नेट थिमस

 सौं चुहे खाये 

उनका कुछ नही हो सकता

ना वे जिंदा हो सकते हैं

ना वे वापस आ सकते हैं


मगर बिल्ली हजको चली हैं

तो शायद उसका कुछ हो सकता हैं


हो सकता हैं

वो शायद 

चुहे खाना छोड दे

और व्हेजीटरियन बने


हो सकता हैं वो ना बदले

और मजहबके नामपे

और ज्यादा चुहे खाना शुरु करे


तो आखरी सवाल

हृदयपरिवर्तनकाही होता हैं 


हज जाना तो बहाना है 


तबतक हैंही

चुहे और बिल्लिका

सनातन खेल


देखते रहीये

और दुआ मांगते रहीये

बिल्ली आपको हमेशा बिल्ली समझे

और आप बिल्ली के सामने 

कभी ना आये


और अगर आप बिल्ली हैं

तो हज जानेका चॉईस

आपकेलीये अवेलेबल हैं


श्रीधर तिळवे नाईक

(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )


पहिले देणारे अन परतावा न मागणारे 

दुसरे देणारे पण परतावा मागणारे 

तिसरं घेणारे पण घेतल्यानंतर परतावा देणारे 

चौथे घेणारे पण परतावा न देणारे 

पाचवे घेऊन पुन्हा खंजीर खुपसणारे 

सहावे हिसकावणारे 


तुला कुणाच्यात जायचंय हे तू ठरव 


पहिला होशील तर आकाश स्वच्छ राहील 

तारे तुझ्या चांगुलपणाची वाट पाहतील 

पण माणसं तुला च्युत्या समजतील 

तुझी वचनं वाचली जातील 

शोपीस म्हणून टांगली जातील 

हा समाज संतांना दयामाया दाखवत नाही 

ठोकतो 

अशावेळी कदाचित चमत्कार तुला वाचवतील 

तुझे फ्लॅशेस खरे झाले तर लोटांगण घालतील 

लक्ष्यात घे 

हाही सर्व दिखावा असेल 

लोक तुझ्या फ्लॅशेस मध्ये स्वतःचा फायदा पाहतायत 

एव्हढाच त्याचा अर्थ असेल 

तेव्हा पहिला होताना विचार कर 

लोक ईश्वरालाही वापरण्यासाठी ठेवतात 


दुसरा बनशील तर लोक नैतिक म्हणतील 

उपकार करतील घेतील 

तुझ्या पाऊलखुणा भाषेला टाकतील 

तुझ्या केसात मोरपंख खोवतील 

ह्या अटीवर कि 

तू त्यांना मोर आणून देशील 

मात्र ज्यादिवशी तू परतावा मागशील 

तेव्हा चौथे पाचवे सहावे खवळतील 

तुझ्या हृदयातले समुद्र त्यांना खारट लागतील 

तुझी उड्डाणे त्यांना पाळलेली वाटतील 

तुझी स्वप्ने ते सिंकमध्ये सोडण्याच्या प्रयत्न करतील 

तेव्हा मैत्री फक्त पहिल्या ,दुसऱ्या आणि तिसऱ्याशी कर 

बुडण्यापासून वाचशील 

आणि समुद्रात आजन्म पोहशील 


तिसरा बनशील तर 

तराजू म्हणून हिणवतील 

तुझ्या मिश्या किंवा स्तन धूर्ततेच्या नादघंटा वाजवतील 

पापणी लवायच्या आत तुझी पापे कॉईन होतील 

पुण्ये नोटा 

मात्र पॅचप करायला शिक 

प्रत्येकवेळी परतावा बारकावा म्हणून कळेलच असं नाही 

हाताला थोडी ढील दे 

पहिला आणि दुसरा आला कि 


चौथा बनशील तर 

काहीकाळ यशस्वी होशील 

मग तुझी वृत्ती फेमस होईल 

आणि कीहोलमधून वादळे येतील 

शब्द स्वतःची जहाजे बनवून नाहीसे होतील 

आणि एक दिवस तू बुडशील 

तूच तयार केलेल्या पाण्यात 

तेव्हा लवकरच तिसरा दुसरा पहिला बन 


पाचव्या सहाव्यांना मी दारातसुद्धा उभं करत नाही 

तर कवितेत काय उभं करणार ?


सो पाचवा सहावा बनशील तर 

तुझ्यासाठी माझ्या दारांवर एक पाटी आहे 

"माझ्या कुत्र्यांपासून सावध रहा 

त्यांना माणसे हुंगता येतात 

ती अयोग्य माणसांना चावण्यात वाकबगार आहेत "


श्रीधर तिळवे नाईक 

(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )


द ऍनिमल इज रिटर्नड 

पशु परतलाय 

जिथून तू सुरवात केली होतीस पशुपतीनाथ म्हणून 


अल्फा लायन बनण्यासाठी सिंह भांडतायत 

म्हाताऱ्याला हुसकावतायत 

आणि लायनेस तमाशा पाहतायत 

जो विजयी तो त्यांच्यासाठी अल्फा 

जो गेला तो गतकाळाच्या डाटा 


चिम्पाझी नीट संभोगत नाहीत 

ते फिमेल चिम्पाझीवर थेट जबरदस्ती करतायत 

आणि विज्ञान सांगतंय कि 

माणसाचं चिंपांझींशी साम्य आहे 


कदाचित तू हे स्पष्ट ओळखणारा पहिला वैज्ञानिक होतास 

म्हणूनच तू पशु आणि पाश अधोरेखित केलेस 

आणि म्हणालास 

प्रथम मानवी बना मग दैवी 

कारण उत्क्रांती तुम्हाला कायमस्वरूपी पशु बनवण्यासाठी 

घडलेली नाहीये 

स्वतःतून माणूस आणि देव निर्माण करण्यासाठी घडलीये 


रद्दीत जमा होतायत भांडवलदार अन साम्यवादी 

पुरोगामी आणि प्रतिगामी 

कार्पोरेट्स अन रेट्स 


एक रॉटन टोमॅटो पृथ्वीएव्हढा झालाय 

त्याचं नेटवर्क जगभर 

सॉससारखं वाटलं जातंय 


मी क्लिशेत सापडत नाहीये कुठल्या 

मी जिवंत नस झालोय जी ठसठसतीये 

ठसवतीये 

कि मोक्षाची शक्यता अजून दुर्मिळ झालेली नाहीये 


शरीरभर फक्त गोळा करण्याची आसक्ती स्पॉन्सर 

अन तिला ओळखणारा माझा सेन्सर 

सारे सेन्सॉर धुडकावत 

मी वाढत राहिलोय वाढतोय 


मॉल बांधून काळजात 

उडतायत प्राण्यातल्या प्राण्यात 


मी प्राणात 

प्रणाली बनत 

अनात्मिक 


एक मरणाचं शतक चालवलं माझ्या अस्तित्वासमोर 

सब्जेक्ट इज डेड पासून आयडियालॉजी इज डेड पर्यंत 

जे मरत न्हवते त्यांना आत्महत्या करायला लावली विसाव्या शतकानं 

मी जीवनात थांबलो 


अंधार ओढून शटर डाऊन करणाऱ्यांना मी टॅक्सी दाखवली 

मीटर डाऊन न करणारी 

ब्रॉन्झ झालेल्या सायंकाळी 

मी गोल्डन केल्या नव्या सूर्योदयात 

लोक म्हणाले सुपर हिरो आऊटडेटेड झालेत 

मी म्हणालो मी नव्या फिल्म्सचा नायक आहे 


पॉझिटिव्हिटीच्या हवामानात मी पाऊस पाडले 

रस्त्यांच्यावर कॅमेरे लागले तेव्हा मी सावल्या धाडल्या 

ज्यांना झाडं उभी करता येत नाही त्यांनी कॅमेरे उभे करावेत ?


उथळतेचा सरफेस गोमुत्राने सारवणाऱ्यांना मी संगणक शिकवला 

आणि खोलात न्हेले प्रोग्रामिंगच्या 

म्हणालो "नवे युग येते तेव्हा धर्म जिवंत होतो 

तुम्ही मोक्ष जिवंत करा 

अन्यथा पुन्हा एकदा गायी कार्स रिप्लेस करतील 

आणि बैलगाड्यांना लागणारे बैल मिळणार नाहीत 

अन तुम्ही बैलांजागी जुंपले जाल 


पशुपालन माणसांनाही पशु म्हणून ट्रीट करतं 

अन माणसाचा जन्म स्वतःतल्या पशूला उत्क्रांत करायला झाला आहे "


पशुपतिनाथा 

बाटलमध्ये गेलं कि पाणी श्रीमंत होतं 

माश्यांना पकडणारी जाळी नेटवर्क झाली कि महागडी होतात 

कास्टिंग काऊचवर व्हायला लागलं कि अभिनय न्यूडिटी बनतो 


कपडे काढून पशु सेलिब्रेट करायला निघालेले लोक 

उन्हाळ्यांचा खून करून सूर्य गाजवणारे लोक 

वेगाच्या वेडाने एकमेकांवर आदळणारे लोक 

धर्म रिव्हर्समध्ये टाकून मागे न्हेणारे लोक 


मर्डर माणसाला अल्फा मेल बनवतो म्हणून मर्डर करणारे लोक 

ज्ञानाच्या अंत :स्फोटात श्रद्धा ठेवून जाणारे लोक 

कवींच्या टेबलवर कविता स्पॉन्सर करणारे लोक 

घटना लक्ष्यात न ठेवता फक्त पॅटर्न रिपीट करणारे लोक 


मॅप बघून अटेन्शन आखून यात्रा करणारे लोक 

देव बघून कुठला नवस बोलायचा ठरवणारे लोक 

आयुष्याच्या मैदानात न उतरता थर्ड अंपायर बनून व्यक्तींना जज करणारे लोक 

करायचे नाही पण करावे लागते म्हणून गोष्टी करणारे लोक 


मी कायमच फाट्यावर मारत 

आतला क्युट दिवा एक्झिक्युट करत 


मला माहीतीये मी ऍनिमल ओलांडलाय 

मला माहितीये मी डिव्हाईनच्या दारात आहे 


फक्त ती जम्प दे 

जी थेट शून्यात पडेल 

काळीज आणि मेंदू परफेक्ट बनवून 


खेच माझा देह दिव्यांगांत 


पशुपतिनाथा 

कर पशूचा अस्त 

पतीचा शेवट 

नाथाचा अंत 


उडव 

मिसाल नसलेले हे मिसाईल 


शून्याचा दाखला मागतोय हा आखिल देह 

दाखल करून घे 


कितीकाळ मला केवळ दखल म्हणून ठेवणार आहेस ?


श्रीधर तिळवे नाईक 

(नेट सिरींजमधील नेट: थीम्स ह्या काव्यफाईलीतून )

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना