मोक्ष ELCETRA

 श्रीधर तिळवे नाईक 


१ 


समोर पुष्पा 

आणि तुझा दोस्त सतत तुझी आठवण काढत 

पुष्पां भारतासारखा दिसतो ना दादा ?

मी पुष्पाच्या जागी पुष्पां पाहतोय 

तुझ्याजागी तू 



तुझ्यासारखे अनेक असतील 

ज्यांना पुष्पा होतं आलं नाही 

काय कमी पडलं ?

तुझ्या डाव्या हातांची शैली मजबूत होती 

धैर्य काठोकाठ होतं 

तुझा दोस्त म्हणतोय 

"दादा भारतकडं डोकं न्हवतं 

तुझ्याकडं तेही होतं "

तुझं धैर्य मोक्षाकडे वळलं नाही 

मी डोकं धैर्याच्या दिशेनं कधी वळवेन ह्याची वाट पाहत राहीलं 


लोकांना मोक्ष नको होता 

पण तुलाही नको होता ?

आतल्या तडसेवर उपाय म्हणून दारू शोधलीस 

हाती काय लागलं ?

दारू ?


आत ग्लास असतो 

आणि तो दारूनं तात्पुरता भरता येतो 

किंवा मोक्षाने कायमचा 

लोक तात्पुरते का होतात 

आणि तुही का झालास तत्पर 

तात्पुरत्यासाठी 



तुझ्यासारखे कित्येक वाया गेले 

मेंदूतल्या जंगलातील लाल चंदन स्मगल करत 


रक्तचंदन ही कल्पना आहे 

लोक लाल चंदनाने ती भरून काढतात 


रक्त चंदन व्हायला 


मोक्ष मिळवावा लागतो 


श्रीधर तिळवे नाईक 


(मोक्षाच्या कविता ह्या काव्यफाईलीमधून )

Comments

Popular posts from this blog

A I

DHARM ANI CHAUTHI NAVTA