MOKSH MILHALYANANTR KAY GHADTE

 मोक्ष मिळाल्यानंतर काय घडते श्रीधर तिळवे नाईक


१ 

मोक्ष मिळाल्यानंतर देह संपतो असा एक फार जणांचा गैरसमज आहे देह संपत नाही तुम्हाला भूक लागते तहान लागते हागायला लागते तुम्हाला मुतायला लागते या सर्व गोष्टी मोक्ष मिळाल्यानंतर सुद्धा सुरू असतात याबाबतीत ही भाषा मी मुद्दामच वापरतोय कारण लोकांच्या फार रोमँटिक कल्पना असतात देह असतो पण त्याचे ऑपरेशन त्याची ऑपरेटिंग सिस्टीम ही मात्र अहंकाराच्या ताब्यात राहत नाही ती शून्याच्या ताब्यात जाते शैवांच्या भाषेत ती शिवाच्या ताब्यात जाते बौद्धांच्या भाषेत ती शून्याच्या ताब्यात जाते जैनांच्या भाषेत ती कैवल्याच्या ताब्यात जाते ब्रह्मसुत्रांच्या व उपनिषदाच्या भाषेत ती ब्रह्मच्या ताब्यात जाते मनुष्य तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे उरलो उपकारापुरता होऊन जातो यातला जो उपकार आहे त्याचा अर्थ एहसान असा नाही उप आकार असा आहे मूळ आकार शून्याचा आणि देह केवळ उप आकार बनतो


मोक्ष मिळाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात त्यातली एक गोष्ट म्हणजे स्वप्न पडणे बंद होते पण याचाही अर्थ अनेकांनी चुकीचा लावलेला आहे प्रत्यक्षात स्वप्न मधले स्व जाते बाकी फायलींगचे जे काम असते ते मेंदू करतच राहतो त्यामुळेच भेटलेली माणसे लक्षात राहतात बोलल्या गेलेल्या गोष्टी लक्षात राहतात आणि त्यांची व्यवस्था लावावी लागते आणि रात्री हे व्यवस्था लावण्याचे काम सुरू असतं त्यामुळे स्वचा कल्पनात्मक जो विलास चालू असतो तो बंद पडलेला असतो परंतु फायलिंग मात्र सुरूच असते आपल्याकडे या बाबतीत अनेक गैरसमज पसरवले गेलेले आहेत म्हणून मी हे बोलतोय एक गोष्ट मात्र वेगळी घडते ती म्हणजे हे फायलिंगचे काम साक्षी भावाने तुम्ही पाहायला लागता.

३ 

मोक्ष मिळाल्यानंतर सर्वाधिक विलक्षण गोष्ट जी घडते ती म्हणजे तुम्हाला मिळालेला ग्रँड वेलकम हा वेलकम सिद्ध वंशाकडून मिळतो बौद्धांच्या भाषेत बुद्धवंसाकडून मिळतो आत्तापर्यंत होऊन गेलेले सगळे सिद्ध तुम्हाला भेटतात त्याविषयीच्या तुमच्या अनेक संकल्पना कोसळून पडतात मोजेस , जीझस , महंमद पैगंबर यांच्यापैकी कुणालाही मोक्ष मिळालेला नसतो आणि हे आश्चर्यकारक असते किंवा ओशो रजनीश यांना मोक्ष मिळालेला नसतो आणि हेही आश्चर्यकारक असते त्याउलट भगवान शिव भगवती पार्वती गणपती स्कंद नंदी भैरवनाथ नकुलीश कपिल, अष्टा वक्र, भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर बोधिधर्म सरहपा तिलोपा आचार्य शंकर , संत निवृत्तीनाथ संत ज्ञाननाथ ,संत सोपाननाथ ,संत मुक्ताई ,संत नामदेव , संत जनाबाई , संत मीरा संत एकनाथ संत तुकाराम संत नरहरी सोनार संत चोखोबा मेळा संत रोहिदास योगी गोरखनाथ योगी मच्छिंद्रनाथ योगी गहनी नाथ बसवेश्वर अक्का महादेवी काडसिद्धेश्वर जे कृष्णमूर्ती रमण महर्षी राम कृष्ण परमहंस साईबाबा मन्सूर रूमी गुरुनानक शिखांचे अनेक गुरू गुरजीफ , झेन परंपरेतले अनेक जण असे अनेक जण दिसतं असतात भारतातल्या आदिवासी लोकांच्यातून अनेक लोक मोक्षाला पोहोचलेले इथे भेटतात स्वतःला भेटलेला आणि झाडावर बसून असणारा एखादा आदिवासी येथे दिसतो अनेक दलित वस्तीत काम करणारे पण मोक्ष मिळवणारे मध्ययुगीन काळात वावरलेले लोक इथे भेटतात अनेक साधे साधे आयुष्य जगणारे पण प्रत्यक्षात सिद्ध असणारे लोक इथे भेटतात यात भाजीवाल्यापासून ते पेपर वाल्यापर्यंत सगळे असतात शेतकऱ्यांच्या पासून लोहार काम करणाऱ्यांच्या पर्यंत अनेक जण आपल्या दैनंदिन जीवनात समाज पाळत मोक्ष मिळवून बसलेले असतात आणि त्याची वाच्यता सुद्धा ते करत नाहीत ते इथे भेटतात यांचे इतिहासात कुठेही नाव नसतं याचं आपल्यालाच आश्चर्य वाटायला लागतं ज्यांना प्रेषित मानले जाते ते पोहोचू नयेत आणि स्कॉटलंड मधला कुठलातरी एक शेतकरी मोक्षाला पोहोचलेला असतो हे फार विलक्षण असते पुरोगामी चळवळीत काम केलेले राजा राम मोहन राय पासून महात्मा गांधींच्या पर्यंत यांच्यापैकी कोणीही या सिद्ध वंशात नसते जे आश्चर्यकारक असते


यातून तुम्ही जेव्हा परतता तेव्हा सगळ्या भेदाच्या भिंती कोसळलेल्या असतात मात्र अपवादात्मक वेळेला जे स विकल्प समाधीच्या अवस्थेत असून नंतर मात्र एका वेगळ्या जन्मात सिद्ध झालेले असतात तेही दिसतात आत्ताच्या जन्मात जे असे असतात तेही दिसतात पण हे फार दुर्मिळ प्रकरण आहे साहजिकच तुमच्या बरोबर प्रवास करणारे अनेक सहयात्री एका गूढ प्रेरणेने तुम्हाला येऊन भेटायला लागतात अर्थात विद्वान किंवा टीकाकार नावाची जमात मात्र मोक्षाला अनेकदा पोहोचलेली नसते तुम्ही फक्त त्यांना हसू शकता हसता आणि पुढे निघता कारण कित्येकदा अहंकार इतका मोठा असतो की प्राथमिक काम सुद्धा त्यावर त्यांनी केलेले नसते अनेकांची साधी साधी व्यसने सुटलेली नसतात मात्र ते उत्तम बोलतात अशावेळी त्यांच्या या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकता त्या उलट ज्यांना साधना पुढे न्यायचे आहे अशा लोकांना मात्र आपोआपच मदत देणे सुरू होते पण असे लोक संख्येने खूप म्हणजे खूपच कमी असतात

मोक्ष मिळाल्यानंतर काय घडते श्रीधर तिळवे नाईक 


मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अंत अनुभवाचा अंत साहजिकच मेथींचाही अंत त्यात काळ आणि अवकाश यांचा अंत येतो तिथे काहीच नसते म्हणून त्याला शून्य अवस्था म्हणतात या शून्यालाच शैव लोक शिव म्हणतात मोक्ष मिळाल्यानंतर जेव्हा ह्या मितींच्या पासून बनलेल्या शिवांडात पुन्हा प्रवेश होतो तेव्हा अवकाश म्हणजे लांबी व रुंदी खोली आणि काळ या चारी मिती म्हणजे डायमेन्शन्स पुन्हा ऑपरेट होतात साहजिकच प्रत्येक मोक्ष मिळालेल्या व्यक्तीला तिच्या काळाची व अवकाशाची मर्यादा असते कारण एकदा तुम्ही मितिंच्या जगात येऊन बोलायला लागला की ह्या मिती त्यांच्या पद्धतीने ऑपरेट होतात त्यामुळे मोक्ष मिळालेला पुरुष किंवा स्त्री कितीही महान असो त्यांना त्यांच्या काळाच्या आणि अवकाशाच्या मर्यादा पडलेल्या असतात आपल्याकडे जणूकाही या मर्यादा पडलेल्या नसतात अशा थाटात बोललं जातं मोक्ष मिळालेली व्यक्ती ही मीतींच्या पलीकडे असते पण ती जेव्हा व्यवहारात येते तेव्हा तिला मिती घेरून टाकतात त्यामुळेच बुद्ध संगणका विषयी बोलत नाही आणि जे कृष्णमूर्तींना 1990 नंतरच्या निर्माण होऊ घातलेल्या वेगळ्या बदलांच्याविषयी जाणीव नसते परंतु अनुयायांना आपला माणूस मितीच्यां पलीकडे आहे हे दाखवण्याचा जबरदस्त शौक असल्याने ते आपले त्यांचा शब्द म्हणजे जणू काय अंतिम शब्द अशा थाटात वावरत असतात प्रत्यक्षात त्यांची सगळी अभिव्यक्ती अवकाश आणि मर्यादित केलेली असते याचा अगदी साधा पुरावा म्हणजे ती व्यक्ती ज्या भाषेत बोलते ती भाषा तिने आसपासच्या अवकाश आणि काळ यांच्या मधूनच घेतलेली असते त्याच्या भाषेत बोलतात ती भाषा ते लहानपणी शिकलेली भाषा असते कुठलीही माणसाला माहीत नसलेली भाषा ते बोलत नसतात तिथेच देवभाषा हा प्रकार कोसळून पडतो पण कोणी कोणाला सांगायचं ? महंमद पैगंबर यांच्या पूर्वीही अरेबिक भाषा होतीच गौतम बुद्धाच्या आधीही पालीभाषा होतीच तेव्हा भाषा आधी असतातच आणि त्याच भाषेत सिद्ध अथवा प्रेषित बोलत असतात तेव्हा ही मर्यादा स्वीकारूनच मोक्ष मिळालेल्या व्यक्तींचा विचार झाला तर तो फायद्याचा ठरेल अन्यथा त्यांच्यावर देवत्व लादले जाणे अटळ आहे आणि एकदा देवत्व लादलं की मग त्यांचे अनुकरण कठीण आहे याबद्दल आपोआपच एकमत होत जाते आणि माणूस सगळे आपली जुनी पापी पुन्हा करायला मोकळा होतो 

श्रीधर तिळवे नाईक

मोक्ष मिळाल्यानंतर काय घडते श्रीधर तिळवे नाईक 

मोक्ष असतो तेव्हा तिथे फक्त शिव असते शून्य असते कैवल्य असते तिथे कुठलाही ईश्वर किंवा देव असत नाही तिथे कुठलाही पुनर्जन्म असत नाही किंवा कर्माफल सिद्धांत असत नाही तिथे कुठलेही कर्मचा असत नाही साहजिकच या संदर्भातल्या कुठल्याही प्रश्नांचे अंतिम उत्तर मोक्षामध्ये असत नाही कारण मोक्षात मुळात हे प्रश्नच उपस्थित असत नाही दुर्दैवाने मोक्षावर ज्यांना मोक्ष मिळालेला नाही असेच लोक जास्त बडबड करत असतात आणि हे लोक आपला कल्पनाविलास मोक्षाच्या नावाने खपवत असतात प्रश्न असा आहे की मग पुनर्जन्म असो किंवा कर्मफल सिद्धांत असो यांच्या संदर्भात मोक्षाची काही भूमिका असते की नाही तर या संदर्भात मोक्ष फक्त शून्य आहे त्यामुळेच या संदर्भातली सगळी अंतिम उत्तरे ही विज्ञानाने शोधायला हवीत किंवा ही उत्तरे तूर्तास कोणाकडेच नाहीत असा स्पष्ट आणि स्वच्छ स्टान्स घेणे आवश्यक आहे दुर्देवाने आपल्याला माहित नाही हेच कबूल करायला अनेकांना लाज वाटते म्हणूनच लोक होकारात्मक किंवा नकारात्मक उत्तरे देत बसतात मोक्ष ना होकार देतो ना नकार देतो कारण तिथे प्रश्नच अस्तित्वात नसतात तिथे फक्त शिव असते शिव असते शिव असते 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना

A I

DHARM ANI CHAUTHI NAVTA