आहे की हे किती चुकीचे आहे आणि तेच प्रत्येक माणसाने केले पाहिजे आणि सर्वच आचार्य ते व्यवस्थित करत असतात खरे तर साधा तर्क आहे हिंदूंच्या मध्ये स्मशानामध्ये प्रेत जाळले जाते शिल्लक उरत नाही तर खाणार कसे ?काय अक्कल बिक्कल आहे की नाही ? ख्रिश्चन व इस्लामने शैव लोकांची बदनामी करण्यासाठी मुळात हे पाखंड रचले मग इस्लामने प्रभावीत झालेल्या बॉलीवूडने हे असले उद्योग दाखवले आता इस्लाम मध्ये प्रेत शिल्लक असते कारण त्यांच्यात दफन विधी असतो हिंदूंच्या मध्ये मग ते शैव असोत की वैष्णव प्रेत जाळले जाते तिथे कसे काय मास खाणार ? प्रचाराला काहीतरी तर्क देणार की नाही? पुर्वी प्रत्येक स्मशानामध्ये रक्षक असायचा आणि आत्ताही असतो तो प्रेताचे व्यवस्थित रक्षण करत असतो आणि दुसऱ्या दिवशी चितेची राख गोळा करायला मदत करतो आणि प्रेत सर्वांच्या समोरच सर्वांच्या देखत जाळले जाते त्यामुळे खाण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा या अशा सर्व भाकडकथांच्यावर विश्वास ठेवू नका बॉलिवूड वाल्यांना काही अक्कल नसते ते भूत प्रेताची फिल्म तयार करताना काहीही दाखवतात आम्ही केवळ कलावंतांचे स्वातंत्र्य म्हणून याबद्दल मौन पाळून आहोत बॉलीवूड मधल्या फिल्मचे शॉट दाखवून काही लोक तो पुरावा म्हणून दाखवून देतात याहुन मूर्खपणा तो काय ?


श्रीधर तिळवे नाईक


महा कुंभ मेळा , बहुतंत्रता आणि धार्मिक आखूडगिरी श्रीधर तिळवे नाईक 


कुंभमेळा हा नेमका कशासाठी आहे याची चर्चा मी यापूर्वी अनेकदा केलेली आहे बारा महिन्याचे एक आवर्तन म्हणजे वर्षातून एकदा सिंहस्थ , बारा वर्षांचे एक आवर्तन म्हणजे कुंभमेळा , बारा कुंभमेळ्यांचे आवर्तन म्हणजे महा कुंभमेळा अशीही शैव योजना आहे यावर्षी असे महा कुंभमेळा असे आवर्तन आल्याने त्याचा गाजावाजा केला जाणार हे स्पष्ट होते परंतु अचानक भाजपने आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये ओडी घेतली उडी घेतली आणि बघता बघता हा इव्हेंट धार्मिक सत्ता कारणाचा आणि शक्ती प्रदर्शनाचा इव्हेंट होऊन गेला 


मी हे अनेकदा सांगितले आहे की शैव धारेमध्ये भगवान शंकरांनी 114 सांगितली तंत्रे सांगितली असे म्हटले जाते पुढे त्यांनी ही तंत्रे १ योग उपाय म्हणजे शरीर उपाय २ शाक्त उपाय म्हणजे शक्ति केंद्र उपाय ३ क्रिया उपाय म्हणजे ॲक्शन सेंटरीक उपाय ४ ज्ञान उपाय ५ भाव उपाय म्हणजेच अलीकडच्या काळातील भक्ती अशा पाच उपायांच्यात विभागली आणि या पाचही उपायांचे दळणवळण याशिवाय सर्व प्रकारच्या ज्ञानाचे दळणवळण करण्यासाठी कुंभमेळा जन्माला घातला गेला साहजिकच हा एक साहेबांचा शैव धर्माचा 114 तंत्रांचा आणि ज्ञानाचा दळणवळण उत्सव होता 


साधारणपणे इसवी सन पूर्व नव्या किंवा दहाव्या शतकामध्ये नकुलिश यांनी पाशुपत नावाचा पहिला धर्म स्थापन केला आणि हिरण्य वंशाचा राजाश्रय मिळवला त्याआधीही या धर्माची स्थापना झालेली होती परंतु त्याचे नेमके स्वरूप उपलब्ध नाही त्यावर वेगळे लिहिलेले आहे साहजिकच महाभारतामध्ये सुद्धा पाशुपत धर्माचा आणि दर्शनाचा उल्लेख आहे याशिवाय बळी वंशाची कथा आपल्याकडे परंपरेमध्ये सतत चालत आलेली आहे आणि हा वंश पशुपत होता हे खुद्द पुराणांनीच मान्य केलेली आहे आणि वैष्णव आणि शैव यांच्यातील वाद हा नंतर रंगवला गेला आणि साहजिकच हिरण्य वंशाचे राज्य हा त्या वादाचा क्षेत्र बनवण्यात आला. साहजिकच हिरण्यकश्यप आणि त्याचा नरसिंह अवताराने केलेला वध हा एक मूल आकृतीबंध तयार झाला मात्र हा आकृतीबंध सादर करताना वैष्णोधर्माने नेहमीच एक गोष्ट लपवली ती म्हणजे हिरण्य हा शैव वंश आहे विष्णूची भक्ती नाकारलेली नाही तर शेव शिवाची भक्ती स्वीकारलेली आहे आणि नंतर आलेल्या वैष्णवांना ठामपणे दिलेला नकार हे त्याचे वैशिष्ट्य आहे परंतु वैष्णव लोकांनी आणि काँग्रेसची लोकांनी कायमच हिरण्यकशपूची कथा त्याच्यानंतर प्रल्हादाची व बळीची कथा ही वैष्णव धर्माचा शत्रू एवढ्याच रूपात सादर केली मात्र हे सर्व लोक एकाच वंशाचे आणि शैव होते हे मात्र कायमच लपवण्यात आले कारण शेवटी काँग्रेस सुद्धा वैष्णववादी होती गांधीवादाचा हा परिणाम होता महात्मा गांधी हे शैव धर्माविषयी व्यवस्थित मौन पाळून होते आणि काँग्रेसने गांधी यांची ही परंपरा पुढे चालवली पुढे पुढे तर नकुलिश यांचे नाव कसे इतिहासातून लुप्त होईल याची काळजी घेण्यात आली आणि त्या जागी लकुलिश या ब्राह्मणाचे कसे हे पाशुपत दर्शन आहे हे सांगायला सुरुवात केली गेली आणि आज अवस्था अशी आहे की पाशुपत दर्शन म्हटले की लकुलिश यांचे नाव येते कारण ते ब्राह्मण होते यालाच महात्मा फुले भटांचा कावा म्हणतात विसाव्या शतकात तो पाशुपत दर्शनाबाबत व्यवस्थित काँग्रेसने चालवला आणि अलीकडे आश्चर्यकारकरीत्या भाजप सुद्धा हेच करत आहे म्हणूनच भाजप काय किंवा काँग्रेस काय शेवटी अंतिमतः वैष्णवच असतात वर आणि पुन्हा असा काही वाद अस्तित्वात नाही असे म्हणून हे लोक मोकळे असतात जणू काय यांच्या सगळ्या दंतकथांच्या मध्ये शैव कसे सुखाने राहत आहेत असे हे प्रोजेक्षण असते त्यामध्ये सगळे शैव कसे काय नेमके ओबीसी आणि पंडित आणि बीसी आणि आदिवासी आणि शूद्रांच्या ढकले ढकलले गेलेले लढाऊ समुदाय असतात याविषयी मात्र सोयीस्कर म्हणून पाळलेले असते यातल्या पंडितांनी तर शैव धर्माचा त्याग केला की काय अशीच आता शंका येते काँग्रेसने न्याय दिला नाही म्हणून भाजप तरी किमान न्याय देईल अशी शैव लोकांची समजूत होती परंतु दुर्दैवाची गोष्ट असे की शैव मते फक्त राजकारणासाठी वापरायची आणि हळूहळू शैव-धर्म नष्ट करत नाहीसा करायचा एवढाच उद्देश भाजपाचा आहे असे आता चित्र निर्माण झालेले आहे महा कुंभमेळा हा सर्व लोकांच्याकडून पद्धतशीरपणे काढून घेऊन त्याचे हिंदूकरण करण्याच्या नावाखाली वैष्णवीकरण करायचे अशी स्पष्ट आणि स्वच्छ योजना आता समोर आलेली दिसते याचा प्रतिकार करणे अटल होते तो केला गेला आणि पुन्हा एकदा शैव लोकांनी हर हर महादेव म्हणत प्रचंड गर्दी करून हे कारस्थान हाणून पाडले 


काँग्रेस शैव धर्माच्या बाबतीत किती उथळ आहे आणि उदासीन आहे हे नेहमीच सिद्ध झालेले आहे मुळात इंग्रजांच्या विरोधात 19 व्या शतकात छोटी-छोटी बंड करून शैव-धर्म थकून गेला खुद्द ब्रिटिशांना सुद्धा तो नकोच होता आणि म्हणूनच त्या विरोधात वैष्णो धर्म वाढीला लागेल याची काळजी घेण्यात आली. बौद्ध धर्म वाढीला लागेल जैन धर्म वाढीला लागेल अशी काळजी घेण्यात आली कारण हे अंतिमतः युरेशियन धर्म होते ज्याच्याशी युरोपियन वसाहत वादाला नाते जोडता येणे सहज शक्य होते साहजिकच विसावे शतक हे हिंदू धर्माच्या नावाखाली आलेला वैष्णववाद आणि ब्राह्मणवाद यांचे होते या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हरहर महादेव अशी घोषणा देऊन भाजपमध्ये वेगळे चैतन्य निर्माण केले तेव्हा सर्वच्या सर्व ओबीसीबीसी आणि आदिवासी हळूहळू नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले दुर्देवाची गोष्ट अशी की खुद्द नरेंद्र मोदी यांना आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याचे रहस्य कळालेले दिसत नाही आणि आज अवस्था अशी आलेली आहे की सर्व गोष्टीविषयी आणि पाठिंबाविषयी आता पुनर्विचार करावा हीच गोष्ट आदित्यनाथ योगी यांच्याबाबत आहे ते गोरख मठाचे आहेत आणि गोरखनाथ हे शैव होते याचा विसर त्यांना पडला आहे की काय अशी आता शंका येते आहे अर्थात महा कुंभमेळ्यात मात्र पुन्हा एकदा हर हर महादेव अशी घोषणा या दोघांनीही दिलेली आहे मात्र ती किती स्वरूपात कायम स्वरूपात राहील याविषयी शंका आहे दुसरी गोष्ट सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणे हे अत्यंत आवश्यक आहे केवळ धार्मिक आभास निर्माण करून सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील यावर शैव धर्माचा विश्वास नाही हे आता सांगायची वेळ आलेली आहे 


तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा आत्ताच्या चर्चेची काय संबंध आहे हा संबंध आहे कारण नकुलीश यांनी ब्राह्मण धर्माविरोधात पहिले बंड केले होते आणि त्याला बळी वंशाचा राजकीय आधार होता पद्मपुराणामध्ये स्पष्ट आणि स्वच्छपणाने हिरण्यकश्यप हा पाशुपत होता असा उल्लेख आहे ही एक नवी राजकीय व्यवस्था होती. जिला पुढे बळीने फार मोठा आधार पुरवला तिच्यात फूट पाडण्यासाठी म्हणून मग प्रल्हादाची काल्पनिक कथा निर्माण करण्यात आली आणि प्रल्हाद विष्णू भक्त म्हणून दाखवण्यात आला जे प्रत्यक्षात असत्य होते जर असे असते तर प्रल्हादाची हत्या नंतर करावीच लागली नसती बळी वंशातल्या प्रत्येक राज्याची राजाची राजकीय हत्या का करावीशी वाटली हा खरे तर कळीचा प्रश्न आहे आणि पाशुपत दर्शनाच्या इतिहासात तो वारंवार विचारला जातो माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की यामागे नकुल विषयांचे धनगर असणे आणि त्यांनी दिलेला धर्म किंवा धर्म हा समतावादी असते हे खरे कारण आहे अशा प्रकारची समता ज्यांना नको होती त्यांनीच हा सगळा प्रकार जास्तीत जास्त दडपण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मग वेगळ्या पौराणिक दंतकथा उभ्या करून इतिहास लपवला गेला त्यातच बळीराजाची अत्यंत प्रसिद्ध अशी कथा येते तिथे सुद्धा वामन नावाचा छोटा अवतार जो ब्राह्मण आहे बळीराजाला पाताळात गाडतो अशी खोटी रस रचना केली जाते यामुळे शैवांच्या भावना दुखावल्या जातात याची सुद्धा कसलीही काहीही फिकीर ब्राह्मण धर्म आणि वैष्णव लोकांनी केलेली नाही कारण शैव-धर्माला ते कायमच प्रतिस्पर्धी मानत आलेले आहेत कारण ही लढाई बळीवंशापासूनच सुरू होते आणि महात्मा फुले यांनी हा संघर्ष प्रथमच इतिहासात आणला म्हणूनच या लोकांना महात्मा फुले हे फार मोठे शत्रू वाटत असतात अलीकडे तर काही लोक वामनाचे समर्थन करायला उतरलेले दिसतात याचा अर्थ शैव लोकांनी काय घ्यावा ? या बळी वंशातल्याच कपिल याने पुढे षष्टीतंत्र डेव्हलप केले ज्यातून सांख्य दर्शन डेव्हलप झाले याच वेळेला ब्रह्म दर्शन सुद्धा ब्रह्म तंत्रातून डेव्हलप झाले आणि उपनिषदांच्यातून प्रकट होत गेले याच सांख्य दर्शनातील कपिल याचा प्रभाव पडून महावीर आणि बौद्ध गौतम बुद्ध यांनी आपला धर्म उभा केलेला आहे म्हणजेच एका अर्थाने धर्म राजकीय प्रणाली म्हणून बळी वंशामध्ये विकसित होत गेली आणि ती पुढे ब्राह्मणधर्माने आणि नंतर जैन आणि बौद्ध या धम्माने विकसित केली गौतम बुद्ध हा स्वतःला शास्ता म्हणजेच एका अर्थाने शासक म्हणजेच राजकीय म्हणवून घेतो हाच विचार आपण अधिक नीटपणे पाहिला तर आता आपण असे म्हणू शकतो की तंत्र हे मोक्षिक असते मात्र त्यातून दर्शन किंवा धर्म किंवा धम्म अशा राजकीय विचार प्रणाली विकसित होत असतात त्यामुळे जे लोक महा कुंभमेळ्या मधल्या राजकारणाबद्दल बोलत आहेत त्यांना हे पुन्हा एकदा सांगणे आवश्यक आहे ते अंतिमतः दर्शन अथवा धर्म किंवा धम्म ही राजकीय विचार प्रणाली आहे ज्याची सुरुवात नकुलीश यांच्या पाशुपत दर्शनापासून सुरू झालेली आहे आणि दर्शनाला म्हणजेच शैव राजकीय प्रणालीला शह म्हणून धर्म निर्माण करण्यात आला जो स्वतःच राजकीय प्रणाली होता आणि या धर्माला शह देण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आजीवक जैन आणि बौद्ध हे एक वेगळी नैतिकता घेऊन राजकीय विचार प्रणाली म्हणून उभे राहिले थोडक्यात भारतीय राजकीय प्रणालींच्या संदर्भामध्ये आपणाला दर्शन त्यातून पुढे मग शह देण्यासाठी धर्म आणि धर्माला शह देण्यासाठी म्हणून धम्म अशा प्रकारचा राजकीय विचारांचा इतिहास मांडावा लागतो यातील धर्म हा विषमतेवरच उभा आहे शोषणाच्या बाजूने उभा आहे आणि त्यामुळेच तो पुरोहित आणि शासक राज्यकर्त्याचा काय वार घेत असतो आणि म्हणूनच त्याचा पुढे सर्वाधिक प्रचार होत आपणाला जुडाई धर्म निर्माण झालेले दिसतात जे स्वतः दुसरे तिसरे काही नसून राजकीय विचार प्रणालीच आहे या सर्व राजकीय विचार प्रणालींचा आधार श्रद्धा आहे फरक आहे तो पद्धतीत आहे दर्शनामध्ये प्रथम प्रचिती येते तर धर्मामध्ये श्रद्धा येते तर धम्मामध्ये आत्मचिकित्सा आणि धर्मचिकित्सा येते पुढे पुढे दर्शन आणि धम्म दोन्हीही ताब्यात घेण्याचा प्रयत्न धर्मांनीच करायला सुरुवात केली भारतामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण धर्म आणि वैष्णव धर्म आणि अलीकडेच हिंदू हा धर्म राजकीय प्रणाली म्हणूनच उदयाला आलेले आहेत आणि म्हणूनच सारे च्या सारे धार्मिक राजकारणच करत असतात या हिंदू धर्माचे दोन गट पडतात एक हिंदूवादी राजकीय प्रणाली आणि दुसरा हिंदुत्ववादी राजकीय प्रणाली यातील पहिल्या हिंदूवादी राजकीय प्रणालीने सेक्युलरिझम स्वीकारून स्वतःची मांडणी केलेली आहे तर हिंदुत्ववादी लोकांनी सेक्युलरिझम नाकारला आहे त्यांनी धर्मवाद स्वीकारला आहे साहजिकच हा धर्मवाद दर्शनाच्या वर आणि धम्मांच्या वडिलांना सतत प्रयत्न चालू झालेला आहे हा महा कुंभमेळा म्हणजे शैव लोकांच्यावर लादलेली धार्मिक विचार प्रणाली होता प्रत्यक्षात शैव लोकांनी ती स्वीकारली नाही उलट अनेक धर्माच्या लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत शैव लोकांनी एक वेगळेच दर्शन घडवले आहे साहजिकच त्या विरोधात काँग्रेस बॉम्ब मारणार आणि सेक्युलर लोक पण बोंब मारणार याची कल्पना होती हे करताना काँग्रेस नेहमी हिंदू धर्म कसा प्लूरल आहे आणि महा कुंभमेळा हा कसा फ्लूरलिझमच्या विरोधात आहे हे सांगणार हे अपेक्षितच होते इंडियन एक्स्प्रेसमध्ये या अंगाने मांडणी आलेली आहे वास्तविक कुंभमेळ्यामध्ये जितका बहुमता वादाचा आदर सामान्य जनमानसांनी दाखवलेला आहे त्याची दखल या लोकांना नाही हे आधीच तयार झालेल्या मतानुसार कुंभमेळा पहात आहेत असे स्पष्ट दिसते या लोकांनी भाजप नेते काय म्हणतात यापेक्षा महा कुंभमेळ्यात असलेल्या सर्व लोकांचा जर का मागवा घेतला असता तर त्यांना काही वेगळी चित्र दिसले असते शैव धर्म हा नेहमीच सर्व जुलैक लोकांना आपले मंदिर खुले ठेवत असतो माझे स्वतःचे रवळनाथ मंदिर हे ख्रिश्चन लोकांसाठी कायमच खुले असते आणि आमची ख्रिश्चन लोकं तिथे अनेकदा नवस पण बोलतात अलीकडच्या काळामध्ये जेव्हा वारकरी संप्रदाय अतिशय संकुचित होत गेला तेव्हा अत्यंत खुल्या पद्धतीचा एक नवा शैव पंथ शिर्डी मध्ये साईनाथांच्या नावाने शैव लोकांनी प्रचलित करून त्याचा प्रचंड भारतभर प्रसार केला शैव लोक नेमके कसे ऍक्टिव्हेट असतात याची कसलीही कल्पना आपल्याकडच्या तथाकथित विचारवंतांना आणि ओरिएंटल लोकांना असत नाही ते कुठल्यातरी कागदी ताजमहालामध्ये व्यस्त असतात किंवा ब्राह्मणधर्माने पुरवलेल्या डाटाला शरण जात असतात साईबाबा हे शैव-धर्मी लोकांनी तयार केलेले उत्तर आधुनिक दैवत आहे आणि याची नीट कल्पना युरेशन लोकांना असल्यामुळेच त्यांनी शंकराचार्यांच्याद्वारे त्या विरोधात भरपूर प्रचार केला होता पण हा प्रचार शैव लोकांनी मनावर घेतलेला दिसत नाही अर्थात प्रथम प्रमाणे आत्तापर्यंतचे राजकारण बघता हळूहळू ज्याप्रमाणे बाळू मामा ताब्यात घेतले गेले त्याप्रमाणे साईनाथ सुद्धा ताब्यात घेतले जातीलच आणि नेहमीप्रमाणे शैवलोक उदासीन राहतीलच 


साहजिकच महा कुंभमेळाला राजकीय भानगड म्हणून काँग्रेस विरोध करणार हे स्पष्टच होते समाजवादी आणि मार्क्सवादी विरोध करणार हे स्पष्ट होते तसा तो झाला पण यामुळे या देशातल्या बहुजन असलेल्या शैव लोकांना घंटा काय फरक पडला नाही पडणारच नाही खरे तर शैव लोकांना एका राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची गरज आहे ही गरज नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेली आहे असे शैवधर्मी लोकांना वाटत होते प्रत्यक्षात अचानक खुद्द नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम म्हणून पाठ केल्याने सगळ्याच शैव लोकांची पंचाईत झालेली आहे प्रथम महात्मा फुले नंतर बाबासाहेब आंबेडकर आणि आता नरेंद्र मोदी यातल्या प्रत्येकाने आपल्याच लोकांच्याकडे पाठ केलेले आहे प्रथम महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून आणि तो ख्रिश्चन बनवून शैव धर्माकडे पाठ केली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून शैव लोकांच्याकडे पाठ फिरवली आणि आता नरेंद्र मोदी यांनी वैष्णव धर्म स्वीकारून शैव धर्माकडे पाठ फिरवलेली आहे महा कुंभमेळ्याच्या चर्चेमध्ये ही गोष्ट अतिशय ठळकपणे समोर आलेली आहे यापुढे नवोदय लोक कायमच साहेबांच्या विरोधात काम करतील हे स्पष्ट आहे त्याचबरोबर फुलेवादी मंडळी सुद्धा कायमच सर्व धर्माच्या विरोधात टाकतील हे स्पष्ट दिसते आणि आता नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाची दिशा बदलण्याऐवजी हिंदुत्वाची पारंपारिक दिशा पत्करालयाने त्यांनीही पाठ फिरवल्या जमा आहे साहजिकच या सगळ्या मधून जी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली आहे ती कशी भरून काढायची हा शेव धर्मी लोकांच्या पुढचा सर्वात मोठा तात्विक प्रश्न आहे एका बाजूला दैनंदिन गरजांच्या मध्ये हा समाज पूर्णपणे गाडला गेला आहे त्याची तिथे प्रचंड पडवळ चालू आहे जिच्याबद्दल कोणालाच काय पडलेली नाही आणि दुसरीकडे धार्मिक पातळीवर आणि सांस्कृतिक पातळीवर त्याला नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न सुरू झालेले आहेत अगदी नवं बौद्ध सुद्धा सर्व धर्म कसा नष्ट करता येते तेच पाहत आहे त ते वारकरी संप्रदायाला स्पष्ट आणि स्वच्छ पणाने मिळालेले आहेत याचा परिणाम काय होईल याची सुद्धा त्यांना कल्पना नाही त्यांना असे वाटते की ओबीसी त्यांच्या बरोबर येतील पण हे होणार नाही कारण भारतभर वारकरी संप्रदाय नाही तिथे शैवधर्मच आहे त्यामुळे महाराष्ट्रातला दिसणारा नकाशा म्हणजे भारताचा नकाशा नव्हे इतकी अक्कल लोकांना येवो अशी आपण प्रार्थना करू शकतो याबाबतीत अलीकडचे एक उदाहरण देतो संभाजी महाराजांच्या छ*** चे चित्र आले आणि आता रिसिप्ट शेट्टी चे रिषभ शेट्टी चे शिवाजी महाराजांच्या संदर्भातले पहिले पोस्टर आले तिथे भवानी माता ही स्पष्ट आणि स्वच्छपणाने अत्यंत मोठ्या आकारात उभी आहे आणि शिवाजी महाराज तिचे भक्त म्हणून आहेत उभे आहेत कन्नड लोक आपल्या होळसा घराण्यातून आलेल्या आपल्या महापुरुषाकडे कसे बघतात त्याचे हे उदाहरण आहे त्या उलट महाराष्ट्रात मात्र शिवजी नष्ट करून शिवाजी आणण्याचे प्रयत्न कायमच झालेले आहेत आणि हे प्रयत्न कायमच ब्राह्मण धर्माने केलेले आहेत वास्तविक शिवजी आहे म्हणूनच शिवाजी आहेत पण हे कोणी कोणाला सांगणार खुद्द शिवाजी महाराज स्वतःच हे सांगत होते परंतु त्याकडे पाठ फिरवणे हा इथल्या तथाकथित अभिजन वर्गाचा उद्योग होऊन बसलेला आहे या लोकांना खंडोबाची आणि तुळजाभवानीची बहुतेक भीती उरलेली दिसत नाही माणसाला त्याच्या आराध्यदेवतेपेक्षा अत्यंत जाणीवपूर्वक मोठे करणे हे ब्राह्मणांचे राजकारण असते त्या राजकारणाला किती बळी पडायचे याला काही मर्यादा असतात या मर्यादा ओलांडल्या जात आहेत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यामध्ये पुरोगामी लोकसभा अत्यंत धूर्तपणे आणि सामील होतात कारण त्यांना सुद्धा शैव धर्म नकोसा झालेले आहे म्हणूनच फुलांचे नाव घ्यायचे परंतु फुलांचे विचार कुठेही जाऊ नयेत या दृष्टीने धडपड करायची त्यांचा सत्यशोधक धर्मच जाणीवपूर्वक पुढे आणायचा आणि त्यांची सेवा बाजू लपवून ठेवायची असा उद्योग पुरोगामी करत असतात यात नवबौद्ध लोक व विचारवंतसुद्धा येतात आत्ताच्या घडीला या सगळ्याला सामोरे कसे जायचे हाच प्रश्न आहे महा कुंभमेळ्याच्या निमित्ताने शैवकांनी आपली संघटित ताकद दाखवून दिली हे या कुंभमेळ्याचे सर्वात मोठे यश आहे या यशाची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल पुरोगामी लोक या देशात कधी सुधारले नाहीत ते पुढे सुधारतील अशी चिन्हे नाहीत त्यामुळे खुद्द साहेबांनीच शैव हरी मी लोकांनीच धर्मी लोकांनीच आता आपला विचार करावा हे बरे 

जय शिवजी जय भवानी हर हर महादेव 


श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना