चॅनेल श्री वहिनी

 कित्येक गोष्टी अंधुकश्या दिसतायत टिव्ही आल्यापासुन


प्रेयसीचा स्तन आईचे मन भावाचा धन बहिणींचा फन भाचीचा रन भाच्याचा

मित्रगण


सगळं अंधुक होत चाललंय धाकधुक शाबूत ठेवत


बायका सोप ऑपेरा पाहतायत आणि अधूनमधून जेवणही


वाढतायत


पुरुष फेस्टीवल्स आणि कास्टिवल्स दोन्ही अटेन्ड


करतायत


पोरं कार्निवल्स आणि हॉर्निवल्स दोन्हि एन्जॉय करतायत


जे जाहिरातीत आहे ते घरी कधी येतंय ह्याची वाट पाहतायत


सगळ्यांचे डोळे


जी सोप ऑपेरात आहेत ती सारी भांडणे प्रत्यक्ष घरात कधी


एन्ट्री मिळतीये ह्याची वाट पाहत दबा धरून आहेत


कौन बनेगा करोडपतीतच मौन आहेत करोडो पती


फक्त एक जीभच आहे जिला आपल्या जागी स्वस्थ बसता येत नाहीये ती तिला मिळेल त्या जागी


जाऊन बसतीये आणि फॅड काढून वाट बघतीये


तिचा डंख हीच इंटरवल


किंवा स्पिरिच्युअल ब्रेक


श्रीधर तिळवे -नाईक 

 (चॅनेल सिरीजमधील '' श्रीवाहिनी '' ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना