net prem
net prem
चाव्या एकमेकांना देतांना विश्वासार्हतेच्या हातांचे झालेले ऍपल श्रीधर तिळवे नाईक
चाव्या एकमेकांना देतांना विश्वासार्हतेचे झालेले अँपल
संगणकाचा दिलेला ताबा पासवर्ड द्यावा कि नाही
फर्निचरच्या मांडणीला छेद बसू शकतात सांडणीचे
टेबलाचा पाय काढून पाया हलवण्याची होऊ शकणारी घाई
तुझ्या डोळ्यात प्रेम आणि काम पापण्यांचे तरुण डोंगर
लग्न केल्याशिवाय पुण्य होत नाही लग्नापूर्वीचा संभोग पाप
देताना विसरलो कि माझ्याकडे डुप्लिकेट नाही चावीची
आणि समोर मीच खरेदी केलेले कुलूप मिश्या पिळत अफाट
पुन्हा येऊ कि फोन करू कि पुन्हा मागू चावी ओरिजनल
तुला काय वाटेल कि कमी होईल ट्रस्ट सगळं फिस्कटेल
मी मोबाईल चाळवतोय तुझ्या फोन नम्बरशी चंचल चाळा
सतत भास कि तूच परतलीयेस घेऊन चावी आणि डेल
मी बसलोय माझ्या दारात तुझ्या प्रेमात पकडून चौकट डावी
ताटकळणारे डोळे ज्यांना माहीत नाही कधी परतणार ओरिजनल चावी
श्रीधर तिळवे नाईक
{नेट सिरींजमधील नेट प्रेम ह्या काव्य फाईलीतून }
कॉप्या करणारी मुलगी म्हणते
आय लव्ह यु
स्वतःतले शहर हाकलून देऊन मुंबईत आलेली
पोपटांचा हिरवा थवा पेंटिंगमध्ये सस्पेंड न करणारी
इंटरनेटवर स्वतःचं मॉडेलिंग वाळत घालणारी
त्वचेत आदळत म्हणते
श्रीधर आय लव्ह यु
तिला स्वतातली दारू मॅनेज करता येत नाही
आणि तिची गणितावर पी एच डी सुरु आहे
तिचे सभ्य प्रवास कधीही पावलांना पिळू शकतात
मी तिला बारावीला कॉपी करताना पाहिलं रुईयाला
अन ती म्हणते
श्रीधर आय लव्ह यु
झोकांड्या ब्रेकफास्ट करतायत
कदाचित लंच करूनच एन एन पी सोडतील
ती म्हणतीये मला प्रकाशला न्हे
तिखटजाळ आलू मटर खायला घाल
मी दारू पाजणार नाही तिला माहितीये
वय एक्सेचज करण्याचे वय निघून गेलंय
घरसुद्धा टुरिस्ट स्पॉट झालंय
अशावेळी असे गेस्ट स्फोट कोण सहन करणार
तेही कॉपी करणाऱ्या मुलीचे
रिक्षा काळापिवळा स्कर्ट उडवत
टॅक्सी काळी मॅक्सी घालत
तिच्या गालावरची खळी
मागतीये माझा बळी
कॉपी करणारा वामन
स्वतःची सूर्य लीला मळी
भाषा सांताक्लॉज झालीये
सिड्यूस होण्याची भीती
कामवासना रिड्यूस करण्याची शपथ घेतलेल्या काळजात
कॉपी हीच जिची इंट्रोडक्शन
तिच्याशी सेक्स करावा कसा
स्वतःला ओरिजनल समजणाऱ्या माणसाने
मी नाही म्हणतोय
"का ?"
"कारण मी ओरिजनल आहे "
"ठीक आहे मग मी तुम्हाला कॉपी मारते तुम्ही मला पेस्ट करा "
मी सेक्सच्या फ्लॅट स्क्रीनवरून जम्प मारत
थेट खुर्चीत
आणि मला भीती
कुठल्यातरी दूरवरच्या हॅकड नेट्वर्कमधून
ती मारत असेल माझी कॉपी
ओरिजनल नष्ट करण्याचा गेम खेळत
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सिरींजमधील नेट:प्रेम ह्या काव्य फाईलीतून )
Comments
Post a Comment