Yuval Harari नारळीकर

 चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी


 १


महाराष्ट्रात अलीकडे युवाल हरारी याची चर्चा जोरदार चालू आहे याचे कारण अमेरिकेतल्या पॉप लिटरेचरची एकंदरच जगभर असलेली लोकप्रियता आहे अत्यंत सोप्या भाषेत वैज्ञानिक सत्य सांगणे हे सायंटिफिक पॉप लिटरेचरचे वैशिष्ट्य असते ते हरारीच्या लेखनामध्ये ओतप्रत भरलेले आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आश्चर्यकारकरीत्या हे करताना तो व पु काळ्यांच्याइतकाच लाघवी असतो साहजिकच अशा प्रकारचे वाचन करणाऱ्या लोकांना तो एक देवदूत वाटला तर आश्चर्य नाही 


आमच्या पिढीने चौथ्या नवतेचे काही प्रश्न निर्माण केले त्यांची स्वतःच्या डाटा उपलब्धतेनुसार उत्तरेही दिली आणि हे प्रश्न आता अधिक व्यापक डाटा घेऊन दुसऱ्या पिढीत सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छपणे झिरपलेले आहेत हे आपणाला हरारीच्या लेखनावरून स्पष्टपणे प्रतीत होते मराठीत त्याचा अनुवाद होतो हा नेहमीच मला पॉझिटिव्ह इव्हेंट वाटत असतो याचे कारण मराठीमध्ये चौथी नवता पसरवायची असेल तर असे सर्व वैज्ञानिक पॉप लिटरेचर अनुवादित होणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य माणूस सुद्धा त्याच्या भोवताली काय चालले आहे हे नीट समजून घेईल मला नेहमीच या गोष्टीचा आनंद होतो की चौथ्या नवतेच्या दुसऱ्या पिढीतील प्रणव सखदेव हे अत्यंत ताकतीने त्याचा अनुवाद करत आहेत


कुठलेही तत्त्वज्ञान जेव्हा उदयाला येते तेव्हा ते अत्यंत किचकट असते उदाहरणार्थ जिला आज आपण उत्तर आधुनिकता म्हणतो ती प्रथम फ्रेडरिक Nietzsche याने अत्यंत व्यवस्थित मांडली परंतु त्याच्या समकालीन लोकांना ती झेपलेली दिसत नाही कारण त्या काळामध्ये उत्तर आधुनिक विज्ञान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले नव्हते पुढे आईन्स्टाईन मुळे सर्व गोष्टी सोप्या होत गेल्या आणि Nietzsche काय म्हणतो हे अधिक नीट समजत गेले पुढे मग उत्तराधुनिकता नीट समजावून सांगणाऱ्या पॉप लिटरेचरची निर्मिती व्हायला लागली फार प्राचीन काळापासून युरोपमध्ये ही प्रथा आहे आणि सोफिस्ट लोक ती नेहमीच चालवत आलेले आहेत अलीकडे तर या लोकांचे मूळ सॉकॅटिस मध्ये आहे आणि सॉक्रेटीस हा त्यांचा आद्य पुरुष आहे अशा प्रकारची मांडणी पुढे येते आहे भारतामध्ये शैव परंपरेमध्ये हा सर्व खटाटोप पंडित लोकांच्याकडे दिलेला होता त्यांनी तो कितपत नीट पार पाडला हा एक आता मोठा प्रश्न आहे युरोशीयन परंपरेमध्ये श्रुतीमध्ये हे काम ब्राह्मण लोकांनी हातात घेतले खरे परंतु त्यांनी चक्क त्या आधारे एक धर्म निर्माण करून टाकला आणि प्रत्येक धर्म स्वतःच्या ताब्यात घेण्याचे व ताब्यात ठेवण्याचे टेकनिकच डेव्हलप केले पाश्चात्त्य देशांमध्ये असा उद्योग तिकडच्या धर्माधिकारी लोकांनी केलेला होता आणि जीजस बळकावला होता त्या विरोधात प्रोटेस्ट ठेवून प्रोटेस्टंट निर्माण झाले आपल्याकडे मात्रे अजूनही असे प्रोटेस्ट निर्माण झालेले नाहीत अपवाद फक्त बसवेश्वर गुरुनानक आणि महात्मा फुले हे शैवच आहेत इतर आणि मात्र कायमच तडजोडी स्वीकारलेल्या दिसतात आणि ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य केलेले दिसते अलीकडेच कुंभमेळ्यावर ब्राह्मण धर्माने ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो पण सरते शेवटी तो फसलेला दिसतो खुद्द अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांनी हर हर महादेव म्हणतच पवित्र स्नानाची डुबकी घेतलेली दिसते अशा प्रकारचे वर्चस्व पाश्चात्त्य देशांमध्ये धर्माधिकारी लोकांचे राहिलेले नाही साहजिकच तिथे वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक पॉप लिटरेचर अतिशय चांगल्या रीतीने निर्माण होते अर्थात तिथेही कधीकधी सपाट करण्याच्या नादामध्ये मूळ सिद्धांताला धक्का लागतो तेव्हा वाद निर्माण होतो

साहजिकच असे लोक निर्माण होणे योग्य की अयोग्य हा कायमच वाद आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रात तो कायमच निर्माण होऊन राहिलेला आहे


युवाल हराळीचे स्कूल कुठले असा प्रश्न नेहमी मला अनेक लोक विचारत असतात माझे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे त्यासाठी आपणाला थोडे आईन्स्टाईन कडे जावे लागते उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन ची सापेक्षतेची थेरी नीट समजत नव्हती तेव्हा बर्ट्रांड रसेल ह्याने अतिशय सोप्या भाषेत ते समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषे स्पष्ट करण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला होता (एबीसी ऑफ रिलेटिविटी)आणि हा प्रयत्न यशस्वी झाला इतका की खुद्द आईन्स्टाईनने जगात फक्त तीनच लोकांना सापेक्षता कळलेली आहे आणि त्यातील एक रसेल आहेत असे सर्टिफिकेट दिले होते आणि तिथून पुढे लोकप्रिय वैज्ञानिक वाङ्मयाचे एक नवीन रसेल स्कूल निर्माण झाले हरारीचे पूर्वज निपजायला सुरुवात झाली याला मी रसेलियन पॉप लिटरेचर म्हणतो हे लोक अत्यंत प्रामाणिकपणे संपूर्ण मांडणी ठेवत असतात आणि त्याचबरोबर काही इन्साइटससुद्धा पुरवत असतात कारण मुळात ते स्वतः तत्त्वज्ञ असतात हरारी या स्कूलमध्ये येतो असे लोकांना गाभा समजावून सांगणारे काही सोफिस्ट लोक प्रत्येक पिढीमध्ये निर्माण होणे फार गरजेचे असते पाश्चात्त्य देशांमध्ये अशी परंपरा कायमच राहिलेली आहे आपल्याकडेही धार्मिक क्षेत्रात मोक्षिक क्षेत्रात अनेक कीर्तनकार हेच करत असतात मात्र आपल्याकडे अनेकदा मूळ गाभा अत्यंत भ्रष्ट होत जातो उदाहरणार्थ पुराणे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत किंवा वारकरी संप्रदायातल्या लोकांची कीर्तने आपण ऐकली तर आपणाला असे दिसते की संत तुकारामांच्या अभंगाची कधीकधी चांगली आणि कधीकधी टोकाची सोपी करण्याच्या नादामध्ये मनोरंजक विश्लेषणे झालेली आहेत विज्ञानामध्ये मात्र जितकी निर्मिती या अंगाने व्हायला हवी होती त्या अंगाने झालेली नाही त्यामुळे साहजिकच हरारीचे महत्त्व मराठीसाठी तरी प्रचंड आहे किंबहुना प्रत्येक ग्रंथालयामध्ये हा मनुष्य जाणे आवश्यक आहे कारण त्या निमित्ताने का होईना पण चौथी नवता ही भानगड काय आहे हे अधिकाधिक उलगडत जाण्याची शक्यता असते 


श्रीधर तिळवे नाईक


चौथ्या नवतेची दुसरी पिढी डॉ युवाल नोआ हरारी भाग २


उत्तराधुनिकतेने धर्म पुन्हा केंद्रस्थानी आणायला मदत केली आणि चौथ्या नवतेमधल्या सर्व विचारवंतांना त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी पेलावी लागली हरारी याला अपवाद नाही 


माझी स्वतःची याबाबतीतले मांडण अशी होती की धर्माशी आणि धार्मिक कट्टरतेशी सामना करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी मोक्ष प्रमोट करावा लागेल धर्म हा धर्माला उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे धर्माला उत्तर द्यायचे असेल तर ते मोक्षानेच देता येते हरारीला मोक्ष उपलब्ध नाही हे त्याचे दुर्दैव किंवा असे म्हणू की झियोनिस्ट दुर्दैव ! साहजिकच तो पुन्हा एकदा ज्यू धर्माच्या सेकंड टेम्पल वार कडे जातो आणि पुढे मग झियानिजमिक राष्ट्रवाद कसा आहे हे सांगायला लागतो इतकेच नव्हे तर जू लोकांचा राष्ट्रवाद ज्यू लोकांना का नाकारला जातो असा प्रश्नही तो उपस्थित करतो ज्या भूमीवर ज्यू लोक क्लेम करतायेत तो क्लेम कसा ऐतिहासिक आहे हेही पटवण्याचा प्रयत्न करतो प्रश्न असा आहे की हे त्याला का करावे लागते? दुसरा प्रश्न असा आहे की हे हिंदुत्ववादी लोकांच्या सारखे आहे का ? म्हणजे ब्राह्मण धर्माला अलीकडे जो लोकांच्या सारखी स्वतंत्र राष्ट्राची आवश्यकता वाटायला लागलेली आहे ब्राह्मणे तर चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात जर भारतात पसरली तर ब्राह्मण धर्माचे हकालपट्टी होणे अटळ आहे असे ब्राह्मण धर्मे लोकांना वाटते प्रत्यक्षात त्या तथ्य नाहीये परंतु त्यांना तसे वाटते हे मात्र खरे आहे म्हणूनच अधून मधून ब्राह्मणांसाठी स्वतंत्र राष्ट्र मागितले जाते प्रश्न असा आहे की ब्राह्मणांना स्वतःचा हा ब्राह्मण धर्म जो सरळ सरळ वंशवादी आणि वर्णवादी आहे टिकवावासा का वाटतो एवढे सगळे रामायण आणि महाभारत घडून गेल्यानंतर सुद्धा वारंवार मुस्लिम आणि इंग्रजांच्या कडून पराभूत झाल्यानंतर सुद्धा वर्ण व्यवस्थेचा हा दुराग्रह का सुटत नाही स्वतःला टॉपला ठेवण्याचा हा आग्रह का सुटत नाही हे खरे तर खरोखर अवघड होऊन बसलेले आहे एक प्रकारे हा एक वंशवाद आहे आणि तो जेनेटिकल नाहीये तर ज्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला ते ब्राह्मण अशा प्रकारच्या कट्टर व्याख्येतून तो आलेला आहे त्यात ब्राह्मण्यतरांचे स्थान हे कायमच दुय्यम राहणार हे उघड आहे पण आश्चर्यकारकरीत्या हे दुय्यम स्थान सुद्धा अनेकांना सुखकारक वाटते की काय अशी सद्यस्थिती आहे ज्यू लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाहीये कारण मुळात ज्यू च एक महाटोळी आहे अशी त्यांची धारणा आहे जिच्यात अनेक किमान 13 टोळ्या येतात असे त्यांना वाटते ज्यू आणि ब्राह्मण लोकांना आपण देवाकडून निवडले गेलेलो आहोत असे वाटत असतं ब्राह्मण स्वतःला त्यामुळेच बिनधास्तपणे भूदेव म्हणवून घेऊ शकतात खरे तर बौद्धिक पातळीचा विचार केला तर जितके क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन जीव लोकांचे आहे त्याच्या धड २% कॉन्ट्रीब्युशन सुद्धा ब्राह्मण धर्माला आणि ब्राह्मण लोकांना देता आलेले नाही याचे कारण त्यांची बुद्धी त्यांनी धर्मामध्ये वाया घालवली याउलट ज्यू लोकांनी आपली बुद्धी सायन्स व तंत्रज्ञानाकडे वळवून अनेक जागतिक दर्जाचे सायन्स आणि तंत्रज्ञानातले काम करून दाखवले आणि त्यामुळे ज्यू लोकांच्या बद्दल एक प्रचंड आदर सर्वत्र आहे अपवाद फक्त मुस्लिम लोक आहेत अशा प्रकारचे काम करून दाखवले तरी हिटलरला हे लोक शत्रू वाटावे शत्रु वाटावेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे सर्वात वाईट गोष्ट त्याचा अहंकार हा आर्य अहंकार होता आणि आश्चर्यकारकडी त्या ब्राह्मण लोकांना हा आरे असण्याचा अहंकार फार प्राचीन काळापासून आहे किंबहुना भारताला आर्यावर्त म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली होती ब्राह्मण असो किंवा रोमन कॅथोलिक असोत या दोघांच्याही मुळामध्ये मुळात युरेशियन मुळे आहेत आणि आश्चर्यकारकरीत्या ती अजूनही ऍक्टिव्ह आहेत की काय अशी मला शंका येत असते कारण हे दोघेही कायम स्वतःला वेगळे काढत असतात मुळसा ख्रिश्चन धर्म आर्यन ख्रिश्चन धर्म कसा काय बनला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा इतिहास आहे आणि त्यामध्ये रोमन अरे लोकांनी अत्यंत मेजर बजावलेला आहे असे असून सुद्धा आश्चर्यकार्यक रित्या हे दोन धर्म एकमेकाचे शत्रू होण्याऐवजी आता एकत्र येऊ बघतात याचे कारण हिटलरने स्वतःला आर्य वंशी म्हणून प्रमोट केले असले तरी स्वतःचा धर्म मात्र त्याने ख्रिश्चन असा सांगितलेला आहे तो खरंतर कितपत ऑथेंटीक आहे याविषयी मला शंका आहेत कळत नकळतपणे प्रोटेस्टन्ट धर्मात त्यांच्या संस्थापकाचा म्हणजेच मार्टिन ल्युथर याचा जो धर्म होता त्यात जू लोकांचा जो द्वेष चालला होता तो द्वेष जर्मन परंपरेतून त्याच्याकडे चालत आलेला होता असे आता दिसते त्यासाठी लागणारे तर्कशास्त्र आर्य सिद्धांताने त्याला पुरवावे आणि हेच सिद्धांतन ब्राह्मणांना सुद्धा आपले वाटावे याहून शोकांतिका काय ? हरारी जेव्हा भारतात येतो तेव्हा त्याला हे सगळे डायनॅमिक्स किती कळलेले असते याबद्दल मला शंका आहेत साहजिकच हिटलरच्या सर्व कारवायांनी जीव लोकांच्या मध्ये ज्यू लोकांच्या मध्ये एक प्रकारे असुरक्षितता निर्माण केली आणि म्हणूनच त्यांना स्वतःच्या सर्वांसाठी आणि स्वतःच्या धर्माच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज भासायला लागली ही परिस्थिती आपण जर का हिटलरच्या काळात गेलो तर आपण नीट समजून घेऊ शकतो आणि ज्यू राष्ट्राला मान्यता ही देऊ शकतो त्यामुळे भारताचा इस्त्राईल या स्वतंत्र राष्ट्राला असलेला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा भारताने कायम स्वरूपात ठेवलाच पाहिजे कारण नैतिकदृष्ट्या तो योग्य आहे पुन्हा कोणी ज्यू विरोधात काही करणारच नाही याची कसलीही खात्री माणसाच्या संदर्भात देता येत नाही आता ही जी इनसिक्युरिटी आहे ज्यामधून इस्त्राईल तयार झाला त्याच्याबाबतीत ऑब्जेक्शन कोणाचे आले तर आश्चर्यकारक लिहिता हिटलर यातून सुटला आणि मुस्लिमांना आता इस्त्राईल नकोसे झाले आहे साहजिकच इस्त्रायल पासून मुस्लिम आणि मुस्लिमांच्या पासून इस्त्राईल आता इन सिक्युअर झालेले आहेत आणि त्यातूनच आत्ताच्या गाजा पट्टीचा प्रश्न आलेला आहे 


प्रश्न असा आहे की ब्राह्मण लोकांच्या मध्ये ही जी इन सक सिक्युरिटी आली आहे तिचे मूळ नेमके कशात आहे आणि कुठून आली ?


वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या महायुद्धात हिटलरने जी प्रचंड ज्यू लोकांची हिंसा केली तशीच हिंसा काश्मीरमध्ये पंडित लोकांच्या वाट्याला आली त्यामुळे साहजिकच एक प्रचंड भय ब्राह्मण धर्मी लोकांच्या मध्ये निर्माण झालेले आहे साहजिकच आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावेच लागेल ही एक प्रखर जाणीव ज्या मागे खुद्द त्यांचे धार्मिक टेक्स्ट आहे सतत जो लोकांच्या मध्ये जशी वाढत गेली आणि शेवटी इस्त्राईलची निर्मिती झाली तसे काही भारतात झाले आहे का महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये अचानक ब्राह्मण लोकांच्यावर हल्ले झाले ते खरोखरच इतके तीव्र होते का की ज्यामुळे ही इन्सिक्युरिटी निर्माण व्हावी ? की ब्राह्मण लोकांना असे वाटते की त्यांनी काहीही केले तरी लोक ते गप्प बसतील त्यांनी प्रतिकार करता कामा नये कारण ब्राह्मणाची हत्या करू नये असे ब्राह्मणांच्या धर्मात सांगितलेलेच आहे प्रत्यक्ष मध्ये ब्राह्मणे तर लोक हे पाळतात असे नाही त्यामुळे मग ही इन्सिक्युरिटी आली आहे का भारतातले ब्राह्मण लोक आणि त्यांचा ब्राह्मण धर्म हा अनेकदा ज्यू लोकांच्या धर्मासारखा आहे असे ब्राह्मण लोकांना वाटत असते आणि म्हणूनच त्यांना इस्त्राईलबद्दल आणि ज्यू धर्माबद्दल प्रेम वाटत असते त्यामुळेच हरारीच्या अनुवादाला आपल्याकडे अनेकदा हिंदुत्ववादी प्रचंड प्रमाणामध्ये उत्तेजन देताना दिसतात कारण शेवटी हरारी फिरून फिरून गंगावेस या म्हणीप्रमाणे ज्यू धर्माकडे परततो 


प्रश्न असा आहे की ज्यूधर्म हा काही आंतरराष्ट्रीय धर्म आहे का? तर नाही ! त्यामुळेच एकीकडे हरारी स्वतःची मांडणी आंतरराष्ट्रीय असे आहे असे मानतो आणि दुसरीकडे झियनिझमचे पूनरागमन झाले पाहिजे असेही म्हणतो चौथ्या नवतेत ही सक्ती झालेली आहे कारण शेवटी इस्लामला पर्याय म्हणून कोणता धर्म द्यायचा हा सर्वांच्या पुढेच प्रश्न ठाकला आहे आणि याचे कारण इस्लाम हा पसरत चाललेला आहे धर्म नाकारला की धर्म येत नाही अशी एक पुरोगामी समजूत होती त्या समजूतिला पूर्ण छेद इस्लामने दिलेला आहे आणि याचा दबाव युवाल हरारी वर आहे मला स्वतःला वैयक्तिक रित्या शैव धर्म निवडण्याची सक्ती झाली याचे कारण आत्ताची इस्लामने आणि ब्राह्मण धर्माने निर्माण केलेली परिस्थिती आहे मी बौद्ध धर्म निवडण्याचाही प्रयत्न केला होता परंतु ते शक्य नाही हे माझ्या लक्षात आले विशेषतः भारतात तर ते अजिबात शक्य नाही पण जिथे बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे तिथे बौद्ध धर्माची शक्यता नाकारता येत नाही माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की आज ना उद्या चीनला बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल जापान ने तो आधीच स्वीकारलेला आहे भले त्यांनी त्याला झेन हे नाव दिले असेल याला पर्याय नाही कारण ब्रम्हांडाशी आणि निसर्गाशी नाते जोडणे हे माणसाला आवश्यक वाटते त्याची ती एक मूलभूत गरज आहे आणि ती अन्न आणि वस्त्र यांच्या इतकीच खोल आहे अशा वेळेला तुम्ही एक तर काल्पनिक नाते जोडू शकता किंवा खरे नाते जोडू शकता मोक्ष खरे नाते जोडतो धर्म काल्पनिक नाते जोडतो यापैकी काय निवडायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे याबाबतीत माझे म्हणणे असे की काल्पनिक नाते निवडायचे असेल तर निदान मग असा धर्म निवडावा जो अधिकाधिक शैक्षणिक दृष्ट्या ओपन असेल सहिष्णू असेल ज्याने पुरोगामी वाद पचवलेला असेल आणि भारतात असा धर्म शैव धर्म असल्याने मी शैव धर्माची निवड करतो आता कोणी त्याला हिंदूशैव म्हणत असेल तर माझी काही हरकत नाही कारण टायटल पेक्षा माझा मुख्य भर हा आशयावर आहे 


हरारी याच्यापुढे असलेला पेच हा काँग्रेस पुढे असलेल्या हिंदू मुस्लिम प्रश्नासारखा आहे त्यामुळेच पाकिस्तान द्यायचे की नाही असा जो प्रश्न होता तसेच पॅलेस्टाईन द्यायचे की नाही असा हा प्रश्न आहे पॅलेस्टाईन नंतर आलेत आणि तरीही ते स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र क्लेम करतात हा क्लेम हिस्टॉरिकल आहे की नाही हा खरा मुद्दा आहे गमतीचा भाग असा आहे की सांगितले जाते ते सर्व दंतकथात्मक आहे धार्मिक आहे आणि ती श्रद्धा आहे असा मांडण केला जातो साहजिकच मग भारत पाकिस्तान युद्धासारखी ज्यू पॅलेस्टाईन युद्ध चालू राहणे अटळ आहे कारण मूळ भूमी आमची आहे अशी ज्यू लोकांची श्रद्धा आहे तर नंतर आलेल्या मुस्लिम लोकांनी आमची भूमि का मागावी आणि तीही एका दंतकथेच्या आधारे असा त्यांचा प्रश्न आहे वास्तविक इस्त्राईलसाठी स्वतंत्र राष्ट्र ही सुद्धा धार्मिक दंतकथा आहे तर प्रत्यक्षात देवाने असे प्रॉमिस दिले होते की नाही हे कोण ठरवणार ? शेवटी हा सारा खेळ श्रद्धेच्या प्रदेशात जातो आज ना उद्या हरारीला मोक्षाकडे वळावेच लागेल किंबहुना अलीकडे जू-धर्मामध्ये हादिस हा एक संप्रदाय कळत नकळत मोक्षाच्या दिशेने जातो की काय अशी शंका येणे इतपत वाटचाल करतो आहे त्यामुळे आज ना उद्या हरारी या दिशेने जाईल पण सध्या तरी तो ही धार्मिक चौकट घेतो आहे आणि त्या आधारे इस्त्राईलच्या काही गोष्टींना प्रमोट करतो आहे आणि काही ठिकाणी रिव्हॅल्युएशन मागतो आहे 


पुढे जाऊन मग अर्थातच टेररिझमच्या संदर्भात मांडणी करणे अटळ बनते उत्तर आधुनिकतेने दहशतवाद हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक प्रश्न म्हणून पाहिला पण चौथ्या नवतेमध्ये मात्र तो इतका झिरपला की तो वैयक्तिक आयुष्यात आला माझ्या बांधकाम चालू आहे या काव्यसंग्रहामध्ये यासंदर्भात अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि चॅनेल लव हॉरर अँड टेरर या काव्यसंग्रहात सुद्धा अनेक गोष्टी आलेल्या आहेतच वेगवेगळ्या प्रसिद्ध प्रकाशित काव्यसंग्रहात काही कविता आहेतच कारण चौथ्या नवतेमध्ये दहशतवाद ही फक्त धार्मिक गोष्ट राहत नाही तर मुळात ती वैयक्तिक होत जाते मोहम्मद अली जिना यांनी पुरोगामी दहशतवाद मांडलाा आयातुला खोमेनी यांनी उत्तराधुनिक दहशतवाद मांडला आणि आता अल कायद्याने चौथ्या नवतेचा दहशतवाद मांडलेला आहे यामध्ये सर्वात गाजलेला अमेरिकेवरचा ट्विन टॉवर अटॅक होता ज्याचे जगभर पडसाद उमटले आणि साहजिकच सर्वच विचारवंतांना त्याविषयी चर्चा करणे आवश्यक बनले माझ्या कव्हीं या काव्यसंग्रहात त्यामुळेच आयातुला खोमनी आणि ट्वीन टॉवर वरचा अटॅक या दोन्ही घटनांच्या वर कविता आहेत 


पुरोगामी दहशतवाद हा पुरोगामी राष्ट्र निर्माण करण्यासाठी केला जातो जिना यांची स्वतःची अशी खात्री होती की हिंदू हे अत्यंत मागासलेले असून ते पुरोगामी नाहीत उलट पुरोगामी वादाला इस्लाम हा जास्त पूरक आहे जी त्यांची गैरसमजुत होती अगदी अशाच प्रकारे धार्मिक तत्वावर आधारित आपणाला इस्रायली ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेले दिसेल बहुतांशी उत्तर आधुनिक विचारवंत हे ज्यू असल्यामुळे साहजिकच इस्त्राईलच्या निर्मितीला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला कारण त्यांची स्वतःची सिक्युरिटी त्यामध्ये होती हरारी ही याला अपवाद नाहीत परंतु कळत नकळत अमेरिका ही ज्यू लोकांची सेकंड ज्यू भूमी असल्यामुळे ती इस्त्रायलला नेहमी प्रोटेक्शन देत असते उत्तर आधुनिकता त्यामुळे नेहमीच ज्यू धर्माला पूरक राहिलेली दिसते भारतात ब्रााह्मण धर्माला अशा प्रकारचे प्रोटेक्शन क्षत्रिय वर्ण देतो अगदी वैचारिक पातळीवर सुद्धा सदानंद मोरे यांच्यासारखे लोक स्वतःला क्षत्रिय घोषित करून ब्राह्मण धर्माालाा व वर्णाला व्यवस्थित संरक्षण देत असतात या नात्यामुळे साहजिकच चौथ्या नवतेत शैव धर्माची पुन्हा एकदा नवीन मांडणी करायची वेळ आली आहे. त्याची पार्श्वभूमी अर्थातच पुरोगामी कालखंडामध्ये शैव धर्माने जे केले त्यात आहे ह्या कालखंडामध्ये मात्र शैव धर्म पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहिलेला होता कारण त्यामागे बसवेश्वर गुरुनानक शिवाजी महाराज संभाजी महाराज होळकर आणि महात्मा फुले यांचे अथक प्रयत्न होते हरारीला आधुनिकतेसंदर्भात असे काही करण्याची गरज भासली नाही त्याला ऑलरेडी आधुनिक आणि उत्तर आधुनिक ज्यू वारसा आहे त्यामुळे साहजिकच तो अधिक स्पष्टपणे चौथ्या नवतेची भूमिका खुलेपणाने मांडू शकतो मात्र बेसिक कडे जाण्याची गरज त्यालाही भासते 


मुळात जी भूमी एकेकाळी डायनासोरची वस्तीस्थान होती ती आता पॅलेस्टाईन आणि ज्यू यांच्यामध्ये विभागली गेलेली आहे अशी मांडणी करत तो पुढे सरकत असतो कारण त्याला हे आता हमास आणि इस्त्राईल यांच्यातील युद्ध संपुष्टात यावे असे वाटत असते कळत नकळत आत्ताचे वातावरण हे कट्टर धार्मिक आहे असे त्याला वाटत असते आणि तो काही मधला मार्ग काढता येईल का ते चाचपत असतो शांती प्रस्थापित कशी करता येईल ते चाचपत असतो प्रश्न असा आहे की संपूर्ण चौथ्या नवतेचाच हा लोच्या आहे काय? 


कारण एकीकडे कट्टर धार्मिक उन्माद आहे आणि दुसरीकडे नव्याने निर्माण झालेले चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान आहे यातील ज्यांना चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान निवडायचे आहे त्यांच्यापुढे जो पेच निर्माण होतो तो स्पेशल चौथा नवतेचा पेच आहे यावर एक उपाय म्हणून संपूर्ण नास्तिकता स्वीकारत धर्म संपूर्णपणे नाकारत पुढे जाता येते परंतु हे पुढे जाणे नकळत इस्लामवादाला प्रोत्साहन देते जरा सर्वच धर्मावर चौफेर हल्ला झाला तरच हा धर्माविरोधात असलेला हल्ला यशस्वी होऊ शकतो पण आपल्याकडे काही अतिशहाणे पुरोगामी लोक सेक्युलर दृष्टिकोनातून मांडणी करताना इस्लामची बाजू मांडत बसतात आणि ते मांडताना अल्पसंख्यांक वादाला ते उत्तेजन देतात त्यांच्या अधिकारांना उत्तेजन देतात त्यामुळे हा मार्ग अंतिमता इस्लामच्या इस्लामीकरणाला पूरक ठरत जातो आणि यामुळेच अधिक सावळा गोंधळ वाढलेला आहे किंबहुना पुरोगामी लोकांची जी दिशा आणि दशा झालेली आहे ती यामुळे झालेली आहे लोकांचा पुरोगामी लोकांच्यावर विश्वास उरलेला नाही कारण ते इस्लामच्या मागे ठाम उभे आहेत अशी त्यांची समजूत आहे किंवा कदाचित लोकांचे बरोबर असलेले आकलन आहे पुरोगामी लोक हे सर्व काही स्पॉन्सर केलेले आहे असे म्हणून मखलाशी करत बसतात आणि सामान्य माणसं ही काहीतरी बिनडोक असतात आणि हिंदुत्ववाद्यांना ती मॅनेज करणे फार सोपे जाते वगैरे गैरसमजुती बाळगून आपला डिस्कोर्स रेटत असतात प्रत्यक्षात लोकांनाच इस्लामचे भय वाटत आहे हे यांच्या लक्षात येत नाही आणि हे भय त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून आलेले असते याची ते साधी दखल सुद्धा घेत नाहीत त्यांना वाटते की गोळवलकरांची पुस्तके वाचून सामान्य माणूस बिथरला आहे 


इस्त्राईल बाबत असे काही होत नाही त्यामुळे एका अर्थाने हरारी काही गोष्टी साफ बघू शकतो मांडू शकतो एका अर्थाने चौथी नव्हता जितकी भारतामध्ये धर्मामुळे डागाळली जाते तितकी इस्त्राईलमध्ये डागाळली जात नाही आणि त्याचा फायदा कळत नकळत हरारीला मिळतो 


श्रीधर तिळवे नाईक

नारळीकर आणि शैव 

श्रीधर तिळवे नाईक 


जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचे मूल्यमापन सुरू होणे अटळ होते ते महाराष्ट्राचे विज्ञान पुरुष होते याबद्दल कुणाला शंका असू नये किमान वीस वर्षे तरी त्यांच्यासाठी हा किताब लागू होऊ शकतो अर्थात त्यानंतर अनेक वैज्ञानिक महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीत उदयाला आले मात्र मराठी संस्कृतीशी नाळ जुळवून वैज्ञानिक असणारा हा कदाचित पहिला वैज्ञानिक असावा ते आयुष्यभर महाराष्ट्रात आणि भारतभर विज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून कार्यरत होते हे सर्वश्रुत आहे त्याविषयी अनेकांनी लिहिलेले असल्याने मला लिहिण्याची काही गरज नाही


शिवांड व ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या प्रक्रिये संदर्भात माणसाला विलक्षण कुतूहल आहे आणि प्राचीन काळामध्ये अनेकदा श्रद्धा , मोक्ष आणि धर्म या तिन्ही आयामांनी यासंदर्भात अनेक सिद्धांत मांडलेले आहेत यातील बहुतांशी सिद्धांत काल्पनिक असल्याचे सिद्ध झाल्याने आता त्यांना फारसा आदर देता येत नाही म्हणजे जुडाईक धर्मातील सात दिवसात जग तयार झाले हा सिद्धांत आता एकदम बाळबोध वाटतो याबाबतीतली सर्वात समजूतदार मांडणी ही गौतम बुद्धाने केली कारण त्याने आदिचा शोधच घेतला नाही जे आहे ते वर्तमान आहे आणि वर्तमानात दुःख आहे त्या दुःखाचे कारण तृष्णा आहे आणि तृष्णा नाश केला की मोक्ष किंवा कैवल्य किंवा निर्वाण प्राप्ती होते अशी ही मांडणी आहे जिला आदिअंताची गरज नाही 


शैवांच्या बाबतीत मात्र असे झालेले नाही त्यांनी या जगाला आदी आणि अंत नाही ते अनादी आणि अनंत आहे अशी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेतली होती साहजिकच जेव्हा बिग बँगचा सिद्धांत आला तेव्हा त्या सिद्धांताला कसे हाताळायचे हा एक फार मोठा प्रश्न सर्व शैव आचार्यांच्या पुढे होता आणि त्याचे एक सोल्युशन नारळीकरांच्या सिद्धांतात आढळले होते


बिग बँग थेअरी ही विश्वाला आरंभ आहे असे मानते एक आरंभाचा विशिष्ट कालखंड ही देते हल्ली आरंभ सतत बदलत असतो ते सोडून द्या ती सांगते की कधी हा महास्फोट झाला व त्यासंदर्भात प्रत्यक्ष गणिती समीकरण मानते आणि त्या अंगाने काही प्रेडिक्शन्स देते ही प्रेडिक्शन्स खरी झाल्याने अनेकदा आजही बिग बँग सिद्धांत अधिक खरा आहे असे अनेकांचे म्हणणे आहे शैव मोक्षाला हे मान्य नाही त्याच्या मते विश्वाला आदि नाही त्यामुळे हा महास्फोट हा अनेकदा होऊन गेलेल्या आधीच्या स्फोटांपैकी एक आहे आणि पुढेही असे महास्फोट होणार आहेत प्रश्न असा आहे की महास्फोट झाल्यानंतर ब्रह्मांड प्रचंड गतीने विस्तार पावत आहे शैव मोक्षाला अनेक विश्वे आहेत हे मान्य आहे आणि ती सुद्धा अनंत आहेत असंख्य आहेत एवढे नक्की आहे शिवांडा मध्ये अनेक ब्रम्हांडे आणि एका ब्रम्हांडात अनेक विश्वे हा मूळ सिद्धांत आहे त्यामुळे जिला आज मल्टी वर्सेस म्हटले जाते ती शैव मोक्षाला मान्यच आहेत साहजिकच जेव्हा जयंत नारळीकर यांनी स्टडी सिद्धांत मांडला तेव्हा मोक्षाला आवश्यक असलेला एक आधार उपलब्ध झाला मात्र हा सिद्धांत वैज्ञानिक कसोटीवर अजूनही सिद्ध झाला असे म्हणता येत नाही मुळातच या मधला स्टेडी हा प्रकार शेव मोक्षाला मान्य नाही शून्य हेच शिव आहे आणि शून्यातून शिवांड निर्माण होत असते आणि नाहीसेही होत असते प्रश्न असा आहे की हे नाहीसे होणे आपणाला कळणार आहे का ? सध्याची परिस्थिती पाहता हे ब्रम्हांड इतक्या वेगाने फैलावत आहे की त्याचा साधा पाठलाग करणे सुद्धा आपणाला शक्य होणार नाही अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे अशावेळी नेमके निष्कर्ष काय काढायचे ? विज्ञानाला निरीक्षण लागते आणि इथे निरीक्षणाची अशक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळेच ज्ञानाची ही अशक्यता निर्माण झालेली आहे आणि खरा पेच हाच आहे 


मग इथे आपण बुद्धाकडे वळावे का ? म्हणजेच आदि आणि अंताचा विचार करण्यापेक्षा आपल्या वर्तमानाचा विचार करणे योग्य नव्हे का? जे विश्व आपल्याला आत्ता ज्ञात होते त्या ज्ञात विश्वाचे काय करायचे हा खरा प्रश्न नाही का ? मुळात आपल्याला जे विश्व दिसते ते जर अब्जावधी वर्षापूर्वीचे असेल तर निरीक्षणे या गोष्टीचा काय अर्थ होतो ? आणि या गोष्टीला काय अर्थ उरतो? आपल्या विश्वा पेक्षा अधिक विश्वे असतीलही पण ती आपणाला दिसणार नसतील तर आपण त्यावर विचार का करावा ? मोक्ष मिळालेल्या माणसाला शून्यत्वाचा आणि अनंतत्वाचा एक समग्र आणि अनंत अनुभव असतो तो शब्दात मांडता येत नाही त्यामुळे मोक्षाकडून या संदर्भात काही मदत मिळण्याची शक्यता नाही हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो मोक्ष मिळालेला माणूस म्हणजे सर्वज्ञ असतो हा एक फार मोठा गैरसमज आहे आणि आपल्याकडे तो पद्धतशीरपणे टिकवणारे भुक्कड लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे ज्या मोक्ष मिळालेल्या लोकांना साधा पाण्याचा एच टू ओ हा फॉर्मुला सुद्धा सापडला नाही त्या मोक्ष मिळालेल्या माणसाला सर्वज्ञ म्हणतात ही खरंतर xमेडी आहे पण ती मोक्ष मिळालेल्या माणसांच्या मुळे निर्माण झालेली नाही तर मोक्ष मिळालेल्या माणसांच्या भोवती जे अति शहाणे आणि अंध भक्त असतात त्यांच्यामुळे झालेली आहे 

विश्व स्थिर आहे म्हणजे स्थिरता म्हणजे काय आणि स्थिरतेची नेमकी व्याख्या काय करता येईल हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण लवचिक स्थिरता असे काही आपण गृहीत धरले तर लवचिकता नेमकी किती ताणली जाते असा प्रश्न निर्माण होतोच नारळीकरांच्या मुळे असे अनेक प्रश्न माझ्या आयुष्यात निर्माण झालेले होते. लवचिकतेचा ताण ही एक समजा आपण वैज्ञानिक संकल्पना मांडली तर तिच्याविषयीची अनेक वैज्ञानिक समीकरणे आपणाला शोधावी लागतात दुसरी गोष्ट हा ताण अनंत असू शकतो का असाही प्रश्न निर्माण करता येईल नारळीकर असे अनेक भंजाळून जाणारे प्रश्न निर्माण करतात दुर्दैवाने मराठीत त्याच्यावर जशी चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाली नाही ज्या काळामध्ये महास्फोटाचा सिद्धांत स्थिर झाला होता त्या काळात आपल्या स्थिरतेच्या सिद्धांताने नारळीकरांनी तो विचलित करून टाकला ही वस्तुस्थिती ! या सिद्धांताच्या शक्यता अजूनही संपलेल्या नाहीत मात्र त्यामध्ये विश्व आणि अर्थात शिवांड सतत निर्माण होते आणि नाहीसे होते ही भर टाकावी लागेल ती वैज्ञानिक पातळीवर कशी टाकता येईल हा एक फार मोठा प्रश्न आहे मुळातच मानवी प्रज्ञेचा आवाका मर्यादित असल्याचे लक्षात आल्याने आता फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंबहुना ज्ञानाची मर्यादा अशी एक संकल्पना आता तत्त्वज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत जाण्याची शक्यता आहे यासाठी मुळातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाच असा पर्याय आहे जो आपणाला भविष्यातल्या वैज्ञानिक सिद्धांतांच्या अनेक शक्यता उकलून दाखवू शकतो काही आत्तापर्यंतचे अशक्य वाटणारी पोस्ट पोस्ट क्वांटम उपकरणे जर का तयार होत गेली तर कदाचित प्रकाशापेक्षा अधिक वेगाचे इप्सित साध्य होऊन आपण या संदर्भात काही गोष्टी करू शकतो मात्र अजून तरी या सर्व गोष्टी वैज्ञानिक दंतकथा आहेत त्या प्रत्यक्षात सिद्ध झालेल्या नाहीत जयंत नारळीकर यांच्या बद्दल भाऊक पद्धतीने लिहिणारे ही खूप लोक आहेत परंतु ती पद्धत फारशी आता कामाची उरलेली नाही माणसाचे भावनाशील असणे हेच कदाचित विचारांच्यावर अवलंबून असू शकते इथपर्यंत सर्व काही आलेले आहे किंबहुना तर्कशून्य तीव्र विचार म्हणजे भावना असेही म्हणता येईल त्यामुळे कलेचे अस्तित्व धोक्यात आलेले असल्याने अनेक कलावंत हल्ली खूपच भावनाळु होतात पण त्याने फार काही साध्य होईल असे मला वाटत नाही याचा अर्थ कलेचा व्यवसाय बंद होईल असे नाही कारण शेवटी भावना वाचणे व भावनाळू असणे ही माणसाची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता कला साध्य करत असते 


नारळीकरांच्यावर मी ताबडतोब लिहिणार होतो परंतु त्यांच्यावर काही सुंदर पोस्ट आल्या आणि मी थांबलो माझ्या तरुण वयात मला त्यांच्याबद्दल प्रचंड फॅसिनेशन होते कारण समाज, विज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचा जो समतोल त्यांच्याकडे होता तो महाराष्ट्राच्या एकाही माणसांमध्ये नव्हता 1990 नंतर हळूहळू काही माणसे उदयाला आली परंतु नारळीकर हे या संदर्भातील पहिले विज्ञान पुरुष होते असे म्हणावयास हरकत नाही 


त्यांना माझी आदरांजली महाराष्ट्राचा विज्ञान पुरुष निघून गेलेला आहे आता आपण विज्ञानाचे काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे बाकी भावनिक उमाळे काढून ज्यांना जागरच करायचा आहे त्यांना काय बोलावे?


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना